Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

श्रीकांत बेणी यांचा सचिवपदाचा राजीनामा

$
0
0

'सावाना'तील कलहाची परिणीती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयातील कलहाची परिणीती अखेर प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांच्या राजीनाम्याने झाली आहे. अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी राजीनामा स्वीकारला असून बेणी यांना पदमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रमुख सचिवपदी कुणाची नियुक्ती होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कार्यक्षम आमदार पुरस्कार समारंभ सोहळ्यात बेणी यांनी त्यांच्या भाषणात काही आरोप केले. पुरस्कारासाठी धनंजय मुंढे यांची निवड केल्याने दबावासाठी फोन आल्याचे त्यांनी समारंभात सांगितले. याप्रकरणी सावाना अध्यक्षांनी खुलासा करून तसे काही नसल्याचे स्पष्ट केले. यानिमित्ताने सावानामध्ये उभी फूट पडल्याचे समोर आले. पुढेही ही धुसफूस कायमच होती. नवीन पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांमध्ये उघड दोन गट पडले होते. प्रमुख सचिव या पदासाठी काहींनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते. गेल्या आठवड्यातील बैठकीत स्वाभाविकपणेच त्याचा स्फोट झाला. या बैठकीत बेणी व पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. एकमेकाच्या गळ्याला हात लावण्यापर्यंत वेळ गेली. एका महिला पदाधिकाऱ्याबद्दल अश्लाघ्य शेरेबाजीही झाली. या बैठकीचा बभ्रा माध्यमांमध्ये झाल्यानंतर या कलहाची परिणीती कोणाच्या तरी बळीत होणार हे अपेक्षित होतेच. यापार्श्वभूमीवर बेणी यांनी मिलिंद जहागिरदार, स्वानंद बेदरकर व विनया केळकर यांच्या चौकशीसाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे पत्र पाठविले. त्याची पत्रपरिषदेत माहिती दिली. ही माहिती बेणी देत असताना उर्वरित सर्व पदाधिकारी त्यांच्यापासून फटकून तर होतेच; शिवाय या पत्राबाबत आमचा काहीही संबंध नाही, असे सांगत होते. त्यामुळे 'सावाना'तील कलह आता टिपेला पोहचल्याचे दिसून आले. कार्यकारिणीतील बदलते वारे लक्षात घेऊन बेणी यांनी रातोरात अध्यक्षांकडे राजीनामा दिला. अध्यक्ष औरंगाबादकर यांनीही तात्काळ तो स्वीकारुन बेणी यांना कार्यमुक्त करण्याची तत्परता दाखविली. यातून हा संघर्ष किती तीव्र झाला होता, याची प्रचिती आली आहे.

बेणी यांनी राजीनामा दिल्यानंतर घटनेची सर्व चौकशी करून आणि 'सावाना'च्या हितास्तव बेणी यांना पदमुक्त केले आहे.

- विलास औरंगाबादकर,

अध्यक्ष, सावाना

भ्रष्टाच्या विविध आरोपांमध्ये अटक होऊन जामिनावर सुटका झालेली व्यक्ती वाचनालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेत पदाधिकारी म्हणून मिरविते हेच मुळात सावानचे दुर्दैव आहे. जेथे तात्यासाहेब, म्हात्रे, बाळासाहेब दातार यांच्यासारख्या दिग्गज मंडळींनी काम केले तेथे बेणीसारख्या व्यक्तीचे असणे धोकादायक आहे. अशा गुन्हेगारी व्यक्तीचे सामान्य सभासदत्वही रद्द केले गेले पाहिजे.

- रमेश जुन्नरे,

माजी पदाधिकारी, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधी विभागातही आउटसोर्सिंगचे वारे!

$
0
0

विभागप्रमुख कंत्राटी तत्वावर नेमण्याचा विचार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपल्या आस्थापनातील रिक्त पदांचा फटका महापालिकेला कायदेशीर सल्ला देणाऱ्या विधी विभागालाही बसला आहे. या विभागाला सध्या कोणी वाली नसल्याने महापालिकेशी संबंधित विविध न्यायालयांमधील दाव्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे महापालिकेविरोधात दावे जात आहेत. त्यामुळे एकीकडे वकील पॅनलची पूनर्रचना करण्यासह विधी विभागप्रमुखपद आउटसोर्सिंगद्वारे भरण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

महापालिकेच्या विविध विभागांना कायदेशीर सल्ला देणारा विधी विभागच सध्या अपंग झाला आहे. महापालिकेशी संबंधित तब्बल २ हजार ७५८ खटले जिल्हा, उच्च व सर्वोच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. या खटल्यांची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे खटल्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतांना दुसरीकडे रिक्त पदांचा फटका या विभागाला बसला आहे. भूसंपादन, घरपट्टी-पाणीपट्टी देयकांचा वाद, विकासकामांच्या ठेक्यांबाबत मक्तेदार आणि महापालिकेत उद्भवलेल्या वादाकडे लक्ष देण्यासाठी आवश्यक असलेले विधी विभागप्रमुखपदसुद्धा रिक्त आहे. त्यामुळे जिल्हा, उच्च व सर्वोच्च न्यायालयात असलेल्या खटल्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. जिल्हा, उच्च व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलांची या पॅनलवर नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र दावा दाखल झाल्यानंतर त्यासंदर्भातील माहिती न्यायालयाला सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवायला हवी, ती दाखविली जात नसल्याने दाव्यांचा निकाल महापालिकेच्या विरोधात जाण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. या प्रकाराची महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली आहे. प्रलंबित दाव्यांची माहिती मागविली आहे. सद्यस्थितीत वाढत्या आस्थापना खर्चाचे कारण देत सरकारने महापालिकेच्या नोकरभरतीला बंदी घातल्याने विधी विभागप्रमुखपद आउटसोर्सिंगद्वारे भरता येईल काय, याची देखील चाचपणी केली जात आहे. आता या विभागाचे प्रमुख पदही आउटसोर्सिंग केल्यास संपूर्ण विधी विभागाचेच खासगीकरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरसाठ, भावसार यांचाही उमेदवारी अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी बुधवारी आणखी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सिडकोतील धनंजय भावसार आणि देवळा तालुक्यातील विनोद शिरसाठ यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. दिंडोरी मतदारसंघात अद्याप एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्ज सादर केला नसला तरी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि त्यांच्या पत्नी कलावती यांच्यासाठी मुलाने उमेदवारी अर्ज नेले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, उमेदवारी अर्ज वितरणास सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज घेऊन जाणाऱ्यांचा ओघ अधिक होता. महेश झुंजार आव्हाड या अपक्ष उमेदवाराने पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज सादरही केला. पाठोपाठ बुधवारी आणखी दोघांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. त्यामध्ये देवळा तालुक्यातील उमराणे येथील विनोद वसंत शिरसाठ या तरुणाने हिंदुस्थान जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर सिडकोतील सावतानगर येथील साईबाबा चौकातील रहिवासी धनंजय अनिल भावसार यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आतापर्यंत तीन उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे.

इच्छुक घोड्यावर...

उमेदवारी अर्ज घेऊन जाणाऱ्यांचा ओघ बुधवारी काहीसा कमी झाल्याचे पहावयास मिळाले. बहुजन पक्षाच्या अॅड. वैभव शांताराम आहिरे यांच्यासाठी संतोष शांताराम आहिरे यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे, तर आम आदमी पक्षाच्या योगेश अशोक कापसे यांच्यासाठी अभिजीत बबनराव गोसावी यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. याखेरीज रमेश बन्सी भाग्यवंत, महेश भिका शिरूडे, रंजना आनंद म्हात्रे, लक्ष्मण शिवचरण वाल्मीकी, शिवाजी सुभाष वाघ, संजय सुकदेव घोडके, शरद तुकाराम शिंदे, मंगेश मनोहर ढगे आणि डॉ. भाऊसाहेब मनोहर ढगे या इच्छुकांसाठी उमेदवारी अर्ज नेण्यात आले.

खासदार चव्हाण यांच्यासाठी अर्ज

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी नाकारलेल्या खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह त्यांची पत्नी कलावती हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासाठी मुलगा समीर चव्हाण यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज नेले. याखेरीज राष्ट्रीय मराठा क्रांती पक्षाच्या वतीने दादासाहेब हिरामण पवार यांच्यासाठी दशरथ पोपट गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. अॅड टिकाराम बागुल, रवींद्र कराटे, अशोक जाधव, बाळासाहेब बर्डे, रामदास बर्डे, किशोर डगळे यांच्यासाठीही समर्थकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. उमेदवारी अर्ज घेऊन जाणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर यांच्याकडे अद्याप एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्ज सादर केलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा संकुलात प्रवेशबंद!

$
0
0

मतदान यंत्राच्या सुरक्षिततेसाठी मनाई आदेश जारी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्र शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल येथे ठेवण्यात येणार आहेत. मतदान यंत्रांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सहाय्यक निवडणूक अधिकारी गणेश मिसाळ यांनी तालुका क्रीडा संकुल परिसरात मनाई आदेश जारी केला असून यामुळे ३१ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत हे क्रीडा संकुल नागरिकांना बंद करण्यात आले आहे.

साठ फुटी रोडवर असलेल्या या तालुका क्रीडा संकुलात सकाळी तसेच सायंकाळी फेरफटका, प्राणायाम तसेच विविध मैदानी खेळ खेळण्यासाठी खेळाडूंसह ज्येष्ठ नागरिकांची गर्दी असते. मनाई आदेश लागू झाल्याने नागरिकांना काही दिवस तरी अन्य मैदानांचा वापर करावा लागणार आहे. क्रीडा संकुलात लोकसभा निवडणुकांसाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्र ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे या यंत्रणाच्या सुरक्षिततेला बाधा पोहचू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने हा आदेश लागू करण्यात आला आहे.

या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी व नाशिक पोलिस अधीक्षक यांनी आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश निर्देशित करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मालेगाव बाह्य सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसळ यांनी मनाई आदेश जारी केले असून आदेशाचा अवमान करणाऱ्यांवर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी येथे २४ तास बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना या मनाई आदेशाची माहिती व्हावी यासाठी प्रवेशद्वारावर नोटीस लावण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता अन्वये विशेष कार्यकारी दंडाधिकारी घोषित करण्यात आले आहे. त्या अधिकाराचा वापर करून हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

- गणेश मिसाळ, निवडणूक निर्णय अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिका, थंडगार आइस्क्रीम मेकिंग

$
0
0

(मटा कल्चर क्लब लोगो, क्यू आर कोड वापरावा)

शिका, आईस्क्रीम आणि डेझर्ट मेकिंग

'मटा कल्चर क्लब'तर्फे कार्यशाळा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून, या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी सगळ्यांची पाऊले थंडगार आइस्क्रीम खाण्याकडे वळू लागली आहेत. उन्हाळ्यात घरात विविध फ्लेवर्सचे आईस्क्रीम असावे आणि ते मनसोक्त खाता यावे, असे प्रत्येकाला वाटते. हीच आ‌वड हेरुन 'मटा कल्चर क्लब'तर्फे 'अॅडव्हान्स आईस्क्रीम आणि डेझर्ट मेकिंग' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'कल्चर क्लब' तर्फे 'अॅडव्हान्स आईस्क्रीम आणि डेझर्ट मेकिंग' कार्यशाळा रविवारी (७ एप्रिल) दुपारी ३ वाजता गंजमाळ येथील हॉटेल रॉयल हेरिटेज येथे होईल. या कार्यशाळेत आईस्क्रीम आणि डेझर्ट एक्स्पर्ट प्रात्यक्षिकांसह रेसिपी शिकविणार आहेत. त्यामध्ये संडे आईस्क्रीम, फ्राईड आईस्क्रीम, ब्लॅक फॉरेस्ट केक आईस्क्रीम शिकण्याची संधी मिळेल. तसेच फुज ब्राउनी, रेड वेलवेट लावा केक, चिया फ्रुट कस्टर्ड पुडिंग, असे डेझर्ट शिकता येतील. या सहभागी होण्यासाठी कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क असेल. कार्यशाळेत सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी दुपारी १ ते ५ या वेळेत ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा 'महाराष्ट्र टाइम्स', २ रा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड या पत्त्यावर संपर्क साधू शकतात.

--

'आइस्क्रीम आणि डेझर्ट मेकिंग वर्कशॉप'

दिनांक : ७ एप्रिल, रविवार

वेळ : दुपारी ३ वाजता

ठिकाण : हॉटेल रॉयल हेरिटेज, गंजमाळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात उष्माघाताचा पहिला बळी?

$
0
0

लखाणे गावातील मुलाचा धुळ्यात उपचारदरम्यान मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या आठवडाभरापासून मालेगाव शहर व तालुक्याचे तापमान चाळीशीपार गेले आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून हे उन नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहे. तालुक्यातील लखाणे गावातील आदिवासी वस्तीवरील अजय श्रावण सोनावणे (वय १८) याचा मंगळवारी सायंकाळी धुळे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. अजयचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे त्याचे कुटुंबीय व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे एप्रिलच्या प्रारंभीच मालेगावी वाढलेले उन जीवघेणे ठरले असून अजय उष्माघाताचा बळी ठरला आहे.

शहर व तालुक्यात सध्या तापमान ४१ ते ४२ अंशापर्यंत गेले आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन प्रभावित झाले असून नागरिक उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी बाहेर पडणे टाळत आहेत. तालुक्यातील लखाणे गावातील अजय शेळ्या चरण्याचे काम करीत असे. शनिवारी देखील भर उन्हात दिवसभर शेळ्या चरण्यासाठी गेल्याने सायंकाळी त्यास अस्वस्थ वाटू लागल्याने चक्कर येऊन पडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. अजय यास उपचारासाठी झोडगे येथे आणले होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यास रविवारी धुळे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी लावण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी उशिरा त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

उष्माघाताचा बळी?

अजय आदिवासी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील श्रावण मोलमजुरी करतात. त्यास एक मोठी बहीण आहे. अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या या कुटुंबातील अजयच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र इंगळे यांनी भेट देऊन आर्थिक मदत केली. इंगळे यांच्यासह अजयचे कुटुंबीय, ग्रामस्थांनी उष्माघाताने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान धुळे जिल्हा ग्रामीण रुग्णालयाकडून त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी बँकेला साडेचार कोटींचा नफा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेस २०१८-१९ या आर्थिक वर्षात शून्य एनपीए राखत ११ कोटी ३२ लाख रुपये इतका ढोबळ, तर ४ कोटी ५५ लाख १३ हजार रुपये इतका निव्वळ नफा मिळवल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी बुधवारी (दि. ३) दिली.

व्यापारी बँकेच्या कामगिरीबाबत माहिती देताना गायकवाड म्हणाले की, बँकिंग क्षेत्रात वाढलेली स्पर्धा, नोटाबंदी आणि जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर उद्भवलेल्या अडचणींतही बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आर्थिक निकष पूर्ण केल्याने शून्य एनपीए राखण्यात यश आले आहे. सध्या बँकेकडे ४८१.११ कोटींच्या ठेवी आहेत. बँकेने २७९.२० कोटी रुपयांचे कर्ज वितरित केलेले आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात ७६०.३१ कोटी रुपये इतका व्यवसाय केला आहे. याशिवाय २३४.७९ कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे. व्यापारी बँक एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय आणि शेड्यूल्ड दर्जा मिळविणे या ध्येयाजवळ पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. विविध स्तरांवरील २१ पुरस्कार बँकेला मिळालेले आहेत. सर्व शाखांत करभरणा, एटीएम, एबीबी बँकिंग, ऑनलाइन बँकिंगसोबतच आता बीबीपीएस सुविधाही सुरू करण्यात आली आहे. लवकरच 'एक कुटुंब एक बँक' ही संकल्पना राबविली जाणार असल्याचेही गायकवाड म्हणाले.

याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष अशोक चोरडिया, जनसंपर्क संचालिका रंजना बोराडे, संचालक निवृत्ती अरिंगळे, सुनील आडके, श्रीराम गायकवाड, अशोक सातभाई, जगन्नाथ आगळे आदींसह मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब जाधव, एकनाथ कदम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय संस्कृतीचे रांगोळीतून दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय सण-उत्सव, दाग दागिने, राष्ट्रभावना, कौटुंबिक स्नेहभाव, स्वावलंबन आदींविषयी तब्बल २५०० फूट रांगोळी रेखाटत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. निमित्त होते, नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे. समितीतर्फे १ एप्रिलपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येत असून, या अंतर्गत बुधवारी विविध परिसरांमध्ये वीरपत्नींच्या उपस्थितीत ही महारांगोळी काढण्यात आली होती. ६ एप्रिलपर्यंत या सर्व रांगोळी नाशिककरांना पाहण्यासाठी खुल्या असणार आहेत.

इंदिरानगर गटातून विभागप्रमुख विदुला अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोदकेश्वर मंदिर येथे 'राष्ट्रभावना' या विषयाला अनुसरून गणेशयंत्राची रांगोळी काढण्यात आली. यावेळी वीरपत्नी सुषमा मोरे उपस्थित होत्या. मुंबई नाका गटातून अनुराधा शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कालिका मंदिर येथे नारीशक्ती या विषयी दुर्गा यंत्र काढण्यात आले आहे. यावेळी वीरपत्नी रुपाली बच्छाव उपस्थित होत्या. आडगाव गटातून हिरावाडी येथे बनारसीनगरसमोरील मैदानात सरोजिनी धनोकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'कौटुंबिक स्नेहभाव' या विषयाला अनुसरून राशी यंत्र काढण्यात आले. म्हसरूळ मेरी गटातून अंजली वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत मंगल कार्यालय येथे 'स्वावलंबन' या विषयाला अनुसरून लक्ष्मी यंत्र काढण्यात आले असून, या वेळी वीरपत्नी रेखा खैरनार या उपस्थित होत्या. गंगापूर रोड गटातील मंजुषा नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुजी रुग्णालयात आरोग्य विचार या विषयाला अनुसरून 'धन्वंतरी यंत्र' काढण्यात आले आहे. यावेळी वीरपत्नी भारती चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होत्या. सिडको गटातून छाया परेवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश चौक येथे कृतज्ञता या विषयाला अनुसरून विष्णू यंत्र काढण्यात आले आहे. यावेळी वीरमाता बाळूबाई सोनवणे या उपस्थित होत्या. या सर्व गटांचे प्रमुख म्हणून पूजा अष्टेकर व सहप्रमुख म्हणून भारती सोनवणे यांनी भूमिका बजावली. आज (४ एप्रिल) राजमाता जिजाऊ यांच्या ४२१ व्या जयंती वर्षानिमित्ताने २५ हजार चौरस फुटांची महारांगोळी पाडवा पटांगण, गोदाघाट येथे काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फळ विक्रेत्यांना इथिलीन वापराचे धडे

$
0
0

'एफडीए'कडून मार्केट यार्डमध्ये शिबिर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कृत्रिमरित्या फळ पिकविताना मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम कार्बाइड व अॅसिटिलीन गॅसचा वापर केला जात असल्याने पेठ रोडवरील मार्केटयार्ड येथे जाऊन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) फळ विक्रेत्यांना कायद्याचे धडे दिले. तसेच व्यापाऱ्यांना अन्न व सुरक्षा मानदे कायद्यातंर्गत इथिलीन या हार्मोनल गॅसचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

'एफडीए'चे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे, अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी यासाठी व्यापाऱ्यांची बैठक पेठरोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट येथे घेतली. फळे ही आरोग्यासाठी लाभदायक आहे. पण, केळी, आंबे, पपई, सारख्या फळांना झाडावरून काढल्यानंतर कृत्रिमरित्या पिकविले जाते. काही व्यापारी त्यात कॅल्शिअम कार्बाइड व अॅसिटिलीन गॅसचा वापर करतात. मात्र, याचा वापर टाळून व्यापाऱ्यांनी फळे पिकविण्यासाठी इथिलीन चेंबरची उभारणी करावी. त्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत वैज्ञानिक समितीने परवानगी दिल्याची माहिती देण्यात आली. यावेळी ज्या व्यापाऱ्यांना इथिलीन गॅस चेंबर तूर्त उभारता येऊ शकत नसतील त्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या इथिलीन गॅस उत्पादनांचा वापर करण्यास हरकत नसल्याचे सांगण्यात आले.

व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन

इथिलीन गॅस चेंबरमध्ये फळे पिकवितांना घ्यावयाची काळजी व चेंबरमधील इथिलीन गॅस वापराबाबतच्या तांत्रिक बाबींची माहिती व्यापाऱ्यांना देण्यात आली. यावेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप पाटील, अनिल बुब, ईश्वर गुप्ता, राजू भामरे हे सुद्धा हजर होते. शिबिरात याकूब शेख, कुशवाही या फळ व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांनी त्यांचे शंकानिरसन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामविकास अधिकाऱ्यांचे निलंबन

$
0
0

कामात अनियमितता आढळल्याने कारवाई

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कामकाजात अनियमितता आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत ताहाराबाद व साल्हेरचे ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सोमवारी (दि.१) रोजी निलंबनाची कारवाई केली. अचानक दफ्तर तपासणी मोहिमेंतर्गत ही कारवाई केल्याने ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.

अनेक वर्षांपासून ताहाराबाद व साल्हेर ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले किशोर भामरे यांच्या विरोधात ताहाराबाद व मुल्हेर येथील घरकुल योजना, शौचालय आदी विकासकामांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. अनेकवेळा त्यांच्या विरुद्ध शिष्टमंडळदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेली होती. मात्र अनेक अधिकाऱ्यांनी त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही दिवसांपासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांच्याकडे तक्रारी पाऊसच पडला. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी डॉ. गिते यांनी अचानक सटाणा पंचायत समितीला भेट देऊन दफ्तर तपासणी केली. या तपासणी मोहिमेत बहुतांश ग्रामसेवकांच्या दफ्तरामध्ये अनियमितता आढळून आल्याने डॉ. गिते यांनी भामरे यांना दफ्तर सादर करण्याच्या सूचना दिल्या; मात्र भामरे यांनी दफ्तर न दाखवता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने डॉ. गिते भडकले. डॉ. गिते यांनी भामरे यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देऊन त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची सूचना केली. डॉ. गिते यांच्या या कारवाईमुळे सर्वच ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.

टॅँकर घोटाळ्याची चर्चा

बागलाण तालुक्यात पस्तीसहून अधिक गावांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकरच्या फेऱ्या आणि कागदोपत्री लांबचे अंतर दाखवून कमी अंतरावर टॅँकरने टॅँकर भरले जातात. यामुळे डिझेल आणि फेऱ्यांमध्ये फेरफार करून लाखो रुपयांचा घोटाळा झाला असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... अन् सगळेच पडले बुचकळ्यात!

$
0
0

पोलिसांना बघताच विक्रेत्यांसह ग्राहकांची धांदल

....

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण येथे गेल्या आठवडे बाजारात फळ विक्रेत्यांच्या दोन गटात वाद झाला होता. मालेगावच्या फळ विक्रेत्याला मारहाण करण्यात आली होती. यामुळे बुधवार (दि. ३) च्या बाजारात पोलिस दाखल झाल्याचे बघताच फळ विक्रेत्यांची धांदल उडाली. काही अनूचित प्रकार घडला की काय, अशी शंकेची पालही अनेकांच्या मनांमध्ये चुकचुकली. यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकही बुचकळ्यात पडले. मात्र, पोलिसांनी तेथे मॉकड्रील सुरू करताच सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.

कळवणच्या गेल्या आठवडे बाजारात फळ विक्रेत्यांच्या दोन गटात वाद झाल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. मालेगाव येथील एकाला गाडी लावण्याच्या वादात मारहाण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बुधवारच्या (दि. ३) आठवडे बाजारात त्या घटनेचे पडसाद उमटतील, असा अंदाज काही फळ विक्रेत्यांना होता. त्यातच पोलिस दाखल झाल्याने सारेच अवाक् झाले. पोलिस आपल्यावर कारवाई करतील, या आशेने काही फळ विक्रेत्यांनी काढता पाय घेतला. तसेच, बाजारात काही अनूचित प्रकार तर घडला नाही ना असा विचारही ग्राहकांच्या मनात आला. मात्र, पोलिसांनी मॉकड्रील सुरू केल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

गेल्या आवठडे बाजारात ऐन निवडणूक काळात वाद उफाळून आल्याने परिस्थिती तणावग्रस्त होऊ नये म्हणून कायदा व सुव्यवस्था लक्षात घेत पोलिसांचा ताफा गांधी चौकात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

.....

दंगल नियंत्रणाची प्रात्याक्षिके

कळवण शहरातील आठवडे बाजारानिमित्ताने उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थित कळवण उपविभागातील पोलिसांचे मॉकड्रील करण्यात आले. यावेळी दंगलीवर नियंत्रण मिळविण्याचे सर्व प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. उपविभागातील कळवण, देवळा, अभोणा, वणी, दिंडोरी, सुरगाणा व बाऱ्हे या पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी गांधी चौकात मॉकड्रीलचे प्रदर्शन केले. तसेच, कळवण शहरातून सशस्त्र संचलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटीत घरफोडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

नातलगांच्या अंत्यविधिसाठी बाहेरगावी गेलेल्या घोटीतील एका वाहनचालकाचे घर चोरट्यांनी फोडले. घरफोडीत सोन्याच्या दागिन्यासह जवळपास साठ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या चोरीप्रकरणाने घोटी शहरात पुन्हा खळबळ उडाली असून घोटी पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा घोटी ग्रामस्थांनी केली आहे.

श्रीरामवाडी येथील सोमनाथ किसन सातपुते हे वाहनचालक आहेत. २ एप्रिल रोजी त्यांच्या जवळच्या नातलगाच्या अंत्यविधिसाठी ते कुटुंबीयांसोबत बाहेरगावी गेले होते. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री सोमनाथ सातपुते यांच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून ३५ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. बुधवारी सातपुते यांच्या घराचे कुलुप तुटलेले दिसल्याने शेजारच्यांनी तत्काळ त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेंगळुरू विमानसेवेस १० मेपासून प्रारंभ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कडाक्याच्या उन्हाळ्यात नाशिककरांसाठी खुषखबर आहे. येत्या १० मेपासून बेंगळुरू विमानसेवा सुरू होणार असून अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन सेवा आता आठवडाभर मिळणार आहेत. हवाई वाहतूक महासंचालनालयाने उन्हाळी सेवांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

उडान योजनेच्या माध्यमातून नाशिकला विविध विमानसेवा जाहीर झाल्या आहेत. त्यातील केवळ नवी दिल्ली, हैदराबाद आणि अहमदाबाद या तीन शहरांच्या सेवाच अद्याप सुरू झाल्या आहेत. भोपाळ, गोवा, बेंगळुरू, गाझियाबाद या शहरांसाठीच्या सेवा उन्हाळ्यात सुरू होतील, अशी अपेक्षा होती. हवाई वाहतूक महासंचालनालयाने उन्हाळी सेवांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यात १ एप्रिल ते २६ ऑक्टोबर या काळातील सेवांचा समावेश आहे. इंडिगो कंपनीची नाशिक ते बंगळुरू ही सेवा येत्या १० मे पासून सुरू होणार आहे. ही सेवा आठवडाभर मिळणार आहे. ओझर विमानतळावर सायंकाळी सहा वाजता विमान येईल आणि साडेसहा वाजता ते बेंगळुरूकडे निघेल. या सेवेचा नाशिकला मोठा फायदा होणार आहे.

बेंगळुरू सेवा सुरू व्हावी याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. आता प्रत्यक्षात ही सेवा सुरू होत असल्याने दक्षिणेतील आणखी एक महत्त्वाचे शहर नाशिकशी जोडले जाणार आहे. अलायन्स एअरची अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन सेवा सध्या सोमवार ते शनिवार आहेत. या दोन्ही सेवा आता रविवारही मिळणार आहेत. तर, ट्रुजेट कंपनीची अहमदाबाद सेवा सध्या मंगळवार ते शनिवार असे पाच दिवस आहे. ही सेवाही आता आठवडाभर मिळणार आहे. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळणार आहे.

दिल्ली दिलासा नाही

नाशिक ते दिल्ली या सेवेला प्रचंड प्रतिसाद असल्याने ती आठवडाभर व्हावी अशी आग्रही मागणी आहे. मात्र, ही सेवा आठवड्यातील तीनच दिवस सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यानंतरच ही सेवा विस्तारण्याची चिन्हे आहेत.

अन्य सेवा लांबणीवर

नाशिकहून गोवा, गाझियाबाद (हिंदण), भोपाळ आणि हैदराबाद या सेवा उन्हाळ्यात सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, नाशिककरांचा भ्रमनिरास झाला आहे. विमान सेवांची घोषणा होऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला तरी या सेवा सुरू झालेल्या नाहीत. तसेच, या सेवा आता दिवाळीच्या आसापसाच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग निवडणुका लांबणीवर पडणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदापाठोपाठ आता सहा प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. महापालिकेने प्रभाग समिती सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर केल्यानंतर त्यांनी याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अभिप्राय मागवला आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्य निवडणुकीप्रमाणेच प्रभाग समित्यांबाबत संभ्रमित अभिप्राय मिळण्याची शक्यता असल्याने लोकसभा निवडणुकीनंतरच सभापतिपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या सातपूर, पूर्व, पश्‍चिम, पंचवटी, सिडको व नाशिकरोड प्रभाग समिती सभापतींची मुदत ३१ मार्च रोजी संपली आहे. त्यामुळे या प्रभाग समितींच्या सभापतिपदावर नवीन नियुक्ती करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे नगरसचिव विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यात निवडणुकीची परवानगी मागण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक विषयांवर लघु चित्रपटांतून भाष्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सामाजिक विषयांवर भाष्य करणारा लघु चित्रपट महोत्सव गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यासमध्ये बुधवारी पार पडला. गुजराती चित्रपट दिग्दर्शक व निर्माता विक्रम मोदी, अभिनेत्री दीप्ती चंद्रात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन झाले.

प्रत्येकाला समाजकार्याची प्रेरणा मिळावी, यासाठी सामाजिक विषयांवर १५ लघु चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात आले. यामध्ये वोट फॉर इंडिया, जरुरत, व्हीज्युअल कॅन बी डिसेप्टीव्ह, लोकमान्यांचा रुद्रावतार, पिशवी, जास्वंद, यह जो देस हे मेरा, अ ट्रिब्युट टू इंडियन आर्मी, देवा तुला शोधू कुठे, अस अॅण्ड देम, गंगा मां का दर्द, खेळ मांडला, आयबीडब्ल्यूएम, रंग, मतदान या लघु चित्रपटांचा समावेश होता. या प्रत्येक चित्रपटातून विविध सामाजिक संदेश देण्यात आले. या महोत्सवास नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष राजेश दरगोडे, कायम निमंत्रित सदस्य प्रफुल्ल संचेती यांची उपस्थिती होती.

\Bफाळके पुरस्काराने होणार गौरव

\Bभारत सरकारतर्फे दादासाहेब फाळके पुरस्कार हा दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जातो. दादासाहेब फाळके हे नाशिकचे असल्याने त्यांच्या नावानी नाशिकमध्येही हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली. दिग्दर्शन, संगीत, संकलन, लेखन व सिनेमॅटोग्राफी यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वाइन फ्लूचे संकट कायम

$
0
0

बाधित रुग्णांची संख्या तीन महिन्यांत शंभरवर; पाच जणांचा बळी

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यंदा स्वाइन फ्लू नाशिक शहराची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. हिवाळा संपल्यानंतरही वातावरणातील गारठा कायम असल्याने नववर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच स्वाइन फ्लू बाधितांची संख्या शंभरवर पोहोचली आहे. मंगळवारी चेहडी येथील एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने तीन महिन्यात मृंताचा आकडा पाचवर पोहचला आहे. या आजाराच्या बांधितांची तसेच, बळींची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने वैद्यकीय विभागासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून नाशिक शहरात स्वाइन फ्लूचा उद्रेक वाढतच असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षात स्वाइन फ्लूने शहरात ३०, तर जिल्ह्यात २० जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे प्रशासनाने स्वाइन फ्लूचा प्रकोप रोखण्यासाठी विशेष प्रबोधन मोहीम राबवली होती. गेल्या नोव्हेंबर महिन्यात स्वाइन फ्लूचा जोर काहीसा ओसरला होता. डिसेंबर महिन्यात स्वाइन फ्लूने विश्रांती दिली होती; परंतु जानेवारी २०१९ पासून मात्र स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्वाइन फ्लूसाठी पोषक वातावरण होते. जानेवारीत सात जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले होते. फेब्रुवारीत या प्रादूर्भाव वाढून बाधितांचा आकडा ४० वर गेला असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्याचे आरोग्य यंत्रणांकडून प्रयत्न सुरू असतानाच मार्च महिन्यात आणखी ४९ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे समोर आले. मार्चमध्ये एका रुग्णाचा बळी गेला आहे. एप्रिलमध्येही स्वाइन फ्लूचा प्रकोप सुरूच आहे. मंगळवारी चेहडी येथील एका रुग्णाचा स्वाइन फ्लूने मृत्यू ओढावल्याचे समोर आले आहे. चेहडी येथील प्रेस कामगार नेते नामदेव ताजनपुरे यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याने त्यांचे मंगळवारी (दि. २) रात्री निधन झाले. स्वाइन फ्लूने त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल अद्याप मनपा प्रशासनाला प्राप्त झाला नसल्याने संशयित स्वाइन फ्लू मृत्यू अशी नोंद पालिकेच्या दप्तरी करण्यात आली आहे.

....

स्वाइन फ्लूचे विषाणू वातावरणाशी जुळवून घेताना दिसत आहेत. नाशिकच्या वातावरणातील तफावत आणि विषाणूंची वातावरणाशी जुळवून घेण्याची वाढलेली क्षमता येत्या काळात अधिक त्रासदायक ठरू शकते. लक्षणे जाणवल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यायला हवीत.

- डॉ. संदीप पाटील, जनरल फिजीशियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ स्कोडाने पोलिसांची धावपळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शस्त्रास्त्रे घेऊन जाणाऱ्या एका स्कोडा कारच्या टिपने शहर आणि ग्रामीण पोलिसांची मंगळवारी दिवसभर धावपळ उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत त्या संशयित कारचा कोणताही थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. मात्र, पोलिसांचा तपास सुरूच होता.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रे, मोठी रक्कम तसेच अवैध मद्य वाहतूक याकडे लक्ष वेधले आहे. शहर तसेच ग्रामीण पोलिसांनी आपआपल्या हद्दीत बॉर्डरवर तसेच अंतर्गत भागात २४ तास नाकाबंदी पाँईटस लावले आहेत. येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. तसेच याबाबत येणाऱ्या प्रत्येक माहितीची पोलिसांकडून खातरजमा सुद्धा होती. शहर पोलिसांना मंगळवारी सकाळी एका संशयित स्कोडा कारबाबत माहिती मिळाली. या कारमध्ये शस्त्रास्त्रे असल्याची माहिती असल्याने पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली. तसेच ही माहिती ग्रामीण पोलिसांना सुद्धा देण्यात आली. पोलिस अधीक्षक आरतीसिंह यांनी सुद्धा संशयित स्कोड कारचा शोध लावण्याबाबत आवश्यक त्या हलचाली केल्या. पोलिसांच्या काही तासांच्या तपासानंतरही त्या संशयित स्कोड कारचा थांगपत्ता लागला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडिया भाजपला नकोसा!

$
0
0

पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मतदार भेटीचा सल्ला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या विजयात आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनविण्यात मोलाचा वाटा उचलणारा सोशल मीडिया २०१९ च्या निवडणुकीत भाजपलाच नकोसा झाला आहे. यापूर्वी दिलेल्या आश्वासनांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जाब विचारण्यांची संख्या वाढू लागल्याने भाजपने सोशल मीडियाऐवजी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीच्या सूचना आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे.

विरोधी पक्षांनाही सोशल मीडिया हाताळणींचे तंत्र जमल्याने हा मीडिया आता भाजपवरच उलटला असून माध्यमांपेक्षाही तो जनतेत प्रभावीपणाचे काम करत आहे. २०१४ मध्ये दाखवलेल्या स्वप्नांची आठवण सोशल मीडियाच्या माध्यमातून करून दिली जात आहे. त्यामुळे सोशल मीडिया भाजपसाठी डोकेदुखी ठरला आहे. त्यामुळेच भाजपने आपल्या समर्थकांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीमुळे मोबाइल आता प्रत्येकाच्या हातात आला आहे. त्यातही स्मार्ट फोन सगळ्यांच्या हातात आल्याने सोशल मीडिया प्रचारासाठी प्रभावी साधन ठरत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोबाइल, जीमेल, व्हॉट्सअॅप,फेसबुक, ट्वीटर या सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला होता. निवडणुकांच्या आधीच माध्यमांसह सोशल मीडियाद्वारे काँग्रेसविरोधी वातावरण तयार करण्यात भाजपला यश आले होते. सोशल मीडियातून भाजपने काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा पद्धतशीरपणे प्रचार करत, भाजपने आपल्या भविष्यातील भारताचे स्वप्नही सोशल मीडियावर दाखवले होते.

सोशल मीडियामुळेच सत्ता गेल्याची जाणीव झालेल्या काँग्रेसह विरोधकांनी हा सोशल मीडियाला गेले साडेचार वर्ष आपलेसे करत, तो भाजपवरच पलटवण्याची तयारी केली आहे. भाजपने सत्तेत येण्यापूर्वी दाखवलेले स्वप्न, १५ लाख रुपयांची घोषणा, भ्रष्टाचार रोखण्यात आलेले अपयश, पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर देण्याचे केलेले आव्हान आता सोशल मीडियात भाजपवरच पलटले आहे.

विरोधकांनीही २०१४ मधील स्वप्नांची आठवण सोशल मीडियातून भाजपला करून दिली आहे. विरोधकांसोबतच सर्वसामान्य नागरिकही आता या सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत भाजपला प्रश्न विचारत आहेत.

२०१४ मध्ये भाजपने विरोधकांवर शस्र म्हणून वापरलेला सोशल मीडियाचे अस्र भाजपवरच बुमरँग झाल्याने आता भाजपचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आता सोशल मीडियाऐवजी प्रत्यक्ष गाठीभेटी देऊन मतदारांचे मतपरिवर्तन करत असल्याचे चित्र आहे.

मतदारांना थेट भिडा

सोशल मीडिया भाजपवरच पलटल्याने जनतेत भाजपची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे प्रतिमा सुधारण्यासह संभ्रमित झालेल्या मतदाराला फ्रेश करण्यासाठी मतदाराच्या थेट गाठी भेटी घेऊन त्याचे मतपरिवर्तन करण्याचा सल्ला वरिष्ठांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते हे यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियापेक्षा प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर देत असल्याचे चित्र आहे. सोबतच सोशल मीडियावर भाजपवर झालेल्या हल्ल्याला प्रतिहल्ला देण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या प्रभावातून भाजपने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैत्रोत्सवासाठी जादा बसेस

$
0
0

सप्तशृंगी गडावर १३ ते २० एप्रिलपर्यंत यात्रा

...

गड ते पायथा : ७० बसेस

जिल्हाभरातून : ५० बसेस

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवानिमित्त एसटीने गडावर जाण्यासाठी ७० बसेसचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध शहरातून ५० जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी बघून त्यात वाढही करण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

सप्तशृंगी गडावर १३ एप्रिलपासून चैत्रोत्सव यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे एसटीने ही यात्रा संपेपर्यंत बसेसचे नियोजन केले आहे. दि. २० एप्रिल रोजी यात्रा संपणार असली तरी २१ एप्रिलपर्यंत या बसेस असणार आहेत. यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. या संपूर्ण यात्रेदरम्यान एसटीचे ६५ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. चोवीस तास ही सेवा असणार आहे.

चैत्रोत्सव यात्रेत खान्देशहून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. जिल्हा व परिसरातून येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते. या यात्रेदरम्यान नाशिकहूनही जादा बसेस सोडण्यात येणार आहे. प्रशासनाने या ठिकाणी खासगी वाहनांना बंदी केली आहे.

...

चैत्रोत्सवानिमित्त गड ते पायथा या मार्गासाठी ७० बसेस असणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतर ठिकाणाहून भाविकांना थेट गडावर जाण्यासाठी ५० जादा बसेस असणार आहेत. चैत्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे एसटी प्रशासनाने अगोदरच नियोजन केले आहे.

- अरुण सिया, जिल्हा वाहतूक नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कार्टून्स’च्या चिमट्यांमुळे रंगतोय निवडणूक प्रचार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये नेत्यांची होणारी भाषणे, प्रचार फेऱ्या, मतदारांशी संवाद या सर्वांमध्ये निवडणुकीवर आधारीत 'कार्टून्स' लक्ष वेधून घेत आहेत. एकमेकांविरोधात भूमिका मांडण्यासाठी उमेदवारांनी कार्टून्स म्हणजेच, व्यंग चित्रांची मदत घेतली असून, त्यामुळे प्रचार आणखी रंगू लागला आहे.

सोशल मीडियासह प्रसिद्धी पत्रकांद्वारे निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार नवनवीन शक्कल लढवत असून, व्यंग चित्रांद्वारे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. फेसबूक, इन्स्टाग्रामवरील पेजसह व्हॉटसअॅप स्टेटसद्वारे कार्टून्स अपलोड केले जात आहेत. या कार्टून्सद्वारे एकमेकांविरोधातील मुद्दे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचवित आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या सोशल मीडियावरील फेसबूक पेजसह प्रसिद्धी पत्रकातून विरोधकांना चिमटे काढण्याचे काम जोरात सुरू असल्याचे दिसते आहे. त्यामुळे नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी हा फंडा वापरल्याची चर्चा रंगते आहे. एका कार्टूनच्या माध्यमातून अनेक मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसल्याचे त्यातून दिसत आहे. नेहमीच्या बैठका, सभा, चर्चा याला वैतागलेल्या मतदारांनाही या नव्या स्टाइलच्या प्रचार अनुभवण्यात रस निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, विरोधकांवर टीका करण्यासाठी त्यांचे कार्टून्स तयार करण्यात आले आहेत. या कार्टून्समधून मांडलेल्या मुद्द्यांसह ते कार्टून देखील चर्चिले जात आहेत. प्रत्येक उमेदवाराने वेगळ्या शैलीत कार्टून्सची मांडणी केली असून, मेमेजचाही वापर प्रचारात होताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर फॉलोवर्स वाढविण्याची सुरू झालेली स्पर्धा आता कार्टून्सच्या माध्यमातून समोरच्याला टार्गेट करण्यापर्यंत येऊन पोहोचल्याचे जाणवते आहे. त्यामुळे यंदाच्या प्रचारातील नवनव्या कल्पना निर्णायक निकालासाठी कितपत उपयुक्त ठरतील, याकडे मतदारांचेही लक्ष लागले आहे.

व्यंगचित्रात मत बदलण्याची खरी ताकद आहे. राजकारणात व्यंगचित्रांना अगोदरपासून महत्त्व आहे. जे भाषणातून व्यक्त करणे कठीण होते, ते कार्टूनमधून सहजपणे मांडता येते. त्यामुळे उमेदवारांनी वापरलेल्या या नव्या शैलीचा मतदारांच्या मनात पोहोचण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो.

- आचार्य रहाळकर, व्यंगचित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images