Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सीडबॉल मेकिंग कार्यशाळेस प्रतिसाद

$
0
0

(पेज फोटोशेजारी वापरणे.)

सीडबॉल बनविणे कार्यशाळेस प्रतिसाद

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आडगाव येथे सोमवारी झालेल्या सीडबॉल मेकिंग कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वृक्षारोपण करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सीडबॉल ही पद्धत वापरून पर्यावरण संवर्धनाचे काम हाती घेऊन विद्या सहयोग सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन सोसायटी संचालित महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त पर्यावरण संवर्धन जनआंदोलन समिती व श्री साई कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट आडगावतर्फेआडगाव येथे उमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांकडून सीडबॉल तयार करवून घेतले. त्यांचे रोपण कशा प्रकारे करायचे याची माहिती देण्यात आली. त्यात प्रामुख्याने गडकोट, किल्ले, प्रेक्षणीय स्थळे आदी ठिकाणी जाऊन प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली कारखान्यांकडून हवेत काय आणि किती प्रमाणात कोणते वायू सोडले जात आहेत. याचे नियंत्रण असूनही नसल्यासारखे आहे. त्यातूनच आग, स्फोट आणि त्यातून बाहेर पडणारे अतिविषारी वायूचे साम्राज्य वाढले आहे. जंगले नष्ट होऊन जमिनीची धूप होतेय. माती निघून गेली आणि सर्व डोंगर बोडके होत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून जंगले कशी वाढवता येतील आणि टिकवता येतील, याचा ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. पर्यावरणाचा ध्यास घेऊन सीडबॉलची ठिकठिकाणी पेरणी करण्याचे काम या माध्यमातून होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

०००

(स्वतंत्र सिंगल)

बेटी बचाव जागृती रॅलीसंदर्भात बैठक

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक डिस्ट्रिक्ट मेडिकल असोसिएशनतर्फे शहरातील अनेक सामाजिक संस्थांच्या सहभागातून पंचवटीतून बेटी बचाव जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसंदर्भात सोमवारी गीतांजली सभागृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्याम थविल, सरचिटणीस डॉ. चारुदत्त कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली.

लिंगभेद चाचणी व स्त्रीभ्रूणहत्या या बेकायदेशीर व मानवी नीतिमूल्यांविरुद्ध असणाऱ्या कृत्यांविरोधात जनजागृती निर्माण व्हावी, हा बेटी बचाव रॅलीचा उद्देश असल्याचे डॉ. थविल यांनी सांगितले. डॉ. चारुदत्त कुलकर्णी म्हणाले, की दि. २५ जून रोजी पंचवटीतून ही रॅली छत्रपती शिवाजी स्टेडियमपर्यंत काढण्यात येईल. रॅलीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. वृक्षारोपणाचा संदेश सर्वदूर पसरावा म्हणून औपचारिकतेला फाटा देऊन येणाऱ्या पाहुण्यांना भेट म्हणून रोपे वाटप करण्यात येणार आहेत. या बैठकीस सुनील परदेशी, ज्योती लांडगे, सुवर्णा कोठावदे, चिंतामण उगलमुगले, मंगेश घुगे आदी उपस्थित होते.

०००

(थोडक्यात)

नाशिकरोड बसस्थानकात दोन दिवसांनंतर गजबज

जेलरोड : एसटी कर्मचार्‍यांनी मागण्यांसाठी सुरू केलेला संप दोन दिवसांनी मागे घेण्यात आला. त्यामुळे नाशिकरोड बस स्थानकात पुन्हा गजबज वाढली आहे. सध्या सुटी संपत आल्याने एसटीला गर्दी होत आहे. या स्थानकातून पुणे, नगरसह लांबच्या पल्ल्याच्या एसटी बस धावतात, तसेच विहितगाव, शिंदे, पळसे, देवळाली कॅम्प, पंचवटी, सिडको, सातपूर आदी ठिकाणी शहर बस सुटतात. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गर्दी असते. स्थानकातून दररोज पाचशे बसफेऱ्या होतात व सुमारे चाळीस हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, संपामुळे स्थानक ओस पडले होते.

देवळालीत इफ्तार पार्टी (फोटो)

जेलरोड : मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त देवळालीगाव येथे मोहम्मदिया सोशल ग्रुप, गणेश मित्रमंडळ आणि

नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्यातर्फे इफ्तार पार्टी झाली. यावेळी नगरसेवक रमेश धोंगडे, राजू लवटे, श्याम खोले, मनोहर कोरडे, शिवा ताकाटे, उत्तम कोठुळे, अरुण महानुभव, योगेश शिंदे, विकास गाडेकर, ईस्माइल हाजी, रफिक शेख, एजाज शेख, अश्फाफ शेख, जावेद पटेल, अमजद शेख आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

महाराणा प्रताप जयंती

पंचवटी : महाराणा प्रताप यांच्या जन्मोत्सवानिमित्त शनिवारी (दि. १६) विविध कार्यक्रम होणार आहेत. शहरातील मोरवाडी, त्रिमूर्ती चौक, मुंबई नाका, द्वारका, वडाळा नाका, पिंपळ चौक, फुलेनगर आदी भागात महाराणा प्रताप यांचे प्रतिमापूजन, मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता बी. डी. भालेकर मैदान येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. समाजातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मातांचा सत्कार (फोटो)

जेलरोड : बिटको रुग्णालयात कन्यारत्न झालेल्या मातांचा नाशिकरोड येथील शिखर स्वामिनी बहुद्देशीय महिला संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा नगरसेविका संगीता गायकवाड, आरती आहिरे, कांचन चव्हाण, मनीषा गायकवाड आदींच्या हस्ते या मातांचा पेढे व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. बेटी बचाव अभियानातंर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बिटकोचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. २५ जूनला नाशिक डिस्ट्रिक्ट मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने बेटी बचाओ जनजागृती रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

साने गुरुजींना अभिवादन (फोटो)

जेलरोड : साने गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे नाशिकरोड येथील साने गुरुजी प्रसारक मंडळाच्या के. जे. मेहता हायस्कूलमध्ये आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव प्रवीण जोशी, मनविसेचे प्रदेश सदस्य उमेश भोई, जिल्हा सरचिटणीस शशिकांत चौधरी, नाशिकरोड अध्यक्ष नितीन धानापुणे, उपाध्यक्ष सागर दाणी, भाऊसाहेब ठाकरे, स्वप्निल विभांडिक, मयूर कटारे, गुड्डू शेख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलास मारहाण प्रकरणी ठेकेदाराला नोटीस

$
0
0

मुलास मारहाण;

ठेकेदाराला नोटीस

सिडको : उत्तमनगर परिसरातील लहान मुलाला मारहाण करणाऱ्या घंटागाडी चालकाची बदली करण्याबरोबरच संबंधित ठेकेदाराला महापालिकेतर्फे नोटीस दिली असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले. सिडको परिसरातील घंटागाडीचा ठेका हा वादग्रस्तच ठरला आहे. घंटागाडी अनियमितपणे येण्याबरोबरच घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांबद्दल अनेक तक्रारी होत होत्या. महापालिका ठेकेदारावर नोटीस देवून कारवाई करीत असली तरी प्रत्यक्षात याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. रविवारी उत्तमनगर परिसरातील घंटागाडी चालकाने मद्यधुंद अवस्थेत अविनाश पाटील या लहान मुलास मारहाण केली हेाती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौर्य पुरस्कारासाठी पाठिवणारअजयचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील गाजरवाडी शिवारातील नांदूरमध्यमेश्वरच्या गोदावरी कालव्यात तोल जाऊन पडलेल्या अंगणवाडी सेविका उषाबाई पगारे यांना वाचविणारा १३ वर्षाचा अजय वळंबे याचा निफाड पंचायत समिती सभापती राजेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अजयचा प्रस्ताव शौर्य पुरस्कारासाठी पाठविणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

शुक्रवारी गाजरवाडी येथे गोदावरी कालव्यात उषाबाई पडल्याचे पाहून अजयने तत्काळ पाटात उडी टाकून अर्धा किमी पोहत जावून उषाबाईंना वाचविले. त्याच्या या कामगिरीची दखल घेत निफाड पंचायत समितीच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी संदीप कराड , बालविकास आधिकारी आभिमान माने, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, नंदु पवार, शंकर संगमनेरे, शहाजी राजोळे, बाळासाहेब चारोस्कर, माधव बनकर, उपसरपंच संगिता पगारे उपस्थित होते. आपला जिव धोक्यात घालून अंगणवाडी सेविकेचे प्राण वाचविणाऱ्या अजयचे नाव केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारासाठी पाठविण्यात येणार. त्यासाठी निफाड पंचायत समितीत ठराव करून सरकारकडे पाठविणार असल्याचे सभापती राजेश पाटील यांनी सांगितले.

नांदुरमध्यमेश्वरच्या गोदावरी डाव्या कालव्यावरील धोकादायक पुलामुळेच माझी आई पाटात पडली. सुदैवाने तेथे अजय असल्यामुळे ती वाचली. तरी प्रशासनाने हा पूल तातडीने पूर्ण करावा. अजयच्या कार्याची दखल घेत त्याला शौर्य पुरस्कार द्यावा.-रवींद्र पगारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरगाणा आंदोलन

$
0
0

सुरगाणा तहसीलला किसान सभेचा घेराव

म. टा. वृत्तसेवा, सुरगाणा

किसान सभेच्या झेंड्याखाली हजारो आदिवासी शेतकऱ्यांनी सुरगाणा तहसील कार्यालयाला मंगळवारी घेराव घातला. किसान सभेच्या ऐतिहासिक लाँग मार्चच्या यशाने प्रभावित होवून भाजप व शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी किसान सभेत लाल बावट्याच्या विजयाच्या घोषणांच्या गजरात प्रवेश केला. लाँग मार्चनंतर राज्य सरकारला मान्य कराव्या लागलेल्या वनाधिकार, नदीजोड, रेशन, पेन्शन, कर्जमाफी, रास्त भाव या मागण्यांची अंमलबजावणी अत्यंत असमाधानकारकरीत्या सुरू असल्याबाबत हजारो शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

सुरगाण्याच्या नगराध्यक्षपदी प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सोनाली बागुल या निवडून आल्याबद्दल त्यांचा हार्दिक सत्कार करण्यात आला.

आजच्या आंदोलनाचे नेतृत्व आमदार जे. पी. गावीत, डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, सुभाष चौधरी, इंद्रजित गावीत, हेमंत पाटील, सुवर्णा गांगोडे, भिका राठोड, उत्तम कडू, रामजी गावीत, धर्मा शिंदे इत्यादी करीत आहेत. आजच्या आंदोलनात किसान सभेचे मुखपत्र 'किसान संघर्ष'चा किसान लाँग मार्च विशेषांक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र 'जीवनमार्ग'चा कार्ल मार्क्स जन्मद्विशताब्दी व हैदराबाद पक्ष काँग्रेस विशेषांक यांच्या हजारो प्रती हातोहात विकल्या गेल्या. तहसीलदारांनी मागण्यांच्या अंमलबजावणीविषयी ठोस कार्यवाही केल्याशिवाय किसान सभेचा हा घेराव उठवला जाणार नाही असा निर्धार येथे हजारो शेतकऱ्यांनी केला आहे.

000

रिक्त पदांबाबत मागविला अहवाल

विभागीय आयुक्त माने यांची मालेगावी आढावा बैठक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील सामान्य रुग्णालय व मनपा रुग्णालयातील रिक्तपदांचा प्रश्न गंभीर आहे. त्यापैकी सामान्य रुग्णालयातील कंत्राटी पदे भरण्यासाठी आचारसंहितेनंतर जाहिरात देण्यात येईल. मनपा रुग्णालयातील अत्यावश्यक पदे भरण्यबाबतचा अहवाल शासनाने मागवला असल्याची माहिती विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिली.

येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश भामरे यांनी सामान्य रुग्णालय व मनपा रुग्णालयातील आरोग्य सेवा सुधारावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त माने यांनी मंगळवारी येथे भेट दिली. शासकीय विश्रामगृहावर आयोजित बैठकीत अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, आयुक्त संगीता धायगुडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे, याचिकाकर्ते राकेश भामरे, नितीन पोफळे, सहायक आयुक्त विलास गोसावी, उपायुक्त अंबादास गरकल, डॉ. प्रदीप पठारे आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर विभागीय आयुक्त माने यांनी सामान्य रुग्णालयास भेट देवून आरोग्य सेवांची पाहणी केली. पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, गेल्या काही महिन्यात सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनगृहानजीक विश्राम गृह, मेडिकल वेस्ट, इ मेडिसीन आदी प्रश्न मार्गी लागले आहेत. असे असले तरी आरोग्य सेवेत अजून सुधारणा होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आरोग्य अधिकारी डांगे यांनी मे महिन्यातील रुग्णतपासणी, शस्त्रक्रिया यांची आकडेवारी देत अत्यल्प स्टाफ असून देखील आरोग्य सेवा दिल्या जात असल्याचे नमूद केले.

अधिकारी, कर्मचारी धास्तावले

येथील अधिकारी कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करीत आहेत. त्यात शहरातील काही समाजकंटकांकडून त्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत महापौर, आयुक्त, आरोग्य अधिकारी यांनी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांची बैठक घेवून कामावर असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना सुरक्षित वातावरण कसे मिळेल याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच रुग्णालयात २४ तास पोलिस संरक्षण मिळावे यासाठी अपर पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा करणार असल्याचे माने यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत अळ्यामिश्रित पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोत पिण्याच्या पाण्याची समस्या कायमच भेडसावत असते. यंदाही अशीच स्थिती असून, आधीच विस्कळीत पाणीपुरवठा होणाऱ्या या भागात आता अळ्या व जीवजंतूमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सिडकोतील प्रभाग २९ मधील साईबाबानगर व महाकाली चौक परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून, याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी स्थानिक नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडे तक्रार केली. साईबाबानगर परिसरात मंगळवारी झालेल्या पाणीपुरवठ्यात चक्‍क अळ्या आढळून आल्याने नागरिकांनी स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

सिडकोत परिसरात दर वर्षी पावसाळा सुरू झाला, की दूषित, गढूळ पाणीपुरवठा होत असतो. यंदा मात्र अद्याप पाऊस पडलेला नसतानाच सिडकोतील प्रभाग २९ मधील साईबाबानगर परिसरात दोन दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्‍त पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडे तक्रार केली. नगरसेवक शहाणे यांनी परिसरात पाहणी केली असता, पाण्यात अळ्या व अन्य जीवजंतू असल्याचे आढळून आले. या परिसरात ड्रेनेज लाइनचाही प्रश्न प्रलंबित असून, ड्रेनेज लाइन व जलवाहिनी एकत्र झाल्याने हा प्रकार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहाणे यांनी यावेळी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. मात्र, यासंदर्भातील कार्यवाहीबाबत ठोस निर्णय न झाल्याने संतप्त नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यावेळी संगीता पाटील, सुनंदा हाडोळे, अनिता शेळके, चंद्रकला गायकवाड, सुनंदा जाधव, शिवांगी सोनार आदींसह परिसरात नागरिक उपस्थित होते.

बाटलीबंद पाणी घेण्याची वेळ

परिसरातील दुर्गंधीयुक्त व दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार महापालिकेकडे तक्रारी करूनही संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. या परिसरातील रहिवाशांना अनेक दिवसांपासून अक्षरशः पाण्याच्या बाटल्या विकत घेत घ्याव्या लागत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या. या ठिकाणी अनेक वर्षांपासून ड्रेनेज लाइन व जलवाहिनी एकत्र झाल्यामुळे दुर्गंधी येत असल्याचा आरोप परिसरातून केला जात आहे. हा दूषित आणि दुर्गंधीयुक्‍त पाणीपुरवठा बंद न झाल्यास थेट महापालिकेवरच मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला.

--

सिडकोत ड्रेनेज लाइनचा प्रश्न प्रलंबित असून, अनेक ठिकाणी या ड्रेनेज लाइन व जलवाहिन्या एकत्र झाल्या आहेत. अधिकाऱ्यांना सांगूनही ते लक्ष देत नसल्याने आता आयुक्‍तांनीच याकडे लक्ष दिले पाहिजे. प्रभागातील दूषित पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर नागरिकांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.

-मुकेश शहाणे, नगरसेवक

--

(लीड, निष्पक्षचा लोगो वापरणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्लॅक स्पॉट’ चकाचक!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरातील विविध ठिकाणचे 'ब्लॅक स्पॉट' मंगळवारी महापालिकेकडून चकाचक करण्यात आले. नाशिकरोड प्रभागातील विविध ठिकाणच्या 'ब्लॅक स्पॉट'वर कचऱ्याचे ढीग साचल्याचे वृत्त 'मटा'त मंगळवारी प्रसिद्ध होताच महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने साचलेल्या कचऱ्याचे ढीग तात्काळ हटविले. नागरिकांनीही या तत्परतेचे स्वागत केले आहे.

नाशिकरोड परिसरातील चेहेडी पंपिंग स्टेशन, सिन्नर फाटा, देवळालीगावातील वडारवाडी, विशाल मॉल या भागात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कचरा संकलनाला विलंब होत असल्याच्या कारणाने कचऱ्याचे ढीग साचले होते. या साचलेल्या कचऱ्यामुळे परिसराला बकालपणाचे स्वरूप आले होते. काही ठिकाणचा कचरा इतस्ततः विखुरल्याचेही चित्र दिसून येत होते. काही भागात कचरा संकलनासाठी घंटागाड्याच येत नसल्याने दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस 'ब्लॅक स्पॉट' ओसंडून वाहू लागले होते. या समस्येविषयीचे वृत्त 'मटा'मध्ये मंगळवारी प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेत तात्काळ या ठिकाणचे 'ब्लॅक स्पॉट' स्वच्छ करण्याची कार्यवाही केली. त्यामुळे परिसरातील अनेक ठिकाणचे 'ब्लॅक स्पॉट' मंगळवारी सकाळीच चकाचक झाल्याचे दिसून आल्याने स्थानिक नागरिकांची दुर्गंधीतुन सुटका झाली.

डस्ट बिनची दुर्दशा जैसे थे

परिसरातील बहुतांश 'ब्लॅक स्पॉट'जवळ कचरा संकलनासाठी महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने डस्ट बिनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, या सर्व डस्ट बिनची सध्या दुर्दशा झाली आहे. काही डस्ट बिन फुटलेले असल्याने त्यात कचरा संकलित होत नाही. काही डस्ट बिन खाली पडलेले आहेत, तर काही डस्ट बिन गायब झालेले आहेत. या डस्ट बिनच्या दुर्दशेचा प्रश्न महापालिकेने मार्गी लावावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

--

(लोगो : मटा इम्पॅक्ट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेफाम वळूच्या हल्ल्यात एक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सोमवारी दिवसभर शहरातील वावी वेस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ परिसरात एका पिसाळलेल्या वळूने धुमाकूळ घातला. एका परप्रांतीयाला पाठीमागून ठोसा दिल्याने त्याचा मृत्यू झाला. तर महिलेसह चार जण जखमी झाले.

सोमवारी दुपारच्या सुमारास या वळूने धुडगूस घातल्याचे नागरिकांनी सांगितले. मार्केटच्या परिसरात सायंकाळी हा वळू अधिक बेफाम झाला. त्याने दोन जणांना गंभीर दुखापत केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा गावाकडे वळवला. तेथे महिलेसह दोन जणांना किरकोळ जखमी केले. गंभीर जखमींपैकी परप्रांतीय नागरिकाचा (वय अंदाजे ६५, नाव समजू शकले नाही). वळुला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक दाखल झाले. त्यांनी वळूला भुलीचे इंजेक्शन देवून रात्री उशिरा पकडले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून, मोकाट जनावरांचा प्रश्न आता गंभीर रुप बनला आहे. पालिकेने यावर ठोस कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य कर्मचाऱ्यांचा ‘आक्रोश’

$
0
0

विविध मागण्यांसाठी ऑगस्टमध्ये संपावर जाण्याचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी १ जानेवारी २०१६ पासून लागू कराव्यात, निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करावी, पाच दिवसांचा आठवडा करावा यासह विविध मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. १२) देशव्यापी आक्रोश दिन पाळला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकेरी मार्गावरून चालणाऱ्या दुहेरी वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने न करता त्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे निवेदन पाठविण्यात येणार आहे.

सरकारी नोकरीमधील कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे कर्मचारी नाराज व असंतुष्ट आहेत. त्यांच्या या मानसिकतेचा परिणाम त्यांच्या दैनंदीन कामकाजावरही होतो आहे. याच कारणास्तव राज्य कर्मचारी मंगळवारी देशव्यापी आक्रोश दिन आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास ऑगस्ट महिन्यात संप करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष दिलीप थेटे, जिल्हा निमंत्रक उत्तम गांगुर्डे, कार्याध्यक्ष महेश आव्हाड, सरचिटणीस सुनंदा जरांडे, माधव भणगे यांसह कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले.

अशा आहेत मागण्या

- जुनी पेन्शन योजना लागू करावी.

- सातवा वेतन आयोग लागू करावा.

- कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे.

- अंशदायी सेवानिवृत्ती देशभर रद्द करावी.

- अनकुंपा भरती विनाअट त्वरित सुरू करावी.

- कंत्राटीकरण रद्द करून सर्व विभागातील पदे भरावीत.

- केंद्राप्रमाणे महागाई भत्ता थकबाकीसह रोखीने त्वरित द्यावा.

- उत्कृष्ट कामासाठीची आगाऊ वेतनवाढ पूर्ववत सुरू करावी.

- महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा मंजूर करावी.

- पद्दोन्नती व सरळसेवा नियुक्ती यामधील प्रारंभिक वेतनातील तफावत दूर करावी.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांद्या उत्पादकांना आता रोखीने परतावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात धान्याप्रमाणेच कांदा उत्पादकांना रोख रक्कम मिळणार आहे. येत्या येत्या सोमवारपासून वजनमापानंतर रोख चुकवती करण्याचा तसेच आठवड्याच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या शनिवारी दुपारपर्यंत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय व्यापारी वर्गाचे मंगळवारी झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली.

नोटबंदीनंतर सध्या येथील कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धनादेश, आरटीजीएस / एनइएफटीद्वारे रक्कम अदा करण्यात येत आहे. परंतु धनादेशाद्वारे मिळालेल्या शेतमाल विक्रीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होणेस उशिर होत असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या नवीन कांदा बाजार आवारावर बाजार समितीचे पदाधिकारी व कांदा विभागातील व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत व्यापारी वर्गाने सोमवारी १८ जूनपासून धान्य शेतमालाप्रमाणेच कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना वजनमापानंतर २४ तासांच्या आत मालविक्रीची संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात अदा करण्याचा निर्णय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिरुद्ध अथनी यांनी उमटविली जागतिक मोहर

$
0
0

'ओझोन एन्ड्युरन्स चॅलेंज' स्पर्धेत दुसरा क्रमांक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

२४ तास, एकही क्षण न थांबता सतत धावण्याचा अशक्य वाटणारा पराक्रम करीत नाशिकच्या अनिरुद्ध अथनी यांनी अमेरिकेतील 'ओझोन एन्ड्युरन्स चॅलेंज' स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकवला आहे.

नाशिकमधील अनेक धावपटूंना मार्गदर्शन करणारे आणि यापूर्वी अनेक मॅरेथॉन गाजवून सुद्धा प्रसिद्धीपासून फार दूर असलेले अथनी यांनी ही कामगिरी केली असून ही स्पर्धा जिंकणारे ते पहिले भारतीय आहेत. सतत २४ तास धावतांना त्यांनी १५१.१५ किलोमीटर अंतर कापत स्वतःचे पूर्वीचे रेकॉर्ड पार केले आहे. पावसाच्या माऱ्याने चिखलमय झालेला रस्त्यावर धावत राहणे हे या स्पर्धेतील एक मोठे आव्हान होते.

नॉर्थ कॅरोलिना येथे दोन जून रोजी होणाऱ्या ब्लॅक माउंटेन मॉन्स्टर या अशाच २४ तास धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनिरुद्ध अमेरिकेला रवाना झाले. पण स्पर्धेच्या दोनच दिवस आधी अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला वादळी पावसाने झोडपून काढले, नद्यांची पात्रे फुगली आणि या स्पर्धेच्या मार्गाची बिकट परिस्थिती झाल्याने आयोजकांना स्पर्धा पुढे ढकलण्याखेरीज गत्यंतर उरले नाही. तयारीनिशी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतातून गेलेले अनिरुद्ध निराश झाले. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी फेसबुकवर या प्रकारच्या स्पर्धांचा शोध घेतला, तेव्हा त्यांना टेनेसी राज्यात रॉकवूड येथे होणाऱ्या 'ओझोन' स्पर्धेची माहिती मिळाली. नॉर्थ कॅरोलिनापासून ७०० किलोमीटर दूर असलेल्या या गावालाही पावसाने झोडपून काढले होते; पण तेथे स्पर्धा घेणे शक्य होते. ऐनवेळी प्रवेश देण्यास आयोजक राजी नव्हते आणि प्रवेश दिला तरी तुम्हाला पदक देणे आम्हाला शक्य होणार नाही, असे त्यांनी अनिरुद्ध यांना स्पष्ट सांगितले. पण, पदकाचा मोह अनिरुद्ध यांना नव्हताच. तीन महिने केलेल्या कसून सरावामुळे स्पर्धेत भाग घेण्याची मात्र मनःपूर्वक इच्छा होती. अथनी यांना स्पर्धेच्या आदल्या दिवशी प्रवेश मिळाला. एका नातलगाच्या मदतीने ७०० किलोमीटरचा पल्ला पार करून स्पर्धेच्या आदल्या दिवशी ते रॉकवूडला पोचले. स्पर्धेत उतरत त्यांनी यश मिळविले.

माझ्यासाठी धावणे ही गतिमान अशी ध्यानावस्था आहे. धावण्याच्या सरावाबरोबरच फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रीत करण्याची साधना मी अखंड करतो. त्यामुळे माझ्यासाठी भूतकाळ आणि भविष्यकाळ नसतोच, असतो फक्त समोर दिसणारा क्षण आणि त्या क्षणी मी धावत असतो. भूतकाळात होऊन गेलेल्या स्पर्धेपेक्षा अधिक मोठे आव्हान घेतांना प्रत्येक वेळी मीच मला नव्याने अधिक जाणतो आणि हे समाधान कोणत्याही पदकापेक्षा खूप मोलाचे आहे.

- अनिरुद्ध अथनी, धावपटू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधील शिष्य परिवारवर शोककळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येच्या घटनेने नाशिकमधील त्यांच्या शिष्य परिवारावर दुखःचा आघात झाला आहे. भय्यूजी महाराज व नाशिककरांचे जवळचे संबंध होते. नाशिकमधील आठवणींनी त्यांच्या निकटवर्तीयांना दाटून आले.

भय्यूजी महाराजांच्या प्रेरणेने करण गायकर यांनी नाशिकमध्ये छावा क्रांतिवीर सेनेची स्थापना केली होती. या संघटनेचे नावही त्यांनीच सुचवले होते. या संघटनेची ध्येयधोरणे स्वतःच्या हाताने लिहून दिली होती. छावा क्रांतिवीर सेनेच्या २०१४ मध्ये झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी भय्यूजी महाराज नाशिकरोडला आले होते. त्यांनी कुंभमेळ्यात नाशिकला आश्रम न उभारता गोदावरीची स्वच्छता मोहीम राबविली होती. २०१५ मध्ये गुणवंत विद्यार्थी समारंभ, विश्वास बँक नाशिकरोड शाखा उद्घाटन, २०१६ साली शरीर सौष्ठव स्पर्धा विजेत्यांचे बक्षीस वितरणासाठी ते शहरात आले होते. तसेच गेल्या महिन्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी ते सिन्नरला आले होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी त्यांचे दर्शन घेतले होते. सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला ते अनेकदा येऊन गेले होते.

औरंगाबाद अधिवेशनाचे उद्घाटन राहून गेले

औरंगाबाद येथे बुधवारी (दि. १३) छावा क्रांतिवीर सेनेचे अधिवेशनाचे उद्घाटन भय्यूजी महाराजांच्या हस्ते होणार होते. त्यासाठी ते मंगळवारीच औरंगाबादला मुक्कामी येणार होते. परंतु, तत्पूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्याने या अधिवेशानाचे उद्घाटन राहून गेल्याची खंत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 'मटा'कडे व्यक्त केली.

भय्यूजी महाराज हे मानवजातीच्या कल्याणासाठी झटणारे संत होते. सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. अध्यात्मासोबतच जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भय्यूजींनी आपल्या कार्याची दिशा ठरवली. तरुणांसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. विश्वास बँकेच्या नाशिक-पुणे रोड शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते आवर्जून उपस्थित होते. सहकारातून देश कसा प्रगतीकडे जाईल आणि देशाचे स्वप्न कसे प्रत्यक्षात येईल, यावर त्यांनी केलेले भाषण आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

- विश्वास ठाकूर

संस्थापक अध्यक्ष, विश्वास को-ऑप. बँक

भय्यूजी महाराज यांनी आयुष्यभर देशभरातील दुखितांचे अश्रू पुसण्याचे काम केले. मात्र शेवटी तेच सर्वांना दु:खात सोडून गेले. देशवासीयांसह खास करून मराठी माणसांचे भय्यूजी महाराजांच्या अकाली जाण्याने मोठे नुकसान झाले आहे.

- ॲड. शिवाजी सहाणे

भय्यूजी महाराज यांच्या अकस्मात जाण्याने कधीही भरुन न येणारी हानी झाली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम केले. ते आत्महत्येचा असा टोकाचा निर्णय घेतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते.

- करण गायकर,

संस्थापक, छावा क्रांतिवीर सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६८० किलो गांजा तपोवनात जप्त

$
0
0

शहर पोलिसांची मोठी कारवाई; पाळेमुळे शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी तब्बल ६८० किलो गांजा पकडून अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या तस्करांचे कंबरडे मोडले. या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आले असून, यामुळे गांजा तस्करीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

यतीन अशोक शिंदे (३५, रा. प्रभातनगर, श्रीगणेश अपार्ट. म्हसरूळ) आणि सुनील नामदेवराव शिंदे (४७, रा. मिरचीचे पालखेड, ता. जि. नाशिक) अशी गांजा तस्करी प्रकरणात अटक झालेल्या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत. शहरात पोलिसांनी गांजा जप्त करण्याची घटना नवीन नाही. मात्र, पहिल्यांदाच तब्बल ६८० किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला आहे. काही दिवसांपूर्वी कोलकाता नार्कोटिक्स कंट्रोल युनिटने नाशिकच्या दिशेने येणारा मोठ्या स्वरूपातील गांजाचा साठा आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमावर्ती भागात जप्त केला होता. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी केलेली कारवाई महत्त्वपूर्ण ठरते. शहरात अंमली पदार्थ येणार असल्याची माहिती क्राइम ब्रँचच्या युनिट एकचे सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांना मिळाली होती. एमएच १२, ईक्यु १४२९ असा वाहन क्रमांकही पोलिसांना मिळाला होता. त्यानुसार कुलकर्णी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाहनाचा शोध सुरू केला. वरील क्रमाकांचा आयशर ट्रक पोलिसांना तपोवन येथे दिसला. वाहनातील संशयित आरोपींच्या हालचालीही संशयास्पद असल्याने पोलिसांनी पाठलाग करून ट्रक थांबविला. पोलिसांनी ट्रकची झडती घेतला असता मागील बाजुस फ्रुटस क्रेट्स होते. नाशिकमध्ये दररोज भाजीपाला आणि फळे घेऊन हजारो वाहने दाखल होतात. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न संशयित घेत होते. क्रेट्स बाजूला केले असता ट्रकमध्ये गोण्यांमध्ये ३६ लाख रुपयांचा ६८० किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी लागलीच सर्व माल जप्त करीत संशयितांना अटक केली.

रॅकेट असल्याची शक्यता

संशयितांच्या अटकेमुळे अंमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, माधुरी कांगणे, सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते हजर होते. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दीपक गिरमे, पीएसआय बलराम पालकर, एएसआय जाकीर शेख, पोपट कारवाळ, हवालदार विजय गवांदे, प्रवीण कोकाटे, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, संजय मुळक, वसंत पांडव, यवाजी महाले, संदीप भांड, पोलिस नाईक आसिफ तांबोळी, दिलिप मोंढे, संतोष कोरडे, पोलिस शिपाई विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, गणेश वडजे, विशाल काठे, शांताराम महाले, राहुल पालखेडे, रावजी मगर, प्रविण चव्हाण, नीलेश भोईर, प्रतिभा पोखरकर, दीपक जठार आदींच्या पथकाने केली.

संशयित आरोपींची पोलिस कस्टडी घेऊन या गुन्ह्याचा सविस्तर तपास केला जाणार आहे. अंमली पदार्थ कोठून आला, कोठे चालला होता. या गुन्ह्याचे सूत्रधार कोण आहेत, हे शोधण्याचे काम हाती घेण्यात येईल. एमडी ड्रग्ज तस्करीचा शेवटापर्यंत तपास केला. यातही तसेच काम होईल.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकासाठी मराठी शब्दकोश

$
0
0

\Bमटा विशेष

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : jitendratarte@MT

\Bनाशिक : विविध प्रादेशिक मातृभाषांमधून मूळ शिक्षण घेणारे विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात, तेव्हा त्यापैकी अनेकांना वैद्यकशास्त्रातील मूलभूत संकल्पना केवळ भाषेच्या अडसरामुळे समजू शकत नाहीत. परिणामी, विषयाचा पायाच कच्चा राहून वैद्यकीय शाखेचा पहिल्या वर्षाचा निकाल खालावण्याची शक्यता असते. ही भाषिक संवादाची दरी मिटविण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. यासाठी वैद्यकीय संकल्पनांचा समावेश असणारा इंग्रजी ते मराठी असा वैद्यकीय शब्दकोश विद्यापीठाच्या वतीने साकारतो आहे.

प्रादेशिक भाषांमध्ये वैद्यकीय शाखेसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वरिष्ठ महाविद्यालयात असा प्रयोग प्रथमत: मराठीतच होत आहे. या अद्ययावत शब्दकोशाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या सप्टेंबरमध्ये याचा लोकार्पण सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शब्दकोशाचे लोकार्पण होण्यासाठी विद्यापीठाचा प्रयत्न सुरू आहेत. वैद्यकीय शाखेंतर्गत अॅलोपॅथी, डेंटल, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आदी विद्याशाखांचा समावेश आहे. या प्रत्येक विद्याशाखेचा मूलभूत विषय वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असला तरीही प्रत्येक शाखेतील संकल्पनांमध्ये वैविध्य आहे. इंग्रजी किंवा लॅटिन भाषेतील मांडणी असणाऱ्या मूलभूत व क्लिष्ट अशा संकल्पनांचा बोध अनेकदा काही विद्यार्थ्यांना होत नाही. या स्थितीत अभ्यासक्रम पुढे सरकतो व त्यापुढील अभ्यासक्रम समजावून घेताना विद्यार्थ्याच्या अध्ययनावर याचा प्रतिकूल परिणाम होतो. परिणामी, बारावीत चांगले गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही वैद्यकीय शाखेत पहिल्याच वर्षी अनेक विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणे, इयर ड्रॉप होणे, शैक्षणिक नुकसान होणे अशा घटनांमधून तणाव व नैराश्याचा सामना करावा लागतो. बाजारपेठेत मुलभूत संकल्पनांचे समानार्थी शब्द उपलब्ध करून देणारे काही शब्दकोश असले तरीही ते पूरक नसल्याचा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. शिवाय त्यावर विद्यापीठासारख्या अधिकृत संस्थेचे शिक्कामोर्तबही नाही. त्यामुळे विद्यापीठाकडून वैद्यकीय विज्ञान शाखेतील इंग्रजी ते मराठी भाषेत साकारणाऱ्या शब्दकोशाला महत्त्व आहे.

आरोग्य विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमातील मुलभूत आणि क्लिष्ट संकल्पना समजावून सांगण्यासाठी मराठी शब्दकोशाची योजना विद्यापीठातर्फे करण्यात आली आहे. मूळ इंग्रजी भाषेतील वैद्यकीय संकल्पना पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना कठीण वाटतात. त्याचे रुपांतर मराठीत केल्याने राज्यातील वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांना सुलभ होईल. हे काम अंतिम टप्प्यात असून सप्टेंबरमध्ये ते पूर्णत्वास जाईल.

- डॉ. दिलीप म्हैसेकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरेंद्र यांची तक्रार; ‘साई’चे पुनरावलोकन

$
0
0

हरेंद्र यांची तक्रार;

'साई'चे पुनरावलोकन

वृत्तसंस्था, बेंगळुरू

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) बेंगळुरू केंद्रात दुय्यम दर्जाचे अन्न मिळत असल्याची तक्रार भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांनी केल्यानंतर साईने आपल्या सगळ्या केंद्रांचे पुनरावलोकन करण्याचे ठरवले आहे. यासाठी प्रत्येक केंद्रांना थोड्याफार कालावधीनंतर अनपेक्षित भेटी द्यायचेदेखील ठरवले आहे. हरेंद्र यांना बेंगळुरू साई केंद्रातील अन्न दुय्यम दर्जाचे आढळलेच; पण येथे अस्वच्छता असल्याचेदेखील हरेंद्र यांनी लक्षात आणून दिले.

याबाबत साईच्या संचालक नीलम कपूर म्हणाल्या, 'साई केंद्रांमधील अन्न पुरवठा, तेथील स्वच्छता याबाबत आम्ही खूपच सजग असतो. त्याबाबत आमचा कटाक्षदेखील असतो. बेंगळुरू केंद्रातील दुरावस्थेसंदर्भात मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनीही लक्ष वेधले होतेच. या सगळ्या समस्या लक्षात घेत आम्ही नवा आचारी नेमला आहे. तसेच फळे, भाज्या अन् इतर अन्नपदार्थांचा दर्जाही कटाक्षाने पाहिला जाणार आहे. स्वच्छतेची खबरदारी अधिक काटेकोरपणे होईल.' यापुढे साई केंद्रांमधून अशा तक्रारी आल्या तर प्रादेशीक संचालकांना जबाबदार धरण्यात येईल, असे कपूर यांनी सांगितले. तसेच कामकाजाचे नियोजन होते आहे की नाही, पदार्थांचा दर्जा, खाण्याची सोय याची माहिती घेण्यासाठी बडे अधिकारी प्रादेशिक केंद्रांना अनपेक्षित भेटीही देणार आहेत.

शनिवारी हरेंद्र यांनी हॉकी इंडियाला लेख तक्रार करत, संघातील बऱ्याच खेळाडूंना अन्नाबाबत कमतरता जाणवत असल्याचे सांगितले. तसेच खेळाडूंची रक्तचाचणी झाली असता, त्या नमुन्यातून हे अधिक स्पष्ट होत असल्याचेही हरेंद्र यांनी तक्रारी नमूद केले. या सगळ्याचा परिणाम आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळाडूंच्या कामगिरीवर पडू शकतो, असे हरेंद्र म्हणाले.

....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध मद्यसाठा दोन ठिकाणी जप्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेगवेगळ्या दोन ठिकाणी सापळा रचून मद्यवाहतूक करणारी चार वाहने पकडली. त्यात एका चारचाकी वाहनासह तीन दुचाकींचा समावेश आहे. यात त्र्यंबक तालुक्यातील दोघांसह कोपरगाव येथील एकास अटक करण्यात आली असून, वाहनांसह तीन लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.

राज्यात विक्रीस बंदी असलेली व दादरा नगर हवेली निर्मित मद्यसाठा जिल्ह्यात येत असल्याच्या माहितीवरून भरारी पथकाच्या युनिट एक आणि येवला निरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली. त्र्यंबक तालुक्यातील आझेर शिवारातून दुचाकीवर मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती अधीक्षक चरणसिंग राजपूत व उपअधीक्षक गणेश बारगडे यांना मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक एकने चारीचा माळ (मुलवड) परिसरात सापळा लावला. लक्ष्मण रामू नानकडे (२२) आणि लक्ष्मण डिगू वड (२७ रा. मुलवड ता. त्र्यंबक) व त्यांचा एक साथीदार वेगवेगळ्या तीन मोटारसायकलींवर मद्याची वाहतूक या सापळ्यात सापडले.

संशयितांच्या ताब्यातून दादरा नगर हवेली निर्मित देशीदारू आणि बिअर असा सुमारे एक लाख ९८ हजार ७३६ रूपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान पथकाची चाहुल लागताच संशयिताचा एक साथिदार दुचाकी सोडून पसार झाला. ही कारवाई निरीक्षक एम.एम.राख दुय्यम निरीक्षक प्रविण मंडलिक, अरूण सुत्रावे जवान विलास कुवर, सुनिल पाटील, विष्णु सानप, पुनम भालेराव चालक विरेंद्र वाघ आदीच्या पथकाने केली.

दुसरी कारवाई येवला तालुक्यातील धामोरी सत्यगाव रोडवर करण्यात आली. बेकायदा मद्याची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून येवला विभागाच्या पथकाने धामोरी शिवारात सापळा लावला असता सतीश रंगनाथ जऱ्हाड (४३ रा. कोपरगाव, जि. नगर) हा व्हॅनचालक (एमएच १४ एएम ९३२०) मद्याची वाहतूक करतांना मिळून आला. वाहन तपासणीत देशीदारूचा मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. या कारवाईत वाहनासह मद्यसाठा असा सुमारे १ लाख ४ हजार ९६० रुपययांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई येवला विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक पांडुरंग कुडवे, वाय. पी. रतवेकर, जी. एन. गरुड, के. आर. चौधरी वाहनचालक डी. आर. नेमणार आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खर्चबंदीविरोधात सर्वपक्षीय मोट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यसरकारच्या परिपत्रकाचा आधार घेत महापालिकेने निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याच्या स्वागताला नकार दिल्याचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले. पालिकेत सत्ताधारी भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी व मनसेने या कृतीला विरोध केला आहे. सण उत्सवांच्या खर्चावर बंदी घालून नाशिकची धार्मिक व सांस्कृतिक ओळख पुसण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. या निर्णयाचा निषेध करीत, राष्ट्रवादी काँग्रेस स्वत: स्वागत करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली. मनसेनेही कोट्यवधीची उधळपट्टी करणाऱ्या पालिकेला धार्मिकतेचे वावडे का, असा सवाल केला. महापौर रंजना भानसी यांनी आयुक्तांना पत्र लिहून शहराच्या धार्मिक व संतपरपरेची आठवण करून देत, स्वागतासाठी संबंधितांना आदेशित करण्याची विनंती केली.

महापालिकेने संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याच्या स्वागतास नकार दिला असून, सण व उत्सवांवर यापुढे महापालिका आर्थिक खर्च करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शनिवारी ईदगाह मैदानावर होणारा ईदचा कार्यक्रम, तसेच येत्या २९ जून रोजी येणाऱ्या पालखी सोहळ्याचे स्वागत अडचणीत आले आहे. धार्मिक व सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या नाशिकमध्येच सण व उत्सवांच्या स्वागतावर बंदी घातल्याने नाशिकमधील राजकीय पक्षांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. महापौर रंजना भानसी यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंना पत्र लिहिले आहे. जगभरात नाशिकची ओळख संतभूमी व सांस्कृतिक शहर अशी आहे. सिंहस्थ कुंभमेळाही येथे भरवला जातो. पालिकेच्या वतीने दरवर्षी पालखीचे स्वागत करण्याची पंरपरा आहे. ईदसाठीही ईदगाह मैदानावर शुभेच्छा देण्याची परंपरा आहे. त्यामुळे ही परंपरा खंडित करता येणार नाही, असे म्हणत पालखीचे स्वागत आणि ईदगाह मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संबंधिताना आदेशित करावे, अशी विनंती केली आहे. राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना यांच्यासह सर्वच पक्षांनी या कृतीला विरोध केला आहे.

सण-उत्सवांवरही बंदी घाला

जगाच्या नकाशावर पौराणिक धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहराची नाशिक महापालिका ही पालक संस्था असून, पालिकेकडून येथील सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जपताना आणि सामाजिक बांधिलकी म्हणून सण, उत्सवावर खर्च केला जात आहे. यावर निर्बंध घालण्यास शिवसेनेचा विरोध असल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत, रमजान ईदच्या निमित्ताने ईदगाह मैदानावर होणारे सामूहिक नमाज पठण, गणेशोत्सवात मानाचा गणपती महापालिकेचा असतो, जयंती मिरवणूक यानिमित्त शहरात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम होते. निवृत्तीनाथांच्या पालखीची २६ वर्षाची परंपरा असून, सामुहिक नमाज पठण कार्यक्रम याची पालक संस्था म्हणून महापालिकेने जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे अशा सण-उत्सवांच्या खर्चावरील निर्बंधास सेनेचा विरोध आहे. अगोदरच महापालिकेतील सत्ताधारी भाजपने अगोदर शहरातील मंदिरे पाडली, कार्यालयांतील देवांच्या फोटोंवर बंदी आणली. आता शहरातील सण-उत्सवांच्या परंपराही बंद होतील की काय, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. भाजपने आपले यासंदर्भात नेमके धोरण काय आहे, हे अगोदर जाहीर करावे. पालिका देणार नसेल तर शिवसेना हा खर्च करील, असेही बोरस्ते म्हणाले.

राष्ट्रवादीकडून स्वागताची तयारी

संत-वारकरी व पालखीचे स्वागत करण्यास नाशिक महापालिकेने नकार दिल्याने त्याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे स्वागत करणार असल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा सुरू झाल्यानंतर राज्यभरातून आलेल्या पालखी व वारकऱ्यांचे स्वागत गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक महापालिका करीत आहे. परंतु, या वर्षापासून महापालिकेने पालखी व वारकऱ्यांचे स्वागत करण्यास नकार दिला आहे. राज्यातील पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका वारकरी संप्रदायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करीत असतात. परंतु, नाशिक महापालिकेच्या भूमिकेमुळे या वर्षापासून स्वागताच्या परंपरेस तडा जाणार आहे. संत वारकरी व पालखीचे स्वागत करण्यास नाशिक महापालिकेने नकार दिल्याने निषेध नोंदवत सामाजिक प्रबोधनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वखर्चाने संत निवृत्तीनाथ महाराज पालखी व वारकऱ्यांचे स्वागत करणार असल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

भाजपच्या राज्यातच अन्याय

संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याची जुनी परंपरा आहे. दरवर्षी नाशिक महानगरपालिकेतर्फे महापौर या पालखीचे स्वागत करतात. मात्र, या वर्षी प्रथमच नाशिक मनपा पालखीच्या स्वागताची जबाबदारी टाळत आहे. मनपातील सत्ताधारी हिंदूत्व व धार्मिक गोष्टींच्या नावाखाली मते मागतात व सत्ता येते तेव्हा त्या सत्तेचा उपभोग घेताना आपली संस्कृती, परपंरा यांचा त्यांना सोयीस्कररीत्या विसर पडला आहे. मनपा नको तिथे कोट्यवधींचा खर्च करते व जिथे गरज आहे तिथे दुर्लक्ष करते. हा स्वागत सोहळा लाखो भाविकांच्या व वारकऱ्यांच्या धार्मिक व जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे स्वागत सोहळा करण्यास महापालिका असमर्थ असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सोहळा करण्यास समर्थ आहे, असेही मनसेने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग गडावर आताबॉटल क्रशिंग मशिन

$
0
0

सप्तशृंग गडावर आता

बॉटल क्रशिंग मशिन

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

सप्तशृंग गडावरील प्लॅस्टिक बाटल्यांच्या वाढत्या प्रदूषणावर उपाय शोधण्यात आला आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीतर्फे ट्रस्टला प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशिन देण्यात आले आहे. शनिवारी (ता.१६) सकाळी साडेअकराला श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या सभागृहात लोकार्पण समारंभ होणार आहे.

ट्रस्टचे विश्वस्त उन्मेष गायधनी, रोटरीच्या अध्यक्षा अल्का सिंग, सचिव ज्योतिका पई व जनसंपर्क संचालक जयंत खैरनार आदींची यावेळी उपस्थित राहणार आहेत.

गायधनी म्हणाले,'गडावर भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. देवीचे मंदिर उंच डोंगराच्या कुशीत असल्याने भाविक वर चढताना आपल्याकडील अनावश्यक समान फेकून देतात. यात प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचा समावेश अधिक असतो. भाविक दर्शन घेऊन खाली परत आल्यावरही पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात अन् पाणी पिल्यावर फेकून देतात. गडावर वनराई व काटेरी झुडपे असल्याने हवेने उडणाऱ्या प्लास्टिक बाटल्या सर्वत्र पसरतात. त्या उचलणे शक्य होत नाही. प्लास्टिक प्रदूषणाचे हे प्रमुख कारण आहे. गडावरील प्लास्टिक बाटल्यांची समस्या गायधनी यांनी रोटरीच्या अध्यक्षा अल्का सिंग यांना सांगितली. त्यांनी त्वरित बाटल क्रशिंग मशिन देण्याची कृती केली. प्लास्टिक बाटल्यांची पर्यावरण पुरक शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावल्यावर परिसरातील स्वच्छता राखणे सोपे होईल. त्यामुळे भाविकांना चांगली सेवा देता येईल, असा विश्वास गायधनी आणि अल्का सिंग यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारवेला कचराकुंडीचे स्वरूप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

औरंगाबाद रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांबरोबरच गावातील नागरिकांचीही तहान भागविणाऱ्या अन् पाण्याचा प्रचंड साठा असलेल्या नांदूर येथील पुरातन बारवेचे अस्तित्वच यंत्रणेच्या दुर्लक्षाने धोक्यात आले आहे. या बारवेत कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, दगड, तसेच विविध प्रकारच्या वस्तू टाकण्यात येत असल्याने त्यांचा थर पाण्यावर दिसत असून, या बारवेला कचराकुंडीचेच स्वरूप आल्याची स्थिती आहे.

वाहनांच्या आणि माणसांच्या गर्दीने कायम गजबजलेल्या नांदूर नाक्यापासून जवळच रस्त्यालगत असलेल्या भागात ही पुरातन बारव आहे. मुख्य विहिरीपर्यंत जाण्यासाठी दगडांच्या बनविलेल्या पायऱ्या अजूनही शाबूत आहेत. लांबवर सुमारे १०० फुटांपर्यंत पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना दगडी भिंत बांधण्यात आलेली आहे. विहिरीपर्यंत ही भिंत खोलपर्यंत बांधली आहे. विहिरीचा भाग माती, विटा यांच्यात गोलाकार बांधण्यात आलेला आहे. उत्कृष्ट बांधकामाचा नमुना असलेले हे बांधकाम आजही चांगल्या स्थिती आहे. या बारवेवर दगडी बांधकामात वड, पिंपळ, विलायती चिंच असे वृक्ष वाढले आहेत. त्यांची मुळे दगडी बांधकामात खोलवर रुजली आहेत. काही झाडे तोडून ती बारवेत उतरण्याच्या पायऱ्यांवर टाकण्यात आलेली आहेत.

कितीही दुष्काळ असला, तरी या बारवेचे पाणी कधी आटलेले नाही. पूर्वी कच्चा रस्ता असताना या मार्गाने जाणारे वाटसरू, बैलगाडीतून जाणारे लोक यांची तहान ही बारव भागवत असे. या बारवेच्या जवळच्या परिसरातील रहिवासी येथील पाणी पिण्यासाठी नेत असत. या बारवेच्या विहिरीवर मोटेने पाणी बाहेर काढण्याचीदेखील व्यवस्था होती. त्यासाठी असलेल्या लाकडी सागवानी बल्ल्यांचे काहीअंश शिल्लक आहेत. बैलांच्या मोटेच्या साह्याने येथील पिकांना पाणी देण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. येथील शेतीचे अस्तित्व नष्ट झाले. घरे झाली. दुकाने झाली, पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेकडून नळांद्वारे पाणीपुरवठा होऊ लागला. त्यामुळे या बारवेकडे दुर्लक्ष झाले.

पुरातत्त्व विभागाने घालावे लक्ष

औरंगाबादरोडच्या दुतर्फा इंच इंच जागा व्यापण्याची धडाका व्यावसायिकांनी लावलेला आहे. येथील नैसर्गिक नाल्यांवरही अनेकांनी घाला घालत व्यवसाय सुरू केले आहेत. रस्त्याच्या लगत असलेली ही बारव आणि तिला रस्त्याच्या समांतर मिळालेली १०० फुटांपेक्षा जास्त जागा अनेक व्यावसायिकांच्या नजरेत भरलेली आहे. त्यामुळे या पुरातन बारवेचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आणखी वाढली आहे. पुरातत्त्व विभागाने या बारवेच्या जतनासाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाडगे महाराज पुलाखालील उघडे गज धोकादायक

$
0
0

गाडगे महाराज पुलाखालील उघडे गज धोकादायक (फोटो)

पंचवटी : संत गाडगे महाराज पुलाखालच्या बाजूला असलेल्या सांडव्यावरील उघडे गज धोकादायक बनले आहेत. म्हसोबा पटांगणाकडून दिल्ली दरवाजाकडे जाण्याच्या मार्गावर असलेल्या भागात सिमेंटचे छोटे खांब बांधण्यात आलेले आहेत. त्यातील खांबाचे सिमेंट निघून गेले आहे आणि हे गज उघडे पडले आहेत. येथे बुधवारी आठवडेबाजार भरतो. इतरही दिवसी नागरिक, भाविक, पर्यटक यांची या भागात वर्दळ असते. अशा या वर्दळीच्या भागातील उघड्या गजांमुळे दुर्घटना घडण्याची भीती वाढली आहे.

--

'सिग्नल सुरू करावा'

जेलरोड : गांधीनगर येथील प्रेस गेटसमोर दोन दिवसांपूर्वी रिक्षाने धडक दिल्याने पादचारी ठार झाला होता. त्याचा गंभीर विचार करून येथील बंद सिग्नल सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आंबेडकरनगरजवळ सिग्नल सुरू झाला आहे. मात्र, गांधीनगर प्रेसगेट जवळ सिग्नल नाही. पुढे लष्करी गेटसमोर पिवळा सिग्नल आहे, तो सुरू राहिल्यावर वाहनांना येथे धोका असल्याचा इशारा मिळतो. मात्र, तो बंद असल्याने वाहने वेगात धावत असतात. त्यामुळेच अपघात होत आहेत.

--

गोदाकाठी वस्त्रांचा खच (फोटो)

पंचवटी : अधिकमासानिमित्त रामकुंडावर स्नानासाठी गर्दी होत आहे. येथे स्नान करण्यासाठी आलेले बहुतांश भाविक संपूर्ण वस्त्रांसह स्नान करून अंगावरील ओली वस्त्रे टाकून देत आहेत. त्यामुळे या परिसरात सध्या अशा वस्त्रांचा खच पडल्याचे चित्र आहे. गांधी स्मारक, वस्त्रांतरगृह, दुतोंड्या मारुती, गांधी तलावाजवळचा भाग आदी ठिकाणी कपड्यांचा मोठा खच पडूनही तो उचलला जात नसल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात सहा पूल धोकादायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सहा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असून या पुलावरून वाहनधारकांना वेगमर्यादा घालून द्यावी, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

जिल्हा प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच विभागांची बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाबाबत दक्षता घेण्याचे सूचित केले. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील धोकेदायक पुलांबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. कोकणातील सावित्रीपूल दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या बांधकाम विभागाने सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, नाशिकमध्येही ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. दक्षता म्हणून गत पावसाळ्यात सहा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. यंदाही सावित्रीसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरीता सहा पुलंबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

पांझण नदीवर नवीन पूल बांधण्यात आला असून तो वगळता अन्य पाचही पुलांवर पावसाळ्यात वाहनांच्या वेगावर मर्यादा असणार आहेत. अतिवृष्टीमुळे संबंधित ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत. वेगमर्यादेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून त्यावर स्वाक्षरी झाल्यास तात्काळ त्याबाबतचे निर्देश काढले जाणार आहेत.

पावसाळ्यात नदी, नाल्याच्या पुराचे पाणी रस्त्यांवर येते. परिणामी हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करावे लागतात. असे २२ रस्ते प्रशासनाने निश्चित केले असून यंदाच्या पावसाळ्यात पुराच्या पाण्याने ते बंद झालेच तर पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे नियोजन केले जात आहे.

या पुलांचा समावेश

धोकेदायक पुलांमध्ये चांदोरी-सायखेडा, भगूर-पांढुर्ली तसेच घोटी-सिन्नर महामार्गावरील देवळे पुलाचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच पुलांची डागडुजी केली. यामध्ये सायखेडा-चांदोरी, नाशिक-त्र्यंबक मार्गावरील महिरावणी येथील दोन पूल, दारणा नदीवरील भगूर-पांढुर्लीला जोडणारा पूल, देवळे पूल तसेच मनमाडजवळील पांझण नदीवरील पुलाचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images