Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मराठीतील प्रमाणित शब्दकोश अधांतरिच!

$
0
0
मराठीला नवसंजीवनी प्राप्त करून द्यायची असेल तर मराठी भाषेचा प्रमाणित शब्दकोश तयार करण्यात यावा, या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. प्रमोद तलगिरे यांची मागणीकडे राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने दुर्लक्ष केल्याने अद्यापही प्रमाणित शब्दकोश तयार होऊ शकलेला नाही.

घरमालकांविरोधात पोलिसांची कारवाई

$
0
0
परकीय चलनाच्या बदल्यात भारतीय चलन देण्याचे अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणा-या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर शहर पोलिसांनी आपला मोर्चा कायद्याकडे दुर्लक्ष करणा-या नागरिकांकडे वळवला. याप्रकरणी गंगापूररोड पोलिसांनी मंगळवारी तीन घरमालकाविरोधात कारवाई केली.

ट्रकमालकांवर पोलिसांची कृपादृष्टी?

$
0
0
राजीवनगरात पकडण्यात आलेल्या अवैध वाळूप्रकरणी गुन्हा दाखल होऊन चार दिवस उलटले असले तरीही, पोलिसांच्या हाती एकही आरोपी लागलेला नाही. कारवाईदरम्यान रॉयल्टीची फोटो कॉपी सादर करत मालकी हक्क दाखविणारेच मुख्य सूत्रधार असल्याचे माहीत असूनही त्यांच्याकडे सोयीस्कर डोळेझाक होत आहे.

प्रॉपर्टीची माहिती शोधा ऑनलाइन

$
0
0
जमीन, फ्लॅट, घरे किंवा व्यावसायिक प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीतून होणाऱ्या फसवणुकीला आता पूर्णविराम मिळणार आहे. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने 'ई-सर्च'चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे खरेदी कराययाच्या प्रॉपर्टीची माहिती क्षणार्धात ग्राहकासमोर येऊन ठेपणार आहे.

रेल्वेचा उत्तर महाराष्ट्राला ठेंगा

$
0
0
रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी मांडलेल्या रेल्वे बजेटमध्ये उत्तर महाराष्ट्राला ठेंगा दाखवला आहे. आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने नाशिककरांनी केलेल्या अनेक मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याने नाशिककरांची घोर निराशा झाली आहे.

सर्पमित्रांचे एकमेकांविरुद्ध फुत्कार

$
0
0
मानवी वस्तीत आढळलेल्या सापाला पकडण्यासाठी वेळेप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या सर्पमित्रांनी एकमेकांविरुद्ध फुत्कार काढल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात वनविभागाच्या प्रधान सचिवांकडेही तक्रार दाखल झाली असून जिल्ह्यातील एकाही सर्पमित्राकडे वनविभागाचे ओळखपत्र नसल्याचेही स्पष्ट होत आहे.

शिरपूर पॅटर्नप्रमाणे ४ जिल्ह्यांत बंधारे

$
0
0
जळगाव जिल्ह्यातील टंचाईवर मात करण्यासाठी शिरपूर पॅटर्ननुसार अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव जामनेर तालुक्यात प्रत्येकी एक या प्रमाणे प्रायोगिक तत्त्वावर चार बंधारे बांधण्यात येणार आहेत. जूनअखेर या बंधा-यांची कामे पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केली.

...तर मराठी भाषा वाचणार कशी?

$
0
0
'श्यामची आई' पुस्तक सावरकरांनी लिहिले, पहिले ज्ञानपीठ बा. बा. आमटेंना मिळाले, शिवकालिन मराठी शिवलिपीत लिहिले गेले, तळे राखील तो पाणी चाखेल या म्हणीचा अर्थ सेल्फिश होणे असा आहे. साध्या प्रश्नांची ही गजब उत्तरे कॉलेजियन्सने दिलेली आहेत.

दुष्काळी भागाला अधिक सवलती

$
0
0
पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांतील दुष्काळी उपाययोजना व सवलतींसंदर्भात राज्य सरकारने नवी अधिसूचना काढली आहे. तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील १ हजार १३ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याने या गावांमध्ये टंचाई परिस्थिती घोषित करण्यात आली होती.

घोळ पुणे विद्यापीठाचा संक्रांत विद्यार्थ्यांवर

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेचे निकाल अद्यापही विद्यार्थ्यांच्या हाती न आल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागला आहे. तब्बल ९० दिवसांपार्यंत लांबलेला हा निकाल अपवादात्मक नाही. दोन महिन्यांच्या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ऐतीहासिक कामगिरी करीत विद्यार्थ्यांच्या निकालाचीच नाही तर भवितव्याची मोठे नुकसान झाल्याचे चित्र समोर येत आहे.

बांधकामाच्या कच-याचा हैदोस

$
0
0
मोकळ्या भुखंडांच्या ठिकाणी सर्रासपणे बांधकामाचा कचरा टाकला जात असल्याने संपुर्ण सातपूर परिसरात हा चिंतेचा विषय बनला आहे. महापालिका प्रशासनाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने सातपूर परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.

साडेतीन हजार गॅस कनेक्शन्स बंद

$
0
0
गॅस ग्राहकांना बंधनकारक करण्यात आलेल्या 'केवायसी' (नो युवर कस्टमर) व त्याच्या मुदतीबाबत अद्याप संभ्रम कायम असताना, मयूर गॅस एजन्सीमधील साडेतीन हजार गॅस कनेक्शन्स 'केवायसी'च्या कारणावरुन बंद करण्यात आले आहेत.

गोदातीरीच्या बांधकामांना तापीच्या वाळूचा आधार

$
0
0
निविदा प्रक्रियेत नाशिकची वाळू अडकल्याने शहर परिसरातील बांधकामांना खान्देशातील 'तापी'चा आधार मिळाला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथून दररोज दोनशेपेक्षा अधिक वाळूचे ट्रक नाशकात दाखल होत आहेत.

अहो, कवीवर्य आता खाली बसा !

$
0
0
'ज्या संमेलनात कवींचा सुकाळ असतो, तेथे श्रोत्यांचा दुष्काळ असतो', हे चित्र हमखासपणे कवी संमेलनामध्ये दृष्टीला पडते. यामुळे कवी संमेलनाचा आयोजक नेहमीच धास्तावलेला असतो. 'जे न देखे रवी ते देखे कवी' या उक्तीनुसार कल्पनेच्या विश्वात डुंबणाऱ्या महाशयांना या श्रोतृसंख्येचे सोयर सुतकही नसते.

'एचएएल'मध्ये पाच वर्षांचा वेतनकरार

$
0
0
ओझर येथील हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमीटेड (एचएएल) मध्ये कामगारांच्या वेतन कराराचा कालावधी पाच वर्षे राहणार असून तीन टक्के इंन्क्रिमेंट देण्याचे एचएएल व्यवस्थापनाने मान्य केल्याची माहिती एच. ए. एल. कामगार संघटनेचे सरचिटणीस रामभाऊ जाधव यांनी दिली.

दुष्काळात गावतळ्याचा सहारा

$
0
0
गोंदे येथील थिसेनक्रुप कंपनीने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गोंदे गावासाठी गावतळ्याची निर्मिती केली असून हे गावतळे बुधवारी गावाला अर्पण करण्यात आले.

साडेआठ हजार खातेदारांचा जीव टांगणीला

$
0
0
रुपी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्यामुळे नाशिकच्या दोन शाखांमधील सुमारे साडेआठ हजार खातेदारांचा जीव टांगणीला लागला आहे. या दोन्ही शाखांमध्ये एकूण २३ कोटी रुपयांच्या ठेवी असून या ठेवी मिळाव्यात, अशी आग्रही मागणी ठेवीदार करत आहेत.

स्वतःच्या बदलीसाठी केला स्वतःच फॅक्स

$
0
0
आरोग्य विभागातून शिक्षण विभागात बदली करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षकाने उपमुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरहेड तयार करून स्वतःच्या बदलीसाठी जिल्हा परिषदेला फॅक्स केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला.

मेगासॉफ्टच्या ठेवी वर्ग होणार

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काळ्या यादीत टाकलेल्या ठाणे येथील मेगासॉफ्ट इन्फॉर्मेशन प्रा. लि. कंपनीची बँकेतील ठेव वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. कंपनीला दिलेल्या कर्जापोटी तारण ठेवलेली एक कोटीची बँक गॅरंटी मुदतीत न सोडविल्याप्रकरणी बँकेचे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा कंपनीवर आरोप आहे.

वीस हजार क्युबिक मीटर गाळाचा उपसा

$
0
0
भुजबळ फाऊंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या जलसंवर्धन कामात पहिल्या दहा दिवसांत सिन्नर तालुक्यातील पांगरीनजीक सुरेगांव- देशमुखवाडी येथे सुमारे २० हजार क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवण होणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images