Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पर्यावरण मंजुरी स्थानिक स्तरावर

$
0
0
अल्प मुदतीच्या किंवा किरकोळ कामांसाठी पर्यावरण मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे किरकोळ कामासाठी राज्यस्तरीय समितीच्या परवानगीची गरज राहणार नसून मोठ्या प्रमाणात होणारा विलंबही टळणार आहे.

यंदा सर्वसामान्यांनाही मिळणार रसायनमुक्त द्राक्ष

$
0
0
आजवर एक्सपोर्ट(निर्यात) अंतर्गत पाठविली जाणारी रेसिड्यू फ्री(रसायनमुक्त) द्राक्ष यंदा सर्वासामान्यांनाही चाखता येणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश द्राक्ष उत्पादकांनी आपले पीक रेसिड्यू फ्री ठेवण्यावर भर दिल्याने यंदा जिल्ह्यात हाच माल असेल असा दावा द्राक्ष उत्पादकांनी केला आहे.

...तर महिंद्राचा नवा प्रकल्प हरिद्वारमध्ये

$
0
0
दक्षिण कोरियन कंपनी खरेदी केल्यानंतर नाशकात नव्या कारच्या प्रकल्पाला नाशिक महापालिकेने एलबीटीत सूट दिली नाही तर हा प्रकल्प हरिद्वार येथे साकारण्याचा विचार महिंद्रा कंपनीकडून सुरू आहे. त्यामुळे महापालिकेला एलबीटीचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

‘मणप्पुरम’ आरोपींना न्यायालयीन कोठडी

$
0
0
मणप्पुरम फायनान्स दरोडा प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्या सर्वांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

ढकांबेत ई गावठाण यशस्वी

$
0
0
नाशिक शहरालगत असलेल्या ढकांबे गावात ई गावठाणचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला असून हा प्रयोग जिल्ह्यातील सहा गावांसह राज्याच्या अनेक भागांत राबविला जाणार आहे.

३ एकरात साकारणार क्रीडांगण

$
0
0
नाशिकरोड येथील प्रभाग ३१ मध्ये तीन एकर जागेत सव्वा दोन कोटी रुपये खर्चून आधुनिक अॅथलेटीक्स ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक असलेले क्रीडांगण विकसित करण्यास महापालिकेने मंजूर दिली आहे. पंचशीलनगर येथील जनता विद्यालयाशेजारी हे क्रीडांगण विकसित करण्यात येणार आहे.

साई पॅलेसवर होणार दंडात्मक कारवाई

$
0
0
पाणी चोरी प्रकरणी नावाजलेल्या साई पॅलेस हॉटेलवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी मटाशी बोलताना स्पष्ट केले. पाणी चोरी उघड झाल्यानंतर महापालिकेने हॉटेलला ४८ तासांची कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

आडगावात हायटेक फायरस्टेशन ?

$
0
0
आडगाव तसेच औरंगाबाद हायवेलगत वाढत असलेल्या रहिवाशी क्षेत्राला ‘कव्हर’ करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आडगाव येथे अद्ययावत फायरस्टेशन उभारण्याचे काम हाती घेतले आहे. हे फायर स्टेशन नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

खैरनार खून : दोघांना पोलिस कोठडी

$
0
0
कॉलेजरोड येथील उच्चभ्रू सोसायटीतील सुरेखा राजेंद्र खैरनार या महिलेच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अनामिक दिनकर वाळके (२५) आणि स्वप्नील निवृती रणमाळे (२३) अशी त्या दोघांची नावे आहेत.

फडणवीसांना कार्यक्षम आमदार पुरस्कार

$
0
0
'सार्वजनिक वाचनालय नाशिक'तर्फे(सावाना) देण्यात येणारा व नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या कार्यक्षम आमदार पुरस्कारपदी यंदा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे.

‘त्या’ व‌िद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपसंचालकांना घेराव

$
0
0
सिल्व्हर ओक शाळेतून काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना न्याय म‌िळवून देण्यात कुचराई करत असल्याचा आरोप करीत श‌िक्षण बाजारीकरण व‌िरोधी मंच आण‌ि इतर संघटनांच्या वतीने श‌िक्षण उपसंचालक तुकाराम सुपे यांना मंगळवारी घेराव घालण्यात आला.

दोन तास ‘जालीम’ ड्युटी

$
0
0
तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या एजंटची शिकार करण्याचा अजब फॉर्म्युला अंगीकारला आहे.

'मला नाही जनतेला कामांची यादी द्या'

$
0
0
मागील दोन वर्षांत केलेल्या विकास कामांची यादी मला नाही, तर जनतेला सादर करा, असे फर्मान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौरांसह सर्व नगरसेवकांना सोडले आहे.

भ्रष्टाचारमुक्ती : ‘आप’ची हेल्पलाइन

$
0
0
‘आम आदमी पार्टी’तर्फे (आप) भ्रष्टाचारमुक्तीसाठी दिल्लीत सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनच्या धर्तीवर नाशिकमध्येही हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली आहे.

अवकाळी पावसाने चिंतेचे वातावरण

$
0
0
गुजरातच्या सीमेलगत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या हवामानात लक्षणीय बदल होतानाच नाशिक जिल्ह्यात थंडीच्या कडाक्यातच अवकाळी पावसाने शिडकावा केला आहे. यामुळे शेतपिकांसह मानवी आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत.

दमछाक कार्यकर्त्यांची

$
0
0
लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने विविध संघटनांच्यावतीने आंदोलनांचा रतीब सुरू झाला आहे. अनेकांनी आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे.

‘जालीम ड्युटी’ला तीव्र विरोध

$
0
0
खासगी ट्रॅव्हल्सच्या एजंटांना हाकलण्याचे काम एसटीच्या चालक, वाहकांनी करण्याच्या महामंडळाच्या जालीम परिपत्रकाला मान्यताप्राप्त संघटनेने कडाडून विरोध दर्शविला आहे. महामंडळाचा हा निर्णय कर्मचाऱ्यांना तोफेच्या तोंडी देणारा असून त्याविरोधात असहकार पुकारण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.

पंचवटीत तरुणावर तलवारीने वार

$
0
0
पंचवटीतील पाथरवट लेन चौकात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास एका मुलावर तलवारीने वार करण्यात आल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. सनी ससाणे उर्फ अवताडे आणि बल्ली लाटे अशी दोघांच‌ी नावे आहेत.

समस्या सोडव‌िणार ‘कुंभथॉन २०१५’

$
0
0
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मेगा इव्हेंटच्या न‌ियोजनातील समस्या सोडव‌िण्यासाठी प्रगत राष्ट्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘हॅके-थॉन’ तंत्राच्या धर्तीवर कुंभमेळ्याच्या न‌ियोजनासाठी ‘कुंभ-थॉन २०१५’ चे आयोजन करण्यात आले आहे.

LBT व्यापाऱ्यांचा पुन्हा एल्गार

$
0
0
राज्य सरकाराने व्यापाऱ्यांवर लादलेला एलबीटी रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी नाशिक महानगर व्यापारी महासंघाच्यावतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे. राज्य सरकारने एलबीटी न काढल्यास येत्या निवडणुकीत सरकारला धडा शिकविला जाईल, असा इशारा महासंघाने दिला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images