Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पंचकचा बाजार सुविधांच्या प्रतीक्षेत

$
0
0
जेलरोड येथील पंचकमधील भाजीबाजारातील विक्रेत्यांना विविध सुविधा मिळत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. राजकारण, अतिक्रमण निर्मुलन अशा अनेक स्थित्यंतरांना तोंड देत हा बाजार येथे सुरु झाला. आता त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याने येथील विक्रेते त्रासले आहेत.

आठवड्याभरात ८ लाखांचा ऐवज लंपास

$
0
0
चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटनांमुळे शहरवासी त्रस्त असून आठवडाभरात तब्बल आठ लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. महागडा ऐवज गमावणाऱ्या तक्रारदारांच्या पोलिस स्टेशनला वाऱ्या सुरू आहेत.

स्वर-तालात रसिक मंत्रमुग्ध

$
0
0
पवार तबला अकादमीतर्फे पंडित भानुदासजी पवार स्मृती संगीत समारोहात शनिवारी प्रा. अविराज तायडे यांचे शिष्य व नाशिकचे ख्यातनाम गायक अशिष रानडे यांचे गायन तसेच पंडित किरण देशपांडे व पंडित सुरेशदादा तळवलकर यांचे शिष्य सुप्रीत देशपांडे यांचे एकल तबला वादन झाले. यावेळी स्वर-तालात रसिक मंत्रमुग्ध झाले.

ताणतणाव कमी करण्यासाठी खेळा

$
0
0
‘सध्या दगदगीच्या जीवनात प्रत्येकाभोवती तणाव आहे. या तणावाचे अनेक दुष्परिणाम माणूस अनुभवतो आहे. या स्थ‌ितीत ताण तणावांचा सामना करण्यासाठी खेळ हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे,’ असे प्रत‌िपादन महाराष्ट्र आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरूण जामकर यांनी केले. खेळामुळे जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी न‌िर्माण होते, असेही त्यांनी सांगितले.

उत्तमनगरात घरफोडी

$
0
0
बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने सुमारे ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. वैशाली जगदीश बोरसे (३३, शिवपुरी चौक, उत्तमनगर) यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. शुक्रवारी सकाळी आठपासून त्यांचे घर बंद होते.

मव‌िप्र सांस्कृत‌िक महोत्सवात समूह नृत्यांचे आविष्कार

$
0
0
मव‌िप्रच्या सांस्कृत‌िक महोत्सवात शुक्रवारी विद्यार्थी स्पर्धकांनी समूह नृत्यांचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने ‌ज‌िंकली. देशाच्या विव‌िध भागांमध्ये सुरू असणाऱ्या लोकनृत्य परंपरेचे प्रत‌िब‌िंबच शुक्रवारी अनुभवण्यास म‌िळाले. या स्पर्धेत सुमारे ३० समूह नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.

माहितीपटांनी मन हेलावले

$
0
0
आदीवासी बांधवांची पाण्यासाठीची भटकंती असो अथवा कचरावेचक महिलांच्या रोजच्या जगण्यातील वेदनांचे होणारे दर्शन असो अशा हृदयस्पर्शी आणि मन हेलावून सोडणाऱ्या माहितीपटांनी राज्यस्तरीय अंकुर चित्रपट महोत्सवात उपस्थितांना अंतर्मुख केले.

ठेकेदार, मजुराच्या निकटवर्तियांची परस्परविरोधी तक्रार

$
0
0
बांधकाम साइटवरील अपघातात बोटे गमावलेल्या मजुराच्या उपचारांवर खर्च करूनही त्याचे निकटवर्तीय दमदाटी करून मोठी रक्कम मागत असल्याचा तक्रारअर्ज विजयकुमार प्रसाद या ठेकेदाराने गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये दिला आहे.

अशोनगरला प्रतीक्षा डीपी रस्त्याची

$
0
0
अशोकनगर भागातील रस्ता डीपी वीस वर्षांहून अधिक काळापासून मंजूर आहे. मात्र, हा रस्ता आजतागत न झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र, असे असताना महापलिकेने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. हा रस्ता झाला तर येथील नागरिकांचा वनवास संपेल अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आता तरी आवरा

$
0
0
कोणत्याही सांस्कृतीक कार्यक्रमात उत्साही कार्यकर्त्यांचा सहभाग नेहमी बघायला म‌िळतो. हे कार्यकर्ते उत्साही असतील तोवर ठ‌िक आहे; मात्र ते जेव्हा अत‌िउत्साही बनतात त्यावेळी काही गमतीही घडतात. शहरातील एका प्रस‌िध्द सांस्कृत‌िक हॉलमध्ये दोन द‌िवसांपूर्वी एका सांस्कृत‌िक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उजवा वाढीव कॅनॉलसाठी ५.५ कोटींचा निधी

$
0
0
देवळा तालुक्यातील चणकापुर उजवा वाढ‌ीव कॅनॉल झाडी बंधाऱ्यापर्यंत नेण्यासाठींच्या कामाला ५ कोटी ४८ लाख रुपयांच्या निधीना जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मान्यता दिली आहे. परसुल व सुकी नदी जोड प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणाचे आदेश ही यावेळी तटकरे यांनी दिले.

अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात चोरीचा प्रयत्न

$
0
0
आशिया खंडातील महत्वाच्या मानल्या गेलेल्या मनमाड येथील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला मात्र गस्तीला असलेल्या सुरक्षारक्षकाच्या जागरूकतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला.

सिन्नरकरांना हवी दिवसाही पोलिसांची गस्त

$
0
0
सिन्नर शहर व परिसरात वाढत चाललेल्या चोरी व लूटमारीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांचा वचक नसल्यानेच या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

फुले शाळा विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे बंद

$
0
0
देवळा तालुक्यातील माळवाडी येथील हायस्कूलच्या शिक्षकाची बदली केल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी चार दिवसापासुन शाळाबंद आंदोलन सुरु केले आहे. विद्यार्थ्यांच्या या पवित्रामुळे शाळा ओस पडली असून संस्थेच्या या निर्णयामुळे पालकवर्गात नाराजी पसरली आहे.

सामान्य नागरिकांच्या वेळेची किंमत नाही

$
0
0
नाशिक शहरात वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या भागांमध्ये होणाऱ्या कारवाईने वेग घेतलेला दिसत आहे. त्यांच्यासमवेत स्थानिक पोलिसही कारवाई करण्यासाठी उभे असतात. सध्या तर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होताना दंड न आकारता एकदम कोर्टात पाठवण्याचा प्रकार सुरू आहे.

येवलासाठी ४७ कोटींचा निधी

$
0
0
आधुनिक नागरीकरणाच्या दृष्टीने येवला शहरात भुयारी गटार योजनेची गरज लक्षात घेऊन येवला शहरासाठी ४७ कोटींच्या भुयारी गटार योजनेला केंद्राने मान्यता द‌िली आहे. शहर व‌िकास मंत्री कमलनाथ यांनी खासदार समीर भुजबळ यांना ही माह‌िती द‌िली.

सबसीडीने वाढवला ‘आधारचा’ टक्का

$
0
0
भारतीय विशिष्ट ओळख क्रमांक (यूआयडी) अर्थात ‘आधारकार्ड’शिवाय सरकारी सवलती मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने अनेक आधारकेंद्रावर पुन्हा एकदा गर्दी वाढू लागली आहे. महापालिका हद्दीचा विचार करता नोव्हेंबरपर्यंत २०११ च्या जणगणनेनुसार ८० टक्के नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे.

डॉमिनोझ, मॅकडोनल्डजवळ पोलिस बंदोबस्त कायम

$
0
0
भारतीय दूतावासातील राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याशी अमे‌रिकेत झालेल्या गैरव्यवहाराचे पडसाद उमटण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी शहरातील अमेरिकन खाद्यपदार्थांच्या आऊटलेटवरील बंदोबस्त कायम ठेवला आहे.

आश्रमशाळांचे भवितव्य गोपनीय अहवालात बंद

$
0
0
शिक्षणासाठी आश्रमशाळेकडे आशेने बघणाऱ्या विद्यार्थ्यांना काय काय दिव्य पार करावे लागते, याची अनुभूती अधिकारी वर्गाच्या तपासणी पथकाने घेतली. या तपासणी पथकाच्या गोपनीय अहवालात आश्रमशाळांचे भवितव्य बंद झाले आहे.

३.५ हजार उमेदवारांची STI परीक्षेला दांडी

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सेल टॅक्स इन्स्पेक्टर या पदासाठी रव‌िवारी पार पडलेल्या परीक्षेत सुमारे साडेतीन हजार उमेदवारांनी दांडी मारली. यामुळे साडेबारा हजार उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केलेली असताना अवघे नऊ हजार उमेदवार या परीक्षेला हजर होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images