Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश

$
0
0
जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपीटमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.

एसटीच्या धडकेने मोटरसायकलस्वार जखमी

$
0
0
भरधाव एसटीने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जखमी झाला. उंटवाडी रोडवरील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ मंगळवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास हा अपघात झाला.

युनिनॉर ५ महिन्यांत ११० टॉवर्स उभारणार

$
0
0
युनिनॉरने उत्तर महाराष्ट्राची क्षमता ओळखून या भागात नेटवर्क सशक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांत येत्या पाच महिन्यांमध्ये ११० टॉवर्स उभारले जाणार आहेत.

पोस्ट ऑफिसमधून मिळणार हेल्थकार्ड

$
0
0
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी यापुढे हेल्थ कार्ड (आरोग्य पत्र) बंधनकारक असणार आहे. टपाल विभागामार्फत या हेल्थकार्डचे वाटप केले जाणार असून त्याचा शुभारंभ प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे.

राज्यात ठिकठिकाणी सायलोज उभारणार

$
0
0
साठ लाख मेट्रिक टन धान्याचा साठा होऊ शकेल अशा क्षमतेची सायलोज राज्यात ठिकठिकाणी उभारण्याचा प्रयत्न राज्यसरकार करीत आहेत. पुढील वर्षभरात हा प्रोजेक्ट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार प्राप्त होणार असल्याचे सूतोवाच कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

‘HAL’ सरकारला देणार दरमहा १ लाख

$
0
0
ओझर विमानतळाच्या ठिकाणी सुमारे ८० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या पॅसेंजर टर्मिनलची जागा हिन्दुस्थान एअरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ची असली तरी आगामी तीस वर्षे एचएएलला महिन्याकाठी एक लाख रुपये राज्य सरकारला द्यावे लागणार आहेत.

रब्बी हंगाम धोक्यात

$
0
0
तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून बेमोसमी पाऊसाचा शिडकावा होत आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार बेमोसमी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, रब्बी हंगाम धोक्यात सापडला आहे. या आठवड्यात ऊन-सावलीचा खेळ सुरूच आहे.

पेयजल योजनांची रखडली कामे

$
0
0
कळवण तालुक्यात आदिवासी उपाययोजनेंतर्गत सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांची असंख्य कामे रखडली आहेत. जिल्हा परिषदेच्या कुचकामी धोरणामुळे ठेकेदारांना जि. प. पदाधिकारी व अधिकारी पाठिशी घालत असल्याचा आरोप करीत ठेकेदारांसह पदाधिकारी व अधिका-यांची कसून चौकशी करण्याची मागणी नगारिकांनी केली आहे.

वारक-यांना त्र्यंबकची वाट बिकट

$
0
0
संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या दिंड्या अन् वारकऱ्यांची वाट यंदा खऱ्या अर्थाने खडतर बनली आहे. येत्या सोमवारी (ता. २७) होणाऱ्या यात्रोत्सवासाठी चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या त्र्यंबक रस्त्यावरील वाहतुकीचे अद्याप योग्य ते नियमन करण्यात आले नसल्याने वारकऱ्यांना जीव मुठीत धरूनच चालावे लागणार आहे.

बँकेची २.२५ कोटींची फसवणूक

$
0
0
बँकेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून खोट्या कागदपत्रांच्या आधारे सव्वा दोन कोटींचे कर्ज मिळविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरकारवाडा पोलिसांनी याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यासह २० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

खोदलेले रस्ते कधी पूर्ण होणार?

$
0
0
नाशिक महापालिकेने अशोकनगर तसेच जाधव संकुलमधील अंतर्गत रस्ते गेल्या दोन महिन्यांपासून खोदून ठेवले आहेत. मात्र, पुढचे काम होत असल्याने रस्ते कधी पूर्ण करणार, असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिकांनी केला आहे.

उत्तर महाराष्ट्रासाठी ९६५ कोटी

$
0
0
उत्तर महाराष्ट्राचा समावेश असलेल्या नाशिक महसूल विभागासाठी ९६५ कोटी रुपयांच्या वार्षिक विकास आराखड्यास शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ही मंजुरी देण्यात आली.

शांतीपार्क चकाचक!

$
0
0
उपनगरमधील शांतीपार्क परिसरात घंटागाडी येत नसल्याने नागरिक रोजच उघड्यावर कचरा टाकत होते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. याबाबत नागरिकांनी तक्रार करूनही दुर्लक्ष करणाऱ्या घंटागाडी ठेकेदाराला पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

पदवीधर ग्रंथपालांना मिळणार उच्चश्रेणी

$
0
0
पदवीधर ग्रंथपालांच्या विरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याच‌िका कोर्टाने फेटाळली असल्याची माह‌िती नाश‌िक ज‌िल्हा माध्यम‌िक शाळा श‌िक्षकेतर संघटनेने द‌िली आहे.

अखेर ‘स‌िल्व्हर ओक’वर गुन्हा दाखल

$
0
0
स‌िल्व्हर ओक शाळेव‌िरोधातील आंदोलन शन‌िवारी तीव्र झाल्यानंतर सरकारवाडा पोल‌िस स्टेशनमध्ये शाळेव‌िरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रेल्वेस्टेशनवर रिक्षाचे दरपत्रक लावावे

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर असलेल्या प्रिपेड रिक्षा कॅबीनजवळ दरपत्रक लावले नसल्याने येणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. याचा फायदा घेत रिक्षाचालक मनमानी भाडे आकारणी करत आहेत.

कैद्यांची संख्या वाढणार

$
0
0
डिसेंबरपासून नाशिकरोड कारागृहाच्या आवारात खुले कारागृह सुरू केले आहे. कैद्यांच्या संख्येत दुपटीने वाढ करावी, असा प्रस्ताव नाशिकरोड कारागृहाने प्रशासनास दिला आहे.

PSI ची पकडली कॉलर

$
0
0
जीपचालकाकडे परवाना तसेच गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने वाहतूक विभागाच्या पोलिस उपनिरीक्षकाची कॉलर पकडली. तपोवन रोडवरील जयशंकर गार्डन जवळ शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला.

सय्यदना मुफद्दल हेच आमचे धर्मगुरु

$
0
0
आजवर वादविवादात न दिसणाऱ्या दाऊदी बोहरी समाजाला अखेर वादाची ठिंणगी पडली आहे. समाजाचे ५२ वे धर्मगुरु डॉ. सय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन यांचे निधन झाल्यानंतर धर्मगुरुपदावर त्यांचे सावत्रभाऊ खुजेमा कुतुबुद्दिन यांनी दावा केला आहे.

रज्जाक सय्यद यांना राष्ट्रपती पदक

$
0
0
नाशिक पोलिस दलात तब्बल ३६ वर्ष कर्तव्य बजावणाऱ्या एएसआय रज्जाक सय्यद यांना राष्ट्रपतीपदक जाहीर झाले आहे. ते सध्या नाशिक शहर पोलिस दलात पोलिस उपायुक्त परिमंडळ एक कार्यालयात कार्यरत आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images