Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बिबट्याने गोठ्यातच फस्त केले वासरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

पांढुर्ली येथून जवळच असलेल्या विंचूरदळवी गावात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शेतकरी केशव निवृत्ती दळवी यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवून त्याचा गोठ्यातच फडशा पाडला. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या लवकरात लवकर जेरबंद करावा, अशी मागणी दळवी वस्तीवरील ग्रामस्थांनी केली आहे. विंचूरदळवी शिवारातील दळवी वस्तीवरील केशव निवृत्ती दळवी हे रोजच्या प्रमाणे आपल्या गोठ्यात गाय व वासरू बांधून घरात झोपले असता शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्याने अचानक वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात ते वासरू ठार झाले. वासराच्या गळ्यातील दोर न तुटल्याने बिट्याने वासरू गोठ्यातच फस्त केले. त्यानंतर वस्ती शेजारी असलेल्या मक्याच्या शेतात गुडूप झाला. पहाटे सहाच्या सुमारास केशव दळवी हे गाईला चारा टाकण्यासाठी गेले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. सिन्नर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद भणगे व पांढुर्ली विभागाचे पशुधन अधिकारी डॉ. विश्वास वल्टे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येवून शवविच्छेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूर्ववैमनस्यातून पिता-पुत्राची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पूर्ववैमनस्यातून पिता-पुत्रावर धुळ्यात शुक्रवारी सायंकाळी जिवघेणा हल्ला करण्यात आला़ या हल्ल्यात पुत्राचा जागीच मृत्यू झाला. तर उपचार सुरू असताना वडिलांचाही मृत्यू झाला. हल्लेखोरांनी तलवार, चॉपरसह धारदार शस्त्रांचा वापर केला़ या हल्ल्यात आणखी एक जण जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

धुळे शहरातील वानखेडकरनगर परिसरात शुक्रवारसायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे़ दरम्यान, परिस्थिती तणावपूर्ण असून शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रावसाहेब दगाजी पाटील (वय ५५) आणि त्यांचा पुत्र वैभव पाटील (वय २२) हे त्यांच्या वानखेडकरनगरातील घराकडे येत असताना अचानक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला़ वैभव या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला़ तर त्याचे वडील रावसाहेब पाटील यांना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचार सुरू असताना रात्री ९ वाजेच्या सुमारास रावसाहेब पाटील यांचाही मृत्यू झाला़ रावसाहेब पाटील यांच्यासमवेत असलेला आकाश राजेंद्र पाटील (वय १४) हादेखील जखमी झाला आहे़ त्याच्यावर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे़ ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे़ पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जाते़ वैभवचे गेल्या महिन्यात ८ मे २०१८ रोजी लग्न झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे संप चौकट

$
0
0

धुळे विभागाचे ६० लाखांचे नुकसान

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करीत संप पुकारला. काँग्रेसप्रणीत इंटक संघटना आणि मान्यताप्राप्त कामगार संघटनेने या संपात भाग घेतला. यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक एसटी बंद झाल्याने प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली. एकीकडे हा संप यशस्वी झाल्याचा दावा संघटनांनी केला आहे. तर विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ, आगार प्रमुख भगवान जगनोर यांनी सकाळपासूनच धुळे आगारात ठाण मांडून होत्या. संपामुळे महामंडळाच्या धुळे विभागातील नऊ आगाराचे ६० लाखाहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सुधारीत वेतनवाढ या प्रमुख मागणीसह, पदनिहाय वेतनश्रेणी देण्यात यावी, एसटीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, जोपर्यंत वेतनाबाबत सुधारित करार होत नाहीत तोपर्यंत २५ टक्के हंगामी पगारवाढ दिली जावी, अशा विविध मागण्यांसाठी काल रात्रीपासून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. शिरपूर आणि शिंदखेडा आगार पूर्णपणे बंद होते. तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दोंडाईचा, साक्री, अक्कलकुवा यासह ९ आगारमधील तुरळक फेऱ्या सुरू होत्या. धुळे आगाराच्या १६० फेऱ्यांपैकी सुमारे १०० फेऱ्या पूर्ण झाल्याची तर नवापूर आगारातील १०० टक्के सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळ प्रशासनातर्फे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे निकाल

$
0
0

धुळे जिल्ह्याच्या निकालात घसरण

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८७.५१ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून २५ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात सात हजार ९५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. दरम्यान मागील तीन वर्षाच्या तुलनेत जिल्ह्याच्या निकालात दोन ते अडीच टक्क्यांनी घसरण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील ६३ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. जिल्ह्यातून २९ हजार ९८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले. त्यात १६ हजार ६७३ मुले व १२ हजार ४२५ मुलींची संख्या होती. एकूण प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी ८७.५१ एवढी आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १४ हजार २५७ मुले आणि ११ हजार २०६ मुली आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. मागील तीन वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात या वर्षी घसरण झाली आहे. २०१५ मध्ये जिल्ह्यातुन २८ हजार ३३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची टक्केवारी ९१.३६ एवढी होती. तर २०१६ मध्ये २५ हजार ९४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांची टक्केवारी ९०.३६ एवढी होती. २०१७ मध्ये २५ हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८९. ७९ होती. तर यावर्षी म्हणजेच मार्च २०१८ मध्ये दहावीच्या निकालाची टक्केवारीत घसरण झालेली आहे. यंदा २० कॉपी बहाद्दरांवर मंडळ शिक्षासुचीनुसार कारवाई करण्यात आली.

सात हजार विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत

दहावीच्या निकालात जिल्ह्यातून सात हजार ९५ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत आहेत. तर ११ हजार ९९ विद्यार्थी प्रथम श्रेणी, सहा हजार ४७० विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ७९९ विद्यार्थी पास श्रेणीत आहेत. असे २५ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतुकीचा बोजवारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट रस्त्याच्या कामासाठी मेहेर सिग्नल ते सीबीएस हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे सीबीएस चौकात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सीबीएस ते मेहेर चौक या एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असली, तरी अनेकांना त्याबाबत माहितीच नाही. त्यामुळे अनवधानाने विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांसमोर अन्य वाहने उभी ठाकत असल्याने येथील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

मेहेर सिग्नल ते सीबीएस या रस्त्याचे रुपांतर स्मार्ट रस्त्यामध्ये करण्यात येणार असून, या रस्त्याचे काम गुरुवारपासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला असून, त्याची अंमलबजावणीदेखील सुरू करण्यात आली आहे. वाहनधारकांची गैरसोय टाळता यावी याकरिता सीबीएस ते मेहेर सिग्नल या मार्गाने दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला. परंतु, या मार्गावरील एकूणच वाहनांची वर्दळ लक्षात घेता एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतुकीचा निर्णय नागरिकांसाठी तापदायक ठरू लागला आहे.

सीबीएस बसस्थानक, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बँक अशी महत्त्वाची ठिकाणे याच मार्गावर असल्याने दिवसभर येथे हजारो नागरिकांची वर्दळ असते. बहुतांश नागरिक स्वत:ची वाहने घेऊन येत असल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. शरणपूररोडवरून जिल्हा न्यायालयाकडे जाताना वाहनचालक नेहमीच्या सवयीप्रमाणे वळतात. त्यामुळे ते विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांसमोर उभे ठाकत असल्याचे पाहावयास मिळते. परिणामी येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. सीबीएस बसस्थानकामध्ये शिरणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस, याच मार्गाने धावणाऱ्या शहर बस यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येमध्ये भरच पडत आहे.

पोलिसांची हतबलता

सीबीएस ते मेहेर सिग्नल मार्गावर एक बस आली, तरी मागील पूर्ण वाहतूक ठप्प होते. सीबीएस चौकात वाहतूक पोलिसांचा फौजफाटा सज्ज ठेवला जात असला, तरी वाहनांची वर्दळ आणि अरुंद रस्ता यामुळे त्यांच्याकडूनही हतबलता व्यक्त केली जात आहे. परिणामी येथील वाहतुकीचे नियोजन फिसकटले असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

---

लीड, निष्पक्षचा लोगो वापरणे. (फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमध्ये बंडखोरी

$
0
0

सोनवणे, पंडित यांच्या अर्जामुळे वाढली डोकेदुखी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपचा अधिकृत उमेदवार असताना पक्षाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे आणि भाजप प्रणित शिक्षक परिषदेच्या सुनील पंडित यांनीही अर्ज दाखल केला आहे. सोनवणेंची भाजपतर्फे मनधरणी सुरू असली तरी सोनवणे अर्ज मागे घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने निवडणुकीत बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे पक्षाचे उमेदवार अनिकेत पाटील यांनी डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सर्वच पक्षांनी सक्रीय होत आपले समर्थक रिंगणात उतरवले आहेत. शिवसेनेने किशोर दराडे यांना पुरस्कृत केले आहे. तर भाजपने अनिकेत पाटील यांना अधिकृत उमेदवारी बहाल केली आहे. पाठोपाठ राष्ट्रवादीने काँग्रेसही संदीप बेडसे यांना पुरस्कृत केले आहे. परंतु या निवडणुकीत भाजपचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी अचानकपणे एंट्री केली. भाजपची संघटना असलेल्या शिक्षण परिषदेच्या सुनील पंडित यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अनिकेत पाटील यांनी ऐनवेळी पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळविल्याने भाजपमध्ये नाराजी आहे. पक्षाने शिक्षक परिषदेलाही विश्वासात न घेतल्याने हे दोघे रिंगणात उतरले आहेत.

निवडणूक लढविण्यावर सोनवणे ठाम आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी अजून तीन दिवस शिल्लक आहेत. या काळात सोनवणेंसह पंडित यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी पक्ष आपली ताकद लावावी लागणार आहे. परंतु सोनवणे आणि पंडित यांची उमेदवारी कायम राहिली तर भाजपला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

..

रिंगणातून दोघांची माघार

नाशिकरोड : निवडणुकीसाठी अर्ज छाननीदरम्यान दाखल २५ पैकी अजित लाठर यांचा उमेदवारी अर्ज वय कमी असल्याच्या कारणाने बाद झाला. उर्वरित २४ जणांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरविले आहे. दरम्यान, गजानन खराटे आणि कुणाल दराडे या दोघा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवसाअखेर एकूण २२ जणांचे अर्ज शिल्लक आहेत. माघार घेतलेल्यांपैकी कुणाल दराडे हे आमदार नरेंद्र दराडे यांचे पुत्र असुन दुसरे माघार घेतलेले उमेदवार गजानन खराटे हे देखील त्यांच्याच शिक्षण संस्थेत सेवेत आहेत. उमेदवारी अर्ज माघारी अंतिम मुदत सोमवारी (दि. ११) आहे.

लोगो : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेशचुरस वाढणार

$
0
0

उत्तीर्ण टक्केवारी

राज्य : ८९.४१%

कोकण : ९६%

नाशिक : ८७.४२%

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. राज्यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४८६१ने वाढली आहे. त्यामुळे यंदा राज्यभर नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ होणार आहे. राज्याचा एकूण निकाल ८९.४१ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ०.६७ टक्क्यांनी वाढला आहे. ‌विभागवार निकालात सलग सातव्यांदा कोकण विभागाने बाजी मारली. ९६ टक्के निकालासह कोकण अव्वल स्थानी आहे. नाशिक विभागाचा निकाल ८७.४२ टक्के असून, गेल्या वर्षीच्या (८७.७६) तुलनेत तो ०.३४ टक्क्यांनी घसरला आहे. नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ८५.९७ टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींचे वर्चस्व आहे.

राज्य शिक्षण मंडळातर्फे १ ते २० मार्च या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून एकूण १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ८ लाख ८६ हजार १०६ मुलांपैकी ७ लाख ७३ हजार ३३९ म्हणजेच ८७.२७ टक्के मुले तर ७ लाख ४२ हजार ५०७ मुलींपैकी ९१.९७ टक्के म्हणजे ६ लाख ८२ हजार ८६४ मुली उत्तीर्ण झाल्या. ११ विषयांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. गणिताचा निकाल मात्र ०.५२ टक्क्यांनी घसरला आहे. १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. कला कोट्यातील अतिरिक्त गुणांमुळे ही अत्युच्च उंची गाठली गेली. हे गुण मिळवण्यात लातूर आघाडीवर असून, येथील ७० विद्यार्थ्यांनी हे शिखर गाठले आहे. नाशिक विभागात १०० टक्के निकाल असलेल्या शाळांची संख्या ३६८ आहे, तर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४९,७४१ आहे. यामुळे नामांकित कॉलेजांचा कट ऑफ ९० टक्क्यांच्या पार जाईल, असे जाणकारांचे मत आहे. परिणामी, अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थ्यांनी कॉलेजांची निवड काळजीपूर्वक करावी, अशी सूचना तज्ज्ञांनी केली आहे.

फेरपरीक्षा १७ जुलैला

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून दहावीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यंदा १७ जुलैला फेरपरीक्षा होणार असून, याचे वेळापत्रक बोर्डाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल, असे मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी जाहीर केले.

विभागनिहाय निकाल

कोल्हापूर - ९३.८८%

पुणे - ९२.०८%

मुंबई : ९०.४१%

औरंगाबाद - ८८.८१%

अमरावती - ८६.४९%

लातूर - ८६.३०%

नागपूर - ८५.९७%

बळ हवे पंखांना

खडतर परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळविणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुढच्या शिक्षणाचे आभाळ खुले करणाऱ्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मटा हेल्पलाइन' उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष आहे. दहावीत ९० टक्के वा त्याहून अधिक गुण मिळवूनही केवळ विपरीत आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाची वाट खुंटण्याची भीती आहे, असा विद्यार्थी किंवा अशी विद्यार्थिनी आपल्याला माहीत असल्यास त्याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयात जरूर कळवा. 'मटा हेल्पलाइन' उपक्रमात त्यांच्या समावेशाबाबत योग्य विचार करून निर्णय घेतला जाईल. या संदर्भात 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयातच संपर्क साधावा. या उपक्रमासाठी 'मटा'ने अन्य कुणाचीही, कुठेही नेमणूक केलेली नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ही तर पत्रकबहाद्दर सेना!

$
0
0

भाजप नगरसेवकांचा शिवसेनेच्या संघटनेवर आरोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढेंच्या दहशतीखाली काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधार देण्याऱ्या भाजप नगरसेवकांवर टीका करणाऱ्या म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमेंना भाजप नगरसेवकांनी जशास तसे उत्तर दिले आहे. महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी हे तणावाखाली असतानाही कर्मचारी सेनेचे अध्यक्ष केवळ पत्रकबाजी करीत आहेत. प्रसिद्धीसाठी वेळोवेळी पत्रक काढून तिदमे हे अधिकारी व कामगारांची दिशाभूल करीत असून, त्यांच्या पत्रकबाजीमुळे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही पत्रकबहाद्दर सेना झाल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे व जगदीश पाटील यांनी केला आहे.

आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कार्यशैलीमुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी हे तणावाखाली असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची बाजू घेण्यावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि म्युनिसिपल कर्मचारी सेनेत वाद सुरू झाला आहे. कर्मचारी व अधिकारी हे तणावाखाली असताना कर्मचारी सेना त्यांच्या मदतीला धावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांच्या युवा ब्रिगेडने अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कर्मचाऱ्यांना आधार देण्याचे काम सुरू केले होते. त्यावर भाजपने आधार देण्याऐवजी नोकरभरती करून दाखवण्याचे आवाहन तिदमे यांनी केले होते. त्याला भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे, जगदीश पाटील, राकेश दोंदे, अॅड. शाम बडोदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. संघटनेकडून कामगारांच्या हिताचे कोणतेही काम आजपावेतो झालेले नाही. रवींद्र पाटील प्रकरणामुळे अधिकाऱ्यांमध्ये असलेला तणाव समोर आला असताना संघटनेचे अध्यक्ष पत्रकांच्या पलिकडे जात नाहीत. त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना असताना अध्यक्षांनी केवळ कॅबिनच सुधारण्याचे काम केले आहे. तिदमेंच्या वर्तनामुळे कर्मचारी सेना ही कामगारांच्या हिताची सेना राहिली नसून, पत्रकबाज सेना झाल्याचा आरोप केला आहे.

...तर आंदोलन करू

भाजपने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हित जपण्याचे काम केले आहे. तळगाळातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता भाजप प्रयत्नशील असून, आम्ही वेळ पडल्यास कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशा इशारा शहाणे आणि पाटील यांनी दिला आहे. कर्मचारी सेनेच्या अध्यक्षांनी केवळ पत्रकबाजी न करता कर्मचाऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून दाखवावे, असे आवाहनही भाजपने दिले असून, त्यावर प्रवीण तिदमे आता काय पलटवार करतात याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पारंपरिक विद्यापीठांच्या योजना ‘आरोग्य’ला ही लागू होणार

$
0
0

\Bलोगो - टॉक टाइम

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ उद्या (१० जून) विसावा वर्धापनदिन साजरा करीत आहे. या निमित्ताने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी 'मटा'च्या वाचकांसाठी साधलेला संवाद...

\Bदेशातील पारंपरिक विद्यापीठे आणि आरोग्य विद्यापीठासारख्या संस्थांमध्ये धोरणात्मक स्तरावरून भेदभाव जाणवतो का?

पारंपरिक अकृषी विद्यापीठातून आरोग्य विज्ञान शिक्षणाशी संबंधित वेगळ्या अभ्यासक्रमांसाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार पारंपरिक विद्यापीठांना लागू असलेल्या योजना, जसे वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती योजना, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, नवीन परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजनेचे लाभ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असणे आवश्यक होते. मात्र, विद्यापीठ स्थापनेपासून कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित होते. ही बाब आम्ही प्रथमच राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली एप्रिल महिन्यात आयोजित कुलगुरूंच्या संयुक्त बैठकीत मांडली. बैठकीत कुलपतींनी विशेष लक्ष घालून पारंपरिक विद्यापीठांना लागू असलेल्या सर्व योजना त्वरित लागू करण्याबाबत सरकारला कळविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थीकेंद्रितपणा हा विद्यापीठाचा गाभा आहे...

ज्यांच्यासाठी विद्यापीठ कार्यरत आहे तो विद्यार्थी आमचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र स्थापण्यात आले आहे. येथून शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रमांना चालना दिली जाते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशात शैक्षणिक संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी जगातील २० देशांमधील विद्यापीठांशी लवकरच करार करण्यात येणार आहे.

आरोग्याचे धडे देणारे विद्यापीठ योगाचेही शिक्षण देणार आहे...

योग आणि आरोग्य या विषयाची उपयुक्तता लक्षात घेता आरोग्य शिक्षणाचे धडे देताना त्यात योगशास्त्राचाही समावेश विद्यापीठास गरजेचा वाटतो. या दृष्टीने योग शिक्षणाच्या प्रसारासाठी केंद्र सरकारच्या आयुष विभागासोबत करार करून आरोग्य विज्ञानातील सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. योगशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

उत्तर महाराष्ट्रात मेडिकल सीट्सचा तुटवडा जाणवतो. याबाबत आरोग्य विद्यापीठाचे प्रयत्न काय?

विद्यापीठाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेतील सदस्यांच्या योगदानामुळे जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सुरू झाले आहे. राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या शंभरावर जागांमध्ये त्यामुळे वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रालाही यातील काही जागांचा फायदा होणार आहे.

संशोधनासाठी विद्यापीठाच्या वतीने कोणते प्रयत्न केले जात आहेत?

संलग्न महाविद्यालयांतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या संशोधनातील सहभाग वाढविण्यासाठी २०१७-१८ पासून प्रथमच विद्यापीठाने विद्या शाखानिहाय संशोधन परिषदेचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. यावर्षी विद्यापीठाद्वारे ८२ विद्यार्थी व २४ वरिष्ठ संशोधकांना संशोधन शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील संशोधकांना आपले संशोधन साहित्य प्रकाशित करण्यासाठी विद्यापीठाचे पहिले संशोधन नियतकालिक लवकरच प्रकाशित होत आहे. त्याबाबतची नोंदणीप्रक्रिया पूर्ण झाालेली आहे.

डॉक्टर्स व रुग्णांमध्ये संवादवाढीसाठी विद्यापीठ प्रयत्न करते आहे का?

डॉक्टर- रुग्ण यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी, गैरसमजाचे प्रसंग टाळण्यासाठी संवादकौशल्य या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्या संदर्भातील नियोजन करण्यात आले आहे. ते विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावणे हे मोठे आव्हान कायम असते?

वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महाविद्यालयांचे परिणामात्मक मूल्यांकन करण्यात येत आहे. विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयांमध्ये केंद्रीय व राज्य परिषदेच्या मानकानुसार आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, अर्हताप्राप्त प्राध्यापक, रुग्णालयीन सुविधा इत्यादी बाबी तपासण्यासाठी परिणात्मक मूल्यांकन उपक्रमही विद्यापीठात आयोजित करण्यात येतात.

अलीकडील काळात विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत अनेक बदल झाले आहेत?

जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी अनुषंगाने परीक्षाविषयक कामकाजात ऑनलाइन प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठास पाठविण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. शोधप्रबंध ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठास सादर करण्याची व परीक्षकांकडून ऑनलाइन पद्धतीने तपासण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रबंध ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतात व मूल्यांकनदेखील ऑनस्क्रीन पद्धतीने करण्यात येते. हे तंत्रज्ञान वापरणारे आपले भारतातील एकमेव विद्यापीठ आहे. परीक्षेतील गैरप्रकारास प्रतिबंध करण्यासाठी विद्यापीठांतर्गत सर्व म्हणजे ११७ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या 'ई पेमेंट गेटवे'बद्दल सांगा.

विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या संकल्पनेनुसार कॅशलेस व्यवहार करण्यासाठी विद्यापीठाने 'ई-पेमेंट गेटवे' ही ऑनलाइन शुल्क अदा करण्यासाठी आवश्यक प्रणाली तयार केली आहे. त्यामुळे विद्यापीठाचे सर्व आर्थिक व्यवहार हे रोख रक्कमविरहित पद्धतीने होण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 'ई-पेमेंट गेटवे'ची सोपी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या वर्धापनदिनापासून या सुविधेचा लाभ संबंधितांना घेता येईल.

शब्दांकन : जितेंद्र तरटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलेशी हवा आंतरिक संवाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कलेशी आपला आंतरिक संवाद हवा, हा संवाद समाजाला दाखवण्यासाठी नसतो, तर तो अमूर्त पातळीवर असतो. चित्र काढणे ही अत्यंत गुह्य गोष्ट आहे. माझा सर्वांसमोर चित्र काढण्याला विरोध त्यामुळेच आहे. ती एक नाजूक बाब आहे, कला ही केवळ सर्वांसमोर दाखविण्यासाठी नसावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांनी शनिवारी केले.

'महाराष्ट्र टाइम्स' व 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान'तर्फे आयोजित दोन दिवसीय कलासंगम महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभाकर कोलते आणि प्रमोद कांबळे यांनी कॅनव्हासवर 'कलासंगम'चे अक्षरचित्र रेखाटून महोत्सवाचे उद्घाटन केले. कोलते म्हणाले, की कला ही आतून बाहेर येणारी गोष्ट आहे. परदेशामध्ये जेव्हा चित्रप्रदर्शन लागते, तेव्हा चित्रकार तेथे नसतोच, तो त्याच्या स्टुडिओमध्ये दुसरे पेंटिंग काढत असतो. आपल्या येथे मात्र मुलीच्या लग्नात वडील उभे राहतात तसे चित्रकाराला उभे राहावे लागते, ही वाईट गोष्ट आहे.

चित्रकलेच्या अवस्थांतराविषयी बोलताना कोलते म्हणाले, की आपण तेथेच राहत नाही. पुढे चालत राहतो, आपण आपल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत व त्यानुसार पुढे मार्गक्रमण केले पाहिजे. चित्रकारांनी आपल्या आतला आवाज ऐकला पाहिजे, तो आवाज ऐकून चित्र काढले पाहिजे व आपण काय काढले आहे, ते समजून घेतले पाहिजे. सर्व जण पाहून चित्र काढत असताना मी मात्र चित्र काढून पाहिले, असेही कोलते म्हणाले.

प्रेक्षकांविषयीही बोलताना कोलते म्हणाले, की भारतातला प्रेक्षक चित्रकलेला अजून सरावलेला नाही. त्याला चित्र लांबून बघायचे की हात लावून बघायचे हेदेखील कळलेले नाही. गॅलरीत जेव्हा एखादा पालक त्याच्या मुलाला चित्रावरून हात फिरवू देतो तेव्हा यांना सांस्कृतिकदृष्ट्या आणखी किती साक्षर व्हायचे आहे, असा प्रश्न मला पडतो. व्यासपीठावर 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक अशोक पानवलकर, ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांची उपस्थिती होती.

अशोक पानवलकर प्रास्ताविकात म्हणाले, की नाशिकला कलेचा मोठा वारसा आहे. नाशिकमध्ये असलेल्या अनेक कलांचा संगम नाशिकची नवी ओळख बनली आहे. कलेचे हे दालन आणि परंपरा जपण्याचे काम 'कलासंगम'च्या माध्यमातून होत आहे. स्वानंद बेदरकर यांनी अतिशय खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शैलेन्द्र तनपुरे यांनी आभार मानले. या महोत्सवाला हॅण्ड फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे.

--

'महाराष्ट्र टाइम्स'ने मला घडविले

उमेदवारीच्या काळात मला जेव्हा आर्थिक बाजू बळकट करावयाची होती तेव्हा मला 'महाराष्ट्र टाइम्स'ने खूप आधार दिला. 'मटा'नेच मला घडवले. मी 'मटा'मध्ये कला समीक्षण लिहायचो. जहाँगीर आर्ट गॅलरी किंवा इतर कला गॅलरीमध्ये प्रदर्शन लागायचे, त्यांचे समीक्षण लिहून चार पैसे कमवायचो. परंतु, एका लेखामध्ये जोरदार टीका केल्याने ते काम तेथेच थांबले. मात्र, 'मटा'ने मला उमेदवारीच्या काळात हात दिला होता.

--

सप्तकन्यांचा सन्मान...

कलेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत नाशिकचा ठसा उमटवत अन् अटकेपार झेंडा रोवणाऱ्या सप्तकन्यांचा सत्कार 'कलासंगम'मध्ये करण्यात आला. रागेश्री वैरागकर (गायन), बिलोरी ढाकीफळे (चित्रकला), शिरीन पाटील (चित्रपट), नूपुर सावजी (नाटक), वैष्णवी भडकमकर (वादन), शिल्पा देशमुख (नृत्य) यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच छोटा पडदा, मोठा पडदा व रंगभूमीवर उत्तुंग कामगिरी करणाऱ्या अर्चना निपाणकर, कल्याणी मुळ्ये व शुभांगी सदावर्ते यांच्या पालकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

--

संबळवादनाने रंगत

नाशिकमधील उगवते कलाकार प्रणव कोंटुरवार, ऋतुजा चव्हाणके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संबळवादनाने 'कलासंगम' महोत्सवाची रंगत आणखी वाढली. पारंपरिक वाद्याच्या मराठमोळ्या ठेक्यास नाशिककरांची दर्दी दाद मिळाली.

--

शोभायात्रेने वाढविली शोभा

आदिवासी नृत्यांचा पारंपरिक साज अन् कलेचे विविध रंग असलेल्या शोभायात्रेने 'कलासंगम' महोत्सवाचा श्रीगणेशा झाला. आदिवासी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचणारी तरुणाई, तारपा नृत्याचा कलाविष्कार बघण्यात दंग झालेले नाशिककर, आदिवासी डफ अन् हलगीच्या नादावर थिरकणारे कलावंत अशा भव्य शोभायात्रेने 'कलासंगम'ची रंजकता वाढवली. एकावर एक थर रचत केलेल्या पारंपरिक नृत्यास नाशिककरांनी उत्स्फूर्त दाद दिली. शोभायात्रेत नाशिकमधील नामवंत कलावंत आणि मान्यवर सहभागी झाले होते.

--

फोटो : सतीश काळे, पंकज चांडोले, प्रशांत धिवंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोयम यांची नियुक्ती

$
0
0

नाशिक : महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणwक निरीक्षक म्हणून कामगार आयुक्त नरेंद्र पोयम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेविषयी काही तक्रार असल्यास नागरिकांनी ०२५३- २३१८२७१ किंवा ८३७८८६५७२० वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी केले आहे.

---

हरकती कळवाव्यात

नाशिक : शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालय जागेतील उन्मळलेले एक स्पॅथोडीया झाड रस्त्याकडे झुकले असून, भिंतीवर टेकल्याने धोकादायक स्थितीत आहे. त्याचा विस्तार तोडण्यात येणार असून, त्याबाबत कुणाच्या हरकती अथवा सूचना असल्यास विभागीय अधिकारी तथा वृक्ष अधिकारी (नाशिक पश्चिम) पंडित कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक येथील कार्यालयात १० दिवसांच्या आत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे आवाहन विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेढनवाढीचा तिढा सुटेना!

$
0
0

एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम;Ḥ खासगी वाहतूक सुसाट

टीम मटा

वेतनवाढीच्या मुद्यावरून महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना संपाचे हत्यार उपसले आहे. शुक्रवारपासून संपावर गेलेले कर्मचारी शनिवारी देखील संपावर असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांची अडवणूक करीत खासगी वाहतूकदारांनी मात्र भाडेवाढ करून दोन दिवसात चांगलीच कमाई करून घेतली.

निमाणी बस स्थानकावर प्रवासी प्रतीक्षेत

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल झाले. निमाणी बस स्थानकावरून शहर परिसरात विविध ठिकाणी जाणाऱ्या बसेसची संख्या घटल्याने प्रवाशांना तासन् तास ताटकळत बसावे लागले. त्यात कामगार आणि महिलांची संख्या अधिक होती. रिक्षा, काळी पिवळी अशा खासगी वाहतूक करणाऱ्यांनी संपामुळे भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांची अडवणूक झाली.

वेतनवाढीच्या मुद्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून (दि. ८) संप पुकारला आहे. या संपात कामगार सेनेने सहभाग घेतला नाही. या संघटनेचे कर्मचारी सेवेत हजर होते. संपात सहभागी झालेले कर्मचारी पंचवटी डेपोच्या प्रवेशद्वारावर सकाळपासून बसून होते. दुपारी येथे ठिय्या देणाऱ्यांची संख्या कमी झाली. सकाळपासून ३५ बसेस रस्त्यावर धावत होत्या. त्यांच्या ३५१ फेऱ्या झाल्या. सकाळच्या सत्रात १०८९ फेऱ्या होत असतात, त्यांची संख्या कमी झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

पंचवटी डेपोतून सुटणाऱ्या बसेस निमाणी बस स्थानकात जावून तेथून त्या शहराच्या विविध भागात सोडण्यात येतात. त्यामुळे प्रवासी बस स्थानकावर येऊन थांबतात. शनिवारी (दि. ९) रोजीही प्रवासी बसच्या प्रतीक्षेत थांबून होते. मात्र तासन् तास थांबूनही बस येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ते निराश झाले. काही नाईलाजास्तव रिक्षा, काळी पिवळी टॅक्सी यांचा आधार घेत होते. संपाच्या काळात प्रवाशांकडून जास्त भाडे आकारणी केली जात असली तरी नियोजित ठिकाणी वेळेवर पोहचण्यासाठी जास्त भाडे देण्याशिवाय पर्याय नसल्याने प्रवाशांच्या खिशाला झळ बसत आहे.

000

घोटीत कडकडीत बंद

म. टा. वृत्तसेवा, घोटी

एस टी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी पुकारलेल्या अघोषित संपाला इगतपुरीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील सर्व जवळपास अडीचशे कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांनी भाग घेत सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकचे अध्यक्ष भास्कर गुंजाळ यांनी इगतपुरी आगारात भेट देऊन अघोषित संपाला पाठिंबा जाहीर केला. शनिवारी घोटीत आठवडे बाजार असल्याने घोटी बाजाराकडे आलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. इगतपुरी तालुक्यात या संपामुळे ५० पेक्षा जास्त बसेस बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण सेवा विस्कळीत झाली. शाळा सुरू होण्याच्या दिवसात व आठवडे बाजारासाठी आलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली. हा संप सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे तसेच वृद्धांचे अतोनात हाल होत आहेत. या संपावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास राज्यात एसटी महामंडळाला याचा मोठा फटका बसणार आहे.

परिवहन मंत्र्यांनी ४८९४ कोटी रुपयांचा करार केला आहे. मात्र या महागाईच्या काळात ही वाढ अत्यंत तुटपुंजी आहे. शेजारी असणाऱ्या कर्नाटकात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याला १९५०० रुपये इतके बेसिक मिळतेय. तेथील कर्मचाऱ्याचा सर्व पगार ३५ ते ४० हजारांवर मिळतोय. याऊलट महाराष्ट्रातील कर्मचाऱ्याला सर्व मिळून १९५०० रुपये इतकीही पगार मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा उद्रेक झाला आहे.---भास्कर गुंजाळ, अध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस(इंटक) इगतपुरी

0000

निफाड, लासलगावातही शुकशुकाट

म. टा. वृत्तसेवा, निफाड

एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या बंदमुळे निफाड, लासलगाव, विंचूर भागातील बस स्थानकात शनिवारी दिवसभर शुकशुकाट होता. शनिवारी निफाड येथून तीन तर लासलगाव येथून केवळ एकच बस बाहेर प्रवासी घेवून निघाल्याची माहिती बस डेपोतून मिळाली.

निफाड येथे शनिवारी बस स्थानकात बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिवसभरात केवळ तीन बस आल्याचे कंट्रोलर गावित यांनी सांगितले. बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना नाशिक, येवला, औरंगाबाद, पिंपळगाव जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने त्यांचे हाल झाले. नाशिकला जाण्यासाठी शांतीनगर चौफुलीवर खासगी वाहनांच्या फेऱ्या सुरू होत्या. औरंगाबाद व येवला जाण्यासाठी मात्र प्रवाशांचे हाल झाले. काहींना प्रवास रद्द करून घरी परतावे लागले.

लासलगाव डेपोतील २०० कर्मचारी संपात असल्यामुळे येथून शनिवारी नाशिककडे जाणारी फक्त एक बस बाहेर पडू शकली. त्यानंतर मात्र एकही बस बाहेर पडली नाही.

लासलगाव बस डेपोतून रोज ५० बस बाहेर पडतात. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी २०० कर्मचारी कामावर आले नाहीत. त्यामुळे लासलगाव डेपोचे गेल्या दोन दिवसात ९ लाख रुपये उत्पन्न बुडाल्याचे डेपो मॅनेजर पी. बी. पद्मने यांनी सांगितले. लासलगाव येथील बाहेरगावी नोकरीनिमित्त जाणाऱ्या नोकरदारांसह विद्यार्थ्यांचेही हाल झाले. काहींनी रेल्वे आणि खासगी वाहनांच्या उपयोग केला.

0000

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून, शनिवारी मनमाडसह नांदगाव व चांदवड बस स्थानकात या संपाचा मोठा परिणाम दिसून आला. संपात कर्मचारी सहभागी झाल्याने मनमाड, नांदगाव, चांदवड बसस्थानकात वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. तसेच बसस्थानकात आलेल्या प्रवाशांचे बाहेर गावी जाण्यासाठी अतोनात हाल झाले. मनमाडहून नांदगाव, चांदवड, मालेगाव येथे जाण्यासाठी तसेच नांदगाव येथून मालेगाव, औरंगाबाद येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध नसल्याने खासगी वाहतुकीवर अवलंबून राहण्याची वेळ प्रवाशांवर आली. काही ठिकाणी प्रवाशांच्या अडचणींचा लाभ उठवत नेहमीच्या दरा पेक्षा १० ते २० रुपये जास्त भाडे आकारले गेल्याची ओरड प्रवासी करताना दिसत होते. मनमाड, चांदवड व नांदगाव डेपोतून शनिवारी कोणत्याच गाड्या सुटल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बसेस बंद असल्याने काळी, पिवळी व्हॅन, टॅक्सी, सिक्स सीटर गाड्या, जि. प. यांची चलती असल्याचे दिसून आले. बसेस बंद असल्याने नाशिक, औरंगाबाद, शिर्डी जाण्यासाठी रेल्वे स्थानकात जाण्याची वेळ मनमाड येथील प्रवाशांवर आली. बसस्थानकात प्रवासी वाहतूक ठप्प होती. शनिवारी सकाळी बसेस सुरू होतील या आशेवर प्रवासी बसस्थानकात थांबले होते.

बस ही ग्रामीण भागातील जीवन वाहिनी आहे. पण बससेवा बंद असेल तर ग्रामीण जीवनच ठप्प होऊन जाते, असा अनुभव येत आहे. ग्रामीण भागातील लोकांनी बस संपाच्या काळात बाहेर गावी जायचेच नाही का? असा प्रश्न पडतो.---देवीदास आहिरे, प्रवासी.

0000

ग्रामीण जनजीवन विस्कळीत

कळवण : तालुक्यातील ग्रामीण भागातील वाहतुकीचे मुख्य साधन असलेली एसटी दोन दिवसांपासून डेपोतच असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कळव ण-नाशिक रोज अपडाऊन करणाऱ्या व्यापारी प्रवाशांना मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागत आहे. कळवण परिवहन आगारातील सर्वच संघटना या संपात सहभागी झाल्या असून, शासनाने केलेल्या एकतर्फी वेतनवाढीला सर्वच संघटनांनी विरोध केला आहे. जर ही ऐतिहासीक वेतनवाढ आहे तर ती घेण्यासाठी सक्ती का? व ती न स्वीकारल्यास राजीनामा देण्याची धमकी कशासाठी?असे प्रश्न संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विचारले आहेत. कळवण आगारातील सर्वच संघटनांनी या संपात सहभागी होऊन बंदला प्रतिसाद दिला आहे.

00000

खासगी वाहतूकदरांची चांदी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशी देखील कायम राहिल्याने प्रवाशांचे हाल कायम आहेत. येथील बसस्थानकातून जवळपास ९० टक्के फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहतुकीने प्रवास करावा लागत आहे. शनिवारी येथील आगारातून जाणाऱ्या २६० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्या. तर दोन दिवसात आगाराचे सुमारे १० लाखांहून अधिक नुकसान झाल्याची माहिती आघार प्रमुख किरण धनवटे यांनी दिली.

शनिवारी संपाचा दुसरा दिवस असल्याने सकाळी तरी बस सुरू होतील या आशेने सकाळी प्रवाशांची तुरळक गर्दी होती. सकाळच्या सत्रात येथील आगारातून केवळ १८ गाड्या धावल्या. नाशिक, शिर्डी तसेच चाळीसगाव जाणाऱ्या प्रवासी या गाड्यांनी मार्गस्थ झाले. मात्र त्यानंतर एकही बस बाहेर पडली नाही. अन्य डेपोमधून देखील बसेस येत नसल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागला आहे. एसटी संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी, व्यावसायिक, नागरिकांना बसला आहे. संपामुळे केवळ १२५ कर्मचारी हजर असून, त्यांच्याद्वारेच तुरळक बससेवा पुरवली जात असल्याचे धनवटे यांनी सांगितले.

१० लाखांचा आर्थिक फटका

एस टी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपाचा आर्थिक फटका मालेगाव आगारास बसला आहे. येथून दिवसभरात सरासरी ३५० बस फेऱ्या होतात. मात्र दोन दिवसाच्या संपाने ५०० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे १० लाखाहून अधिकचा आर्थिक फटका बसला आहे.

00000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलासंगम महोत्सवात आज बहुढंगी कार्यक्रमांची रेलचेल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स' व कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आयोजित कलासंगम महोत्सवास शनिवारी कलाप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला असून, या महोत्सवात आज, रविवारी (दि. १०)देखील विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

गायन या विषयावर सकाळी १० वाजता विशाखा हॉलमध्ये परिसंवाद होणार असून, 'कलेची साधना आणि आजचा विद्यार्थी' असा विषय घेण्यात आला आहे. त्यानंतर वादन या विषयावर परिसंवाद होणार असून, 'हौस, साधना की फॅड?' या विषयाभोवती तो फिरणार आहे. छायाचित्र या विषयावरील परिसंवादात 'छायाप्रकाश कालचा की आजचा?' असा विषय घेण्यात आला आहे. त्यानंतर शिल्प या विषयावर परिसंवाद होणार असून, 'पैसा, कला आणि समाज' याभोवती हा विषय गुंफण्यात येणार आहे. दुपारी हौशी कलाकारांचे कला सादरीकरण होणार आहे. मुक्तायन हॉलमध्ये डिजिटल आर्ट या विषयावरील सादरीकरण होणार असून, शिल्पकला, चित्रकला, कॅरिकेचर, कॅलिग्राफी या विषयांवरील डेमोदेखील यावेळी होणार आहेत. सायंकाळी गणेशवंदना, अरंगेत्रम, तसेच फ्युजन आदी कार्यक्रम होणार असून, मेलोडिकाही सादर होणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जादुगार सतीश देशमुख जादूचे प्रयोग सादर करणार आहेत. या कार्यक्रमाने 'कलासंगम' महोत्सवाचा समारोप होणार आहे.

खजिना दिवसभर खुला

'कलासंगम'द्वारे 'मटा'तर्फे नाशिककरांसाठी विविध कार्यक्रमांचा खजिना रविवारी दिवसभर खुला राहणार आहे. कुसुमाग्रज स्मारकात शस्त्रास्त्रे व नाणी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यात दुर्मिळ नाणी, तसेच शस्त्रास्त्रे नाशिककरांना बघायला मिळणार आहेत. छंदोमयी गॅलरीत फोटोग्राफी, चित्रकला, वारली पेंटिंग्जचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ते पाहण्याची संधीदेखील उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विस्थापितांना आता प्रॉपर्टी कार्ड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाशिक व इगतपुरी तालुक्यांतील अनेक गावांच्या जमिनी लष्करासाठी संपादित केल्यानंतर विस्थापित झालेल्या नागरिकांना तातडीने प्रॉपर्टी कार्ड देण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून नाशिक व इगतपुरी तालुक्यांतील अनेक गावांच्या जमिनी लष्करासाठी संपादित केल्यानंतर अनेकांना गावोगावी विस्थापित करण्यात आले. शिगवे बहुला येथे अशा प्रकारे अंबडवाडीच्या लोकांना दिलेल्या जागा आजही त्यांच्या नावे होत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लालफितीच्या कारभारामुळे नागरिक मेटाकुटीला आले असताना पालकमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत. शिगवे बहुला, अंबडवाडी येथील सरकारी जागेवर अनेकांना प्रस्थापित करण्यात आले. मात्र, सदरच्या जागा त्यांच्या नावे नसल्याने त्यांना या जागेवर कोणताही विस्तार करता येत नाही. याशिवाय याच भागातील सर्व्हे नंबर १४ हा चारणवाडी परिसरात असून, गेल्या ५० वर्षांपासून येथे अनेक कुटुंबे राहतात. त्यांची मोजणी होऊन त्यांच्या नावे सदर जागा होणे गरजेचे आहे. याबाबतही पालकमंत्र्यांनी लक्ष घातले असून, सरकारच्या अनेक जागांवर कॅन्टोन्मेंट परिसरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल योजना राबविली जाऊ शकते. यात स्टेशनवाडी, हाडोळा, सोनेवाडी, शिगवे बहुला या भागाचा समावेश आहे. याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्ड लोकप्रतिनिधींनी शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस अधिकारी बदल्या

$
0
0

--

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

--

म टा खास प्रतिनिधी, नाशिक

--

नाशिक शहराच्या पोलिस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तसे आदेश राज्य सरकारच्या गृहविभागाने काढले आहेत. शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ १ मध्ये कार्यरत असलेले सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे, विजयकुमार चव्हाण व डॉ़ राजू भुजबळ यांची बदली झाली आहे़ तर ग्रामीण पोलिस दलातील कळवणचे उपविभागीय अधिकारी देवीदास पाटील यांची उपअधीक्षक म्हणून ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे़ शहर पोलिस आयुक्तालयात दीपक गिऱ्हे, बापू बांगर, रमेश पाटील, ईश्वर वसावे यांची तर पदोन्नतीवर अरविंद आडके व शांताराम पाटील यांची सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे़

बदली झालेले अधिकारी असे (कंसात बदलीचे नवे ठिकाण)

सचिन गोरे (उपविभागीय अधिकारी, पेठ, नाशिक ग्रामीण), डॉ. राजू भुजबळ (उपविभागीय अधिकारी, पुसद, जि. यवतमाळ), विजयकुमार चव्हाण (उपविभागीय अधिकारी, चोपडा, जि. जळगाव), महेश रायकर (पोलिस उपअधीक्षक, सांगली), गजानन राजमाने (उपविभागीय अधिकारी, सातारा), बजरंग बनसोड (सहायक आयुक्त, बृहन्मुंबई), एस. के. वळवी (उपविभागीय अधिकारी, ठाणे). दीपक गिऱ्हे (सहायक आयुक्त, नाशिक), ईश्वर वसावे (सहायक आयुक्त, नाशिक), रमेश पाटील (सहायक आयुक्त, नाशिक), बापू बांगर (सहायक आयुक्त, नाशिक), देवीदास पाटील (उपअधीक्षक, नाशिक ग्रामीण), माधव पडिले (उपविभागीय अधिकारी, निफाड, नाशिक), रत्नाकर नवले (उपविभागीय अधिकारी, मालेगाव), सदाशिव वाघमारे (उपविभागीय अधिकारी, कळवण, नाशिक), विशाल ठाकूर (महाराष्ट्र पोलिस अकादमी).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कॉमर्समधील संधी’विषयी उद्या व्याख्यान

$
0
0

प्लॅनेट कॅम्पस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही वर्षांपासून कॉमर्स या क्षेत्रातील विस्तारलेल्या संधींमुळे या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. या क्षेत्रातील विविध संधींविषयी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या प्लॅनेट कॅम्पस उपक्रमांतर्गत 'कॉमर्समधील संधी' या विषयावर लोकेश पारख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित कॉलनी येथील पारख क्लासेस येथे उद्या (११ जून) सायंकाळी ५ वाजता हा सेमिनार होणार आहे. दहावीच्या कलमापन चाचणीतही कॉमर्स या क्षेत्राला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. दहावीचा निकालही जाहीर झाल्याने आता प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेपूर्वी विद्यार्थ्यांना कॉमर्समधील संधी कळाल्यास त्यांना करिअरच्या दृष्टीनेप्रभावी नियोजन करता येणार आहे. त्यामुळे या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तानाजी सावंतचे सेट परीक्षेत यश

$
0
0

नाशिक : विद्यापीठ अनुदान आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने २८ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापकपदासाठी राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत तानाजी हरिभाऊ सावंत यांनी वाणिज्य विषयात यश मिळविले. त्यांनी पदव्युत्तर पदवी शिक्षण हे गंगापूररोडवरील केटीएचएम महाविद्यालयातून पूर्ण केले.

मनीषा बोरसेचे यश

नाशिक : विद्यापीठ अनुदान आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने २८ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापकपदासाठी राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स या महाविद्यालयातील प्रा. मनीषा कारभारी बोरसे यांनी 'इलेक्ट्रॉनिक्स' या विषयात यश मिळविले. प्रा. डॉ. दीप्ती भुतडा, प्रा. आर. वाय. बोरसे, डॉ. जगदाळे, डॉ. ए. व्ही.पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

परवानगी नाकारावी

नाशिक : कोरेगाव भिमा दंगल प्रकरणी वादग्रस्त ठरलेले संभाजी भिडे गुरूजी यांच्या सभेस परवानगी देण्यात येऊ नये, अशा आशयाची मागणी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत समितीच्या वतीने समन्वयक राहुल तुपलोंढे यांनी पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांना निवेदन दिले आहे. या निवेदनावर राम ठाकूर, गीतांजली बर्गे, तुळशीराम शिंदे यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाखल्यांसाठी आता व्हॉटस अॅप हेल्पलाईन

$
0
0

शैक्षणिक दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांना सुविधा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शैक्षणिक प्रवेशासाठीचे दाखले मिळविण्यात येणाऱ्या अडचणींबाबत तत्काळ दाद मागता यावी याकरिता जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ७२६४८८६८०० या व्हॉटस अॅप क्रमांकावर नागरिक त्यांच्या तक्रारी किंवा दाखल्यांबाबत अडचणी सांगू शकणार आहेत.

बारावी पाठोपाठ आता दहावीचेही निकाल जाहीर झाले असून, विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक प्रवेशासाठीची लगबग सुरू झाली आहे. महाविद्यालयीन शैक्षणिक प्रवेशासाठी उत्पन्नाच्या दाखल्यासह डोमेसाईल, नॅशनॅलिटी, नॉन क्रिमिलेयर आणि जातीच्या दाखल्याची आवश्यकता भासते. याखेरीज गरजेनुसार अन्य काही दाखल्यांची देखील विद्यार्थ्यांकडे मागणी केली जाते. प्रवेशासाठी मुदतीत हे दाखले सादर करणे अनिवार्य असते. परंतु या काळात एकूणच दाखल्यांची मागणी वाढत असल्याने ते मुदतीत उपलब्ध होण्यातही अडचणी निर्माण होतात. याखेरीज त्वरेने दाखला मिळवून देण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांकडे पैशांची मागणी होण्याची शक्यताही अधिक असते. असे गैरप्रकार वेळीच रोखता यावेत याकरीता व्हॉटसअप हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

-

उद्यापासून १३ महाविद्यालयांत 'आपले सरकार'

जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शहरातील १३ शाळा, महाविद्यालयांमध्ये आपले सरकार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून संबंधित शाळा, महाविद्यालयांमध्ये हे केद्र सुरू होतील. त्यामुळे विद्यार्थी तेथे विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी अर्ज करू शकतील. यामध्ये डी.डी. बिटको, जी. डी. सावंत आणि गुरूगोविंदसिंग कॉलेज, जी. ई. सोसायटी, नाशिकरोड येथील बिटको व आरंभ कॉलेज, केटीएचएम व मराठा हायस्कुल, के. एस. के डब्लू, एस. व्ही. के. टी व के. एन. केला, पंचवटी कॉलेज, के. के. वाघ, आर. पी विद्यालय, सातपूरचे जनता विद्यालय, भोसला मिलीटरी कॉलेज आणि भगूर येथे ही केंद्र सुरू करण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात सर्वाधिक शस्त्र परवाने निफाडमध्ये

$
0
0

ग्राफीक्स करता येईल

मटा विशेष

--

सर्वाधिक शस्त्र परवाने निफाडमध्ये

--

अधिकृत परवानाधारकांची माहिती एका क्लीकवर

-

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

-

नाशिक : बागायतदारांचा तालुका अशी ख्याती असलेल्या निफाडमध्ये जिल्हा प्रशासनाने सर्वाधिक शस्त्र परवाने वितरीत केले आहेत. स्वत:च्या आणि मालमत्तांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांना पिस्तूल व तत्सम शस्त्र जवळ बाळगणे अत्यावश्यक वाटू लागले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे सव्वा नऊशे शस्त्रपरवाने वितरीत करण्यात आले असून, निफाड पाठोपाठ मालेगावात परवानाधारकांची संख्या अधिक आहे. अशा शस्त्र परवान्यांची नोंद राष्ट्रीय शस्त्र परवाना प्रणालीवर अनिवार्य असून त्यामुळे अधिकृत परवानाधारक शस्त्रधारकांची माहिती येत्या काळात एका क्‍लिकवर मिळू शकणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि ग्रामीण भागातही बेकायदेशीररित्या गावठी कट्टा, पिस्तूल यांसारखी शस्त्र बाळगले जात असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जमीनदारांसह अनेकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावते असून, त्यामुळेच त्यांना स्व-संरक्षणासाठी शस्त्र जवळ बाळगणे अधिक हिताचे वाटू लागले आहे. स्वत:च्या तसेच मालमत्तांच्या रक्षणासाठी शहरात पोलिस आयुक्तांकडून तर ग्रामीण भागातील रहिवाशांना जिल्हा प्रशासनाकडून शस्त्र परवाने दिले जातात. जिल्ह्यात सद्यस्थितीत ९१७ शस्त्र परवानाधारक असून, सर्वाधिक २७१ शस्त्र परवाने एकट्या निफाड तालुक्यात आहेत. त्याखालोखाल मालेगावात १३२ तर येवल्यात ११५ जणांकडे परवाने आहेत. सर्वात कमी १० परवाने महापालिका क्षेत्र वगळता उर्वरीत नाशिक तालुक्यात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रीय शस्त्र परवाना प्रणालीवर ज्या परवानाधारकांची नोंद नसेल त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्याच्या सूचनाही सरकारकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे शस्त्र परवानाधारक, शस्त्र दुरुस्ती, खरेदी-विक्री परवानाधारकांची माहिती भविष्यात एका क्‍लिकवर उपलब्ध होणे शक्य होणार आहे. या प्रणालीद्वारे माहिती अद्ययावत केल्यानंतर प्रत्येक परवानाधारकाला विशिष्ट ओळख क्रमांक (युनिक आयडिंटिफिकेशन कोड) दिला जातो आहे. हा क्रमांक न घेतल्यास संबंधित शस्त्र परवानाधारकांचा शस्त्र परवाना रद्द होऊ शकतो असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

-

तालुका शस्त्रपरवाना धारकांची संख्या

निफाड २७१

मालेगाव १३२

येवला ११५

दिंडोरी ६०

इगतपुरी ५६

सिन्नर ४९

चांदवड ४३

कळवण ३९

सुरगाणा ३७

नांदगाव २८

बागलाण २७

देवळा २५

पेठ १४

त्र्यंबकेश्वर ११

नाशिक १०

एकूण २१७

..शस्त्र परवान्यासाठी या गोष्टींची आवश्यकता ..

ऑनलाईन अर्ज भरताना शस्त्र परवान्याची आवश्यकता काय हे या अर्जामध्ये संबंधितांना प्राधान्याने नमूद करणे अनिवार्य आहे. यासह अर्जामध्ये स्वत:चे तसेच वडिलांचे पूर्ण नाव, लिंग, जन्मतारीख, अर्जदाराचा व्यवसाय, निवासाचा पत्ता या प्राथिमक माहितीसह स्वघोषणापत्र सादर करणे अनिवार्य आहे. याखेरीज या अर्जासमवेत ओळखीचा पुरावा, पत्तयाचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, अर्जदार जमीन मालक असल्यास ७/१२ आणि ८-अ चा उतारा व तलाठी अहवाल, नोकरदार असल्यास फॉर्म क्र. १६, शस्त्र बाळगण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सकाने जारी केलेले स्वास्थ्य प्रमाणपत्र, अर्जदार वास्तव्यास असलेल्या परिसरात चोरी, दरोडा यासारख्या घटना घडल्या असल्यास त्याबाबतचा अहवाल आदी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैविध्यपूर्ण कलांची प्रत्यक्षानुभूती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फ्री हँड, स्टिल लाइफ अशी खुणावणारी चित्रकला, आदिवासी नृत्याचे हुबेहूब दर्शन घडविणारे वारली पेंटिंग, वाइल्ड लाइफ फोटोग्राफीची नवी शैली आदींचा समावेश 'कलासंगम'च्या छंदोमयी आर्ट गॅलरीमध्ये करण्यात आलेला आहे. नाशिककर रसिकांनी शनिवारी या आर्ट गॅलरीच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कलांची प्रत्यक्षानुभूती घेतली.

फोटोग्राफी, चित्रकला अन् वारली पेंटिंगने चैतन्यमय झालेल्या छंदोमयी आर्ट गॅलरीस रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आर्ट गॅलरीतील निरनिराळ्या विषयांवरील फोटोग्राफीचा रसिकांनी आस्वाद घेतला. लँडस्केप, निसर्गचित्र, वाइल्ड लाइफ फोटोग्राफी अशा विषयांवरील फोटोग्राफीचा रसिकांनी आस्वाद घेतला. त्याचप्रमाणे 'पडद्यामागचा तमाशा' या विषयातून पडद्यामागच्या गोष्टी, गावातल्या जत्रा, तेथील तमाशाचे फड यांचे हुबेहूब चित्रण फोटोग्राफीच्या माध्यमातून रसिकांनी अनुभवले. उत्तराखंड येथील पक्ष्यांचा जीवनप्रवासही फोटोग्राफीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मायक्रो फोटोग्राफीची नवीन ओळख रसिकांना अनुभवायला मिळाली. शहराच्या सभोवताली असणाऱ्या पक्ष्यांची नवी ओळख फोटोंच्या माध्यमातून झाली.

विविध प्रकारच्या चित्रकलेचे प्रदर्शन छंदोमयी आर्ट गॅलरीमध्ये रसिकांना पाहायला मिळाले. क्रिएटिव्ह पेंटिंग, स्टिल लाइफ, अॅकॅडमिक पेंटिंग अशी नावीन्यपूर्ण चित्रकला रसिकांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. स्टिल लाइफमध्ये विविध वस्तूंचा समावेश करून साकारण्यात आलेल्या चित्रकला प्रदर्शनासही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आदिवासींच्या राहणीमानाचे हुबेहूब चित्र वारली पेंटिंगद्वारे रसिकांना अनुभवायला मिळाले. वारली पेंटिंगमध्ये आदिवासींचे विविध नृत्य प्रकार साकारण्यात आले होते. आदिवासींच्या कला, क्रीडा, तसेच वारली पेंटिंगमधील अन्य प्रकार रासिकांना प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 'कलासंगम'मधील छंदोमयी आर्ट गॅलरीच्या माध्यमातून चित्रकला, फोटोग्राफी आणि वारली पेंटिंग अशा कलांची अनोखी मेजवानी रसिकांनी अनुभवली.

--

(कलासंगम बातमी २)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images