Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मान्सूनपूर्व बैठकीला वरिष्ठांची दांडी

$
0
0
मान्सून पूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीला विविध सरकारी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दांडी मारत केवळ कर्मचाऱ्यांना पाठविले. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

बसपानेही घेतली उडी!

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत हेतूपुरस्सर घोळ केला असल्याची तक्रार बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हाधिकारी विलास पाटील यांची भेट घेऊन दोषींवर करावाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘आप’ला हवी मतदारांची साथ

$
0
0
यापूर्वी वेळोवेळी मतदान करूनही लोकसभा निवडणुकीतील मतदारयादीतून नाव गायब झाल्याने अडीच लाखाहून अधिक मतदारांना फटका बसला. यावर राजकीय पक्षही आक्रमक झाले असून, आम आदमी पार्टीने (आप) या मतदारांनी पक्षाला संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याबाबतच्या मुंबईतील प्रकारावरून आपतर्फे याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याला जोड देण्यासाठी नाशिकच्या मतदारांनी आपल्या तक्रारी द्याव्या, असे आपतर्फे सांगण्यात आले आहे.

मैत्रेय रिअल्टर्सचे ‘संकुल फेज २’ लाँच

$
0
0
मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीजच्या निर्माण शाखा अंतर्गत रिअॅल्टर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने नाशिक शहरातील पाथर्डी येथील मैत्रेय संकुल फेज २ चे औपचारिक लाँच करण्यात आले आहे. यात सर्वसामान्य कामगार वर्गाच्या बजेटमध्ये असतील असेच घरकुल तयार करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे सीओ पंकज श्रीवास्तव यांनी दिली. हॉटेल एमराल्ड पार्क येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शहरातून चार मोटारसायकलची चोरी

$
0
0
निवडणूक संपताच पुन्हा एकदा दुचाकी चोरांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून शहरात सोमवारी चार मोटार सायकली चोरीला गेल्या.

माजी मुख्याध्याप‌िकेचा उपोषणाचा इशारा

$
0
0
श‌िक्षण उपसंचालकांच्या आदेशांनंतरही स्वेच्छा न‌िवृत्ती वेतन आण‌ि इतर फायदे नाकारल्याचा आरोप करीत माजी मुख्याध्याप‌िका श्रध्दा लेले द‌ी न्यू एज्युकेशन इन्स्ट‌िट्यूटच्या व्यवस्थापनाव‌िरोधात उद्या (द‌ि.१ मे) पासून ज‌िल्हा श‌िक्षणाध‌िकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.

कार्बाईडद्वारे आंबा पिकविण्याचा उद्योग

$
0
0
कार्बाईडच्या माध्यमातून आंबा पिकविण्याचा उद्योग उघडकीस आला असून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंगळवारी कारवाई करीत १५ हजार रुपयांचा आंबा तसेच कार्बाईड जप्त केले आहे. कार्बाईड संदर्भातील कारवाई येते काही दिवस जोमाने राबविली जाईल, असे एफडीएने स्पष्ट केले आहे.

अवकाळी पावसाचा डाळिंबाला धोका

$
0
0
बागलाण तालुक्यात अवकाळी पावसामुळे कांद्यासह डाळिंब पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी झालेल्या पावसामुळे डाळिंबावर तेल्या रोगाचे आक्रमण झाले असून, शेकडो हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. गिरणाकाठ परिसरातील लखमापूर, ब्राह्मणगाव, धांद्री, यशवंतनगर, अजमीर सौंदाणे, देवळाणे, चौगाव, दऱ्हाणे, पिंपळदर, मळगाव आदी परिसराला अर्धा तास पावसाने झोडपले.

मनसे आणि प्रशासनाचेही दुर्लक्ष

$
0
0
दादासाहेबांचे स्मारक उभारण्याची घोषणा झाल्यानंतर ‘गवसेल का फॅक्टरी’ या शीर्षकाने एक लेखमाला ‘मटा’ने चालवली होती. त्यांचा नाशिकस्थित (दूधबाजार, फाळके लेन) स्टुडिओ शोधण्यात ‘मटा’ने यश मिळवले होते. त्यानंतर दादासाहेबांची मॉरिस नावाची गाडीही एका जुन्या गॅरेजमधून शोधण्यात आली.

तलाव चांगला; समस्यांनी गांजला

$
0
0
नाशिकरोडच्या राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव म्हणजे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारे व्यासपीठ अशी या तलावाची ओळख आहे. मा‌त्र, अनेक समस्या व महापालिकेच्या दुर्लक्षामुळे खेळाडूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

‘बीएसएनएल’ची ग्रामीण सेवा ठप्प

$
0
0
भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) भोंगळ कारभाराचा जिल्ह्याला पुन्हा एकदा फटका बसला असून, मंगळवारी दिवसभर बीएसएनएलचे सर्वच सेवा ठप्प होती. याचा मोठा फटका जिल्ह्यातील ग्राहकांना बसला. दिवसभर ग्रामीण भाग दूरसंचार सेवेपासून वंचित होता.

फाळकेंच्या स्मारकाचे काय झाले?

$
0
0
चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळके यांचा विसर राज्य सरकारला पडला असून नाशिकला त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारू अशी मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली आहे. सरकारच्या निगरगट्टपणाचे याहून मोठे उदाहरण काय असेल? पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या घोषणेला तब्बल दोन वर्षे उलटूनही स्मारकाबाबत प्रशासन चकार शब्द काढत नाहीत.

डोळे बांधून चालवली मोटरसायकल

$
0
0
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी शहरातून डोळेबांधून मोटरसायकल चालवून येवलेकरांना थक्क केले. जादूगाव रघुवीर यांनी डोळ्यांना घट्ट काळ्या पट्टयाने बांधून काळ्या रंगाच्या पिशवीने संपूर्ण चेहरा झाकून शहरातील प्रमुख रस्त्यावरून मोटारसायकल चालवली.

जमीन व्यवहारात ३८ लाखांची फसवणूक

$
0
0
जमीन व्यवहारात ३८ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार आडगावमध्ये उघडकीस आला आहे. आडगाव पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून, आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. विजय नंदू वानखेडे (रा. पाटील लेन, कॉलेजरोड) आणि संजिवनी प्रवीण वानखेडे (रा. पंपींग स्टेशन, गंगापूर रोड) अशी आरोपींची नावे आहेत. भालचंद्र जाधव (४१, रा. गोदावरी सोसायटी, जेलरोड) यांनी फिर्याद ‌दिली आहे.

मालेगाव @ ४३.७

$
0
0
मालेगाव शहर आणि परिसरात उन्हाचा तडाखा कायम असून बुधवारी येथे ४३.७ अंशाची नोंद झाली. दिवसा रस्ते ओस पडून असून थंडपेयांच्या दुकानावर गर्दी होत आहे. महाराष्ट्रात तपमानाचा उच्चांक गाठणाऱ्या मालेगाव शहराची ओळख आता कडक उन्हाळ्याचे गाव म्हणून होऊ लागली आहे.

डाळिंबावर तेल्या रोगाचे संकट

$
0
0
गारपीटच्या संकटानंतर आता डाळिंबाच्या आगारावर तेल्याचे संकट ओढावले आहे. अवकाळी पाऊस आणि वाढत्या उष्यामुळे कसमादे पट्टयातील सुमारे पंधरा हजार हेक्टरवरील डाळिंब बागांवर तेल्याने आक्रमण केले आहे.

डाळिंब लागवडीसाठी नवीन दर

$
0
0
शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेतंर्गत डाळिंब फळबागांच्या लागवडीसाठी सुधारीत दर नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. डाळिंब पिकाच्या लागवडीसाठी तीन वर्षासाठी एक लाख एकवीस हजार रुपये मिळणार आहेत. राज्य नियोजन विभागाने हे दर लागू केले आहेत.

राष्ट्रसेवा दलाचा तारा निखळला

$
0
0
उभं आयुष्य समाजासाठी व्यथित करणारा, राष्ट्रसेवा दलासाठी कष्ट घेणारा तेजस्वी तारा, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक बा. य. परीट गुरुजी यांचे बुधवारी पहाटे निफाड येथे (वय ९१) वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

पशुवैद्यकीय दवाखान्यातून औषध, कृत्रिम रेतनची विक्री

$
0
0
देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातून खासगी व्यावसायिक डॉक्टरला शासकीय कोट्यातील औषधे व कृत्रिम रेतन विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या कर्मचाऱ्यास ग्रामस्थांच्या जागरुकतेने रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत संबंधिताची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी पिंपळगाव वाखारीचे सरपंच दिलीप पाटील, जगदीश थोरात यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

‘चणकापूर’मधून आवर्तन

$
0
0
चणकापूर धरणातून कसमादे परिसराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ४५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आर्वतन सोडण्यात आले आहे. यामुळे गिरणा नदीकाठावरील ५१ गावांतून दुष्काळाचे सावट दूर होऊन सटाणासह मालेगाव, कळवण, देवळा तालुक्यांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images