Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जागतिक विशेष ग्रंथपाल दिन

$
0
0
पुस्तकांच्या विश्वात काम करणारा ग्रंथपाल (लायब्ररियन) हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश देणारा ग्रंथपाल सरकारच्या विचित्र धोरणांमुळे आज कोर्टाचे उंबरे झिजविताना दिसतो आहे.

वोक्हार्टतर्फे घरपोच फिजीओथेरपी

$
0
0
नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या वोक्हार्टतर्फे जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने घरपोच फिजिओथेरपी सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.

पंचवटीतील वाहतूक मार्गात उद्या बदल

$
0
0
कामदा एकादशीनिमित्त शुक्रवार (दि. ११) शहरातून रामरथ व गरूडरथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे पंचवटी, मेनरोड परिसरातील वाहतुकीच्या मार्गात दुपारी तीनपासून बदल करण्यात येणार असून वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.

नाशिकरोडच्या प्रवाशांना प्रतीक्षा शेडची

$
0
0
नाशिकरोडसह परिसरात बस प्रवाशांना निवारा शेडची गरज तीव्रतेने भासत आहेत. अनेक ठिकाणी चुकीच्या जागेवर बसशेड उभारण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी त्या वापराविना पडून आहेत.

कौन्सुलेट जनरलची उद्योजकांशी चर्चा

$
0
0
नाशिक दौऱ्यावर आलेल्या इस्रायल कौन्सुलेट जनरल जोनाथन मिलर आणि त्यांच्या सहकार्यांनी नाशकात येऊन उद्योगासाठी चाचपणी केली आहे. त्यानंतर नाशकात गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी अनुकूलता दाखविली आहे.

रस्त्याच्या कामांना अडथळ्यांची शर्यत

$
0
0
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांची कामे महापालिकेमार्फत सुरू करण्यात आली आहेत. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे या कामांमध्ये अनेक ठिकाणी अडथळे येत आहेत.

आता वेळ सत्ताबदलाची

$
0
0
गेल्या काही वर्षापासून एकच सत्तापक्ष आपल्यासमोर असल्याने वेगळा विचार किंवा बदल झालेला नाही. आज सत्तेत बदल होऊन ज्या क्षेत्रांचा विकास झालेला नाही, त्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

नेत्यांच्या तारखांचा बसेना मेळ!

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख दोन आठवड्यांवर आल्याने राजकीय पक्षांकडून प्रमुख नेत्यांच्या सभा, प्रचार दौ-यांचे नियोजन करण्यात येत आहे. शिवसेना, मनसेसह माकप व आम आदमी पार्टीतर्फे प्रमुख नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात येत असताना निवडणुकीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र नेत्यांच्या तारखांची वाट पहावी लागते आहे.

जिल्ह्यात ३८ लाख ८६ हजार मतदार

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३८ लाख ८६ हजार ९९५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वसाधारण मतदारांची संख्या ३८ लाख ७८ हजार ७५९ तर ८ हजार २३६ नोकरदार मतदार आहेत.

अन् रंगले माघारीचे नाट्य!

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील अर्ज माघारी घेण्याच्या बुधवारच्या अंतिम दिवशी माघारीचे नाट्य रंगले. जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी जमल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चव्हाणांच्या प्रचार कार्यालयाचे उद्‍घाटन

$
0
0
‘देशाच्या बाह्य आणि अंतर्गत सीमादेखील असुरक्षित असल्याने देशाची संरक्षणव्यवस्था भक्कम करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या समर्थ हातात देशाचे नेतृत्व सोपवा,’ असे प्रतिपादन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मनमाड येथे केले. शिवाजी चौकात प्रचार कार्यालयाचे उद् घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

भरारी पथकांकडून येवल्यात वाहन तपासणी

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला विधानसभा मतदारसंघात भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांकडून शहरात वाहनांची तपासणी केली जात आहे.

आज झडणार आरोप-प्रत्त्यारोपांच्या फैरी

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या अधिकृत प्रचाराला सुरू होत नाही तोच राजकीय सभा जोर धरू लागल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून आज(गुरुवार) नाशिल लोकसभा मतदारसंघात मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांसह शिवसेना नेते संजय राऊत व रामदास कदम यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे.

‘आरोग्य’ सुधारा

$
0
0
सिव्हिल हॉस्पिटलमध‌ील बंद असलेला रेड‌िओलॉजी विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्रांसह हॉस्पिटल्समधील अस्वच्छता आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धिम्या गतीने सुरू असलेली कामे याबद्दल आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी नाराजी व्यक्त केली.

सट्टा बाजार तेजीत!

$
0
0
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तस तसा सट्टा बाजारातील हालचालींनी वेग घेतला आहे. विशेष म्हणजे कोणत्या पक्षाच्या अधिक जागा येतील, यावर जसा सट्टा लागतोय तसा सट्टे बाजाराच्या इतिहासात प्रथमच पराभवाची चव कुणाला चाखावी लागेल, यावरही सट्टा लावला जात आहे.

नाशिक-मुंबईचे रिटर्न तिकीट

$
0
0
नाशिक ते मुंबई प्रवासासाठी मध्य रेल्वेने रिटर्न तिकीट द्यावे, अशी मागणी रेल परिषदेने मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे केली होती. या मागणीला रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली असून, निवडणुकांचा कालावधी संपताच ती सुरू केली जाईल, असे आश्वासन रेल परिषदेला दिले आहे.

नाशकात बहुरंगी लढत

$
0
0
बुधवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण ९ उमेदवारांनी माघार घेतल्याने एकूण १५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर, दिंडोरीत एका उमेदवाराने माघार घेतल्याने तेथे १० उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

सुनील कुलकर्णींचे मोदींना आव्हान

$
0
0
गुजरातचे मुख्यमंत्री तथा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आव्हान म्हणून उमेदवारी करताना दिग्गजही नकार देत असताना मूळचे नाशिककर असणारे सुनील कुलकर्णी त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत.

साहेबांना काय नंतरही भेटता येईल!

$
0
0
कार्यकर्ते हरप्रकारचे असतात. न‌िष्ठा दाखव‌िणारे तसेच व‌िश्वासू. तत्पर असणारे तसेच सेवाभावी. अन् प्रसंगी कडवट त‌ितकेच दुराग्रही, हट्टी. सार्वजन‌िक ठ‌िकाणी हा कार्यकर्ता जेव्हा भावन‌िक होऊन नकारात्मक वृत्तींचे जाहीर प्रदर्शन करतो त्यावेळी तो गमतीचाही व‌िषय बनतो.

जनसंपर्क साधणारा उमेदवार गरजेचा

$
0
0
‘जो तो उमेदवार निवडणुकीआधी महिनाभर आमची मनधरणी करायला येतो. निवडणूक झाल्यानंतर मा‌त्र तोंड दाखवायलाही फिरकत नाही, मग काम करायची गोष्ट तर सोडूनच द्या. त्यामुळे नियमित जनसंपर्क ठेवून काम करणाऱ्या उमेदवाराची आज गरज आहे’, असा सूर दुर्गा महिला संस्थेच्या सदस्यांमधून उमटला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images