Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘नारपार’साठी आता एकजुटीचा लढा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यासाठी सिंचनाची एकही जलयोजना नसणे हा अन्यायच आहे. भावी पिढीच्या दृष्टीने नार-पार जलयोजना आमच्यासाठी भावनिक अस्मितेचा प्रश्न झाला असून, आम्ही राजकीय जोडे बाहेर काढून एकजुटीने लढ्यात उतरलो आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी केले.

तालुका सर्वपक्षीय जलहक्क समितीतर्फे नांदगाव तालुक्यातील दहेगाव येथे आयोजित नार-पार जलप्रबोधन गावसभेत संतोष गुप्ता बोलत होते. दुष्काळात तालुका होरपळत असताना माणिकपुंजचे पाणी चाळीसगावकडे पळवून नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे पाणी तातडीने रोखायला हवे. अन्यथा तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार माजेल, असा इशारा गुप्ता यांनी दिला. समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी एकजुटीने लढा उभारण्याचे आवाहन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष नीलेश चव्हाण, 'आम आदमी'चे तालुकाध्यक्ष विशाल वडघुले, राजाराम जाधव, अर्जुन महाजन, भगवान डांगे-पाटील यांनीही लढा उभारण्याचे आवाहन केले.

निवडणुकीवर बहिष्कार?

तालुक्यात दुष्काळ पडलेला असून, आमदार-खासदार व इतर लोकप्रतिनिधी जनतेकढे ढुंकूनही पाहत नाही. नार-पार प्रकल्पाबाबतही कमालीचे उदासीन आहेत. त्यामुळे निवडणुकीत जनतेने मतदानावर बहिष्कार टाकून त्यांना धडा शिकवावा, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावाना प्रशासक नियुक्तीचा अर्ज फेटाळला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विद्यमान कार्यकारी मंडळाच्या हातातून कारभार काढून घेऊन सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेवर प्रशासक नियुक्त करण्यात यावा अशा मागणीचा अर्ज नाशिकच्या धर्मादाय उपआयुक्त कांचनगंगा जाधव-सुपाते यांनी फेटाळला. हा मागणी अर्ज सावानाचे माजी पदाधिकारी मिलिंद जहागीरदार, स्वानंद बेदरकर व प्रा. विनया केळकर यांनी दिला होता.

मार्च, २०१७ मध्ये सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक झाली. या निवडणुकीबाबतचा सन २०१७ ते २०२२ या कार्यकाळाचा फेरफार अर्ज संस्थेचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी जून, २०१७ मध्ये दाखल केला मात्र या फेरफार अर्जाला सावानाचे माजी पदाधिकारी मिलिंद जहागीरदार, स्वानंद बेदरकर, प्रा. विनया केळकर तसेच पराभूत उमेदवार सुरेश गायधनी यांनी हरकत घेतली होती. हरकतदारांच्या वतीने अॅड. विनयराज तळेकर यांनी या प्रकरणात अर्ज दिला त्यात नमूद करण्यात आले आहे की, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अपात्र व्यक्तींचे अर्ज स्वीकारण्यात आले असून, अपात्र व्यक्तींनी मतदान केले आहे. या निवडणुकीत त्यामुळे प्रा. विलास औरंगाबादकर, श्रीकांत बेणी यांना निवडून देऊन संस्थेचा कारभार त्यांच्या हाती दिला. त्यामुळे संस्थेचा कारभार सध्याच्या कार्यकारी मंडळाच्या हातातून काढून घेण्यात यावा व संस्थेचा कारभार करण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करावी.

या अर्जाबाबत, सावानाच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक संस्थेच्या घटनेप्रमाणे झालेली असून त्याचाच फेरफार अर्ज प्रलंबित आहे. कार्यकारी मंडळ अस्तित्वात असताना प्रशासकाची नियुक्ती करता येणार नाही आणि प्रशासक नियुक्त करणे हे धर्मादाय उपआयुक्त यांच्या कार्यकक्षेत नाही, असा युक्तिवाद प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी केला.

न्यायालयाने श्रीकांत बेणी यांचा युक्तिवाद मान्य केला असून हरकतदाराचा अर्ज कायदेशीर नाही तसेच प्रशासकाची नियुक्ती करण्याचे अधिकार या न्यायालयास नाही,त्यामुळे अर्ज नामंजूर करण्यात येत असल्याचा निकाल दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन फरार संशयित तीन वर्षांनंतर अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फसवणुकीच्या गुन्ह्यात तब्बल तीन वर्षांपासून फरार असलेल्या एका संशयितासह घरफोडीतील सराईतास पोलिसांनी अटक केले. संशयितांच्या अटकेने देवळाली कॅम्प आणि सिन्नर पोलिस स्टेशनमधील दोन गुन्हे उघडकीस आले आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने केली.

सतीश उर्फ बाबा कैलास शिंदे (२२, रा. चारणवाडी, देवळाली कॅम्प) आणि शहानवाज उर्फ शानू अश्पाक शेख (२५, रा. भगूर, देवळाली कॅम्प) अशी अटक झालेल्या संशयितांची नावे आहेत. देवळाली कॅम्प पोलिसात दाखल एका फसवणुकीच्या गुन्ह्यात शिंदे तीन वर्षांपासून फरार होता. तर शानू शेख सिन्नर येथील घरफोडीतील संशयित आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या आदेशान्वये रेकॉर्डवरील आणि सराईत गुन्हेगारांची शोध मोहीम सुरू आहे. त्यानुसार युनिट दोनचे पथक गुन्हेगारांच्या मागावर असतांना पोलिस नाईक संजय ताजणे यांना मिळालेल्या माहितीवरून शिंदे हाती लागला. त्यास देवळाली कॅम्प येथील घरात अटक करण्यात आली. सहाय्यक उपनिरीक्षक श्यामराव भोसले यांना मिळालेल्या माहितीवरून शानू शेख पोलिसांच्या हाती लागला. शानू शेखविरूध्द सिन्नरला घरफोडीचा गुन्हा दाखल असून, त्यास सिन्नर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

युनिटचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अभिजीत सोनवणे, उपनिरीक्षक रविंद्र सहारे, महेश इंगोले, विजय लोंढे, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव, श्यामराव भोसले, राजाराम वाघ, अन्सार सय्यद, श्रीराम सपकाळ हवालदार घडवजे, मधुकर साबळे, संतोष ठाकुर, पोलिस नाईक मोतीलाल महाजन, संजय ताजणे, नितीन भालेराव, देवकिसन गायकर, परमेश्वर दराडे, ललीता आहेर, गुलाब सोनार, शिपाई महेंद्र साळुंखे, यादव डंबाळे, विजय पगारे, योगेश सानप, बाळा नांद्रे, जयंत शिंदे आदींच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन गणिताला विद्यार्थी ऑफलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये वर्षभरापूर्वी मोबाइलद्वारे गणिताचा ऑनलाइन लेक्चर उपक्रम सुरू करण्यात आला होता. पण विद्यार्थ्यांच्या हाती मोबाइल देण्यास पालक इच्छुक नसल्याच्या कारणाने या प्रकल्पास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

'माझाक्लास' या उपक्रमाद्वारे शहरातील मुक्त विद्यापीठातील निवृत्त अधिकारी आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीने ऑनलाइन गणित शिक्षणाचा प्रयोग सुरू करण्यात आला होता. प्रा. प्रफुल्ल चिकेरूर व त्यांच्या टीमने पदरमोड करीत लाखो रुपये खर्चून गणिताच्या उपक्रमशील शिक्षकांच्या मदतीने गणित व विज्ञानाचे धडे देणारे तब्बल १६५ व्हिडीओ मोबाइल इंटरनेटवर उपलब्ध करून दिले होते. २४ तासांतून कुठल्याही क्षणाला या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानाचे हे लेक्चर ऑनलाइन पद्धतीने अभ्यासता येणार होते. मराठी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पैसा आणि वेळ खर्च करून हा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तंत्रज्ञानाच्या पुरेशा जागरूकतेअभावी या उपक्रमास मिळालेला प्रतिसाद अत्यल्प आहे, असा अनुभव चिकेरूर यांनी सांगितला.

सोप्या गणितासाठी होती धडपड

एसएससी बोर्डाकडे नोंदणीकृत शाळांमध्ये सुमारे ८० टक्के विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकतात. गेल्या पाच वर्षांमध्ये गणित आणि विज्ञानातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन न मिळाल्याने या विषयाची ही स्थिती आहे. तर ग्रामीण भागातील याबाबतचे चित्रही विदारक असून सुमारे ४० टक्के विद्यार्थी प्रामुख्याने या दोन विषयांचे कडे भेदू शकत नाहीत. यासाठी या विद्यार्थ्यांकरीता या प्रकल्पांतर्गत सोप्या व सुलभ पद्धतीने गणिते शिकविणाऱ्या शिक्षकांच्या मदतीने लेक्चर्स व्हिज्युअलाइज करण्यात आले होते. यामध्ये कटाक्षाने ॲनिमेशन, बालिश संवाद आदी तंत्रज्ञानाचा वापर टाळला होता. विद्यार्थ्याला मुलभूत संकल्पना समजावून घेताना सोपे जावे, यासाठी थेट शिक्षकाचे व्याख्यान यात उपलब्ध करून देण्यात आले होते. पण समाजातील पुरेशा जागरूकतेअभावी या तंत्रज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांनी अद्याप करून घेतलेला नाही, असे ते म्हणाले.

गणित आणि विज्ञानाविषयीच्या मूलभूत संकल्पनांचे सुलभ मार्गदर्शन करणारी ही संकल्पना ग्रामीण व निमशहरी भागातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोरही ही संकल्पना मांडली.

- प्रा. प्रफुल्ल चिकेरूर,

संचालक, माझाक्लास ऑनलाइन प्रकल्प

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणित होतेय डिजिटल

$
0
0

शालेय अभ्यासक्रमापासून तर अगदी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत किचकट वाटणारा गणित विषय आता सहज अन् सोपा झाला असून, बेरीज वजाबाकीपासून तर भूमितीचे प्रमेय आणि इंजिनीअरिंगची अवघड गणिते फक्त एका क्लिकवर सोडविण्यात येत आहेत. त्यासाठी स्मार्टफोनवरच्या विविध अॅप्सचा वापर होत असून, गणिताच्या कसोट्यांचे धडे आता अॅप्सद्वारे घेणे शक्य झाले आहे. सध्या स्मार्टफोनवर मॅथ्स फॉर्म्युलरी, क‌म्प्लिट मॅथेमॅटिक्स, मॅथ वर्कआऊट, मॅथ एक्स्पर्ट आणि फोटो कॅमेरा कॅल्क्युलेटर यांसारखे शेकडो अॅप उपलब्ध असून, प्रत्येक अॅपचा वापर लाखो युजर्सकडून होताना दिसतो आहे. या अॅप्समध्ये गणितातल्या अनेक लहान-मोठ्या मूळ संकल्पना एकत्र केल्या असून, बीजगणित आणि भूमिती यांचे प्रमेय, संकल्पना, नियम व सूत्रे यांची माहिती यात एकत्रितपणे देण्यात आली आहे. फोटो कॅमेरा कॅल्क्युलेटर सारखे अनेक अॅप्स स्मार्टफोनवर उपलब्ध असून, एखाद्या गणिताचे आकडे फक्त स्कॅन केल्यानंतर लागलीच त्याचे उत्तर देण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेकॉर्डरुममधील दलालयुग संपुष्टात

$
0
0

साडेपाच कोटी कागदपत्रांचे स्कॅनिंग

नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड

डिजिटल इंडियाच्या धोरणांतर्गत नॅशनल लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रामची अंमलबजावणी विभागात आतापर्यंत सुमारे ५ कोटी ६० लाख महत्त्वाच्या कागदपत्रांचे स्कॅनिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. इमेजेसचे व्हेंडर क्वॉलिटी चेकिंगचे आणि मेटा डेटा एन्ट्रीचे कामही वेगाने सुरू आहे. ई-अभिलेखांच्या स्वरुपात संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध झाल्यावर रेकॉर्डरुमधील दलांलांचा हस्तक्षेप इतिहासजमा होणार आहे.

महसूल आणि भूमी अभिलेख कार्यालयांतील रेकॉर्डचे स्कॅनिंग करण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आले आहे. लवकरच नागरिकांना गावदप्तरातील जमिनींचे सातबारा उतारे, फेरफार नोंदवही, इनाम रजिष्टर, मालमत्ता पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड), सातबारा अस्तित्वात येण्यापूर्वीचे कडई पत्रक, जन्म-मृत्यू नोंदी, १९४८ च्या कुळकायद्यातील निर्णय, बत्तीसएम सर्टीफिकेटस या प्रकारचे रेकॉर्ड आता एका क्लिक ऑफ माऊसवर उपलब्ध होणार आहे. डिजिटल इंडियाच्या धोरणांतर्गत महसूल व भूमी अभिलेख या महत्त्वाच्या विभागाकडील जुने रेकॉर्डचे स्कॅनिंग करून हे सर्व रेकॉर्ड नागरिकांना ई-अभिलेखे स्वरुपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. नाशिक विभागात आतापर्यंत स्कॅन झालेल्या कागदपत्रांच्या संख्येच्या प्रमाणात ९८.७१ टक्के भूमी अभिलेखांचे मेटा डेटा एन्ट्रीचे काम पूर्ण झाले आहे.

डिजिटल इंडियाची भरारी

नाशिक विभागात ५ कोटी ३८ लाख २३ हजार ६० इतक्या स्कॅनिंग पृष्ठांची संख्या आहे. पैकी ५ कोटी ६० लाख २४ हजार ६५८ कागदपत्रांचे स्कॅनिंग झाले आहे. पैकी ५ कोटी ६० लाख १ ह्जार ७४२ इमेजेसचे व्हेंडर क्यू. सी. पूर्ण झाले आहे. या सर्व इमेजेसचे शासकीय विभागाकडूनही शंभर टक्के स्कॅन झाले आहे. सर्वात किचकट असे मेटा डेटा एन्ट्री झालेल्या इमेजेसची संख्या ५ कोटी ५२ लाख ९२ हजार २१९ वर जाऊन पोहचली आहे.

भूमी अभिलेख विभागातील सर्व अभिलेखे लवकरच ई-अभिलेखांच्या स्वरुपात नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. रेकॉर्ड स्कॅनिंग आणि तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. नागरिकांना एका क्लिकवर रेकॉर्ड मिळणार असल्याने वेळेची बचत होणार आहे.

- मिलिंद चव्हाण,

उपअधीक्षक, भूमी अभिलेख, नाशिक विभाग

ई-अभिलेख (भूमी अभिलेख) स्कॅनिंग स्थिती

जिल्हा.......स्कॅन झालेल्या कागदपत्रे संख्या

नाशिक..............१,८४,५५,७६५

अहमदनगर.........१,८१,२७,८८१

जळगाव..............१,१८,९७,३२०

धुळे..................४७,५३,७२५

नंदुरबार..............२७,८९९६३

एकूण................५,६०,२४,६५८

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीगावात युवतीचा विनयभंग

$
0
0

देवळालीगावात

युवतीचा विनयभंग

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

देवळालीगाव भागात राहणाऱ्या अल्पवयीन युवतीचा त्याच परिसरातील तरुणाने चॉपरचा धाक दाखवून विनयभंग केला. याबाबत कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित युवती बुधववारी (दि. १९) तिच्या घराबाहेर उभी असताना संशयित सौरभ जयराम लोंढे तेथे आला. त्याने युवतीचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत विनयभंग केला. यानंतर धारदार चॉपर दाखवित घटनेबाबत कोणाला सांगितले तर ठार मारेन, अशी धमकी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पशुहत्या न करण्याचा संदेश देणारे ‘सांबरी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पशूहत्या करू नये, त्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होतो, असा आशय असलेले सांबरी हे नाटक कामगार कल्याण मंडळ, पिंप्राळाच्या वतीने शुक्रवारी सादर करण्यात आले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६ वा नाट्यमहोत्सव परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू आहे.

सांबरी ही गोष्ट जंगलात राहणाऱ्या व सांबर मारून खाणाऱ्या व त्याच्या कातडीचे वस्त्र वापरणाऱ्या आदिवासी जमातीची होती. पशुहत्या थांबावी असा या नाटकाचा मूळ गाभा. रोजच्या धकाधकीच्या जीवनात विविध प्रसार माध्यमांच्या युगात आपल्याकडून कळत नकळत विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे पशुहत्या होतच असते. याविरोधात आपल्याच कुटुंबाला विरोध करणारा आदिवासी यात आहे. पालकांनी पाल्यावर कोणतीही बळजबरी न करता त्यांना स्वच्छंदपणाने आपल्या इच्छेनुसार वागू द्यावे, असा संदेश यातून देण्यात आला.

नाटकाचे लेखन शैलेश गोजमगुंडे यांनी तर दिग्दर्शन पराग चौधरी यांनी केले. रंगभूषा-वेशभूषा मयूर भंगाळे यांची होती. नेपथ्य पूनम थोरवे तर प्रकाश योजना किशोर खोबरे यांची होती. संगीत चेतन सोनार यांचे होते. नाटकात मुकेश अहिरे, सचिन भावसार, युगंधरा ओहोळ, संकेत राऊत, दीपक कोळी, किशोर मराठे, दीपाली सोनार, गोरक्ष कोळी, उमेश गोसावी, मोनी बारेला, कमलेश भोळे, नितीन पाटील यांसह कलाकारांनी भूमिका केल्या.

..

आजचे नाटक

व्हईल ते दणक्यातच

कामगार कल्याण केंद्र, अहमदनगर

स्थळ : प. सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६ वाजता

..

लोगो : कामगार कल्याण नाट्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन लाख शेतकरी कांदा अनुदान लाभार्थी

$
0
0

प्रति क्विंटल २०० रुपयांपर्यंत पैसे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर केल्याने जिल्ह्यात दोन लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या काळात जिल्ह्यात ३५ लाख ८८ हजार १९१ क्विंटल कांदा विकला गेला आहे. यात कमी दराने विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान मिळणार आहे. त्याची आकडेमोड आता सुरू झाली आहे.

सरकारच्या या अनुदानात प्रत्येक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रतिक्विंटल २०० रुपये प्रमाणे जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंतच अनुदान मिळणार आहे. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्यांनी त्यापेक्षा जास्त कांदा विकला असेल तरी त्याला अनुदान २०० क्विंटल पर्यंतच मिळणार आहे. तसेच त्याने दोन किंवा तीन वेळा कांदा विकला तरी त्याची एकत्रित नोंद घेऊन हे अनुदान दिले जाणार आहे. २०० क्विटंलपेक्षा कमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र पूर्ण अनुदान मिळणार आहे. या अटीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला आता ४५ दिवसाच्या कांदा विक्रीच्या नोंदीतून हे निकष लावून आकडे काढावे लागणार आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण यादी पुढे येणार आहे.

४० हजार मिळणार

राज्य सरकारचे २०० रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त २०० क्विंटल पर्यंतच अनुदान मिळणार असल्याने पात्र शेतकऱ्यांना ४० हजार प्रत्येकी अनुदान मिळणार असल्याची चर्चा आहे. पण, कांद्याची विक्री कमी केली असेल तर त्याला कमी अनुदान मिळेल. पाणीटंचाईमुळे यंदा अनेक शेतकऱ्यांचा कांदा हा ५० ते १०० क्विंटल झाल्याचे समजते.

असा आहेत लाभार्थी

बाजार समिती..........शेतकरी संख्या

लासलगांव...............३४१५४

पिंपळगाव................३३२३९

उमराणे...................२४२२६

मालेगांव.................१८८५१

येवला....................१५३३२

चांदवड..................११८२३

नामपूर...................११८२३

सटाणा...................९८१६

मनमाड..................९१९७

देवळा....................९१२८

कळवण..................७९१४

नांदगाव..................७४५६

नाशिक....................६३०७

दिंडोरी....................६२८७

सिन्नर....................२८००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीला पेटविले; सासूवर केला हल्ला

$
0
0

संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला शिवीगाळ करीत लोखंडी गजाने मारहाण केली तसेच अंगावर इंधन ओतून पेटवून दिले. तिला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या सासूलाही जावयाने मारहाण केली. यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत पती, पत्नी व सासू या तिघांवर उपचार सुरू आहेत. ही घटना चांदवड तालुक्यातील राहूड गावात बुधवार (दि. १९) घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब जिजाबा वानखेडे हा पत्नी रत्नाबाई (४०) हिच्यासोबत राहतो. चारित्र्याच्या संशयाने गुलाब व रत्नाबाई यांच्यात बुधवारी सकाळी भांडण झाले. यावेळी गुलाबने रत्नाबाईला शिवीगाळ करीत लोखंडी गजाने मारहाण केली. त्यानंतर अंगावर रॉकेल व डिझेल ओतून देत पेटवून दिले. जावई आपल्या मुलीला पेटवून देत असल्याचे पाहून सासू लीलाबाई गंगाराम देवरे (६५, रा. झोडगे, मालेगाव) या त्याला रोखण्यासाठी धावल्या. गुलाबने डोक्यावर गजाने प्रहार करीत लीलाबाईला जखमी केले. पेटलेली रत्नाबाई आरडाओरडा करीत घराबाहेर पळाली. शेजारच्या लोकांनी धाव घेत तिला विझविले. रत्नाबाई आणि लीलाबाई यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, गुलाबने घरात फाशी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्यास उपचारासाठी दवाखान्यात नेले.

रत्नाबाई व लीलाबाई यांना अधिक उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. तसेच गुलाब याच्यावर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रत्नाबाई हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुलाबविरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मनमाडच्या पोलिस उपअधीक्षक रागसुधा आर., चांदवडचे निरीक्षक संजय पाटील, उपनिरीक्षक कैलास चौधरी, रामकृष्ण जगताप, अनिल केदारे यांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेकॉर्ड रूममधील दलालयुग संपुष्टात

$
0
0

नाशिकरोड : डिजिटल इंडियाच्या धोरणांतर्गत नॅशनल लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रामची अंमलबजावणी विभागात आतापर्यंत सुमारे ५ कोटी ६० लाख महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅनिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. इमेजेसचे व्हेंडर क्वॉलिटी चेकिंगचे आणि मेटा डेटा एन्ट्रीचे कामही वेगाने सुरू आहे. ई-अभिलेखांच्या स्वरूपात संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध झाल्यावर रेकॉर्ड रूमधील दलालांचा हस्तक्षेप इतिहासजमा होणार आहे.

सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लभान समाजाचा निफाडमध्ये मोर्चा

$
0
0

निफाड : सरकारने हातफोड खडी बंद केल्याने आणि क्रशर ब्रेकर सारख्या माध्यमांची खडी वापर सुरू असल्याने लभान समाजाचा पारंपरिक हातफोड खडी व्यवसाय बंद झाल्याने समाजातील लोकांवर चार वर्षांपासून उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने याबाबत विचार करावा तसेच इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी छावा लभान क्रांतिवीर सेना लभान समाजाने निफाड तहसील कार्यालयावर शुक्रवारी हातोडा मोर्चा काढला. मोर्चात मायाराम नवले, सुभाष जाधव, सुरेश नवले, मुकेश माळी, ब्रिजलाल म्हस्के, किशोर पवार, पप्पू जाधव आदींसह लभान समाजातील महिला आणि पुरुष सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा शहरा विकासासाठी पाच कोटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपरिषदेच्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाने विशेष अनुदान म्हणून पाच कोटी रुपये दिल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

डॉ. भामरे यांच्या माध्यमातून सटाणा शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. काही कामे प्रशासकीय स्तरावर मान्यतेसाठी प्रस्तावित आहेत. त्यात प्रामुख्याने सटाणा शहर पुनद पाणीपुरवठा योजनेस मान्यता मिळाली असून, त्यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याचप्रमाणे स्कायवॉक, रिंगरोड, नाना नानी पार्क यासारखी महत्त्वाची कामे सद्यस्थितीत सुरू आहेत.

नगरपरिषदेच्या कामांसाठी अधिकचा निधी मिळवून देण्याबबत मी नेहमीच कटीबध्द असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. तसेच सटाणा नगर परिषदेच्या २२ कामांसाठी रुपये पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यात विविध मोकळ्या भूखंडांना संरक्षण भिंत बांधणे व सुशोभिकरण करून उद्यान तयार करणे विविध प्रभागातील रस्ते तयार करणे, गणेश कुंड तयार करणे, सार्वजनिक शौचालय बांधणे, ग्रिन जीम उभारणे, यासारखे कामे प्रस्तावित केली आहेत. इदगाह मैदान सुशोभीकरण व स्मशानभूमी दुरुस्ती करणे यासह विविध कामांसाठी निधीची तरतूद केली आहे. या कामांमुळे शहरातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचे डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झणझणीत पदार्थांची मेजवानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चुलीवरील गरमागरम मांडे, ठसकेदार भरीत भाकरी अन् ठेचा, त्यासह साजूक तुपातील उकडीचे मोदक अन् विविध प्रकारचे पराठे... अशा अनेक खान्देशी खाद्यपदार्थांची चव चाखण्यात नाशिककर दंग झाले. नाशिककरांच्या खान्देश महोत्सवातील अनेक पदार्थांवर ताव मारत झणझणीत पदार्थांची मेजवानी नाशिककरांनी अनुभवली.

आमदार सीमा हिरे यांच्या संकल्पेतून ठक्कर डोम येथे आयोजित खान्देश महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. शहरातील विविध भागातून खवय्यांनी या महोत्सवासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळपासूनच महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. खान्देशातील संस्कृतीची जडणघडण अनुभवतानाच, खान्देशातील चविष्ट आणि चटपटीत खाद्यपदार्थ्यांचा नाशिककरांनी मनमुराद आस्वाद घेतला. महोत्सवात सकाळी ११ वाजता ज्येष्ठोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी खान्देशी गाणी सादर करीत उपस्थितांचे मनोरंजन केले. संध्याकाळी ६ वाजता 'न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा' या कार्यक्रम रंगला. आज सकाळी ११ वाजता आंतरशालेय नृत्य स्पर्धा घेण्यात येणार असून, संध्याकाळी ६ वाजता खान्देशरत्न पुरस्कार सोहळा होणार आहे.

\Bपालकमंत्र्यांनी घेतला आस्वाद

\Bखान्देश महोत्सवास शुक्रवारी दुपारी २ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार अनिल कदम यांनी भेट दिली. यावेळी महोत्सवातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्री महाजन, आमदार कदम यांसह आमदार सीमा हिरे, स्थायी समिती अध्यक्षा हिमगौरी आहेर-आडके आणि भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी खान्देशी पदार्थांचा आस्वाद घेतला. या सर्वांनी भरीत भाकरी, लाल मिरचीचा ठेचा, खान्देशी कारलं आणि भाजणीचा पराठा या पदार्थांची चव चाखत महोत्सवाची रंगत अनुभवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रादेशिक कर परिषदेस प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टेट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे आयोजित प्रादेशिक कर परिषदेस प्रारंभ झाला असून, यामध्ये आर्थिक व्यवहारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात येत आहे. शहरासह राज्यभरातून दोनशेहून अधिक सीए या परिषदेत सहभागी झाले असून, क्षेत्रातील तज्ज्ञांकडून जीएसटी, इनकम टॅक्स, शेअर मार्केट यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

'आयसीएआय' नाशिक शाखा या संस्थेच्या वतीने अशोका मार्ग येथील आयसीएआय भवन येथे आयोजित दोन दिवसीय प्रादेशिक कर परिषदेला शुक्रवारी प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे सीए किशोर कारिया यांच्यासह संस्थेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलन लुणावत, उपाध्यक्ष रेखा पटवर्धन, सचिव रणधीर गुजराथी, खजिनदार हर्षल सुराणा, सदस्य रोहन आंधळे, रवी राठी, राजेंद्र शेटे यावेळी उपस्थित होते.

यावेळी सीए कारिया यांनी शेअर मार्केटमधील पेनी स्टॉकच्या व्यवहाराचे मार्गदर्शन केले. तर सीए राजेंद्र जैन यांनी इनकम टॅक्सच्या कायद्यांसंदर्भात माहिती दिली. सीए अभिजित मोदी यांनी आयकर विभागाकडून आकारण्यात येणाऱ्या विशेष करांचे उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिषदेत शनिवारी (दि. २२) जीएसटी वार्षिक रिटर्न्स, ऑडिट फॉर्म, इनपुट टॅक्स क्रेडिट आणि जीएसटी ऑडिट यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँका होणार ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केलेला संप, पाठोपाठ लागून आलेल्या सुट्या आणि मंगळवारी ख्रिसमसची सुटी यामुळे पुढील काही दिवस बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे. सोमवारी बँका सुरू राहणार असल्या तरी या दिवशी गर्दी होऊ शकते.

बँक अधिकाऱ्यांच्या ऑल इंडिया बँक ऑफिसर कॉन्फडरेशन या संघटनेने (एआयबीओसी) शुक्रवारी संप पुकारला होता. स्टेट बँकेचे अधिकारी या संपामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले. सीबीएस परिसरात संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन केले. वेतनवाढ मिळावी, बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँकेच्या विलीनीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, बँक अधिकाऱ्यांवरील हल्ले थांबावावेत, पेन्शनसंदर्भातील मागण्या मान्य कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी हा संप करण्यात आला. संपामुळे बँकांचे कामकाज ठप्प झाले. बँकांच्या विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी २६ डिसेंबर रोजी युनायटेड फोरमने संपावर जाण्याचा इशारा दिला असून, पुढील आठवड्यातही बँकिंगच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. शनिवार (दि. २२) आणि रविवारच्या (दि. २३) सुटीमुळे सलग तीन दिवस बँकांचे कामकाज ठप्प असणार आहे. सोमवारी बँका उघडतील. परंतु, मंगळवारी ख्रिसमसची सुटी असल्याने सोमवारीदेखील बँकांमध्ये अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची भिस्त एटीएमद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवरच असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोबाबत सरकारकडे मार्गदर्शन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नगररचना विभागातील ऑटो डीसीआर प्रणालीत सिडकोची नियमावली समाविष्ट नसल्याने सिडकोच्या बांधकाम परवानग्यांबाबतचा संभ्रम वाढला आहे. सिडकोची नियमावली स्वतंत्र असून, ऑटो डीसीआरमध्ये मात्र शहर विकास नियंत्रण नियमावलीनुसार परवानग्या दिल्या जातात. त्यामुळे सिडकोची नियमावली आणि शहर विकास नियंत्रण नियमावलीतील तिढा दूर करण्यासाठी सरकारकडे मार्गदर्शन मागवल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

नगररचना विभागात ऑनलाइन बांधकाम परवानग्यांबाबत कार्यरत करण्यात आलेल्या ऑटो डीसीआर प्रणालीत सन २०१७ मध्ये मंजूर झालेल्या शहर विकास नियंत्रण नियमावलीचा समावेश आहे. त्यानुसारच बांधकामांना परवानग्या दिल्या जात आहेत. सिडकोच्या बांधकामांसंदर्भातील २०१६ मध्ये मंजूर झालेली नियमावली आणि शहर विकास नियंत्रण नियमावलीत मोठा फरक आहे. त्यामुळे सिडकोचे प्रस्ताव ऑटो डीसीआर प्रणालीत सादर केल्यास ते मंजूर होत नाहीत. त्यामुळे सिडकोचे प्रस्ताव ऑनलाइन काढायचे की, ऑफलाइन याबाबतचा तिढा कायम राहिला आहे. सिडकोतील प्रस्ताव ऑफलाइन काढावेत अशी लोकप्रतिनिधींसह नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे हा वाद सोडविण्यासाठी महापालिकेने राज्याच्या नगर विकास विभागाकडे मार्गदर्शन मागवले आहे. सिडकोबाबत २०१६ मधील नियमावली लागू करायची की, शहर विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकामांना परवानगी द्यावी, याबाबत शासनाने स्पष्टता करावी असा प्रस्ताव पालिकेकडून पाठवण्यात आला आहे. सिडकोच्या बांधकामांना सिडकोच्या सन २०१६ च्या नियमावलीनुसार मंजुरी द्यावी, अशी पालिकेची भूमिका असल्याचे गमेंनी यावेळी सांगितले. आयुक्त गमे यांनी सिडकोच्या नियमावलीबाबत सॉफ्टवेअरमध्ये स्वतंत्र तरतूद करावी अशी सूचना केली. सरकारकडून मार्गदर्शन येईल तेव्हा येईल, तोपर्यंत सिडकोच्या नियमावलीचा त्यात समावेश करावा. जेणेकरून मार्गदर्शन आल्यानंतर तातडीने बांधकाम परवानग्या देता येतील अशी तरतूद करावी, अशी सूचना देण्यात आली. त्यामुळे सिडकोतील बांधकामाचा प्रश्नही लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांना कांद्याचा ‘वानोळा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमांवर मलम लावण्यासाठी प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले असले तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये त्याबाबत कमालीची नाराजी आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी शुक्रवारी थेट जिल्हाधिकाऱ्यांना कांद्याच्या गोण्या भेट देण्याचा प्रयत्न करीत नाराजी नोंदविली. जिल्हाधिकाऱ्यांनी हा कांदा स्वीकारला नसला तरी शेतकऱ्यांच्या भावना सरकारकडे पोहोचवू, अशी ग्वाही दिली.

कांद्याला भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. विविध प्रकारच्या आंदोलनांनी याबाबतची नाराजी सरकारकडे व्यक्त करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले आहे. परंतु, कांद्याचा एकूण उत्पादन खर्च विचारात घेता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी किमान ७०० रुपये क्विंटल अनुदान मिळावा, अशी मागणी करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेऊन त्यांना कांदा भेट देऊ केला. मात्र, शेतकऱ्यांनी आणलेल्या कांद्याच्या गोण्या स्वीकारण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. शेतकऱ्यांच्या भावना आपण सरकारकडे कळवू, असे आश्‍वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळातील भारत दिघोळे, अशोक बोडके, सुरेश गिते, खंडेराव दिघोळे व सोमनाथ गिते यांनी दिले.

अनुदान तुटपुंजेच

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. राज्य सरकारने कांद्यासाठी २०० रुपये क्विंटल अनुदान जाहीर केले असले तरी ते अत्यंत तुटपुंजे आहे. केंद्र व राज्य सरकारने क्विंटलसाठी किमान ७०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नव्याने बाजारात आलेल्या कांद्याला अल्पदर मिळत असून त्यास दोन हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, कांद्याच्या गोऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर सोडून शेतकरी तेथून निघून गेले.

सरकारने २०० रुपयांचे अनुदान दिले की भीक, हेच समजत नाही. केंद्र सरकारने कांद्याचा जीवनावश्यक वस्तुंमध्ये समावेश केला असून निर्यातीचे धोरणही केंद्र सरकारच ठरविते. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य अनुदान द्यायला हवे.

- अशोक दिघोळे, अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतो. परंतु, यंदा पाण्याअभावी थोडेच उत्पादन घेऊ शकलो. पिक जगविण्यासाठी तुषार सिंचनावर २५ हजार रुपये खर्च केला आहे. परंतु, तेवढा भाव मिळत नसल्याने हताश झालो आहे.

- अशोक बोडके,

कांदा उत्पादक, जायगाव, सिन्नर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांनी’ केले मानवमन सुसंस्कृत

$
0
0

\Bपुलं, गदिमा, फडकेंबाबत \Bज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पु. ल. देशपांडे यांचे शब्द, ग. दि. माडगूळकरांचे सूर आणि सुधीर फडके यांचे शब्द आणि सूर यांनी माणसाच्या मनाला सुसंस्कृत केले. संपूर्ण महाराष्ट्र या तिघांनी समृद्ध केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी केले.

ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर व ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्कृती वैभव संस्थेच्या वतीने त्रिवेणीनगरी, गोविंदनगर येथे त्रिवेणी महोत्सवाचे शुक्रवारी राजदत्त यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी रवींद्र देवधर, दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे दीपक चंदे, चेतन पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय ढमाळ, दंडे ज्वेलर्सचे संचालक अनिल दंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

राजदत्त म्हणाले, की 'पुलं, गदिमा, फडके या तिघांचाही सहवास मला लाभला. त्यांच्या सावलीत वाढण्याचे भाग्य मिळाले. त्रिवेणी महोत्सवाचे उद्घाटन करताना आकाशात पाहिले असता, मला तात्यासाहेबांचा भास होतो. कला, गीत, सूर, साहित्य असा एकत्रित हा सोहळा आहे. कलेतून माणसाला विशालता, जीवनाची दिशा मिळते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असलेले तिघांचे स्मरण नवीन पिढीलाही उत्सुकता देईल. गदिमा, फडके व हसवत हसवत शिकवणारे पुलं या माणसांचा हा आयोजित उत्सव कौतुकास्पद आहे.

आज गीत रामायण

महोत्सवात शनिवारी (दि. २२) सायंकाळी ५.३० वाजता सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर यांचा अजरामर ठेवा असलेले गीत रामायणाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, उद्घाटन सत्रात राजदत्त यांच्या हस्ते त्रिवेणी महोत्सव स्मरणिकेचे प्रकाशन झाले. संस्कृती वैभवचे अध्यक्ष नंदन दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सुप्रिया देवघरे यांनी सूत्रसंचालन केले.

\Bरसिकांना मोहिनी\B

महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर, गीतरचनांवर आधारित 'अक्षर त्रिवेणी' हा सुरेल कार्यक्रम पार पडला. निवेदिका उत्तरा मोने, अभिनेता तुषार दळवी, संजय मोने, गायक अनिरुद्ध जोशी, नचिकेत लेले, गायिका धनश्री देशपांडे, सृष्टी पगारे यांनी हा कार्यक्रम सादर केला. आयुष्याचे तत्वज्ञान सांगणारे 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे', 'तिन्ही लोक आनंदानी भरून गाऊ दे, तुझे गीत गाण्यासाठी', अशा अनेक गीतांनी रसिकांवर मोहिनी पसरवली. या सुरेल कार्यक्रमाला प्रमोद पवार, विजय जाधव, नवीन तांबट, अमित शर्मा, अनिल धुमाळ, मनोज गुरव यांनी साथसंगत केली.

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Amit Thackeray Wedding: अमितचं लग्न २७ जानेवारीला; राज ठाकरेंनी जाहीर केली तारीख

$
0
0

नाशिक:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा विवाह सोहळा २७ जानेवारीला पार पडणार आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत खुद्द राज ठाकरे यांनी आज ही तारीख जाहीर केली. अमितचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीनं होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसांपासून अमित यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. त्यांची लग्नपत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. राज यांनी काल सप्तश्रृंगी देवीच्या चरणी ही पत्रिका ठेवल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झालं. मात्र, आज खुद्द राज यांनीच लग्नाबद्दल माहिती दिली. 'लग्नाला सर्वांनी यावं असं मलाही वाटतं. मात्र, तसं आमंत्रण द्यायचं झालं तर हा आकडा सहा लाखांवर जाईल. त्यामुळं मोजक्या मंडळींनाच या लग्नाचं आमंत्रण असेल, असं ते म्हणाले.
67204088

मोदींना आमंत्रण नाही?

पंतप्रधान मोदींना अमितच्या लग्नाचं आमंत्रण देणार का, असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी राज यांना विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता, 'त्यांचा लग्न वगैरे गोष्टींवर विश्वास आहे का,' असा मार्मिक टोला राज यांनी केला. त्यामुळं राज हे मोदींना आमंत्रण देणार नसल्याचीच चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images