Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बंदीनंतरही गुटख्याची अवैध विक्री

$
0
0
राज्यात गुटखाबंदीनंतरही कळवण परिसरात चोरटी व चढ्या दराने गुटखाविक्री सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकातून गुटखा राज्यात आणला जात होता. मात्र १ जूनपासून तेथेही बंदी घालण्यात आल्याने गुटखाच्या किमतीत आणखी वाढ झाली आहे.

बुडालेल्या ट्रकमुळे नदी प्रदुषणाचा धोका

$
0
0
मुंबई-आग्रा महामार्गावर पुलाचे कठडे तोडून एक ट्रक तापी नदीत पडला. आज पोहणाऱ्या युवकांना ट्रकचा शोध लावण्यात यश मिळाले आहे. ट्रक हा 30 फूट खोल पाण्यात आहे.

अन्नसुरक्षा अभियान सुरु

$
0
0
अन्न व औषध प्रशासने (एफडीए) जिल्ह्यात अन्न सुरक्षा अभियान राबविण्यास प्रारंभ केला आहे. या अभियानासाठी एफडीएने क्षितिज प्रतिष्ठान आणि गॅलेक्सी या दोन स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली आहे.

गणवेशखरेदीचा घोळ कायम

$
0
0
दरवर्षीच सुरू राहणारा शासकीय आश्रमशाळांतील गणवेशाचा गोंधळ यंदाही कायम दिसून येत आहे. शाळा सुरू होऊन दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला.

यावलचा हिरा मुंबईत झळकला

$
0
0
तालुक्यातील मोहराळे येथील योगेश पुंडलिक पाटील यांनी काढलेल्या चित्रांचे मुंबईत नेहरु आर्ट गॅलरीत ८ ऑगस्टपासून चित्रप्रदर्शन भरत आहे.

चोरीचे २ लाखाचे सोने सराफांकडून जप्त

$
0
0
अट्टल घरफोड्यांनी सराफांना विकलेले सोने मिळवण्यात पोलिसांना यश आले असून आरोपींना भुसावळ न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

लासलगावात डेंग्युसदृश आजार

$
0
0
ताप येत असल्याने लासलगावच्या खासगी हॉस्पिटलात उपचार घेत असलेल्या एका १५ वर्षाच्या तरुणास डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे निदान झाले आहे.

देशी दारूचे १०० खोके जप्त

$
0
0
गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर शहरात तस्करी करून दाखल होणारा देशी दारूचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) अधिकाऱ्यांनी मंगळवारी पकडला.

कोम्बिंगमुळे तळीरामांची पळापळ

$
0
0
‘आषाढ महिन्यातील शेवटचा दिस गोड व्हावा’ म्हणून झटणाऱ्या तळीरामांच्या आनंदावर पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे विरजण पडले.

आता ‘वाघूर’च्या चौकशीचा फेरा

$
0
0
जळगाव पालिकेच्या नगरसेवकांमागे घरकुल घोटाळा लागला असतानाच आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाघूर पाणीपुरवठा योजना घोटाळ्याच्या चौकशीचा फेराही त्यांच्यामागे लागला आहे.

पाणीकपात कायमच!

$
0
0
पाणीकपात मागे घेऊन दिवसातून दोनदा पाणीपुरवठा करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात कपात रद्दच झाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

धरणे निम्मी भरली

$
0
0
गेल्या दोन महिन्यांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर आला आहे. आगामी दोन महिन्यांत अशाच प्रकारे पर्जन्यमान झाल्यास सर्व धरणे ओसंडून वाहण्याची चिन्हे आहेत.

गुणवंतांच्या ओंजळीत दातृत्वाचे संचित

$
0
0
‘महाभारतात योद्धे अनेक आहेत परंतु, लक्षात राहतो तो कर्ण; असे का तर त्याच्यापुढे दानशूर ही उपाधी लागलेली आहे. दानशूर ना‌शिककरांनी या मुलांना जे भरभरून दान दिले आहे, ते लक्षात ठेवून ही मुले उद्या कुणाला तरी अशीच मदत करतील’, असा आशावाद पोलिस अकादमीच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य हरिष बैजल यांनी बुधवारी ‘मटा हेल्पलाइन’च्या चेकप्रदान सोहळ्यात व्यक्त केला.

८०० करचुकव्या व्यापा-यांना नोटिसा

$
0
0
एलबीटी भरण्याकडे व्यापा-याने पाठ फिरवल्याने महापालिकेच्या तिजोरीवर ताण पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कारवाईचे सीमित अधिकार असलेल्या प्रशासनाने करचुकवेगिरी करणा-या व्यापा-यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.

आदिवासी विकास विभागाला मंत्र्यांचा विसर

$
0
0
जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त नाशकात आयोजित करण्यात आलेली आदिवासी सांस्कृतिक परिषद वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

आदिवासी क्रीडा प्रबोधिनी दृष्टीपथात

$
0
0
इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सद्रोद्दिन येथील ४७ एकर जागेत राज्यातील पहिली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी साकारली जाणार आहे.

विमा कार्यालयातून मिळणार सबसिडी?

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना लहान गावांमधील विमा कार्यालयांमधून मिळण्याची शक्यता आहे.

दीड महिन्यात ६० वाँटेड जेरबंद

$
0
0
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे करून परागंदा झालेल्या तब्बल ६० संशयित आरोपींना शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. मागील दीड महिन्यापासून यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

कान नदीवरील पूल खचला

$
0
0
अवघ्या पाच वर्षांपूर्वी बांधलेला साक्री तालुक्यातील दहिवेल आणि चिंचपाडा या गावांना जोडणारा कान नदीवरील पूल खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

गंगापूर रोड परिसरात वीजेचा लपंडाव

$
0
0
वास्तव्यासाठी प्राधान्य असलेल्या शहरातील गंगापूर रोड परिसराला वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे वीजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात काही नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली असली तरी त्याचा काहीही फायदा झाला नसल्याचेही स्पष्ट होत आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images