Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लढत आजपासूनलंडन : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया

$
0
0

लढत आजपासून

लंडन : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली डे नाइट वन-डे क्रिकेट लढत आजपासून खेळली जाणार आहे. या लढतीपूर्वी इंग्लंडला स्कॉटलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. मात्र, याचा इंग्लंडच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही, असे बेअरस्टोवने सांगितले आहे. सध्या बेअरस्टोव चांगल्या फॉर्मात आहे.

..

२०१६ वर्ल्ड कप

मॉस्को : २०१६ची वर्ल्ड कप स्पर्धा नॉर्थ अमेरिकेत घ्यायची किंवा आफ्रिकेत याचा निर्णय फिफाचे अधिकारी बुधवारी घेणार आहेत. या वर्ल्ड कपसाठी कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका यांनी एकत्रितपणे बोली लावली असून, दुसरी बोली मोरोक्कोकडून आली आहे. २०२२चा वर्ल्ड कप कतारमध्ये होणार आहे.

...

जोकोविचचा सहभाग

लंडन : यंदाच्या मोसमातील सुमार कामगिरीत सुधारणा करण्याची संधी नोव्हाक जोकोविचला येत्या ग्रास कोर्टवरील स्पर्धांमधून मिळणार आहे. त्यामुळेच जागतिक क्रमवारीत पूर्वी अव्वल असलेल्या जोकोविचला क्वीन्स क्लब स्पर्धेनेही थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच आटोपलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतही त्याला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. सध्या तो २१ व्या क्रमांकावर घसरला आहे.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिधापत्रिकांची कामे मार्गी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावात तहसीलदार आपल्या दारी हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. त्याअंतर्गत तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे येथे २४८ शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ३४ लाभार्थींची निवडदेखील करण्यात आली.

नाशिक तालुक्यातील गावोगावी शासनाच्या वतीने तहसीलदार आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात येत आहे. या उपक्रमातून शासनाच्या विविध योजनांची महिती देण्याबरोबरच सर्वांची कामे कार्यालायांत सोडविणे शक्य नसते म्हणून गावपातळीवर जाऊन समस्या सोडविणे आणि नागरिकांशी संवाद साधणे हा उद्देश साध्य होत आहे. संजय गांधी योजनेत लाभार्थींच्या कागदपत्रांची पूर्तता नसल्याने लाभार्थी कमी असतात. पुढील काळात ई सेवा केंद्रातच या सर्व सोयी मिळतील, ज्यामुळे तहसील कार्यालयात नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत. नागरिकांनी एजंटांच्या अमिषांना बळी पडू नये, यासाठी सरकारने तहसीलदार आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. अहिरराव यांनी दिली.

या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय तुंगार, सरपंच माधुरी तुंगार, मंडल अधिकारी सईद शेख, तलाठी बाळासाहेब काळे, पोलिसपाटील रवींद्र जाधव, ग्रामसेवक विजय जाधव, पुरवठा विभागाच्या सुनीता पाटील, नरेंद्र बाहिकर, देवीदास उदार, संजय गांधी योजनेचे ज्ञानेश्वर धांडे, प्रवीण पाटील, माया शिवदे, सतीश बोडके, परिघा उपासनी आदींसह शिंदे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिंदे ग्रामपंचायतीतर्फे तहसीलदार डॉ. राजश्री आहिरराव, तलाठी बाळासाहेब काळे, तलाठी अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला.

यासंदर्भात झाली कार्यवाही...

या उपक्रमावेळी ज्या नागरिकांकडील शिधापत्रिका जीर्ण झालेल्या होत्या त्यांना त्या ताबडतोब बदलून देण्यात आल्या. नवीन शिधापत्रिका, शिधापत्रिकेत नाव कमी करणे, नाव वाढविणे आदी अर्ज भरण्याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ योजना, लाभार्थींना अनुदान देणे याबाबत माहिती देऊन अर्ज स्वीकारण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केशव बोराडेंची निवड

$
0
0

केशव बोराडेंची निवड (फोटो)

नाशिकरोड : चेहेडी बुद्रुक विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी केशव बोराडे, तर व्हाइस चेअरमनपदी दत्तात्रय सातपुते यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास आगळे यांनी काम पाहिले. सोसायटीचे चेअरमन व व्हाइस चेअरमन यांनी राजीनामे दिल्याने या दोन्ही पदांसाठी सोसायटी कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. चेअरमनपदासाठी केशव बोराडे व व्हाइस चेअरमनपदासाठी दत्तात्रय सातपुते यांचेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आगळे यांनी निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. यावेळी संचालक रामभाऊ आवारे, अनिल सातपुते, कैलास ताजनपुरे, सुदाम बोराडे, माणिक गोडसे, नीलेश ताजनपुरे, सुमन घोडे, कृष्णाबाई बोराडे आदी उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला. प्रभाग सभापती पंडित आवारे, अंबादास पगारे, नगरसेवक बाजीराव भागवत, बाबा सदाफुले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

--

अर्भक आढळले

पंचवटी : गोदाघाटावरील टाळकुटेश्वर पुलाजवळील नदीपात्राच्या बाजूला सोमवारी (दि. ११) रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास बेवारस अर्भक आढळले. हे अर्भक मुलीचे आहे. अक्षय मोरे यांनी पंचवटी पोलिस स्टेशनला येथे अर्भक असल्याचे कळविले. पंचवटी पोलिसांनी हे मृत अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--

हेल्मेट देऊन वाढदिवस (फोटो)

जेलरोड : गोडसे एज्युकेशन हबचे संचालक प्रा. संदीप गोडसे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले. खासदार गोडसे म्हणाले, की रहदारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने अपघातांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी आवर्जून हेल्मेटचा वापर करावा. गाडी चालवत असताना मोबाइलचा वापरही टाळावा. नितीन डांगे, एकनाथ नवले, नारायण गोडसे, अविनाश गोडसे, सचिन बेरड, विजय बोराडे, कल्पेश पगारेआदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्वच्छतेचा सामना

$
0
0

इंदिरानगर

अस्वच्छतेचा सामना

इंदिरानगरमधील मंदार अपार्टमेंटच्या भिंतीलगत अनेक दिवसांपासून कचरा पडून आहे. रस्ता झाडून कर्मचारी येथे कचरा लावतात. घंटागाडी कर्मचारी तो उचलत नाही. मग उपयोग काय? या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांना मात्र नाहक अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.

-मंदार देशपांडे

ठक्कर बाजार परिसर

शॉर्टसर्किट रोखावे

हा फोटो आहे ठक्कर बस स्टँडवरील रस्त्याचा. येथे भरदिवसा विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट होताना दिसून आले. असा प्रकार अधूनमधून होत असल्याची काही वाहनचालकांत चर्चा होती. हा अत्यंत वर्दळीचा भाग असल्याने यासंदर्भात ताबडतोब उपाय न केल्यास एखादी दुर्घटना घडू शकते.

-कृष्णा सराफ

शहर परिसर

दिशादर्शक फलकांची दुर्दशा

सिंहस्थाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी असे दिशादर्शक लावण्यात आले होते. पण, सध्या त्यातील काहींची अशी दुरवस्था झालेली आहे. यानिमित्त शहराचे अत्यंत वाईट दर्शन परगावच्या प्रवाशांसह भाविकांना होते. संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी याबाबत नेमके काय करीत आहेत?

-हेमंत साळी

शहर परिसर

शाळांकडून सक्ती नको

शहरातील अनेक शाळांकडून शालेय साहित्य शाळांमधूनच देण्याची सक्ती केली जाते. पालकही त्यास बळी पडतात. असे करणे चुकीचे आहे. अशा प्रकारामुळे कायद्याचा भंग होत असून, पालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिक्षण विभागाने या गंभीर प्रकाराची दखल घ्यायला हवी.

-सौरभ अमृतकर

सातपूर-अंबड लिंकरोड

मोबाइल नेटवर्क गायब

सातपूर-अंबड लिंकरोडवरील जाधव संकुल येथे मोबाइलचे नेटवर्कच मिळत नसल्याने सर्वांनाच गैरसोय सहन करावी लागत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या, पण काहीच कार्यवाही झालेली नाही. येथील समस्या जैसे थेच आहे. त्यामुळे आता नागरिकांनी आंदोलन करावे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-रितेश वाघ

अश्विननगर

तोडलेल्या फांद्यांचा ढीग

सुमारे एक महिन्यापूर्वी महावितरण कंपनीने विजेच्या तारांमध्ये अडकणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून त्याचे ढीग रस्त्यांवर तसेच टाकून ठेवले आहेत. दिवसेंदिवस हा कचरा वाढतच चालला आहे. मात्र, तो उचलायचा कोणी याची जबाबदारीच निश्चित नसल्याचे दिसते. त्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता पसरत आहे.

-हरिभाऊ पुजारी

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपर कप विक्रीमधून अडीच लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेपर कप विक्री करीत असल्याचे भासवणाऱ्या भामट्याने इंडिया मार्ट या वेबसाइटवर शहरातील एका व्यावसायिकास तब्बल अडीच लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे बनावट कंपनीची तसेच व्यक्तीचे प्रोफाईल वेबसाईटवर ठेवणाऱ्या इंडिया मार्ट व्यवस्थापनाविरोधातही नोटीस काढण्यात येणार असल्याचे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी शशी हरीराम हेमनानी (३५, रा. प्लॉट क्रमांक बी २८/२९, वेदास स्पेस बिल्डींग, गोविंदनगर) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. हेमनानी यांचा पेपर कप तसेच पेपर डिश आदी विक्रीचा व्यवसाय आहे. ठोक भावात घेतलेल्या मालाची ते किरकोळ स्वरूपात विक्री करतात. प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकपासून निर्मित होणाऱ्या वस्तूंचे उत्पादन बंद झाले असून, पेपरपासून बनलेल्या डिश अथवा कपांना मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर हेमनानी इंडिया मार्ट या वेबसाइटवर ठोक विक्रेत्यांची माहिती घेत होते. त्यात त्यांना श्रीराम कप या कंपनीची माहिती समजली. त्यांनी संबंधित फोनवर संपर्क साधला असता सागर पटेल (रा. सूरत) याने पेपर कप बॉक्स पाठवण्यास तयार असल्याचे सांगितले. माल पाठवण्यापूर्वी पटेल नावाच्या आरोपीने हेमनानी यांना दोन लाख ६२ हजार ५०० रुपये स्वत:च्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, हेमनानी सर्व रक्कम वर्ग केली. २३ एप्रिल ते ७ मे या काळात इंटरनेटच्या माध्यमातून हा सर्व व्यवहार आणि संपर्क पार पडला. पैसे भरल्यानंतरही माल मिळत नसल्याने हेमनानी यांनी चौकशी केली असता श्रीराम कप नावाची कंपनीच बनावट असल्याचे पुढे आले.

'इंडिया मार्ट'लाही नोटीस

सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांनी सांगितले, की सराईत गुन्हे वेगवेगळ्या शकला लढवत असतात. हा प्रकार त्यातीलच असून, ज्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले, त्याची माहिती घेतली जाते आहे. इंडिया मार्ट या वेबसाइटच्या माध्यमातून यापूर्वी एकदा बनावट कंपनीने फसवणूक केली असून, हेमनानी यांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात इंडिया मार्ट व्यवस्थापनाविरोधात नोटीस काढण्यात येणार आहे. इंडिया मार्टकडे नोंदणी होणारी कंपनी बनावट नाही, याची खात्री संबंधित व्यवस्थापनाने करायला हवी. मात्र, तसे होत नसल्याने ही कारवाई करण्यात येणार असल्याचे पीआय बोरसे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एएफसी’ मोबाइल अॅपचे उद्घाटन

$
0
0

कृतज्ञता सोहळ्यात पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान

म. टा. प्रतिनिधी,नाशिक

पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चोपडा लॉन्सच्या बॅक्वेट हॉलमध्ये कृतज्ञता सोहळा झाला. या कार्यक्रमात नाशिककरांसाठी अॅम्बॅसेडर फॉर चेंज (एएफसी) मोबाइल अॅपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांचे कॅरिकॅचर देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर व पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल उपस्थित होते. यांच्या हस्ते 'एएफसी' मोबाइल अॅपचे उद्घाटन झाले. या अॅपमधून यूजर्सला शहरात सुरू असलेले कार्यक्रम, बातम्या, फोटो गॅलरी, व्हिडिओ गॅलरी पहायला मिळणार आहे. तसेच या अॅपमधून यूजर वेगवेगळे फ्रेम्स सिलेक्ट करून सेल्फी तयार करू शकतात. तसेच वेगवेगळ्या स्पर्धांमध्येही भाग घेऊ शकतात. या अॅपद्वारे यूजर्सला इमर्जन्सी कॉन्टॅक्टची लिस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय विविध स्वयंसेवी संस्थांचीही (एनजीओ) नोंदणी करून त्यांच्या विविध उपक्रमाची माहिती या अॅपद्वारे सर्व यूजर्सपर्यंत पोहोचवू शकतात. या अॅपची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी राहुल रायकर यांच्या मोलाचा वाटा आहे.

कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक योगेश हिरे, शहर पोलिस मुख्यालयाचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त, उपआयुक्त, अधिकारी, हवालदार, कृतज्ञता फाउंडेशनचे एन. सी. देशपांडे व डॉ. शैलेंद्र गायकवाड, आर्किटेक्ट जयेश आणि मृणाल आपटे, इंटेरियर डिझाईनर नीलेश आणि पूजा गायधनी, मिलिंद कुलकर्णी, मुकुंद फणसळकर यांनी परिश्रम घेतले.

अॅप डाउनलोड करण्यासाठी AFC Nashik हे अँड्रॉइड प्लेस्टोर व अॅपल अॅपस्टोरवर सर्च करून यूजर्सला डाउनलोड करता येईल. उद्घाटनप्रसंगी डॉ. रवींद्र सिंघल यांनी आपल्या मिळालेल्या सन्मानाचा स्वीकार करत अॅपचे महत्त्व कसे आहे. हे समजावून सांजितले. त्यांच्यावरील म्हणजे पोलिसांवरील जबाबदारीची जाणीव करून देत आपण नाशिकचा अजून चांगल्या व नाविन्यपूर्ण पद्धतींने वापर करून नाशिककरांची सुरक्षा करण्याचे आवाहन त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व सहकार्यांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन व्यवहारांवरील कर प्रणाली करावी रद्द

$
0
0

नोटाबंदीनंतर किंवा सरकारने रोखीने व्यवहार कमी करून ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन केल्यावर नागरिकांकडून रोखीने व्यवहार होत आहेत. मात्र, त्यासाठी सरकारने तयार केलेल्या सुविधा ॲप किंवा बँकांची ऑनलाइन पद्धत यावरील कर प्रणाली रद्द केली पाहिजे. ऑनलाइन व्यवहारांवर कोणताही छुपा कर घेता कामा नये. हे कर रद्द केले, तर निश्चितच नागरिक त्याचा लाभ घेतील. रोखीने व्यवहार करताना कोणतेही कर लागत नसल्याने या व्यवहारांना प्राधान्य देत असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्‍त केले आहे.

...तरच होईल उद्देश सफल

बहुतांश ऑनलाइन व्यवहार करताना सर्व्हिस चार्ज मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट करण्याऐवजी रोख व्यवहार करण्यावरच सर्वजण भर देत आहेत. बँकेचे ऑनलाइन पेमेंट बरेच जण करू लागले होते. त्यामुळे बँकेतील भार कमी होत होता. मात्र, त्यावरही कर लावला आहे. असे कर लावणे थांबविल्यासच सरकारचा उद्देश सफल होऊ शकेल.

-उदय सोनवणे

जनजागृती पडतेय कमी

डिजिटल पद्धतीने पैशांचे व्यवहार करणे खूप चांगले आहे. अनेक जण त्याचा वापर करू लागले आहेत. बँक किंवा विविध प्रकारचे ॲप याद्वारे पेमेंट केले जाते. मात्र, अजूनही त्याबाबत जनजागृती झालेली नाही. सर्वच ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करण्याची सक्‍ती करणे व त्यावर कर न घेणे हे योग्य होईल. रोखीच्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी जनजागृती कमी पडत आहे.

-संदीप दिघे

तांत्रिक सुधारणांची गरज

सरकारने रोखीने व्यवहार न करता विविध पद्धतीने ऑनलाइन व्यवहार करण्याच्या सुविधा सुरू केल्या असल्या, तरी सरकारी यंत्रणेच्याच अनेक वेबसाइट किंवा ॲप हे कधीही सुरळीत कार्यरत नसतात. सरकारने त्यात तांत्रिक सुधारणा करणे आवश्यक आहे. डिजिटल पद्धतीने व्यवहार करताना कोणतेही जादा किंवा छुपे कर घेऊ नयेत, त्यामुळे रोखीच्या व्यवहारांना आळा बसेल.

-रोहित ताहाराबादकर

व्यवहार वाढविण्यावर द्यावा भर

चांगल्या नियमाचे चांगले परिणाम दिसण्यासाठी वेळ जास्त जातो. त्यामुळे आज जरी पूर्णपणे व्यवहार डिजिटल पद्धतीने होत नसले, तरी येत्या काही दिवसांत नक्कीच त्याचे चांगले परिणाम बघावयास मिळतील, हे सत्य नाकारता येत नाही. आज अडचण दिसली, तरी त्याचे फायदेसुद्धा लवकरच समोर येतील. त्यामुळे असे व्यवहार वाढविण्यावर सर्वांनीच भर देण्याची गरज आहे.

-मयूर लवटे

नागरिकांनी कर का सोसावा?

रोखीने व्यवहार करण्याऐवजी ॲप किंवा ऑनलाइन व्यवहार करण्याची नागरिकांची तयारी आहे. मात्र, बँकांनी वाढविलेल्या करांमुळे किंवा छुप्या करांमुळे नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. प्रत्येक ठिकाणी अशी सुविधासुद्धा उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी रोख व्यवहार करण्याऐवजी ॲप किंवा ऑनलाइन व्यवहार करायचे म्हटल्यास कर लावला जातो. तो कर नागरिकांनी का सोसावा?

-प्रणव मानकर

(आमचा ‌आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या भांडणाच्या वादात तरुणाची हत्या

$
0
0

म टा प्रतिनिधी, नाशिक

जुन्या भांडणाची कुरापत काढत लोखंडी रॉड तसेच धारदार शस्त्राने वार करून पंचवटी येथील फुलेनगरमध्ये २५ वर्षीय युवकाची टोळक्याने खून केल्याची घटना घडली. घटना आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहा जणांना अवघ्या तासाभरातच पंचवटी पोलिसांनी अटक केली.

अनिल सुखलाल गुंजाळ (वय २५, रा. वैशाली नगर, पेठरोड पंचवटी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी जयराम गायकवाड (वय ४४) सुरज गायकवाड (वय १८), श्रीराम गायकवाड (३६), दशरथ गायकवाड (३४), ऋतिक गायकवाड (२०) अंबिका पवार सर्व राहणार लक्ष्मीनगर पेठरोड अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अनिल गुंजाळ हा फुलेनगर रोडने जात असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयितांनी अचानक त्याच्या डोक्यात मिरचीची पूड टाकून लोखंडी रॉड, धारदार शस्राने मारण्यास सुरुवात केली.

चाकूचा वार वर्मी बसल्याने अनिल जागीच कोसळला तर त्याच्यासोबत असलेला मित्र संपत माने हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

यातील जखमी अनिल गुंजाळ व संपत माने पोलिसांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वीच अनिलचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तर मानेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संशयितांची नावे समजताच पोलिसांनी अवघ्या तासाभरातच सर्वांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहीर शंतनू कांबळे यांचं निधन

$
0
0

नाशिक:

विद्रोही कवी आणि लोकशाहीर शंतनू कांबळे यांचं आज दुपारी दीर्घ आजारानं नाशिक येथे निधन झालं. ते ३९ वर्षाचे होते. कांबळे यांच्या निधनावर जागर लढाऊ लोककला आघाडी, लोकसांस्कृतिक मंचसह विविध विद्रोही सांस्कृतिक संघटनांनी दु:ख व्यक्त केले आहे.

शाहीर शंतनू कांबळे गेल्या काही वर्षांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त होते. तब्येत बिघडल्याने गेल्या आठवड्यात त्यांना नाशिकच्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. गेल्या ५-६ दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. आज प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. नव्या शाहीरांसाठी प्रेरणादायी असलेले शंतनू हे मुळचे सांगलीतील तासगावचे होते. मुंबईतल्या वडाळा येथे राह्यचे. मात्र आजारपणानंतर ते नाशिकला स्थायिक झाले होते.

२००५ मध्ये शंतनू यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी अटक केली होती. रायपूर येथे आदिवासींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना १०० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र तपासाअंती कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पोलिसांनी तुरुंगात प्रचंड मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते अंथरुणाला खिळले होते. त्यातच त्यांना क्षयाची लागण झाली होती. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी वडाळ्याहून नाशिकला मुक्काम हलवला होता. मात्र नाशिकमध्ये आल्यानंतरही आजाराने त्यांची पाठ सोडली नव्हती.

अनेक वर्षांपासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि जातीअंताच्या लढाईत ते अग्रेसर होते. गाणी आणि कवितातून ते जातीय अत्याचार, शोषण, आर्थिक-सामाजिक विषमता आणि मानवतावादावर भाष्य करत असायचे. 'दलिता रे हल्ला बोल ना...श्रमिका रे हल्ला बोलं ना...' आणि 'समतेच्या वाटेनं, खणकावत पैंजण यावं तू यावं, तू यावं, तू यावं बंधन तोडीत यावं...' त्यांची आदी गीते चळवळीत लोकप्रिय होती. अत्यंत गाजलेला 'कोर्ट' हा सिनेमा त्यांच्या आयुष्यावर बेतलेला होता. ते 'विद्रोही' मासिकाच्या संपादक मंडळावरही होते. त्यांच्या अकस्मिक निधनावर जागर लढाऊ लोककला आघाडी, लोकसांस्कृतिक मंचसह विविध विद्रोही सांस्कृतिक संघटनांनी दु:ख व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात टँकर्सची शंभरीकडे वाटचाल

$
0
0

जून अर्धा संपला तरी पावसाची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन झाले असले तरी नाशिककरांना अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागातील रहिवाशांना अजूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यातील आणखी १९ गावे आणि ७५ वाड्यांसाठी जिल्हा प्रशासनाने १८ टँकर्सला मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हावासियांची तहान भागविण्यासाठी धावणाऱ्या टँकर्सची संख्या ९५ झाली असून शंभरीकडे वाटचाल सुरू आहे.

जिल्हावासीयांनी यंदा तप्त उन्हाच्या झळांचा सामना केला. उन्हाच्या दाहकता आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचे उपलब्ध स्त्रोतही आटू लागले आहेत. पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने ग्रामस्थांकडून जिल्हा प्रशासनाकडे टँकर्सची मागणी होऊ लागली. ७७ टँकरद्वारे २६८ गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा सुरू होता. आणखी ९२ गावे आणि वाड्यांसाठी १८ टँकर्सला प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची तहान भागविणाऱ्या टँकर्सची संख्या ९५ होणार आहे.

बागलाण, येवल्यात सर्वाधिक झळा

येवला, बागलाण आणि सिन्नर तालुक्यात टंचाईच्या सर्वाधिक झळा सहन कराव्या लागत आहेत. या तीन तालुक्यांमध्ये ५२ टँकर सुरू असून आणखी दोन टँकरला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मालेगाव व नांदगावमध्ये देखील प्रत्येकी नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. १०३ गावे आणि १६५ वाड्यांसाठी ७७ टँकर्सद्वारे दररोजच्या २५७ फेऱ्या होत आहेत. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या गावांसाठी दोन दिवसांत १८ टँकर धावण्यास सुरूवात होणार आहे. याखेरीज पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५६ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत.

..

नव्याने मंजूर केलेले टँकर

चांदवड तालुक्यातील एका गावासाठी, सिन्नर तालुक्यातील १० वाड्या आणि दोन गावे, सुरगाणा तालुक्यातील १३ गावे व २९ वाड्या, नांदगावमधील तीन गावे व ३४ वाड्यांसाठी टँकरला मान्यता देण्यात आली आहे. तसेच देवळा, त्र्यंबकेश्‍वर आणि मालेगाव तालुक्यातही ९ वाड्यांसाठी नव्याने टँकर सुरू करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या स्वागताची जोरदार तयारी

$
0
0

अडीच वर्षानंतर नाशकात आगमन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ हे अडीच वर्षांनंतर गुरुवारी (दि. १४) दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरात दाखल होत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व समता परिषदेकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक व शहराध्यक्ष संतोष सोनपसारे यांनी दिली आहे.

येवल्याचे आमदार छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ हे अडीच वर्षांनंतर नाशिक जिल्ह्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकार्त्यामध्ये चैत्यन्य संचारले आहे. छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांचे इगतपुरी, वाडीवऱ्हे पाथर्डी फाटा सह शहरात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर शहरात प्रवेश करताच प्रथम पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन त्यानंतर गणेशवाडी, पंचवटी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास व शालीमार येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते अभिवादन करणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास ते मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

सहा दिवसाचा दौरा

छगन भुजबळ यांचा सहा दिवसाचा नाशिक जिल्हा दौरा आहे. या काळात ते विविध धार्मिक स्थळांनाही भेट देणार आहे. त्यात सप्तशृंगी गड, त्र्यंबकेश्वर व शिर्डी येथे जाणार आहे. गुरुवार १४ जूनपासून सुरु होणारा त्यांचा दौरा मंगळवार १९ जूनपर्यंत असणार आहे.

येवल्यात जोरदार तयारी

मतदारसंघातून सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या छगन भुजबळांचे येवल्यात जोरदार स्वागत करण्यासाठी तयारी केली जात आहे. तुरुंगात असतानाही त्यांनी येवल्याचे विविध प्रश्न पत्रातून मांडले. तसेच मतदारासंघांच्या विविध कामांसाठी भरघोस निधी मिळविला होता.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला तहसीलदारांना ‘आंबा’ भेट

$
0
0

भिडे गुरुजींच्या कथित वक्तव्याचा 'स्वारीप'कडून निषेध

म. टा. वृत्तसेवा, येवला

फळांचा राजा आंबा गेल्या काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. भिडे गुरुजींच्या या कथित वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघताना विशेषतः आंबेडकरी चळवळीतील संघटनांकडून भिडेंचा निषेध केला जावू लागला आहे. येवल्यातील स्वाभिमानी रिपब्लिकन संघटनेच्या वतीने मंगळवारी दुपारी भिडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ येवला तहसील कार्यालयासमोर धरणे धरण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांना 'आंबा' भेट देण्यात आली.

माझ्या शेतातील आंब्याच्या झाडाचे आंबे खाल्ले, की जोडप्यांना मुले होतात, असे कथित वक्तव्य मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांनी दोन दिवसांपूर्वी केल्यानंतर राज्यात मोठे वादळ उठले आहे. विशेषतः भिडे गुरुजींना गेल्या काही महिन्यात 'लक्ष्य' करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील अनेक संघटनांनी भिडे गुरुजींना आंदोलनात्मक मार्गाने घेरण्याचा पवित्रा घेतला आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत येवल्यातील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी येवला तहसीदार नरेशकुमार बहिरम यांना आंबा भेट देवून भिडेंच्या कथित वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. येवला तहसीलबाहेरील आवारात अनेकांनी आपल्या हाती आंबा धरत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी तहसील इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'स्वारीप'च्या महिला कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदनावर स्वारीप महिला आघाडीचे महेंद्र पगारे, रेखा साबळे, रंजना पठारे, आशा आहेर, ज्योती पगारे, शोभा घोडेराव, वाल्हुबाई जगताप, कांताबाई गरुड, विजय घोडेराव, आकाश घोडेराव, शशिकांत जगताप आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालमजुरीच्या उच्चाटनासाठी जनजागृती गरजेची’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

बालकांना शिक्षण व जगण्याचा हक्क मिळावा यासाठी जनजागृतीपर बालमजुरी प्रथा विरोधी दिन साजरा केला जातो. मुस्लिमबहुल असलेल्या मालेगाव शहरात बालमुजरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अल्पवयीन बालकांना मजुरीसाठी प्रवृत्त करणे अथवा त्यांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. शहरातून बालमजुरीचे समुळ उच्चाटन होण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी येथे केले.

येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात बुधवारी बालमजुरी प्रथा विरोधी जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प व कामगार कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा रथ काढण्यात आला. बालमजुरी प्रथा विरोधात शहरात जनजागृती करण्यात येणार असून, विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे कार्यक्रम अधिकारी अनिल खरे यांनी दिली.

शहरातील देवीचा मळा, म्हाळदे शिवार, अख्तराबाद आदी परिसरात बालमजुरी प्रथा विरोधी जनजागृती चित्ररथाची फेरी काढण्यात आली. अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधला. कार्यक्रमास नायब तहसीलदार आर. के. सायंकर, जे. पी. निकम, विवेक पाटील, अभिषेक चोळके, विलास गायकवाड, दीपक हेडे आदींसह बालकामगार प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस दलातर्फे इफ्तार पार्टी

$
0
0

पोलिस दलातर्फे इफ्तार पार्टी

मालेगाव : मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान पर्व सध्या सुरू असून, शनिवारी रमजान ईद साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी येथील शहर पोलिस ठाण्यातील सुसंवाद सभागृह येथे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक तसेच इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीस जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उप अधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, पालिका उपायुक्त राजू खैरनार आदींसह शांतता कमिटीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते .

उपायुक्तांची पठारे यांची बदली

मालेगाव : येथील महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांची बदली करण्यात आली आहे. अहमदनगर महापालिकेचे उपायुक्त म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेर नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कापडणीस हे अहमदनगर येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिफेन्स सेमिनारच्या पूर्वतयारीचा आढावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथे शुक्रवारी (दि. १५) होणाऱ्या डिफेन्स वेंडरशीप डेव्हलपमेंटच्या सेमिनारच्या पूर्वतयारीची आढावा बैठक घेण्यात आली. या सेमिनारमुळे नाशिकच्या उद्योगक्षेत्रात व रोजगाराबाबतीत स्थानिक विकासाचा प्रचंड फायदा होणार आहे.

बैठकीत डिफेन्स प्रॉडक्शनचे जॉइन सेक्रेटरी संजय जाजू, डॉ. प्रशांत पाटील, 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर, सारिका बच्छाव, ज्ञानेश्वर गोपाळे, चेबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेच्या, अमोल जाधव, 'आयमा'चे ललित बूब, योगिता आहेर लघुउद्योग भारतीचे मिलिंद कुलकर्णी, संजय महाजन, 'सीआयआय'चे तुषार पटवर्धन, 'एचएएल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजीतसिंग सिंगल, पूनम श्रीवास्तव, अजित अधळकर, तरुण गोस्वामी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेस कामगारांचे निलंबन बिनशर्त मागे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडच्या नोटप्रेसमधील अधिकाऱ्यांना झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी गणेश काळे आणि एस. जी. घुगे या कामगारांना व्यवस्थापनाने कारणे दाखवा नोटीस न देताच मंगळवारी (दि. १२) निलंबित केले होते. व्यवस्थापनाने बिनशर्तपणे कारवाई मागे घेतल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी बुधवारी दिली. निलंबन मागे घेतल्याने प्रेसमधील तणाव निवळला आहे.

जुंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीसाठी दिल्लीहून प्रेस महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक विजय गुप्ता, व्यवस्थापक अंजन दुर्गाप्रसाद आणि ए. के. श्रीवास्तव यांची समिती आली होती. समितीने दोन दिवस व्यवस्थापन व अधिकारी वर्गाशी चर्चा केली. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, सुनील आहिरे, राजेश टाकेकर, माधवराव लहांगे, सिद्धार्थ पवार, संदीप बिश्वास, किरण खर्डे यांच्याशी चर्चा केली. अधिकाऱ्यांनीही आपल्याला मारहाण झाली नसल्याचे सांगितले. कामगार व अधिकाऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाले. अधिकाऱ्यांना लोटले असताना मारहाण झाल्याचे चुकीचे वृत्त दिल्लीला पाठविण्यात आले. त्रिसदस्यीय समितीलाही त्यात तथ्य आढाळले नाही. त्यामुळे निलंबन मागे घेऊन कामगारांना रुजू करून घेण्याचे आदेश नाशिकरोड प्रेसचे जनरल मॅनजेर एस. पी. वर्मा यांना देण्यात आले. त्यांनी दोन्ही कामगारांना बुधवारी रुजू करून घेतले.

एकजुटीचा विजय

निलंबन मागे घ्यावे यासाठी कामगार नेते तीन दिवसांपासून प्रयत्न करत होते. दोन्ही कामगारांना कारणे दाखवा नोटीस न देताच निलंबित केल्याच्या निषेधार्थ कामगारांनी स्वयंस्फूर्तीने दोन तास कामबंद आंदोलन केले. दरम्यान, सुरक्षेचे वॉटरमार्क नसलेल्या नोटा काही वर्षांपूर्वी छापण्यात आल्या होत्या. त्याप्रकरणी येथील नोट प्रेसममधील तीन जणांना निलंबित करण्यात आले होते. नंतर ही कारवाई मागे घेण्यात आली होती. आता पुन्हा निलंबन मागे घेण्यात आले. त्यामुळे आपली ताकद दाखवून दिल्याचे कामगारांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यातील सहा जणांची अपहारप्रकरणी चौकशी

$
0
0

अमळनेर पोलिसांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, अमळनेर

धुळे येथील महामार्गावरील उड्डाणपुलासाठी संपादित जमिनीचा वाढीव मोबदलाच्या आर्थिक अपहारप्रकरणी धुळे येथील दोन प्रतिष्ठीत व्यक्तींसह सहा जणांची अमळनेरला पोलिसांकडून तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. या सहाही जणांना समज देण्यात आली असून, पुन्हा चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी अमळनेर पोलिसांकडून ही चौकशी करण्यात आली. अधीक्षकांनी याबाबत निरीक्षक अनिल बडगुजर व मारवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना माहिती देत खासगी बँकेत जाऊन आर्थिक अपहारप्रकरणी धुळे येथील दोन प्रतिष्ठीत व्यक्तींसह सहा जणांची चौकशी करण्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने तब्बल सात तास चौकशी करीत त्यांना समज देऊन सोडून दिले. रात्री उशिरापर्यंत याबाबतच्या घडामोडी सुरू होत्या. तसेच, जिल्हा पोलिस अधीक्षक अमळनेरला भेट देणार होते. यामध्ये धुळ्यातील शिवसेना महानगरप्रमुख सतीश दिगंबर महाले, माजी नगरसेवक विनायक वालचंद शिंदे यांच्यासह जितेंद्र गंगाराम भिल, अनिल गुलाब खैरनार, बबलू सोनू मोरे, रुपसिंग गेंदा भिल यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती निरीक्षक बडगुजर यांनी दिली.

असे आहे प्रकरण...

दिनेश विकास ठाकरे (रा. पिंपरी, ता. धुळे) ह. मु. रामबोरीस यांच्या वडिलांची जमीन महामार्गावर उड्डाणपुलासाठी संपादित झाली आहे. तत्पूर्वी विकास ठाकरे यांनी ही जमीन धुडकू मोरे यांना विकली होती. त्यावेळी त्यांना २६ लाख रुपये मिळाले होते. त्यादरम्यान विकास ठाकरे यांचा मृत्यू झाला आणि ही जमीन विकास ठाकरे यांच्या नावावरून वारसदार दिनेश ठाकरे यांच्या नावावर झाली. शासनाच्या नवीन धोरणानुसार प्रकल्पात संपादित जमिनीचा वाढीव मोबदला मिळणार असल्याचे कळताच धुळे येथील भरत जाधव यांच्यासह काही व्यक्तींनी दिनेशशी करार करीत वाढीव मोबदला मिळवण्याचे आमिष दिले. दिनेशचे यापूर्वी धुळे येथील खासगी बँकेत खाते होते. मात्र, तेथे मर्यादित रक्कम निघत होती म्हणून दिनेशने २९ मे २०१८ रोजी अमळनेर येथील खासगी बँकेत खाते उघडले. अमळनेर येथे एक कोटी २८ लाख रुपये जमा झाले होते. त्यापैकी भरत जाधव यांनी १० ते १२ लोकांच्या नावावर नेटबँकिंगच्या माध्यमातून ५० लाख रुपये वळते केले. याबाबत दिनेश ठाकरे यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले की, माझा भ्रमणध्वनी भरत जाधव यांच्या ताब्यात असून, नेटबँकिंग व्यवहार त्यांनीच केले आहेत. या आर्थिक व्यवहाराबाबत बँक व इतरांचा काय सबंध यासाठी बँकेचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावले होते.

राष्ट्रीय महामार्गाबाबत यापूर्वी मी विधानसभेत या प्रकरणात ३५ कोटींचा अपहार झाल्याचे बोललो होतो. तो प्रकार अमळनेरच्या आजच्या आर्थिक व्यवहाराच्या गुन्ह्याच्या माध्यमातून हळूहळू बाहेर येत आहे. या प्रकरणात आदिवासींची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे.
- अनिल गोटे, आमदार, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या महिलेस अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत मातोश्री रो-हाऊस नंबर -३मध्ये तीन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. याप्रकरणी एका संशयित महिलेला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे.

चैताली रामदास आहेर (वय ३५, रा. संजयनगर पाण्याच्या टाकीजवळ, पंचवटी, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. ही महिला गेल्या काही दिवसांपासून आडगाव परिसरातील मातोश्री रो-हाऊस नंबर ३ येथे काही पीडित महिलांकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसाय करवून घेत होती. ही माहिती मिळाल्यावर मंगळवारी (दि. १२) रात्री साडेआठ वाजता आडगाव पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक योगिता जाधव यांच्यासह पथकाने खात्री करून छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुटका केली. याबाबत संशयित चैताली आहेर या महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे स्थलांतर

$
0
0

नाशिक : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे स्थलांतर झाले असून कार्यालयास करण्यात येणारा संपर्क, गोपनीय पत्रव्यवहार, अर्ध शासकीय पत्रे व इतर महत्त्वाची पत्रे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जुने केंद्रीय कार्यालय इमारत, पहिला मजला, जुना मुंबई-आग्रा रोड, नाशिक या पत्यावर पाठवावीत तसेच संपर्कासाठी ०२५३-२९७२१२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक संचालक सं. पा. चाटे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर जलवाहिनी स्वच्छ

$
0
0

दूषित पाण्याच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी केली पाहणी

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील साईबाबानगर व महाकाली चौक परिसरातील अनेक घरांमध्ये चार दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत होता. मंगळवारी पाण्यात आळ्या किंवा अन्य जीवजंतू आढळल्याने नागरिकांनी तक्रार केली होती. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी पाहणी करून संपूर्ण जलवाहिनी स्वच्छ केली असून, ड्रेनेज व जलवाहिनीची पाहणीही सुरू केली आहे.

सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील साईबाबानगर व महाकाली चौक परिसरात मागील चार दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. नागरिकांनी याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही काहीही उपयोग होत नव्हता. मंगळवारी या परिसरातील नळांमधून आलेल्या पाण्यात आळ्या किंवा अन्य जीवजंतू आढळून आल्याने संतप्त नागरिकांनी स्थानिक नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडे तक्रार केली होती. शहाणे यांनी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बोलावून परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळपासून महापालिकेच्या पाणीपुरवठाचे अधिकारी दौलत घुले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून जलवाहिनी पूर्णपणे स्वच्छ केली. या वेळी काही घाण आढळल्याने नागरिकांनी सांगितलेल्या गोष्टीत तथ्य असल्याचे दिसून आले. त्यानुसार बुधवारी संपूर्ण परिसरात ड्रेनेजलाइन व जलवाहिनी एकत्र येत असलेल्या परिसराची पाहणी करून ज्या ठिकाणी लिकेज असले तेथे सुधारण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

सिडकोत परिसरातील याच भागात नव्हे तर अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन व पाणीपुरवठा करणारी लाईन एकत्र झाल्याचे दिसून आले आहे. आता या दोन्ही लाईन बदलण्यासाठी महापालिकेने खास तरतूद करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा प्रकारे दूषित पाणीपुरवठा होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन जीवितहानी झाली तर याची जबाबदारी महापालिका घेणार काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सिडकोत अनेक ठिकाणी ड्रेनेज व पाण्याच्या लाईन जवळजवळ असल्याने असे प्रकार होत असतात. नागरिकांच्या जीविताशी हा खेळच होत असून, आयुक्‍तांनीच या प्रकरणी लक्ष द्यावे. तसेच या परिसराची पाहणी करीत या समस्येपासून सिडकोवासियांची सुटका करावी.

- मुकेश शहाणे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images