Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चर्चा बातमी

$
0
0

सर्वाधिक शेअर झालेली बातमी

शेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला

मोहरमच्या सुट्टीनंतर आज सकाळी शेअर बाजार तेजीतच सुरू झाला. त्यामुळे सेन्सेक्स उसळी घेईल असे वाटत असतानाच दुपारी सेन्सेक्समध्ये दीड हजार अंकांनी घसरण झाली तर निफ्टीतही ३५० अंकाची घसरण झाली आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जळगाव गणेशदर्शन

$
0
0

युवाशक्ती गणेशमंडळ

सच्चीदानंद गणेशमंडळ

स्वामी समर्थ मित्रमंडळ

अष्टविनायम मित्रमंडळ सिंधी कॉलनी

युवा मारुती पेठ बहुउद्देशी संस्था

विश्वजीत मित्रमंडळ मारूतीपेठ

गौरव गणेश मित्रमंडळ, जुनेगाव

साईलीला गणेश मित्रमंडळ

सिद्धार्थ नगर गणेश मित्रमंडळ

त्रिमूर्ती गणेश मित्रमंडळ

रामभैय्या मित्रमंडळ बळीराम पेठ

हाऊसिंग सोसायटी गणेशमित्रमंडळाचा बेटी बचाव देखावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोध कुष्ठरोग्णांचा

$
0
0

जिल्हाभरात ४९२ रुग्ण; आठ लाख घरांचे सर्वेक्षण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रातील कुष्ठरोगाबाबत समस्याग्रस्त भागात २४ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या काळात कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कुष्ठरोगाचे ४९२ रुग्ण आढळले असून त्यावर उपचार सुरू असून त्यात प्रगती असल्याची माहिती कुष्ठरोग आरोग्य सेवाचे सहाय्यक संचालक डॉ. पी. एम. पडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्यधिकारी डॉ. विजय डेकाटे उपस्थित होते.

कुष्ठरोग शोध अभियानासाठी जिल्ह्यातील ४३ लाख ३५ हजार ३४३ नागरिकांची शारिरीक तपासणी केली जाणार असून त्यासाठी ८ लाख ६६ हजार ९५१ घरांना आरोग्य सेवक भेटी देणार आहे. ग्रामीण भागात ३ हजार ३०४ टीम व शहरी भागात ३५६ टीम असे एकूण ३ हजार ६६० टीम मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पर्यवेक्षणासाठी ७३३ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आल्याचेही डॉ. पडवी यांनी सांगितले.

अभियानाची अधिक माहिती देतांना डॉ. पडवी यांनी सांगितले, की केंद्र सरकारतर्फे कुष्ठरोग शोध अभियान देशभर घेण्यात आले आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश समाजातील लपून राहिलेले कुष्ठरोग लवकरात लवकर व विना विकृती शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराअंतर्गत आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून औषधोपचारांतर्गत आणून संसर्गाची साखळी खंडित करून रोगाचा होणारा प्रसार कमी करणे, कुष्ठरोगाचे दुरीकरण ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणे असा आहे.

आशा स्वयंसेवकमार्फत सर्वेक्षण

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रातील कुष्ठरोगाबाबत समस्याग्रस्त भागात राबविण्यात येणार असून त्या भागातील सर्व घरांचे प्रशिक्षित आशा व स्थानिक पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच मार्गदर्शक सुचनांनुसार घरातील सर्व सभासदाची (दोन वर्षांखालील बालके वगळून) शारिरीक तपासणी करण्यात येणार असून यामध्ये स्त्रियांची तपासणी 'आशा'मार्फत व पुरुषांची तपासणी पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत केली जाईल.

तरीही रुग्ण आढळतातच

कुष्ठरोग निर्मूलन २००५ मध्ये झाले असले तरी काही रुग्ण अजूनही आढळत आहेत. त्याचा आजार संपूर्ण बरा करण्यासाठी हे अभियान असून १० हजार लोकसंख्येमध्ये १ रुग्ण आढळतो असेही यावेळी सांगण्यात आले. पूर्वीसारखे कुष्ठोरोगाच्या रुग्णांमध्ये हात पायला होणारी सूज व इतर गोष्टी आता कमी आहे. पण, या रुग्णांध्ये विकृतीचे लक्षण आढळते.

अशी आहे आकडेवारी

वर्ष..............कुपोषित व्यक्ती

२०१६-१७.........३१४

२०१७-१८.........२६४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागाईच्या फेऱ्यात मिठाई!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परराज्यातून येणाऱ्या खव्याचे प्रमाण कमी झाल्याने मिठाईच्या दरात पाच ते दहा टक्के वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत वाढ झाल्याने नागरिकांना आखडता हात घ्यावा लागतो आहे.

शहरातील बहुतांश मिठाईच्या दुकानांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या भागातून खवा येतो. अनेक व्यापारी या भागातून आयात केलेल्या खव्यावर प्रक्रिया करून त्याचीच मिठाई तयार करतात. महाराष्ट्रात खवा तयार करण्याच्या कारखान्यांवर अन्न औषध प्रशासनाचे अनेक निर्बंध असल्याने उत्पादन किंमत महाग जाते. त्या तुलनेत बाहेरील राज्यातून येणारा खवा स्वस्तात मिळतो. त्यामुळे अनेक व्यापारी या खव्यावरच आपली उत्पादने तयार करतात. मात्र, बाहेरील राज्यांमध्येही अन्न औषध प्रशासनाने नियम कडक केल्याने तेथील उत्पादनांवरही परिणाम होतो आहे. त्यामुळे पूर्वी ज्या प्रमाणात खवा येत होता त्या प्रमाणात तो आता येत नाही. त्यामुळे किमतीत वाढ झाली आहे. याचा फटका नाशिकमधील मिठाईच्या दुकानांनाही बसला आहे. शहरातील बोटावर मोजण्याइतके विक्रेते स्वत: खवा बनवतात. अन्य विक्रेते हे या भागातून येणाऱ्या खव्यावर अवलंबून होते. हीच संधी साधून शहरातील मिठाई विक्रेत्यांनीही मिठाईच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी पेढ्याचे मोदक घेण्याऐवजी घरगुती तळलेले मोदक खरेदी करणेच पसंत केले आहे. मिठाईमध्ये कच्चा पेढा, पक्का पेढा, मलई पेढा, पेढा मोदक, सोनपापडी, गुलाबजाम, सुका गुलाबजाम, काजुकतली, मलई बर्फी, ऑरेंज बर्फी अशा सर्व प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये वाढ झाली आहे. ही दरवाढ कमी झाल्याचे आजवर ऐकिवात नाही. त्यामुळे हे दर असेच चढे राहतील, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या दरवाढीचा फटका विक्रेत्यांना नवरात्र, दसरा, दिवाळी यात जास्त बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक कंपन्या काही वर्षांपासून दिवाळीत मिठाईऐवजी ड्रायफ्रूट खरेदी करीत आहेत.

मिठाईचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी वाढले आहेत. दुधाचे दर स्थिर आहेत. गॅसचे दर आणि साखरेचे दर वाढल्यामुळे काही पदार्थांमध्ये पाच टक्के, तर काही पदार्थांमध्ये १० टक्के वाढ झाली आहे.

- सुभाष शिंदे, मिठाई विक्रेते

मिठाईचे प्रतिकिलो दर

पेढे : ३००-४०० रुपये

मावा बर्फी : ३५०-४५० रुपये

खवा : २००-२५० रुपये

सोनपापडी : १००-५०० रुपये

गुलाबजाम : ३००-४५० रुपये

काजूकतली : ६००-८०० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पार्क केलेल्या वाहनांचा काचा फोडून आतील मौल्यवान वस्तू चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. नुकत्याच वेगवेगळ्या तीन ठिकाणी पार्क केलेल्या चार वाहनांच्या खिडकीच्या काचा फोडून चोरट्यांनी सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सरकारवाडा, मुंबई नाका आणि इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इंदिरानगर येथील अर्जुन शिवराम भालसिंग हे बुधवारी कॉलेजरोड भागात गेले होते. बिग बाजार परिसरातील निवेदिता मॅटर्निटी होम येथे पार्क केलेल्या त्यांच्या व्हॅगन आर कारची (एमएच १५ जीअ‍े ३९५२) काच फोडून चोरट्यांनी गाडीतील सिटवर ठेवलेली बॅग पळवून नेली. बॅगेत मंगळसूत्र, वाहनाचे कागदपत्र आणि दोन हजार रुपयांची रोकड असा सुमारे ३२ हजारांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास हवालदार राठोड करीत आहेत.

दुसरी घटना त्र्यंबकरोडवरील गोल्फ क्लब भागात घडली. सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अविनाश शिवाजी खैरनार बुधवारी (दि. १९) सायंकाळी गोल्फ क्लब मैदानावर गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बसस्टॉप परिसरात पार्क केलेल्या त्यांच्या बलेनो कारची (एमएच १५ जीएफ ४७९०) काच फोडून कारमधून लॅपटॉप चोरून नेला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनोने करीत आहेत.

सावरकरनगर येथील जयंत जनार्दन पगारे व त्यांचे सहकारी चारुदत्त भटू वाघ बुधवारी (दि. १९) राजीवनगर येथील ग्रॅड रिओ हॉटेल येथे गेले होते. लेखानगर ते कलानगर दरम्यानच्या वेदांत मंगल कार्यालयाजवळ दोघांच्या ताब्यातील कंपनीच्या बोलेरो (एमएच ४६ एक्स ७७१८) आणि (एमएच १५ सीटी ७९२९) पार्क केल्या असता अज्ञात चोरट्यांनी दोन्ही वाहानांची काच फोडून दोन लॅपटॉप, दोन वायफाय डिव्हाईस तसेच आयफोन असा सुमारे ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार राणे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पांच्या निरोपासाठी सज्जता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरात रविवारी (दि. २३) निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन सज्ज झाले असून, या सज्जतेची प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी पाहणी केली.

महापालिकेच्या बांधकाम विभाग व आरोग्य विभागाच्या वतीने विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली असून, महापालिकेतर्फे सिडको, इंदिरानगर व पाथर्डी परिसरात इंदिरानगर येथे डे केअर विद्यालय, गोविंदनगरातील जिजाऊ वाचनालय, राजे संभाजी स्टेडियम, अश्विननगर, पवननगर येथील जलकुंभ व पिंपळगाव खांब येथील वालदेवी घाट या नऊ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेश विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांनी प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. विभागीय अधिकारी डॉ. कुमावत, बांधकाम विभागाचे नाना जगताप, आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे आदींसह त्यांनी वालदेवी नदीवरील गणेश घाट, संभाजी क्रीडा संकुल, डे केअर विद्यालय, इंदिरानगर, जिजाऊ वाचनालय, गोविंदनगर, पवननगर जलकुंभ, कामटवाडे विद्यालय आदी ठिकाणी करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची पाहणी केली. यावेली त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचनादेखील केल्या.

--

अधिकारी, कर्मचारी नियुक्त

विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाचे अभियंता नरसिंगे यांच्या नेतृत्वाखाली एक सहाय्यक अभियंता, तीन कनिष्ठ अभियंते, एक शाखा अभियंता, एक मुख्य मिस्तरी, चार मिस्तरी, तीन रोड मुकादम, तीन बिगारी, ३१ कर्मचारी, सात डंपर, सात ट्रॅक्टरची सज्जता करण्यात आली आहे. सध्या पाऊस सुरू नसल्याने बांधकाम विभागाला फारसे परिश्रम घ्यावे लागलेले नाहीत. पाऊस नसल्याने रस्त्यांची देखभाल व डागडुजी करण्याचीही आवश्यकता भासली नाही. मात्र, तरीदेखील यावर्षी प्रशासकीय तरतुदीआभावी गणेश मंडळांनी मागणी करूनही त्यांना खडी, कच, मुरूम देण्यात आला नव्हता.

--

गणेशभक्तांनी नदीपात्रात गणेश मूर्तींचे विसर्जन न करता कृत्रिम तलावांचा वापर करावा. महापालिकेकडून अमोनियम बायकार्बोनेटची पावडर विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे, त्याचाही वापर करावा.

-हर्षा बडगुजर, प्रभाग सभापती, सिडको

--

देवळालीत पोलिसांचे संचलन (फोटो)

देवळाली कॅम्प : येथील गणपती विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देवळाली कॅम्प पोलिस व दंगल निवारण पथक यांनी शहरातून सशस्त्र संचलन केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संपत लोंढे, उपनिरीक्षक रघुनाथ नरोटे यांच्यासह पोलिस ठाण्यातील कर्मचारी व दंगल निवारण पथकातील जवानांनी येथील जुन्या बसस्थानकापासून शहर परिसरातील मेन स्ट्रीट, हौसनरोड, वडनेररोड आदी भागातून सशस्त्र संचलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिदास नव्हे कलाउदास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत नुतनीकरण करण्यात आलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या प्रस्तावित दरवाढीविरोधातील कलावंतांच्या लढाईला अपयश आले आहे. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपने प्रस्तावीत भाडेवाढीबाबत अल्पसा दिलासा देत, कलावंतांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला. स्थायी समितीने जुन्या दरांमध्ये दुप्पट ते चारपट वाढ केली असून, नवे दर सरासरी साडेचार हजार ते २९ हजारांपर्यंत आहेत. शिवसेनेने या दरवाढीला विरोध केला असतानाही, भाजपने बहुमताच्या जोरावर या दरवाढीला मंजुरी देऊन कलावंतांची निराशाच केली आहे. महात्मा फुले कलादालनाचे भरमसाठ वाढीव दरही मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या भाडेवाढीवरून सत्ताधारी विरुद्ध भाजप असा संघर्ष उभा राहणार आहे.

शहरातील सांस्कृतिक व नाट्य चळवळीचे केंद्र असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीचा वाद गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत या कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्यावर तब्बल १२ कोटी १३ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे या कलामंदिराचे दर बदलण्यात आले असून, त्यावरून कलाप्रेमी आणि प्रशासनात संघर्ष सुरू झाला आहे. प्रशासनाने सहा हजार ते ३९ हजारांपर्यंत कालिदासचे भाडे प्रस्तावित केले होते. त्यावरून कलावंतांनी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले होते. परंतु, पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी हस्तक्षेप करीत, कलावंतांसोबत आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घडवून आणली होती. त्यावेळी दिलासा दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावाला शिवसेनेच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला. भाडेवाढीचा प्रस्ताव हा साहित्य व कलेवर घाला घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप समीर कांबळे यांनी केला असून, प्रत्येक गोष्टीत मनपा नफा शोधणार का असा सवाल केला. या प्रस्तावाचा त्यांनी निषेध केला. महापालिका उत्पन्न कमवायचे साधन आहे, का असा सवाल संतोष साळवे यांनी केला. कालिदासचे दर वाढले तर नाट्यप्रेमी या नाट्यगृहाकडे पाठ फिरवतील अशी भीती संगीता जाधव यांनी व्यक्त केली. हा कलेला मारण्याचा प्रकार असून, महापालिका खासगी कंपनी आहे का असा सवाल उपस्थित केला. दिनकर पाटील यांनी दरवर्षी ५ टक्के दरवाढीला विरोध करीत, प्रशासनाच्या प्रस्तावातून काही वाढ कमी करण्याचा पक्षाचा आदेश फर्मावला. मिळकत उपायुक्त सुहास शिंदे यांनी १७ वर्षांपासून दरात वाढी झाली नसल्याचे सांगत सदरील दर हे देखभाल दुरुस्तीसाठी वाढवल्याचा दावा केला. त्यामुळे सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाचा विचार करीत, दरांमध्ये अल्पसा दिलासा देण्याचा निर्णय जाहीर केला. पूर्वी कालिदासचे दर हे ३ हजार ते ६ हजारांपर्यंत सरासरी होते, ते आता साडेचार हजार ते २९ हजारांपर्यंत वाढविण्यात आले आहेत.

ऑनलाइन बुकिंग

नाट्यगृहाचे बुकिंग काही ठराविक व्यावसायिकांच्या हातात यापूर्वी होते. त्यामुळे नव्या प्रस्तावात यात बदल करण्यात आले असून, ऑनलाइन बुकिंग होणार आहे. त्यामुळे एकत्र बुकिंग घेऊन मक्तेदारी निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांना मोठी चपराक बसणार आहे. नव्या दरामुळे तिकिटाच्या दरातही फारसा फरक पडणार नसल्याचा दावा मुंढे यांनी यावेळी केला.

एका शोसाठी ३९ हजार खर्च

नूतनीकरणात या नाट्यगृहात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचा दावा आयुक्त मुंढे यांनी यावेळी केला. भाडेवाढ केली नाही तर सध्याच्या सिस्टिम्स जास्त टिकणार नाहीत. नव्या खर्चानुसार एका शोसाठी ३९ हजार रुपये खर्च येणार आहे. परंतु, मनपा सेवा देणारी संस्था आहे. त्यामुळे दर परडवतील असे ठेवले आहे. वास्तवता दुर्लक्षित करू नका, असे त्यांनी यावेळी सुनावले. आयुक्तांनी भाडेवाढीचे समर्थन करताना, अतिशयोक्तीपूर्ण विधानेही यावेळी केली. कालिदासचे नियमित बुकिंग करणाऱ्यांनी आपली भेट घेऊन आपण कसे कालिदासचे शो विकायचो, याची माहिती काही कलावंतांनी दिल्याचा दावा केला. महापालिकेकडून एक शो पाच हजार रुपयांमध्ये विकत घेऊन काही लोक हा शो १५ ते २० हजारांपर्यंत विकायचे, असा दावा त्यांनी यावेळी केला.

कलावंत आज स्पष्ट करणार भूमिका

कालिदास कलामंदिर भाडेवाढप्रश्नी कलांवंतांनी मौन बाळगले असून, या सर्व दरांचा अभ्यास करून मगच प्रतिक्रिया देणार असल्याचा पवित्रा कलाकारांच्या वतीने घेण्यात आला आहे. स्थायी समितीने केलेली दरवाढ ही अजिबात दिलासादायक नसून, त्यात काही तोडगा काढता येतो का, याबाबत आज आपली भूमिका मांडणार असल्याचे कलाकारांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा वसतिगृहाचा ठेका मेडीआर्टकडे

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

मेरी वसाहत येथील मराठा वसतिगृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मेडीआर्ट या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बुधवारी काढण्यात आलेल्या सोडतीत मेडीआर्टला हा ठेका मिळाला. वसतिगृहाचे व्यवस्थापन पाहण्यासाठी संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. जिल्हा प्रशासनाला आठ निविदा प्राप्त झाल्या. त्यामध्ये पिंपळगाव बसवंत येथील स्व. रामगोपालजी कस्तूरचंदजी बूब बहुउद्देशीय संस्था, नाशिकरोड येथील छत्रपती फाउंडेशनसह पदमतारा सामाजिक शैक्षणिक संस्था सावळीरामनगर ओढा रोड, जागृती सामाजिक शैक्षणिक संस्था उपनगर, निफाड येथील मातोश्री जसोदाबाई सोनी विकास व सेवा केंद्र, जय जनार्दन सेवा संस्था आणि नाशिक येथील मेडीआर्ट फाउंडेशन या संस्थांचा समावेश होता. अखेरच्या टप्प्यात छत्रपती फाउंडेशन आणि मेडीआर्ट फाउंडेशन या दोनच संस्थांनी सरकारच्या नियम व अटी पूर्ण केल्याने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते चिठ्ठी पद्धतीने सोडत काढण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून, वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्राप्त अर्जांची छाननी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारवाईच्या भीतीपोटी पोलिसास रिक्षाची धडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कारवाईच्या भीतीपोटी वाहतूक पोलिसास धडक देऊन पोबारा करण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाली. ही घटना काठेगल्लीत घडली असून, अपघातात पोलिस कर्मचाऱ्यासह रिक्षाचालक जखमी झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय हरिश्चंद्र चावला (४०, रा. सिंधी कॉलनी, उपनगर) असे संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. या घटनेत शहर वाहतूक शाखेचे युनिट दोनचे कर्मचारी गणेश बाळासाहेब झनकर व रिक्षाचालक चावला जखमी झाले. झनकर यांच्यावर खासगी हॉस्पिटल येथे तर चावला यांच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. काठे गल्ली सिग्नल परिसरात गुरुवारी (दि. २०) दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. युनिट दोनच्या वतीने गुरुवारी नाशिक-पुणे मार्गावरील बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी नाशिककडून भरधाव वेगात येणाऱ्या (एमएच १५ झेड ४९१८) या रिक्षाच्या चालकास झनकर यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने थेट त्यांच्या अंगावर रिक्षा घातली. यावेळी अन्य पोलिसांनी धाव घेतली असता संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात रिक्षावरील ताबा सुटून ती पलटी झाली. या घटनेत पोलिस शिपाई झनकर यांच्यासह रिक्षाचालक चावला जखमी असून, दोघांवर उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक घोटेकर करीत आहेत.

दुचाकी चोरट्यास अटक

पार्क केलेली दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांस नागरिकांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयिताच्या अटकेने अनेक गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

कुणाल कैलास गायखे (१८, रा.गायखे मळा, पळसे) असे संशयिताचे नाव आहे. प्रकाश बंडू पोरजे (रा. वडनेर दुमाला) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. पोरजे हा गुरुवारी (दि. २०) सायंकाळी पळसे येथील खासगी हॉस्पिटल येथे आजारी नातेवाइकास भेटण्यासाठी गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची दुचाकी (एमएच १५ बीएस ६२७) संशयित गायखे चोरी करतांना मिळून आला. ही बाब पोरजे यांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेतला. यावेळी नागरिकांनी संशयित आरोपीस बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेचा अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

चार जुगारी जेरबंद

घास बाजारात उघड्यावर जुगार खेळणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. घास बाजारातील कैलास मोरे यांच्या टपरीच्या बाजूला गुरुवारी (दि. २०) ही कारवाई करण्यात आली. यावेळी समीर मोहम्मद शेख व त्याचे तीन साथिदार जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून एक हजार १२० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. पोलिस शिपाई दीपक शिलावट यांच्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार सातपुते करीत आहेत.

जिन्यावरून पडल्याने कामगार मृत्युमुखी

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या जिन्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही शालिमार चौकात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अंबादास रामजी पठाडे (५०, रा. विहितगाव, नाशिकरोड) असे मृत कामगाराचे नाव आहे. शालिमार परिसरातील नव्याने सुरू असलेल्या बांधकामावर ही घटना घडली. पठाडे बुधवारी (दि. १९) दुपारी दीड वाजेच्या सुमारास जिन्यावरून उतरत असतांना अचानक पाय सरकून पडले. यामुळे त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली. पत्नी वंदना पठाडे यांनी त्यांना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी (दि. २०) दुपारी त्यांचा मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास हवालदार थेटे करीत आहेत.

क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणूक मार्गाची पाहणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी शुक्रवारी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. या दौऱ्यावेळी दोन आमदार, महापालिकेसह महावितरणचे अधिकारी हजर होते. ओव्हरहेड वायर्स, उघड्या डीपी यांची पाहणी करताना या मार्गावर इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.

भक्तांच्या लाडक्या गणरायाला ११ दिवसांनी म्हणजे २३ सप्टेंबर रोजी निरोप देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळाकडून यावेळी वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते. विसर्जन मिरवणुकीत शेकडो मोठी मंडळे सहभागी होतात. या मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी भाविकही मोठ्या संख्येने हजर असतात. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहर पोलिसांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्यासह फौजफाटा हजर होता. या दौऱ्याबाबत पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले की, विसर्जन मिरवणूक सुरू होते तिथपासून सर्वच मार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, महापालिका आणि महावितरणचे अधिकारी हजर होते. पाहणीदरम्यान काही ठिकाणी अडथळे दिसून आले. ते दूर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. भाविकांची आणि मंडळ कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी फिरते शौचालय ठेवण्यात येणार आहे. पाहणीदरम्यान सर्व प्रमुख ठिकाणी बंदोबस्त किती असावा, याचे नियोजन करण्यात आले. यासाठी दोन्ही शिफ्टमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

डीजेवर संक्रातच

सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजविण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने कायम ठेवला असून, यामुळे याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंडळ आणि डीजे चालकांवर संक्रात ओढणार आहे. गतवर्षी मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन केले म्हणून एका मंडळावर कारवाई झाली होती. यानंतरच्या एका मिरवणुकीदरम्यान नऊ डीजे जप्त करण्यात आले होते.

११ वाजता मिरवणूक?

विसर्जन मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू होईल, असा अंदाज धरून वाहतूक व बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. आजच्या पाहणीदरम्यान शांतता समितीचे पदाधिकारी हजर होते. सकाळी ११ वाजता मिरवणूक सुरू झाल्यास सर्वच मंडळांना योग्य तो वेळ मिळेल आणि क्रमांकानुसार मंडळे पुढे जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पोलिस प्रशासनाने सर्वांना सूचना केल्या असून, गणेश मंडळे त्यास काय प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूने आणखी दोघांचा बळी

$
0
0

आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू

सप्टेंबरमध्ये १७ जणांचा मृत्यू

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वाइन फ्लूवर उपचार घेत असलेल्या एका महिलेसह सिन्नर येथील कामगाराचा शुक्रवारी मृत्यू झाला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फक्त सप्टेंबर महिन्यातच तब्बल १७ जणांचा बळी गेला असून, हा आकाडा दिवसेंदिवस वाढत आहे.

राजेंद्र सिंग (वय ५५, रा. माळेगाव एमआयडीसी, सिन्नर) आणि सखुबाई सोनवणे (वय ५२, चिंचवणी, ता. अकोले, जि. नगर) अशी या दोन्ही मृतांची नावे आहेत. राजेंद्र सिंग माळेगाव एमआयडीसीत कामास होते. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू झाल्यानंतर अवघ्या एका तासात त्यांचा मृत्यू झाला. सखुबाई सोनवणे यांच्यावर १८ सप्टेंबरपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, आजमितीस सिव्हिल हॉस्पिटलच्या स्वाइन फ्लू कक्षात १८ पेशंट दाखल असून, त्याच्यातील दोघे व्हेंटिलेटरवर आहेत. महापालिका व ग्रामीण रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूला बळी पडलेल्या व्यक्तींचा विचार करता हा आकडा २४ च्या पुढे गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देवभूमी’ला मदत करा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देवभूमी केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सामाजिक संस्था, शाळा-कॉलेज यांसह वेगवेगळ्या स्तरांवरून केरळमधील आपत्ती निवारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील सर्व गणेश मंडळांनीदेखील वर्गणीतून उरलेली रक्कम केरळ रिलीफ फंडामध्ये जमा करावी, असे आवाहन नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

केरळवासीयांसाठी सध्या विविध संस्था, संघटनांकडून आर्थिक मदतीसोबतच फूड पॅकेट, औषधे व जीवनावश्यक वस्तू केरळमध्ये पाठविल्या जात आहेत. अजूनही केरळमधील जनजीवन पूर्णतः पूर्ववत झालेले नाही. त्यामुळे केरळमधील बांधवांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी अनंत चतुर्दशीनंतर शहरातील सर्व गणेश मंडळांनी केरळमधील आपत्ती निवारणासाठी आर्थिक स्वरूपात मदत करावी. मंडळांनी गणेशोत्सवासाठी जमवलेल्या वर्गणीतून गणेशोत्सवानंतर उरलेली रक्कम केरळ रिलीफ फंडात जमा करावी. मंडळांनी ऐच्छिक रक्कम जमा केल्यानंतर त्याची पावती महामंडळांकडे सुपूर्द करावी, असे आवाहन गणेशोत्सव महामंडळातर्फे शहरातील सर्व गणेश मंडळांना करण्यात आले आहे. शहरातील सर्व गणेश मंडळांकडून केरळ या देवभूमीला नाशिक या मंत्रभूमीकडून निश्चितपणे वर्गणीतली उर्वरित रक्कम देण्यात येईल, असे गणेशोत्सव महामंडळाचे सरचिटणीस देवांग जानी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टीव्हीच्या रिमोट मागितल्याचा रागातून पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करणाऱ्या मद्यपी पतीस जिल्हा कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही घटना १६ जून २०१७ रोजी घडली होती.

पांडुरंग लक्ष्मण मानवतकर (रा. चुंचाळे शिवार, दत्तनगर, अंबड) असे कोर्टाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. रवींद्र निकम यांनी बाजू मांडत ११ साक्षिदार तपासले. हिंगोली जिल्ह्यातील मानवतकर हा पत्नी शोभा आणि चार मुलींसह दत्तनगर येथे एका बांधकाम साईटवर राहत होता. वॉचमॅनचे काम करणारा मानवतकर मद्याच्या आहारी गेला होता. यामुळे तो शोभाला सातत्याने मारहाण करीत होता. तो १५ जून २०१७ रोजी मद्यप्राशन करून घरी परतला. तो टीव्ही बघत असताना पत्नी शोभा हिने रिमोट मागितले. यातून वाद झाला. पांडुरंगने पहाटे चार वाजेच्या सुमारास डोक्यात दगड टाकून शोभाची हत्या करीत पोबारा केला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रत्यक्षदर्शी व परिस्थितीजन्य पुरावे समोर आल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी पांडुरंग मानवतकर यास जन्मठेप व पाच हजार रुपये, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तुंग यश प्राप्तीसाठी वाचनाला पर्याय नाही

$
0
0

प्रा. डॉ. डी. पी. पवार यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रंथांचे वाचन व अभ्यास केवळ परीक्षा आणि पदवी घेण्यासाठी नसून जीवनात कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही, म्हणून महाविद्यालयीन युवकांनी वाचनाचा ध्यास घ्यावा आणि आपले ध्येय गाठावे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळ सदस्य प्रा. डॉ. दिलीप पवार यांनी ओझर महाविद्यालयात केले.

मविप्र समाज संस्थेच्या ओझर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित वाङमय मंडळाचे नुकतेच उद्घाटन झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पवार बोलत होते अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. आर. एच. ठाकरे होते. प्रारंभी सरस्वती पूजन आणि अक्षरगंगा या भित्तीपत्रकाचे अनावरण डॉ. पवार यांचे हस्ते झाले. याप्रसंगी मंचावर मराठी विभागप्रमुख प्रा. किरण चव्हाण, प्रा. नारायण पाटील, सिनेट सदस्या डॉ. कल्पना आहिरे, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. आर. बी. शिंदे, हिंदी विभागप्रमुख डॉ. दीपा कुचेकर, कनिष्ठ विभागाच्या प्रा. श्रीमती जे. डी. पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉ. पवार यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रवींद्रनाथ टागोर,अब्राहम लिंकन, माउन्ट एल्फिंस्टन आदी महापुरुषांच्या जीवनातील विविध प्रसंग कथन केले आणि आपल्या कविताही सादर केल्या. विद्यार्थ्यांनी वाचनसंस्कृती जोपासावी असे प्रा. ठाकरे यांनी सांगितले. मराठी विभाग प्रमुख प्रा. किरण चव्हाण यांनी वाङमय मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा नारायण पाटील यांनी परिचय करून दिला. गायत्री चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. ए. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गायत्री जाधव, गायत्री चौधरी, ऋषिकेश गवळी, शीतल धनराळे, अनुजा पवार आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांडूळ साप तस्करांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी सुमारे २५ लाखांच्या मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. यापूर्वी याच पथकाने द्वारका येथून एक टोळी पकडली होती. काही दिवसांपासून मांडूळ सापाच्या तस्करीच्या घटना वाढल्या आहेत.

सोमनाथ नथू चारोस्कर (वय २२, रा. पिंपळगाव खांब, तालुका नाशिक) आणि अजय कैलास मोरे (१९, रा. गाडे वस्ती, चेहेडी जकात नाका) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस शिपाई स्वप्नील जुंद्रे यांना गुप्त बातमीदारामार्फत दोन व्यक्ती गांडूळ जातीच्या सापाची तस्करी करीत असून, ते विक्रीसाठी शहरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक आनंदा वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलिस कर्मचारी बलराम पालकर, पोट कारवाळ, बाळासाहेब दोंदे, रवींद्र बागूल, वसंत पांडव, संजय मुळक, येवाजी महाले, तसेच वन विभागाचे परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनावर व रवींद्र भोगे यांच्यासह व्ही. एन. नाईक शाळेजवळ सापळा लावला होता. संशयित टप्प्यात येताच त्यांना पकडण्यात आले. त्यांची झडती घतली असता कापडी पिशवीत २५ लाख १५ हजार किमतीचा मांडूळ जातीचा साप आढळून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिका गरब्याचे विविध प्रकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशाला निरोप देतानाच आता सर्वांना दोन आठवड्यांवर आलेल्या नवरात्रीचे वेध लागले आहेत. नवरात्रीनिमित्त शहरात आयोजित होणाऱ्या गरबा कार्यक्रमांचे सर्वांनाच आकर्षण असते; पण गरब्याच्या सर्व स्टेप्स सर्वांनाच जमतात असे नाही. मात्र, आता गरब्याच्या विविध प्रकारांतील प्रोफेशनल स्टेप्स तुम्हालादेखील शिकता येणार आहेत. त्यासाठी मटा कल्चर क्लबतर्फे येत्या शुक्रवारपासून (दि. २८) गरबा कार्यशाळा होणार आहे.

गरब्याच्या पारंपरिक गाण्यांसोबतच रिमिक्स आणि बॉलिवूडच्या गाण्यांवर गरब्याचा ताल धरण्यासाठी प्रत्येक जण आतूर असतो. गरबा खेळायची अनेकांची इच्छा असते. मात्र, अनेकांना गरबा खेळणे जमत नाही. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत सर्वांनाच गरब्याचा आनंद लुटता यावा, या उद्देशाने महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि स्काय युनायटेड डान्स सेंटरतर्फे ही गरबा कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेसाठी कल्चर क्लबचे सभासद असलेल्यांना दोघांमिळून ८०० रुपये आणि इतरांसाठी १ हजार रुपये शुल्क राहणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी ०२५३-६६३७९८७ किंवा ९४२२५१३५६९ या क्रमांकांवर, तसेच महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा.

याचे मिळणार प्रशिक्षण

कार्यशाळेत वेस्टर्न, काजूकतली, ढोलीतारो, घुमियो, फोर स्टेप, एक ताली, दो ताली, तीन ताली, दोडियो आणि क्रॉस दोडियो गरबा असे विविध प्रकार शिकविले जाणार आहेत. या कार्यशाळेस शुक्रवारपासून (दि. २८) प्रारंभ होणार असून, ९ ऑक्टोबरपर्यंत बारा दिवस ही कार्यशाळा रंगणार आहे. त्यासाठी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

--

येथे रंगणार कार्यशाळा

- स्वाध्याय केंद्र हॉल, मधुबन कॉलनी, गणपती मंदिराजवळ, मखमलाबाद रोड येथे सायंकाळी ६ ते ७, ७ ते ८, ८ ते ९ व ९ ते १० वाजता

- ०७, त्रिकोणी बंगला, गणेशनगर, गुलमोहर कॉलनी, पाइपलाइन रोड, सातपूर येथे सायंकाळी ५ ते ६ वाजता

- कोमल रो हाऊस, कल्पतरूनगर, अशोका मार्ग येथे दुपारी ११ ते १२ वाजता

- ऋतुरंग भवन, नाशिकरोड येथे सायंकाळी ६ ते ७ व ७ ते ८ वाजता

- नारायण बापूनगर, जेलरोड येथे सायंकाळी ६ ते ७ वाजता

लोगो : कल्चर क्लब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिंसा महोत्सवासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण

$
0
0

अहिंसा महोत्सवासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण

नाशिक : सटाणा तालुक्यातील मांगातुगी येथील जैन तिर्थक्षेत्र येथे २१ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत जागतिक अहिंसा महोत्सव शरद पोर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जागतिक अहिंसा महोत्सवाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी जैनसमाजाचे हे निमंत्रण स्विकारले असून, या महोत्सवासाठी येण्याची तयारी दर्शवल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले आहे.

मांगीतुंगी येथे जगातील १०८ फूट उंच वृषभदेवाची मूर्ती उभारण्यात आली आहे. याच ठिकाणी २१ ते २४ ऑक्टोबर असे तीन दिवस जागतिक शांतता अहिंसा महोत्सव आणि शरद पोर्णिमा महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्या महोत्सवासाठी कोविंद यांना शुक्रवारी डॉ. भामरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट देवून आमंत्रण दिले. यावेळी डॉ. भामरे यांच्यासह भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, स्वामी रविंद्र किर्ती महाराज, चांदवडचे नगराध्यक्ष डॉ. भूषण कासलीवाल उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी बँकेची सभा वादळी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील इतिवृत्तासह अनेक विषयांना आक्षेप घेत विरोधी गटाच्या सभासदांनी गोंधळ घातला. त्यामुळे सत्ताधारी संचालकांनी ही सभा अवघ्या तासाभरात आटोपती घेतली. काही सभासदांनी 'नहीं चलेगी नहीं चलेगी.. दादागिरी नही चलेगी'च्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. मात्र, या गोंधळात सभेच्या पटलावरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. सभा संपल्यानंतर विरोधी गटाने सभागृहातच ठाण मांडत निषेध नोंदवत आपली नाराजी व्यक्त केली.

जेलरोड येथील इंगळेनगर शाखेतील सभागृहात झालेल्या या सभेत सुरुवातीला विषयपत्रिकेवरील सर्व विषय वाचून ते मंजूर करण्यात आले. प्रकाश गोहाड यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. लागलीच सभा संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विरोध करणाऱ्या सदस्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर अॅड. सुनील बोराडे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचा मुद्दा उपस्थित करून त्यावर अध्यक्ष व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सही नसल्यामुळे ते नामंजूर करण्याची मागणी केली. त्यांनी व्यवस्थापन खर्च नियमापेक्षा सात कोटींनी जास्त आहे, भांडवली खर्च किती केला आहे, तो दिसत नसल्यामुळे ताळेबंद व नफा-तोटा पत्रकाला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश गोहाड यांचे सभासदत्व रद्द करण्यासही विरोध केला. या सर्व मुद्द्यांचे निवेदन सभेने स्वीकारावे, असे त्यांनी सांगितले. मात्र, अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी ते फेटाळल्यानंतर सभेत गोंधळाला सुरुवात झाली. सभेत विरोध करणाऱ्यांमध्ये पां. भा. करंजकर, शिरीष लवटे, सतीश मंडलेचा, चंद्रकांत विसपुते, हेमंत गायकवाड, संतोष क्षीरसागर, अतुल धोंगडे, श्याम गोहाड, साहेबराव खर्जूल आदी सभासद होते.

हिंमत असेल तर चर्चा करा

सभेच्या व्यासपीठासमोर येत सभासदांनी आपला विरोध दर्शवला. तब्बल पंधरा मिनिटे हा गोंधळ सुरू होता. या वेळी या सभासदांनी 'हिंमत असेल तर चर्चा करा, नाही तर खुर्च्या खाली करा' अशा घोषणाही दिल्या. या गोंधळात सत्ताधारी संचालकांनी राष्ट्रगीताला सुरुवात केली अन् सभाही संपली. विरोध असणारे विषय घेऊन तयार केलेले फ्लेक्सचे पोस्टर परिधान करूनच सभासदांनी आपला संताप व्यक्त केला. पोस्टर सर्वांचे लक्ष वेधत होते.

अध्यक्ष धावले विरोधकांवर

सभेत विरोध दिसू लागल्यानंतर बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी व्यासपीठावरून उडी घेत विरोधकांवर धावले; पण इतर सभासदांनी त्यांना शांत केल्यानंतर ते परतले. या वेळी त्यांची शाब्दिक चकमकही झाली. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आतापर्यंत असा गोंधळ कधीच झाला नाही. सत्ताधारी संचालकांनी सभा संपवण्याची घाई केली तर विरोधी सदस्यांनी मुद्दे रीतसर मांडले नाहीत, असे सांगत एका ज्येष्ठ सदस्याने या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. सभासदत्व रद्द केल्यानंतर गोहाड यांनी संताप व्यक्त करीत बँकेच्या कारभारावर आरोप केले.दहा वेळा सभासद रद्द केले तरी पुरून उरेल, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐतिहासिक मिरवणुकीची नांदी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस, महागणेश मंडळ आणि महापालिका यांच्या प्रयत्नांमुळे यंदाची सार्वजनिक गणेश मिरवणूक ऐतिहासिक ठरणार आहे. यंदा प्रथमच सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या मिरवणुकीत गुलाल, तसेच डीजेचा वापर न करण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. गणेशमूर्तींचे नदीपात्रात विसर्जनदेखील रोखण्यात येणार आहे. राज्यात 'डीजे'बंदीवरून धुरळा उडत असताना शहरात मात्र सकारात्मक चित्र दिसून येत असल्याने गणेशभक्तांतही समाधानाचे वातावरण आहे.

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहर पोलिस आयुक्तालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, तर महागणेश मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी ही माहिती दिली. पोलिस आयुक्तालयातर्फे शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास सर्वच मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला. संपूर्ण गणेशोत्सवात कोठेही डीजेचा दणदणाट सहन करण्याची वेळ नाशिककरांवर आली नाही. पर्यावरणपूरक देखाव्यांबरोबरच अनेक मंडळांनी शाडू मातीच्या गणेशमूर्तींवर भर दिल्याचेही दिसून आले. त्याबद्दल या बैठकीत आयुक्त डॉ. सिंगल यांनी सर्व गणेश मंडळांचे आभार मानले. आता गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान 'डीजे'ऐवजी पारंपरिक ढोल, लेझीम, तसेच इतर वाद्यांवर भर देण्यात आला असून, त्याबाबत सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात आले असल्याचे समीर शेटे यांनी सांगितले. यंदा प्रथमच मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांचा वापर करण्यात येणार आहे. सर्व मंडळे आपल्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता त्या कृत्रिम तलावात विसर्जित करणार असून, मोठ्या मूर्ती सामाजिक संस्थांना दान करण्यात येणार आहेत. 'डीजे'बाबत प्रशासनाने आपले म्हणणे यापूर्वीच स्पष्ट केले असून, त्यास सर्व मंडळे सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा शेटे यांनी व्यक्त केली. नाशिकमधील गणेश मंडळांनी यंदा आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविण्याचा निर्णय घेतला असून, पोलिस आणि सर्व पदाधिकारी मिळून हा उत्सव साजरा करतील, असे आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक आयुक्त अशोक नखाते, भागवत सोनवेण, बापू बांगर, दीपक गिऱ्हे, शांताराम पाटील, वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, मधुकर कड, सूरजकुमार बिजली, त्याचप्रमाणे गजानन शेलार, रामसिंग बावरी, सत्यम खंडागळे, शंकरराव बर्वे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

--

मिरवणूक सकाळी ११ वाजेलाच

उशिरा मिरवणूक सुरू झाल्यास गणेशभक्तांना आनंद लूटता येत नाही. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बहुतांश मंडळे विसर्जन ठिकाणांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे यंदा भद्रकालीतील मुख्य विसर्जन मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू करण्यास सर्व मंडळांनी सहमती दर्शविली आहे. गणेश मंडळांमधील अंतर कमी करण्यासाठी स्वागत कमानीजवळ आरती न घेण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. या मुख्य मिरवणुकीत २१ मंडळे सहभागी होणार असून, सकाळी ११ वाजता मिरवणूक सुरू झाल्यास मध्यरात्री १२ वाजेपर्यंत गणेशभक्तांना त्याचा आंनद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.

--

'डीजे'चा प्रश्नच नाही!

मुंबई हायकोर्टाने 'डीजे'बाबत आपले म्हणणे स्पष्ट केले असून, त्याचे पालन पोलिस प्रशासनातर्फे होणार आहे. यात मंडळांनी कोणताही आतातायीपणा न करता सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. सिंगल यांनी केले आहे. 'डीजे'ऐवजी ढोल-ताशा, बँजो अशा पारंपरिक वाद्यांचा वापर करीत समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. गतवर्षी डीजे वापराबाबत एकमेव गुन्हा नगरसेवक गजानन शेलार यांच्याविरुद्ध दाखल झाला होता. बैठकीस शेलारदेखील उपस्थित होते. मात्र, प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच यावेळी मौन बाळगत पोलिसांच्या आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याचे संकेत दिले.

--

यंदाची ठळक वैशिष्ट्ये

-प्रथमच 'डीजे'चा वापर टाळला जाणार

-सकाळी ११ वाजता मिरवणुकीचा प्रारंभ

-गुलालाऐवजी फुले अथवा नैसर्गिक रंगांचा वापर

-स्वागत कमानीवर यंदा आरती नाही

-मिरवणूक मार्गावर ५० सीसीटीव्हींचा वॉच

-ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

-महिला व पुरुषांसाठी शौचालयांची व्यवस्था

--

शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक ही पहिल्यापासून वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. यंदा ही मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू करण्याचा प्रयत्न असून, मिरवणुकीत डीजेसह गुलालाचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सर्व मंडळे विसर्जन ठिकाणापर्यंत पोहोचतील, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे.

-समीर शेटे, अध्यक्ष, महागणेश मंडळ

--

नियमांचे पालन करीत हा उत्सव साजरा होईल, याकडे पोलिस विशेष लक्ष पुरवतील. त्यासाठी पुत्सा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, महिला व वृद्धांनाही मिरवणुकीचा आस्वाद घेता येईल, याकडे कटाक्ष ठेवण्यात आला आहे. गोदावरी प्रदूषणाबाबत हायकोर्टात दाखल याचिकेचा विचार करता सर्वांनी विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा वापर करावा.

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

--

(लीड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१६५ रुग्णांची मोफत तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मखमलाबाद येथे नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित सर्वरोगनिदान शिबिरात १६५ गरजू रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

तपासणी करण्यात आलेल्या ३५ रुग्णांवर पुढील उपचार केले जाणार आहेत. मखमलाबाद येथील सार्वजनिक सभागृहात आयोजित या शिबिराचे उद्घाटन नगरसेविका सुनीता पिंगळे, नगरसेवक पुंडलिकराव खोडे, भिकूबाई बागुल यांच्या उपस्थितीत झाले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी बच्छाव यांनी स्वागत केले. या दोन दिवसीय शिबिरात १६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. डॉ. मनीषा मराठे, डॉ. अतुल डहाळे, डॉ. कुणाल जाधव, डॉ. सोनाली ठाकरे, डॉ. राहुल ठाकरे, डॉ. मनोज दगडे, डॉ. अनुपमा डहाळे आदींनी या शिबिरात योगदान दिले. त्यात महिलांशी संबंधित विविध व्याधींसह दात आणि तोंडाच्या आजारांचीही तपासणी झाली. ट्रस्टच्या रुग्णालयात नव्याने सुरू झालेल्या अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा मल्टिस्पेशालिटी विभागात पुढील तीन महिने मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याने, गरजू व गरीब रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सेक्रेटरी शशिकांत पारख यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images