Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गोदेचे प्रदूषण रोखण्यासाठी कमिटी

$
0
0
गोदावरीत होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येवून तिचा अहवाल मे महिन्यांपर्यंत कोर्टाला सादर करण्यात यावा, असे आदेश मुंबई हाय कोर्टाने दिले आहे.

लाचप्रकरणी प्रांतसह दोघे ताब्यात

$
0
0
विहिरीसाठी खरेदी केलेल्या जागेचा निकाल तक्रारादाराच्या बाजूने देण्यासाठी त्याच्याकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी येवल्यातील प्रांताधिकाऱ्यासह आणखी एकास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

राजकीय जनजागृतीचा होणार जागर

$
0
0
लोकसभा न‌िवडणुकीतील तरुणांच्या सहभागाला व‌िशेष महत्व प्राप्त झाल्याने त्यांच्या जाणीव जागृतीसाठी एचपीटी कॉलेजच्या जर्नाल‌िझम ड‌िपार्टमेंटच्या वतीने राजकीय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. द‌िनांक १० ते १५ मार्च या कालावधीत हा उपक्रम पार पडणार आहे.

`अन्यथा शेतकऱ्यांचा मतदानावर बह‌िष्कार`

$
0
0
ठरल्याप्रमाणे आधारभूत क‌िमतीला मका खरेदीसाठी सरकारनेच आवश्यक त्या सुव‌िधा पुरव‌िलेल्या नाहीत. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थ‌िक नुकसान झाले आहे. सरकारने ही भरपाई १५ द‌िवसांच्या आत न केल्यास ज‌िल्ह्यातील लोकसभा न‌िवडणुकीतील मतदानावर बह‌िष्कार टाकून तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

अश्रू पुसायला नाही कुणी?

$
0
0
राज्यात सर्वत्र निवडणुकीची वारे वाहू लागले असतानाच अवकाळी पावसाने थैमान घालून राज्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले. सर्व नेते सध्या प्रचारसभेत बिझी असल्याने जगाच्या पोशिंद्याचे अश्रू पुसायला ना कोणी नेता फिरकत आहे ना पदाधिकारी.

निवडणूक खर्च पथकाची स्थापना

$
0
0
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक विभागीय आयुक्तालयाने उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक्सपेंडीचर अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. याटीम मधील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

सटाण्यात काँग्रेस-भाजपचा काडीमोड

$
0
0
बागलाण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी काँग्रेसने भाजपशी दोन वर्षापूर्वी घरोबा करून पंचायत समितीत सत्ता स्थापन केली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा घरोबा काँग्रेस श्रेष्ठींना अमान्य करून भाजपशी तत्काळ फारकत घेण्याचा फतवा थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काढला आहे.

निकालापर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी

$
0
0
आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवडणुकीचे निकाल जाहीर होईपर्यंत सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७४० शस्त्र परवानाधारक आहेत. त्यामध्ये राजकीय व्यक्तींसह, व्यापारी, प्रगतशील शेतकरी, उद्योजक यांचाही समावेश आहे.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार

$
0
0
सिन्नर तालुक्यात गारपिटीमुळे झालेले नुकसान भयंकर असून, हे नुकसान येत्या तीन वर्षात भरून येणारे नाही. हाती आलेली पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होणार आहे.

जातपडताळणीमुळे उमेदवारांची दमछाक

$
0
0
इगतुपुरी तालुक्यात २९ ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांच्या गावातच चुरशीच्या निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण होऊ पहात आहे.

ब्राह्मणगावला बिबट्यांचा मुक्त संचार

$
0
0
बिबट्यांसाठी आता बागलाणचा पट्टा प्रसिध्द होत चालला असल्याचे सध्या चित्र आहे. गेल्या वीस दिवसांपासून तीन बिबट्यांसह देान बछड्यांनी सुरक्षित ठिकाण पाहून बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगावच्या सुळ्या डोंगराच्या भुयारात मुक्काम ठोकला आहे.

अजूनही वाहतोय माणुसकीचा झरा

$
0
0
स्वार्थी माणसांच्या जगात हरवलेल्या पाखरांना पुन्हा घरट्याकडे आणण्यासाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी नांदगाच जवळील पिंपरखेड येथील शिक्षक जीवापाड प्रयत्न करीत आहेत. शाळेसमोरचा पक्षी वाचवा प्रकल्प सुरू करून माणुसकीचा ओलावा अजूनही शाबूत असल्याची अनुभूती देत आहे. त्यांच्या या अभिनव प्रयत्नांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

अंधश्रध्देचा सटाण्यात गुन्हा

$
0
0
बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील महिलेला चेटकीण म्हणून हिनवून गावाबाहेर काढणा-या आठ जणांविरुध्द अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. कसमादे पट्ट्यात पहिल्यादांच दाखल झालेल्या गुन्ह्यात देान मांत्रिकांसह चार महिला आणि दोघांचा समावेश आहे.

दिनकर पाटलांना बडतर्फीची नोटीस

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीकडून (बसपा) उमेदवारी लढविणारे काँग्रेसचे नगरसेवक दिनकर पाटील यांना पक्षातर्फे बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हा प्रभारी आमदार भाई जगताप यांनी बजावलेल्या या नोटीसमध्ये ‘पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल बडतर्फ का करण्यात येऊ नये,’ असा प्रश्न करण्यात आला आहे.

शिवसेनेतर्फे नाशिकमधून गोडसे

$
0
0
शिवसेनेतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत होणाऱ्या विलंबाला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला आहे. नगरसेवक हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला शिवसेनेने विराम दिला आहे.

टोल वसुलीवरून संघर्ष अटळ

$
0
0
उभारणीपासून संपूर्ण महाराष्ट्रात वादग्रस्त टोलनाका म्हणून परिचित झालेल्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर शुक्रवारी (दि.७) मध्यरात्रीपासून दरवाढ लागू करण्यात येणार आहे. वाहनधारकांसह स्थानिक नेत्यांनी या टोल दरवाढीला विरोध दर्शविल्यामुळे दरवाढीचा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

षटकोनी लढतीत षटकार कोणाचा?

$
0
0
उमेदवारासह शिवसैनिकांची कमालीची अस्वस्थता मातोश्री दरबारी पोहचताच शुक्रवारी भल्या सकाळी नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे यांची अखेर उमेदवारी जाहीर झाली. आता मनसेच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा बाकी आहे.

८७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

$
0
0
नाशिक विभागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यांतील पिकांना तडाखा बसला आहे. यामुळे ८७ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अखेर केबीसीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

$
0
0
गुंतविलेल्या रकमेवर तिप्पट पैसे परत देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची माया गोळा केल्याप्रकरणी केबीसी कंपनीवर आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीच्या आडगाव परिसरातील कार्यालयावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे पावणेपाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली. तसेच तिघांना ताब्यात घेतले आहे.

धोबी घाटाच्या भूसंपादन प्रस्तावाला मुहूर्त नाही

$
0
0
धोबी घाटाचे निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक असलेला भूसंपादन प्रस्ताव अजूनही महापलिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेला नाही. ३० डिसेंबर, २०१३ रोजी स्थायी समितीने भूसंपादन प्रस्ताव पाठवण्यास मंजुरी दिली होती.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images