Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अनैतिक संबंधातून एकाचा खून

$
0
0
अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एकाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृताच्या पत्नीच्या प्रियकरानेच हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. १५डिसेंबरला सिन्नर तालुक्यातील मोह शिवारात ही घटना घडली होती.

नव्या २५ मेडिकल कॉलेजांचा प्रस्ताव!

$
0
0
आगामी शैक्षण‌िक वर्षापासून हेल्थ सायन्स या विषयाशी संबंध‌ित अभ्यासक्रमांची नवी २५ कॉलेजे सुरू करण्याची श‌िफारस विद्यापीठाच्या वतीने सरकारला करण्यात येणार आहे. आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत या मुद्द्यावर न‌िर्णय घेण्यात आला.

विद्यापीठ कॅम्पसचे अपडेट्स जानेवारीत नाश‌िककरांसमोर

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या प्रस्ताव‌ित नाश‌िक कॅम्पसचे अपडेट्स जानेवारी मह‌िन्यात नाश‌िककरांसमोर मांडण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी नाश‌िकच्या विद्यार्थ्यांना द‌िले. विद्यार्थ्यांच्या प्रलंब‌ित प्रश्नांसाठी मनव‌िसेने कुलगुरूंकडे पाठपुरावा केला.

महान्यूजकडून पुन्हा घोळ!

$
0
0
राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महान्यूज’ या अधिकृत वेबसाइटने बेरोजगार युवकांची खिल्ली उडविण्याचा विडाच उचलला असल्याचे त्यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या चुकांवरू दिसते आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे.

‘नॅशनल हायवे’च्या नियमांनाही ठेंगा

$
0
0
पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी आणि प्रांत यांच्या अधिकारांवर कुरघोडी केल्यानंतर नॅशनल हायवे अथॉरिटीच्या (न्हाई) नियमांनाही ठेंगा दर्शविला आहे. त्यामुळेच ‘न्हाई’चा ना हरकत दाखला घेतल्याखेरीज पिंपळगावात अनेक बांधकामांचे इमले उभारले जात आहेत.

नाशिकरोडला झाडांची कत्तल!

$
0
0
हजारोंचे श्रद्धास्थान असलेल्या जेलरोड येथील जुना सायखेडा रोडवरील म्हसोबा मंदिरातील आंब्याच्या झाडावर महापालिकेच्या ठेकेदाराने घाव घातल्याने पयार्वरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला. दोन दिवसांपासून नाशिकरोड परिसरात वृक्षांची बेसुमार कत्तल होत आहे.

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा

$
0
0
घर बांधण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणावेत यासाठी पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. रविंद्र पांडुरंग साळवे असे आरो‌पीचे नाव आहे.

प्लास्टिक मनीला एसटीची ‘डबल बेल’

$
0
0
मॉल्सपासून मेडिकल स्टोअरपर्यंत सर्वत्र डेबिट अथवा क्रेडिट कार्डांचा वापर सर्वमान्य होत असला तरी एसटी महामंडळ मात्र काळाची गरज ठरत असलेल्या या प्लास्टिक मनीला ‘डबल बेल’ देत आहे.

अमेरिकेची मस्ती जिरवा

$
0
0
भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेने दिलेल्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी मनसे महिला आघाडीतर्फे शनिवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या या आंदोलनात अमेरिकेविरोधात घोषणाबाजी करत प्रतिकात्मक राष्ट्रध्वजाचे दहन करण्यात आले.

सातपूर, सिडकोला सोमवारी पाणी बंद

$
0
0
सातपूर भागातील अशोकनगर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या बाराशे एम. एस. व्यासाची पी. एस पी लाइनच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याने सातपूर व सिडकोतील काही भागांत सोमवारी, २३ डिसेंबर रोजी पाणी पुरवठा बंद राहील. मंगळवारीदेखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

'त्यांचे' मुंबईत आंदोलन

$
0
0
वीज कामगारांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई येथील बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्सच्या प्रकाशगड येथे २३ डिसेंबर रोजी आंदोलन होणार असून त्यात सहभागी होण्यासाठी नाशिकरोडहून कामगार सेनेचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत आहेत.

दंड नको, कोर्टातच जा

$
0
0
मोटारींवर काळ्या फिल्म लावणारे आणि वाहन चालविताना मोबाइलवर बोलणारे पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्या विरोधात शुक्रवारपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून दंड अर्थात तडजोड शुल्क न स्वीकारता थेट कागदपत्रेच जप्त केली जात असून त्यांना कोर्टात पाठविण्यात येत आहे.

हा सर्व्हिस रोड की पार्किंग लॉट

$
0
0
शहरांतर्गत वाहतूक गतिमान करण्यासाठी शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक हायवेलगत सर्व्हिस रोड साकारण्यात आले. मात्र बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणांमुळे काही ठिकाणचे सर्व्हिस रोड त्रासदायक ठरत आहेत. द्वारका परिसरातून पखाल रोड, वडाळानाक्याकडे जाणारा सर्व्हिस रोडही याच गर्तेत सापडला आहे.

ओझरचे टर्मिनल इको फ्रेंडली!

$
0
0
ओझर विमानतळाच्या ठिकाणी साकार होत असलेले पॅसेंजर टर्मिनल हे इको फ्रेंडली असून येत्या जानेवारी अखेर ते सेवेत रुजू होण्याची चिन्हे आहेत. या टर्मिनलच्या निमित्ताने नाशकात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण इमारत साकार होत आहे.

आधाराश्रमाला देशस्तरावर बहुमान

$
0
0
देशांतर्गत क‌िंवा परदेशामध्ये दत्तक देण्याच्या प्रक्र‌ियेवर न‌ियंत्रण ठेवणाऱ्या ‘कॅरा’ या देशस्तरावरील संस्थेच्या कार्यकारी मंडळात नाश‌िकच्या आधाराश्रमाचा समावेश झाला आहे. या बहुमानामुळे आधाराश्रमाकडे देशभरातील चारशे खासगी व सामाज‌िक संस्थांचे प्रत‌िन‌िधीत्व करण्याची जबाबदारी आली आहे.

‘आदर्श’प्रकरणी आज निदर्शने

$
0
0
आदर्श प्रकरणाचा चौकशी अहवाल फेटाळण्यात आल्याबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे नाराजी व्यक्त करण्यात आली असून सोमवारी दुपारी साडेचारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात येणार आहे.

अनधिकृत होर्डिंग

$
0
0
एकिकडे राज्य सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्था शहर स्वच्छतेवर भर देत असताना सवंग तसेच स्वस्त प्रसिध्दीसाठी राजकीय मंडळींकडून जागोजागी उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.

तुम्ही व्हा ‘सिक्रेट सांता’

$
0
0
समाजातील गरजू व निराधार मुलांसाठी सांताक्लॉजची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी ‘मटा’च्या माध्यमातून वाचकांना मिळणार आहे.

नाते जुळले मनाशी मनाचे

$
0
0
जेमतेम वर्षभर त्यांनी सुखाचा संसार केला. त्यांच्या संसारवेलीवर गोंडस मुल जन्मले. पती आणि सासू आपली काळजीच घेत नाही असा आक्षेप पत्नीने घेतल्याने या कुटुंबातला कलह वाढत गेला. पत्नी माहेरी निघून गेली.

रॅम्पने अरूंद केले रस्ते

$
0
0
शहरातील बहुतांश कॉलनी रस्त्यांवर इमारतींच्या रॅम्पचे अतिक्रमण झाले आहे. नगररचना विभागाच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे साडेसात मीटर रूंद असलेले रस्ते काही ठिकाणी अवघे चार मीटरपर्यंत झाले आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images