Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पक्ष संघटन मजबूत करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पक्ष संघटन मजबूत असेल, तर आपण निवडणूक जिंकू शकतो. त्यासाठी स्थानिक पातळीवरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनिष्ठेने व नि:स्वार्थी भावनेने काम करावे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी केले.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या नाशिक जिल्हा पदाधिकारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला पक्षाचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ पोथारे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख कैलास हळनोर, जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण आव्हाड, शहरप्रमुख डॉ. उल्हास कुटे, डॉ. विजय थोरात, भागवत सापनर, नवनाथ शिंदे, शमशाद खान, महिला अध्यक्षा वनिता जाधव आदींसह जिल्ह्यातील तालुकाप्रमुख उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाचा दि. २९ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे पंधरावा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात शिवाजी पार्क, मुंबई येथे अकरा लाख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचेही जानकर यांनी सांगितले. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बूथ बांधणी करून पक्षाचे सदस्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ पोथारे, शहरप्रमुख डॉ. विलास कुटे आदींनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

(फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नंदिनीपात्राची स्वच्छता

$
0
0

\Bनंदिनीपात्राची स्वच्छता\B

जेलरोड : नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवायोजनेच्या विद्यार्थ्यांनी नंदिनी (नासर्डी) नदीची लोकसहभागातून स्वच्छता केली. नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या पुढाकाराने नंदिनी रक्षक उपक्रम राबविण्यात आला. त्याअंतर्गत ही स्वच्छता करण्यात आली. त्याबद्दल प्राचार्य डॉ. धनेश कलाल यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत खेमनर, दर्शन पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी विशाल ताजनपुरे, अमित पवार आदी उपस्थित होते.

--

स्वच्छतेकडे दुर्लक्ष

नाशिकरोड : परिसरातील अनेक मोकळ्या भूखंडांवर पावसाच्या पाण्याची डबकी साचलेली आहेत. झाडे-झुडपे आणि रानगवतही फोफावले आहे. काही ठिकाणी प्लास्टिकचा कचराही मोठ्या प्रमाणात पडून आहे. या कचऱ्यात पावसाचे पाणी साचलेले असल्यानेही डासांसह डेंग्यूच्या अळ्यांचा प्रादुर्भाव परिसरात वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, तरीदेखील मलेरिया विभागाकडूनही शहरातील सार्वजनिक ठिकाणी फवारणी करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ नगरसेवकांवर टांगती तलवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी नाशिक

मुदतीत जातप्रमाणपत्र सादर न केलेल्या लोकप्रतिनिधींचे पद रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींचे पद धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामध्ये चांदवडच्या नगराध्यक्षांसह अन्य काही लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षित जागेवर निवडून आलेल्या सदस्यांना सहा महिन्यांच्या आत जातीचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. कोल्हापूर महापालिकेतील १९ नगरसेवकांनी मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्याने निवडणूक आयोगाने त्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निकालाविरोधात संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून पदे रद्द करण्याचे आदेश दिले. नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमधील नऊ नगरसेवकांनाही या आदेशाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. त्यामध्ये चांदवडच्या नगराध्यक्षा रेखा गवळी, सटाणा नगरपालिकेतील भारती सूर्यवंशी, मन्सुरी शमा आरिफ, बाळू बागुल व लता सोनवणे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सिन्नर नगरपालिकेतील रखमा मुठे व ज्योती वामने यांचेही पद रद्द होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. येवल्याच्या पुष्पा गायकवाड यांनी प्रमाणपत्रच दिले नसून मनमाडच्या शेख यास्मीन रफीक आणि नांदगावच्या चांदनी खरोटे यांनी प्रमाणपत्राची पोच पावती जमा केल्याची बाब पुढे आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेने यापूर्वीच या सर्व सदस्यांचे प्रस्ताव सरकारकडे सादर केले असून, सरकार काय निर्णय घेते याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन समुहाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

देवभूमी केरळमध्ये वादळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. वादळीपावसामुळे निम्म्याहून अधिक केरळ राज्याची मोठी हानी झाली आहे. लाखो लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची वानवा झाली. केरळमधील नागरिकांना मानवतावादी मूल्यांतून मदतीचा हात देण्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने पुढाकार घेतला आहे.

जैन इरिगेशनच्या माध्यमातून जैन फार्मफ्रेश फुडस लि. आणि भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनद्वारे कांदे, मसाले, फळयुक्त आहार असे खाद्यपदार्थ पाठविले जाणार आहेत. बुधवारी रात्री एर्नाकुलमला जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसमधून २० हजार किलो मसाले भरलेली एक वॅगन पाठवण्यात आली. २२ हजार किलो निर्जलिकृत कांदे भरलेली दुसरी वॅगन शनिवारी पाठवण्यात येईल. त्यानंतर उद्या आणि परवापर्यंत आणखी ३ वॅगन्स भरून खाद्यपदार्थ पाठविले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा योजनांसाठी ३६७ कोटींचा निधी

$
0
0

जिल्ह्यात २९४ गावांसाठी २१८ योजनांना मिळाली मंजुरी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मोठा दिलासा देत या वर्षी सन २०१८-१९ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये २९४ गावांसाठी २१८ पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहेत.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मार्च २०१५ मध्ये केंद्र शासनाने स्थगिती दिली होती. याबाबत केंद्रीय मंत्री उमा भारती यांची दिल्ली येथे लोणीकरांनी २३ डिसेंबर २०१७ रोजी भेट घेतली व ही बंदी उठविण्याची मागणी केली. केंद्र शासनाने सन २०१८-१९ मध्ये राज्यातील पाणीपुरवठा योजना घेण्यासाठी परवानगी दिली व त्याप्रमाणे सन २०१८-१९ चा आराखडा तयार करण्यात आला.

आराखड्यामध्ये जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आमदार एकनाथ खडसे यांनी सुचविलेल्या सर्व योजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणी प्रमाणे योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजना राबविण्यासाठी एकूण ३६७ कोटी ६३ लाख रुपये एवढा अंदाजपत्रकीय खर्च लागणार आहे. यामुळे २ वर्षाच्या कालखंडानंतर या वर्षी हा जंबो आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी २२ कोटी ६३ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन व चालू असणाऱ्या अशा ३१० गावे/वाड्यांसाठी २३३ योजनांसाठी एकूण ३९० कोटी २६ लाख रुपये निधीचा आराखडा अंतिमत: मान्य करण्यात आला आहे.

सन २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखड्यांमध्ये सर्व गावे हागणदारीमुक्त झाल्यामुळे जिल्ह्यांतील जास्तीत जास्त गावांचा समावेश लोणीकरा यांनी सन २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखड्यात केला आहे. याद्वारे जिल्ह्यातील जवळपास सर्वच टँकरग्रस्त गावासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. या प्रकारे या वर्षीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत बांधलेल्या शौचालयांना निधी असे एकत्रित मिळून जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून ६७१ कोटी ३३ लक्ष रूपये एवढा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

तालुकानिहाय मंजूर योजना

तालुका-गावे-योजना-किंमत

अमळनेर-७६-२३-७३ कोटी ४६ लक्ष

भडगाव-१६- १५-१५ कोटी ६९ लक्ष

भुसावळ-३-३-३१ कोटी ५१ लक्ष

चाळीसगाव-३३-२८-३७ कोटी १५ लक्ष

चोपडा-२६-१७-५१ कोटी ८३ लक्ष

धरणगाव-१२-११-८ कोटी १७ लक्ष

एरंडोल-१३-१२-५ कोटी ९० लक्ष

जळगाव-१४- १४-१४ कोटी ५२ लक्ष

जामनेर-१९- १८-५३ कोटी ९४ लक्ष

मुक्ताईनगर-५-५-७ कोटी ८५ लक्ष

पाचोरा-४१-४१-४२ कोटी ८३ लक्ष

पारोळा-२३-१८-१८कोटी ७२ लक्ष

रावेर-८-८-४ कोटी ४ लक्ष

यावल-५-५- १ कोटी ९६ लक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेळाव्यात ८८६ रिक्त पदे भरणार!

$
0
0

नाशिक : जिल्ह्यातील अनेक औद्योगिक आणि व्यावसायिक कंपन्यांमध्ये रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सुमारे ८८६ पदांची भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी मंगळवारी सकाळी नऊ वाजता भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात रोजगार व उद्योजकता मेळावा होणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे हा मेळावा होईल. नोंदणीसाठी www.mahaswayam.gov.in या वेबसाइटला भेट द्या, अडचण असल्यास ०२५३-२९७२१२१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री डॉ. भामरेंकडून पुन्हा आश्वासनच

$
0
0

म. टा वृत्तसेवा, सटाणा -

उत्राणे (ता. सटाणा) येथील दिव्यांग तरुण प्रवीण पगार यांनी बँकेकडून उद्योगासाठी कर्ज मिळत नसल्याने व मराठा समाज आरक्षणापासून वंचित रहात असल्याने मंगळवारी गावातील विहिरित आत्महत्या केली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला असता कुटुंबियांनी व गावातील नागरिकांनी विविध मागण्या करीत ठिय्या आंदोलन केले होते. महसूल अधिकारी, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी फोन वरुन मदतीचे आश्वासन दिल्यानंतर मयत तरुणावर दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुक्रवारी दुपारी डॉ. सुभाष भामरे यांनी उत्राणे येथे भेट देत प्रवीण पगार यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी मयत प्रवीण पगार यांनी बँक कर्मचाऱ्यांचा अरेरावी करत असलेला मोबाइल व्हिडिओ भामरे यांना दाखविण्यात आला. हा व्हिडिओ पाहून भामरे यांनी यावर संताप व्यक्त करून चौकशीचे आदेश दिले. तसेच प्रवीणच्या भावाला सेंट्रल बँकेत नोकरी देण्यासाठी प्रयत्न करू असे पुन्हा आश्वासनच दिले. तसेच माझ्यातर्फे दोन लाख रुपयांची मदत देतो असे सांगितले. मुख्यमंत्री सहाय्यता निधितून मदत मिळवून देण्याचे पुन्हा आश्वासन दिले. यामुळे प्रत्यक्ष राज्यमंत्र्यांच्या भेटीत काहीतरी मदत मिळेल अशी आशा कुटुंबियांना होती. मात्र डॉ. भामरेंनी यांनी पुन्हा आश्वासनच दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.

चार दिवसानंतरही गुन्हा दाखल नाही

मयत प्रवीण यांनी आपल्या चिठ्ठीत संबंधित बँक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मला अग्निडाग देऊ नये असा उल्लेख केला होता. जायखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गूरव यांनी ४८ तासात संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात चार दिवस उलटूनही कोणावरच गुन्हा दाखल झालेला नाही.

नोकरी खिशात नसते

मयत प्रवीणच्या नातेवाईकांसह मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी डॉ. भामरे यांच्याकडे प्रवीणच्या नातेवाईकाला बँकेत नोकरी मिळवून द्यावी, अशी मागणी केली. त्यावेळी डॉ. भामरे यांनी संतापात,'नोकरी मी खिशात घेवून नाही फिरत', असे संतापजनक उत्तर दिल्याने उपस्थित नागरिकांसह नातवाईकांचा हिरमोड झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षणाशिवाय जीवनउत्कर्ष नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया असून शिक्षणाशिवाय जीवनाचा उत्कर्ष होत नाही, असे प्रतिपादन एअर इंडियाचे निवृत्त अधिकारी भीमराव बनसोडे यांनी केले. सुखदेव एज्युकेशन संस्थेचा २३ वा वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

बनसोडे म्हणाले की, कोणताही व्यक्ती त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थीच असतो. शिक्षण हा मनुष्याचा तिसरा डोळा असून त्याद्वारे आपल्याला प्रगतीची वाट गवसते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, जगात कोणाशीही वैर बाळगू नका. कोण कोणत्या वेळी मदतीला येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे कोणालाही कमी लेखू नका. व्यक्तिमत्व विकास हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुखदेव काळे, संस्थापक अध्यक्ष बाबुराव काळे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. संस्थेचे सरचिटणीस संजय काळे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात शाळेचे महत्त्व मनोगतातून स्पष्ट केले. तसेच सुखदेव एज्युकेशन संस्थेच्या विद्यालयात शिक्षण घेऊन जीवन जगतांना काय फायदा झाला याचा उल्लेख त्यांनी आपल्या मनोगतातून केला. पृथ्वीराज उडाण या विद्यार्थ्याने देशभक्तीपर गीत, ऋतुजा सबगर या विद्यार्थिनीने सत्यम शिवम सुंदरम हे गीत सादर केले. तर अरबाज खान या विद्यार्थ्याने नृत्याविष्कार सादर केला. विलास लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य बाबासाहेब खरोटे यांनी आभार मानले.

यावेळी सुखदेव एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्ष रत्‍नाबाई काळे, उपाध्यक्ष रंजय काळे, चिटणीस विजय काळे, मुख्याध्यापक नितीन पाटील, मुख्याध्यापक हिरामण बारावकर, शशांक हिरे, राजेंद्र म्हस्के, प्रवीण नेटावणे, चैताली नरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हृदयरोगाकडे होतेय दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हृदयरोगाची लक्षणे माहिती नसल्याने रुग्णांकडून हृदयरोगाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. जेव्हा जळजळ होत असते, अस्वस्थ वाटते किंवा जबड्याच्या खालील भागात वेदना होते, तेव्हाच हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. मात्र, अनेकदा साधी वेदना असेल असा रुग्णांचा समज होता. त्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढते. त्यानंतर रुग्ण डॉक्टरांकडे येतात. त्यामुळे हृदयरोगावर वेळीच मात करणे अशक्य होते, अशी खंत हृदयरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली.

शंकराचार्य न्यासातर्फे आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या हेतूने आरोग्यभान व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत शुक्रवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजता गंगापूर रोडवरील शंकाराचार्य कुर्तकोटी सभागृहात 'हृदयविकार' या विषयावर तज्ज्ञांची मुलाखत घेण्यात आली. या वेळी डॉ. मनोज चोपडा, डॉ. साकेत जुनागडे, डॉ. नितीन घैसास आणि डॉ. अभयसिंग वालिया उपस्थित होते. डॉ. सुधीर संकलेचा यांनी मुलाखत घेतली. हृदयरोगाची लक्षणे, निदान आणि उपचाराबद्दल उपस्थितांना तज्ज्ञांनी माहिती दिली. ते म्हणाले, की वय वाढायला लागले, की रक्तवाहिन्या आजारी होऊ लागतात. त्यामुळे हृदयरोगाचा धोका अधिक वाढतो. मधुमेह आणि रक्तदाबाचा आजार असेल तर हृदयविकार होऊ शकतो. तंबाखू, स्मोकिंग, गुटखा यांसारखे व्यसन करणाऱ्या व्यक्तींना हृदयविकार होण्याची शक्यता दाट असते. अॅसिडिटीमुळेही हृदयविकार होऊ शकतो. जळजळ होत असेल, नेहमीपेक्षा अधिक वेदना होत असतील तर ईसीजी करायला हवा. एखाद्याला हृदयविकार आल्यास दुसऱ्या व्यक्तीने त्या व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी दोन्ही हातांनी दाब द्यावा. अतिदक्षता विभाग असलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णास घेऊन जावे. हृदयविकार टाळण्यासाठी नेहमी व्यायाम, संतुलित आहार आणि तणावमुक्त जीवनशैली असायला हवी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाण, नांदगावला पूर्णवेळ तहसीलदार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील अनेक तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून, बागलाण आणि नांदगाव या दोन तालुक्यांना दीर्घकाळ केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर पूर्णवेळ तहसीलदार मिळाले आहेत. नाशिकच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांची संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे.

नाशिक विभागातील अनेक तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाने काढले आहेत. काही तहसीलदारांना जिल्ह्यातच, तर काहींना विभागातील अन्य जिल्ह्यांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. नांदगावच्या तहसीलदारपदी भारती सागरे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे कार्यरत होत्या. बागलाण तालुक्यातही तहसीलदारांची मागणी होत होती. प्रमोद हिले यांना येथे नियुक्ती देण्यात आली होती. ते नंदुरबार येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. येवल्याच्या तहसीलदारपदी रोहिदास वारुळे यांची नियुक्ती झाली आहे. येथील नरेश बहिरम यांची धुळ्यातील पिंपळनेर-साक्री येथे बदली करण्यात आली आहे. मंजूषा घाडगे यांची तहसीलदार महसूल प्रबोधिनी येथे नियुक्ती करण्यात आली आहे. देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार यांची विभागीय आयुक्त कार्यालयात आस्थापना विभागात बदली करण्यात आली असून, धुळ्याचे तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल प्रबोधिनीतील तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे नियुक्ती देण्यात आली आहे.

शहरात झालेल्या नियुक्त्या

नाशिकच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांची संजय गांधी योजनेच्या तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शिवकुमार आवळकंठे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी शुक्रवारीच पदभारही स्वीकारला. इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांची धान्य वितरण अधिकारीपदी बदली झाली असून, पारोळ्याच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्ताईनगरच्या तहसीलदार रचना पवार यांना नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृउबा’च्या राष्ट्रीय दर्जाने संचालकांत चलबिचल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

राज्यातील मुंबई, नागपूर, पुणेसह नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्य सरकारने राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यामुळे संचालकांच्या अधिकारांवर मर्यादा येण्याच्या शक्यतेमुळे त्यांच्यातील चलबिचल वाढली आहे. पण, या निर्णयाचा अध्यादेश अजून बाजार समितीस प्राप्त झालेला नाही. परिणामी राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभ्रमात पडले आहेत.

देशातील ज्या बाजार समित्यांमधील आवकेत परराज्यांतील शेतमालाची आवक ३० टक्क्यांहून अधिक आहे अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा दिला जातो. नाशिक बाजार समितीत परराज्यांतून येणाऱ्या शेतमालाचे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक असल्यामुळे या बाजार समितीचा समावेश त्यात करण्यात आला आहे. सरकारने राज्यातील काही बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याच्या निर्णय घेतल्याने बाजार समितीतील संचालक मंडळाचे वर्चस्व कमी होणार आहे. बाजार समित्यांवर नियंत्रण राहावे यासाठी जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली बाजार समितीचे व्यवहार होतील. बाजार समितीचे सर्वतोपरी निर्णय हे शासन नियुक्त अधिकाऱ्यांचे राहतील. शासनाचा हा निर्णय म्हणजे ठराविक पक्षाच्या लोकांच्या ताब्यात बाजार समित्या असल्याने त्यांचे खच्चीकरण करण्याचे असल्याची दबकी चर्चा होत आहे. बाजार समितीतील तृटी दूर करण्यासाठी कायद्यात सुधारणा जरूर करावी. मात्र, त्यासाठी बाजार समितीच्या घटकांशी चर्चा करणे गरजेचे होते, असेही काही संचालकांचे म्हणणे आहे.

ठराविकच बाजार समित्यांना अशा प्रकारचा राष्ट्रीय दर्जा देण्यात येत आहे. या दर्जाविषयी बाजार समितीच्या संचालकांशी चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा निर्णय नेमका कसा आहे, याविषयी बाजार समितीत संभ्रम आहे.

-शिवाजी चुंभळे, सभापती, नाशिक बाजार समिती

--

सरकारने बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय घेतला असला, तरी अजून बाजार समितीस त्यासंदर्भाचा 'जीआर' आलेला नाही. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीदेखील वेळ लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

-चंद्रकांत निकम, संचालक, बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वाधिक वाचलेली बातमी

$
0
0

सर्वाधिक वाचलेली बातमी :

सहाव्या दिवशी दोन सुवर्ण

आशियाई क्रीडा स्पर्धेचा सहावा दिवस भारतासाठी 'सोनियाचा' ठरला. भारताने एका दिवसात दोन सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्यपदकांसह सात पदके जिंकली.

मटा अॅप डाउनलोड करा

app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या

1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चेतील बातमी-

$
0
0

सर्वाधिक शेअर झालेली बातमी:

चहाला ४० हजार रुपये किलो!

अरुणाचल प्रदेशमधील 'गोल्डन नीडल्स टी' या चहाला तब्बल ४० हजार प्रतिकिलोचा भाव मिळाला आहे.

मटा अॅप डाउनलोड करा

app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या

1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तूच्या यशाने तळेगाव रोहीत जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/मनमाड

दत्तू भोकनळला नौकानयन प्रकारात मिळालेल्या यशामुळे चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील ग्रामस्थांनी जल्लोष करीत आनंद व्यक्त केला.

भारतीय लष्करातील जवान रोईंग पटू दत्तू भोकनळने पुन्हा एकदा सुवर्णपदकाला गवसणी घातली. मेन्स क्वारडरपल या प्रकारात त्याच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले आहे. ही बातमी सकाळी गावात समजताच त्याच्या पाठचा भाऊ गोकुळ व लहान भाऊ युवराजने गावातील मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गावातील लोकांना बातमी समजल्यावर सगळ्यांनी एकच जल्लोष केला. गावातील लोक सकाळी शेतावर गेल्याने त्याच्यापर्यंत बातमी पोहचण्यास दुपार झाली होती. त्यानंतर साखर वाटून सर्वांनी आनंद व्यक्त केला. दत्तुच्या संघात सवार्ण सिंग, ओमप्रकाश आणि सुखमित सिंग या चौघांचा समावेश होता. दत्तू गावातून स्पर्धेसाठी रवाना झाल्यानंतर तेथील शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील देवाकडे प्रार्थना केली होती. त्याच प्रमाणे गावातील त्याचे शिक्षक देखील त्याच्या यशाकडे लक्ष लावून होते. कुपवाडा येथे असलेला दत्तूचा चुलतभाऊ रवी भोकनळला ही बातमी समजताच त्यानेही आपल्या सहकाऱ्यांना सांगत आनंदोत्सव साजरा केला.

…..

दत्तूने सुवर्णपदक मिळवून आमचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. आम्ही भरून पावलो. शब्दात व्यक्त होता येत नाही.--

रामभाऊ भोकनळ, दत्तूचे आजोबा

…..

इंडोनेशिया येथील स्पर्धेत पदक मिळावे यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करीत होतो. खेळाची प्रॅक्टीस करीत असताना आमच्याकडेही त्याचे कायम लक्ष असायचे. त्याने आई वडिलांच्या प्रेमाची उणीव भासू दिली नाही--गोकुळ भोकनळ, दत्तूचा भाऊ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डर फसवणुकीची भद्रकालीतही तक्रार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खोट्या नावानिशी कामाला लागून बिल्डरांची फसवणूक करणाऱ्या रतेश विश्राम कर्डक उर्फ धीरज मदनराव मत्सागर भामट्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या संशयितास भद्रकाली पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली असून, कोर्टाने त्यास २५ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी माजी नगरसेविका सुजाता डेरे यांचे पती बन्सी किरण डेरे (रा. शिवतेजनगर, तिडके कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. कर्डकने २१ ते २२ मे २०१८ या कालावधीत डेरे यांचा जनकल्याण को. ऑप. बँकेचा धनादेश चोरी केला होता. यानंतर बनावट स्वाक्षरी करून त्याने चार हजार रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली.

याबाबत भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी सांगितले की, मत्सागरविरुद्ध भद्रकालीसह अंबड, गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत. चौकशी दरम्यान आणखी काही प्रकार समोर येण्याची शक्यता आहे. संशयित आरोपी बनावट नावाने बिल्डर आणि डेव्हलपरकडे कामाला जायचा. मालकाचा विश्वास बसला की नकळत मालकाचा धनादेश चोरी करून बँकेतून परस्पर पैसे काढायचा. काही दिवसांपूर्वी संशयिताने शरणपूररोडवरील कुलकर्णी गार्डनसमोर राहणाऱ्या संजीव नवाल यांची अशाच प्रकार फसवणूक केली होती.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल गिरी यांनी सुरू केला. ज्या बँकेतून पैसे काढण्यात आले, त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून आम्ही समज दिली. तसेच असा प्रकार पुन्हा घडणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार बँकेच्या अधिकाऱ्यांनी इतर शाखा व्यवस्थापकांना माहिती दिली. सुदैवाने काही दिवसात ठाणे येथील नौपाडा येथील बँकेत संशयित पोहचला. तेथे तो पैसे काढण्याच्या तयारीत असताना बँक व्यवस्थापकाने ही माहिती भद्रकाली पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी कर्डकला नौपाडा येथे पोहचून अटक केली. याच गुन्ह्यात पोलिस चौकशी करीत असताना डेरे यांची तक्रार समोर आली. पंचवटीत राहणाऱ्या कर्डकचे कुटुंब तसे सुस्थितीत असून, त्याने फुकटच्या पैशांच्या मोहातून एकापाठोपाठ एक अनेक गुन्हे केल्याचे पीआय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

व्यावसायिकांनी काळजी घ्यावी

कर्डकने शहरातील बऱ्याच बिल्डर्सकडे नोकरी केली. त्याने कोठेही आपले खरे नाव सांगितले नाही. त्यामुळे धनादेशाद्वारे पैसे काढून तो पसारा व्हायचा. सुदैवाने तो पोलिसांच्या हाती लागला. शहरातील व्यावसायिकांनी यातील गांभीर्य ओळखून नवीन कर्मचाऱ्याची नियुक्ती करताना संबंधितांकडून ओळखपत्र तसेच रहिवाशी पुरावा याबाबत कागदपत्रे घ्यावीत, असे आवाहन पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेला बाजू मांडण्याचे आदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील मोकळ्या भूखंडावरील ७१ धार्मिक स्थळावरील महापालिकेच्या कारवाईविरोधात विश्वस्तांनी शुक्रवारी हायकोर्टात याचिका दाखल केली असून, कोर्टाने महापालिकेला येत्या सोमवारी (दि. २७) आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सोमवारी सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेने चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून ही कारवाई सुरू केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामळे या धार्मिक स्थळांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडूनही दोन याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत.

महापालिकेने शहरातील मोकळ्या भूखंडांवरील ७१ धार्मिक स्थळे, तसेच सन २००९ पूर्वीची शिल्लक ५७४ धार्मिक स्थळे अनधिकृत ठरवित त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. पालिकेने पहिल्या टप्प्यात ७१ धार्मिक स्थळे काढण्याची प्रक्रिया सुरू केली असून, विश्वस्तांना नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, विश्वस्तांनी या कारवाईला विरोध केला आहे. आमदार देवयानी फरांदे आणि सभागृहनेते दिनकर पाटील यांनी विश्वस्तांची बैठक घेऊन हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विनोद थोरात सदरचे सर्वेक्षणच चुकीच्या पद्धतीने केल्याचा दावा त्यांनी केला आहे. शुक्रवारी न्या. गवई व कर्णिक यांच्या पीठाने ही याचिका दाखल करून घेतली असून, महापालिकेला २७ तारखेला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार याचिकाकर्त्यांचे वकील नवीन चौमल यांनी यासंदर्भात महापालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठविले आहे. तसेच बाजू मांडण्यासाठी सोमवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे ही धार्मिक स्थळे वाचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेची कारवाईच चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेकडून या याचिकेवर उत्तर देण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

सेनेच्या दोन याचिका दाखल

शिवसेनेच्या वतीनेही उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व नगरसेवक दिलीप दातीर यांनी दिली. अंबड येथील तुळजाभवानी मंदिर आणि म्हसरुळ येथील कालिका माता मित्र मंडळाचे साईबाबा मंदिर अशा दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरही सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. मोकळ्या भूखंडांवरील ७१ धार्मिक स्थळांसह सन २००९ पूर्वीच्या अनधिकृत ठरलेल्या धार्मिक स्थळांनाही दिलासा मिळावा अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे.

'रामायण'वर आज बैठक

येत्या सोमवारी या धार्मिक स्थळांबाबत उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावर दिशा ठरविण्यासाठी शनिवारी महापौरांच्या उपस्थितीत 'रामायण'वर विश्वस्तांची बैठक होणार आहे. या बैठकीला हायकोर्टाचे वकील अॅड. प्रवर्तक पाठक व विजय चौमल मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सभागृहनेते दिनकर पाटील यांनी दिली. बैठकीला शहरातील धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. या बैठकीत उच्च न्यायालयात काय बाजू मांडायची, याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिरजकर’विरुद्ध एक कोटींचा गुन्हा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मिरजकर व त्रिशा जेम्स सराफ फसवणुकीच्या गुन्ह्यात एका महिलेची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

रक्‍कम वा सोन्याच्या गुंतवणुकीवर दीड टक्‍का व्याजाने परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये यापूर्वीच गुन्हा दाखल असून, त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत ७२५ तक्रारदार समोर आले असून, गुंतवणूकदारांची २३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. एक कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी स्मिता मधुकर बच्छाव ऊर्फ स्मिता वडेरा (४५, वडेरा बंगला, सिरीन मेडोज, गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. मिरजकर व त्रिशा जेम्स सराफी पेढीचे संचालक हर्षल प्रकाश नाईक, महेश मधुकर मिरजकर व अनिल रखमाजी चौघुले यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, बच्छाव यांनी सुवर्ण योजनेमध्ये भाग घेऊन तब्बल एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

बच्छाव यांनी ८ मे २०१७ ते १९ जून २०१८ दरम्यान गुंतवणूक केली. मात्र, जून महिन्याचा ८० हजार रुपयांचा परतावा संशयितांनी दिला नाही. त्यामुळे बच्छाव यांची एक कोटी ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न होत असून त्यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरुद्ध काही दिवसांपूर्वी तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या चौकशीवरूनवरील संशयितांविरुद्ध गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितासह अन्य व्यक्तीविरुद्ध यापूर्वीच सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहेत. त्यामुळे बच्छाव यांच्या तक्रारीनुसार दाखल गुन्हा सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग केला जाणार आहे. मिरजकर फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत सात जणांना अटक केली असून, ७२५ गुंतवणूकदारांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. या प्रकरणात गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याबरोबरच फसवणुकीच्या रकमेचा आकडाही दिवसेदिवस वाढतो आहे.

संशयितांच्या कोठडीत वाढ

फसवणुकीच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या भरत सोनवणे, वृशाल नगरकर आणि विजयदीप पवार या तिघांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाच्या युक्तीवादानंतर कोर्टाने तिघांच्या कोठडीत सोमवार, तीन सप्टेंबरपर्यंत वाढ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर रस्त्यावर उतरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मांजरपाड्याचे पाणी २०१९ पर्यंत न मिळाल्यास किमान १० हजार नागरिकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला दिला आहे.

राजकीय द्वेषापोटीच आपण जिल्ह्यात आणलेले बोट क्लबसारखे प्रकल्प कार्यान्वित केले जात नसून, त्यामुळे सरकारचाच निधी वाया जात असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी भुजबळ यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेऊन येवल्यासह जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्यासह जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

मांजरपाडा-देवरगाव कालव्याच्या ३५० मीटरचे काम, छोट्या-मोठ्या पुलांच्या कामासह विस्तारीकरण, अस्तारीकरणाची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशी मागणी भुजबळ यांनी केली. ही कामे चालू वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होतील अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिली. परंतु, तसे झाले नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला. याखेरीज जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील टँकर सुरूच ठेवावेत, येवला तालुक्यातील काही गावांमध्ये बंद केलेली बससेवा पूर्ववत सुरू करावी, कोटमगाव व मुक्तिभूमीचा ब वर्ग पर्यटन क्षेत्रात समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, राजापूर, पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच तालुक्यातील पाच शाळांना मुख्याध्यापक नसून, आवश्यक मनुष्यबळ पुरवावे आदी मागण्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या सद्यस्थितीचा आढावाही भुजबळ यांनी घेतला. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. पीककर्जावाचून शेतकरी आत्महत्या होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करतानाच त्यांनी विजेचे प्रश्न, पीक कर्ज, वनहक्क जमिनी, पर्यटनाची अपूर्ण कामे, रखडलेले सिंचनाचे प्रकल्प याचा आढावाही यावेळी घेण्यात आला. जिल्ह्यात विजेचा गंभीर प्रश्न असून, दोन-दोन महिने शेतकऱ्यांना ट्रान्स्फॉर्मर मिळत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

प्रसंगी नियम बाजूला ठेवा!

जिल्ह्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा बळी जात आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत रोजच वर्तमानपत्रांत बातम्या येत आहेत, तरीही रस्त्यांची कामे हाती घेतली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ही कामे आमच्या अख्त्यारीतील नाहीत, असे सांगत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे बोट दाखविले. त्यामुळे भुजबळ संतप्त झाले. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यामुळे मला नियम सांगू नका. जेथे नागरिकांच्या जिवावर बेतते अशा ठिकाणी नियम बाजूला ठेवून जनतेसाठी काम करा, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.

४८ बोटी गेल्या कुठे?

नाशिक शहरातील कलाग्राम, बोट क्लब, ग्रेप पार्क रिसोर्ट, साहसी क्रीडा संकुलाच्या सद्यस्थितीचाही त्यांनी आढावा घेतला. बोट क्लबसाठी अमेरिकेतून मागविलेल्या ४८ बोटी कुठे गेल्या, असा सवाल करतानाच बोटी चोरीला गेल्या असतील तर गुन्हे दाखल करा, अशा शब्दांत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यामुळे अधिकारी निरुत्तर झाल्याचे पाहावयास मिळाले.

पालकमंत्री संकटमोचक, केसरकर हुशार

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे सरकार आणि मुख्यमंत्र्यांचेही संकटमोचक आहेत. राज्य सरकारतर्फे ते केरळमध्ये चांगले काम करीत आहेत. परंतु, नाशिकमधील अडचणींची सीता बंदिस्त झाली असून, तिला सोडविण्याची आवश्यकता असल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. दाभोलकर-पानसरे हत्येच्या घटनेत सनातनचा हात नसल्याच्या राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. केसरकर हे हुशार असून, त्यांचा माझ्यापेक्षा अधिक अभ्यास असल्याचा टोमणा त्यांनी मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त मुंढेंविरोधात अविश्वास ठराव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वाढीव दराने घरपट्टीची देयके वितरित करण्याचे आदेश दिल्याने नगरसेवकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय सत्तारूढ भाजपने घेतला असून, शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी उशिरापर्यंत महापौर निवासस्थान रामायण येथे सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. बैठकीत स्थायी समिती सदस्यांना पाचारण करीत अविश्वास ठरावासाठी विशेष महासभा बोलविण्याकरिता स्वाक्षरीपत्र तातडीने लिहून घेण्यात आल्याचे समजते. पुढील आठवड्यात ही विशेष महासभा बोलावली जाणार असून, त्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांचीही संमती घेण्यात आल्याचे समजते.

अविश्वास ठरावावर स्थायी समितीचे दहा सदस्य, तसेच ५० पेक्षा अधिक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत सर्व पक्षांच्या गटनेत्यांना पाचारण करून स्वाक्षरी मोहीम राबवली जात होती. भाजप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक शुक्रवारी उशिरा झाली. नवी मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येही मुंढे यांच्याविरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ३६/३ अन्वये अविश्वास आणण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सभागृहनेते दिनकर पाटील, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, मनसे गटनेते सलीम शेख, कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे आदी उपस्थित होते. आमदार देवयानी फरांदे यादेखील उशिराने बैठकीस उपस्थित राहिल्या. अविश्वास प्रस्तावाकरिता विशेष महासभेचे आयोजन आवश्यक असल्याने कायद्यातील तरतुदींनुसार स्थायी समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र महापौरांच्या नावे तत्काळ लिहून घेण्यात आले. यासाठी स्थायी समिती सदस्य उद्धव निमसे, दिनकर पाटील, प्रवीण तिदमे, सुषमा पगार, पुष्पा आव्हाड, संतोष साळवे, संगीता जाधव यांना पत्रावर स्वाक्षरीसाठी महापौर बंगल्यावर पाचारण करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो कॅप्शन - मान्सून स्कूटर रॅली

$
0
0

फोटो - पंकज चांडोले

फोटो कॅप्शन

मॉन्सून स्कूटर रॅलीचा थरार...

स्पोर्टक्राफ्ट आयोजित जे. के. टायर्स २९ वी मॉन्सून स्कूटर रॅलीचा थरार शनिवारी रंगला. पावसाच्या बरसणाऱ्या रिमझिम धारा, प्रचंड चिखल अन् त्यातून सुसाट वेगाने जाणारी स्कूटर असा थरार रॅलीत बघायला मिळाला. मुंबई पाठोपाठ नाशिकमध्ये प्रथमच या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीसाठी १५ किलोमीटरचा मार्ग होता. मुंबईसह नाशिक, पुणे, कोल्हापूर, भोपाळ, इंदूर व इतर शहरातील स्पोर्ट स्कूटर रायडर्सनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images