Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकमध्ये लोडशेडिंग सुरू

$
0
0
नाशिक परिसरात गेल्या काही दिवसात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असून गुरुवारी दुपारी नाशिक व नाशिकरोडच्या काही भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता. केंद्रीय विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे तात्पुरते लोडशेडिंग करावे लागत असल्याचे महावितरणने कळवले आहे.

मग विद्यमान खासदारांचे काय?

$
0
0
लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आल्याने सर्वांची उत्सुकता उमेदवारांच्या घोषणेकडे आहे. त्यातच 'व्हॉट्सअप'सह 'सोशल मीडिया'त 'राष्ट्रवादी काँग्रेस'तर्फे नाशिकमधून पालकमंत्री छगन भुजबळ उमेदवारी करणार असल्याचे मेसेज फिरत असल्याने तर्कवितर्कांसह प्रश्न व चर्चांना जोर चढला आहे.

श्रद्धांजलीऐवजी लावणी वाजली

$
0
0
एका ज्येष्ठ कवीला श्रद्धांजली वाहण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. ठरलेल्या वेळेवर जवळपास सर्वच लोक कार्यक्रमस्थळी जमले. कार्यक्रम म्हटलं की थोडासा उशीर होणारच.

‘वाकी-खापरी’चे काम रोखले

$
0
0
नांदुरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत इगतपुरी तालुक्यात वाकी-खापर धरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने पाटबंधारे विभागाने घळभरणीचे काम सुरू केले होते. मात्र, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही रखडले आहेत. यामुळे धरणग्रस्तांनी धरणावर धाव घेत आक्रमकपणे काम रोखले.

धुमाळ पॉईंट रस्ता वाहतुकीसाठी बंद

$
0
0
शहरातील मुख्य बाजारपेठेतील महत्वाचा भाग समजल्या जाणाऱ्या सांगली बॅंक सिग्नल ते धुमाळ पॉईंट मार्गावर पाइपलाईन आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार आहे.

पंचवटीत भोंदूबाबाचा भांडाफोड

$
0
0
पैशांचा पाऊस पाडून पैसे दुप्पट करून देतो, सर्व आजार बरे करतो असे सांगून लोकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या भोंदूबाबा विरोधात पंचवटी पोलिसांना तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी त्याला शुक्रवारी ताब्यात घेतले.

आपला मतदार दूर जाता नये

$
0
0
तीन आमदारांपाठोपाठ पक्षाला महापालिकेतील यश ज्या मतदारांमुळे मिळाले तो मतदार आपल्यापासून दूर जाता कामा नये, असे आवाहन करत लोकसभा निवडणुकीत गटअध्यक्षांवर महत्त्वाची जबाबदारी असल्याचे मत मनसेचे प्रदेश गटनिरीक्षक वसंत फडके यांनी मांडले.

महा‌शिवरात्रीनिमित्त खास २३० बसेस

$
0
0
महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्रांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वाहतुकीचे नियोजन केले आहे. इच्छित तीर्थक्षेत्रावर जाताना भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्र्यंबकेश्वर, टाकेद, दोधेश्वर, सोमेश्वर, सिध्देश्वरसह यात्रा भरणार असलेल्या बहुतांश गावांकडे २६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

मुले बुडाल्याने वडिलांचीही आत्महत्या

$
0
0
शेततळ्यात जनावरांसाठी पाणी काढण्यासाठी गेलेल्या जायखेडा येथील तरुणाचा शुक्रवारी बुडून मृत्यू झाला. त्याला वाचविण्यासाठी गेलेला लहान भाऊही शेततळ्यात बुडाला. ही घटना समजताच त्यांच्या वडिलांनीही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सानुग्रह अनुदान देण्याचे स्थायीचे आदेश

$
0
0
महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीमध्ये घोषित करण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानातील उर्वरीत रक्कम मार्च अखेरी​स कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आले. याबरोबर प्रशासनाची दरवाढीचा प्रस्ताव फेटाळात स्थायीने आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

उन्हाळी कांदा बाजारात दाखल

$
0
0
येथील कृउबा समितीत लाल कांद्याची आवक कायम असून बाजारभावात मात्र गेल्या सप्ताहाच्या तुलनेत क्विंटलमागे तीनशे रुपयांपर्यत वाढ झाली आहे. दरम्यान, नवीन उन्हाळी कांद्याची आवक अत्यल्प प्रमाणात सुरू झाली आहे. मात्र, लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळी कांद्याला कमी बाजारभाव मिळाल्याचे दिसून येत आहे.

वक्तृत्वावर सिद्ध केले कर्तृत्व

$
0
0
गरीब कुटुंबात जन्मलेल्या अमोल गुट्टेला शाळेत एकदा भाषणाची संधी मिळाली. विषय होता ‘आई माझा गुरू’. त्या दिवशी स्पर्धेत अमोलने आपल्या वक्तृत्वाने संपूर्ण सभागृहाला रडवले आणि प्रथम पुरस्कार मिळवला.

पॅरोलसाठीच्या अर्जात वाढ

$
0
0
नाशिकरोड कारागृहातून पॅरोलवर सुटण्यासाठी केल्या जाणाऱ्या अर्जांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अभिनेता संजय दत्तला मिळत असलेल्या मुदतवाढीच्या पार्श्वभूमीवर पॅरोलवर जाण्यासाठी १९१ कैद्यांनी अर्ज केले आहेत.

गोदापार्क ‘तापले’

$
0
0
प्रदीर्घ काळापासून राजकीय पटलावर अढळ स्थान प्राप्त केलेल्या तसेच राजकीय उणेधुणे काढण्याचा प्रशस्त मार्ग बनलेल्या गोदापार्कच्या कामाचा शुभारंभ शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील पक्ष सक्रीय झाले असून राजकीय आरोप प्रत्यारोपांची धुळवड चांगलीच रंगली आहे.

५१ दिवसांत मंत्र्यांचे ५३ दौरे

$
0
0
लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्याने राज्यातील मंत्र्यांना जनतेचे महत्त्व अधिकच जाणवू लागले असल्यामुळेच मंत्र्यांचे विविध जिल्ह्यांमधील दौरे प्रचंड वाढले आहेत. गेल्या ५१ दिवसांत नाशिकमध्ये विविध मंत्र्यांचे तब्बल ५३ दौरे झाले असून यामुळे सरकारी अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडत आहे.

भाजप-मनसेत मनोमीलन?

$
0
0
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचा राग ओढवून घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आज, शनिवारी एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

राज-भाजपात पुन्हा मैत्रीचे वारे

$
0
0
शिवसेनेनं नाक मुरडलं असतानाही आज नाशिकमध्ये ‘गोदावरी’च्या तीरावर मनसे आणि भाजपची ‘मैत्री’ उफाळून आली. गोदापार्क भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अक्षरश: साखरपेरणी करत एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले.

ट्रकखाली सापडून २ विद्यार्थी ठार

$
0
0
एका मोपेडच्या धक्क्यामुळे रस्त्यावर फेकले गेलेले दोन मोटरसायकलस्वार विद्यार्थी धावत्या ट्रकखाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास त्रिमूर्ती चौकातील अतुल डेअरीजवळ हा अपघात झाला.

त्रिमूर्ती चौक बनतोय मृत्यूचा सापळा

$
0
0
बेशिस्त वाहतुकीचे सातत्याने दर्शन घडविणारा त्रिमूर्ती चौक मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. अरुंद रस्ता, अतिक्रमणे, रस्त्यावर उतरणाऱ्या वाहनांची भरमसाठ संख्या आणि वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन यामुळे छोटे-मोठे अपघात येथे नित्याचीच बाब बनली आहे.

विकासकामांना निधी आणण्यासाठी फिरावे लागते

$
0
0
विकासकामांसाठी निधी आणण्यासाठी राज्य, केंद्रात फिरावे लागते. मंत्री, अधिका-यांकडे पाठपुरावा करावा लागतो, तेव्हा विकासकामे पूर्ण होतात. विकासकामांच्या भूमिपूजनासाठी थांबलो नाही म्हणूनच आज शेकडो कोटींची कामे प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहेत, असा टोला सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विरोधकांना लगावला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images