Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जंगलीबाबा पोलिसांच्या जाळ्यात

$
0
0
वाडगाव येथील कसबे कुटुंबीयांना काही लाखांना गंडा घालणारा जंगलीबाबा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. नाशिक तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार बांगडीवाला बाबा मात्र अजून फरार आहे.

कृषी भरतीचा सावळा गोंधळ

$
0
0
कृषी विभागाकडून घेतल्या जात असलेल्या विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेत कमालीचे गोंधळाचे वातावरण आहे. शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी कृषी विभागातील एकूण सहा पदांसाठी परीक्षा घेतली जात आहे.

३ कोटींचा महसूल पोहोचणार ४१ कोटींपर्यंत

$
0
0
पुणे शहराच्या तुलनेत नाशिक महापालिकेला जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न अतिशय अत्यल्प असून जाहिरात धोरणात सुधारणा केल्यास तीन कोटी रुपयांचे उत्पन्न थेट ४१ कोटींपर्यंत पोहचू शकते, असा दावा एका खासगी संस्थेने केला आहे.

अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांचा सिंहस्थ दौरा?

$
0
0
गेल्या महिन्यात शिखर समितीची बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी नाशिक भेटीवर येण्याची शक्यता आहे. या भेटीमुळे सिंहस्थाच्या कामांना गती मिळण्याची चिन्हे आहेत.

नवाल दाम्पत्याच्या वडिलांची DNA चाचणी

$
0
0
उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीत बेपत्ता असलेल्या नाशिकच्या नवाल दाम्पत्याच्या वडिलांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरोड्यातील जखमी वृद्धाचा मृत्यू

$
0
0
पाथर्डी शिवारात दरोडेखोरांच्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या वृद्धाचा अखेर मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात जीव गमावणाऱ्यांची संख्या आता तीन झाली आहे.

LED च्या तिढा ‘२८ ऑक्टोबर’ निर्णायक

$
0
0
विवादास्पद आणि बहुचर्चित एलईडी प्रकरणाचा तिढा २८ ऑक्टोबर या एकाच दिवसाभोवती गुरफटला गेला आहे.

दोन लिपिकांचे निलंबन

$
0
0
सप्टेंबर महिन्यात झालेल्या तलाठी भरतीत घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागात काम करणाऱ्या दोन लिपिकांचे निलंबन केले आहे.

कांदाभाव कोसळू लागले

$
0
0
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याचे भाव क्विंटलमागे तब्बल दीड ते दोन हजार रुपयांनी घसरले.

‘मंगला एक्स्प्रेस’ चालकाची चौकशी

$
0
0
मंगला एक्स्प्र‍ेस आणि भुसावळ-पुणे पॅसेंजरच्या चालकांसह इंजिन गार्डची मंगळवारी चौकशी करण्यात आली. आतापर्यंत केलेल्या चौकशीतून अपघाताचे स्पष्ट कारण समजू शकले नसले तरी निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अशी माहिती रेल्वे रेल्वे सुरक्षा विभागाचे आयुक्त चेतन बक्षी यांनी दिली.

मनसेचे कर्णयंत्र वाटपाचे नाशिक पॅटर्न इतरत्रही

$
0
0
मनसे व अमेरिकेतील स्टारकी फाऊंडेशनतर्फे नाशिकमध्ये राबविण्यात येणाऱ्या कर्णयंत्र वाटप शिबिराचे सर्वत्र कौतुक होत असल्याने मनसेतर्फे हे शिबिर इतर शहरात राबविण्याचा आमचा विचार असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे धूर छोडो आंदोलन

$
0
0
पंचवटी विभागातील आरोग्याच्या समस्यांबाबत आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी धुर छोडो आंदोलन करण्यात आले. यात शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयात जाऊन धुप व अरगबत्ती जाळून धुर करत प्रशासनाचा निषेध केला.

सिलिंडर फक्त ९५ रूपयांना!!

$
0
0
वाढलेला रेपोरेट आणि कांद्यांने डोळ्यात पाणी आणल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना घरगुती गॅस सिलिंडर फक्त ९५ रूपयांना मिळाला तर ? आश्चर्यचकीत झालात ना !

स्वागत वहिनीसाहेबांचे

$
0
0
एखाद्या राजकीय पक्षाचे श्रेष्ठी शहरात येतात त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांची लगीनघाई बघण्यासारखी असते. त्यातून अनेकदा काही बिंगदेखील फुटतात. मंगळवारी पक्षश्रेष्ठी नाही पण त्यांच्या सौभाग्यवती शहरात आल्या होत्या.

धूळघाण झालेल्या बेटांवर

$
0
0
वाहतूक कोंडी कमी करण्यासह शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महापालिकेने वाहतूक बेटं उभारली. त्याला प्रायोजकही लाभल्याने वाहतूक बेटांची संख्याही वाढली. सुरुवातीला आकर्षक वाटणारी या बेटांपैकी काही बेटं कालांतराने दुर्लक्षित होऊ लागली.

गोदापात्रात पुन्हा पाणवेली

$
0
0
गोदावरी नदीच्या प्रदूषणप्रश्नी हायकोर्टात याचिका दाखल झाली असतानाही गोदावरीच्या प्रदूषणाचे ग्रहण सुटण्याची चिन्हे नाहीत. गोदावरीला पुन्हा पाणवेलींचा विळखा पडला असल्याने संपूर्ण पात्र हिरव्या रंगाचे दिसू लागले आहे.

नगरसेविकेनेच मागितली खंडणी

$
0
0
महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात विविध प्रकारांचे व्यवहार होत असल्याची चर्चा असतानाच, घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्याने दर महिन्याला ठराविक रक्कम मिळालीच पाहिजे असा सज्जड दम राष्ट्रवादीच्या नगरसेविकेने आणि तिच्या पतीने दिल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

नाशकात १० लाखांचा कांदा चोरला!

$
0
0
कांद्याच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना कांद्यांचे आगार समजले जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात आता थेट कांदा चोरण्याचे प्रकारही घडू लागले असून कळवणमध्ये कांदा भरलेला ट्रकच चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने कांदा व्यापारी आणि शेतकरीही हादरले आहेत.

शेतक-यांचे पाण्यासाठी आजपासून बेमुदत उपोषण

$
0
0
ओझरखेड कालव्याला पाणी सोडावे, या प्रलंबित मागणीसाठी आज, २१ नोव्हेंबरपासून शेतकरी नाशिकच्या पाटबंधारे विभागासमोर उपोषणाला बसणार आहेत.

मुद्रांक विक्रेत्यांचे अनधिकृत बांधकाम पाडा

$
0
0
सिन्नर तहसील कार्यालयाच्या परिसरात प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी मुद्रांक विक्रेत्यांचे कक्ष जमीनदोस्त करण्यात आल्याने त्यांनी पर्यायी जागेत नवीन बांधकाम सुरू केले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images