Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महिलांच्या टोल नाक्यावर महिलादिनापासून वाढ

$
0
0
पिंपळगाव-बसवंत येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर काम करणाऱ्या सर्व कर्मचारी महिला आहेत. देशातला हा अशाप्रकारचा पहिलाच टोलनाका आहे. विशेष म्हणजे, याठिकाणी होणारी टोल दरवाढ लागू करण्यासाठीही 'जागतिक महिला दिनाचाच' मुहूर्त टोलचे दर तीनपट वाढविण्यासाठी निवडण्यात आला आहे.

अनेक ठिकाणी वाहनांचा खोळंबा

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील पिंपळगाव बसवंत येथे असलेल्या टोल नाक्याला दर वाढविण्यास परवानगी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात हायवेचे काम १०० टक्के पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी वाहनांचा खोळंबा होत असताना वाढीव टोल कसा भरायचा, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

रेल्वे रिझर्वेशनसाठी लागताहेत रांगा

$
0
0
परीक्षांचा हंगाम संपल्यानंतर साहजिकच सुट्यांचा हंगाम सुरू होणार आहे. बच्चेमंडळींसह अनेक पालकांनी पर्यटनाची तयारी केली असून, त्यातूनच तिकिटांसाठी आतापासूनच नाशिकरोडच्या तिकीट खिडक्यांवर गर्दी होत आहे.

कांदा १०० रुपयांनी घसरला

$
0
0
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. गेल्या आठवड्यात नऊशे पन्नास रुपयांपर्यंत असणारे कांद्याचे बाजारभाव लिलाव सुरू होताच शंभर रुपयांनी घसरले.

४५८ नळ कनेक्शन सील

$
0
0
दहा हजार रूपयांच्या पुढे थकबाकी असलेल्या सुमारे ४५८ मिळकतधारकांचे नळ कनेक्शन महापालिका प्रशासनाने सील केले आहे. याबरोबर ४ हजार १२० मिळकतधारकांना कनेक्शन बंद का करण्यात येऊ नये अशा आशयाची नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

नाशकात पावसाच्या तुरळक सरी

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या हवामानात लक्षणीय बदल झाला असून मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास शहरात तुरळक सरी; तर इंदिरानगर भागात पावसाच्या धारांनी हजेरी लावली. आगामी काही दिवस हवामान असेच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

क्रीडा संस्था आणि राजकारणी !

$
0
0
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजकारण्यांना क्रीडा क्षेत्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. कारण साहजिकच आहे, जास्तीत जास्त किंवा सगळ्या क्रीडा संस्थाच्या अध्यक्षपदी राजकारणी विराजमान आहेत आणि ते वर्षानुवर्षे खुर्च्या अडवून बसले आहेत, खेळाची प्रगती होवो अथवा न होवो त्यांना सोयरसुतक नाही !

फायनल डोस

$
0
0
व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे समाजात काही मंडळी आपल्याच गुर्मीत वावरणारी असते. यात ‘कुणालाही न जुमानणे’ हा त्यांचा स्वभावदोष असतो. मात्र अशांनाही कधी ना कधी ‘फायलन डोस’ मिळतो.

बुलेटवेडी तरुणाई !

$
0
0
फ्युचर बाईक्सच्या जमान्यातही बुलेटने आपला दबदबा कायम राखला आहे तो तरुणाईच्या बळावर. बुलेटने रॉयल लूक घेतला असला तरी जुन्या बुलेटची शानही दमदार आहे.

नाशिकचे देखणे टर्मिनल

$
0
0
विमानतळ प्राधिकरण कक्ष, पायलट क्रु रेस्ट रूम, कॅफेटेरिआ, एक्स रे मशिन्स अशा बहुविध सुविधा आहेत. त्यामुळेच हे टर्मिनल पाहण्यासाठी इंजिनिअरींग, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसह नाशिककरांचीही मोठी गर्दी होत आहे.

राहुल गांधींचा धुळे दौरा

$
0
0
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचा दौरा केला. आदिवासी युवक-युवतींच्या समस्या जाणून घेत राहुल यांनी आदिवसींच्या विकासासाठी विविध क्षेत्रात प्रयत्न करण्याच आश्वासन देत जुनचं तुणतुणं वाजवलं. निवडणूक आल्यामुळेच आदिवासींच्या मतांवर डोळा ठेवत राहुल गांधींचा हा दौरा झाल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.

‌‘रिलेशन’ गुरुवारचे

$
0
0
गुरुवारचा निवडणुकीशी काय संबध? असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. त्यातही निवडणूक आयोग आणि गुरुवार हे काय ‌‘रिलेशन’ असेही वाटू शकते. तथापि, गेल्या व होऊ घातलेल्या निवडणूक तारखा आणि वार यांचा आढावा घेता हे प्रश्न कोणालाही पडू शकतात.

आचारसंहितेचा धसका आणि उत्साह

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच लागू झालेली आदर्श आचारसंहिता यंदाही चर्चेचा विषय बनते आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रमुख निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू करण्यात येते. मात्र तरीही कार्यकर्त्यांमध्ये आचासंहितेविषयी उत्सुकता असते, ती यंदाही कायम आहे.

कॅम्पस इंटरव्ह्यू केला क्रॅक

$
0
0
भारतीय औषधन‌िर्माण क्षेत्रातील मॅकलाईड्स फार्मास्युटीकल कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ५० उमेदवारांची न‌िवड करण्यात आली.

नाव‌िन्याचा शोध घ्या

$
0
0
‘पुस्तकाच्या पल‌िकडचे जग अनुभवण्यासाठी स्वत:ला झोकून द्या. सातत्याने नाव‌िन्याचा शोध घ्या,’ असे आवाहन ल‌िग्राड इंड‌िया कंपनीचे स‌िन‌िअर मॅनेजर म‌िलींद पाडे यांनी केले.

मल्टिप्लेक्समध्ये ‘दादासाहेब फाळके’ हवेत: मनसे

$
0
0
ज्या दादासाहेब फाळके यांनी देशाला चित्रपटाची देण दिली त्यांच्याच जन्मभूमीत सिंगल स्क्रीन थिएटरसह मल्टिप्लेक्समध्ये दादासाहेबांना स्थान नाही हे योग्य नसून, थिएटर व मल्टिप्लेक्सचालकांनी त्वरीत दादासाहेबांची तसबीर लावावी असे आवाहन मनसे चित्रपट सेनेच (मनचिसे) अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केले.

आपली श्रीमंती कशात?

$
0
0
नाशिक विकासाच्या बाबतीत `टेक ऑफ`च्या मूडमध्ये असल्याचे म्हणताना आपण गेल्या आठवड्यात विकासाला पूरक गोष्टींचाही विचार केला होता. वाहतुकीचा वेग वाढविणारे घटक विकासासाठी अतिशय पूरक असतात. वाहतूक हाच सुरुवातीपासून नाशिकच्या विकासाचा केंद्रबिंदू राहिला आहे.

धास्ती आचारसंह‌ितेची

$
0
0
निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याबद्दल सर्वच क्षेत्रात उत्सुकता असते. महापालिका कार्यालयापासून ते विभागीय आयुक्तालयापर्यंत सर्वचजण बुधवारी आचारसंहितेच्या घोषणेची वाट पाहत होते.

चला, शिल्पकलेच्या विश्वात

$
0
0
सिंधु संस्कृती, वेरूळ अजिंठा, घारापुरी येथील त्रिमूर्ती शिल्प तर खजुराहो येथील शिल्पाकृतीने भारतीय आणि जागतिक कलाविश्वात वेगळा ठसा उमटविला आहे.

इव्हेंट मॅनेजमेंट उत्सवाला कोंदण

$
0
0
घरातला किंवा ऑफिसचा एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असला की, त्याच्या नियोजनाची जबाबदारी अनेकांवर येऊन पडते. पाहुण्यांच्या स्वागतापासून जेवणापर्यंत सर्व व्यवस्था चोख ठेवता ठेवता आपल्याच कार्यक्रमाची मजा घ्यायची राहून जाते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images