Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

LED प्रकरणात ‘MIC’ची चांदी

$
0
0
राष्ट्रकुल घोटाळ्यातील कथीत सहभागामुळे बदनाम झालेल्या तसेच दिल्ली महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या एमआयसी कंपनीला एलईडी बसवण्याचा ठेका महापालिकेने दिला आहे.

मराठा आरक्षणाचा अहवाल निवडणुकीपूर्वी

$
0
0
‘मराठा आरक्षणाबाबत आम्ही आमचा अहवाल लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारला देऊ. मात्र, त्यावर निर्णय घ्यायचा अधिकार सरकारवर अवलंबून असेल’, असे सांगत मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष तथा राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याचे संकेत दिले.

गरजूंना 'आरोग्य'दायीचा दिलासा

$
0
0
पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यांमध्ये राबविली जात असलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना येत्या शनिवारपासून राज्यभर राबविली जाणार आहे. या योजनेचा शुभारंभ युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते नागपूरमध्ये २१ नोव्हेंबरला होणार आहे.

युवकांना मिळणार कौशल्याधारित संधी

$
0
0
कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची बाजारपेठेची वाढती गरज लक्षात घेऊन अडीच महिन्यांच्या प्रशिक्षणाची संधी शहरातील युवकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि कोठारी फाऊंडेशन यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कार्यकर्त्यांनी जागृत रहावे

$
0
0
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जातीयवादी पक्षांना दूर सारण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. तसेच नव्याने साकारण्यात येणाऱ्या शहर विकास आराखड्यातही आपल्या शेतजमिनीवर आरक्षण टाकले जाऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी जागृत राहण्याचे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी केले.

'भरती'च्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उच्च व तंत्रशिक्षण विभागात ड्रेस डिझायनिंग व गारमेंट मॅन्युफॅक्चरींग विषयातील अधिव्याख्याता पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

उत्सुकता, उत्साह आणि वाद

$
0
0
एरवी किरकोळ वर्दळ वगळता शांत असलेला सरकारी विश्रामगृह परिसर सोमवारी मराठा आरक्षण समितीच्या बैठकीमुळे पोलिसांसह संघटनांच्या गर्दीने गजबजला होता. समितीसमोर कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिस तैनात होते. तर, काहीही करुन समितीत्या सदस्यांना भेटायचे यासाठी नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.

चांगल्या कामाचं बक्षीस... चॉकलेट

$
0
0
बेरोजगार तरुणाई आणि बँक यांचा काय संबंध? मात्र, तो अनेक अर्थाने आहे. सध्या अगदी साध्या शिपायापासून ‘यूपीएससी’पर्यंतची कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, अर्ज दाखल करण्यापासून सर्व प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे. तसेच परीक्षा शुल्क राष्ट्रीयीकृत बँकेद्वारेच भरले जाते.

सिव्हिल हॉस्पिटलवर वॉच सीसीटीव्हींचा

$
0
0
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नुकतेच अत्याधुनिक आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विविध वॉर्डांमध्ये चालणारे कामकाज आणि विशेषत: रुग्णांना मिळणारी वागणूक यावर हॉस्पिटलमधील वरिष्ठांची नजर राहावी यासाठी या कॅमेऱ्यांची मदत होणार आहे.

आता अत्याधुनिक ‘सेतू’!

$
0
0
अलोट गर्दी, लांबच लांब रांगा आणि एजंटचा ससेमिरा यांच्या गर्तेत सापडलेल्या सेतू केंद्राचे रूपडे आता बदलणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या नव्या निकषांनुसार नाशिक शहर आणि ग्रामीण भागासाठीचे टेंडर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

अंबडमध्ये वर्षभरात ट्रक टर्मिनस

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीत २१,५०० चौरस मीटर भूखंडावर अद्ययावत ट्रक टर्मिनस साकारले जाणार आहे. येत्या वर्षभरात हा प्रकल्प साकारला जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात निमाचे पदाधिकारी आणि एमआयडीसीचे अधिकारी यांच्यात नुकतीच बैठक झाली.

काल गारठा, आज थंडी

$
0
0
रविवारी ९.७ अंश सेल्सिअसवर केलेल्या तपमानाने नाशिककरांना गारठ्याचा अनुभव दिला, तर सोमवारी तब्बल चार अंशांनी तपमानात वाढ झाल्याने सलग दोन दिवसात चार अंशांच्या चढ-उताराचा सामना नाशिककरांना करावा लागला.

अडचणीतील ठेवीदार लढणार

$
0
0
गैरव्यवहारांसह विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या बँक तसेच पतसंस्थांच्या ठेवीदारांचे आता संघटन होणार आहे. यामाध्यमातून ठेवी परत मिळविण्यासाठी तसेच गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी दबावही निर्माण केला जाणार आहे.

वादग्रस्त एलईडीसाठी बनवाबनवी

$
0
0
वादग्रस्त एलईडी फिटिंगसंदर्भांत महापालिका प्रशासनाने वर्क ऑर्डर काढल्याची माहिती समोर आली आहे. विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात कोर्टात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे.

पानेवाडीच्या शाळेतील कागदपत्रे जाळली

$
0
0
मनमाडजवळील पानेवाडी गावात असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापक कार्यालयाचा दरवाजा तोडून एका व्यक्तीने त्यातील महत्त्वाची कागदपत्रे जाळल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

यंत्रमागधारकांची उद्या मंत्रालयावर धडक

$
0
0
वीजदरवाढीविरोधात पुकारलेल्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मालेगाव शहरातील यंत्रमागधारक आणि कामगार बुधवारी सुमारे एक हजार मोटारसायकलींवरून शहरातून निघणार असून गुरुवारी ते मंत्रालयावर धडक देणार आहेत.

‘मंगला एक्स्प्रेस’च्या चालकासह अनेकांची चौकशी

$
0
0
मंगला एक्स्प्रेस आणि भुसावळ-पुणे पॅसेंजरच्या चालकांसह इंजिन गार्डची मंगळवारी चौकशी करण्यात आली.

टर्मिनल मार्केटसाठी कागदी घोड्यांचा नाच

$
0
0
कृषीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी नाशिकजवळील सैयद पिंप्री येथे प्रस्तावित असलेले टर्मिनल मार्केट जागेच्या तिढ्यामुळे अद्याप कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे.

‘आरोग्य’चे कर्मचारीही भेटणार उपमुख्यमंत्र्यांना

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बुधवारी दुपारी साडेचार वाजता विद्यापीठ अधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे.

वृक्षतोडीमुळे बोरे झाली महाग

$
0
0
वृक्षतोडीमुळे बागलाणच्या पट्ट्यात पडीक, कोरडवाहू क्षेत्रात वाढणाऱ्या गावरान बोरांची झाडे नामशेष होऊ लागली आहेत. परिणामी बोरांच्या उत्पादनात घट होऊन स्थानिक बाजारपेठेत गावरान बोरे ४० ते ५० रुपये किलोने विकली जात आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images