Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अमेरिकेत हापूसचा घमघमाट

$
0
0
कीटकनाशकांच्या अतिवापराचे कारण पुढे करत हापूस आंब्याला युरोपात एक मे पासून बंदी घातली जाणार असतानाच अमेरिकेत मात्र भारतीय हापूस आंब्याची अवीट चव चाखण्यासाठी अमेरिकन बाजारपपेठा आतुरतेने वाट पाहत आहेत.

छगन भुजबळ यांना हायकोर्टाची नोटीस

$
0
0
सार्वजनिक बांधकाम विभागातील ११९ कोटी रुपयांच्या गैरप्रकाराप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्या विभागाचे प्रधान सचिव श्यामल मुखर्जी यांना नोटीस बजावली.

उद्योग भवनातील कार्यालये त्रस्त

$
0
0
उद्योग भवनातील कामगार उपायुक्त कार्यालयात सततच्या वर्दळीमुळे या ठिकाणी असलेली इतर कार्यालये कमालीची त्रस्त झाली आहेत. त्याशिवाय, उद्योजक व कामगार यांना बऱ्याचवेळी चार मजली कामगार उपायुक्त कार्यालयात जाण्या-येण्यासाठी पायपीट करावी लागते.

पंचवटीतील जलतरण शिबिराचा समारोप

$
0
0
पंचवटीतील श्रीकांत ठाकरे जलतरण तलावावर आयोजित करण्यात आलेल्या जलतरण शिबिराचा समारोप बुधवारी झाला.

पोलिस चौकी धुळखात

$
0
0
गंगापूर, गोवर्धनमधील तयार पोलिस चौकी पोलिसांविनाच पडून आहे. या परिसरात घडणाऱ्या अनुचित प्रकारांवर आळा घालण्यासाठी येथील चौकी सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पोलिसांचे आज संचलन

$
0
0
महाराष्ट्र दिनानिमित्त गुरुवारी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी आठला शानदार संचलन होणार आहे. त्यामध्ये पोलिसांसह महाराष्ट्र पोलिस अकादमीतील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक, अग्निशमन विभाग, वनविभाग अशा विविध विभागांचे एकूण १४ प्लाटून सहभागी होणार आहेत.

कारागृहात कैद्याची आत्महत्या

$
0
0
नाशिकरोड कारागृहातील बाथरुममध्ये कैद्याने नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. गेल्याच आठवड्यात एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता तर एका कैद्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कारागृहाच्या १५ फूट उंचीच्या भिंतीवरून पलायन केले होते.

जुगार अड्डयांवर छापा

$
0
0
भद्रकाली आणि पंचवटी परिसरातील जुगार अड्डयांवर छापा टाकून पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले. आठवडाभरापासून पोलिसांनी जुगार अड्डयांवर कारवाईची मोहीम सुरू केली असून, ७ अड्डयांवर छापे टाकले आहेत.

लाच घेणारा पीएसआय जाळ्यात

$
0
0
कारवाई दरम्यान जप्त केलेले मोबाईल परत करण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पीएसआयला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

कष्टकऱ्यांची लढाई संपणार कधी?

$
0
0
नाशिकच्या औद्योगिक क्षे‌‌त्रात ७५ टक्के कामगार कंत्राटी पद्धतीने काम करतात. तर कायम असलेले २५ टक्के कामगारही आपल्या हक्कांसाठी झगडताना दिसतात. असंघट‌ित क्षेत्रातील कामगारांची अवस्था तर अधिकच बिकट आहे. जिल्ह्यात ९३ टक्के कामगार असंघट‌ित क्षेत्रात असलेल्या कामगारांना कष्टाच्या भाकरीसाठी आंदोलनाचा झेंडा हाती घेऊन पोटाची खळगी भरावी लागते.

‘त्या’ मतदान यंत्रांची माहिती द्या

$
0
0
कुठल्याही उमेदवाराला मत दिले तरी एकाच उमेदवाराला मत मिळत असल्याचा प्रकार काही ठिकाणी घडल्याने निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यात असे किती मतदान यंत्र आहेत, याची माहितीच आयोगाने मागविली आहे.

टेस्ट ट्यूब बेबीचे द्व‌िशतक

$
0
0
अथर्व इनफर्टिलिटी अॅण्ड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने दोनशेव्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्म देत द्व‌िशतकी टप्पा गाठला आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आणणारे अथर्व सेंटर एकमेव ठरले असल्याची माहिती सेंटरचे संचालक डॉ. यशवंत माने व डॉ. उमेश मराठे यांनी दिली.

‘लेखणी बंद’ आंदोलन

$
0
0
अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्याच्या तहसीलदारांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी लेखणी बंद आंदोलन केले. हा गुन्हा तत्काळ मागे घ्यावा आणि गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी निलंबित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सिंहस्थाच्या कामांना वेग येणार

$
0
0
अवघ्या वर्षभरावर येवून ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना येत्या काही दिवसात मोठा वेग येणार आहे. येत्या शनिवारी जिल्हास्तरीय समितीची बैठक होत असून, आचारसंहितेमुळे प्रलंबित असलेली महापालिकेची कामे येत्या काही दिवसांतच वेग घेणार आहेत. तसेच, पुढील आठवड्यात महापौर सिंहस्थ पाहणी दौरा करणार आहेत.

सप्तशृंग गडावर आत्महत्या

$
0
0
कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावर नाशिक येथील प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शंकर गोरख धोत्रे (२८) व सीमा महेंद्र पगारे (२५) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही विवाहित असल्याने प्रेमसंबंधात विवाहाचा अडसर ठरत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

नाश‌िकचा च‌िराग देशात पह‌िला

$
0
0
फेब्रुवारी २०१४मध्ये घेण्यात आलेल्या एमबीए सीईटी परीक्षेत नाश‌िकचा च‌िराग अग्रवाल देशात पह‌िल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. मुंबई, पुण्याची मक्तेदारी मोडून काढत च‌िरागने हे यश म‌िळव‌िले आहे. तो के. के. वाघ इंजि‌नीअरिंग आण‌ि पी. टी. एज्युकेशनचा व‌िद्यार्थी आहे.

कारवाई प्लास्टिकची

$
0
0
महापालिकेतर्फे अनेक मोहिमा राबवल्या जातात. कधी अतिक्रमण मोहीम तर कधी प्लॅस्टीक विरोधी मोहीम राबविली जाते, अशीच एक मोहीम नाशिकरोड परिसरात राबविण्यात आली. सकाळी दहा वाजताच कर्मचारी आपला लवाजमा घेऊन कारवाईला निघाले.

वाद शिक्षकांचे अन् नुकसान विद्यार्थ्यांचे

$
0
0
सटाणा येथील नाशिक जिल्हा विधायक कार्य समितीच्या कार्यकारणिचा वाद कोर्टात असताना त्याच संस्थेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

ग्रामस्थांनी लावले ग्रामपंचायतीला कुलूप

$
0
0
ग्रामसेविकेने गेल्या तीन महिन्यांपासून दांडी मारल्यामुळे गावाची विकासकामे ठप्प होण्याबरोबरच मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असलेल्या तिळवणच्या संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.

संस्कार शिबिरात सांप्रदायिक शिक्षणाचे धडे

$
0
0
महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. साधू-संतांनी समाजाला अध्यात्माचा चांगला मार्ग दाखवला. आजच्या नवीन भरकटत चाललेल्या पिढीला संस्कृती व संस्कार टिकण्यासाठी अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जाणे ही काळाची नितांत गरज बनली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>