Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ओझर : लँडिंग, पार्किंग चार्जेस माफ!

$
0
0
ओझर विमानतळाच्या ठिकाणी अल्प तिकीटदराच्या विमानांकडून लँडिंग आणि पार्किंग चार्जेस न आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने येथून विमानसेवा सुरू होण्यास हातभार लागणार आहे.

रिक्षा परवाने ऑनलाइन

$
0
0
रिक्षाचा परवाना (परमीट) मिळावे ही अनेक वर्षांपासूनची प्रत‌ीक्षा आता संपुष्टात येणार आहे. नाशिकमध्ये १६६७ परवान्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

खेळाडूंची उपेक्षा थांबणार का?

$
0
0
...अखेर महाराष्ट्र सरकारने गेले तीन वर्षे भिजत पडलेले शिवछत्रपती पुरस्काराचे घोंगडे एकदाचे जाहीर केल्याने पुरस्काराची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला असेल. खरे तर कोणतेही पुरस्कार ' ग्रेसफुली' आणि वेळेवर दिले पाहिजेत, त्यामुळे पुरस्काराचा, तो देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा मान राखला जातो.

केटीएचएम रॉक्स

$
0
0
कॉलेजियन्सच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेला 'नाशिक टाइम्स कार्निवल'चा पहिला दिवस गंगापूर रोडवरील केटीएचएम कॉलेजमध्ये संपला. दुपारच्या रटाळ वातावरणात कार्निवलचा फ्लोट केटीएचएमच्या कॅम्पसमध्ये दाखल झाला आणि कॅम्पसचा मुडच बदलला.

'एचपीटी'त कल्ला

$
0
0
डान्स, सिंगिंग, अक्टिंगसह आपल्यातील कलागूण दाखविण्याचं दणकेबाज व्यासपीठ असलेल्या 'नाशिक टाइम्स कार्निवल'चा दिमाखदार 'फ्लोट' सोमवारी सकाळी कॉलेजरोडच्या एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स कॉलेजमध्ये दाखल झाला. कार्निवलचा फ्लोट सकाळी साडेदहा वाजता येणार असला तरी कॉलेजियन्स साडेनऊपासून तयार होते. फ्लोट कॅम्पसमध्ये आल्याचे समजताच सर्वांनी एकच जल्लोष केला.

भोसलाचा हौसला

$
0
0
'नाश‌िक टाइम्स कार्न‌िवल'ला भोसला म‌िल‌िटरी कॉलेजच्या कॅम्पसमधूनही उत्स्फूर्त प्रत‌िसाद लाभला. या कॅम्पसमध्ये कार्न‌िवल फ्लोटचे स्टेज विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले. म‌िम‌िक्री, डान्स, फ‌िटनेस अॅक्टीव्हीटी, अॅक्टींग, स‌िंगींग अशा व‌िव‌िध कॉम्पीटीशनमध्ये सहभागी होत भोसला म‌िलीटरी कॉलेजचा कॅम्पस बहरला होता.

कार्यक्रमाची शोभा

$
0
0
चांगले कार्यक्रमांमुळे नाशिकचे सांस्कृतिक विश्व नेहमी चर्चेत असते. वेगळेप्रयोग आणि वेगळे उपक्रमांमुळे शहरात नेहमी चैतन्य बहरलेले असते. शहरातील उपक्रमांनी खूष झालेल्या एका पुढाऱ्याने आपल्या गावातही सांस्कृतिक संस्कृती बहरावी म्हणून धडपड सुरू केली होती. याची सुरूवात म्हणून आठवडाभराच्या कार्यक्रमाची हातभर लांब पत्रिका साहेबांनी शहरभर वाटली.

धावले रस्त्यावरचे राजे

$
0
0
‘शौक बडी चीझ है’ या ओळीचे उत्तम उदाहरण या बुलेट रॅलीत दिसून आले. सातपूरच्या बॉशमध्ये नोकरी करणारे ५९वर्षीय सुधाकर नागरे आपल्या चकचकीत बुलेटसह रॅलीत सहभागी झाले होते. बुलेटशौकीन असलेल्या नागरे यांनी १९८९ मध्ये स्टॅन्डर्ड मॉडेलची बुलेट घेतली. त्यानंतर तीन वर्षापूर्वी त्यांनी बुलेटचे क्लासिक मॉडेल घेतले.

त्यांच गाणं अक्षय राहिलं

$
0
0
मालतीबाई निपाणकर म्हणजे त्यांच्या शिष्यवर्गासाठी एक चालतं- बोलतं विद्यापीठ होतं. त्यांच्या जवळचं ज्ञान ते मोकळेपणानं त्यांच्या शिष्यांना देत होत्या. गेली ४० वर्ष त्यांनी अनेक शिष्य घडवले.

त्र्यंबक रोडवर वाहतुकीचा खोळंबा

$
0
0
संत निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त लाखो वैष्णवांचा मेळा त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाला आहे. दिंड्यांसमवेत येऊ न शकलेले भाविक एसटी आणि खासगी वाहनांनी त्र्यंबकेश्वरकडे निघाल्याने महिरावणी ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली.

अन् त्यांचं जीवनंही फुललं आनंदानं

$
0
0
मूकबधीर असल्याचं दुःख बाजूला सारत, स्वतःच्या वेदनेवर स्वतःच फुंकर घालत, आसवात बुडालेलं आयुष्य हसरं, अधिक आनंदी करण्यासाठी ते दोघे जीव पुढे सरसावले.

कळवणचे रस्ते होणार चकाचक

$
0
0
कळवण, सुरगाणा या आदिवासी मतदारसंघातील १०० किमी रस्त्यासाठी आंतरराज्य जोडणी प्रकल्पांतर्गत केंद्रीय मार्ग निधीतून १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याचा मतदारसंघातील व शेजारील तालुक्यातील ४०० गावांना फायदा होणार आहे.

उद‍्घाटनाचा गाजावाजा, कामाचे वाजले तीन तेरा

$
0
0
बागलाण तालुक्यातील केळझर चारी क्रमांक आठच्या प्रलंबित कामाला मोठ्या गाजावाज्यात जलसंपदा विभागाकडून सुरुवात करण्यात आली. मात्र ते काम अवघ्या काही तासातच पुन्हा एकदा बंद पडले असून गत १५ दिवसांत या कामांवरील तसूभर मातीही न हलल्याने उद्घाटनाचा देखावाच कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आश्वासनाची बोळवण : आमदारांचे उपोषण मागे

$
0
0
आमदार साहेबराव पाटील यांनी शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषण केले. या वेळी उपविभागीय अधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिता पाटील पालिका मुख्याधिकारी सोमनाथ शेटे, आणि पोलिस निरीक्षक रामदास पाटील या अधिकाऱ्यांनी नेहमी प्रमाणे ठोस कारवाई करू असे आश्वासन देऊन आमदारांना उपोषण मागे घ्यायला लावले.

कंत्राटी वीज कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन

$
0
0
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे कंत्राटी व आउटसोर्सिंग वीज कामगारांच्या चार दिवसीय आंदोलनाची आजपासून सुरवात झाली. नाशिकरोड येथे विद्युत भवनापुढे सुरू असलेल्या असलेल्या आंदोलनात संघटनेचे राज्य संयुक्त सचिव सुभाष काकडे यांनी मार्गदर्शन केले.

प्रीमियम टूलमध्ये कामगारांचा संप

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रीमियम टूल कंपनीतील कामगार वेतनवाढीचा करार होत नसल्याने संपावर गेले आहेत. कंपनी व्यवस्थापनाने मात्र दरवर्षी कामगारांच्या वेतनात वाढ होत असल्याने वेतनवाढीचा करार कशाला, असा सवाल केला आहे.

घंटागाडी कर्मचाऱ्यांची परवड कायम

$
0
0
नाशिककरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना सुविधा मिळणार तरी कधी, असा सवाल गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करणारे हे कर्मचारी उपस्थित करत आहेत. त्यातच मागील दहा वर्षांत घंटागाडीवर काम करणारे ३० कर्मचारी दुर्धर आजारांनी मयत झाले आहेत.

झोन गेला, रस्त्याबाबत निर्बंध कायम

$
0
0
साधुग्रामसाठी ताब्यात घेण्यात येणाऱ्या जमीनीच्या मोबादल्यात दीड टीडीआर (हस्तांतरीय विकास हक्क) योग्य असल्याचे सांगत आयुक्त संजय खंदारे यांनी प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

देवळा येथे टँकर सुरू

$
0
0
कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसाचे वातावरण सध्या असतानाच देवळा तालुक्यातही टँकरने पाणी पुरवठा सुरु झाला आहे. त्यामुळे सिन्नर, बागलाण आणि देवळा अशा तीन तालुक्यात एकूण २१ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

नाशिकरोड कोर्टाला पार्किंगचा विळखा

$
0
0
नाशिकरोड कोर्टाच्या आवारात वाहने पार्क केली जात असून नागरिकांना प्रवेश करणे मुष्कील झाले आहे. या परिसरातील पार्किंगची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images