Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गेल्या वर्षीचाच माल घ्या!

$
0
0
उन्हाळा सुरू होतो न होतो, तोच मेनरोडला झळांपासून वाचण्यासाठी उन्हाळी साहित्य खरेदी करणाऱ्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मेनरोडवरील दुकानांना दरवर्षीप्रमाणे यंदाही प्राधान्य मिळत आहे.

स्थायीत चालणार अल्पसंख्याक कार्ड?

$
0
0
महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीवर लोकसभेचे वर्चस्व निर्माण झाल्याने सर्वच पक्षांनी मागासवर्गीय तसेच आदिवासी सदस्यांना प्राधान्य दिले आहे. गत शुक्रवारी निवड झालेल्या आठ सदस्यांपैकी पाच सदस्य मागासवर्गीय तसेच आदिवासी समाजामधून निवडण्यात आले आहे.

निवडणुकीबरोबरच मार्च एण्डची लगीनघाई

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असतानाच आर्थिक वर्षाचीही अखेर या महिन्यात होत असल्याने सरकारी कार्यालयांपासून बँका, उद्योजक आणि सर्वच आघाड्यांवर धावपळ सुरु झाली आहे. नोटिस बजावणे, थकीच हप्ते भरणे, इन्कम टॅक्ससाठी जुळवाजुळव आणि इतरही कामांनी या महिन्यात मोठा वेग घेतला आहे.

ट्रेण्ड ‘लिंगो लँग्वेज’चा

$
0
0
सध्याच्या तरुणपिढीमध्ये लिंगो लँग्वेजची चलती आहे. लिंगो लँग्वेज म्हणजे मोबाइलवरून किंवा इंटरनेटवरून मेसेज पाठवण्यासाठीची कोड लँग्वेज. या भाषेतून अनेक नव्या शब्दांनी जन्म घेतला असून ते तरुण पिढीमध्ये चांगलेच लोकप्रियही झाले आहेत.

सिडको व सातपूरला आज पाणी नाही

$
0
0
सातपूर-अंबड लिंकरोडवरील संजीवनगर परिसरात होणारी पाणीगळती थांबविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या दुरुस्ती मोहिमेमुळे सिडको व सातपूर परिसरातील काही भागात आज, सोमवारी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच मंगळवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

किशोर सुधारालयाची ‘उंची’ वाढणार

$
0
0
किशोर सुधारालयातून अल्पवयीन आरोपी पळून जाण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी तेथील तटभिंतीची उंची वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किमान मर्यादेपेक्षाही कम‌ी उंचीच्या भीतींवरच अनेक वर्ष सुधारालयाच्या सुरक्षेचा गाडा हाकलला जात असल्याचा प्रकारही यानिमित्ताने पुढे आला आहे.

अवकाळीचा तडाखा

$
0
0
गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला सादर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात साडेसहा हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

जानकर, शेट्टींमुळे आमच्यावर अन्याय

$
0
0
महायुतीत नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रीय समाज पार्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे लोकसभा निवडणुकीतील जागावाटपात ‘आरपीआय’वर अन्याय झाल्याचे सांगत खासदार रामदास आठवले यांनी रविवारी महायुतीला घरचा आहेर दिला.

मी‌डिया कपवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ची मोहर

$
0
0
नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे आयोजीत केलेल्या मीडिया करंडक क्रिकेट स्पर्धेत ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर घेण्यात आल्या.

माझा संबंध नाही

$
0
0
कोणताही कार्यक्रम आपल्याला जवळून ऐकायला मिळावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. कालिदासमध्ये नुकत्याच झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात गर्दी प्रचंड होती.

कासवांच्या संरक्षणासाठी नाशिककरांना साद

$
0
0
'येवा कोकण आपलाच असा..', अशा अस्सल कोकणी भाषेमध्ये पर्यटकांचे स्वागत करणारा कोकण एका खास निमित्ताने पर्यटकांना खुणावत आहे. सागरी कासवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने कोकणवासियांनी नाशिककरांना मदतीची हाक दिली आहे.

हवामानातील बदलामुळे नाशिककरांना 'ताप'

$
0
0
एरवी फेब्रुवारीच्या अखेरीस उन्हाचे चटके जाणवू लागतात. पण, यंदा मार्च महिना उजाडला तरी थंडीचं प्रमाण कमी झालेलं नाही. हवामानात सातत्याने बदल होत असल्याने नाशिककर हैराण झाले आहेत.

पालकांची हुरहुर, व‌िद्यार्थ्यांच्या मनी काहूर

$
0
0
नव्या करिअर वाटांचा पाया असणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा श्र‌ीगणेशा सोमवारी झाला. शहरातील व‌िव‌िध परीक्षा केंद्रांवर मराठीच्या पह‌िल्याच पेपरला सामोरे जाणाऱ्या पाल्यांसाठी पालकही खास सुटी काढून उपस्थ‌ित होते.

वेडात मराठे वीर दौडले सात...

$
0
0
लता मंगेशकरांनी गायलेलं गीत ऐकलं की, प्रत्येकात स्फुरण येतं अन् मराठ्यांचा ज्वलंत इतिहास डोळयासमोर उभा राहतो.

महापालिकेच्या एसएमएस सेवेला अल्पप्रतिसाद

$
0
0
शहरातील कचऱ्याबाबत तक्रार करण्यासाठी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या एमएसएम सर्व्हिसला नाशिककरांच्या प्रतिसादाअभावी ब्रेक लागला आहे. ही योजना सुरू झाल्यापासून अवघ्या २१८ तक्रारी प्राप्त झाल्या असून यातील ५९ तर कचऱ्याशी संबंधीत नसल्याचे समोर आले आहे.

‘श्रीमंत’ जिल्हाधिकाऱ्यांनी लपविली पत्नीची संपत्ती

$
0
0
दोन कोटींच्या आसपास संपत्ती असलेले जिल्हाधिकारी विलास पाटील २०१३मध्ये नाशिकमधील सर्वांत श्रीमंत आयएएस अधिकारी ठरले होते. मात्र, यंदा त्यांनी पत्नीच्या नावावरील संपत्ती जाहीर न करण्याचेच पसंत केले आहे. तर करोडपती असलेल्या महापालिका आयुक्तांनी मात्र, आपली संपत्ती ‘जैसे थे’ असल्याचे म्हटले आहे.

‘छावा’च्या व्यासपीठावर भाजपची गर्दी

$
0
0
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छावा संघटनेतर्फे नाशिकमध्ये आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनासाठी सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले असले तरी व्यासपीठावरील भाजप नेत्यांची गर्दी चर्चेची ठरली.

सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन

$
0
0
मनमाड नगरपालिकेच्या सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू केल्याने शहरातील स्वच्छता व आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे.

‘फ’ सत्ता प्रकारातील जमीन लाटली?

$
0
0
नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून ठेकेदाराच्या घशात जागा दिल्याचे धक्कादायक प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.

बिबट्या जेरबंद

$
0
0
सिन्नर व निफाड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या तारुखेडले व तामसवाडी शिवारात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. दोन महिन्यांपासून या भागात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू होता.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images