Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कॅन्सर बरा होणे झालंय सोपे

$
0
0
‘केमोथेरपीचा बाऊ न करता कॅन्सर कोणता आहे हे ओळखून घ्या, त्यावर उपचार करून तो बरा होऊ शकतो इतकीच खूणगाठ मनाशी बांधा. शंभर टक्के सकारात्मक विचार करा, आता कॅन्सर बरा होणे पूर्वीपेक्षा अत्यंत सोपे झाले आहे.’ असे मत डॉ. प्रीतेश जुनागडे यांनी व्यक्त केले.

टेम्पो उलटून १७ जखमी

$
0
0
गंगा महाळुंगी येथे वऱ्हाडाचा टेम्पो उलटल्याने १७ जण जखमी झाले. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

धुळे एलसीबी पथकाची कारवाई

$
0
0
सटाणा-सुरत राज्य मार्गावर धुळे एलसीबीच्या टीमला गुटख्याचे घबाडच सापडले. अहमदाबादहून मालेगाव आणि जळगाव शहरात जाणारे गुटख्याचे तीन ट्रक गुरुवारी सकाळी पिंपळनेरजवळ पोलिसांनी पकडले. या गुटख्याची ‌किंमत बाजारभावानुसार ६५ लाख रुपये इतकी आहे.

सांडपाण्याची मालकी महापालिकेची?

$
0
0
राज्य नदी संवर्धन योजनेतंर्गत नदीपात्रात सोडण्यात येणारे प्रक्रियायुक्त सांडपाणी एखाद्या उद्योगास अथवा शेतीस देऊन त्यातून मिळणारे उत्पन्न महापालिकेला देण्यात यावे, अशी तरतूद करण्यात आली आहे.

आईऽऽऽगं एक आपसुक आरोळी

$
0
0
पळता पळता आपल्याला ठेच लागली आणि तोंडून आपसूक आईऽऽऽगं अशी आरोळी येतेच येते. आई आणि मुलांचं नातं इतकं नाजुक आणि घट्टं असतं की, त्या नात्याला कोणतीच उपमा नाही की तुलना नाही.

विम्बल्डन जिंकणारी अलथेआ

$
0
0
टेनिस क्षेत्रात जागतिक पातळीवर गेली काही वर्षे सेरेना आणि विल्यम्स या निग्रो भगिनी अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून राज्य करीत आहेत. त्या काळ्या असून त्यांना गोऱ्यांबरोबर कसे खेळता येते किंवा गोऱ्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व त्यांना कसे करता येते हे प्रश्न आता आपल्याला पडत नाहीत.

सेवापुस्तके घेवून जाण्याचे आवाहन

$
0
0
एप्रिलपर्यंत सेवापुस्तके ज्या कार्यालयांनी पडताळणीसाठी वेतन पडताळणी कार्यालयाकडे पाठविली आहेत, ती घेऊन जावित असे आवाहन लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक बाळासाहेब घोरपडे यांनी केले आहे.

चिठ्ठी पाठवेपर्यंत...!

$
0
0
जाहीर कार्यक्रमातला माईक प्राध्यापकाच्या हाती आला तर काय होईल श्रोत्यांना तासभर लेक्चर ऐकण्याशिवाय पर्याय राहणार नाही, बाकी काय. परवाच्या कार्यक्रमात असेच झाले.

आई आमचा आधारवड

$
0
0
‘आई हे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठच तरीही नाही म्हणवत नाही!’ हे शब्द मांडणाऱ्या फ. मुं. शिंेदेंसारख्या संवेदनशील कवींपासून तर लहान मोठ्या प्रत्येकाच्या मनात लपलेली ‘आई’ प्रत्येक जीवनाचा कणा आहे.

चोवीस तासात पेमेंट देणाऱ्या व्यापाऱ्यालाच माल

$
0
0
शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाचे पेमेंट चोवीस तासांच्या आत करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच शेतमाल घेता येईल, असा फतवा देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीने काढल्यामुळे व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

निसर्ग पर्यटनाला मिळतेय चालना

$
0
0
जळगावलगत असलेल्या लांडोरखोरी वनक्षेत्राचा जळगाव वनविभागाकडून एक कोटी रुपये खर्चून विकास केला जात आहे. येथे वनविभागाच्या वतीने निसर्ग पर्यटनाला चालना देणारे एक माहिती केंद्र उभे राहणार असून, वर्षभरात हा प्रकल्प आकारास येईल अशी अपेक्षा वनसंरक्षक यू. जी. कडलग यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.

मालेगावात रिपाइंचा निषेध मोर्चा

$
0
0
महाराष्ट्रात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दीपक निकम यांनी केले.

रेशनकार्डधारकांना मिळेना लेव्हीच्या दरावरून साखर

$
0
0
साखरचे खुल्या बाजारात वाढलेले दर आणि राज्य सरकारने लेव्ही साखरेचे निश्चित केलेले दर या मुद्यावरून राज्य सरकार आणि साखर सम्राट यांच्यात सुरू असलेल्या ताणाताणीत गेल्या महिन्यात राज्यातील रेशनकार्ड धारकांना साखरच देता आलेली नाही. यामुळे दोघांच्या वादात आम आदमीची पंचाईत होत आहे.

नुकसानभरपाई द्या; अन्यथा रास्तारोका

$
0
0
गेल्या मार्च व एप्रिल महिन्यात येवला तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसानग्रस्तांना तत्काळ अार्थिक मदत द्यावी, अन्यथा या प्रश्नी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने निवेदनाद्वारे येवला तहसीलदारांना दिला आहे.

गारपीटग्रस्तांसाठी ३ कोटी २८ लाख

$
0
0
सिन्नर तालुक्यात गारपीटग्रस्तांना शासनाकडून तीन कोटी २८ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. ज्या शेतकऱ्यांचे बॅँक खाते क्रमांक मिळाले त्यांच्या नावावर ही रक्कम बॅँकेत वर्ग करण्यात आली.

नाशिकरोड परिसरात पथदिव्यांचा गोंधळ

$
0
0
नाशिकरोड परिसरातील उपनगरांबरोबरच जेलरोडसारख्या मुख्य रस्त्यावरील पथदीप बंद आहेत. त्याचवेळी काही भागात सूर्य मावळला नसतानाही पथदिवे लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महिंद्रा सर्कलवर ट्रॅफिक जॅम

$
0
0
नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिंद्रा सर्कलवर अवजड ट्रेलरमुळे तसेच सर्कलच्या बाजूला असलेल्या व्यावसायिकांच्या व ग्राहकांच्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या गाड्यांमुळे नेहमीच ट्रॅफिक जॅम होत असते. त्यांच्यावर कारवाईची मागणी वाहनचालक करत आहेत.

सिन्नर तालुक्यात धावताहेत सर्वाधिक टँकर

$
0
0
नाशिक विभागात सर्वात जास्त टँकर सिन्नर तालुक्यात धावत आहेत. सिन्नरमध्ये २० खासगी व २१ शासकीय असे ४१ टँकर २७ गावे आणि १३६ वाड्यांना पाणीपुरवठा करत आहेत.

पीकपद्धतीची माहिती गावपातळीवर पोहोचवा

$
0
0
आगामी खरीप हंगामात बी-बियाणे, खते, कृषी निविष्ठा वेळेवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना पीकपध्दती विषयी माहिती देण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम राबवावी, असे आवाहन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी शुक्रवारी केले.

मनसेकडून भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर

$
0
0
पोलिस दलाच्या भरतीमध्ये शहर आणि जिल्ह्यातील तरुणांना अधिक संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लागलीच म्हणजेच १७ मे पासून शिबिरास सुरुवात होईल.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images