Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पिंपळगाव बसवंतमध्ये कर वसुलीची धडक मोहीम

$
0
0
मार्च महिना संपत आला तरी नागरिकांकडून कर भरण्यासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने शनिवारपासून (दि. २२) धडक वुसली मोहीम हाती घेतली आहे. पाणीपट्टी न भरणाऱ्या नागरिकांचे नळ कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे.

‘जीपीआरएस’मुळे इनोव्हासह चोर ताब्यात

$
0
0
पुण्यातून शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी लांबवलेली इनोव्हा कार अवघ्या पावणे पाच तासात शोधण्यात पोलिसांना यश आले. येवला पोलिसांनी इनोव्हासह आरोपीला ताब्यात घेत पुणे पोलिसांच्या हवाली केले. इनोव्हामध्ये बसविलेल्या 'जीपीआरएस' प्रणालीमुळेच वाहन अन चोरट्यांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले.

हुतात्मा चौक रस्त्याची चौकशी करा

$
0
0
सिन्नर शहरात नगरपालिकेकडून सुरू असलेल्या कॉँक्रिटीकरण काम निकृष्ट होत असल्याची तक्रार नगरपालिकेतील विरोधी गट असलेल्या शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या रत्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणीही विरोधी गटाने केली आहे.

कन्टेनरच्या धडकेने टँकर पेटला

$
0
0
विमानाचे इंधन घेऊन जाणारे टँकर आणि कन्टेनर यांच्यात झालेल्या अपघातात टँकरने पेट घेतला. यामुळे राज्य महामार्गावर चार तास अग्नितांडव सुरू होते. या भीषण आगीत दोन वाहनांसह चार मोटसायकली जळून खाक झाल्या. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

हम साथ साथ है!

$
0
0
धुळे मतदारसंघात हिंदू् व मुस्लिम समाजाची मोठी व्होट बँक आहे. यामुळे दोन्ही समाजांना बरोबर घेऊन चालणाऱ्या उमेदवाराचा विजय निश्चितच होतो. मात्र, प्रत्येक निवडणुकीत हे दोन्ही समाज कधीही एका उमेदवाराच्या पाठिशी उभे राहिले नाहीत.

देवळाली मतदारसंघात अस्वस्थता अन् उत्सुकताही!

$
0
0
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री व देवळाली मतदारसंघाचे आमदार बबन घोलप यांना एक लाखाच्या दंडासह तीन वर्षांचा सश्रम कारावास ठोठावण्यात आल्याने घोलप यांच्या राजकीय कारकीर्दीपुढे संकट निर्माण झाले आहे.

अल्पसंख्यांक ठरविणार नंदुरबारचा खासदार

$
0
0
काँग्रेससाठी राज्यातच नव्हे, तर देशात अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नंदुरबार मतदारसंघात सामाजिक न्याय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्यासमोर डॉ. हीना गावित यांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे.

उद्धव ठाकरेंचा आज धावता दौरा

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे आज, सोमवारी नाशिकच्या धावत्या दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी बारा वाजता शहरात त्यांचे आगमन होणार असून, त्यानंतर पुढील तीन ते चार तास ते सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

अॅट्रॉसिटीची २८२ प्रकरणे प्रलंबित

$
0
0
नाशिक विभागाच्या सामाजिक न्याय विभागात यंदा अॅट्रॉसिटीची तिचनशे प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यातील अवघ्या १८ प्रकरणांचा निकाल लागला असून २८२ प्रकरणे प्रलंबिपत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

पॅरोलवर गेलेले ११ कैदी फरारी

$
0
0
संचित रजा (पॅरोल) घेऊन कारागृहातून बाहेर पडलेले गंभीर गुन्ह्यांमधील ११ आरोपी रजेचा कालावधी संपूनही अद्याप परतलेले नाहीत. त्यांना फरारी घो‌षित करण्यात आले आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती देणाऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे.

राजकीय प्रवाह शुद्ध करेनः पांढरे

$
0
0
राजकारणात शिरलेल्या भ्रष्टांना ताळ्यावर आणल्यास प्रवाहाचा स्त्रोतच शुध्द होईल, हेच काम आम आदमी पक्ष करणार असल्याचे प्रतिपादन या पक्षाचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विजय पांढरे यांनी केले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

नाशिकला काय हवंय?

$
0
0
जीवनाच्या प्रत्येकच क्षेत्रात आज समस्यांचे जंजाळ उभे राहिलेले आहे. प्रामाणिक प्रयत्न केले, तर त्यातून नक्कीच मार्ग निघू शकतो. महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये काय काय करणे गरजेचे आहे, ते सांगणारा हा ‘मटा’चा जाहीरनामा…

शिर्डीचे तिकीट घोलप कुटुंबातच?

$
0
0
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले शिवसेनेचे शिर्डीचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बबनराव घोलप यांच्याऐवजी त्यांचा मुलगा योगेश घोलप यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

निवडणुकीचे रंग

$
0
0
लोकसभा निवडणुकीची धामधूम एवढी वाढली आहे. की सरकारी कर्मचाऱ्यांपासून राजकीय कार्यकर्त्यांपर्यंत सारेच त्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. अजून महिनाभर हा फिव्हर चांगलाच राहणार आहे.

प्रवृत्ती बनली संस्कृती

$
0
0
निवडणुका आल्यावर राजकारणात आयाराम गयाराम प्रवृत्ती एकदम बळावते. सध्या देशभर याचा अनुभव ना‌गरिक घेत आहेत. पोलिस, संरक्षण दल, प्रशासकीय सेवेतील अधिकारी तसेच तारे तारकांनाही राजकारणाचं प्रचंड आकर्षण या निमित्ताने दिसून येत आहे.

अखेर त्या नगरसेविकांचा सेनेत प्रवेश

$
0
0
जनराज्य आघाडीच्या प्रभाग ४६ बच्या नगरसेविका शोभा बाबूराव निकम आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभाग ५० अच्या नगरसेविका नंदिनी महेंद्र जाधव यांनी पाच महिन्यापूर्वीच शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची घेऊन पक्ष प्रवेशास इच्छुक असल्याचे संकेत दिले होते.

जनकल्याणाचा वारसा जपणार

$
0
0
‘भांडवलदार पक्षांनी‌ खऱ्या लोकशाहीचा अर्थच सामान्य जनतेपर्यंत पोहचू दिीलेला नाही. सामान्य माणसालाही सर्व दृष्टीने सक्षम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

केटीएचएमचे ३१ विद्यार्थी ‘जीपॅट’मध्ये उत्तीर्ण

$
0
0
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘जीपॅट’ (ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टीट्यूड टेस्ट) मध्ये मविप्र फार्मसी कॉलेजच्या ३१ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यातील दोन विद्यार्थी नॅशनल रँकींगमध्येही आले आहेत.

उपनगर नाक्यावरील पेच काही सुटेना!

$
0
0
नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर नाका येथे पादचाऱ्यांना जीव मूठीत धरुनच रस्ता ओलांडावा लागत आहे. वेगाने धावणाऱ्या गाड्या थांबण्याचे नावच घेत नसल्याने अपघाताची संख्या वाढतच आहे. येथे सिग्नल यंत्रणा उभारावी किंवा वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रहिवाशांनी बंद पाडले केबलचे काम

$
0
0
रिलायन्स कंपनीतर्फे दूरध्वनी केबलसाठी खोदलेले खड्डे व्यवस्थित बुजवत नसल्याचे कारण देत मंगलमूर्ती नगर परिसरातील रहिवाशांनी सोमवारी सकाळी कामच बंद पाडले. केबल टाकण्याचे काम लवकर पूर्ण केले जात नाही. ते पूर्ण झाल्यानंतर खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images