Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘त्या’ निर्णयांचा फेरविचार करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नगरसेवक निधी, रस्ते या सत्ताधारी भाजपच्या ड्रीम प्रोजेक्टवर फुली मारणाऱ्या तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढें यांच्या बदलीचे मिशन पूर्ण झाल्यानंतर भाजपने मुंढेंनी रद्द केलेले प्रस्ताव व योजना पुन्हा कार्यान्वीत करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. महापौर, सभागृहनेता, गटनेत्यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन शेतीवरील कर रद्द करण्यासह बजेटमधे प्रस्तावित केलेली कामे, नगरसेवक निधी, ६२ हजार मिळकतींचे व्हेरिफिकेशन करा, अंगणवाड्या पुन्हा सुरू करा, प्रलंबित बांधकाम परवानग्या मार्गी लावण्याची मागणी केली. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गमेंनी आस्तेकदम घेत, अभ्यास करून पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली.

महापालिकेत भाजपची सत्ता येऊन पावणेदोन वर्षे झाली तरी, भाजपला अद्याप भरीव काम करता आलेले नाही. उलट शहरातील बांधकाम परवानग्या ठप्प होणे, अंगणवाड्या बंद होणे, नागरिकांवर भरमसाट कर लादल्याने भाजपबद्दल नागरिकांमध्ये नाराजी वाढली. सत्ताधारी भाजपने २५७ कोटींच्या रस्त्यांचा प्रोजेक्ट तयार करून तो मंजूर करून घेतला. परंतु, तुकाराम मुंढे यांनी त्रिसूत्री लावून त्यावर काट मारली. मुंढेंनी तर करयोग्य मूल्यात प्रचंड वाढ करून करवाढीचे ओझे नाशिककरांवर टाकले. शेतीवरही कर लादला. त्यामुळे भाजप आणि मुंढे यांच्यातील संघर्ष मुंढेंच्या बदलीनेच थांबला. त्यांच्या जागेवर आलेल्या राधाकृष्ण गमे यांच्याकडे भाजप नेत्यांनी पुन्हा जुन्याच मंजूर परंतु रद्द झालेल्या कामांचा पुन्हा रेटा लावला आहे. महापौर रंजना भानसी, सभागृहनेते दिनकर पाटील आणि गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी बुधवारी आयुक्त गमेंची भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने शहरात भेडसावत असलेल्या समस्या आणि प्रश्नांची जाणीवर आयुक्तांना करून दिली. यावेळी सन २०१८-१९ च्या बजेटमध्ये मंजूर केलेली परंतु, नंतर मुंढेंनी थांबवलेली कामे मार्गी लावण्याची मागणी केली. मुंढेंनी काट मारलेला ७५ लाखांचा नगरसेवक निधी देण्यात यावा, मिळकत सर्वेक्षणात नव्याने आढळलेल्या ६२ हजार मिळकतींना दिलेल्या नोटिसांमध्ये त्रुटी आहेत. त्यामुळे या त्रुटी दूर करून सर्व घरपट्ट्यांचे व्हेरिफिकेशन करून त्यात सुधारणा करावी, शेतीवरील कर रद्द करावा, कॉलनी रस्त्यांचे सर्वेक्षण करून अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, बंद केलेल्या अंगणवाड्या सुरू कराव्यात, नगररचना विभागातील ऑटो डीसीआर प्रणालीमुळे बांधकाम परवानग्या ठप्प पडल्या आहेत. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली असून, त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई

शहरातील बांधकाम व्यवसाय हा गेल्या तीन ते चार वर्षांपासून ठप्प आहे. एकीकडे ऑटो डीसीआर प्रणालीतल्या त्रुटींमुळे नवीन परवानग्या रखडल्या आहेत.तर दुसरीकडे कंम्पाऊंडीग पॉलिसीमध्ये जवळपास चार हजार प्रकरणे दाखल आहेत.यावर मार्ग निघत नसल्याने व्यावसायिकांसह ग्राहकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ऑटो डीसीआर यंत्रणेत लवकरच दुरुस्ती करण्यात येऊन कम्पाउंडिंग पॉलिसीअंतर्गत दाखल केलेल्या प्रकरणांची छाननी करून उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमााणे निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

करवाढीबाबत आक्रमक

तत्कालीण आयुक्त तुकाराम मुंढेंनी करयोग्य मूल्यात वाढ करत शेतीवरही कर लादला होता. या करवाढीच्या निर्णयामुळे भाजप विरोधात जनतेत रोष आहे. नव्या करवाढीच्या नोटिसा नागरिकांच्या हातात पडल्यानंतर रोष अधिकच वाढत आहे. त्यामुळे करयोग्य मूल्यात सुधारणा करण्यासह शेतीवरील कर पूर्ण रद्द करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. काहीही करा पण करात दुरुस्ती करा, अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना केली आहे. त्यावर आयुक्तांनीही अभ्यास करूनच निर्णय घेऊ, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे करवाढीचा रेटा कायम राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सायकल रॅली उद्यापासून

$
0
0

सायकल रॅली उद्यापासून

जेलरोड : नाशिक ते शेगाव सायकल रॅली शुक्रवारी (दि. १४) निघणार असून यात शंभरहून अधिक सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. यात वयवर्ष १० पासून ७३ पर्यंतच्या नाशिककरांचा सहभाग असेल. सुमारे ३९० किलोमीटरच्या या रॅलीत तीन दिवस मुक्काम असेल. पहिल्या दिवशी १६० किलोमीटरचा पल्ला पार करून धुळे येथे मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी १३० किलोमीटरचा मुक्काम जळगावजवळ तर तिसऱ्या दिवशी शंभर किलोमीटरवरील शेगावला शेवटचा मुक्काम राहील. परतीचा प्रवास रविवारी (दि. १६) सुरू होईल, अशी माहिती समन्वयक डॉ. आबा पाटील आणि नाशिक सायकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर ‘त्यांचे’ सभासदत्व रद्द करणार

$
0
0

संस्थेची बदनामी करणाऱ्यांना अध्यक्ष रवींद्र कदम यांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील काही नाट्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर केलेले आरोप खोटे आहेत. जे सभासद असे आरोप करणाऱ्यांमध्ये सामील होते त्यांचे सभासदत्व कायमस्वरुपी रद्द केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांनी दिला आहे.

कालिदास कलामंदिरातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बुधवारी बोलत होते. राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालात नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ढवळाढवळ करून निकालात फेरफार केल्याचा आरोप काही कलाकारांनी केला होता, त्यास उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. नाट्य परिषदेच्या पत्रकार परिषदेसाठी दिग्दर्शक सचिन शिंदे, प्रशांत हिरे यांच्यासह नाट्य कलावंत हजर होते.

यावेळी अध्यक्ष कदम म्हणाले, की नाट्य कलावंतांची मातृशाखा म्हणून नाट्य परिषद काम करीत असते. सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या निमंत्रणावरुन आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. त्यामुळे आम्ही परीक्षकांवर दबाव टाकला असे म्हणणे चुकीचे आहे. मागील वर्षी माझ्या मेनली अॅम्युचर्स या संस्थेचे नाटक स्पर्धेत होते. त्यावेळीही मी स्पर्धेचा उद्घाटक होतो. त्यावर्षी माझ्या संस्थेला एकही पारितोषिक मिळाले नाही. मला जर फेरफेर करायचे असते तर मी माझ्या संस्थेला बक्षिस मिळवून देऊ शकलो असतो. गेल्या अनेक वर्षापासून मी रंगभूमीची सेवा करतो आहे. असे गैरकृत्य करणे माझ्या रक्तात नाही त्यामुळे काही संस्थांनी केलेल्या आरोपांमुळे मी व्यथित झालो आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जे सभासद या कलाकारांबरोबर होते त्याच्यावर संस्थेची बदनामी केली म्हणून संस्थेच्या घटनापत्रक व नियमावलीतील कलम ८ व पोटकलम ४ नुसार कारवाई करुन सभासदत्व रद्द केले जाईल.

यावेळी संस्थेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे म्हणाले, की आजवर असे काम केले नाही; करणार नाही. या ठिकाणी कुंपणच शेत खाते आहे, याचा सांस्कृतिक कार्य संचलनालयाने तपास करावा. ज्या मानसी राणे यांच्यावर दबाव टाकून स्पर्धेत फेरफार करण्याचा आरोप केला जातो आहे त्या राणे यांनी सांस्कृतिक कार्य संचलनालयाला पत्र दिले आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, की आकसापोटी परिक्षकांची बदनामी करण्यात येते आहे. मी कधीही याबाबत समोर येऊन बोलण्यास तयार आहे असे त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या श्री समर्थ सहकारी बँकेने रौप्य महोत्सवात पदार्पण केले असून, बँकेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदावर प्रशांत पुरंदरे आणि उपाध्यक्षपदावर अलका कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

सहायक निबंधक संजय गिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली. नवीन कार्यकारिणीच्या अधिपत्याखाली रौप्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कार्यकारिणीत कार्यकारी संचालकपदी डॉ. रवीकिरण निकम यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष अॅड. जालिंदर ताडगे, माजी कार्यकारी संचालक श्रीपाद कुलकर्णी, ज्येष्ठ संचालक अॅड. लक्ष्मण उगावकर, बाळकृष्ण कुलकर्णी, अरुण भांड, मकरंद सुखात्मे, राधाकृष्ण नाईकवाडे, नरेंद्र कुलकर्णी, मनोज गोडसे, हेमा दशपुत्रे, तज्ज्ञ संचालक अरुण कुकडे, सुनील पत्की उपस्थित होते.

बँकेचे माजी संचालक सुहास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी त्रिगुण कुलकर्णी, देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, काळाराम मंदिर संस्थांचे विश्वस्थ अॅड. अजय निकम, नगरसेविका हेमलता पाटील यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले. तसेच रौप्य महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्करोग रुग्णांना ‘जपायगो’चा आधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्करोगाच्या निदानाबरोबरच रुग्णांवर उपचारासाठी जपायगो या सामाजिक संस्थेने सरकारी हॉस्पिटल्सकडे मदतीचा हात पुढे केला आहे. कर्करोगाचे रूग्ण शोधून तातडीने उपचारांद्वारे त्यांचे आयुर्मान वाढविण्याच्या उद्देशाने काम केले जाणार आहे.

शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयात 'इन्व्हेस्टिगेशन टू स्ट्रेथनिंग कॅन्सर केअर इन नाशिक' या उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रमाच्या सहसंचालक डॉ. साधना तायडे यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, मानवता क्युरी सेंटरचे डॉ. राज नगरकर, जपायगो संस्थेचे राज्य समन्वयक डॉ. पराग भांबरे आदी मान्यवर उपस्थित होते. कर्करोगाचे रुग्ण वाढत असून या रोगाचे वेळीच निदान होत नसल्याने रूग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळेच जिल्हा रुग्णालय आणि जपायगो संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कर्करोगग्रस्त रुग्णांचा शोध घेण्यावर भर दिला जाणार आहे. कर्करोगाचे निदान झाल्यास अशा रुग्णांवर वेळेत योग्य उपचार सुरू करणे शक्य होऊ शकणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शिल्पा बांगर यांनी केले तर आभार डॉ. राहुल विधाते यांनी मानले.

कर्करोगाबाबत जनजागृतीवर भर

कर्करोगाची लक्षणे, त्यावरील उपचार पद्धती, कर्करोगग्रस्त रुग्ण दगावण्यामागील कारणे, कर्करोग होऊ नये यासाठी घ्यावयाची दक्षता याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात १७ टक्के रुग्णांना मौखिक तर २० टक्के रुग्ण स्तनाच्या कर्करोगाचे आढळले आहेत. १६ टक्के रुग्णांना गर्भाशयाचा तर ३९ टक्के अन्य कर्करोगाने ग्रस्त रुग्ण आहेत. त्यामुळे कर्करोगाबाबत जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'माओवाद्यांना वेळीच ओळखा'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साम, दाम, दंड किंवा भेद अशा कुठल्याही टोकाच्या तंत्राने लोकशाही आणि संविधानाच्या मार्गाला धक्का पोहचवून सत्ता हस्तगत करणे, हेच माओवाद्यांचे प्रमुख ध्येय आहे. स्वत: उपेक्षित जनतेचे कैवारी असल्याचे चित्र पद्धतशीरपणे बनवत हे माओवादी समाजात छुप्या चेहऱ्याने राजरोसपणे वावरतात. समाजातील सर्व स्तरातील घटकांचा उपयोग ते अतिशय बेमालूमपणे त्यांच्या विध्वंसक उद्दिष्टासाठी करतात. 'फोर्थ जनरेशनर वॉर' नावाने हे छुपे युद्धतंत्र आपल्या भोवतालीही पोहचले आहे. ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे कारस्थानी माओवाद्यांचा खरा चेहरा वेळीच ओळखा, असे आवाहन कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमालेप्रसंगी 'माओवाद आणि अंतर्गत सुरक्षा' या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रकाश पाठक उपस्थित होते.

गायकवाड म्हणाल्या, की फोर्थ जनरेशन युद्धतंत्रात शत्रू अदृश्यमार्गे लढतो. यात नागारिकांच्या मनाचा ताबा घेऊन त्यांनाच सरकार विरोधात भडकावले जाते. नक्षलवाद आणि माओवाद यात फरक नाही. क्रांतिकारी स्थळांची साखळी तयार करून हल्ला करून राजकीय शक्ती हस्तगत करण्याकडे माओचा कल होता. त्यांनी कायम हिंसक कृत्यांनाच साथ दिली. जनतेच्या सेवेचे त्यांनी केवळ दिखावा केल्याचा त्यांनी यावेळी सांगितले.

'कोरेगाव भीमा'त सहभाग

कॅप्टन गायकवाड यांनी यावेळी एल्गार परिषदेवरही स्लाईड शोद्वारे सादरीकरण करत उपलब्ध शासकीय नोंदीचे विश्लेषण केले. त्या म्हणाल्या, की भीमा कोरेगाव दंगलीमागे हिंदूत्त्ववादी किंवा आंबेडकरवाद्यांचा कुठलाही सहभाग नसून हा विध्वंस माओवाद्यांनीच घडवून आला. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या भीमा कोरेगाव सत्यशोधन समितीचा अहवाल तेच सांगतो. माओवादी हे संविधानास प्रखर विरोध करतात; पण कोणताही आंबेडकरवादी हा संविधान विरोधी नसतो. त्यामुळे माओवादी हे आंबेडकरवादी नसल्याचेही गायकवाड यांनी यावेळी निक्षून सांगितले. एल्गार परिषदेसाठी महाराष्ट्र गोळा करणारे खरे कारस्थानी मात्र या परिषदेला प्रत्यक्षात न जाता पुण्यात लपून राहिले. याबाबत माध्यमांनी त्यांना विचारता परिषदेच्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले होते. त्यांचे लपणे हे संशयास्पद असल्याचे कॅप्टन गायकवाड यांनी सांगितले.

'ते' ट्विटर हँडल पाकमधून!

नक्षलवादी किंवा माओवाद्यांचा खरा चेहरा समजावून घ्या. कारण, लोकशाही आणि संविधान नाकारणारी ही विध्वंसक शक्ती देशासाठी घातक आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. या शक्तींच्या देशातील अस्तित्वाचा फायदा थेट पाकिस्तानसारखे शत्रूराष्ट्र कसे घेते याबाबत त्यांनी महाड सत्याग्रहाच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमाचे उदाहरण दिले. या कार्यक्रमाप्रसंगी चालविण्यात आलेले व्टिटर हे पाकमधून चालविले गेले. अपेक्षित तोच संदेश देऊन शत्रूराष्ट्रात अशांतता प्रस्थापित करण्याच्या कारस्थानाला अशा कुप्रवृत्तींमुळे चालना मिळते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आज सजग राहण्याची वेळ आहे, असे कॅप्टन गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसीलदार संघटनेचा कोतवालांना पाठिंबा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि सहावा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्यांसाठी येथील विभागीय आयुक्तालयापुढे २४ दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील कोतवालांच्या मागण्यांना महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला आहे. या संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी या पाठिंब्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. कोतवालांच्या आंदोलनाला अधिकाऱ्यांचही पाठबळ मिळाले आहे.

कोतवालांच्या मागण्यांना तलाठी संघटनेने यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. आता महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, कोतवालांच्या काम बंदमुळे महसूल गोळा करण्याची प्रक्रिया ठप्प पडली आहे. परिणामी राज्याच्या तिजोरीत जमा होणारी रसदही प्रभावित झाली आहे. राज्यातील बहुतेक तालुक्यांतील तहसीलदारांनीही महसूल गोळा करण्याचे काम कोतवालांच्या अभावाने ठप्प झाल्याचा अहवाल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याची माहिती कोतवाल संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश इंगोले यांनी दिली. दरम्यान, राज्यातील तुळजापूर, रत्नागिरी, खेड, दापोली, नवापूर, उमरगड, देवगड, उमरखेड, चिपळून, साक्री या ठिकाणाहुन मोठ्या संख्येने कोतवाल आंदोलनस्थळी येत आहेत.

यापेक्षा गावी आंदोलन करा

भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी आंदोलनस्थळी मंगळवारी भेट देत कोतवालांशी चर्चा केली. यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस भारत पवार यांनी कोतवालांच्या प्रलंबित मागण्या आणि शासनाकडून आजवर झालेली दिशाभूल याबद्दल भंडारी यांना माहिती दिली. कोतवालांच्या मागण्या रास्त असून सरकार त्यांचा नक्कीच सकारात्मक विचार करेल. कामबंद आंदोलन तुम्ही तुमच्या गावात राहूनही करू शकता. त्यासाठी इथे थंडी-वाऱ्यात आंदोलन करु नका, अशा कानपिचक्याचीही त्यांनी कोतवालांना दिल्या. मागण्यांपेक्षा आपले आरोग्य महत्त्वाचे आहे, असे सांगून त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे कोतवालांना आवाहन केले.

संयमाची कसोटी बघू नये

कोतवालांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याच्या मुद्द्यावर वर्षभरापूर्वी नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त होऊनही सरकारकडून या अहवालातील शिफारशींच्या आधारे निर्णय घेण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. सरकारने कोतवालांच्या संयमाची कसोटी बघू नये, असे आवाहन राज्य संघटनेचे अध्यक्ष गणेश इंगोले यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्त्रोच्या मदतीने जिल्ह्याचे मॅपिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याच्या विकासप्रक्रियेला गती मिळावी यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्त्रो) मदत घेण्यात येणार आहे. शुक्रवारी १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आणि इस्त्रो यांच्यात याबाबतचा विशेष करार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अशा पद्धतीचा हा देशातील पहिलाच करार असून, नाशिकमध्ये होऊ घातलेला हा प्रयोग राज्यासाठी पथदर्शी ठरेल असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या प्रक्रियेत इस्त्रोचे सहकार्य घेण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी पुढाकार घेतला. यामुळे जिल्ह्यातील रस्ते, खड्डे, पिकांची उपलब्धता, जमिनीचे मृदा परीक्षण याची अचूक माहिती प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वृक्षतोड झालेली ठिकाणे, सिंचनाचे जाळे कुठे विरळ आहे, नदीच्या प्रवाहात सर्वाधिक अतिक्रमण झालेली ठिकाणे यांसह विविध प्रकारची अचूक माहिती इस्त्रोने संकलीत केली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी या माहितीचा उपयोग होऊ शकणार आहे. वन विभाग आणि वन जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांमधील संघर्ष सोडविण्यासाठी या माहितीचा आधार जिल्हा प्रशासनाला घेता येणार आहे. सद्य:स्थितीत वन जमीन कसणारा शेतकरी २००५ पूर्वी जमीन कसत होता किंवा नाही याची अचूक माहिती देखील उपलब्ध होऊ शकणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून एका उपग्रहामार्फत इस्त्रो लोकसभा मतदारसंघाचे खास सर्व्हेक्षण करीत आहे. इस्त्रोकडून जीआयएस अॅप्लिकेशन तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. या सर्व्हेक्षणामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील रस्ते, मोकळी जागा, पाणीपुरवठा योजना, नवीन वसाहती याविषयीची माहिती मिळणार आहे. या करारासाठी इस्त्रोचे चीफ जनरल मॅनेजर डॉ. एस. व्ही. सी.कामेश्‍वरा राव, डॉ. वर्गीस, डॉ. जुगल किशोर मणी, अरूण सूर्यवंशी हे शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सॅटेलाईट इमेजेस या करारान्वये सहजपणे उपलब्ध होऊ शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुकटच्या राखेतून गुन्हेगारीची ‘ठिणगी’

$
0
0

टीम मटा, नाशिक

एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामुळे मुबलक रोजगारसंधी मिळाली. सुबत्ताही लाभली. परंतु, या कारखान्याच्या बॉयलरमधून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणाऱ्या राखेच्या अर्थकारणाने गुन्हेगारीची 'ठिणगी' पडली आहे. तिचा पुढे भडका होऊन एकलहरेसह परिसरातील शहरी भाग तसेच, खेड्यांनाही त्याचा 'चटका' बसू लागला आहे. राखेच्या अर्थकारणावर वर्चस्व घट्ट आणि कायम रहावे, यासाठी विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून केले जाणारे शहकाटशहाचे राजकारण स्थानिकांच्या जीवावरच बेतू लागले आहे.

एकलहरे येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. सध्या तेथील पाचपैकी केवळ तीन संच सुरू आहेत. दोन संचांतून वीजनिर्मिती होते, तर एक संच देखभाल दुरुस्तीसाठी बंद असतो. दररोज येथे सुमारे सहा हजार मेट्रिक टन कोळसा वापरून वीजनिर्मिती केली जाते. त्यातून दोन प्रकारच्या राखेची निर्मिती होते. एक पावडरच्या स्वरुपात, तर दुसरी जाडीभरडी असते. पहिल्या प्रकारची राख महानिर्मितीने टेंडर काढून विविध कंपन्यांना ४५० रुपये टनाप्रमाणे दिली आहे, तर जाडसर राखेवर महानिर्मितीने कोणतेही शुल्क आकारलेले नाही. ती राख व्यावसायिकांना मोफत मिळते. ही राख पुणे, मुंबई या शहरांत हजारो रुपयांना विकली जाते. परिणामी या परिसरात राख वाहतुकीचा धंदा प्रचंड प्रमाणात फोफावला आहे. सध्या येथे १५ ते १६ पोकलेन मशिन अहोरात्र सुरू असून, सुमारे २५० गाड्या दिवसभरातून राख घेऊन रवाना होतात. फुकट मिळालेल्या राखेतून लाखो रुपये घरबसल्या मिळत असल्याने चंगळवादातून येथे गुन्हेगारीने शिरकाव केला आहे. या धंद्यामुळे स्थानिक युवकांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या करिअरवरही परिणाम झाला आहे. राखेच्या धंद्यात आपला जम कायम राहावा, यासाठी अंतर्गत गुन्हेगारी स्वरुपाचे राजकारण येथे कायमच खदखदत असते. त्याचा फटका दसक, पंचक, गोरेवाडी, जेलरोड या शहरी भागासह कोटमगाव, सामनगाव, सिन्नरफाटा, हिंगणवेढे, ओढा, गंगावाडी या खेड्यांनाही बसू लागला आहे.

...

वर्चस्ववाद अन् राजकारण

एकलहरेत राखेच्या धंद्यात सनी भागवत, नगरसेवक विशाल संगमनेरे, अतुल धनवटे, अनिल कापसे, सुका वारडे, विजय होलीन यांसारख्या मंडळींचा दबदबा आहे. या व्यावसायिकांत वर्चस्ववादातून नेहमी खदखद सुरू असते. इतरांना या धंद्यात उतरू दिले जात नाही. बाहेरील राज्यांतील वाहतूकदारांवरही दादागिरी केली जाते. यापैकी नाशिक महापालिकेत भाजपच्या तिकिटावर नगरसेवकपदी निवडून गेलेले विशाल संगमनेरे यांचा गुन्हेगारी स्वरुपाचा इतिहास जगजाहीर आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्याकडील ऑफिसबॉयकडे पिस्तूलही आढळून आले होते. यावरून या धंद्यातील काही व्यावसायिक शस्त्र तस्करीसारख्या प्रकरणांत अडकल्याचेही दिसून आले. या व्यवसायाच्या आडून येथे दारूविक्री, मटका, जुगार यांसारख्या अवैध धंद्यांचाही उगम झाला. टवाळखोरांची येथे कमी नाही. राख आणि अवैध धंद्यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर राजकारणात केला जातो. राख विक्रीबाबत कोणतेही नियम नसल्याने काही धरबंधच राहिलेला नाही. मध्ये येणाऱ्यांना आडवे केले जाते. आता तर काही जण तेथे संस्थानिक बनले असून, या मंडळींना राजकारणविरहीत अनेक नेत्यांचा आशीर्वाद आहे. साहजिकच पोलिसांचे हात बांधले गेले आहेत.

...

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावले

शांताराम सहाणे यांच्या मालकीचे सरकारमान्य दारू विक्री दुकान अतिक्रमित असल्याचे सांगून ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी दुकान स्थलांतराचे आदेश दिले असतानाही ते पाळले गेले नाहीत. अवैध धंदे चालविणाऱ्यांची मजल जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झिडकारण्याइतपत गेल्याने येथील गुन्हेगारी प्रवृत्ती किती खोलवर रुजली आहे, याची प्रचीती येते. एकलहरे गावात ग्रामपंचायतीने दारुबंदीचा ठराव मंजूर केलेला आहे. असे असले तरी देशी दारूची बेकायदेशीरपणे विक्री या भागात सर्रास सुरू असते. देशी दारूचे अड्डे वाड्या-वस्त्यांवर पसरलेले आहेत. नेहे मळा, अरिंगळे मळा, सिद्धार्थनगर, एकलहरे ते जेलरोड मार्ग, गोरेवाडी या ठिकाणी मिळणारी देशी दारू ही एकलहरे येथील केंद्रातूनच पोहोच होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी भागात ‘पर्यटन सर्किट’ विकसित करणार

$
0
0

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळावी यासाठी तोरणमाळ, प्रकाशा व सारंगखेडा हे पर्यटनाचे सर्किट पूर्ण करण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदेच्या काठावर गमन हे आदिवासी गाव विकसित करून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला भेट देणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करणार असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.


सारंगखेडा येथे आयोजित ‘चेतक महोत्सव - २०१८’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ. विजयकुमार गावीत, उदेसिंग पाडवी, चेतक महोत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सहाय्यक जिल्हाधिकारी वान्मती सी., अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस अधीक्षक संजय पाटील, सरकारसाहेब रावल, पर्यटन विभागाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, सहव्यवस्थापक आशुतोष राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, तळोदा न.पा. अध्यक्षा अजय परदेशी, दोंडाईच्या शहराच्या नगराध्यक्षा नयनकुवर रावल, सारंगखेडा सरपंच सुशिलाबाई मोरे, मंदीराचे सचिव भिकनभाई पाटील, बाबा रावल उपस्थित होते.

मंत्री रावल म्हणाले, सारंगखेडा यात्रा तीनशे वर्षांपासून भरत असून, या यात्रेत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बलुचिस्तान या ठिकाणाहून घोडे विक्रीसाठी येत होते. आता या यात्रेचे स्वरुप बदलेले असून, सारंगखेडा महोत्सव, चेतक महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. पूर्वी दीड दिवसाच्या होणाऱ्या यात्रेत घोड्यांना येणारी वाढती मागणी लक्षात घेता कालावधी वाढला आहे. घोडा बाजार व यात्रेत वेगवेगळ्या वस्तुंची विक्रीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. तसेच परिसरातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. सारंगखेडा महोत्सवात दरवर्षी किमान ८० कोटींची उलाढाल होते, असेही रावल यांनी यावेळी सांगितले.

या महोत्सवात येणाऱ्या विदेशी पर्यटकांना राहण्यासाठी टेंट सिटी निर्माण केली असून, ते महोत्सवाला भेट दिल्यानंतर या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. त्यामुळे यात्रेचे आकर्षणही वाढणार आहे. सारंगखेडा येथे येत्या काळात सारंगखेडा हॉर्स पार्कची आणि रेसिंग पार्कची व्यवस्था करण्यात येणार आहे. पुष्कर येथे भरणाऱ्या महोत्सवासारखे स्वरुप चेतक महोत्सवाला देण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. चेतक महोत्सवात स्थानिक कलाकारांना आपल्या कलागुणांचे दर्शन येणाऱ्या पर्यटकांना व्हावे यासाठी वेगळे व्यासपीठ तयार करण्यात आले असून नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा असला तरी येथील आदिवासी संस्कृती, त्यांचे राहणीमान त्यांनी तयार केलेले पदार्थ पर्यटकांसाठी उपलब्ध करुन देण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जयकुमार रावल व उपस्थित मान्यवरांनी एकमुखी दत्तांचे दर्शन घेतले. या वेळी चेतक महोत्सव समितीतर्फे ढोल, ताशा व वेगवेगळ्या पथकांची आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात?

$
0
0

वरिष्ठांच्या निर्णयाकडे इच्छुकांच्या नजरा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेच्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांमध्ये मातब्बर, अनुभवी, उच्च शिक्षित तसेच तरुण व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे महापौरपदी कोणाची वर्णी लागते, याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, आता या पदासाठी स्पर्धा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या पदासाठी ठेकेदार शीतल नवले, उद्योजक हर्षकुमार रेलन, भाजपच्या गटनेत्या प्रतिभा चौधरी, विद्यमान स्थायी समिती सभापती वालीबेन मंडोरे यांच्या नावांची जास्त चर्चा आहे. दरम्यान, महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेचा कार्यकाळ दि. ३१ डिसेंबरला संपुष्टात येणार आहे. महापालिकेत सन २००९ ते २०१३ या पंचवार्षिक काळात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना दुसऱ्या अडीच वर्षाच्या काळासाठी मंजुळा गावित यांच्या माध्यमातून फक्त तीन नगरसेवक असतानाही भारतीय जनता पार्टीला महापौरपद मिळाले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच भाजपने महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे धुळ्यात दुसऱ्यांदा भाजपाचा महापौर बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यांच्या नावांची चर्चा
महापौरपदासाठी भाजपात स्पर्धा होणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र, पक्षश्रेष्ठी सांगतील तीच व्यक्ती महापौरपदी विराजमान होणार आहे. त्यामुळे सध्या तरी या पदासाठी माजी महापौर मोहन नवले यांचे सुपुत्र शीतल नवले, उद्योजक हर्षकुमार रेलन यांची नावे आघाडीवर आहेत. शीतल नवले व त्यांचे काका रावण नवले यांच्यातील लढत चर्चेच्या केंद्रस्थानी होती. या लढतीत पुतणे शीतल नवले यांनी बाजी मारली आहे. तर हर्षकुमार नवले हे माजी नगरसेवक असल्याने त्यांनाही मनपातील कामकाजाचा अनुभव आहे. तर भाजपाच्या गटनेत्या प्रतिभा चौधरी या चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. स्थायी समितीच्या सभापती वालीबेन मंडोरे याही राजकारणात नवीन नाहीत. त्यांनी सभापतीपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे ही नावे महापौरपदाच्या स्पर्धेत असण्याची शक्यता आहे. परंतु, मनपातील भाजपाचा दुसरा महापौर कोण? याविषयी नागरिकांमध्ये निरनिराळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. निवडणुकीनंतर विजयी झालेल्या उमेदवारांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करण्याची तयारी महापालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे. कदाचित आज (दि. १३) नाव राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर गट नोंदणी केली जाणार असून, त्यानंतरच महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला जाईल, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाने घर सोडले अन सुनेने बाहेर काढले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कौटुंबिक वाद होतात आणि थोड्याशा तूतू-मैमैनंतर हे पेल्यातील वादळ शांतही होते. मात्र कधी कधी ईर्षा, तिरस्कार इतका वाढतो की त्यातील नाती गळून पडतात. सुडाग्नी या नात्यांना काळिमा फासण्याचे काम करतात. असेच एक प्रकरण जिल्हा कोर्टात आले. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या विभागात काम करणाऱ्या त्या महिलेच्या परिस्थितीवर अखेर कोर्टानेही आश्चर्य व्यक्त करीत सुनेविरुद्ध मनाई हुकूम काढला.

महिलेच्या पतीचे निधन झालेले असून, ती एका केंद्र सरकारी कार्यालयात काम करून आपला उदरनिर्वाह करते. पतीच्या माघारी पदरात पडलेल्या मुलाच्या डोक्यावर छत हवे म्हणून तिने स्वकष्टाने कमाविलेल्या पैशांच्या मदतीने गोविंदनगर येथे घर घेतले. मुलाचे लग्न झाले अन सुरू झाला एक कटकटीचा प्रवास. दिवाळीच्या सणाची लगबग सुरू असताना या घरात वाद उभा राहिला. पोटच्या मुलाने आणि सुनेने नको नको ते ऐकविले. या भांडणानंतर मुलगा घरातून बाहेर पडला. तो कोठे गेला, काय करतो याची कोणतीही माहिती महिलेला नाही. मागील महिन्याच्या अखेरीस सुनेने कहर करीत सासूला घराबाहेर काढले. आपल्याच घरातून अंगावरच्या कपड्यांवर हुसकावून दिल्यानंतर महिलेसमोर अनेक प्रश्न उभे राहिले. स्वकष्टाने कमाविलेल्या प्रॉपर्टीच्या वादाने त्या विधवा महिलेला एका क्षणात बेघर केले. कधी नातेवाईकांकडे, तर कधी मैत्रिणींकडे असे करीत आणि आपले काम सांभाळणाऱ्या महिलेने शेवटी अॅड. गायत्री उदगीरकर आणि अॅड. प्रणव चंद्रात्रे यांच्यामार्फत कोर्टात धाव घेतली. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी. व्ही. धांडे यांच्या कोर्टात सुनावणी झाली. दोन्ही बाजूने झालेल्या युक्तिवादानंतर कोर्टाने महिलेला दिलासा देणारा सुनेविरुद्ध मनाई हुकूम काढला. याबाबत बोलताना अॅड. उदगीरकर यांनी सांगितले की, वृद्धापकाळात मुले मनमर्जी छळ करतात. आपल्याच प्रॉपर्टीवर ठाण मांडतात. अशा सर्व वृद्धांसाठी आणि छळ करून प्रॉपर्टी घेऊ पाहणाऱ्या मुलांसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरला आहे. महिला ज्या ठिकाणी काम करते, त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घालण्यावरसुद्धा सुनेला मनाई करण्यात आली आहे. कोर्टाने दिलेल्या मनाई हुकमाची अंमलबजावणी झाली असल्याचे अॅड. उदगीरकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात कालअपव्यय थांबवा

$
0
0

माधव भंडारी यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

शासकीय अधिकारी काम कसे करतात यावरच सरकारप्रती जनतेच्या मनात सद्भावना निर्माण होत असते. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन कामाकडे बघण्याचा अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन बऱ्याचदा दुर्दैवी आढळून येतो. या विभागातील काम अधिकाऱ्यांना शिक्षाही वाटते. परंतु, पिढ्यानपिढ्या वास्तव्य करणाऱ्यांना प्रकल्पासाठी स्थलांतर करावे लागते, त्यांच्या भावनांचा विचार अधिकाऱ्यांनी करावा आणि कामात नियमांचा बाऊ करुन उगाच वेळेचा वाया घालवू नये, असे प्रतिपादन राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले.

विभागातील विविध प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाच्या कामाची विभागीय आढावा बैठक बुधवारी विभागीय आयुक्तलयातील सभागृहात माधव भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी ते बोलत होते. या विभागीय आढावा बैठकीस विभागीय आयुक्त राजाराम माने, उपायुक्त ज्ञानेश्वर खिल्लारी, अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव, भाजपचे लक्ष्मण सावजी आदींसह विभागातील अधिकारी उपस्थित होते.

विभागातील प्रकल्प प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाच्या कामाचा भंडारी यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक प्रथम घेतली. त्यानंतर प्रकल्पबाधितांसोबत चर्चा करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित विविध प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसनाचे काम अपूर्ण असल्याचा व झालेली कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा थेट आरोप केला. उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांकडून मात्र पुनर्वसनाचे काम झाल्याचा दावा करण्यात आला.

कश्यपी धरणग्रस्तांच्या नोकरीचा मुद्दा जलसंपदा व मनपाच्या वादात भरडला जात असल्याचे यावेळी उघड झाले. भाम धरणग्रस्तांच्या समस्या निशांत निकम, रमेश गव्हाणे, भावली धरणग्रस्तांचे प्रश्न भानुदास लोखंडे, वाघाडचे प्रश्न संजय थेटे, पुणेगाव कालवा प्रकल्पबाधितांचे प्रश्न भूषण घुले, मुकणे धरणग्रस्तांचे प्रश्न सुनील चोरडिया, दमणगंगा व झरी प्रकल्पाचे सर्वेक्षणामुळे निर्माण झालेले प्रश्न डॉ. प्रशांत भदाणे, नांदूर मध्यमेश्वर एक्स्प्रेस कालवा वितरिका प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समीर आंबोरे आदींनी मांडले.

काँग्रेसची वाटचाल स्वबळाकडे

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निकालांचा आगामी लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. काँग्रेसला यापुढे मित्रपक्षांची राज्यात गरज राहणार नसून हा पक्ष स्वबळावरच लढविण्याची शक्यता भंडारी यांनी यावेळी व्यक्त केली. नोटबंदी आणि जीएसटीमुळे भाजपचा पाच राज्यांमध्ये पराभव झाल्याचे त्यांनी अमान्य केला. राज्यातही भाजप इतर मित्रपक्षांना विचारात घेत नसल्याच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी बोलणे टाळले. धुळे महापालिकेचे मिळविलेल्या यशाची पुनरावृत्ती येत्या लोकसभा निवडणुकीत होईल, असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएमचषक स्पर्धेच्या जागेचे भूमीपूजन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात सीएम चषक स्पर्धेच्या जागेचे भूमीपूजन व मांडव उभारणी कामांचा शुभारंभ भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते कल्याणसिंग परदेशी व परशुराम दळवी तसेच श्रीराम विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव मुखेडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. या स्पर्धेसाठी ४० हजार खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात १४ ते २३ डिसेंबरपर्यंत तपोवन येथे १५ व १६ डिसेंबर दरम्यान पंचवटी येथील श्रीराम विद्यालय येथे कब्बडी, खो-खो, व्हॉलीबॉल, कॅरम व कुस्ती स्पर्धा होणार आहेत. १६ डिसेंबर रोजी १०० मी व ४०० मी धावणे ही स्पर्धा स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे होणार आहे. २२ व २३ डिसेंबर रोजी गायन व नृत्य स्पर्धा औरंगाबाद नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. २३ डिसेंबर रोजी भाजीबाजार पटांगण येथे व नाशिकरोड विभागासाठी शिखरेवाडी हॉल, येथे रांगोळी स्पर्धा होणार आहे. २५ डिसेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक पंचवटी आणि नाशिकरोड भागासाठी राजराजेश्वरी मंगल कार्यालय येथे चित्रकला स्पर्धा होणार आहे.

स्पर्धा यशस्वीतेसाठी चंद्रशेखर पंचाक्षरी, बाजीराव भागवत, अमित घुगे, दिगंबर धुमाळ, सचिन हांडगे, दिपक सानप, सागर परदेशी, शांताराम घंटे, प्रियंका कानडे, मंदा फड यांसह क्रीडा प्रशिक्षक प्रशांत भाबड, क्रीडा विभाग प्रमुख विलास पाटील, प्रद्युम्न जोशी, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याचे आमदार सानप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात ऑनलाइन लॉटरी योजना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

म्हाडाची लॉटरी योजना व इतर कामात पारदर्शकता यावी व काम सोपे व्हावे यासाठी मुंबईसारखी ऑनलाइन प्रक्रिया संपूर्ण राज्यातील कार्यालयात सुरू करणार असल्याची माहिती 'म्हाडा'चे अध्यक्ष उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यासाठी आयटी विभाग व अधिकाऱ्यांशी आधी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

या ऑनलाइन प्रक्रियेमुळे सर्वांना लॉटरी योजनेचा फॉर्म भरणेही सोपे जाणार आहे. नाशिक विभागात ११९३ सदनिकांची विक्री लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. त्यामुळे येथेही मुंबईसारखी प्रक्रिया राबवल्यास त्याचा फायदा काम करताना होणार आहे. या ऑनलाइन प्रक्रियेत 'म्हाडा'च्या साइटवर लॉटरी सोडत टाकल्यास त्यातून माहिती फॉर्म उपलब्ध होणार आहे. त्या फॉर्मवर सर्व माहिती भरून कागदपत्रेही अॅटॅच करता येणार आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या कॅटेगिरीत घर हवे, हेसुद्धा येथे नमूद करता येणार आहे.

म्हाडातर्फे आतापर्यंत झालेली कामे, त्याची स्थिती व पुढे करायची कामे यासाठी दिवसभर आढावा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी म्हाडातर्फे आगामी काय प्रकल्प राबवता येतील याबद्दलही माहिती घेतली.

राज्याचा कला व क्रीडा महोत्सव

म्हाडा अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते. यावेळी नाशिक विभागाकडे यजमानपद आहे. त्यामुळे १२०० कर्मचारी राज्यभरातून येणार आहेत. त्याबाबतही आढावा घेण्यात आला. या स्पर्धा ८ ते १३ जानेवारीदरम्यान होणार आहेत. त्यात क्रिकेट सामना, सांस्कृतिक स्पर्धा व क्रीडा सामने यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आनंद महिंद्रा विरुद्ध आनंद महिंद्रा

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : आनंद महिंद्रा हे नाव भारतात नव्हे तर जगात एक ब्रॅण्ड म्हणून ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी एका सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानेही यावर शिक्कामोर्तब केले. नाशिकमधील एका उद्योजकाने आपल्या आणि वडिलांच्या नावाचा वापर करीत एक उद्योग सुरू केला. या उद्योगाला 'आनंद महिंद्रा' असे नामकरण करण्यात आले. अर्थातच नावाचा हा 'वाद' आता हायकोर्टात पोहचला आहे. दोन्ही पक्ष आपापल्या नावावर ठाम असून, यात कोण आणि कशी बाजी मारेल, हे येत्या सोमवारी स्पष्ट होऊ शकते.

नाशिकमध्ये बिल्डर आणि उद्योजक म्हणून काम करणाऱ्या महिंद्र आनंद बच्छाव यांनी काही वर्षांपूर्वी अंबड परिसरात आयटी कंपनी सुरू केली. वडील आणि स्वत:च्या नावामुळे त्यांनी या कंपनीस आनंद महिंद्र आयटी कंपनी असे नामकरण केले. अर्थातच ही माहिती महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीपर्यंत पोहचली. त्यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली. बच्छाव यांनी हे नाव काढून टाकवे अशी मागणी नोटिशीद्वारे करण्यात आली. आपण आपल्या आणि वडिलांच्या नावाचा वापर केला असून, त्यात काहीही गैर नसल्याचा मुद्दा बच्छाव यांनी नोटिशीला उत्तर देताना मांडला. यानंतर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतर्फे अॅड. हिरेन कमोद यांनी न्यायमूर्ती एस. जी. काथावाला यांच्या कोर्टात दावा दाखल केला. आनंद महिंद्रा हे नावच एक ब्रँड असून, त्याच्या वापराबाबत निर्बंध घालणे आवश्यक असल्याचा मुद्दा अॅड. कमोद यांनी मांडला. आनंद हे नाव वडिलांचे असून, महिंद्रा हे नाव मुलाचे आहे. त्यामुळे महिंद्रा आनंद असे नाव समजू शकले असते. मात्र, त्यात फेरबदल करण्यात आल्याचा मुद्दा अॅड. कमोद यांनी कोर्टासमोर उपस्थित केला. कमोद यांच्या या म्हणण्यास बच्छाव यांनी हरकत घेतली. मात्र, कमोद यांनी मांडलेले मुद्दे कोर्टाने तूर्तास ग्राह्य मानत वेबसाइटसह इतर ठिकाणी असलेल्या नावाच्या वापराबाबत निर्बंध घातले आहेत. बच्छाव यांनी 'आनंद महिंद्रा' हे नाव वगळून दुसरे नाव कंपनीस द्यावे, हा वादाचा मुद्दा असून, त्यावर गत सोमवारी (दि. १०) हायकोर्टात सुनावणी झाली. नाव बदलाबाबत विचार करण्यासाठी बच्छाव यांनी वेळ मागितला. त्यानुसार कोर्टाने ही सुनावणी १७ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

नावातच सगळं आहे...

नावात काय असते, असा प्रश्न उपस्थित करून आपल्याकडे कंपनीचे नाव, लोगो रजिस्टर करणे टाळले जाते. त्यामुळे भविष्यात वाद उद्भवू शकतात. नाशिकमध्ये असे आतापर्यंत तीन ते चार प्रकरणे समोर आली असून, याबाबत उद्योजकांनी, व्यावसायिकांनी सुरुवातीपासूनच काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वयाच्या ६७ व्या वर्षी अवयवदान जनजागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वय वर्षे ६७, किडनी १८ वर्षांपूर्वीच मित्राला दान केलेली, आर्थिक परिस्थितीही चणचणीची परंतु, अंगी इच्छाशक्ती इतकी प्रबळ, की अवयवदानाविषयी देशभर जनजागृती करण्याचा निर्णय घेतला २१ ऑक्टोबरपासून तो प्रत्यक्ष आणण्यास सुरुवात केली. सांगली तालुक्यातील ढवळी या छोट्याशा गावातील प्रमोद लक्ष्मण महाजन यांची ही समाजसेवा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. रिबर्थ फाउंडेशनचे सदस्य असलेले महाजन दहा हजार किलोमीटर प्रवास करून देशभर अवयवदानाविषयी जनजागृती करत आहेत. नाशिकमध्ये ते गुरुवारी जनजागृतीसाठी आले होते.

याविषयी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. प्रमोद महाजन यांसह नाशिक विभागाचे डॉ. उदय साकुरीकर, शरद सायंकर, चंद्रकांत चिंचोले यांची यावेळी उपस्थिती होती. महाजन यावेळी म्हणाले, की गेल्या वर्षी ब्रेन डेडमुळे एक लाख सात हजार व्यक्ती मृत पावल्या. त्यापैकी केवळ ८१७ व्यक्तींनीच अवयवदान केले. अवयवदानाविषयी अद्याप लोकांमध्ये गैरसमज, भीती, माहितीच नसणे यामुळे हे प्रमाण अत्यंत कमी आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी व अवयवदानाची चळवळ तळागाळात रुजविण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. याचसाठी १०० दिवस, १८ राज्य व दहा हजार किलोमीटर प्रवास दुचाकीवरून करण्याचे निश्चित केले असून या माध्यमातून देशभर जनजागृती करत आहे.

मोहिमेचा पुण्यात समारोप

प्रमोद महाजन यांचा प्रवास २१ ऑक्टोबरपासून सुरू झाला असून २५ जानेवारीला या मोहिमेचा पुण्यामध्ये समारोप होणार आहे. आतापर्यंत महाजन यांनी सूरत, अहमदाबाद, जयपूर, उदयपूर, पटना, लखनऊ, चंदीगड, कोलकाता, नागपूर, भोपाल, इंदौर आदी ठिकाणी जनजागृती या मोहिमेअंतर्गत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय स्पर्धेसाठी मनपा शाळेची निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

महापालिकेच्या जेलरोड पंचक येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ४९ ने 'ए वर्ल्ड इन मोशन ऑलिम्पिक्स २०१८' मध्ये स्कीमर या स्पर्धेत विजेतेपद मिळवले. या संघाची चंडीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सोसायटी ऑफ अटोमोटिव्ह इंजिनीअर आणि महिंद्रा कंपनीच्या सामाजिक निधीतंर्गत ही स्पर्धा कालिका देवी मंदिराच्या आवारात घेण्यात आली. स्पर्धेत प्रत्येक शाळेचा चार विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला. संघामध्ये प्रोजेक्ट इंजिनियर, फॅसिलिटी इंजिनीअर व दोन टेस्ट इंजिनीअर असतात. विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले. त्यांनी स्कीमर व जेट राय बनवले. त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये अचूकता, वेग, अधिक अंतर चालणे, वळण घेणे आदींचा समावेश होता. त्यातून मुलांना गती, घर्षण, हवेचा दाब, वचन अशा वैज्ञानिक संकल्पना समजल्या. प्रकल्पातून मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. या चाचण्यातून विद्यार्थ्यांना नवीन कल्पना सादर करुन भविष्यातील उत्कृष्ट स्किमरबाबत सादरीकरण करता आले. महिंद्रा नाशिक प्रकल्पाचे उपाध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाली.

मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील, प्रकल्प समन्वयक संजय काकड, कमलाकर धोंगडे यांनी उदघाटन केले. नाशिक सायकलिस्टचे डा. महेंद्र महाजन, महिंद्र गुणवत्ता विभागाचे महाव्यवस्थापक अनिक के. राजा यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. सुनील जानोरकर, अभिजित पुराणिक, रुपाली फुले, सूचकता कुलकर्णी, शिरीष जोग, हेमंत शिरसाठ, दर्शन ठक्कर, संजय गाढे, नरेंद्र निकुंभ आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रीवरील अत्याचाराचे ‘वैराण’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आजची स्त्री कितीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन अवकाश भ्रमण करून आली तरीही तिला उपभोगाची समजली जाते, तिच्या आवाजाला आजही दाबले जातेय, अशा आशयाचे नाटक सादर करण्यात आले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६ व्या नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत गुरुवारी कामगार कला केंद्र, जोशी कॉलनी, जळगावच्या वतीने 'वैराण' हे नाटक सादर करण्यात आले. प. सा. नाट्यगृहात या स्पर्धा सुरू आहेत. स्त्रीला नेहमीच पुरुषी अहंकाराचा मारा झेलावा लागतो आणि ती विविध प्रकारच्या अत्याचारांना बळी पडते. अशाच काही घटनांना एकित्रत करून वैराण हे नाटक रसिकांपुढे ठेवण्यात आले आहे. प्रेम आणि विश्वासाच्या नावावर तिचा छळ करून तिला जगासमोर नाडले जात आहे. आणि या गोष्टी समाजात रोज घडूनही समाज मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. एखादी मेणबत्ती पेटवून बातमीपत्र चाळत बसण्यापलिकडे समाज काहीही करीत नाही हे कुठेतरी थांबावे असा या नाटकाचा आशय होता.

नाटकाचे लेखन व दिग्दर्शन आकाश बाविस्कर यांनी केले. पार्श्वसंगीत हितेश सावळे यांनी केले. वेशभूषा चारुलता जगताप यांनी वेशभूषा व रंगभूषा केली. नाटकात प्रतीक्षा इंगळे, स्वाती सकट, नेहा पवार, हर्षा शर्मा, वैष्णवी खैरनार, स्वप्नील इंगळे, सागर मराठे, प्रेमकुमार बडगुजर, सुशांत कुळकर्णी यांसह कलाकारांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक

ऋतू आठवणींचे

कामगार कल्याण केंद्र, देवळालीगाव वसाहत

स्थळ : प.सा.नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६ वाजता

..

\Bलोगो : कामगार कल्याण नाट्य \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्येही आता धान्य बँक

$
0
0

नाशिक : ठाणे, पुणे येथे अनेक गृहिणी एकत्र येऊन गेल्या तीन वर्षांपासून 'धान्य बँक' चालवत आहेत. असा अनोखा उपक्रम लवकरच नाशिकमध्ये सुरू होत आहे. यासंदर्भात पहिली बैठक शनिवारी (दि. १५) सायंकाळी चार वाजता गोळे कॉलनीतील काका गद्रे कार्यालयात होणार आहे.

आधाराश्रम, बालिकाश्रम, वृद्धाश्रम, तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना मोठ्या प्रमाणावर धान्याची गरज असते. या संस्थांना मदत करण्याच्या हेतूने नाशिकचे माहेर असलेल्या आणि लग्नानंतर ठाण्यात स्थायिक झालेल्या उज्ज्वला बागवाडे यांनी अनेक गृहिणींना एकत्र घेऊन धान्य बँक सुरू केली. या बँकेतर्फे प्रत्येक कमावत्या हाताला दर महिना एक किलो धान्य, वर्षाला बारा किलो धान्य किंवा वार्षिक ६०० रुपयांचे आवाहन केले जाते.

सध्या या बँकेचे ४०० हून अधिक सभासद आहेत. एकूण ५२ गृहिणी या बँकेचे काम सांभाळत आहेत. आतापर्यंत या बँकेमार्फत २५ हजार किलोंपेक्षा अधिक अन्नदान केले जात आहे. सात संस्थांना धान्य बँकेने दत्तक घेतले आहे. तसेच श्रद्धा फाउंडेशन, शांतीवन, आधार, सेवाश्रम यासारख्या अनेक संस्थांना ही बँक धान्य पुरवत आहे. शाळेतील मुलांना दानाचे महत्त्व कळावे या हेतूने ठाण्यातील अनेक शाळाही या कामात जोडलेल्या आहेत. आता नाशिक, औरंगाबाद, अमरावती येथे धान्य बँक सुरू होत आहे.

नाशिकमधील तयारीसंदर्भात होणाऱ्या बैठकीला इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. अधिक माहितीसाठी उज्ज्वला बागवाडे (९७६९१२५१४८) आणि गौरी ओक (९७०२३४९५२४) यांच्याशी संपर्क करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images