Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

हॉटेल्स, टेरेस रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील रस्त्यावरची लहान-मोठी अतिक्रमणे जमीनदोस्त केल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता मोठ्या अनधिकृत बांधकामांकडे मोर्चा वळवला आहे. शहरातील अनधिकृत लॉन्सपाठोपाठ आता अनधिकृतपणे वापर सुरू असलेले बेसमेंट व टेरेसवरील हॉटेल्स, दुकाने व गोडावून रडारवर घेतले आहेत. शहरातील १६३ अनधिकृत लॉन्सला अंतिम नोटिसा पाठवल्यानंतर आता टेरेस आणि बेसमेंटमधील ६४ हॉटेल्स, १२६ गोडावून आणि १०५ दुकानांवर हातोडा चालविण्याची तयारी सुरू केली आहे. नगररचना विभागाने अंतिम नोटिसा काढत, या सर्वांवर कारवाईची फाइल अतिक्रमण विभागाकडे सुपूर्द केली आहे. त्यामुळे १ जूनपासून शहरात अनधिकृत बांधकामांविरोधातील मोठी मोहीमच सुरू होणार आहे.

मुंबईतल्या कमला मील कंपाऊंडमध्ये दुर्घटनेनंतर महापालिकेनेही शहरातील अनधिकृत हॉटेल्सच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने महिनाभर सर्वेक्षण करीत, शहरातील बेसमेंट व टेरेसवर सुरू असलेल्या अनधिकृत वापर असलेल्या हॉटेल्स व गोडावूनची यादीच तयार केली होती. या सर्व्हेक्षणात शहरात बेसमेंटमध्ये २५ तर टेरेसवर २१ अशी ४६ हॉटेल्स आढळून आले होते. पाठोपाठ बेसमेंटमध्ये १०४ तर टेरेसवर १२ असे एकूण १२६ गोडावून अनधिकृतपणे सुरू असल्याचे आढळून आले होते. बेसमेंटमध्ये अनधिकृतपणे १०५ दुकाने सुरू असल्याचे समोर आले होते. ५६ ठिकाणी निवासी क्षेत्राचा वापर व्यावसायिक कामांसाठी केला जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाकडून या अनधिकृतपणे वापर करणाऱ्या हॉटेल्स, गोडावून, दुकाने असा वापर करणाऱ्या ३३४ व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या. या सर्वांवर अंतिम कारवाईची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. त्यानुसार या सर्वांना अंतिम नोटिसा पाठविण्यात आल्या असून, अनधिकृत बांधकामे पाडल्याचा खर्च संबंधित व्यावसायिकांनाच करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील कारवाईसाठी संबंधित फाइल अतिक्रमण विभागाकडे पाठविण्यात आली आहे. १ जूनपासून या कारवाईला सुरुवात होणार आहे. यामध्ये महापालिकेच्या लागून असलेल्या सुयोजित कॉम्प्लेक्स आणि बाफना कॉम्प्लेक्सचाही समावेश असल्याची माहिती नगररचना विभागाच्या वतीने देण्यात आली.

१६३ लॉन्सवर चालणार हातोडा

महापालिकेने शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या १६६ लॉन्स व मंगल कार्यालयांना यापूर्वीच नोटिसा दिल्या होत्या. त्यांना दंड भरून नियमित करण्यासाठी संधी दिली होती. यापैकी केवळ तीन लॉन्सचालकांनीच महापालिकेडे अर्ज केला आहे. त्यामुळे महापालिकेने आता सर्वप्रथम १६३ लॉन्स आणि मंगल कार्यालयांवर हातोडा चालविण्याची तयारी सुरू केली आहे. या सर्वांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या असून अतिक्रमण विभागाला त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.

अनधिकृत वापराचा प्रकार -बेसमेंट-टेरेस

हॉटेल्स-२५-२१

गोडावून-१०४-१२

दुकाने -१०५-००

इतर वापर-४७-०९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडकोत पुन्हा गाड्यांची तोडफोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरात गाड्या जाळणे व गाड्यांची मोडतोड करण्याचे प्रकार अद्याप सुरूच आहेत. कामटवाडे परिसरात शुक्रवारी काही समाजकंटकांनी गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. परिसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने हे करण्यात आले असून, पोलिसांनी समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कामटवाडे, अभियंतानगर येथे मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास संदीप पाटील यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. बिल्डिंगच्या वाहनतळावर उभ्या असलेल्या सफारी कारच्या (एमएच ४६, झेड ३७०२) काचा फोडण्यात आल्या. या प्रकाराने परिसरात घबराट निर्माण झाली असून, सिडको परिसरात असे कृत्य वारंवार होत असल्याचे दिसत आहे. याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हा सर्व प्रकार कैद झाला आहे. पाटील यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असला तरी वारंवार होणाऱ्या या प्रकारांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूर नाक्यावर एकावर चाकू हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नांदूर नाका येथील श्रीराम कॉलनी येथे गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या कारणावरून दोघा पिता-पुत्रांनी एका व्यक्तीवर चाकूने वार करीत जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदूर येथे राहणारे युवराज भारुलाल देवरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. नांदूर नाका येथील मराठा नगर, श्रीराम कॉलनी येथे बुधवारी (दि. ९) रोजी रात्री दहा वाजता संशयीत अनिल माधव वाडेकर (वय ४७) आणि अभिजित अनिल वाडेकर (वय २७) यांनी त्यांच्या मोबाइलमधील गाण्याचा आवाज मोठा केला होता. देवरे यांनी हा आवाज कमी करण्यास सांगताच या दोघांनी त्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याच्या गुप्त भागावर चाकूने वार करून त्याला जखमी केले. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलिस्टतर्फे पोलिसांप्रती कृतज्ञता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्टसह सदस्यांनी पोलिस कृतज्ञता दिन उत्साहात साजरा केला. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह शहर पोलिस आयुक्तालय, सर्व विभागीय कार्यालये, सरकारवाडा, पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, अंबड, सातपूर गंगापूर, भद्रकाली, मुंबई नाका पोलिस स्टेशनला भेट देऊन पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फूल आणि एक पेन भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न सायकलिस्ट सदस्यांनी केला.

सामान्य नागरिक आणि पोलिस बांधव यांच्यातील सुसंवाद वाढून अपप्रवृत्तींना नैतिक धाक निर्माण व्हावा, पोलिस दल आणि सकारात्मक नागरिक सोबत आहेत हा संदेश संपूर्ण समाजात पोहचावा म्हणून आपण 'पोलिस कृतज्ञता दिन' साजरा करण्यात आला. यावेळी नाशिक सायकलिस्ट सदस्यांकडून नो होर्न डे, वाहतूक सुरक्षा अभियान, सीटबेल्ट, हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती यामध्ये असलेल्या सहभागाबद्दल नाशिक पोलिसाकडून कौतुक करण्यात येऊन ही मोहीम अधिक व्यापक व्हायला हवी, अशी अपेक्षा आयुक्त सिंगल यांनी व्यक्त केली आहे. यावेळी नाशिक पोलिसांकडे वापरात असलेल्या विविध शस्रांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

नाईट एनआरएममध्ये पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासोबत अनेक पोलिस अधिकाऱ्यांसह १०० सायकलिस्टने सहभाग नोंदविला. आजवर झालेल्या १६ एनआरएम राइड्समध्ये पोलिस खात्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. महिला दिनानिमित्त होणाऱ्या सायकल राइडसमध्येही पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे नाशिक सायकलिस्ट आणि शहर पोलिस आयुक्तालयाकडून होणाऱ्या उपक्रमांद्वारे सायकल आणि समाज यांचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होत आहे. येत्या १३, १४ आणि १५ जुलै दरम्यान आयोजित पंढरपूर सायकल वारीमध्ये पोलिस दलाच्या सदस्यांना आमंत्रित करण्यात आले. यासाठी विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिगत वीज तारांचे सोमवारपासून सर्वेक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागपूरच्या धर्तीवर नाशिकमध्येही महावितरण कंपनीच्या वतीने वीजतारा भूमिगत करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. महापालिका आणि महावितरणच्या वतीने शहरातील वीजतारा भूमिगत करण्यासाठीचे सर्वेक्षणाचे काम सोमवारपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी २० कोटी रुपये मंजूर झाले असून त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ८६ किलोमीटरच्या वीजतारा भूमिगत करण्यात येणार आहेत. त्यात ६१ किलोमीटर नव्या भूमिगत वीज तारांचा समावेश आहे.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये भूमिगत वीजतारांसाठी ८७ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्याअंतर्गत शहरात सध्यस्थितीत उघड्यावर असलेल्या वीजतारा या भूमिगत केल्या जातील असा दावा करण्यात आला. नागपूरच्या धर्तीवर नाशिक महापालिकेने महावितरण कंपनीसोबत करार करावा, अशी अट घालण्यात आली. यामध्ये रस्ते फोडण्यासाठी लागणारा खर्च महापालिकेने न घेता, महावितरण कंपनीने रस्ते बुजवण्याचा ठराव करण्यात आला. त्यासंदर्भात महासभेनेही ठराव दिला आहे. त्यानुसार महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

एकात्मिक ऊर्जा सक्षमीकरण योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात २० कोटींच्या भूमिगत तारांचे काम केले जाणार आहे. त्यात एकूण ८६ किलोमीटरचे भूमिगत तारांचे जाळे टाकले जाणार आहे. त्यात २५ किलोमीटरच्या उघड्यावरील तारा भूमिगत केल्या जाणार असून ६१ किलोमीटर भूमिगत तारांचे नवीन जाळे टाकले जाणार आहे. या कामासाठी महापालिका आणि महावितरणकडून सोमवारपासून संयुक्तपणे सर्वेक्षण केले जाणार आहे.

भाजपचा दावा खोटा

नाशिक दौऱ्यावर आलेल्या उर्जामंत्र्यानी उघड्यावरील वीजतारा भूमिगत करण्यासाठी शहरासाठीच ८७ कोटींचा निधी मंजूर केल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. प्रत्यक्षात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र हा निधी संपूर्ण जिल्ह्यासाठी असल्याचा दावा केला आहे. नाशिकला केवळ २० कोटीच मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांचा दावा खोटा ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिचारिकांनी ठेवावे रुग्णसेवेचे व्रत कायम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प परिसरासह आजूबाजूच्या  ३२ गावांमधील नागरिकांवर उपचार करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलमधील परिचारिका कायम तत्पर असतात. त्यांनी रुग्णसेवेचे हे कौतुकास्पद व्रत अव्याहत  सुरू ठेवावे, जेणेकरून रुग्णांना आरोग्यासह मानसिक समाधानदेखील लाभेल , असे प्रतिपादन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी केले. 

जागतिक परिचारिका दिनानिमित्त देवळाली  कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये आयोजित परिचारिका सत्कार कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्ड वॉर्ड क्रमांक ४ च्या नगरसेविका आशा गोडसे व चंद्रकांत गोडसे यांच्या वतीने  भैरवनाथ महिला सेवाभावी संस्था व शिवनेरी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सर्व परिचारिकांना सीईओ अजय कुमार व हॉस्पिटल सुप्रिटेंडंट डॉ. जयश्री नीतेश यांच्या हस्ते किटाणूमुक्त हात राहण्यासाठी  हँड सॅनिटायझर व रुमाल भेट देण्यात आले. यावेळी नगरसेविका आशा गोडसे म्हणाल्या, की रुग्णांची रात्री-अपरात्री सेवा-सुश्रुषा करणाऱ्या परिचारिकांचा सन्मान केला जावा, या उद्देशाने आमच्या संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मधुकर गोडसे, दत्तात्रय गायकवाड, रोशन गोडसे, प्रदीप पाटील, गणेश देवकर आदी उपस्थित होते.

(फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर- फोटो

सिटिझन रिपोर्टर्सचा सन्मान...

$
0
0

सिटिझन रिपोर्टर्सचा सन्मान...

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे दर आठवड्याप्रमाणे निवडक सिटिझन रिपोर्टर्सचा सन्मान करण्यात आला. रस्त्याची समस्या पाठविणारे प्रीतम नाईक आणि एसटीचा कारभार चव्हाट्यावर आणणारे पीयूष जोशी यांना 'मटा'चे निवासी संपादक शेलेन्द्र तनपुरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

----

सिटिझन सन्मान

फोटो - पंकज चांडोले

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे वाहनतळाकडे जाणारा मार्ग बंद

$
0
0

रेल्वे वाहनतळाकडे जाणारा मार्ग बंद

जेलरोड : नाशिकरोड रेल्वे स्थानकातून आरपीएफमागील वाहनतळावर जाण्याचा रस्ता बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तेथे होणारी फुकट्यांची गर्दी कमी झाली आहे. प्रवाशांना सुभाषरोडमार्गेच यावे लागते. नाशिकरोड रेल्वेतर्फे देवी चौक, पार्सल ऑफिस आणि आरपीएफ कार्यालयामागेच अधिकृत वाहनतळ आहेत. अनेक जण तिकीट काढण्याच्या बहाण्याने आरपीएफमागील वाहनतळावर वाहने लावून प्रवासाला निघून जातात. वाहनतळाचे पैसेही भरत नाहीत, तसेच जागा अडवून बसतात. त्यामुळे ठेकेदाराचा तोटा होतो. या वाहनतळावर क्षमतेपेक्षा दुप्पट गर्दी होऊ लागली होती. त्यामुळे वाहनतळाकडे रेल्वे स्थानकातून येणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. आता या ठिकाणी सुभाषरोडमार्गेच जाता येत आहे. बहुसंख्य नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असले, तरी काहींनी नाराजीदेखील व्यक्त केली आहे.

--

(थोडक्यात)

भारतरत्न फाउंडेशनतर्फे उद्या भीमगीतांची मैफल

जेलरोड : नाशिकरोड येथील भारतरत्न फाउंडेशनतर्फे सोमवारी (दि. १४) सायंकाळी सात वाजता बुद्ध व भीमगीतांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजक रवींद्र जाधव यांनी दिली. प्रसिद्ध गायक गणपत जाधव ही गीते सादर करणार आहेत. देवळालीगाव येथील मालधक्कारोडवरील मातोश्री रमाबाई आबंडेकरनगरमध्ये हा कार्यक्रम होईल. सोनू आंधळे, अनिल चंद्रमोरे, चेतन चंद्रमोरे, अजय जवरे, महेश चंद्रमोरे, दीपक भालेराव, जीवन आहिरे, विशाल जाधव, रवी धोंगडे आदी संयोजन करीत आहेत.

--

आज विविध कार्यक्रम

नाशिक : आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे आज, रविवारी (दि. १३) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण, सत्संग व रक्तदान शिबिर यांचा त्यात समावेश आहे. चुंचाळे टेकडी, अंबड येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत वृक्षारोपण, सायंकाळी ५ ते १० या वेळेत रक्तदान शिबिर आणि सायंकाळी ६.३० ते ९.०० या वेळेत सत्संगाचा कार्यक्रम होणार आहे. जुना गंगापूर नाका येथील शंकराचार्य न्यास हॉल येथे हे कार्यक्रम होणार असल्याचे सुरज मालपुरे यांनी कळविले आहे.

--

नागचौकातील पथदीप बंद

पंचवटी : नाग चौकातील मंदिरासमोरच्या रस्त्यावरील पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. परिणामी मोठ्या लोकवस्तीच्या या भागातील अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावर अंधार पसरत आहे. त्याचा त्रास येथील रहिवाशांसह या रस्त्याने जाणारे वाहनचालक, पादचारी यांनाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे यंथील बंद असलेले पथदीप त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

--

पोलिसांचा गौरव (फोटो)

नाशिकरोड : आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस जागरूक असणाऱ्या पोलिसांप्रति पोलिस कृतज्ञता दिनानिमित्ता केरला महिला सेवा समितीतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भद्रकाली पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांना समितीच्या अध्यक्षा जया कुरुप यांच्या हस्ते गुलाबपुष्प देवुन गौरविण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त पाटील, निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जलाजा सुगुनन, मिनी नायर, अनू रवींद्रन, जया हरिदास, माया नायर, स्नेहित कुरुप, वसंत कुरुप आदींनी संयोजन केले.

--

पंचवटीत सत्कार

पंचवटी : पंचवटी पोलिस ठाण्यात उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पंचवटी शांतता समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील, देवांग जानी, किशोर गरड, लक्ष्मण धोत्रे, सचिन पाटील, अतुल शेवाळे आदी उपस्थित होते. म्हसरूळ पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चिवडा व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, संजय बेडवाल, प्रदीप वाघचौरे, मनोज हिरे, चांदनी पाटील, सुरेश माळोदे, मनीषा मल्ला, शिल्पा अवस्थी आदी उपस्थित होते.

--

युवासेनेतर्फे सन्मान

नाशिक : पोलिस कृतज्ञता दिनानिमित्त युवासेना नाशिक जिल्हा व राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळातर्फे भद्रकाली पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, सहाय्यक निरीक्षक कमलाकर जाधव यांचे आभार मानून त्यांना शाल, गणेशाची प्रतिमा व गुलाबपुष्प त्यांचा सन्मानित करण्यात आले. अन्य कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. युवासेनेचे उपमहानगर प्रमुख गणेश बर्वे, सचिन रत्ने, बंटी रॉय, दुर्गेश माळोदे, आदित्य अक्कर, अशोक जैन, करण घोडके, योगेश मुंदडा आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋषभ पंतने बेंगळुरूला धुतले

$
0
0

ऋषभ पंतने बेंगळुरूला धुतले

दमदार खेळी करत ६१ धावांवर बाद

दिल्ली : येथील फिरोजशहा कोटला मैदानावर सुरू असलेल्या दिल्ली विरुद्ध बेंगळुरूच्या सामन्यात प्रेक्षक दिल्लीच्या ऋषभ पंतची

फलंदाजी पाहून तृप्त झाले. पंतच्या एकसे बढकर एक फटक्यांनी बेंगळुरूच्या गोलंदाजीची अक्षरश: पिसे निघाली. पंतने अवघ्या ३४ चेंडूत ६१ धावा ठोकल्या. आयपीएलमधले हे ऋषभचे सातवे अर्धशतक ठरले. पंतने चार उत्तुंग षटकार आणि पाच चौकार लगावले. त्याच्या कामगिरीच्या बळावर दिल्लीने बेंगळुरूपुढे विजयासाठी चार बाद १८१ धावांचे लक्ष ठेवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक मतदारसंघासाठी ८ जूनला मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुलही वाजला आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी याबाबतची घोषणा केली. ८ जून रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, १२ जूनला मतमोजणी होणार आहे. १५ मे रोजी याबाबतची अधिसूचना प्रसिध्द केली जाणार असून, नाशिकसह विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विद्यमान सदस्याची मुदत ७ जुलैला संपुष्टात येत आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, १५ मे रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द केली जाईल. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी २२ मे ही अंतिम मुदत आहे. २३ मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी, तर २५ मे रोजी दुपारी तीनपर्यंत माघारीची मुदत आहे. ८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत मतदान होणार असून, १२ जून रोजी मतमोजणी होईल.

जिल्हानिहाय मतदार

नाशिक - १४ हजार

नगर - १२ हजार ७००

जळगाव - ९ हजार

धुळे व नंदुरबार - ८ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट अॅप’मध्ये त्रुटी

$
0
0

शहर परिसर

'स्मार्ट अॅप'मध्ये त्रुटी

महापालिकेच्या स्मार्ट नाशिक अॅपवर कोणतीही तक्रार केल्यावर कम्प्लेंट नंबर मिळत नाही. त्यामुळे केलेल्या कम्प्लेंटचा कुठेही रेकॉर्ड मिळत नाही. आपण केलेल्या तक्रारीला सरळ केराची टोपली दाखविली जाते. हा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. संबंधित यंत्रणांनी याची दखल घ्यावी.

-तुषार ठाकरे

जुने नाशिक

पथदीप बंदने गैरसोय

जुने नाशिक परिसरातील झरेकारी कोठ परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पथदीप बंद आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना नाहक गैरसोय सहन करावी लागत आहे. यासंदर्भात महापालिकेत फोन केला, पण काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे परिसरात अंधार आहे.

-नितीन नाईक

इंदिरानगर

दुरवस्थेकडे दुर्लक्ष

वडाळा-पाथर्डीरोडवर इंदिरानगरमध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. येथील बसण्याच्या बाकांचीही दुरवस्था झालेली आहे. महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीसह गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत उपाययोजनेची गरज आहे.

-सुनील जोशी

गंगापूररोड

अस्वच्छतेचा कळस

गंगापूररोडवरील प्रमोद महाजन गार्डनमधील स्वच्छतागृहाची सध्या प्रचंड दुरवस्था झालेली आहे. साधी पाण्याची सुविधाही येथे नाही. दररोज शेकडो नागरिक तेथे येतात आणि अशी असुविधा? महापालिका करते तरी काय, असा प्रश्न यामुळे पडतो. लोकप्रतिनिधींनीही याप्रश्नी उपाय योजावेत.

-आदित्य कुलकर्णी

शहर परिसर

पालकांनी घ्यावी दक्षता

हल्ली मुले-मुली बिनधास्तपणे वाहने चालवताना दिसतात. अज्ञान वयात गाडी चालविणे हे त्या मुलांसाठी धोक्याचे आहे. चुकून अपघात होऊन मोठी इजा होऊ शकते किंवा रस्त्यावर चालणाऱ्याला इजा होऊ शकते. त्यामुळे पालकांनीच याससंदर्भात पुरेशी दक्षता घ्यायला हवी.

-मनोहर पवार

दीपालीनगर

भटक्या कुत्र्यांचा त्रास

दीपालीनगर, विनयनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळत्या रस्त्याने पायी चालताना प्रचंड भीती वाटते. ही कुत्री दुचाकीस्वारांच्या मागे धावत असल्याने अनेकांची धांदल उडत आहे. महापालिका या कुत्र्यांचा बंदोबस्त का करीत नाही?

-ईशांत साबळे

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्या नको; नैराश्यावर मार्ग शोधा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दैनंदिन जीवनातील ताणतणाव, मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना, नैराश्य यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे वारंवार समोर येत आहेत. नुकतेच पोलिस अधिकारी हिमांशू रॉय यांनी आजाराला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलले आणि राज्यभरात खळबळ निर्माण झाली. गेल्या काही महिन्यात नाशिकमध्येही आत्महत्येची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. आयुष्याचा अशाप्रकारे होणारा शेवट हा कुटूंबियांबरोबरच समाजेही मन हेलावणारा ठरत आहे.

शारीरिक सुदृढतेबरोबरच आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मानसिक सुदृढताही तितकीच गरजेची आहे. परंतु, याकडे अद्यापही तितक्या गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे वास्तव आहे. मानसिक शांती नसल्याने आलेले नैराश्य हे आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यास कारणीभूत ठरत आहे. अशाप्रसंगी संवाद साधणे, चर्चा करून समस्यांवर मार्ग शोधण्याचा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांकडून दिला जात आहे. नैराश्य पूर्णत: बरे होऊ शकत असल्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलू नका, असा संदेशही दिला जात आहे.

\B

\Bशिक्षण, पद, आर्थिक सुबत्ता, रंगरुप यांच्या पुढे जाऊन उदासीनता, नैराश्य कोणालाही होऊ शकते. आत्महत्येसारख्या कारणाने कोणाचाही मृत्यू होणे हे दू्र्दैवी आहे. प्रत्येक जीव महत्त्वाचा असतो. नैराश्य आणि आत्महत्येची प्रवृत्ती काही जणांमध्ये नैसर्गिक असते. त्याला जेनेटिक्स बेसिक असतो. दूर्धर आजार, व्यावसायिक, आर्थिक, प्रेम प्रकरण, परीक्षा यांतील अपयशामुळे येणारा मानसिक ताण किंवा नैराश्य आत्महत्येकडे एखाद्या व्यक्तीस ढकलू शकतात. हे सर्व वेळीच ओळखणे, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे, आवश्यक उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. हे केल्याने नैराश्य पूर्ण बरे होऊ शकते. जवळच्या व्यक्तींनी समजून घेऊन मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतल्यास आत्महत्येसारखी दुर्दैवी घटना निश्चितपणे थांबवता येऊ शकतात.

\B- डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचारतज्ज्ञ

\B

मेंदूत होणारे रासायनिक बदल ताणतणावास व परिणामी आत्महत्यांसारख्या घटनांना कारणीभूत ठरतात. आपण एखाद्या संकटाला, आजाराला कशा पद्धतीने सामोरे जातो, हे एखाद्या व्यक्तीच्या स्वभावावरदेखील अवलंबून असते. जर कोणी आपल्या शारीरिक सुदृढतेविषयी सजग असेल तरीदेखील त्याला आजाराचा सामना करावा लागतो, ही बाब खच्चीकरण करणारी ठरते. त्यामुळे आत्महत्येची पावले उचलली जाऊ शकतात. यासाठी वेळीच मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली तर फायदेशीर ठरू शकते.

\B- डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचारतज्ज्ञ

\B

प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावाचा सामना करत असते. तणावाचे प्रमाण मात्र कमी जास्त असते. स्वत:च्या दिनचर्येत झालेले बदल, अनुत्साह यामुळे आपल्याला नैराश्याची जाणीव होते. याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब जवळच्या व्यक्तींशी, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. यातून समस्यांवर मार्ग शोधणे सोपे जाते.

\B- डॉ. मानस सुळे, मानसोपचारतज्ज्ञ\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात २७ तारखेला सर्वजातीय वधू-वर मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लग्नगाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असे म्हटले जाते. परंतु, त्यासाठी मानवी प्रयत्नही तितकेच गरजेचे असतात. भावी आयुष्यातील सुयोग्य जोडीदाराच्या निवडीचा क्षण हा अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो.

या क्षणांना अधिक आनंददायी बनविण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स व अनुपमशादी डॉट कॉम यांच्या वतीने सर्वजातीय वधू-वर मेळावा (स्वजातीय व आंतरजातीय) आयोजित करण्यात आला आहे. दि. २७ मे रोजी सकाळी १० वाजता हॉटेल एमराल्ड पार्क, मायको सर्कल नाशिक येथे हा मेळावा होणार आहे.

अनुपमशादी डॉट कॉमतर्फे आजपर्यंत विविध समाजाचे सात वधू-वर मेळावे, वेडिंग स्वयंवर यशस्वीरीत्या पार पडले आहेत. या सर्व वधू-वर मेळाव्यांतून अनेकांचे विवाह जुळले आहेत. या पद्धतीने वधू-वर मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र टाइम्स व अनुपमशादी डॉट कॉमने प्रथम नोव्हेंबर २०१३मध्ये केले होते. तेव्हापासून झालेल्या सर्व वधू-वर मेळाव्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आता हा आठवा वधू-वर मेळावा सर्व समाजांसाठी आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या उपवधू-वर यांना लग्न जमेपर्यंत मदत व वेबसाइटवर नोंदणी ही सेवा मिळणार आहे. या मेळाव्यात ब्राह्मण, मराठा, सोनार, शिंपी, माळी, तेली, सुतार, चांभार व इतर सर्व समाजांचे वधू-वर संपूर्ण महाराष्ट्रातून येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वर-वधू यांना आपल्याच समाजातील व आंतरजातीय विवाहस्थळे बघता येणार आहेत, असे संचालक संजय लोळगे यांनी सांगितले आहे.

नोंदणी करणे अनिवार्य

या वधू-वर मेळाव्यामध्ये भाग घेण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुपमशादी डॉट कॉम, शीतल कॉम्प्लेक्स, आयडीबीआय बँकेसमोर, द्वारा- नाशिक, या पत्त्यावर किंवा ८२७५०१६५०१ / ८३७८९१०९९९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

(लोगो वापरणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत रविवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक सकाळी १० वाजता सोमवारी खुटवडनगर येथील श्रीसिद्धी बँक्वेट हॉल येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी दिली.

नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीच्या वतीने शिवाजी सहाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. या मित्रपक्ष आघाडीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी, व हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर आदींनी केले आहे.

रणनिती ठरणार

विधान परिषदेच्या निवडणुकीत आतापर्यंत राष्ट्रवादीची मतदारसंख्या जास्त होती. यावेळेस सदस्य संख्या घटल्यामुळे राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी नाही. त्यामुळे या बैठकीत रणनीती आखली जाणार आहे. त्यात इतर पक्षांचे सदस्यांचे मतदान करुन घेण्यासाठी जबाबदारी प्रमुख नेत्यांवर टाकण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक ते नेपाळ बससेवा?

$
0
0

लोगो - शुभवार्ता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये एकत्रित 'रामायण सर्किट' तयार होणार असल्यामुळे नाशिकही थेट नेपाळला जोडले जाणार असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील जनकपूर ते अयोध्या यांना जोडणाऱ्या बससेवेला सुरुवात केली. त्यामुळे रामायणातील दोन धार्मिक जन्मस्थळे जोडली गेले. पुढील टप्प्यात इतर स्थळेही जोडली जाणार असल्यामुळे नाशिकलाही ही बससेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

रामायण सर्किटमध्ये महाराष्ट्रातील नाशिक व नागपूरची याअगोदरच निवड करण्यात आली आहे. या दोन शहरांबरोबरच उत्तर प्रदेशमधील अयोध्या, नंदिग्राम, श्रींग्वेरपूर, चित्रकूट तसेच बिहारमधील सीतामढी, बक्सर, दरभंगा तसेच मध्य प्रदेशमधील चित्रकूट, ओदिशामधील महेंद्रगिरी, छत्तीसगडमधील जगदलपूर, तेलंगणामधील भद्रचालम, कर्नाटकमधील हम्पी, तामिळनाडूतील रामेश्वरम यांचाही समावेश आहे. रामाचे जन्मस्थान अयोध्या असून नेपाळमधील जनकपूर हे सीतेचे जन्मस्थान आहे. त्यामुळे रामायण सर्किटच्या पहिल्या टप्प्यात या दोन जन्मस्थानांना जोडणारी ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर रामायण सर्किट पूर्ण करायचे असल्यास निवड केलेल्या स्थानावरही ही सेवा द्यावी लागणार आहे. त्यामुळे सरकार पुढे काय निर्णय घेते हे महत्त्वाचे असणार आहे. केंद्रीय पर्यटन विभागाने स्वदेश योजनेंतर्गत ही धार्मिक स्थळे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिकमधील रामकुंड, पंचवटी, टाकेद परिसराचा विकास होऊन नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

रामायण सर्किटमध्ये नाशिकचाही समावेश आहे. त्यामुळे येथील स्थळांचा विकास व इतर योजनाही येथे सुरू होणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्टोन्मेंटच्या प्रश्नांवर संसदेतून तोडगा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भारतातील एकूण ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डातील नागरिकांना ब्रिटिशकालीन कायद्यातील काही तरतुदींमुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. लोकाभिमुख कायदे असणे अथवा बनविणे व प्रसंगी त्यात परिस्थितीनुसार बदल करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा आवाज आता देशातील सर्वात मोठी लोकशाहीचे केंद्र असलेल्या संसदेत घुमणार असून, कॅन्टोन्मेंट परिसरात निर्माण होणाऱ्या विविध अडचणींवर तोडगा काढला जाणार आहे.

देशातील सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्ड असलेल्या भागातील नागरिकांच्या समस्यांची उकल होण्यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, डायरेक्टर जनरल जोजनेश्वर शर्मा, लष्कर प्रमुख यांसह संबंधित विभागाचे प्रमुख, खासदार फारुख अब्दुल्ला, मुरली मनोहर जोशी तसेच २६ संसद सदस्य व ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डाचे एकूण सव्वाशे नगरसेवक यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. मिनी संसद म्हणून संबोधल्या गेलेल्या या बैठकीत अनेक प्रतिनिधींनी समस्या मांडताना ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती कॅन्टोन्मेंट बोर्डांची असून, जुन्या कायद्यांचा आधार घेत लष्कराच्या आस्थापनांकडून नागरिकांवर कठोर कायदे राबवून अन्याय होत असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. वारंवार मागणी करूनही त्यात बदल करण्याबाबत या विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. स्वातंत्र्यानंतर प्रथमच संरक्षण मंत्र्यांनी अशा प्रकारची बैठक आयोजित केल्याने कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समस्या सोडविताना देशाच्या सुरक्षिततेला महत्त्व देणे योग्य आहे. मात्र, हाच नियम देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांना लावणे गैर असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

गोडसेंनी मांडला रस्त्याचा प्रश्न

खासदार हेमंत गोडसे यांनी कॅन्टोन्मेंट हद्दीत लष्कराकडून रस्त्यांबाबत अतिशय कठोर नियम केले जात आहेत. मात्र, त्यासाठी आवश्यक खातरजमा करून जनतेच्या सोयीचे निर्णय घेणे गरजेचे आहे. लीज लॅण्ड व ओल्ड ग्रॅण्ड याबाबत माजी संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी अजूनही केली गेली नसल्याने अनेक नागरिकांच्या अडचणी वाढीस लागल्या आहे. राज्य सरकारकडून कॅन्टोन्मेंट बोर्डात विकासकामे करण्यासाठी वाटप करण्यात येणाऱ्या निधीबाबत निश्‍चित धोरण आखले जात नाही. यासह अनेक बाबींवर संरक्षणमंत्र्यांनी विशेष लक्ष दिले. कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कोणत्याही नागरिकाला लोकशाही असलेल्या देशात राहतो असे वाटावे याकरता लोकाभिमुख कायदे बनविण्यासाठी समिती स्थापन करून येत्या सहा महिन्यांत त्याचा अहवाल संसदेत सादर केला जाणार आहे. बैठकीस देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिनकर आढाव, नगरसेवक बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे यांच्यासह ६१ कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

देवळालीसह देशभरात नागरिकांच्या मनात कॅन्टोन्मेंट बोर्ड व कायदे याविषयी एक वेगळेच मत निर्माण झाले आहेत. त्यासाठी बैठकीत घेण्यात आलेले निर्णय व यापूर्वीच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेले निर्देश पाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

-दिनकर आढाव, उपाध्यक्ष, कॅन्टोन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजाच्या रक्षकांप्रति व्यक्त झाली कृतज्ञता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रति पोलिस कृतज्ञता दिनानिमित्त शुक्रवारी नाशिकरोड आणि उपनगर या दोन्ही पोलिस ठाण्यांत विविध सामाजिक संस्थांतर्फे गुलाबपुष्प वाटप करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

नाशिकरोड पोलिस ठाण्यात शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या उपाध्यक्षा प्रीती ढोकणे, सदस्या सारिका सागर, कांचन चव्हाण, मनीषा गायकवाड, आशा पाटील, अरुणा सूर्यवंशी, अनिता पाटील, भक्ती शिंदे, आरती आहिरे आदींनी शुक्रवारी दुपारी शहर परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, निरीक्षक सुरज बिजली यांच्यासह उपस्थित सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पोलिसांनी या सर्व महिलांना पोलिस ठाण्याच्या कामकाजाविषयी माहिती दिली.

चेहेडी येथील आई सोशल फाऊंडेशनचे संतोष बोराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, निरीक्षक सुरज बिजली आणि उपस्थित सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे भगीरथ घोटेकर आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, निरीक्षक सुरज बिजली आणि उपनगर पोलिस ठाण्यात निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्यासह सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. पोलिसांच्या कार्याची समाजाने दखल घेतल्याबद्दल शहर पोलिसांतर्फे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी या सामाजिक संस्था व नागरिकांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जत्रा चौकात पुन्हा वाहतूक कोंडी

$
0
0

जत्रा चौकात पुन्हा वाहतूक कोंडी (फोटो)

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

अत्यंत वर्दळीच्या जत्रा हॉटेल चौकात उड्डाणपुलाच्या कामाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. येथील पिवळा सिग्नल हा फक्त नावापुरताच उरला आहे. कोणीच नियम पाळताना दिसत नाही. येथे वाहतूक पोलिसदेखील उपस्थित नसतो. बहुसंख्य वाहनचालक गतिरोधक असतानाही जोरात वाहने चालवितात. त्यामुळे अपघातांची भीती वाढली आहे. दररोज साधारण सकाळी ८ ते दुपारी १२, तसेच सायंकाळी ६ वाजेनंतर येथे वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येबाबत ठोस कार्यवाही करण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

--

(थोडक्यात)

शनी महाराज जयंतीनिमित्त शनी चौकात विविध कार्यक्रम

पंचवटी : शनी चौकातील शनी मंदिर ट्रस्टतर्फे सोमवार (दि. १४) ते बुधवार (दि. १६)पर्यंत शनी महाराज जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात सोमवारी सनवग्रहमख शनैश्वर याग होईल. श्यामकांत भटमुळे प्रधानचार्य असतील. मंगळवारी (दि. १५) रोजी लघुरुद्राभिषेक होईल, सायंकाळी ६ वाजता शनी महाराजांचा पालखी सोहळा होईल. बुधवारी (दि.१६) रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. अध्यक्ष नंदकुमार जानोरकर, उपाध्यक्ष सुनील महंकाळे यांनी ही माहिती दिली.

--

लग्नातील डीजेकडे दुर्लक्ष

जेलरोड : पोलिसांनी नाशिक शहरात राष्ट्रपुरुषांच्या जयंतीदिनी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या डीजेंच्या संयोजकांवर कारवाई केली. त्याचे स्वागत झाले. परंतु, आता लग्नसराईनिमित्त गल्लीबोळांत मोठ्याने डीजे लावले जात आहेत. परिसरात रुग्णालय आहे याचाही विचार केला जात नाही. नाशिकरोड, उपनगर, जेलरोड, सिन्नर फाटा, देवळालीगाव भागात हा अनुभव रोजच येत आहे. पोलिसांनी रात्री व दिवसा गस्त घालून अशा ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

--

धूम्रपान निषेध मोहीम (फोटो)

पंचवटी : शहरात सुरू असलेल्या धुम्रपान निषेध मोहिमेंतर्गत शनिवारी सकाळी ६ वाजता पंचवटीत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी विशेष मोहीम राबविली. प्रारंभी आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पंचवटी परिसरात फेरी काढण्यात आली. पोलिस कर्मचाऱ्यांसह डॉ. राज नगरकर, शांतता समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील, लक्ष्मण धोत्रे, देवांग जानी, गणेश भोरे, मंदार जानोरकर, योगेश महंकाळे, सचिन पाटील, गुलाब सय्यद, किशोर गरड आदी उपस्थित होते.

--

रिक्षाचालक सावध

जेलरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकात सध्या तरी आपल्याला व्यवसायासाठी जागा मिळणार असल्याचे वृत्त येताच रिक्षाचालकांनी आनंद साजरा केला आहे. मात्र, कधीही वेगळा निर्णय होऊ शकतो या शक्यतेने त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. रिक्षाचालकांचे शिष्टमंडळ रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणेंच्या नेतृत्वाखाली नुकतेच भुसावळला गेले होते. तेथे खासदार हेमंत गोडसेंच्या मध्यस्थीने रिक्षाचालकांना स्थानकातून न हटविण्याचा निर्णय झाला होता. ओला व उबेर टॅक्सींना सिन्नर फाटा येथे जागा देण्याचे ठरले. परंतु, अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत रिक्षाचालक विश्वास ठेवायला तयार नाहीत.

--

मोकाट कुत्र्यांचा उपद्रव (फोटो)

नाशिक : जुने नाशिक भागातील खडकाळी, भद्रकाली परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने स्थानिक रहिवाशांसह वाहनचालकांत धास्ती निर्माण झाली आहे. परिसरात टाकून दिलेल्या शिळ्या अन्नावर पोसली जाणारी ही कुत्री थेट अंगावर धावून येत असल्याने वाहनचालकांची घाबरगुंडी उडत आहे. या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिचारिकांना जीवन संजीवनीचे धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक परिचारिका दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन महिला विभाग आणि भूलशास्त्र संघटना नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनसंजीवनी कार्यशाळा शनिवारी आयएमएच्या शालिमार येथील सभागृहात पार पडली. जीवन संजीवनी म्हणजे मरणासन्न व्यक्तीस जीवनदान देण्यासाठी केलेले प्रयत्न असून, त्याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. भूलशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा डॉ. सरला सोहनंदानी यांनी यावेळी मार्गदर्शन करीत अपघातानंतर किंवा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर, बंद हृदय चालू करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली.

कार्यशाळेला पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या म्हणाल्या की, आजच्या काळात तरुण मुलामुलींनी अभ्यासाबरोबर शिस्तही अंगीकारणे अतिशय महत्त्वाचे आहे. रहदारीच्या नियमांचे पालन, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर या बाबींची जाणही ठेवली पाहिजे. त्याचबरोबर यशस्वी भविष्यासाठी प्रचंड मेहनत घेतली तर यश निश्चित मिळते, ही बाब लक्षात घेण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. नितीन वाघचौरे यांनी भूलशास्त्र संघटनेच्या वतीने कार्यशाळेविषयी मार्गदर्शन केले. छोट्या-छोट्या गोष्टी आत्मसात करून आपण रुग्णाचे प्राण कसे वाचवू शकतो, याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच विविध उदाहरणेदेखील यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आवेश पलोड होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा दुगड यांनी केले. आयएमएकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. यावेळी नाशिक शहरातील सरकारी, महानगरपालिका रुग्णालये, खासगी रुग्णालये, ईएसआय रुग्णालय, मेडिकल कॉलेज येथील अठरा परिचारिकांना त्यांच्या कार्याचा आदर म्हणून यावेळी गौरविण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. प्रशांत देवरे, डॉ. नितीन चिताळकर, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. राहुल भामरे, डॉ. किरण शिंदे, डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. दिनेश पाटील, डॉ. राजश्री पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माधवी गोरे-मुठाळ यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉ. वैशाली काळे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images