Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाश‌िकच्या पदरी उपेक्षाच...!

$
0
0
बुधवारी पुणे व‌िद्यापीठाचा ६५ वा वर्धापनद‌िन. १२ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबई व‌िद्यापीठापासून वेगळे होऊन स्थापन झालेले हे व‌िद्यापीठ. पुढे या व‌िद्यापीठापासून उत्तर महाराष्ट्र व‌िद्यापीठ वेगळे झाले. उत्तर महाराष्ट्र व‌िद्यापीठाची स्थापना नाश‌िकला व्हावी, अशी जोरदार मागणी त्यावेळी नाश‌िककरांनी केली होती. मात्र,

गुंगीचे औषध देऊन विदेशी पर्यटकाला लुटले

$
0
0
एर्नाकुलमहून दिल्लीकडे जाणाऱ्या हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या बेल्जियम येथील विदेशी पर्यटकाला खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देवून त्याच्याकडील नऊ हजार डॉलर रोख तसेच किंमती कॅमेरा असा लाखो रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. रत्नागिरी ते पनवेल स्थानका दरम्यान हा प्रकार घडला.

‘भरावालगतच्या विहिरीचे काम त्वरित बंद करा’

$
0
0
सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील कडवा कालव्याच्या भरावालगत बेकायदेशीरपणे सुरू असलेले विहिरीचे काम त्वरित बंद करावे, या मागणीचे निवेदन कडवा कालवा संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना देण्यात आले.

नामपूरच्या गाळे लिलावात गोंधळ

$
0
0
सटाणा बाजार समितीच्या नामपूर उपबाजार समितीतील गाळ्यांची जाहीर लिलाव प्रक्रिया शनिवारी शेतकरी, व्यापारी आणि संचालक मंडळात जोरदार बाचाबाची होऊन गोंधळ उडाल्याने स्थगित करण्यात आली. या गोंधळामुळे बाजार समिती आवारात काही काळ तणावाचे वातावरण होते.

लेबर सोसायटींचा ‘भार’ वाढणार?

$
0
0
लेबर सोसायटींना देण्यात येणाऱ्या पाच लाखापर्यंतच्या कामांना गती मिळणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. लेबर सोसायट्यांकडील कामांना मंजुरीच मिळत नसल्याने अनेक कामे खोळंबली असल्याचा आरोप गेल्या महासभेत प्रभाग सभापती अरविंद शेळके यांनी करत प्रशासनावर टीका केली होती.

मेरी कॉलनीत जनरेटरचे अतिक्रमण

$
0
0
नाशिक शहरातील पोस्ट ऑफिसची कैफियत मांडावी तेवढी कमी आहे. पोस्टमन व इतर कर्मचाऱ्यांची टंचाई तर पोस्टाच्या पाचवीलाच पुजलेली आहे. मात्र, काही ठिकाणी पोस्टाच्या कार्यालयांना किंवा खुल्या जागांना अतिक्रमणांचाही वेढाही पडू लागला आहे.

खड्ड्यांचा सोस आणखी किती दिवस?

$
0
0
नाशिक शहराप्रमाणेच नाशिकरोड, जेलरोड, उपनगर परिसरात भूमिगत केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खड्डे व चर खोदण्यात आल्याने नागरिक वैतागलेले आहेत. एका बड्या खासगी कंपनीच्या `फोर जी' सेवेसाठी केबल टाकण्यासाठी खणलेल्या या खड्ड्यांमुळे नागरिकांचे कम्युनिकेशन धोक्यात आले आहे.

उलगडला युध्द भूमीवरचा प्रवास

$
0
0
युध्दभूमीवर वार्तांकन करताना शरीराबरोबरच मानसिक तयारी कशी ठेवायची, वेळोवेळी मृत्यू समोर दिसत असताना आपल्या सोबत असलेल्या टीममधील प्रत्येकाची काळजी कशी घ्यायची, काम करताना अनेक दिवस काहीही खायला न मिळाल्यास कसे दिवस काढायचे याचे जिवंत अनुभव जय देशमुख यांनी मुलाखतीद्वारे कथन केले.

वस्तीशाळा शिक्षकांचे भवितव्य अधांतरीच?

$
0
0
राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात शिक्षण पोहोचविणाऱ्या वस्तीशाळेतील शिक्षकांना कायम करण्याचा राज्य सरकारने घेतलेला महत्त्वाचा निर्णय पुन्हा दोलायमान स्थितीत आला आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीच आता पुन्हा सचिवांची बैठक घेऊन विचार करण्यात येणार असल्याची भूमिका घेतली आहे.

मुख्य सचिव घेणार कुंभमेळ्याची माहिती

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंध असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी १३ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च अधिकार समितीची ही बैठक असून यात खोळंबलेल्या कामांचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काकूची हत्या : पुतण्याला जन्मठेप

$
0
0
सख्या काकूचा खून करून मृतदेह पेटवून दिल्याप्रकरणी बागलाण तालुक्यातील मुंगसे येथील एकाला मालेगाव सेशन कोर्टाचे न्यायमूर्ती एस. आर. भगदले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

अॅपल बोर : शेतकरी झाले ‘बोअर’

$
0
0
मोठ्या मेहनतीने अॅपल बोरं लावली. रात्रंदिवस पहारा ठेवला, मुंगूस, वटवाघळं, चोरांपासून रक्षण केले, कोल्ह्यांना पळविण्यासाठी रात्री फटाके वाजविले. परंतु, नफा तर सोडाच खर्चही भरून निघालेला नाही. ही व्यथा आहे नाशिक-औरंगाबाद मार्गावरील लाखलगावजवळील चेहेडी शिवारातील फकिरा रुमणे यांची.

सुमितच्या आवारात गवताला आग

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद असलेल्या सुमित मिक्सर कंपनीच्या परिसरात असलेल्या वाळलेल्या गवताला शनिवारी अचानक आग लागली होती. कंपनीचे सिक्युरिटी गार्ड तसेच काही नागरिकांनी तत्काळ सिडकोतील अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.

रंगात अडकली महापौरांची कार

$
0
0
महापौरांसाठी विकत घेण्यात येणारी टोयोटा करोलो अल्टीस कार रंगाच्या वादात अडकली आहे. अंबर दिव्याला साजेशा रंग उपलब्ध होत नसल्याने महापालिकेची कार परराज्यातून आयात करणे शक्य आहे का? याची चाचपणी देखील प्रशासनाकडून केली जात आहे.

५० हजार इमारतींचे होणार ‘ऑडिट’

$
0
0
शहरातील ३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी महापालिका तीन संस्थांची नियुक्ती करणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ४० ते ६० वर्षे जुन्या इमारतींच्या ऑडिटचे काम हाती घेतली जाण्याची शक्यता आहे.

नको रे बाबा !

$
0
0
सायकल ही हौसेची चिजवस्तू आहे. असं कोणी म्हटलं तर अनेकांना नवल वाटेल. पण, सध्या सायकलींच्या किंमती पाहिल्या तर अनेकांची ही हौस पूर्ण होईल की नाही असा प्रश्न पडतो. शहरातील एक डॉक्टरने नुकतीच दीड लाखांची सायकल घेतली आणि फेसबुकवर ढिगभर कमेंट मिळविल्या.

ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार गुणवत्तापूर्ण शिक्षण

$
0
0
राज्यात सुमारे सत्तर तालुक्यांमध्ये मॉडेल स्कूल उभारण्याचा निर्णय मानव संसाधन विकास विभागाने नुकताच घेतला. या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्यांच्या सर्वांगिण विकासाबरोबरच अद्ययावत शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

बंद पथदिवे : महायुतीचे आंदोलन

$
0
0
नगरपालिकेने शहरातील पथदिव्यांची वीजबिले न भरल्याने वीज कंपनीने पथदिवे बंद केले आहेत. शहरात सर्वत्र अंधार पसरला आहे. याचा तसेच शहरातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेचा निषेध म्हणून शिवसेना-भारतीय जनता पक्ष व रिपब्लीकन पक्ष या महायुतीतर्फे तसेच व्यापारी महासंघातर्फे सोमवारी पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढून नगरपालिकेसमोर पुतळ्याचे दहन करण्यात आले.

बागलाणचा आंबा बहरला

$
0
0
एकेकाळी दिल्लीच्या बादशाहला रसिल्या आंब्यांची भुरळ घालणारा बागलाणचा आंबा यंदा चांगलाच बहरला आहे. त्यामुळे यंदा आंब्यांचे उत्पादन वाढून सर्वसामान्यांनाही आंबा चाखायला मिळणार आहे. लोणच्याची कैरीही यंदा सहजतेने उपलब्ध होणार आहे.

आदिवासींच्या सेवेसाठी !

$
0
0
राज्यातील आदिवासी भागांत चार नवीन बसस्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे, तर तीन ठिकाणचे आधु‌निकीकरण करण्यात येणार आहे. आदिवासी विकास आयुक्तांनी सरकारकडे सादर केलेल्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images