Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दुष्काळातही भेदभाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत सरकार झोपी गेल्याचे सोंग करीत आहे. राज्यात गंभीर दुष्काळ असताना सरकारने लागलीच उपाययोजनांची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच दुष्काळ जाहीर करण्यात भाजप सरकारने भेदभाव केला आहे,' असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी केला. विरोधकांच्या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही त्या तालुक्यांना दुष्काळातून वगळलेले असून, यातही 'राजकीय दुष्काळ' दाखविला असल्याचे खोचक टीकाही चव्हाण यांनी केली.

नाशिक शहर काँग्रेसतर्फे जनसंपर्क अभियानाचा प्रारंभ केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, डॉ. तुषार शेवाळे आदी उपस्थित होते.

अन्य राज्यांत कोळसा पाठवला

राज्यातील वीजटंचाईवर बोलताना चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. सध्या पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने राज्यातील सत्ताधारी भाजप सरकार, राज्यातील कोळसा पळवत असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केला. राज्यात वीज केंद्रांना कोळसा नसल्याने वीज निर्मिती होत नाही. सरकारकडून राज्यातील कोळसा मध्यप्रदेश, राजस्थान या निवडणुका असलेल्या राज्यात पाठवत असल्याचे सांगत, सरकारच्या कोळसा चोरीमुळेच राज्यात वीज संकट असल्याचेही आरोप त्यांनी याप्रसंगी केला.

राणेंनी भाजपा सोडली तर चर्चा...

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादीने सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मागणी माजी मंत्री नारायण राणे यांच्यासाठी केली असल्याचे विचारले असता, असा प्रस्ताव नसल्याचा त्यांनी इन्कार केला. तर, राणे भाजपचे खासदार असून, त्यांना मतदारसंघाची काय गरज? असा प्रश्न करत राणे यांनी भाजप सोडली तर, त्याबाबत काही चर्चा होऊ शकते, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.

महाजन पैशांची मॅनेजमेंट करतात

चव्हाण यांनी नाशिकमध्ये निवडक पत्रकारांशी बोलताना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे भाजपच्या पैशांची मॅनेजमेंट करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपकडून निवडणुकांत प्रंचड पैसा ओतला जातो. राज्यात गिरीश महाजन यांच्याकडे पैशांच्या मॅनेजमेंटचे काम देण्यात आले आहे. त्यांच्याकडून उमेदवारांना थेट पैसा पुरवला जातो. कोणाही या पैसे घ्या अन् निवडणुका जिंका हा फंडा भाजपकडून अवलंबला जात असल्याचे सांगत, भाजपकडून गुंडानाही पावन करून घेतले जात असल्याचा हल्लाबोल चव्हाण यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रत्येकाचे नशीब वेगळे सांगणारे ‘प्रारब्ध’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माणूस आपल्या पाल्याच्या बाबतीत खूप हळवा असतो, त्यातही ती मुलगी असेल तर जास्तच. बाप तर आपल्या मुलीच्या सुखासाठी काहीही करायला तयार असतो. एक मुलगी पत्नी झाल्यावर कितीतरी नाते बदलतात. सासरा, नवरा, सासू, नणंद सारेच वेगळे होते; मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते हे सांगणारे नाटक 'प्रारब्ध' गुरुवारी सादर झाले.

राज्य नाट्य स्पर्धेत ल्युमिनस फाउंडेशनच्या वतीने हे नाटक सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही स्पर्धा सुरू आहे. नाटकाचे दिग्दर्शन अनघा धोडपकर यांनी केले तर लेखन विवेकानंद भट यांचे होते. आपल्या होणाऱ्या सुनेसाठी जिवाची पर्वा न करता धडपडणारा जीव काढणारा सासरा, मुलीने गडगंज श्रीमंत माणसाशी लग्न करावे म्हणजे ती सुखी होईल अशी आईची भाबडी कल्पना, मला सासू म्हणू नको मी तुझी आईच आहे, माझ्या मुलीला जीव लाव, असे ठणकावून सांगणारी आई, माझे तुझ्यावर निस्सिम प्रेम आहे हे सांगणारा भावी नवरा असे सारेच नाते या नाटकात गुंफण्यात आले होते. ही सगळी हाडामासाची माणसे, पण तरीही वेगळे वागणारी, विचार करणारी, तो ही एकमेकांच्या विरोधातला विचार. एकमेकांवर प्रेम असूनही त्यांना एका विचित्र प्रारब्धाला तोंड द्यावे लागते. त्याची कहाणी म्हणजे प्रारब्ध हे नाटक होय.

नेपथ्य हिमांशु धोडपकर यांचे, संगीत प्रणिल तिवडे यांचे, प्रकाशयोजना वैशाली खाटीकमारे, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा श्यामल हलकर्णी यांची होती. नाटकात विवेकानंद भट, अनघा धोडपकर, दीप्ती जोशी, गोपाल लोखंडे, विनायक नवसुपे यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक

देहासक्त

नम्रता कलाविष्कार बहुउद्देशीय संघटना

स्थळ : पसा नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकाराम मुंढे नियोजन सहसचिव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेले तुकाराम मुंढे यांची मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या सेवा विभागाचे सचिव सीताराम कुंटे यांच्या सहीचा दोन ओळींचा आदेश गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता मुंढे यांना मिळाला. हे आदेशपत्र हाती येताच मुंढे यांनी तत्काळ महापालिका मुख्यालय सोडले. आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याच्या सरकारच्या आदेशानुसार मुंढे यांनी आपला पदभार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावरून आपसात रणकंदन नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'अगोदर दोन राज्यांमध्ये पाण्यावरून वाद पेटत. आता महाराष्ट्रातच दोन जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी वाद होऊ लागले आहेत. हे चित्र महाराष्ट्राच्या हिताचे नाही. जायकवाडीच्या पाण्याचे वितरण ठरलेल्या धोरणांनुसारच व्हायला हवे. या पाण्याचा लाभ नाशिक आणि मराठवाडा या दोन्ही भागात शेती व पिण्यासाठी व्हायला हवा,' अशी भूमिका माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडली.

त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम मैदानावर आयोजित कृषिथॉन प्रदर्शनाच्या उद्घाटप्रसंगी ते बोलत होते. हे प्रदर्शन २६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

चव्हाण म्हणाले, 'राज्यामध्ये सद्यस्थितीत दुष्काळाचे वातावरण सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. दुसरीकडे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत शेती व्यवसाय बेभरवशाचा बनल्याने शेतीपूरक जोडधंद्याच्या उभारणीसाठी सरकारने प्राधान्याने प्रयत्न करायला हवेत. सोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देण्याची गरज आहे. शेतीसाठी तंत्रज्ञानही तितकेच गरजेचे आहे. नवीन पिढी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीत अमूलाग्र बदल घडवू शकते. या तंत्रज्ञानाच्या प्रचार आणि प्रसाराचे काम कृषिप्रदर्शनासारख्या उपक्रमांमधून होते. पण तंत्रज्ञान कितीही उपयुक्त असले तरीही पाण्याशिवाय शेती नाहीच. यामुळे पाण्याचा प्रश्न हा समन्वयाने सुटायला हवा.'

यावेळी शेतकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवरही चव्हाण यांनी उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, 'आमच्या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांवर गारपीटीचे संकट ओढावले. तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना तातडीने मदत केली. पण विद्यमान सरकारने वर्षभर घोषणांचा पाऊस पाडत उशिराने शेतकऱ्यांना जे दिलं ते त्यांच्या उपयोगी कसं येईल.' विरोधी पक्षात असलो तरीही जेथे महाराष्ट्र आणि शेतकरी हिताचा मुद्दा येतो. त्यासाठी शासनाला मदत करायला तयार आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, नाडाचे अध्यक्ष विजूनाना पाटील, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, साहील न्याहारकर, संजय न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, शाहू खैरे, राजाराम पानगव्हाने, जयंत जायभावे, शरद आहेर आदी उपस्थित होते.

\Bमुंढे आले अन् गेले सीएममुळेच

\Bप्रदर्शन उद्घाटनानंतर पत्रकारांनी अशोक चव्हाण यांना नाशिक मनपा आयुक्त मुंढेंच्या बदलीसंदर्भात प्रतिक्रिया विचारल्यानंतर यावर फारसे भाष्य न करता त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे निर्देश केला. या बदलीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा होता. त्यांनीच मुंढेंना नाशिकमध्ये आणले अन् त्यांनीच पुढची बदली घडवून आणली, असे सांगत अधिक बोलणे टाळले.

\B \B

\Bअयोध्येपेक्षा शेतकरी महत्त्वाचा

\Bशिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे हे अयोध्येस जाऊन राजकीय भांडवल करणार आहेत. पण त्यांनी अयोध्येला जाण्याऐवजी राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची स्थिती समजावून घ्यायला हवी. त्यासाठी राज्यात लक्ष घालायला हवे, असा टोलाही चव्हाण यांनी ठाकरेंना लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसैनिकांचे अयोध्येकडे कूच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

केंद्र सरकारने राममंदिर उभारणीस त्वरित प्रारंभ करावा, या मागणीसाठी राज्यभरातून हजारो शिवसेना कार्यकर्ते गुरुवारी, २२ नोव्हेंबर रोजी अयोध्येला रवाना झाले. नाशिकरोड, मुंबई आणि ठाणे अशा तीन ठिकाणांहून स्पेशल ट्रेनने कार्यकर्ते रवाना झाले. ज्या कार्यकर्त्यांना या ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही ते दुसऱ्या रेल्वेगाड्यांनी रवाना झाले आहेत.

नाशिकरोडहून गुरुवारी रात्री एक वाजता १२५४ कार्यकर्ते जय श्रीराम एक्सप्रेसने रवाना झाले. एक्सप्रेसला १८ बोगी आहेत. परतीसह हा प्रवास एकूण पाच दिवसांचा आहे. पासधारकांनाच या गाडीत प्रवेश देण्यात आला. ठाण्याहून २४ बोगी असलेली ट्रेन गुरुवारी दुपारीच रवाना झाली होती. त्यामध्ये साधारण दीड हजार कार्यकर्ते होते. नाशिकच्या रेल्वेगाडीचे संयोजन राजेश फोकणे यांनी केले. ही गाडी २४ नोव्हेंबरला पहाटे पाचला अयोध्या स्थानकात पोहोचेल. खासदार गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील पाटील आदी नेते कार्यकर्त्यांसमवेत आहेत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी आरती केल्यानंतर जय श्रीराम एक्सप्रेस अयोध्येहून नाशिकला रवाना होईल. २६ नोव्हेंबरला रात्री बाराला ती नाशिकरोड स्थानकात पोहोचेल. गाडीला अठरा बोगी असून, इंजिनानंतरची पहिली बोगी एसआरएल आहे. या बोगीची क्षमता ४० प्रवाशांची आहे. त्यानंतर एसी बोगी असून, तिची क्षमता ६४ प्रवाशांची आहे. त्यापाठोपाठ स्लीपर क्लासच्या सात बोगी असून, प्रत्येक बोगीची ७२ प्रवासी क्षमता आहे. स्लीपर कोचनंतर पॅन्ट्री बोगी असेल. त्यामागे ४० प्रवासी क्षमतेची एसआरएल बोगी राहील. पाच दिवसांचा हा प्रवास तीन हजार किलोमीटरचा आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने १२५४ पासधारकांनाच जागा देण्यात आली आहे.

रेल्वेला कोटींचा महसूल

शिवसेनेच्या अयोध्यावारीतून रेल्वेला सुमारे एक कोटीचा महसूल मिळाला आहे. अयोध्येला जाण्यासाठी स्पेशल ट्रेन करण्यात आल्या आहेत. यासाठी नेहमीच्या तिकिटापेक्षा दीडपट दर जास्त द्यावा लागतो. नाशिकच्या गाडीसाठी रोख ३९ लाख रुपये मोजण्यात आले होते. तर ठाणेकरांनी त्यापेक्षा जास्त रक्कम मोजली. मुंबईहून देखील गाडी रवाना झाल्याचे समजते. या गाड्यांसाठीच पक्षाने सुमारे एक कोटी मोजले आहेत.

मिळणार मराठी जेवण!

रेल्वेने फक्त विशेष गाडी दिली आहे. पाच दिवसांच्या जेवण व नाश्त्याची सोय नेते मंडळीनींच केली आहे. नाशिकच्या जय श्रीराम ट्रेनमध्ये विशेष आचारी आणि दोन टेम्पो भरुन भाजीपाला व धान्य नेण्यात आले आहे. भाजी-पोळी, वरण-भात असा मेन्यू आहे. नाशिकरोडहून गाडीत पाणी भरुन घेण्यात आले. अयोध्येत ठाकरेंच्या सभेला कायदा सुव्यवस्थेमुळे परवानगी नाकारल्याचे वृत्त आल्याने रेल्वेगाड्या मुंबईतच थांबविण्यात आल्याने कोटींच्या खर्चावर पाणी फेरणार का या विचाराने नेते अस्वस्थ झाले. ग्रीन सिग्नल आल्यानंतर त्यांनी सुस्कारा सोडला. यावेळी हजारो कार्यकर्त्यांना टी शर्ट, टोपी आणि विशेष बॅच देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशीपचा रविवारी थरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांच्या काळजाचा थरकाप उडविणाऱ्या नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिपचा थरार रविवारी सकाळी १० वाजेपासून बाइक प्रेमींना पहायला मिळणार असून ही चॅम्पीयनशीप इंदिरानगर येथील पेठे नगर येथे होणार आहे.

या चॅम्पियनशिपचा हा पाचवा राऊंड असून या अगोदर कोचिन, गोवा, कोइम्बतूर, जयपूर या ठिकाणी ही स्पर्धा झाली आहे. पाचवा राऊंड नाशिकमध्ये तर सहावा राऊंड वडोदरा येथे होणार आहे. देशातली सर्वात मोठी ऑफरोड कॉम्पिटीशन समजली जाते. गॉडस्पीड रेसिंगच्यावतीने या चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी पेठे नगर भागात आर्टिफिशयल ट्रॅक तयार करण्यात आला असून अवघड वळण, उंच सखल भाग, तयार करण्यात आले आहे. यासाठी पुण्याहून टीम आली आहे. या स्पर्धेत ८ कॉटेगिरीमध्ये १२० स्पर्धेक सहभागी होत असून आतापर्यंत झालेल्या चार राऊंडमध्ये केरळच्या खेळाडूंनी आघाडी घेतली आहे. या चॅम्पियनशीपमध्ये चालकाचा अत्यंत कस लागत असून शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक अवस्थांचे देखील मूल्यमापन होत असते. येथे बनविण्यात आलेला ट्रॅक ७५० मीटर लांबीचा असून यात १२ डबल जम्प, कट टेबलटॉप असे विविध प्रकारांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबा बोकील स्मृती चषक ७ डिसेंबरपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवसत्य क्रीडा मंडळ व नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि मार्गदर्शक कै. बाबा बोकील यांच्या स्मृतीप्रत्यर्थ ७ ते ९ डिसेंबर, दरम्यान ११व्या नाशिक जिल्हा टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

बाबा बोकील स्मृती चषक स्पर्धेचे आयोजन गेल्या दहा वर्षांपासून केले जात असून हे या स्पर्धेचे ११वे वर्षे आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या स्पर्धेचे उद्घाटन गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखविलेल्या खेळाडूच्या हस्ते करण्यात येते. यावर्षी हा मान किलबिल शाळेची राष्ट्रीय खेळाडू सायली वाणी आणि विस्डम इंटरनॅशनल शाळेची राष्ट्रीय खेळाडू तनिषा कोटेचा या दोन युवा खेळाडूंना देण्यात आला आहे. तनिषा कोटेचा हिने गोव्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे, तर सायली वाणीनेही याच स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळतांना चांगले प्रदर्शन केले होते.

या स्पर्धेत कॅडेट मुले-मुली, सब ज्युनियर मुले- मुली आणि वरीष्ट गट पुरुष आणि महिला अशा सहा गटात या स्पर्धा खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचा आंतरराष्ट्रीय जलतरण खेळाडू तथा महाराष्ट्र शासनाचा एकलव्य क्रीडा पुरस्कारप्राप्त हंसराज पाटील उपस्थित राहणार आहे. जिल्हातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवहान शिवसत्य मंडळाचे उपाध्यक्ष अनिल (बंडू) सोनावणे, आमदार डॉ. राहुल आहेर, स्थायी समिती अध्यक्षा हिमगौरी आडके, नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी तसेच स्पर्धा आयोजक तथा टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमरावती, भंडारा संघाने वाजिवला ‘बँड’

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बँड स्पर्धेत पुरुषगटात अमरावतीच्या भानमाता विद्यालयाने तर मुलींमध्ये भंडारा येथील सनफ्लॅग हायस्कूल संघाने बाजी मारली.

नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुल येथे दुसऱ्या राज्यस्तरीय बँड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलीच्या विविध संघानी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी भूषविले. या स्पर्धेत सहभागी संघानी बँडमधील कौशल्य सादर केले. काही संघानी सूत्रबद्ध बँडच्या कसरती करून प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत मुलींमध्ये नागपूर विभागात भंडाऱ्याच्या सनफ्लॅग हायस्कूलने सुंदर सादरिकरण करीत स्पर्धेवर आपली छाप सोडत प्रथम क्रमांक पटकावला. तर अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलने त्याखालोखाल सुंदर प्रदर्शन करून दुसरा क्रमांक मिळविला तर नाशिक विभागामध्ये दोंडाईचाच्या हस्ती पब्लिक स्कुलने तिसरा क्रमांक मिळविला. मुलांमध्ये अमरावतीच्या ज्ञानमाता हायस्कूलने चांगले प्रदर्शन करून प्रथम क्रमांक पटकावला तर दोंडाईचाच्याच हस्ती पब्लिक स्कूलने दुसरा क्रमांक मिळविला.

या स्पर्धेसाठी राज्य परीक्षक म्हणून शहादू धाकमोरे, प्रकाश सोनावणे, वाल्मिक गरुड, संजय खैराते, विजय निकम आदिंनी काम बघितले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे प्रशिक्षक राजेश क्षत्रिय, दिलीप दिघे, प्रकाश पवार, हेमंत कानडे आदिंनी अथक परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सूर्यवंशी ट्रॉफी जिंकण्यात मालेगावची हॅटट्रिक

$
0
0

आघारकर संघाने पटकावली भालेकर ट्रॉफी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी अंतर तालुका क्रिकेट स्पर्धेत मालेगाव संघाने नाशिक ग्रामीण संघाचा पराभव करीत सलग तिसऱ्यांदा विजय संपादन केला. तर सुधाकर भालेकर मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत भाई वडके संघाचा पराभव करीत अविनाश आघारकर संघाने विजय संपादन केला.

पारितोषिक वितरण समारंभ माजी समाजकल्याण मंत्री बबन घोलप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भालचंद्र गोसावी, राजेंद्र सूर्यवंशी, चित्रा सुधाकर भालेकर, प्रशांत भालेकर, विनोद शहा, समीर रकटे, योगेश हिरे, तरुण गुप्ता, चंद्रशेखर दंदणे उपस्थित होते.

पारितोषिक विजेते संघ व खेळाडू

किशोर सूर्यवंशी क्रिकेट स्पर्धा

विजेता संघ-मालेगाव

उपविजेता संघ-नाशिक ग्रामीण

मालिकावीर - दीपक शिरसाठ

अंतिम सामन्यात सामनावीर - रोहन परदेशी

उत्कृष्ट फलंदाज - लखन बोरसे

उत्कृष्ट गोलंदाज - हेमंत सदांशीव

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - हेमंत सदांशीव

सुधाकर भालेकर मेमोरियल ट्रॉफी

विजेता संघ - अविनाश आघारकर संघ

उपविजेता संघ - भाई वडके संघ

मालिकावीर - निळकंठ तनपुरे

अंतिम सामन्यात सामनावीर - कुणाल कोठावदे

उत्कृष्ट फलंदाज - शाहरुख पटेल

उत्कृष्ट गोलंदाज - प्रतीक भालेराव

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - कुणाल कोठावदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालाजी मंदिर फोटो कॅप्शन

$
0
0

मनमंदिरा... तेजाने उजळून घेई साधका!

गंगापूर रोड येथील श्री शंकराचार्य न्यासाच्या बालाजी मंदिरात दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा करण्यात येतो. हजारो दिव्यांच्या प्रकाशात ही पौर्णिमा गुरुवारी उजळून निघाली. मग या वेळी 'मनमंदिरा... तेजाने उजळून घेई साधका!' ही ओळ ओठी न आली तर नवलच.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राम मंदिरप्रश्नी सेनेचे सोयीचे राजकारण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्यवारीवर, तसेच मुख्यमंत्र्यांकडून सुरू असलेल्या दुष्काळ आणि मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या राजकारणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी जोरदार टीकास्र सोडले. उद्धव ठाकरेंनी अयोध्येच्या रामाचे दर्शन घेण्याऐवजी नाशिकच्या काळारामाचेही दर्शन घेतले असते तरी चालले असते, अशी खोचक टीका त्यांनी केली. गंभीर आणि मध्यम दुष्काळ अशी महसुलात व्याख्या नसतानाही, मुख्यमंत्र्यांकडून शब्दच्छल केला जात असल्याचे सांगत, मराठा आरक्षणाचा अहवाल सभेच्या पटलावर ठेवला नसतानाही, जल्लोष कशाचा करायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक शहर काँग्रेसतर्फे जनसंपर्क अभियानाचा प्रारंभ केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी खासदार चव्हाण म्हणाले, की ज्या समृद्धी महामार्गाला शिवसेनेने विरोध दर्शविला, त्याच महामार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यातूनच शिवसेनेची दुटप्पी भूमिका लक्षात येते. सरकारमध्ये राहून विरोधात काम करायचे ढोंग शिवसेना करीत आहे. अयोध्येतील राम मंदिर मुद्दा न्यायालयात प्रविष्ट आहे. केवळ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम शिवसेना व भाजपकडून केले जात आहे. अयोध्येत जाऊन भाजपवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यातून फक्त शिळया कढीला ऊत आणला जात असल्याचा आरोप केला.

जल्लोष पोकळ घोषणेचा करायचा का?

नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल विधानसभेत ठेवलेला नाही. अहवाल ठेवला नसताना चंद्रकात पाटील वेगळे सांगत आहेत, तर मुख्यमंत्री वेगळेच सांगत आहेत. अहवाल स्वीकारला नसताना आरक्षण कोणत्या आधारावर देणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत नाहीत. आरक्षण मिळालेले नसताना दुसरीकडे जल्लोष करायला लावत आहे. हा जल्लोष मुख्यमंत्र्यांच्या पोकळ घोषणेचा करायचा का, असा उपरोधिक सवाल प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंचे निर्णय बदलणार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकप्रतिनिधींच्या द्वेषापोटी नाशिककरांच्या हिताविरोधात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेले सर्व अन्यायकारक निर्णय रद्द करण्यात येतील, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली.

मुंढे यांच्या बदलीचे आदेश आल्यानंतर महापौरांसह उपमहापौर, सभागृह नेत्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधत मुंढेंच्या कार्यशैलीवर कठोर टीका करीत मुंढेंची बदली योग्य ठरवून बदलीचे स्वागत केले. मुंढे यांची बदली म्हणजे हुकूशाही कारभारामुळे वैतागलेल्या नाशिककरांसह सर्व १२७ नगरसेवकांचा विजय असल्याची भावनादेखील महापौरांनी व्यक्त केली. हेकेखोरीला सरकारने लगाम घातल्याचा दावा आमदार बाळासाहेब सानप यांनी केला.

मुंढेंची बदली बुधवारी झाली असली, तरी त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले नसल्याने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी बुधवारी चुप्पी साधली होती. परंतु, गुरुवारी मुंढेंच्या बदलीचे आदेश धडकताच महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले. प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुंढे यांच्या बदलीचा सरकारने घेतला निर्णय स्वागतार्ह असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया महापौरांनी व्यक्त केली. नऊ महिन्यांपासून मुंढे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कारभाराला संपूर्ण शहर त्रासले होते. लोकप्रतिनिधींचा अवमान जणू मुंढे यांना हक्काचा वाटत होता. शहरविकासासाठी करवाढ व्हावी, ही भावना वाईट नाही. परंतु, नाशिककरांवर अवाजवी करवाढ लादणे अन्यायकारक होते. त्याविरोधात भाजप नगरसेवकांनी आवाज उठविल्यानंतर मुंढेंनी नगरसेवकांना जणू शत्रूसमान वागणूक देण्यास सुरुवात केली. २५७ कोटींच्या रस्तेविकासासह सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव रद्द करून नाशिकच्या विकासाला खीळ घातली. नगरसेवकांच्या प्रस्तावांना मुंढेंनी 'ब्रेक' लावत मनमानी कारभार चालविला होता. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करण्याची विनंती त्यांना अनेक वेळा केली गेली. परंतु, त्यांनी हेकेखोरपणा कायम ठेवत नकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळेच त्यांना लोकप्रतिनिधींच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आता यापुढील काळात नाशिककरांना दिलासादायक निर्णय घेतले जातील. शेतकऱ्यांवरील अन्यायकारक करवाढ रद्द करण्याबाबत विचार केला जाईल. मुंढेंनी घेतलेल्या निर्णयांबाबत सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून ते निर्णय बदलण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करून, नवीन आयुक्तांना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामकाज करण्याची विनंती केली जाईल. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र येऊन शहर विकास साधला जाईल, असा मनोदय महापौर भानसी यांनी व्यक्त केला.

------

'मुंढेंची बदली योग्यच'

विकासासाठीच नाशिककरांनी महापालिकेची सत्ता भाजपच्य हाती सोपविली होती. परंतु, नाशिककरांच्या विकासाच्या स्वप्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला. गेल्या ११ वर्षांत १२ वेळा बदली झालेला अधिकारी चांगला कसा असू शकतो? त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्यांची संख्या जेतमेत हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी आहे. प्रत्येक नगरसेवकाला ४५ ते ५० हजारांच्या प्रभागाने निवडून दिले आहे. लोकप्रतिनिधींचा अवमान करून हुकूमशाही कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांची नाशिकमधून बदली होणेच योग्य आहे. यापुढच्या काळात सर्वांना सोबत घेऊन नाशिकच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील.

---

केवळ आमदारकीच नव्हे, तर आपण नगरसेवक, उपमहापौर आणि महापौरपदीही काम केले आहे. परंतु, मुंढे यांच्यासारखा हेकेखोर स्वभावाचा अधिकारी कधी पाहिला नाही. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून नाशिकचे लोकप्रतिनिधी मुंढेंकडून वारंवार होणार अवमान सहन करीत होते. सरकारनेच त्यांच्या हेकेखोर कारभाराला लगाम घातला आहे.

-बाळासाहेब सानप, आमदार

--

मुंढेंनी शहरवासीयांची अपेक्षापूर्ती करण्याऐवजी वादच अधिक निर्माण केले. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नेहमीच दडपणाखाली ठेवले. ७० टक्के शहर त्यांनी परस्पर अनधिकृत ठरवले. प्रसिद्धीसाठी अनेक निर्णय घेऊन लोकप्रतिनिधींचा अवमान केला. शिवसेनेने त्यांच्या चुकीच्या कामांवर नेहमीच बोट ठेवले होते. त्यामुळे त्यांची बदली योग्यच आहे.

-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, शिवसेना

--

मुंढेंना काँग्रेसने कधीही विरोध केला नाही. परंतु, मुंढेंचे कामकाज हूकूमशाही पद्धतीचे होते. आयुक्तांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित असताना नेमके उलटे काम करण्याची त्यांची पद्धत होती. लोकशाहीला अभिप्रेत काम त्यांच्याकडून होत नव्हते. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांनी महापालिकेत कामच केले नाही.

-शाहू खैरे, गटनेते, काँग्रेस

--

दत्तक नाशिकच्या विकासासाठी आणलेल्या मुंढेंनी नाशिक शहर भकास करण्यास सुरुवात केली होती. शेतकऱ्यांवर करवाढ, अंगणवाड्या बंद करणे, नागरिकांना वेठीस धरण्याचे काम त्यांनी केले. लोकप्रतिनिधींचा अवमान करणे हाच त्यांचा उपक्रम होता. त्यामुळे त्यांच्या बदलीने फार मोठे आभाळ कोसळले नसून, हा बदलीचा निर्णय योग्यच आहे.

-सलिम शेख, गटनेते, मनसे

--

देशात प्रथमच शेतकऱ्यांवर कर लावण्याचा अविवेकी आणि बेकायदेशीर निर्णय मुंढेंनी घेऊन गरीबविरोधी असल्याचे दाखवून दिले होते. करवाढीबाबतचा त्यांचा निर्णय नियमाच्या बाहेर जाऊन होता. त्यांच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायच झाला होता. त्यांच्या बदलीचा निर्णय योग्य असून, त्यांनी आता तरी दिल्या घरी सुखी राहावे.

-उन्मेश गायधनी, सल्लागार, कृती समिती नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ कोटींचा टीडीआरच देणार

$
0
0

घंटागाडी, टीडीआर घोटाळा चौकशीसाठी समिती, रेडिरेकनर दर आकारणी प्रस्ताव महासभेवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाडी आणि टीडीआर घोटाळ्याची चौकशीचे आदेश सभापतींनी दिले असताना सभेच्या कार्यवृत्तात त्याचा उल्लेख नसल्याने स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत नगरसचिवांना धारेवर धरले. चर्चेअंती संबंधित कार्यवृत्त तहकूब करीत येत्या आठवडाभरात या दोन्ही प्रकरणांच्या चौकशीसाठी समिती जाहीर करण्याचा निर्णय सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी दिला. तसेच गंगापूर रोडवरील सर्व्हे क्रमांक ७०५ मधील आरक्षित भूखंडाचा सुमारे २१ कोटी रुपये रोख मोबदला देण्याऐवजी सदस्यांच्या मागणीनुसार टीडीआरद्वारे मोबदला देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

स्थायी समितीची बैठक गुरुवारी सभापतींच्या अध्यक्षतेखाली झाली. समितीच्या २ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सभेत घंटागाड्यांच्या अनियमितेवर वादळी चर्चा होऊन ठेका रद्द करण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले. तसेच, टीडीआर घोटाळ्याविषयीही जोरदार चर्चा होऊन चौकशी अहवाल महिनाभरात सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले होते. परंतु, या प्रकरणाची चौकशी सुरू झाली तर नाहीच; मात्र या सभेच्या कार्यवृत्तात याविषयी शब्दभरही उल्लेख न आल्याने सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत नगरसचिवांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. सभेत तीन-चार तास चर्चा होऊनही प्रशासन त्याची दखल घेत नसेल तर सभा घेण्यात अर्थ नाही, असे नमूद करीत या सभेचे कार्यवृत्त तहकूब करून त्यात दुरुस्ती करण्याची सूचना दिनकर पाटील, संतोष साळवे, मुशीर सय्यद, प्रवीण तिदमे, भागवत आरोटे आदींनी केली.

घंटागाडीच्या चौकशीचे आदेश स्थायी समितीने दिले असताना घाईघाईत घंटागाडी ठेकेदारांची कोट्यवधींची देयके प्रशासनाने कशी अदा केली, असा सवालही सदस्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. घंटागाडी आणि टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी तात्काळ समिती गठीत करण्यात यावी, अन्यथा सभागृहातच ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी सदस्यांनी दिला. चर्चेअंती सभापतींनी दोन्ही प्रकरणांच्या चौकशीसासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी दिला.

संस्थांना मिळणार दिलासा

महापालिकेच्या मालकीचे समाजमंदिर, वाचनालय, व्यायामशाळा, अभ्यासिका, आदी मिळकती रेडीरेकनर दराने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा स्थायी समितीचा अधिकार कायमस्वरूपी आयुक्तांना देण्याच्या प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या प्रस्तावाला स्थायी सदस्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. या मिळकती सेवाभावी संस्थांच्या ताब्यात असल्यानेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीची तोशीस महापालिकेला लागत नसल्याचा दावा करीत यासंदर्भातील महासभा, स्थायी समितीचे अधिकार प्रशासनाकडे गहाण ठेवण्याची गरज नसल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केल्याने संबंधित प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी पाठविण्याचा निर्णय सभापतींनी जाहीर केला. त्यामुळे मिळकतींबाबत आता अंतिम निर्णय हा महासभाच घेणार असल्याने या मिळकत वापरत असलेल्या संस्थांना दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांचे गुन्हेगारांशी संबंध!

$
0
0

आमदार अनिल गोटे यांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील गुंडाशी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे महापालिकेची निवडणूक मुक्त वातावरणात होऊच शकत नाही, असा आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. या मंत्र्यांसह त्यांचे स्वीय सहायक, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी यांना जिल्हाबंदी करा, अशी मागणीही आमदार अनिल गोटे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. जर आयोगाने दखल घेतली नाही तर पोलिस अधिकाऱ्यांमधील संवेदनशील संभाषण मुंबईत माध्यमासमोर जाहीर करू, असा इशाराही त्यांनी गुरुवारी (दि. २२) पत्रकार परिषदेतून दिला आहे.

आमदार पत्नी हेमा गोटे यांचा अवमान करणारी पोस्ट सोशल मीडियावर शहरातील विनोद थोरात याने टाकली होती. त्याला अटक होऊन जामीनदेखील मिळाला. मात्र, या थोरात प्रकरणात मातृत्वाचा अवमान करणाऱ्याला या तीनही मंत्र्यांनी संरक्षण दिल्याचा आरोप आमदार गोटे यांनी केला. मंत्री आणि त्यांच्या दलालांचे संभाषणात उल्लेख असतानादेखील तपास यंत्रणेने साधा जवाबही नोंदवून घेतलेला नाही. यामुळे शासकीय अधिकारीदेखील मोठ्या दडपणाखाली काम करीत असल्याचेही गोटे म्हणाले. यांसारख्या अनेक घटनांचा उल्लेख निवडणूक आयोग दिल्ली व मुंबई यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून केला आहे, अशी माहितीही आमदार गोटे यांनी यावेळी दिली. या सर्व प्रकरणाची ऑडिओ संभाषणाची सीडीदेखील सोबत दिली असून, निवडणूक आयोगाने आपण केलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही तर सोमवारी (दि. २६) संबंधित संभाषणाची सीडी मुंबईत प्रसार माध्यमासमोर खुली करणार, असेही ते म्हणाले.

अन्सारी फातमा बिनविरोध

धुळे महापालिकेची निवडणूक दि. ९ डिसेंबर रोजी होणार असून, यासाठी शहरातील १९ प्रभागांतील ७४ जागांसाठी ७३२ उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरले आहेत. या अर्जांची छाननी गुरुवारी करण्यात आली. यात प्रभाग क्रमांक १२ अ मधून समाजवादी पक्षाकडून उमेवारी दाखल करणाऱ्या अन्सारी फातमा नुरल अमीन यांचा एकमेव अर्ज छाननीवेळी मंजूर झाला तर इतर तीन जणांचे अर्ज बाद झाल्याने त्या बिनविरोध ठरल्याचे निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांनी घोषित केले. त्यामुळे आता ७३ जागांसाठी निवडणूक होणार असून, समाजवादी पक्षाच्या अन्सारी फातमा नुरल अमीन या बिनविरोध नगरसेविका ठरल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर भाजपनं फोडले फटाके

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या तडकाफडकी बदलीविरोधात त्यांच्या निवडक समर्थकांनी गुरुवारी राजीव गांधी भवनावर मोर्चा काढत पालकमंत्री व आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. मात्र, दुसरीकडे विरोधकांनी ‘रामायण’बाहेर फटाके फोडून मुंढेच्या बदलीचा आनंदोत्सव साजरा केला.

आंदोलकांच्या थेट प्रवेशाने गोंधळ
महापालिकेत एरवी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश करण्यासाठी तीन ठिकाणी तपासून आत सोडले जाते. परंतु, गुरुवारी मुंढे समर्थकांना महापालिकेत पायघड्या घालण्यात आल्या होत्या. सुरक्षारक्षकांनी मुंढे समर्थकांपुढे लोटांगण घालत त्यांना प्रवेशद्वारावरून थेट आतमध्ये जाण्यास मदत केली. मोर्चातील चार ते पाच जणांच्या शिष्टमंडळालाच मुख्यालयात प्रवेश दिला जाणे अपेक्षित असताना २० ते २५ जणांना आश्चर्यकारकरीत्या प्रवेश दिला गेला. सुरक्षा यंत्रणेवर टीका झाल्याने अखेर या मोर्चेकऱ्यांना मुख्यालयाच्या आतील प्रवेशद्वारावच थोपवून धरण्यात आले. या ठिकाणी या मुंढे समर्थकांनी पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे आमदार, तसेच महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मुंढे गेले, फटाके फुटले...
मुंढे समर्थकांकडून एकीकडे महापालिकेत घोषणाबाजी सुरू असताना दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसमोर, तसेच महापौर निवासस्थान ‘रामायण’समोर जल्लोष साजरा करीत फटाक्यांची आतषबाजी केली. महापौर निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी एकच गर्दी केली होती. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, नगरसेवक उद्धव निमसे, मुकेश शहाणे आदींच्या चेहऱ्यांवर मुंढेंने बदलीचे हास्य झळकताना दिसत होते. बदलीचा जल्लोष थेट फटाके फोडून साजरा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिरावणीजवळ गाडी उलटली

$
0
0

उत्तर प्रदेशचे ११ भाविक जखमी

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथून दर्शन आटोपून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या उत्तर प्रदेशातील प्रवाशांची गाडीचा संदीप फाउंडेशननजिक अपघात झाला. यात ११ भाविक जखमी झाले. यातील सात भाविकांना नाशिक जिल्हा रुग्णालयात तर इतर भाविकांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

त्र्यंबकेश्वर येथे दर्शन करून नाशिककडे येताना महिरावणी गावाजवळ संदीप फाउंडेशन कॉलेज परिसरात सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास वेगात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडीत २० भाविक होते. त्यापैकी ११ जण जखमी झाले. जखमी असलेल्या ११ पैकी चार भाविकांची प्रकृती गंभीर असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडीचालक आसीम आयुम शेख (वय ३५) हा गंभीर जखमी आहे. आधान सिंह (वय १० महिने), निधतसिंह (वय २ महिने) दशसिंह वय (दीड वर्षे) विष्णूसिंह (६० वर्षे), लतासिंह (वय ६० वर्षे), विश्वनाथसिंह (वय ७० वर्षे), शालिनीसिंह (वय ३० वर्षे), शैलासिंह (वय ३० वर्षे), चंद्रेश कुमारी (वय ७० वर्षे), यथार्तसिंह आणि

अमितसिंह (वय ९ वर्षे) अशी जखमींची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्ट्यांचा विळखा घट्ट

$
0
0

अस्वच्छतेचे साम्राज्य; नगरसेवकांचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

शहराच्या विकासात मोलाचा वाटा असलेल्या इंदिरानगर परिसराचा विकास झपाट्याने होत असला तरी या भागाच्या चारही बाजूला झोपडपट्ट्यांचा विळखा वाढत आहे. तेथील कष्टकऱ्यांना घरकुले देण्याची घोषणा होऊनही प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने झोपडपट्ट्यांमुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण होऊन गुन्हेगारीही वाढत आहे. वडाळा गावाजवळ किंवा भारतनगर परिसरात घरकुल उभारणी झाली असली तरी झोपड्यांचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही.

इंदिरानगर परिसरात भारतनगर, राजीवनगर, स्प्लेंडर हॉल, पाथर्डी फाटा परिसर, वडाळागाव येथील झोपडपट्ट्या आहेत. राजीवनगर वसाहत अनेक वर्षांपासूनची असली तरी तेथील वसाहतीमुळे परिसरात अस्वच्छता वाढतच आहे. या वसाहतीच्या तीनही बाजूंना कायम कचऱ्याचे ढिग पडलेले असतात. तसेच राजीवनगर वसाहतीलगतच्या मोकळ्या भूखंडावर घाण व गवतांचे साम्राज्य आहे. नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी व सूचना मांडूल्यानंतरही या प्रश्नी लक्ष घातले जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या वसाहतीसमोर शंभर फुटी रस्त्यावरून कायम वाहतूक धावते. मात्र, या ठिकाणी घाणीच्या साम्राज्यामुळे अनेक नागरिक रस्त्याने जाणे सुद्धा टाळतात. हगणदारीमुक्‍त योजनेंतर्गत या ठिकाणी कायमस्वरूपी शौचालयाची व्यवस्था गरजेची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या वसाहतीत राहणाऱ्यांना घरकुल योजनेत का सामावून घेण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजीवनगर वसाहतीत यापूर्वी अनेकदा खून, हाणामाऱ्यांसारखे गुन्हे घडलेले आहेत. तसेच महामार्गाच्या समांतर रस्त्यालगत स्प्लेंडर हॉल जवळही अशाच प्रकारची वसाहत उभी राहिली आहे. त्यामुळे तेथेही घाणीच्या साम्राज्यासह कायम रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी व सांडपाणी वाहतनांना दिसत असते. विशेष म्हणजे या दोन्ही वसाहती वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या रस्त्यालगत असल्याने याठिकाणाहून वाहतूक करताना ही अनेक अडचणी येत असतात.

गुन्हेगारची केंद्र

वडाळा गावालगत झोपडपट्टीचे अतिक्रमण काही दिवसांपूर्वी काढण्यात आले. येथील नागरिकांना घरकुलांत घरे मिळाली असली तरी ते झोपडपट्टीतच राहत असल्याचा आरोप केला जात आहे. वडाळागावातील या झोपट्टपट्टीतही अनेक वेळा वादविवाद, हाणामारीचे प्रकार होत असल्याने गुन्हेगारीचे केंद्रच म्हणून याकडे पाहिले जात असते. भारतनगर येथेही झोपडपट्टी असून तेथील रहिवाशांना घरकुल योजनेत सामवून घेण्यात आले. तरीसुद्धा तेथे अजूनही काही अनधिकृत झोपडपट्ट्या दिसून येतात.

परिसराचा विकास खुंटला

इंदिरानगर परिसरातलगतच्या झोपडपट्ट्यांमुळे विकासकामेही खुंटल्याचे चित्र तयार झाले आहे. तसेच झोपडीवासीय केर-कचरा रस्त्यावरच टाकत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नगरसेवक किंवा प्रशासनाकडे वारंवार प्रश्न मांडल्यानंतरही यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

लोगो : व्यथा इंदिरानगरच्या

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिचडीवरच भागवावी लागतेय भूक

$
0
0

कोतवालांचे आंदोलन सरकारकडूनही बेदखल

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

चतुर्थ श्रेणी पदाचा दर्जा देऊन सहावा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेतर्फे कामबंद ठेवून येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पाच दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची सरकारने अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामळे कोतवालांनी शुक्रवारी (दि. २३) सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यभरातील कोतवालांनी कामावरही बहिष्कार टाकलेला असल्याने तलाठ्यांच्या दैनंदिन महसूल विषयीच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे.

राज्याच्या महसूल विभागाच्या कामकाजात कोतवालाची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, असे असूनही सरकारकडून राज्यातील कोतवालांची अवघी पाच हजार रुपये मानधनावर बोळवण केली जाते. याशिवाय कोतवालांच्या माथी इतरही शासकीय कामे थोपविली जातात. चतुर्थ श्रेणी दर्जाच्या पदाची सर्व कामे राज्यभरातील कोतवालांकडून करवून घेतली जात असली तरी या पदास मात्र चतुर्थ श्रेणी पदाचा दर्जा सरकारने दिलेला नाही. याच मागणीसाठी राज्यातील कोतवालांनी काम बंद ठेवून धरणे आंदोलन सुरू केले आहे. परंतु, अद्यापही या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नसल्याने या आंदोलक कोतवालांनी सरकारच्या या धोरणाचा निषेध करीत शुक्रवारी जोरदार घोषणाबाजी केली.

संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश इंगोले, नाशिक विभागाचे अध्यक्ष कैलास कोळी, औरंगाबाद विभाग उपाध्यक्ष बाळू नागरे, नागपूर विभागाचे उपाध्यक्ष रवींद्र बोदेले, अमरावती विभाग अध्यक्ष पुरुषोत्तम साखरे, उपाध्यक्ष राजेश केंडे, कोकण विभागाचे अध्यक्ष अनंत भोसले, उपाध्यक्ष दीपक आरेकर, महिला आघाडीच्या माधुरी हंकारे, माधुरी आहिरे, क्रांती जाधव आदींनी उपस्थित कोतवालांना मार्गदर्शन केले.

तुटपुंजे मानधन

धरणे आंदोलनात राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील सुमारे दीड हजार कोतवाल सहभागी झालेले आहेत. त्यांना भोजनासाठी आंदोलनस्थळीच दररोज खिचडी तयार करून त्यावर भूक भागविली जात आहे. कोतवालांना अतिशय तुटपुंजे मानधन मिळत असल्याने आवश्यक व पुरेसे अन्न मिळविणे राज्यातील कोतवालांना अशक्य होत असल्याची व्यथा याप्रसंगी शरद कडाळे, उत्तम सानप, किरण पठारे, नामदेव शिरसाठ, भाऊसाहेब आढाव आदी कोतवालांनी मांडली.

राज्यातील ढिगभर कामे करवून घेत सरकार कोतवालांच्या कायदेशीर मागण्यांकडे दुर्लक्ष करून आमची थट्टा करीत आहे. पूर्वीपासून वेतनासह इतर शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्तेही मिळत होते. परंतु, एकछत्र योजना समिती नेमून सरकारने राज्यातील कोतवालांची दिशाभूल केली आहे.

- कैलास कोळी, अध्यक्ष, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला लवकरच पाइपलाइनद्वारे नॅस?

$
0
0

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या पथकाने दिली भेट

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस या कंपनीच्या पथकाने भेट देऊन नागरिकांच्या घरात पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याबाबत अनुकुलता दाखविली आहे. नाशिक येथे याच कंपनीने पाइपद्वारे गॅस पुरवठा करण्याचे काम हाती घेतले आहे. शहरात देखील अशा प्रकारे गॅस पुरवठा करणे शक्य असल्याचे महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचे जनरल मॅनेजर सुजीत रूईकर यांनी सांगितले आहे.

बलसाडपासून नाशिक येथे गॅसलाइन ञ्यंबकेश्वर शिवारातून जाणार असल्याने त्र्यंबकेश्वर येथे गॅसपुरवठा करणे सहज शक्य होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचे तंत्रज्ञ व अधिकारी यांचे दहा व्यक्तींचे पथक आले होते. नगर पालिका आरोग्य सभापती विष्णू दोबाडे, भाजप शहर सरचिटणीस संतोष भुजंग, दत्ता जोशी, हर्षल शिखरे, माजी नगराध्यक्ष प्रशांत तुंगार यांनी पथकाचे स्वागत केले. त्र्यंबकेश्वर शहराची आणि आजुबाजूच्या लोकवस्तीची माहिती दिली. शहरात नळावाटे गॅसजोडणी करण्यासाठी विनंती केली. मंदिरात हे पथक दर्शनासाठी आले देवस्थान ट्रस्टचे विशेष कार्यकारी अधिकारी राधाकृष्ण जोशी यांनी स्वागत केले. त्यांचाशी चर्चा करीत येथील कार्यपद्धती समजावून घेतली आहे. त्यानंतर नगरपालिका कार्यालयात नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांची भेट घेतली. शहरासाठी असलेल्या योजनेची माहिती दिली. चर्चेत नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी शहराची संपूर्ण माहिती दिली. नळाद्वारे गॅस कनेक्शनसाठी अनुकुलता दर्शविली आहे. नागरिकांसाठी फायद्यासाठी असलेला हा उपक्रम राबविण्यास नगर पालिकेकडून सहकार्य मिळेल असे त्यांनी सूचित केले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये गॅस कनेक्शन करिता सर्वेक्षण करण्यात येईल, असे जनरल मॅनेजर यांनी सांगितले आहे. नाशिक येथे जाणारी गॅसलाइन त्र्यंबकमार्गे जाणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा तासांत चोरटे गजाआड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील किल्ला पोलिस ठाण्यानजीक असलेल्या ताबानी किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री चोरी करून रोकड लंपास केली होती. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस ठाण्याजवळच चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. चोरांना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर किल्ला पोलिसांना त्या चोरट्यांना अवघ्या १२ तासांत जेरबंद केले आहे.

गुरुवारी सकाळी दुकान मालक मोहमद अल्ताफ हे दुकानावर आले असता हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी दुकान मालक यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . दरम्यान पोलीस ठाण्यानजीक चोरी झाल्याने किल्ला पोलिसांपुढे चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान होते. पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, उपनिरीक्षक यू. व्ही. गोपाळ, पोलिस नाईक किशोर नेरकर, गणेश कुमावत, मनोज चव्हाण आदींनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्या चोरट्यांचा छडा लावाला. मोहंमद सुफीयान अहमद (वय २३, रा. आयेशानगर), हसनैन रजा मोहमद याकुब (वय २१, हुडको कॉलनी) या दोघांना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली असून त्यांच्याकडून ३९ हजार रुपये जप्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images