Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

निपाहच्या भितीने फळांना ग्राहक दुरावले

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

निपाह (एनआयव्ही) विषाणूमुळे मनुष्य आणि प्राणी या दोघांमध्ये गंभीर स्वरुपाचे आजार निर्माण होऊ शकतात. वटवाघुळे ही या विषाणूची नैसर्गिक वाहक असल्याचा प्रचार आणि प्रसार हा सोशल मीडियासह सर्वच प्रसारमाध्यमांतून झाला. त्यामुळे फळांविषयी माणसांच्या मनात भितीचे वातावरण पसरल्याने आहे. तेव्हापासून निपाहच्या भितीने फळांची मागणी घटली आहे. सध्या अधिकमास आणि रमजान सुरू असूनही फळांच्या खरेदीकडे ग्राहकांनी कानाडोळा केला आहे.

केरळमधील कोझीकोड भागात निपाह विषाणूची साथ तेजीत पसरत असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तासांमध्ये देशभर पसरली. निपाहावर कोणतीही लस किंवा औषध नाही. या विषाणूचे वाहक म्हणून वटवाघूळ असल्याने तसेच ते फळे खात असल्याने त्यांनी खाल्लेल्या अर्धवट फळांच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो. अशा माहितीमुळे बहुतांशी ग्राहक सध्या कोणतीच फळे खरेदी करण्यासाठी सध्या धजावत नाही. सध्या आंब्यांचा हंगाम सुरू आहे. आंबा हा दक्षिण भागातूनच येत असल्याने आणि याच भागात निपाहचे रुग्ण आढळल्याने ही भीती आणखी वाढलेली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याला प्रचंड मागणी असते. त्यातच सध्या अधिकमास सुरू आहे. अधिकमासात सासुरवाडीला जावयास आमंत्रण दिल्यानंतर आमरसाचा बेत हमखास केला जातो. त्यामुळे या अधिकमासात इतर महिन्यांच्या तुलनेत जास्त मागणी असते. तसेच, मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे. रमजानमध्ये फळांना प्रचंड मागणी असते. नेहमीच्या तुलनेत ही मागणी केवळ २५ टक्केच होत असल्याचे पेठरोड बाजार समितीच्या आवारातील घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत देवगड, रत्नागिरी, मद्रास आदी भागातून येणारे कच्चे आंबे पिकविण्याची प्रक्रिया सध्या मंदावली आहे. आंब्याची मागणी कमी असल्यामुळे थोड्याच प्रमाणात आंबे पिकविली जात आहे. सफरचंद, चिक्कू, खरबूज, पेरू, केळी, जांभूळ आदी फळांचीही विक्री थंडावली आहे. ग्राहक नसल्याने फळांचे दरही काही प्रमाणात घसरल्याचे दिसून येत आहे.

आंबा हा नाशिकच्या बाजारात १००० ते १२०० किलोमीटरवरून येतो. तो कच्चा असतानाच तोडला जातो. कच्चाच पॅक करून इतर ठिकाणाच्या बाजारात पाठविला जातो. वटवाघूळ हे काही कच्ची फळे खात नाहीत. असे असतानाही आंब्याच्या बाबतीतही ग्राहकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. ती कमी झाली पाहिजे.

याकूब खान, फळ विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोर्डाच्या छपराला दीड तपानंतर मुहूर्त

$
0
0

वर्षभरात साकारणार विभागीय कार्यालय इमारत

सुमारे २४ कोटी रुपये खर्च अपेक्षित

jitendra.tarte@timesgroup.com

Twitter : jitendratarte@MT

नाशिक : शहरात मोक्याच्या ठिकाणी स्वमालकीची तब्बल पाच एकर जागा उपलब्ध असतानाही भाडोत्री इमारतीत होणारी एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या विभागीय कार्यालयाची वणवण आता थांबणार आहे. या जागेची निविदा मुंबईतील एका विख्यात कन्स्ट्रक्शन कंपनीस देण्यात आली असून आता प्रत्यक्ष कामासही सुरुवात झाली आहे. कार्यालयासाठी बोर्डाच्या ताब्यात जागा आल्यानंतर तब्बल १८ वर्षांनंतर बांधकामास मुहूर्त लागला आहे. दरम्यानच्या काळात कार्यालयाच्या भाडोत्री जागेपोटी कोट्यवधीची किंमत मोजली गेली आहे.

'सरकारी काम अन् थोडे थांब' याचाही प्रत्यय विविध सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना वेळोवेळी येतो. मात्र, या अनुभवास सरकारी कार्यालयही अपवाद नाही, याचेच उदाहरण बोर्डाची नाशिक विभागाची वास्तू बनली आहे. आडगाव परिसरातील मोक्याच्या ५ एकर जागेवर बोर्डाची नवी इमारत साकारण्यास आता कुठे सुरुवात झाली आहे. या जागेस तीन बाजूने संरक्षक भिंत असली तरीही एक बाजू पूर्णपणे मोकळी होती. याचा फायदा घेत या जागेवर परिसरातील नागरीकांनी अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण नुकतेच हटविण्यात आले. येथे प्रत्यक्षात बांधकामासही दोनच दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. या कामासाठी सुमारे २३ कोटी ७० लाखांवर खर्च अपेक्षित आहे. साधारण वर्षभरात ही इमारत उभी राहणे अपेक्षित आहे. 'देर से आये, दुरुस्त आये...' अशी एक म्हण आहे. पण बोर्डाच्या प्रलंबित कारभारास ती पूर्णत: लागू होत नाही. 'देरसे आये, हे विधान चपखल बसत असले तरीही दुरुस्त आये असे म्हणज उचित ठरणार नाही. कारण, बोर्डाचे कार्यालय १९९६ पासून भाडोत्री इमारतीत चालविले जाते. सद्यस्थितीत या इमारतीत प्रतिमहिन्यास भाड्यापोटी सुमारे पावणेपाच लाख रुपये बोर्डाला जागामालकास द्यावे लागतात. आजवरचा हिशेब केल्यास ही रक्कम काही कोटींच्या घरात जाते. इतक्या पैशांमध्ये इतक्या कालावधीत बोर्डाने टोलेजंग इमारत कधीच साकारली असती. 'बोर्डाला छप्पराची प्रतिक्षा' या मथळ्याखाली 'मटा'ने या विषयाची दखल २ ऑगस्ट २०१६ रोजी घेतली होती.

सध्याचे कार्यालय अपुरे

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नाशिक विभागीय कार्यालय अनेक वर्षांपासून मुंबई नाक्यावरील वाणी हाउस येथे कार्यरत आहे. नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांचा कार्यभार या कार्यालयाच्या माथ्यावर आहे. सुमारे १०० कर्मचाऱ्यांचा गाडा ओढणाऱ्या या कार्यालयास सध्या जागा अपूर्ण पडण्यासोबतच जागेचे भाडे वाढविण्याचे भय आजवर कायम सतावत आले. यामुळे विभागीय कार्यालयाने नव्या इमारतीचा शोधही इतरत्र सुरू केला होता. पण त्यांना द्वारका परिसरात ३० ते ३५ हजार स्क्वेअर फुटांची अपेक्षित इमारत मिळू शकलेली नाही.

एसएससी व एचएससी बोर्डाच्या विभागीय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. तेथील जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. आगामी वर्षभराच्या काळात विभागीय कार्यालयास अधिकारी कक्ष, अतिथी निवास, स्ट्राँग रुमसह प्राथमिक सुविधांनी सज्ज अशी इमारत साकारली जाईल, असे नियोजन आहे. साधारणत: २३ कोटी ७० लाखांवर खर्च यासाठी अपेक्षित आहे.

- राजेंद्र मारवाडी, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोर्डाच्या छपराला दीड तपानंतर मुहूर्त!

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com

Twitter : jitendratarte@MT

नाशिक : शहरात मोक्याच्या ठिकाणी स्वमालकीची तब्बल पाच एकर जागा उपलब्ध असतानाही भाडेतत्त्वावरील इमारतीत होणारी एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या विभागीय कार्यालयांची वणवण आता थांबणार आहे. या जागेची निविदा मुंबईतील एका विख्यात बांधकाम कंपनीस देण्यात आली असून, प्रत्यक्ष कामास सुरुवातही झाली आहे. कार्यालयासाठी बोर्डाच्या ताब्यात जागा आल्यानंतर तब्बल १८ वर्षांनंतर बांधकामास मुहूर्त लागला आहे. दरम्यानच्या काळात कार्यालयाच्या भाडेतत्त्वावरील जागेपोटी कोट्यवधीची किंमत मोजली गेली आहे.

'सरकारी काम अन् थोडे थांब' याचाही प्रत्यय विविध सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना वेळोवेळी येतो. मात्र, या अनुभवास सरकारी कार्यालयही अपवाद नाही, याचेच उदाहरण बोर्डाची नाशिक विभागाची वास्तू बनली आहे. आडगाव परिसरातील मोक्याच्या ५ एकर जागेवर बोर्डाची नवी इमारत साकारण्यास आता कुठे सुरुवात झाली आहे. या जागेस तीन बाजूने संरक्षक भिंत असली तरीही एक बाजू पूर्णपणे मोकळी होती. याचा फायदा घेत या जागेवर परिसरातील नागरीकांनी अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण नुकतेच हटविण्यात आले. येथे प्रत्यक्षात बांधकामासही दोनच दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. या कामासाठी सुमारे २३ कोटी ७० लाखांवर खर्च अपेक्षित आहे. साधारण वर्षभरात ही इमारत उभी राहणे अपेक्षित आहे. 'देर से आये, दुरुस्त आये...' अशी एक म्हण आहे. पण बोर्डाच्या प्रलंबित कारभारास ती पूर्णत: लागू होत नाही. 'देरसे आये, हे विधान चपखल बसत असले तरीही दुरुस्त आये असे म्हणज उचित ठरणार नाही. कारण, बोर्डाचे कार्यालय १९९६ पासून भाडेतत्त्वावरील इमारतीत चालविले जाते. सद्यस्थितीत या इमारतीत दरमहा सुमारे पावणेपाच लाख रुपयांचे भाडे बोर्डाला जागामालकास द्यावे लागतात. आजवरचा हिशेब केल्यास ही रक्कम काही कोटींच्या घरात जाते. इतक्या पैशांमध्ये इतक्या कालावधीत बोर्डाने टोलेजंग इमारत कधीच साकारली असती. 'बोर्डाला छपराची प्रतीक्षा' या मथळ्याखाली 'मटा'ने या विषयाची दखल २ ऑगस्ट २०१६ रोजी घेतली होती.

सध्याचे कार्यालय अपुरे

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नाशिक विभागीय कार्यालय अनेक वर्षांपासून मुंबई नाक्यावरील वाणी हाउस येथे कार्यरत आहे. नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांचा कार्यभार या कार्यालयाच्या माथ्यावर आहे. सुमारे १०० कर्मचाऱ्यांचा गाडा ओढणाऱ्या या कार्यालयास सध्या जागा अपूर्ण पडण्यासोबतच जागेचे भाडे वाढविण्याचे भय आजवर कायम सतावत आले. यामुळे विभागीय कार्यालयाने नव्या इमारतीचा शोधही इतरत्र सुरू केला होता. पण, त्यांना द्वारका परिसरात ३० ते ३५ हजार स्क्वेअर फुटांची अपेक्षित इमारत मिळू शकलेली नाही.

एसएससी व एचएससी बोर्डाच्या विभागीय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. तेथील जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. आगामी वर्षभराच्या काळात विभागीय कार्यालयास अधिकारी कक्ष, अतिथी निवास, स्ट्राँग रूमसह प्राथमिक सुविधांनी सज्ज अशी इमारत साकारली जाईल, असे नियोजन आहे. साधारणत: २३ कोटी ७० लाखांवर खर्च यासाठी अपेक्षित आहे.

-राजेंद्र मारवाडी, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्किल डेव्हलपमेंटसाठी प्राचार्यांची शाळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर (एनईसी) संस्थेच्या स्किल डेव्हलपमेंट हबतर्फे नाशिक जिल्ह्यातील विविध नामवंत महाविद्यालयांची प्राचार्यांची शाळा झाली. निमित्त होते 'प्रिन्सिपल मीट २०१८' कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डीटीईचे जॉइंट डायरेक्टर आणि सामनगाव गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. डी. पी. नाथे उपस्थित होते. एनईसीचे सीईओ एस. के. माथूर, एनईसीचे संस्थापक सदस्य के. एस. पाटील, एनईसीचे तंत्रज्ञान सल्लागार ए. आर. राजवाडे प्रमुख पाहुणे होता. दिव्या बोहरा यांनी सूत्रसंचालन केले.

सुरुवातीला के. एस. पाटील यांनी एनईसीच्या स्थापनेविषयी माहिती देतांना एनईसीचे नाशिकच्या उद्योगविश्वातील योगदान अधोरेखित केले. पुढे स्किल डेव्हलपमेंट हबचे फारूख झहेरी यांनी एनईसीत उपलब्ध असलेल्या विविध सुविधांबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्यांनी स्किल डेव्हलपमेंट हबतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कोर्सेसविषयी माहिती दिली. वृषाली कुलकर्णी यांनी एनईसी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे होणारे विविध कोर्सेस व शासकीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत उपलब्ध असलेल्या विविध कोर्सेसविषयी माहिती दिली.

नाशिककरांनी विविध औद्योगिक कौशल्ये आत्मसात करून नाशिक आणि सभोवताली अस्तित्वात असणाऱ्या विविध एमआयडीसींमधील संधींचा पुरेपूर फायदा घ्यावा, असा मानस डॉ. नाथे यांनी व्यक्त केला. शैक्षणिक परिक्षांना देण्यात येणाऱ्या अवास्तव महत्त्वाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक अनुभव अधिक उपयोगी असल्याचे त्यांनी संगितले. एईसीचे सीईओ माथूर यांनी औद्योगिक जगातील गरजा आणि महाविद्यालयातील शिक्षण यातील अंतर अधोरेखित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड हजार स्कूलबस चालकांचे समुपदेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

जून महिना सुरू होण्यासोबत स्कूलबस चालकांचीही लगबग सुरू होण्याअगोदरच शहर व जिल्ह्यातील सुमारे दीड हजार स्कूलबस चालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थी वाहतुकीबाबत घडलेल्या काही अपघात घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नाशिक फर्स्ट या संस्थेसोबत हा उपक्रम आयोजित केला होता. या अंतर्गत १५०१ स्कूलबस चालकांचे समुपदेशन आणि अपघात विरहीत वाहतुकीसंदर्भात प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.

शहरात यापूर्वी शालेय वाहतुकीदरम्यान काही अपघात घडल्याच्या घटना आहे. नव्यानेच शाळा उघडताना अशा प्रकारच्या दुर्घटनांना शहरास सामोरे जावे लागू नये, यासाठी स्कूल बसचालकांशी संवाद साधण्यात आला. गेल्या महिनाभराच्या काळात यासाठी सुमारे ३० प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात स्कूलबस आणि खासगी स्कूल व्हॅनचालकांना सहभागी करून घेण्यात आले होते.

उर्वरित चालकांनीही सहभागी व्हावे

जिल्हाभरात शालेय वाहतुकीशी निगडीत सुमारे २ हजार वाहने आहेत. अद्यापही अनेक स्कूलबस किंवा व्हॅनचालकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलेले नाही. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना प्रमाणपत्र देण्यात येते. हे प्रमाणपत्र वाहनचालकांजवळ असणे गरजेचे ठरणार आहे.

१५ जूनपासून वाहन तपासणी

शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात येणार आहे. १५ जूनपासून या तपासणीला सुरुवात करण्यात येईल. शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनाचा परवाना किंवा वाहन योग्यता प्रमाणपत्र मिळविताना वाहनचालकांना हे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र गरजेचे असणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी न झालेल्या वाहनचालकांनी १० जूनच्या अगोदर प्रक्रियेत सहभागी होऊन प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीसह तिघांना वाहनचोरीत अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह इतर जिल्ह्यात वाहनचोरी करणाऱ्या सराईतास सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तब्बल वर्षभरानंतर शिताफीने अटक केली. सराईतच्या चौकशीनंतर आणखी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, त्यात एका २२ वर्षांच्या तरुणीचा समावेश आहे.

पूजा किशोर मोरे (२२, रा. आरटीओ, पवार लॉन्स, श्रीधर कॉलनी), प्रकाश कांतीलाल सूर्यवंशी (१९, रा. बंडू वस्ताद तालीम जुनी, तांबट लेन), दीपक साईदास राठोड (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) आणि सागर अनिल देशमुख (रा. चाळीसगाव, जळगाव) अशी या गुन्ह्यात अटक झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यातील दीपक राठोड हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात जळगाव जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. शहरात होणाऱ्या वाहनचोरीच्या घटनांमध्ये राठोडचा हात असल्याने सरकारवाडा पोलिस मागील वर्षांपासून त्याच्या मागावर होते. गुन्हे शोध पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव यांना राठोडबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाचे कर्मचारी घेऊन त्यांनी चाळीसगाव येथे राठोडला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता प्रकाश सूर्यवंशी आणि पूजा मोरे यांनी एक दुचाकी चोरी करून चाळीसगाव येथे विक्री केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मागील वर्षी या दोघांनी मिळून पूजा राहते त्याच ठिकाणाहून एक वाहन चोरी केले होते. यातील देशमुख हा संशयित आरोपी चोरीचे वाहन विकत घेतो.

याबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले, की संशयितांकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील एक दुचाकी शहरातील असून, उर्वरित दुचाकी जळगाव किंवा चाळीसगाव येथील आहेत. मात्र, वाहनांचा क्रमांक बदलण्यात आला असल्याने प्रादेशिक परिवहन विभागामार्फत वाहनांची खात्री करण्यात येण्यात येत आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तरुणीसह तिचा साथिदाराने यापूर्वी काही गुन्हे केले आहेत काय याचाही तपास सुरू आहे. वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तरुणीची कौटुंबिक परिस्थिती तशी ठीक असून, तिने हे कृत्य का केले हे तपासाअंती स्पष्ट होऊ शकेल, असेही भगत यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरीप हंगामसाठी कृषी विभागाच्या टिप्स

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार आणि योग्य किंमतीत बियाणे, रासायनिक खते आणि इतर सामग्री पुरविण्याच्या दृष्टीने संपूर्ण नियोजन करण्यात आले असून उत्पन्नात वाढ होण्याच्यादृष्टीने शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

सोयाबीन पिकाची पेरणी करताना ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेमी खोलीपर्यंत करावी. बियाणे, खते, किटकनाशके इत्यादी निविष्ठा अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी कराव्यात. किटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी. संकरित वाण वगळता सुधारित वाणांचे प्रमाणित बियाणे दरवर्षी नव्याने खरेदी न करता तीन वर्षांपर्यंत वापरावे. बियाण्यांची बचत होईल अशा लागवड पद्धतीचा अवलंब करावा. भात पिकासाठी 'श्री' व 'सगुणा भात तंत्र' पद्धत , तेलबिया व कडधान्यासाठी बीबीएफ यंत्राद्वारे लागवड करावी.

जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसारच रासायनिक खतांचा वापर करावा. जमिनीतील स्फुरद मुक्त होण्यासाठी स्फुरद विरघळणाऱ्या जीवणू खतांचा वापर करावा. शुन्य मशागत, पिकांचा फेरपालट , जैविक व सेंद्रिय खतांचा वापर , शेतातील काडी कचरा व पालापाचोळा शेतातच गाडणे आणि पिकाच्या गरजेनुसार पाण्याचा वापर या बाबींचा अवलंब केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमिनी सुपिक बनतात व परिणामी रासायनिक खतांची आवश्यकता कमी भासते.

जमिनीतून पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रणासाठी जैविक किंवा रासायनिक किडनाशकांची बीजप्रक्रिया करावी, जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा तसेच जिराईत पिकांसाठी पावसातील खंडाच्या काळात संरक्षित सिंचन द्यावे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी तुषार व ठिबक सिंचनसारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा पिकांसाठी शिफारशीनुसार अवलंब करावा.

पिकांच्या पूर्वमशागतीपासून ते काढणी-मळणी पर्यंतच्या प्रत्येक कामासाठी उपलब्ध असलेल्या सुधारित कृषी अवजारे व यंत्रांचा वापर करावा. जिराईत पिकांच्या पेरणीसाठी फारच मर्यादित कालावधी मिळत असल्याने एकाच वेळी गादीवाफे तयार करणे, बियाणे पेरणे व बियाण्याच्या ठिकाणी खत देणे ही कामे करण्यासाठी रुंद वाफा सरी यंत्राचा वापर करावा. सोयाबीन, तूर, कापूस, भाजीपाला या पिकांवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर करावा यासारख्या बऱ्याट टिप्स दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात फास्ट

$
0
0

अहिल्याबाई होळकर

जयंत्तीनिमित्त एकांकिका

मनमाड : शिवसेनेकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. शिवाजी चौक येथे प्रतिमापूजन करण्यात आले. ज्येष्ठ शिवसैनिक गोविंद आण्णा रसाळ, सुनील पाटील, सनी फसाटे, मयुर बोरसे, राजाभाऊ आहेर, जाफर मिर्झा उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता अहिल्याबाई होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर एकांकिका सादर केली जाणार आहे.

000

मालेगावी अभिवादन

मालेगाव : येथील शिवसेना संपर्क कार्यालयात पुण्याश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली. राज्यमंत्री दादा भुसे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमोद शुक्ला, भिमा भडांगे, दीपक देसले, गणेश पाटील उपस्थित होते.

000

रक्तदान शिबिर

मालेगाव : जमनाबेन कुटमुटिया सोशल ग्रुपच्या वतीने शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १९९४ पासून सातत्याने या ग्रुपतर्फे रक्तदान शिगिर घेण्यात येते. शिबिराचे हे २५ वे वर्ष आहे. सटाणा नाका भागातील तुलसी अपार्टमेंट येथे सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत शिबीर होणार असल्याचे नितीन पोफळे यांनी कळविले आहे.

0000

शिंदे बिनविरोध

मालेगाव : तालुक्यातील मांजरे येथे नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले असून, सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या शैला रवींद्र शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर सरपंचपदासह चार जागा शिवसेनेला मिळाल्या असून शिवसेनेने मांजरे ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उन्हापासून दिलासा; पावसाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शुक्रवारपासून जून महिन्यास सुरूवात होत असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या मालेगावकरांना आता पावसाचे वेध लागले आहेत. संपूर्ण मे महिना सूर्य आग ओकत होता. आता मात्र तापमानाचा पारा खाली येण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी कमाल तापमान ४२ अंश से. तर किमान तापमान २६.२ अंश से. इतके नोंदवले गेले. पारा दोन अंशाने खाली आला असून आता पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या एका महिन्यात उन्हाचा पारा अनेकवेळा उच्चांकी ४४ अंश से. पर्यंत गेला होता. या वाढत्या तापमानाने नागरिक घामाघूम झाले होते. गेल्या दोन दिवसात मात्र पारा खाली आला असून, सायंकाळी गार वाऱ्याची झुळूक सुखद गारवा देत आहे.

गेल्या आठवड्यातील कमाल तापमान

शुक्रवार - ४१.२

शनिवार - ४२.४

रविवार - ४४.४

सोमवार - ४३.६

मंगळवार - ४२.०

बुधवार - ४२.२

गुरुवार - ४२.०

0000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात

$
0
0

मुक्त विद्यापीठात

होळकर जयंती

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठाचे उपकुलसचिव विवेक ओक, उत्तम जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणघातक हल्ला; सात वर्षांची शिक्षा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कोर्टाने एकाला दोषी ठरवत सात वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. संतोष मुरलीधर लहानगे (३६) असे आरोपीचे नाव आहे.

सिन्नर येथील आयटीआयसमोर आरोपी लहानगे याने शरद एकनाथ मेढे या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला होता. आरोपीने तब्बल पाच वार केले होते. या प्रकरणी सिन्नर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीविरोधात नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाने नऊ साक्षीदार तपासले. वैद्यकीय पुरावे तसेच दोन प्रत्यक्षदर्शीच्या साक्षी कोर्टाने मान्य करीत आरोपीस सात वर्षे कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मी सावरकर’ स्पर्धेतनाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश

$
0
0

बागेश्री पारनेरकर, कॉलेज क्लब रिपोर्टर

'मी सावरकर' या अभिनव खुली वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा २७ मे रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात झाला. यात पाचवी ते आठवी या गटात नाशिकच्या सोहम कुलकर्णी याने द्वितीय क्रमांक मिळवला, तर महाविद्यालयीन गटात बागेश्री पारनेरकर आणि मधुरा घोलप याने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.

राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी प्रमुख व्याख्याते होते. स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, हिंदू हेल्पलाइन, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिवसंघ प्रतिष्ठान यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हिडीओ पाठवून ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत भारताबरोबर भारताबाहेरूनही अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे हे पहिले वर्ष होते. साहित्यिक सावरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर, समाजसुधारक सावरकर, द्रष्टे सावरकर, योद्धा सावरकर, हिंदुत्ववादी सावरकर असे या स्पर्धेचे विषय होते. एकूण सहा गटांत ही स्पर्धा झाली. पाचवीच्या विद्यार्थ्यांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.

स्पर्धेसाठी शरद पोंक्षे, नितीश भारद्वाज, राहुल सोलापूरकर, प्रवीण जाधव, प्रवीण तरडे, योगेश सोमण, श्रीरंग गोडबोले, मिलिंद वेर्लेकर, अरविंद रानडे, प्रकाश पाठक, निपूण धर्माधिकारी, डॉ. पिंपळखरे, कॅप्टन नीलेश गायकवाड, सुनील अभ्यंकर, मंदार परळीकर, धनश्री लेले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जय भवानीरोडला बिबट्याचे दर्शन

$
0
0

जय भवानीरोडला बिबट्याचे दर्शन

जेलरोड : जय भवानीरोड परिसरातील लष्करी भागातील नागरी वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसल्याच्या तक्रारींमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. रोकडोबावाडी भागातील डोबी मळ्यातही बिबट्या दिसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी उपनगर नाक्याजवळ जय भवानीरोडला बंगल्यात बिबट्या आला होता. आता पुन्हा तो दिसल्याने वन विभागाने परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने भक्ष्य व पाण्याच्या शोधात सध्या बिबटे नागरी भागाकडे फिरत आहेत. भगूरमार्गे जाणाऱ्या मार्गावरही बिबट्या बिबट्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

--

भिंतीला भगदाड (फोटो)

पंचवटी : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)च्या उत्तरेच्या बाजूला असलेल्या दगडी संरक्षक भिंतीला भगदाड पाडण्यात आले आहे. पूर्वीच्या दगडी भिंतीपासून आठ-दहा फुटांच्या अंतरावर आतमध्ये सिमेंट काँक्रीटची भिंत बांधण्यात आलेली आहे. या दोन्ही भिंतीमध्ये असलेल्या अंतराचा वापर करण्यासाठी हे भगदाड पाडण्यात आलेले आहे. या भगदाडातून पायवाट दिसत असल्यामुळे येथे गैरप्रकार घडत असल्याची चर्चा आहे.

--

भगूरला ज्ञानयज्ञ

देवळाली कॅम्प : अधिक मासानिमित्त भगूर येथे दि.१ ते ७ जूनदरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान श्रीमद भगवद कथा ज्ञानयज्ञ होणार आहे. येथील तुळसा लॉन्समध्ये हभप गणेश महाराज करंजकर यांच्या कथनाचा परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

'एक वही मोलाची'

जेलरोड : नाशिकरोड येथील आई सोशल ग्रुपतर्फे एक वही मोलाची हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वह्या संकलित करून गरजू विद्यार्थांना वाटप केल्या जातील. नागरिकांना कितीही वह्या देता येतील. आपल्या परिसरात गरजू मुले असल्यास, तसेच वह्यांसाठी संतोष बोराडे (८०८७००१३४२), श्याम आकुल (९३७०३७२६४५), दीपक भागवत (८४११९ ७००९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे नितीन रणशिंगे, मंगेश लोकरे यांनी कळविले आहे.

--

'माण देशी'ची शाखा

जेलरोड : म्हसवड (सातारा) येथील माण देशी उद्योगिनीच्या जेलरोड शाखेचे नुकतेच उद्घाटन झाले. महिलांनी उद्योजक व्हावे यासाठी आर्थिक साक्षरता, व्यवसायवृद्धी, संगणक, ब्यूटिपार्लर, फॅशन डिझाइन आदींचे प्रशिक्षण संस्थेतर्फे अल्प शुल्कात दिले जाते. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सहाय्य या उपक्रमांसाठी लाभते, असे संयोजकांनी सांगितले.

--

ज्येष्ठांचा वाढदिवस

जेलरोड : येथील श्री दुर्गामाता देवस्थान ट्रस्टच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश ढगे, उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र चव्हाण, शिवाजी भोर, संघाचे सचिव रमेश डहाळे, अरविंद भालेराव, राजेंद्र जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. भागवत गुरव यांचा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार झाला. १० जूनला सहस्रचंडी महायज्ञ होणार असून, त्याबाबत शिवाजी भोर यांनी माहिती दिली.

(थोडक्यात)

पॉइंटर्स

--

कॉलेजेस नव्वदीपार -२

चेंबर फुटल्याने दुर्गंधी-३

पंचवटीत चेन स्नॅचिंग -४

बंध जुळून आले..! ५

सनी आणि टोनी -६

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यसन रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक

$
0
0

जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तंबाखू हे गोड विष असून, यामुळे शरीराला विविध आजाराचे आमंत्रण मिळते. तरुण पिढी यांचे परिणाम भोगत असून, हे रोखण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी व्यक्त केले.

सिव्हिल हॉस्पिटलतर्फे जागतिक तंबाखू विरोध दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ३१ मे ६ जून या तंबाखू विरोधी सप्ताहाचे उद्घाटन सांगळे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. जी. एम. होले, निवासी वैद्यकीय अधिकारी अनंत पवार, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य राजन इनामदार, डॉ. दिनेश ढोले, प्रमोद गुंजाळ, विद्या जोशी आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. होले यांनी सांगितले, की भारतात दररोज साडेसहा लाख मुले धुम्रपान करतात. तंबाखू आणि सिगारेट सहजपणे उपलब्ध होतात, हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. भारतातील एकूण लोकसंख्येच्या ३५ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असून, कॅन्सरसारख्या आजाराला आवार घालणे यामुळे अवघड झाले आहे.

तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची यादी मोठी असून, शरीराच्या प्रत्येक अवयवावर त्याचा परिणाम होतो, हे समजून सांगण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबविले पाहिजेत, असे लांडगे यांनी स्पष्ट केले. जागतिक आरोग्य संस्थेने यावर्षी या दिनाची संकल्पना तंबाखू व हृदयरोग अशी दिली असून, त्याअनुषंगाने तंबाखूला नाही म्हणा या संदेशाचे फुगे हवेत सोडण्यात आले. यावेळी द मास्क अॅक्टिंग ग्रुपने पथनाट्य सादर केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत, सर्व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी यावेळी तंबाखू विरोधी शपथ घेतली. दरम्यान, आरोग्य शिक्षण, शिक्षण विभाग, अन्न व औषध प्रशासन तसेच समाजिक संघटना आदींनी एकत्र येऊन देशाच्या खांद्यावरील तंबाखूचे जड ओझे कमी करायला हवे, असे मत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार शिल्पा बांगर-गाभणे यांनी व्यक्त केले. कविता पवार यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रखडलेली पाणी योजना अखेर मार्गी

$
0
0

झेडपी सीइओंचे महिलांना कार्यालयात येऊन मानले आभार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणीपुरवठा योजना मंजूर असताना चार वर्षांपासून त्याचे काम झाले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचा उंबरठा झिजविणाऱ्या या महिलांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी न्याय दिला. त्यामुळे या महिलांनी गुरुवारी जिल्हा परिषदेचे कार्यालय गाठत थेट गिते यांचे आभार मानले. मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा विहीर पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित कामाचे आदेश तत्काळ देऊन जूनअखेरपर्यंत योजना पूर्ण करण्याचे आदेशही डॉ. गिते यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांना दिले.

इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो या सुमारे पाच हजार लोकवस्तीच्या गावाला चार वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा आहे. पूर्वीच्या पाणीपुरवठा समितीने काय केले आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न कसा निर्माण झाला या तांत्रिक बाबी असल्या तरी गावाला पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती होती. पाणी प्रश्नासाठी गावातील वत्सलाबाई भागडे, अंजनाबाई भागडे, विद्या चव्हाण, लक्ष्मीबाई जगताप, मंजुळाबाई भागडे, कमलबाई जगताप, नंदाबाई भागडे, पुष्पा अडोळ, सावित्रीबाई कडू, मथुराबाई अडावळ, संगीता भागडे या बारा महिला पाण्याचे मागणे घेऊन जिल्हा परिषदेचा उंबरठा झिजवत आहे. ग्रामीण, आदिवासी भागातील या महिला चार वर्षांपासून पाण्यासाठी झगडत होत्या. वेळोवेळी निवेदन देऊन, मोर्चे काढूनही काहीही उपयोग झाला नाही. पण,गिते यांनी त्याचा प्रश्न मार्गी लावला.

प्रतीक्षा जलवाहिनी पूर्ण होण्याची

डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा परिषदेची सूत्र हातात घेतल्यावर सर्व महिलांनी त्यांच्याकडे पाणी प्रश्नाबाबत कैफियत मांडून सर्व वस्तुस्थिती सांगितली. डॉ गिते यांनी या प्रकरणी स्वत: वैयक्तिक लक्ष घालून सर्व संबंधिताना काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर या महिलांनी स्वत: विहिरीच्या कामावर लक्ष देऊन काम पूर्ण करून घेतले. या विहिरीचे काम बुधवारी पूर्ण झाले. विहिरीस पाणी लागले असून उर्वरित जलवाहिनी पूर्ण झाल्यावर या महिलांचा आणि गावाचा पाणीप्रश्न मिटणार आहे.

शुभवात'ा''

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहाशेंपेक्षा अधिक पोलिसांच्या बदल्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलातील ६०६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यावर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी शिक्कामोर्तब केले. पोलिस कर्मचाऱ्यांपाठोपाठ निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्याबाबत गुरूवारी रात्रीपर्यंत कामकाज सुरू होते. विशेष म्हणजे यंदाही काही जणांना महाराष्ट्र पोलिस अकादमीत पाठवण्यात आले आहे.

मागील अनेक दिवसांपासून शहर पोलिस दलास बदल्यांचे वेध लागले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने प्रथम सहायक उपनिरीक्षक ते शिपाई या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. मागील वर्षी झाडून बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे यंदा तांत्रिक तसेच प्रशासकीय कारणांमुळे बहुतांश कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या नामंजूर करण्यात आल्या आहेत. १३ पोलिस स्टेशन, पोलिस मुख्यालयासह इतर विभागातील मिळून ३३१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या विविध ठिकाणी करण्यात आल्या आहे. यात प्रशासकीय १५९, विनंती ७६, महाराष्ट्र पोलिस अकामदतीत पाच, अंगरक्षक ११, सलंग्न ३३, चालक विनंती १५, मुदतवाढ २२ यांचा समावेश आहे. मागील वर्षी शहर पोलिस दलातील जवळपास ३६ जणांना महाराष्ट्र पोलिस अकादमीत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यंदाही पाच जणांना तेथे पाठवण्यात आले आहे.

पोलिस स्टेशन पातळीवर एएसआय, कॉन्स्टेबल, पोलिस नाईक आदी पदांची स्थापना करून पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर बदल्या झालेल्या असल्याने यंदा हा आकडा कमी होता. त्यातही काही कामचुकारांना संधी मिळू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आल्याचे डॉ. सिंगल यांनी स्पष्ट केले. उपनिरीक्षक तसेच निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, रात्री ते पूर्ण होईल, असे डॉ. सिंगल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्याख्यानमालेचा सार्थ अभिमान

$
0
0

काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेली ९७ वर्षे वसंत व्याख्यानमालेचा हा ज्ञानयज्ञ सुरू आहे, त्यामुळे नाशिकला वेगळी ओळख मिळाली असून वेगळे अस्तित्त्व निर्माण झाले आहे. शहराला ही ओळख देण्यासाठी ज्या संस्था नेहमी झगडत असतात त्यात व्याख्यानमाला एक आहे. म्हणून या व्याख्यानमालेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी केले.

नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरलेल्या वसंत व्याख्यानमाला, नाशिक या संस्थेच्या ९७ व्या वर्षांच्या ज्ञानसत्राचा समारोप गुरूवारी करण्यात आला. यावेळी प्रांजली बिरारी-नेवासकर, नाशिक यांच्या वसंत स्वरमाला- सुमधूर गाण्यांचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे, मनपा प्रभाग सभापती अ‍ॅड. वैशाली भोसले, सुमन भालेराव, नगरसेविका वत्सला खैरे, अर्चना थोरात यांची उपस्थिती होती.

खैरे म्हणाले की, नाशिकचा गोदाकाठ भारलेला आहे, येथे अनेक मंदिरे असून समाध्यांचा हा परिसर आहे. त्यात येथे वसंत व्याख्यानमाला असल्याने तिची झळाळी वेगळीच आहे.

प्रांजली बिरारी यांच्या वसंत स्वरमाला या सुमधूर गीतांच्या कार्यक्रमाने व्याख्यानमालेचा गुरूवारी समारोप झाला. सत्यम शिवम सुंदम, ओमकार स्वरूपा या गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रागेश्री धुमाळ, अनिल धुमाळ, अमोल पाळेकर, स्वरांजय धुमाळ, अभिजीत शर्मा, सहगायक हर्षद वडजे, मयूर उगले यांनी साथसंगत केली.

व्याख्यानमालेचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रकट मुलाखतीने झाले होते. अतुल दाते, यजुवेंद्र महाजन, सुरेखा बोऱ्हाडे, पांडुरंग गोरे, दा.कृ.सोमण, आनंद क्षेमकल्याणी,रत्नाकर आहिरे, अजितकुमार तेलंग, कवी राजेंद्र उगले, अरुण इंगळे, ब्रह्मकुमार सुरजभाई, राजेंद्र फातर्पेकर, भावार्थ देखणे, लक्ष्मीकांत देशमुख, प्रमोद कांबळे या मान्यवरांनी व्याख्यानमालेत आपले विचार मांडले.

कासार, कुलकर्णी यांचा सत्कार

कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट स्त्री श्रोता म्हणून रत्नमाला कासार व पुरूष श्रोता म्हणून प्रमोद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी, व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या संतोष कुलकर्णी, नंदू गवांदे, बापू गायधनी, श्रीकांत येवलेकर, अवधूत देशपांडे, सुनील बिरारी, जगन्नाथ गरगटे, अर्जून व्यवहारे, गणेश धोंगडे, ओंकार व रवी पांडगे यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवण : सोसायटी निकाल

$
0
0

चेअरमनपदी खैरनार

कळवण : भुसणी येथील श्री छत्रपती शिवाजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भाऊसाहेब शंकर खैरनार यांची, तर व्हा. चेअरमन पदी विजय वसंत सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली. पोपट खैरनार, त्र्यंबक खैरनार, किशोर सोनवणे, विश्वास निकम, सुधाकर खैरनार, बापू खैरनार, दादाजी गांगुर्डे, सचिन मुरलीधर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावातील ३७ ठेकेदार ‘ब्लॅक लिस्टेड’

$
0
0

विकासकामे रखडल्याने आयुक्तांची कारवाई

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापालिकेच्या सन २०१५ पासूनच्या विविध विकासकामांचा कार्यादेश मिळून देखील संबंधित ठेकेदारांनी कामे सुरू न केल्याची बाब समोर आली आहे. विकासनिधी पडून असतांना देखील कामे न करणाऱ्या ठेकेदारांवर अखेर आयुक्त संगीता धायगुडे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कार्यादेश मिळून देखील विकासकामे सुरू अथवा पूर्ण न केलेल्या ३७ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती आयुक्त धायगुडे यांनी दिली.

येथील महापालिकेच्या अंदाजपत्रकात वर्षानुवर्ष हजारो कोटीची कामे मंजूर केली जात आहेत. प्रशासनाकडून त्याची निविदा प्रक्रिया राबवून संबंधित ठेकेदारास ठेका देवून कार्यारंभ आदेश देखील देण्यात आले आहेत. मात्र तीन ते चार वर्ष उलटूनही विकासकामे सुरू झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपापल्या प्रभागात विकासकामे होत नसल्याचा किंवा प्रलंबित असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी आयुक्त धायगुडे यांच्याकडे केल्या होत्या. त्यानंतर आयुक्तांनी कार्यादेश निघालेल्या परंतु अद्याप काम सुरू न झालेल्या किंवा कामे प्रलंबित असलेल्या ठेकेदारांची यादी मागवली. त्यातून हा प्रकार समोर आला.

शहरातील नागरिकांना रस्ते, गटारी, दुभाजक, नाले अशा विविध मूलभूत सुविधा मिळणे अपेक्षित असताना केवळ ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे सन २०१५ पासून कार्यादेश निघालेला असताना देखील कामे झालेली नाही. ही अत्यंत गंभीर बाब असून, त्यावर कठोर कारवाईची वेळ आल्याचे आयुक्तांनी सांगितले. यात मनपाच्या फंडातून केली जाणारी सुमारे २७० कामे या ३७ ठेकेदारांनी घेतली आहेत. त्यात ५ लाखांवरील ४४ कामे तर ५ लाखांखालील सुमारे २२६ कामे प्रलंबित आहेत. १५ कोटींहून अधिकची विकासकामे यामुळे खोळंबली असल्याचा अंदाज आहे. या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याने पुढील सहा महिने पालिकेचे कोणतेही कामे घेण्यास प्रतिबंध असणार आहे.

भविष्यात कठोर उपाय

विकासकामे प्रलंबित राहू नये यासाठी भविष्यात कार्यादेश निघाल्यानंतर सहा महिन्यात कामे सुरू किंवा पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाईल असे देखील आयुक्त धायगुडे यांनी सांगितले. आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मात्र ठेकेदारांचे धाबे दणाणले असून, ठेकेदारांवर अशा प्रकारे पहिल्यांदाच कारवाई झाल्याचे बोलले जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारली कार्यशाळेने दिली कलादृष्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साध्या-सोप्या आणि निसर्गस्नेही जीवनशैलीचे प्रतिबिंब आदिवासी वारली चित्रशैलीत उमटलेले दिसते. वारली चित्रकला समजून घेताना आदिवासी संस्कृतीची ओळख झाली. भौमितिक मूलाकार व पांढऱ्या रंगातून तयार होणाऱ्या कलाकृती सर्वांनाच आकर्षित करून घेतात. यापुढेही सातत्याने सराव करून सुंदर कलानिर्मिती करू. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनी जगभर पोहोचवलेली वारली चित्रकला ही महाराष्ट्राने जगाला दिलेली कलात्मक देणगी आहे, या आणि अशा प्रतिक्रिया वारली चित्रसृष्टी प्रक्षिक्षण कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे उमटल्या.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली वारली चित्रसृष्टी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन क्लब हाऊस, सावरकरनगर येथे करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांची संकल्पना होती.

संजय देवधर यांनी आदिवासी वारली चित्रशैलीचा ११०० वर्षांचा इतिहास थोडक्यात मांडला. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनी मोठे योगदान देऊन ही कला जगात लोकाभिमुख व लोकप्रिय केली, असे सांगून वारली चित्रांचे अनेक नमुने दाखवले. सहभागी शिबिरार्थींनी रंगीत टिंटेड पेपरवर मानवाकृती, पशू-पक्षी, लग्नाची वरात, सण-उत्सव अशी अनेक सुंदर चित्रे पांढऱ्या रंगाने रंगवून कलानिर्मितीचा आनंद घेतला.

दुपारच्या सत्रात अ‍ॅडव्हान्स कोर्समध्ये कापडावर, तसेच मातीच्या भांड्यांवर वारली चित्रे कशी रंगवायची याची प्रात्यक्षिके दाखवून देवधर यांनी वारली चित्रशैलीची तंत्रे समजावून दिली. तारपा नृत्याच्या चित्राने सर्वजण मोहित झाले. वारली चित्रकलेचे स्लाइड-शो व लघुपट दाखवून चित्रसहलीची माहिती देण्यात आली. दोन्ही कार्यशाळांच्या समारोपप्रसंगी सर्वांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images