Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पुणे व‌िद्यापीठाचे एक पाऊल तळ्यात अन् दुसरे मळ्यात

$
0
0
महसूल व‌िभागाने पुणे व‌िद्यापीठाच्या ना‌श‌िक कॅम्पस भूसंपादनाला ह‌िरवा झेंडा दाखव‌िला. परिणामी द‌ीर्घ काळापासून कोंडीत सापडलेला कॅम्पसच्या डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा झाला आहे.

सीड्स कंपनीच्या आगीत कोट्यवधींचे नुकसान

$
0
0
सातपूर एमआयडीसीतील पी. जी. एंटरप्रायजेस या सीड्स कंपनीत रविवारी रात्री लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. १५ बंबांवरील अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

हजाराहून अधिक गावे पंचनाम्याच्या प्रतीक्षेत

$
0
0
बदलत्या वातावरणामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला गारपिटीने मोठ्या प्रमाणात झोडले आहे. या आपत्तीत झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरूच असून उत्तर महाराष्ट्रातील २५३४ पैकी केवळ १५०७ गावांचेच पंचनामे पूर्ण झाले असून अद्याप १०२७ गावांचे पंचनामे होण्याचे बाकी आहे.

नांदूरमध्यमेश्वर लवकरच आंतरराष्ट्रीय स्थानांमध्ये

$
0
0
राज्याचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याचा समावेश लवकरच ‘रासमर’ ठिकाणांमध्ये होणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव नाशिक वन्यजीव विभागामार्फत राज्य सरकारकडे जावून पोहचला आहे.

दरोडेखोर तुकाराम चोथवेला अटक

$
0
0
खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये शहर पोलिसांना हवा असलेला आणि कित्येक महिने चकवा देणाऱ्या तुकाराम चोथवे या सराईतला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पंचवटीतील हांडे खून प्रकरणात त्याला अटक करण्यात आली.

शहर काँग्रेस कमिटी ‘अँड्रॉइड’वर

$
0
0
देशात सोशल मीडियासह मोबाइल तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व लक्षात घेता राजकीय पक्ष या दोन्ही माध्यमांवर विशेष लक्ष देत आहेत. त्याचाच भाग म्हणून नाशिक शहर काँग्रेसतर्फे अँड्रॉइड अॅप लाँच करण्यात आले आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते या अॅपचे उद्घाटन करण्यात आले.

कमाल तापमानात वाढ

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा सामना करणाऱ्या नाशिककरांना आता उन्हाळ्याची चाहूल अनुभवास येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरातील कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

प्लॉट खरेदीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0
सुलभ हप्त्याने प्लॉट देण्याच्या नावाखाली अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार अंबड पोलिसांना देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी प्राथमिक चौकशी सुरू केल्याचे अंबड पोलिसांकडून सांगण्यात आले.

गारपीटग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0
गारपीटीच्या संकटाने सोमवारी बागलाण तालुक्यात दुसरा बळी घेतला. १०८ रुपये किलोने सौदा झालेली डाळिंब बाग एक रुपये किलोने विकावी लागल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे ६२ वर्षीय शेतकरी बापू रामचंद्र पवार यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

आम्हाला गृहीत धरू नका

$
0
0
ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडणा ऱ्या ज्येष्ठांकडे ऐवढे दुर्लक्ष का? यामुळे ज्येष्ठांनी मतदानाला अवश्य जायचे पण मतदार यादीतील यापैकी कोणीही उमेदवार आम्हाला मत देण्यास योग्य वाटत नाही. असे मतदान करायचे.

उताविळाची तऱ्हा!

$
0
0
उतावळ्या मंडळींना आपल्या वागण्याचा कधी ना कधी जाहीरपणे फटका बसतोच. परवा एका महाशयांनाही असाच फटका सहन करावा लागला. शहरात आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात हे महाशय पोहोचले.

‘केअरटेकर’ व्हायची संधी !

$
0
0
वयानुसार येणारे विविध आजार आणि थकलेल्या शरीरामुळे दैनंदिन कामे पूर्ण न करू शकणाऱ्या ‘आजी-आजोबां’ची काळजी यापुढे प्रशिक्षित केअरटेकर घेणार आहेत.

‘न‌िफ’ फिल्म फेस्टीव्हल उद्यापासून

$
0
0
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ मेट्रो फाउंडेशन ऑफ इंड‌िया व कलावैभव संस्थेतर्फे सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

तहान भागेल पण आरोग्याचं काय ?

$
0
0
घामाच्या धारा, तापलेलं शरी‌र आणि तहानेनं घशाला पडलेली कोरड अशी अवस्था झाली की ‘किती वाढलाय उन्हाचा तडाखा’, असे शब्द आपसूकच तोंडातून बाहेर पडतात.

पिंपळगाव बसवंतमध्ये गायीचे तांडव

$
0
0
पिंपळगाव बसवंत शहरात एका मोकाट गायीच्या तांडवाने मंगळवारी अवघ्या शहराला वेठीस धरले. गायीच्या हल्ल्यात दोन नागरिक गंभीर जखमी झाले तर किमान पंधरा ते वीस नागरिक किरकोळ जखमी झाले.

शेतकऱ्यांना लवकर नुकसानभरपाई द्या

$
0
0
अस्मानी संकटाने बरबाद झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने भरीव मदत दिली नाही तर‌ शिवसैनिक रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांनी मालेगावला सरकारविरोधी धरणे आंदोलन करताना दिला.

गारपिटीने फुटले फळ अन् नशीबही

$
0
0
गवंड्याकडे मोलमजुरी करून टँकरच्या पाण्यावर दीड बिगे डाळिंब बाग फुलविणाऱ्या बागलाण तालुक्यातील पिंपळदर येथील पवार बंधूंवर अस्मानीने जो भयानक हल्ला केला तो पाहिल्यावर मनही हादरून जाते.

त्र्यंबकेश्वरला गंगामाता झाली प्रकट !

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथे गंगाद्वार पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या म्हाळसादेवी मंदिराजवळ जलस्त्रोत आढळला आहे. यामुळे एकूणच गंगामाता प्रकट झाली या चर्चेने जोर धरला असून दर्शनासाठी भाविक गर्दी करीत आहेत.

पालकांनीही व्हावे भावनिक साक्षर

$
0
0
‘मुलांचा स्वत:च्या व‌िश्वाभोवती फ‌िरणारा मी अध‌िक व‌िशाल करून त्याला सामाज‌िक आयाम कसा देता येइल, या प्रश्नाचे उत्तर शोधत बालकांचे संगोपन करायला हवे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हल्लाबोल

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे हजारो हेकर शेतीचे नुकसान झाले आहे. यात जिल्ह्यातील सिन्नर, सटाणा, मालेगाव, देवळा, कळवण, येवला, निफाड तालुक्यांचा समावेश आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images