Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

खडी, क्रशरला अखेर मंजुरी

$
0
0
गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले खडी, क्रशर अवघ्या काही दिवसात कार्यान्वित होणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या ५३ पैकी ३५ अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच, इतरही क्रशर लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

स्वतंत्र घाटाच्या मुद्यावरून वादाची शक्यता

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात होणारी गर्दी पाहता पर्यटकांच्या सोयीसाठी प्रशासनाने स्वतंत्र स्नानघाटाचे नियोजन केले आहे. मात्र हा निर्णय घेताना प्रशासनाने साधुमहंत आणि पुरोहित संघाला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप होत आहे.

कॉलेज निवडणुकांबाबत कही खुशी कही गम

$
0
0
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी कॉलेज प्रतिनिधींच्या निवडणुका पुन्हा सुरू करण्याची शक्यता विधानसभेत वर्तवली असल्याने शहरातील विद्यार्थी संघटनांनी त्याचे स्वागत केले आहे. मात्र विद्यार्थी तसेच प्राध्यापकांच्या मनात या निवडणुकांविषयी संभ्रमाचे वातावरण आहे.

जलसाठा ४० टक्क्यांवर

$
0
0
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत होत असलेल्या दमदार पावसामुळे जलसाठा लक्षणीयरित्या वाढत असून शुक्रवारी हा साठा ४० टक्क्यांवर पोहचला. जिल्ह्यातील तीन धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत, तर तीन धरणे अद्याप पाण्याच्याच प्रतीक्षेत आहेत.

दोनशे ठिकाणी ८०० कॅमेरे

$
0
0
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागात बसवल्या जाणाऱ्या सीसीटीव्हीचा पोलिस प्रशासनाने नव्याने प्रस्ताव सादर केला आहे. यापूर्वीच्या प्रस्तावात १ हजार ७५० कॅमेरे बसवण्यात येणार होते आणि त्यासाठी २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता.

एसटी प्रशासनाचे आरटीओला साकडे

$
0
0
महापालिका हद्दीसह इतर ठिकाणी सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी प्रशासन मेटाकुटीला आले आहे. त्यातच अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी खासगी बस मालकांना ठेके दिले असून संबंधित बसचालक कर्मचाऱ्यांना सोडल्यानंतर परत येताना प्रवासी वाहत आहेत.

नाशिकही आयटी हब हवे

$
0
0
विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ)च्या माध्यमातून तिरुअनंतपुरम येथील पपलीपुरम गावात सुमारे ४५० एकर जागेवर भव्यदिव्य असे इंटिग्रेटेड आयटी टाऊनशिप, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, रेसिडेन्शिअल अपार्टमेंट, शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, हॉस्पिटल, हॉटेल, शैक्षणिक संस्था, या सगळ्याच्या अनुषंगाने हे पार्क विकसित करण्यात आले आहे.

'धर्मादाय'ची परीक्षा दोन टप्प्यात

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (२८ जुलै) आयोजित करण्यात आलेली अधीक्षक पदासाठीची परीक्षा लक्षात घेऊन काही पदांची परीक्षा नंतरच्या टप्प्यात घेण्यात येणार आहे. यातील निरीक्षक, जनसंपर्क अधिकारी, अधीक्षक पदांसाठीची परीक्षा उद्या (दि.२८) होणार आहे.

सुमारे सहा हजार तक्रारींचा होणार निपटारा

$
0
0
अनेक वर्षांपासून पोलिस स्टेशनमध्ये दाखल होणाऱ्या तक्रार अर्जांनी सात हजारांचा टप्पा गाठला आहे. अर्जांचा डोंगर पाहून पोलिस अधिकारीही चक्रावून गेले असून प्रलंबित तक्रार अर्जांचा आकडा कमी करण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे.

पेठ परिसरात सौम्य भूकंप

$
0
0
पेठ तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य हादरे बसले. तीन रिश्टर स्केलच्या आसपास या भूकंपाची नोंद झाली असून कुठलेही नुकसान किंवा जीवितहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

निकालासाठी NCP चा ठिय्या

$
0
0
पुणे विद्यापीठातर्फे तीन महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या द्वितीय वर्षाचे रखडलेले निकाल त्वरित लावावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. पुणे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी केलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

डोनेशनविरोधात 'छात्रभारती' रस्त्यावर

$
0
0
डोनेशन घेण्यास कायद्याने बंदी असतानाही या नियमाचे कॉलेजकडून सर्रास उल्लंघन होते. डोनेशन घेणाऱ्या कॉलेजची तपासणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी छात्रभारती संघटनेने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

बोगस मतदार वगळा

$
0
0
जळगाव शहराच्या मतदार यादीत आढळलेले ६६,७३३ बोगस मतदार वगळावेत, यासाठी महापालिकेची निवडणूक तीन ते चार महिने पुढे ढकलावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. विविध राजकीय पक्षांनी या मागणीचा फॅक्स आणि ई-मेल निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे.

मारा उडी अन् चुकवा खड्डे

$
0
0
पावसामुळे शहरातील रस्त्यांची दैना झाली असताना महापालिकेतील सत्ताधारी सुस्त बसल्याचा आरोप करत शुक्रवारी शिवसेनेने खड्डयांवरुन लांब उडी मारण्याच्या अनोख्या आंदोलनाद्वारे मनसेच्या कारभाराचा निषेध केला.

लॅब असिस्टंटपदावर टांगती तलवार

$
0
0
राज्यभरात ज्युनिअर कॉलेजमधील लॅब असिस्टंटची पदे रद्द करून त्यांचा समावेश चतुर्थ श्रेणीत करावा, असा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेताना शालेय संहिता आणि राज्यपालांच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याची बाब काही कर्मचाऱ्यांनी उघड केली.

इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचा बहुमान नाशिकला

$
0
0
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटची (सीपीआरआय) पश्चिम भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची लॅबोरेटरी नाशिकजवळील शिलापूर येथे होणार आहे.

कारागृहाच्या आवारात पोलिस शिपायावर हल्ला

$
0
0
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्याने उपचाराहून परत येताना कारागृहाच्या आवारात पोलिस शिपयावर जीवघेणा हल्ला केला.

ओझर विमानतळासाठी ३०० कोटींचा प्रस्ताव

$
0
0
मुंबई विमानतळावरील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून नावारुपाला येणा-या ओझर विमानतळाच्या विकासासाठी तब्बल ३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

द्वारका भुयारी मार्ग खुला

$
0
0
द्वारका चौकातील वाहतुकीमुळे पादचाऱ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी बांधण्यात आलेला पंचमुखी भुयारी मार्ग शनिवारी खुला करण्यात आला.

नाशकात आयटीचा सिक्सर

$
0
0
आयटी परफेक्ट डेस्टिनेशन असलेल्या नाशिकमध्ये येण्यासाठी सहा कंपन्यांनी इच्छा दर्शविली असून येत्या वर्षभरात त्या नाशकात येऊ शकणार आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images