Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शिक्षण समितीसाठी २९ ला निवडणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शिक्षण समितीच्या नऊ सदस्यांच्या नियुक्तीला महासभेने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता सभापती व उपसभापती पदासाठी येत्या २९ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. विभागीय आयुक्तांनी ही निवडणूक जाहीर केली असून, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. समितीवर भाजपचे वर्चस्व असल्याने सभापती तसेच उपसभापती पदावरही भाजपच्या सदस्यांची निवड होणार आहे. परंतु, भविष्यातील शिवसेनेसोबतच संबंध सुधारण्यासाठी भाजपकडून शिवसेनेला उपसभापतीपद ऑफर केले जाण्याची शक्यता आहे.

तब्बल पावणेदोन वर्षानंतर भाजपच्या सत्ताकाळात शिक्षण समिती की, शिक्षण मंडळ याचा वाद संपुष्टात आला आहे. मंडळाचा वाद संपुष्टात आल्यानंतर भाजपने समिती किती सदस्य असावेत यावरून भाजपने वेळ वाया घालवला. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महासभेत शिक्षण व वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतू मंडळाप्रमाणेच सोळा सदस्यांची नियुक्ती करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. प्रशासनाने नऊ सदस्यांचा प्रस्ताव सादर केला होता. परंतू नियमाप्रमाणे नऊ सदस्यांचीचं नियुक्ती करता येणार असल्याने भाजपने तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर यु-टर्न घेत नऊ सदस्यांची नियुक्ती जाहीर केली.

गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत नऊ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यात भाजपच्या वर्षा भालेराव, प्रतिभा पवार, सरीता सोनवणे, स्वाती भामरे, दिनकर आढाव, यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर शिवसेनेचे चंद्रकांत खाडे, संतोष गायकवाड, सुदाम डेमसे व कॉंग्रेसच्या राहुल दिवे यांना समिती सदस्य म्हणून घोषणा करण्यात आली. त्यामुळे ९ पैकी ५ सदस्य हे भाजपचे असल्याने सभापतीपदावर भाजपचा सदस्य विराजमान होणार आहेत. सध्या वर्षा भालेराव यांचे सभापती पदावर नाव आघाडीवर आहे. तर आमदार देवयानी फरांदे यांच्या गटातून स्वाती भामरे यांचेही नाव येऊ शकते. त्यामुळे २९ डिसेंबर रोजीच यासंदर्भातील अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

शिवसेनेला उपसभापतीची ऑफर

भाजपचे बहुमत असल्याने सभापती आणि उपसभापती पदावर भाजप सदस्यांची वर्णी लागणार आहे. परंतु, भाजपकडून सभापतीपद आपल्याकडे ठेवून उपसभापती शिवसेनेला ऑफर केले जाण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी भाजपला जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे त्याची पायरी म्हणून सेनेला उपसभापती पद देवून खूश करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. परंतु, शिवसेना त्याला किती प्रतिसाद देते, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुगेवाल्याचा सिलिंडरला मालेगावात स्फोट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील मोसमपूलजवळील महात्मा फुले पुतळा चौकात एका फुगे विक्रेत्याच्या दुचाकीवरील सिलिंडरचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र सिलेंडरचे तुकडे झाले आणि दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

फुगे विक्रेता रस्त्यावरून जात असताना अचानक त्याच्या दुचाकीवरील सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे सिलिंडरचे तुकडे झाले. अर्धा तुकडा हवेत उडाला. सिलिंडर स्फोटामुळे फुगेवाल्याच्या वाहनाचे नुकसान झाले. दरम्यान वर्दळीचा परिसर असल्याने या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली. बघ्यांनी गर्दी केल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक अधीक्षक संजय पवार यांच्यासह अग्निशामक बंब व कर्मचारी, वाहतूक पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. फुगेविक्रेत्यास चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला ते कळू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन चोरट्यास दीड वर्षाची शिक्षा

$
0
0

वाहन चोरट्यास शिक्षा

नाशिक : बसस्थानक परिसरात पार्क केलेली दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अ. मो. शाह यांनी एक वर्ष सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. चोरीची ही घटना २८ जानेवारी २०१५ रोजी घडली होती. जक्की उर्फ जाकीर अक्तार शेख (३० रा. इस्माईल बेकरी जवळ, खडकाळी) असे वाहनचोरी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २८ जानेवारी २०१५ रोजी आरोपीने ठक्कर बाजार बसस्थानक भागात आलेल्या कामटवाडा येथील शरद कचेश्वर न्याहारकर यांची दुचाकी (एमएच १५ बीपी २७१६) हातोहात चोरी केली होती. मनसे कार्यालयासमोर सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप - चित्राची जागा

महदंबा पुरस्कार थोडक्यात

$
0
0

विज्ञान लोकमाध्यमला पुरस्कार

नाशिक : गिरणारे येथील श्रीदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने दत्तजयंती, दत्तमंदिर अकरावा वर्धापन दिन व मराठी भाषेच्या आद्यकवी महदंबा स्मृतिदिनानिमित्त आद्यकवी महदंबा स्मृती पुरस्कार निसर्ग विज्ञान लोकमाध्यम संस्थेस प्रदान करण्यात आला. विज्ञान व पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प.पु.महंत सुकेणकरबाबा यांच्या हस्ते संस्थेचे प्रतिनिधी अध्यक्ष प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी स्वीकारला. यावेळी श्रीदत्त मंदिर ट्रस्टचे संचालक चक्रपाणी बाबा कोठी, शिवकार्य गडकोट संस्थेचे अध्यक्ष राम खुर्दळ, निशिकांत पगारे व ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलेतून परंपरेचे दर्शन

$
0
0

कलेतून परंपरेचे दर्शन

बॉईज टाऊन पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॉईज टाऊन पब्लिक स्कूलच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन दादासाहेब गायकवाड सभागृहात झाले. गणेश वंदना सादर करत या सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. सोहळ्यात देशभक्तीपर गाण्यांवर नृत्याविष्कारांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, केरळ, तामिळनाडू या राज्यातील परंपरा दर्शविणाऱ्या नृत्याचा बहारदार आविष्कार सादर करण्यात आला. महाराष्ट्राची आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची गाथा पोवाड्यातून मांडताना विद्यार्थ्यांनी उपस्थितांची कमालीची दाद मिळवली. यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ आणि उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा पवार यांनी स्नेहसंमेलनात शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. सोहळ्याच्या अखेरीस शाळेचे ट्रस्टी नेवील मेहता यांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे संयोजन स्वाती कुलकर्णी, प्रभाकर मुसळे, पद्मश्री संवत्सरे आणि नीता ठक्कर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देश महोत्सवात भाऊ कदमचा धमाका!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीत मंचावर प्रवेश करत सारा माहोलच ताब्यात घेणाऱ्या विनोदवीर भाऊ कदम आणि सहकलाकार रेणूका यांच्या दमदार परफॉरर्मन्सला खान्देश महोत्सवानेही उदंड प्रतिसाद दिला. भाऊ कदम यांच्या सादरीकरणासोबतच सांस्कृतिक उपक्रमांतर्गत सादर करण्यात आलेली मराठी गीते, लावण्या आदी कलाप्रकारांनाही उपस्थितांच्या प्रचंड गर्दीने टाळ्या अन् शिट्ट्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांची सायंकाळी प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते काही स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.

नागरिकांच्या उत्साहामुळे खान्देश महोत्सवाची समारोपाची संध्याकाळ चांगलीच बहरली होती. आमदार सीमा हिरे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खान्देश महोत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी करण्यात आला. समारोपाच्या सोहळ्यासाठी विनोदवीर अभिनेते भाऊ कदम हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. सोबतच विविध कलावंतांनी नृत्य, गायन आदी कला सादर करत रसिकांची दाद मिळविली. सायंकाळी ७ वाजेदरम्यान सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नागरिकांनी गर्दी केल्याने सिटी सेंटर मॉल ते एबीबी सर्कल या रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करण्यात आल्याने या मार्गावर वाहतुकीचा वेग अतिशय मंद होता. नागरिकांची वाढती उपस्थिती लक्षात घेता मंचावरील कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा यासाठी ठक्कर मैदानात व मैदानाबाहेर मोठ्या पडद्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुख दु:खाचा धांडोळा घेणारे ‘विसर्जन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्युट यांची निर्मिती असलेल्या 'विसर्जन' या नाटकाचे अश्वमेध थिएटर्स आणि सपान नाशिक या संस्थेतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरात सादरीकरण करण्यात आले.

जगणं सुरु होण्याच्या उंबरठ्यावर मरण कवटाळू पहाणारा वैफल्यग्रस्त तरुण शेतकरी आनंद, लौकिकार्थान जगणं संपत आलेलं असतानाही ते सुरू होण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा करीत बसलेली आजी, आणि जगाला जगणं समजवून देण्याच्या गदारोळात हरवलेल्या थोरल्या भावाला अनंत काळ शोधत रहाणं, हेच अनादी जगणं घेऊन प्रवासत रहाणारा रंगा या तिघांच्या सुख दु:खाचा धांडोळा घेणारे 'विसर्जन' हे दोन अंकी प्रायोगिक नाटक सादर झाले.

या कथेत असलेल्या आनंदचे आई बापाचे छत्र हरवलेलं असते. त्याची आजी मात्र जिवंत असते. आजीचा नवरा व आनंदचा आजोबा हा देखील वारीत परागंदा झालेला असतो. त्याची आठवण म्हणून आजीने एक मंदिर बांधलेले असते; मात्र या मंदिराचा गाभारा रिकामा ठेवलेला असतो. परागंदा झालेल्या नवऱ्याला शोधायचे आणि येताना विठ्ठलाची मूर्ती घेऊन यायची व मंदिरात तिची स्थापना करायची ही आजीची इच्छा असते. याच वेळी रंगा नावाचा वारकरी त्याच्या भावाचा शोध घेण्यासाठी वारीत निघालेला असतो. धावत येत तो आनंदला आजीकडे घेऊन येतो पुन्हा एकदा आनंद जगण्याच्या लढाईत ढकलला जातो. त्यानंतर रंगा निघून जातो. 'स्व' विर्सजित झाल्याशिवाय 'गाभारे' भरत नसतात, म्हणूनच ही एक डोहातील आकाशशोधाची गोष्ट आहे, असे सूत्रधार म्हणतो.

नाटकाचे लेखन दत्ता पाटील व दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे होते. नेपथ्य लक्ष्मण कोकणे, शेखर सरोदे, प्रकाशयोजना राहुल गायकवाड, संगीत संयोजन रोहीत सरोदे, राजेंद्र उगले, गीत दत्ता पाटील, राजेंद्र उगले, रंगभूषा माणिक कानडे वेशभूषा चेतन बर्वे, उर्वराज गायकवाड, पार्श्व संवाद प्राजक्त देशमुख, प्रशांत साठे, निर्मती प्रमुख विश्वास ठाकूर, सुत्रधार विनायक रानडे, सहाय्य प्रणव प्रभाकर, राजेश भुसारे, हेमंत महाजन, गिरीश गर्गे यांचे होते.

नाटकात आनंद-धनंजय गोसावी, आजी-दिप्ती चंद्रात्रे, रंगा-निलेश सूर्यवंशी, कार्तिकेय कंट्रोजवार, चेतन बर्वे, एकता आढाव, पूजा पूरकर, दामिनी जाधव, अंकिता साळूंखे, प्रतिक गोवर्धने, प्रतिक शर्मा, सुरज बोडाइ, अर्थव लाखलगावकर, प्रतिक कुलकर्णी, विनायक अमृतकर यांनी भूमिका केल्या. गायन वादनाची साथ राजेंद्र उगले, अरुण इंगळे, दत्ता अलगट, शुभम लांड़गे, अपूर्व इंगळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फास्ट

$
0
0

\Bशिबिराचा समारोप\B

नाशिक : श्री कैवल्यनाथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भारत सेवाश्रम, तपोवन येथे आयोजित अध्यात्मिक शिबिराचा समारोप झाला. या कार्यक्रमात दोनशेपेक्षा अधिक सदस्य सहभागी झाले होते. कार्यक्रमात दुरजुती चॅटर्जी महाराज यांनी 'सकारत्मक वृत्तीची निर्मिती आणि आत्मिकशांती' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ट्रस्टचे अध्यक्ष अनिरबन भौमिक, सचिव डॉ. प्रियनाथ घोष, स्वाती भौमिक, सुनीता रॉय, मलय देव, अलोक मालाकर, महिंद्रा दास यांसह ट्रस्टचे इतर प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bसिडको शाखेचे उद्घाटन\B

नाशिक : छावा क्रांतीवीर सेनेच्या सिडको शाखेचे शनिवारी सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, युवा प्रदेश अध्यक्ष शिवा तेलंग यांच्या हस्ते उट्घाटन करण्यात आले. यावेळी युवा शहर उपाध्यक्ष रोहित गोसावी, कार्याध्यक्ष अनिल खरात, प्रदिप बोखारे, शंकर पाटील, विक्रम थापा, अक्षय शर्मा, संतोष सरोदे, शुभम निकम, रितेश भुजबळ, चेतन कुरकुरे, निखिल पवार, विजय जगताप, अजय गांगुर्डे, कुशल बागुल, ऋतिक शेलार यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्सुरा फेस्टमध्ये रंगले नाशिककर

$
0
0

'मित्सुरा'त रंगले नाशिककर

विविध स्पर्धांचे आयोजन; कलाकारांना संधी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डेमोस्ट्रेशन्स, विविध खेळ, प्रदर्शन, कविता, तसेच नृत्य, नाटक, सेल्फी तसेच शिल्पकला यांचे प्रदर्शन, काळ्या रंगाचे कापड अंथरलेली अलिबाबाची गुहा, विविध धातुंचा गणपती, तब्बल ४३ तास खर्च करून रेखाटलेली रांगोळी, अशा एक ना अनेक कलाकृतींनी भरलेल्या मित्सुरा आर्ट फेस्टिव्हलमध्ये नाशिककर रविवारी रंगले.

सकाळी ८ वाजता फेस्टला सुरुवात झाली. मित्सुरा आर्टमध्ये प्रवेशद्वार अतिशय प्रभावी बनविण्यात आले असून तीन द्वारांमध्ये हे विभागण्यात आले आहे. मध्ये प्रवेश करताच नटसम्राट सिनेमावर आधारित रांगोळीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. जोकर, पाण्यातले बगळे, काळ्या कापडामधील मोठी गुहा, नळ्यांनी तयार केलल्या बाहुल्या, तसेच लाकडाचा बनवलेला बंगला अशा कलाकृतींनी आर्ट फेस्ट परिपूर्ण होता. सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत रॉक बॅण्ड परफॉर्मन्स, शास्त्रीय संगीत, नृत्य गायन व नाटक हे कार्यक्रम झाले. गोदापार्क, आसाराम बापू ब्रीजजवळ, गंगापूर रोड येथे सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत हा फेस्ट झाला.

शौर्य सामाजिक संस्थेच्या विद्यमाने हा 'मित्सुरा' आर्टफेस्ट आयोजित करण्यात आला होता. नाशिककरांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने झालेल्या या फेस्टिवलमध्ये विविध स्पर्धा व खेळांचे प्रदर्शन झाले. गायनापासून तर शिल्पकलेपर्यंत सर्वच कलागुणांचा समावेश असणारा हा आर्ट फेस्ट नाशिककरांसाठी मेजवानीच ठरला. प्रत्येक खेळात पालकांना तसेच विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. चित्रकला, अक्षरलेखन, हस्तकला यांच्या कार्यशाळा, तसेच गायन, वादन, शास्त्रीय संगीत, नाटक अशा सर्वच कलांचा या फेस्टमध्ये समावेश होता. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पॉट ड्रॉईंग स्पर्धा तसेच नृत्य गायनाच्या स्पर्धादेखील यावेळी झाल्या. गेम्स, झुम्बा व योगा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात लहानपणचे खेळ खेळण्याची संधी पालकांना देण्यात आली. फेस्टमध्ये कला व फूडसाठी विविध ५० स्टॉल्स मांडण्यात आलेले होते. तेथे खवैय्यांनी आनंद घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकाला कार बदलून द्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उत्पादन दोष असलेल्या वाहनांची विक्री केल्यामुळे ग्राहक न्यायंचाने होंडा कारला वाहन बदलून देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार व अर्जाचा खर्च म्हणून ५ हजार असा १५ हजारांचा दंडही ठोठावला आहे. त्याच मॉडेलचे वाहन देणे शक्य नसेल, तर वाहनांची किंमत ९ लाख ५८ हजार ८०० रुपये व्याजासह परत करण्याचा विकल्पही दिला आहे.

मखमलाबाद रोडवरील डॉ. स्वप्नील जगदिश गवारे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे ऋषभ होंडा मोटार प्रा. लि. व होंडा कार प्रा. लि. यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर हा निकाल न्यायमंचाने दिला आहे. गवारे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, होंडा कार प्रा. लि. ने उत्पादित केलेली होंडा सिटी (क्र. एम. एच. १५, ईएक्स ९९८२) हे वाहन त्यांनी ऋषभ होंडा मोटार प्रा. लि. यांच्याकडून ९ लाख ५८ हजार ८०० रुपयांना विकत घेतले. वाहनाची २४ महिन्यांची वॉरंटी देण्यात आली होती. मात्र, वाहन विकत घेतल्यापासून क्लचमध्ये आवाज येत असल्याने कंपनीच्या शो रूममधून क्लच सिलेंडर स्लॅव्ह विनामूल्य बदलून दिले. तरीदेखील वाहनातील दोष दूर झाला नाही. तांत्रिक दोष असलेले वाहन विक्री करून सामनेवाला यांनी सेवा देण्यास कमतरता केलेली आहे.

या तक्रारीवरुन होंडा मोटारकडून सांगण्यात आले की, एआरएआय यांनी अॅप्रूव्हड केल्यानंतरच विवादीत वाहन तक्रारदारांना विक्री करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारांना वेळोवेळी सहकार्य करून समाधान केले आहे. तसेच वाहनांचा पार्टदेखील विनामूल्य बदलवून दिलेला आहे. वाहनांचा अयोग्यरीत्या वापर केल्याने वाहनात दोष निर्माण झालेला असण्याची शक्यता आहे. वाहन तपासणीसाठी घेऊन येण्याबाबत तक्रारदारांना वेळोवेळी कळवूनदेखील तक्रारदार यांनी त्यांच्याकडे वाहन तपासणीसाठी आणले नाही. वाहनात कोणताही तांत्रिक दोष नाही. सेवा देण्यास कोणतीही कमतरता केली नाही.

कंपनीचा दावा फेटाळला

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमंचाने वाहनाचा अयोग्य रितीने वापर केल्याने वाहनात दोष निर्माण झाल्याचा कंपनीचा दावा फेटाळला. विक्री केलेल्या वाहनांबद्दल तक्रार केल्यानंतर तीन वेळा दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर क्लचही बदलून देण्यात आल्याचे कंपनीने मान्य केले आहे. वाहन विकत घेतल्यानंतर सुमारे तीन महिन्यांतच समस्या उत्पन्न होणे. त्यानंतर दुरुस्ती करुन पार्ट बदलून देणे व त्यानंतरही दोष कायम राहणे ही गोष्ट वाहनात दोष असल्याचे शाबित करते. त्यासाठी तज्ज्ञ पुराव्याची गरज नाही. होंडा कार प्रा. लि.ने वाहन विक्री केल्यामुळे त्यांनी ती बदलून द्यावी व त्याच मॉडेलची कार उपलब्ध नसल्यास व्याजासह पैसे परत करावे असा निर्णय दिला. ऋषभ होंडा मोटर विक्रेते असल्यामुळे त्यांना उत्पादन दोषाबाबत जबाबदारी टाकता येणार नाही. म्हणून त्यांच्या विरुद्धचा अर्ज फेटाळला. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे - कुलकर्णी, सचिन शिंपी यांनी दिला. गवारे यांच्याकडून अॅड. एम. आर. आहेर यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलच्या कंत्राटदाराची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सेंट्रल जेलचे कंत्राट घेतलेल्या व्यावसायिकाची इंदूर येथील कंपनीने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मनोज विष्णू उबराणी (३८, रा. मोटवाणीरोड, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. उबराणी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मध्यप्रदेश राज्यातील इंदूर येथील व्हाइट गोल्ड एजन्सीच्या श्वेतल जैन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. उबराणी हे ठेकेदार असून, काही वर्षांपूर्वी त्यांनी सेंट्रल जेलमधील एकाचा कामाचा ठेका घेतला होता. उबराणी यांनी घेतलेल्या कामासाठी ६ एस ग्रे कॉटन यार्न हा कापसाचा दोरा आवश्यक होता. त्यामुळे त्यांनी हा माल इंदूर येथील व्हाइट गोल्ड एजन्सीकडून मागविला. मात्र, फेब्रुवारी २०१७ पासून आतापर्यंत कंपनीने शुद्ध कापसाचा दोरा न पुरविता पॉलिस्टर मिक्स केलेले कापसाचे दोरे पुरविले. उबराणी यांनी याबाबत कंपनीकडे तक्रार करून पॉलिस्टर मिक्स दोरा परत घेऊन जाण्याबाबत कळविले. मात्र, कंपनीने उबराणी यांच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. दोऱ्याच्या मोबदल्यात उबराणी यांनी कंपनीला नऊ लाख ६९ हजार रुपये दिले होते. तेही त्यांना परत करण्यात आले नाहीत. त्यामुळे उबराणी यांनी उपनगर पोलिस स्टेशन गाठून संशयित श्वेतल जैन यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस. जी. जगदाळे करीत आहेत.

जयभवानी रोडवर घरफोडी

जयभवानीरोड परिसरातील रचना कॉलनी येथील घर फोडून चोरट्यांनी ४७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत घडली. या प्रकरणी महेंद्र ताराचंद गायकवाड (रा. रचना कॉलनी, आडकेनगर) यांनी फिर्याद दिली. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवून आत प्रवेश केला. तसेच कानातील चेन जोड, कानातील टॉप्स, नेकलेस, नथ असा ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक एम. डी. परदेशी करीत आहेत.

जुगार अड्ड्यावर छापा

इंदिरानगरमधील मुरलीधरनगर भाजी मार्केटसमोर पत्र्याच्या शेडच्या शेजारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून इंदिरानगर पोलिसांनी सात संशयित जुगाऱ्यांना अटक केली. ही कारवाई शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास झाली.

उघड्यावर जुगार खेळणाऱ्या महावीर उर्फ पप्पू रमेश भदरगे, अनिल वसंत नाडे, अमोल मनोज घाटे, अरुण दामोदर हांडे, इंदर अहलाजी डोंगरे, गजानन बळीराम मानकुटे आणि वंजी लखा गायकवाड यांना अटक केली. पोलिसांनी छापा मारला त्यावेळी सर्व संशयित मटका जुगारा खेळताना सापडले. संशयितांकडून जुगाराचे साहित्य आणि दोन हजार ७७० रुपये हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी पोलिस नाईक राजू भगवान राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार आर. के. शेख करीत आहेत.

शिडीवरून पडल्याने मृत्यू

घरातील शिडीवरून पडलेल्या महेश जगन्नाथ पाटील (५०, रा. पाटील गॅरेजमागे, देवळाली गाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. २२) सायंकाळच्या सुमारास घडली. शिडीवरून पडल्याने पाटील यांच्या डोक्यास दुखापत झाली. त्यांना लागलीच आडगाव नाका परिसरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून पाटील यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार अश्पाक शेख करीत आहे.

दुचाकीसह सायकल चोरीला

इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी तर दुसऱ्या एका घटनेत सायकल चोरीला गेल्याची घटना घडली. विठ्ठल काशिनाथ पाटील (रा. शिखरेवाडी, नाशिकरोड) यांची २५ हजार रुपयांची दुचाकी (एमएच १५ डब्ल्यु ७९४३) १६ डिसेंबर रोजी इमारतीच्या पार्किंगमधून चोरीस गेली. तर, परमिंदर कौर हरविंदर घुमन (रा. इच्छामणी रो हाऊस, रायन स्कुलच्या बाजूला) यांची ७ हजार रुपये किमतीची सायकल चोरीस गेली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराच्या कम्पांउडमधून १८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी कामगारांचा ९ जानेवारीला मोर्चा

$
0
0

\B

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

कामगार संघटनांच्या विविध मागण्यांसाठी ८ आणि ९ जानेवारी रोजी देशव्यापी संप करण्यात येणार असून, कंत्राटी कर्मचारी संघटनांतर्फे ९ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघातर्फे देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघातर्फे रविवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी 'आयटक'चे राज्यसचिव राजू देसले, महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर, धाडस संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी, महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांसह कंत्राटी कामगार उपस्थित होते. राज्य सरकारने मेगा भरतीची प्रक्रिया राबविण्यापूर्वी राज्यातील सरकारी कार्यालयांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अशी प्रमुख मागणी महासंघाने केली आहे. राज्यातील विविध विभागाच्या ५२ कंत्राटी कर्मचारी संघटनांनी यासाठी महासंघाला पाठिंबा दिला असून, ९ जानेवारीला या संघटनांतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यात तीन लाख कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून, त्यांना समकक्ष पदावर काम करण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता नसल्याचे महासंघाने सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रथम दीड लाख रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करावी. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन लागू करावे, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. मात्र सरकार कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने महासंघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने कंत्राटी कामगारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई एकाच वेळी लढली जाईल, असा इशारा महासंघाने दिला आहे.

\B...तर लाँग मार्च\B

९ जानेवारीला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. सरकारने मेगा भरतीच्या पूर्वी कंत्राटी कामागारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात येईल, असे महासंघाचे अध्यक्ष जाधवर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामकोसाठी.... टक्के मतदान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ३१० मतदान केंद्रांवर ..... टक्के मतदान झाले. १ लाख ७६ हजार २६२ मतदारांपैकी .... मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत सर्वाधिक मतदान जिल्ह्यातच झाले. जिल्ह्याबाहेरील मतदान केंद्रांवर कमी मतदान झाल्याचे वृत्त आहे. राज्याबाहेर असलेल्या हैदराबाद व सुरत येथील मतदानाची टक्केवारी कमीच होती.

रविवारी सकाळी ८ वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली. सकाळी बहुतांश केंद्रांवर मतदान संथगतीने सुरू होते. त्यानंतर टक्केवारी वाढत गेली. काही मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान सुरू होते. साडेचार वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीनंतर या निवडणुका होत असल्यामुळे उमेदवारांमध्ये सर्वत्र उत्साह होता. नाशिकमध्ये ३१० मतदान केंद्रांपैकी १६२ केंद्रे असल्यामुळे मतदानासाठी चुरसही दिसत होती. कडेकोट पोलिस बंदोबस्त असल्यामुळे मतदान केंद्राजवळील रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे मतदार नसलेल्या नागरिकांचा संताप झाला.

या निवडणुकीत एका मतदाराला २१ मते देण्याचा हक्क असल्यामुळे काही ठिकाणी मतदारांचा गोंधळही उडत होता. सर्वसाधारण गटातील १८ जागांसाठी ७० उमेदवार असल्यामुळे या जम्बो मतपत्रिकेत १८ मते अपेक्षित होती. त्यापेक्षा जास्त मते दिल्यास ती मतपत्रिका बाद होणार असल्यामुळे मतदार काळजी घेत होते. काहींचा गोंधळ उडत होता. महिला राखीव गटाच्या दोन जागांसाठी ७, तर राखीव गटाच्या एका जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात असल्यामुळे येथील मतदान करणे सोपे होते.

नंबरचा आधार

ज्या मतदारांना एकाच पॅनलला मते द्यायचे होते, त्यांचा गोंधळ कमी होता. पसंतीच्या पॅनलच्या एका चिन्हावर मत देणे सोपे होते. पण, ज्यांना क्रॉस वोटिंग करायचे होते, त्यांनी मात्र नंबरचा सहारा घेतला. सर्व उमेदवारांची नावे लक्षात ठेवणे अवघड असल्यामुळे त्यासाठी चिठ्ठ्या घेऊनच मतदार मतदान केंद्रात जात होते. एका मतदाराला २१ मते द्यायची असल्यामुळे ३ ते ५ मिनिटे वेळ लागत होता. मतदान केंद्रावर मतदानासाठी तीन कक्ष होते. त्याचप्रमाणे दोन पेट्या होत्या. मतदान केंद्रावर काही ठिकाणी वरच्या मजल्यावर मतदान केंद्र असल्यामुळे त्यांना जिने चढणे अवघड होते. त्याचप्रमाणे मतदानाची प्रक्रिया अवघड असल्यामुळे त्यांना मतदान करणे थोडे अवघड जात होते.

कडेकोट बंदोबस्त

नामकोच्या या निवडणुकीसाठी २२०० कर्मचाऱ्यांबरोबरच ठिकठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलिस मतदान केंद्रावर मतदार जाताना त्याची चौकशी करून त्यांना सोडत होते. मतदान केंद्राच्या रस्त्यावरही बॅरिकेड्स टाकून रस्तेही बंद करण्यात आले होते. या निवडणुकीत सर्व पॅनलने मतदान केंद्राबाहेर बुथ लावल्यामुळे त्यांना मतदान यादीतून नंबर काढणे सोपे होत होते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी अॅपचा वापर करून मतदान कोणत्या ठिकाणी आहे, हे मतदारांना सांगितले जात होते. बँकेच्या निवडणुकीत मतदानासाठी पैसे मागत असल्याचे चित्र काही ठिकाणी होते. तर काही ठिकाणी पैशांचे वाटप केल्याचीही चर्चा होती.

नाशिकरोडला कमी प्रतिसाद

जेलरोड : नामको बँकेच्या निवडणुकीस नाशिकरोड येथे मतदारांचा कमी प्रतिसाद मिळाला. तीस टक्क्यांपेक्षीही कमी मतदान झाल्याचे सूत्रांनी दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले. नाशिकरोडला तीन ठिकाणी मतदान केंद्रे होती. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये दहा खोल्यांची व्यवस्था होती. येथे ५६५७ मतदान होते, पैकी १६४० मतदान झाले. उपनगर येथील महापालिका शाळा क्रमांक ४६ येथे दोन खोल्या होत्या. येथे १०५० पैकी ३२५ मतदान झाले. गांधीनगर येथील महापालिका शाळा क्रमांक ४४ येथे चार मतदान खोल्या होत्या. येथे २०५८ पैकी ५९२ मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिकरोडला एकूण ८७६५ मतदान होते, पैकी २५५७ मतदान झाले. थंडीमुळे सकाळी मतदानाला प्रतिसाद कमी होता. त्यामुळे काही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी वाहने पाठवून मतदारांना केंद्रावर आणले. सायंकाळी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतपेट्या सील करण्यात आल्या. नंतर खासगी वाहनातून कडेकोड पोलिस बंदोबस्तात त्या मुख्यालयाकडे रवाना करण्यात आल्या.

सातपूरला ४५ टक्के

सातपूर : सातपूला छत्रपती शिवाजी विद्यालयात असलेल्या केंद्रात ४५ टक्के मतदान झाले. सातपूर भागात एकूण ४ हजार २०० मतदान होते. त्यातील पाचशेहून अधिक मतदार हयात नाहीत, तर ७०० हून अधिक मतदार इतर जिल्ह्यांत वास्तव्यास गेल्याने मतदानाची टक्केवारी कमी झाली. सकाळी आठ वाजेपासूनच शिवाजी विद्यालयात चोख

पोलिस बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली. ३ हजार २०० मतदारांपैकी १४७१ मतदारांनी मतदान केले.

सटाण्यात ४१ टक्के

सटाणा : सटाणा केंद्रावर ४१ टक्के मतदान झाले. येथील जिजामाता विद्यालयात मतदान केंद्र होते. सटाण्याचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते, त्यात प्रगती पॅनलचे महेंद्र बुरड, रंजन ठाकरे व नम्रता पॅनलचे महेश भामरे यांचा समावेश आहे. त्यामुळे शहरात चुरस होती. सहकार पॅनलचे सचिन कोठावदे दिवसभर या मतदान केंद्रावर तळ ठोकून होते. दुपारनंतर मतदानासाठी गर्दी झाली. सटाणा येथील सर्व केंद्रेमिळून १६५४ मतदान झाले.

त्र्यंबकला ३० टक्के

त्र्यंबकेश्वर : येथे नाशिक मर्चंटस बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. त्र्यंबकचे दोन उमेदवार रिंगणात होते. नम्रता पॅनलकडून सर्वसाधारण गटात दिलीप मनोहर पवार आणि सहकार पॅनलकडून महिला राखीव गटात रेखा कैलास भुतडा यांनी निवडणूक लढवली. नूतन त्र्यंबक विद्यालय इमारतीमध्ये पाच बुथ स्थापन करण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ३१५० पैकी ९४० जणांनी मतदान केले. केंद्र अधिकाऱ्यांकडून ओळखपत्राचा आग्रह धरण्यात येत असल्याने वाद उद्भवत होता. बँकेने दिलेले ओळखपत्र अथवा खातेपुस्तक ओळखीचा पुरावा म्हणून नाकारण्यात येत असल्याने सभासदांनी नाराजी व्यक्त केली.

मनमाडला १५९६ मतदान

मनमाड : मनमाडला शांततेत मतदान झाले. सकाळी मतदान प्रक्रिया संथ होती. थंडीचा परिणाम मतदानावर जाणवला. शिवाजी चौक येथील प्राथमिक शाळेत मतदान केंद्र असल्याने याठिकाणी उमेदवार समर्थकांची गर्दी होती. मनमाड येथील सुभाष नहार व दादा बंब या दोन स्थानिक उमेदवारांमुळे मनमाडमध्ये समर्थकांत उत्साह दिसून आला. मनमाडमध्ये ३५०० मतदार होते त्यापैकी पाच वाजेपर्यंत १५९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदगावात व्ही. जे. हायस्कूलमध्ये मतदान केंद्र होते. एकूण २१४९ मतदारांपैकी ..... मतदान झाले. यावेळी माजी आमदार अॅड. अनिल आहेर यांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदगावमध्ये स्थानिक उमेदवार खंडू दंडगव्हाळ व संजय सानप यांच्यात चुरस दिसून आली.

कळवणला ५३.२४ टक्के

कळवण : कळवण येथे १६६६ पैकी ८८७ म्हणजे ५३.२४ टक्के मतदारांनी हक्क बजावला, तर अभोण्यात ८५४ पैकी ३१६ म्हणजे मतदारांनी मतदान केले. सकाळी ८ वाजेपासून मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत होती. सुरुवातीला थंडीचा परिणाम जाणवत होता. शासकीय ओळ्खपत्राव्यतिरिक्त कुठलेही अन्य ओळखपत्र अधिकारी वर्गाने स्वीकारले नाही. नामको बँक सभासद ओळखपत्र पूर्णपणे बंद करण्यात आले होते. पोलिस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशमुख मराठा वधू-वर मेळावा उद्या

$
0
0

देशमुख मराठा वधू-वर मेळावा उद्या

नाशिक : नाशिक जिल्हा देशमुख मराठा समाजाच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही मंगळवारी (२५ डिसेंबर) सकाळी १० वाजता कालिका मंदिर सभागृह, मुंबई नाका येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजाचे अध्यक्ष फकीर देशमुख भुषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप-अधीक्षक हेमंत सोमवंशी, संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. शेखर सोमवंशी, नवनाथ हर्बल्सचे संचालक बाळासाहेब देशमुख, देशमुख समाज महिला मंडळ नाशिकच्या अध्यक्षा कामिनी तनपुरे आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रदर्शनातून कोट्यवधींची उलाढाल

$
0
0

\B

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

'क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०१८'मध्ये अवघ्या तीन दिवसांत कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी खरेदी करण्यात आल्या असून, ग्राहकांनी प्लॅटसह रो हाऊसच्या खरेदीला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले. शहरातील सर्व ठिकाणच्या प्रॉपर्टीला ग्राहकांकडून मागणी करण्यात आली असून, गृह खरेदीसाठी नाशिककरांनी प्रदर्शनातून तुफान गर्दी केल्याचे पहायला मिळाले. शहराचे बदलते स्वरुप लक्षात घेता, वाढलेल्या किंमतीतही गृह खरेदीचा उत्साह कमालीचा असल्याचे प्रदर्शनाचे समन्वयक अनिल आहेर यांनी सांगितले.

डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित तीन दिवसीय 'क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०१८'मध्ये ग्राहकांनी बजेट होमला पसंती दिली. २५ लाखांपासून १ बीएचके प्लॅट ते १ कोटीहून अधिक किमतीस असलेले ३ आणि ४ बीएचके प्लॅट खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पसंती दिली आहे. क्रेडाईने या प्रदर्शनातून ५० कोटीहून अधिक रुपयांची प्रॉपर्टी विक्री होईल, असे उद्दिष्ट्य होते. यानुसार तीन दिवसांतच १०० हून अधिक प्लॅट आणि रो हाऊची विक्री प्रदर्शनाच्या माध्यमातून झाली असून, यातून ५० कोटीहून अधिक किमतीची प्रॉपर्टी विक्री झाल्याचे प्रदर्शनाच्या समन्वयकांनी सांगितले. प्रदर्शनात ग्राहकांनी नाशिकमधील प्रॉपर्टीची माहिती घेत, कुटुंबीयांसह प्रॉपर्टीची पाहणी करत बुकिंग केली असून, उत्तर महाराष्ट्रातील ग्राहकांनीही यावेळी गृह खरेदीची पर्वणी साधल्याचे दिसून आले.

\B

योजनांचा घेतला लाभ\B

प्रदर्शनात प्रॉपर्टीची बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना नो जीएसटी, स्टँप ड्यूटी, नोंदणी शुल्क वर सूट, स्क्रॅच कूपन, लकी ड्रॉ, सोन्याचे नाणे भेट, आकर्षक व्याज दर, लोन ट्रान्स्फर यासह इतर योजनाचा लाभ देण्यात आला. तसेच अनेक ग्राहकांनी प्रॉपर्टीची ऑनलाइन बुकिंग केली असून, प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या प्रॉपर्टींची विक्री करण्यात आली आहे.

\Bशहराबाहेरील ग्राहकांचाही प्रतिसाद\B

नाशिककरांसह उत्तर महाराष्ट्र, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, डोंबिवली, पुणे या शहरातील ग्राहकांनी देखील गृहखरेदी केली असून, नाशिक शहराची इतर शहरांसोबतची वाढती कनेक्टिव्हिटी प्रॉपर्टी विक्रीसाठी लाभदायक ठरत असल्याचे यावेळी दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहलगाम गोठले

$
0
0

पहलगाव गोठले…

दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाव येथे रविवारी झालेल्या तुफान हिमवर्षामुळे परिसरातील वाहते ओढेही गोठले. गोठलेल्या ओढ्याची छायाचित्रे टिपण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारठा झाला कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गत आठवड्यात हुडहुडी भरविणारी थंडी गायब झाली असून ७.९ अंश सेल्सियसपर्यंत गेलेले किमान तापमान रविवारी ११.२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे कमाल तापमानही ३० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असून, वातावरणातील गारवा कमी झाल्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून नाशिककर आरोग्यदायी हिवाळ्याचा अनुभव घेत आहेत. कधी हुडहुडी भरविणारा गारठा, तर कधी गुलाबी थंडीचा सामना नाशिककर करीत असून गत आठवड्यात १९ डिसेंबर रोजी यंदाच्या हंगामातील नीचांकी (७.९ अंश सेल्सियस) तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे थंडीचा कडाका कायम राहील असे वाटत असताना चारच दिवसांत हा कडाका कमी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात रविवारी किमान तापमान ११.२ अंश सेल्सियस नोंदविले गेले. चारच दिवसांत किमान तापमान ३.३ अंश सेल्सियसने वाढले आहे तर कमाल तापमानही ३० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याने हवेतील गारवाही गायब झाल्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत. पुढील आठवड्यातही थंडीचा जोर फारसा वाढणार नाही असा अंदाज भारतीय हवामान विभागाने नोंदविला आहे.

दिनांक किमान तापमान कमाल तापमान

२४ डिसेंबर १२ ३०

२५ डिसेंबर १२ ३०

२६ डिसेंबर १० २८

२७ डिसेंबर १० २९

२८ डिसेंबर ११ २९

२९ डिसेंबर ११ २९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदाप्रश्न सोडविण्यासाठी प्रक्रिया उद्योग सुरू करावेत

$
0
0

छगन भुजबळ यांचे मत; कृषि व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

'जगात कांद्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू झालेले आहेत. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठे उत्पादन होते तरीही जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग नाही. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज आहे.' असे मत माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे लासलगांव येथे प. पू. भगरीबाबा भव्य कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन २०१८ आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार अनिल कदम, कलाकार हार्दिक जोशी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती ललित दरेकर, चांगदेवराव होळकर, मानसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे उपस्थित होते. हे प्रदर्शन २७ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

भुजबळ म्हणाले,'शेतकऱ्यांनी डगमगून न जाता हिंमतीने काम करावे. कधीकाळी कांद्याने दिल्लीत शीला दिक्षित यांचे सरकार पाडले होते. कांद्याचे भाव वाढले तर सरकार पडते तर कांद्याचे भाव पडले तर सरकार पडू शकत नाही का?' असा सूचक सवाल त्यांनी उपस्थित केला. कांद्याला भाव मिळण्यासाठी निर्यात खुली करण्याची गरज आहे. राज्यातील शेतकरी परदेशातील कांद्याशी स्पर्धा करण्यात सज्ज आहे. अमेरिकेत देखील शेतकऱ्यांना कोट्यवधीचे कर्ज दिले जाते. देशात सद्या अनेक अनुदान योजना बंद केल्या जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

'शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगू, असे म्हटले जाते; मग त्याच्या शेतमालाला भाव मिळत का नाही.' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पक्षभेद विसरून सर्व राजकीय पक्षाने एकत्र येण्याची गरज भुजबळ यांनी व्यक्त केली.

आमदार अनिल कदम म्हणाले,'नव्या तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषि प्रदर्शन फायद्याचे ठरेल त्यामुळे शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. शेतीला जोडव्यवसाय केल्याशिवाय शेतकऱ्यांना फायदा होत नाही.'

यावेळी आयोजक सभापती जयदत्त होळकर म्हणाले,'शेतकरी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्याचा सन्मान करावा या उद्देशाने कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.' यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन प्रा. किशोर गोसावी यांनी केले.

राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १५० कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून, १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कमी दराने विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान घोषित केले आहे. सरकारची ही मदत अतिशय तुटपुंजी आहे. २००० साली कांद्याचे भाव पडले तेव्हा आघाडी सरकारने ३५० रुपये क्विंटलने कांदा खरेदी केला होता, त्यावेळी कांद्याचा उत्पादन खर्च प्रती क्विंटल २०० ते २५० रुपये होता. आज कांद्याचा उत्पादन खर्च ८०० रुपये असताना २०० रुपये मदत ही अतिशय तुटपुंजी असून, ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा आहे.

- छगन भुजबळ, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मण समाजाला हवे महामंडळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ब्राह्मण समाज बुद्धिवंत असला तरी समाजातील अनेक बांधव हालअपेष्टांमध्ये जगत आहेत. अशा घटकांच्या उन्नतीसाठी सरकारने ब्राह्मण समाज विकास महामंडळाची स्थापना करावी, असा ठराव रविवारी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था समाज सहाय्य संस्थेच्या सभागृहात करण्यात आला. समाजाला आरक्षण हवे की नको, याबाबतची मते खुलेपणाने मांडतानाच संरक्षण मात्र नक्कीच मिळायला हवे, अशी एकमुखी मागणीही यावेळी नोंदविण्यात आली.

ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी गुजरातमध्ये जोर धरीत असून, याच पार्श्वभूमीवर ब्राह्मण आरक्षण हवे की नको, या विषयावर शहरातील सर्व ब्राह्मण संघटनांच्या वतीने महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पुरोहीत संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, मुकुंदराव कुलकर्णी, धनंजय बेळे, दीपाली कुलकर्णी, शामला दीक्षित, अॅड. भानुदास शौचे, अॅड. नागनाथ गोरवाडकर, अॅड. अविनाश भिडे, अॅड. गणेश गोखले आदी उपस्थित होते. आरक्षण हा अत्यंत कळीचा मुद्दा असल्याने या महाचर्चेसाठी देशस्थ, ऋगवेदी, कोकणस्थ, चित्पावन यांसह सर्वच ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्राह्मण समाजाला आरक्षण हवे की नको यावर मत मांडण्याची संधी यावेळी सहभागींना देण्यात आली. आरक्षणाअभावी ब्राह्मण समाज शिक्षण, नोकरी, पदोन्नती यांसारख्या संधींपासून वंचित राहतो. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. याकामी नेतृत्व करणाऱ्यांना पाठबळ देण्याची तयारीदेखील दर्शविण्यात आली. आरक्षणासाठी वेळप्रसंगी महामोर्चे काढण्याची तयारी ठेवा, असे आवाहन यावेळी काही नागरिकांनी केले. कमी गुणवत्ता असणारे आरक्षणाच्या बळावर पुढे जातात व आपल्याकडे गुणवत्ता असूनही मागे राहावे लागते. त्यामुळे आपल्या समाजालाही आरक्षण मिळायलाच हवे अशी भावना रोहिणी कुलकर्णी, काशिनाथ गाडगीळ आदींनी व्यक्त केली. तर आरक्षणापेक्षाही समाजातील मुली आणि महिलांना संरक्षण पुरविणे गरजेचे आहे, असे मत विशाल शिखरे यांनी मांडले. देशातील सर्व ब्राह्मण बांधवांना एकत्रित आणून मोठे संमेलन घ्यावे, अशी मागणी करतानाच समाजाला सवलती मिळाल्या नाही तर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या संमेलनातून देऊन दबावगट निर्माण करावा असे मत शुक्ल यांनी नोंदविले. समाज बदलत असून, एकमेकांना मदत करीत पुढे जावे लागेल, असा सल्ला मुकुंद कुलकर्णी यांनी दिला. समाजाच्या विकासासाठी आरक्षण हाच ठोस पर्याय आहे का, यावर विचार करावा असे आवाहन बेळे यांनी केले. स्वागत सुभाष सबनीस यांनी, तर प्रास्ताविक उदयकुमार मुंगी यांनी केले.

महाचर्चेतील मुद्दे

- समाजाच्या उन्नतीसाठी हवे विकास महामंडळ

- आरक्षणासाठी मोर्चे काढा

- समाजातील एकी कायम ठेवावी

- समाजातून राजकीय नेतृत्व तयार व्हावे

- ग्रामीण भागातील समाजबांधवांना संरक्षण द्या

- आरक्षणापेक्षा महामंडळ व सुरक्षेला प्राधान्य द्यावे

- आरक्षणाचा कायदा रद्द होण्यासाठी लढा उभारा

- नोकरीऐवजी शिक्षणात आरक्षण असावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images