Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सटाणा नगराध्यक्षपदासाठी चढाओढ

$
0
0
ओबीसी महिलेसाठी आरक्षित असलेल्या सटाणा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ येत्या २५ जूनला पूर्ण होत आहे. येत्या अडीच वर्षासाठी हे पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. या पदासाठी येत्या १७ जूनला निवडणूक होत असून इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

येवला तालुक्यातही पावसाची हजेरी

$
0
0
शहर परिसरात बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. सकाळी कडक ऊन, दुपारी ढगांची गर्दी अन् सायंकाळी गार हवा तर रात्री पुन्हा उकाडा या बदलत्या वातावरणाने येवलेकर हैराण झाले होते.

लासलगाव परिसरात व्यावसायिकांचे नुकसान

$
0
0
लासलगावसह परिसरात बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर स्टेशन रोडवरील काही दुकानांचे पत्रे उडाले.

दिंडोरी तालुक्याला पावसाचा दणका

$
0
0
दिंडोरी शहरासह तालुक्यात वादळी पावसाने घरे, शेती, पॉलिहाऊस आदींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीचे अनेक पोल वादळात कोसळून मोठे नुकसान झाले असून, दिंडोरी शहरवासीयांना मंगळवारी रात्र अंधारात काढावी लागली.

जिल्ह्यात होणार ७३ लाख रोपांची लागवड

$
0
0
सरकारने १०० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून, त्यापैकी ७३ लाख रोपं एकट्या नाशिक जिल्ह्यात लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. १२ ते १९ जून या कालावधीत ही रोपं लागवडीची मोहीम राबविण्यात येणार असून, रोपांच्या संगोपनासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा सत्कार

$
0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळात चांगली सेवा देणाऱ्या चालक वाहकांचा परिवहन ‌दिनाच्या न‌िमित्ताने सत्कार करण्यात आला. महांमडळाच्या पंचवटी आगारात हा कार्यक्रम झाला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून भविष्यनिर्वाह निधी अभियान

$
0
0
सोशल मीडियाची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने या माध्यमाचा भविष्य निर्वाह निधी अधिनियम व कार्यालयाच्या कामकाजासंबंधी माहिती प्रदान करण्यासाठी उपयोग करण्याचे ठरविले आहे.

जेहान सर्कल ते नरसिंहनगर रस्त्याची चाळण

$
0
0
गंगापूररोडवरिल जेहान सर्कल ते नरसिंहनगरकडे जाणा-या रस्त्याची अक्षरक्षः चाळण झालेली आहे. मागील दहा वर्षांहून अधिक काळापासून हा रस्ता महापालिकेकडून दुर्लक्षित राहिलेला आहे. महापालिकेने आता तरी रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी रहिवाशी व वाहनचालकांनी केली आहे.

वीज कोसळून चार गायी ठार

$
0
0
वादळी वा-यांसह मान्सून पूर्व सरींनी नाशिकरोड, देवळाली कॅम्प भागात बुधवारी सायंकाळी हजेरी लावली. देवळालीत सदर बाजारात वीज कोसळून चार गायी ठार झाल्या.

लक्ष्मण जायभावेंचा गटनेतेपदाचा राजीनामा

$
0
0
नाशिक महापालिकेतील कॉँग्रेसचे गटनेते लक्ष्मण जायभावे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा पक्षाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या पदावर आता कुणाची वर्णी लागणार याबाबत नगरसेवकांसह नागरिकांनाही उत्सुकता आहे.

उद्योजकांच्या घरपट्टीबाबत फेरसर्वेक्षणाचे आदेश

$
0
0
सातपूर परिसरातील उद्योजकांना आकारलेली घरपट्टी अन्यायकारक असल्याच्या तक्रारींनंतर महापालिकेचे आयुक्त संजीवकुमार यांनी बुधवारी उद्योजकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हरकती असलेल्या दोनशे चाळीस उद्योजकांच्या जागांचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिककर अनुभवणार ‘विसा’ रॅलीचा थरार

$
0
0
वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या मोटारस्पोर्ट प्रेमींसाठी १२ ते १५ जून या कालावधीत इंडियन रॅली चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे.

संवाद म्हणजे सारस्वताचे झाड

$
0
0
गेल्या ३३ वर्षांपासून समाजाला साहित्याच्या माध्यमातून दिशा देण्याचे काम ‘संवाद’ ही संस्था करीत आहे. म्हणूनच संवाद हे सारस्वताचे झाड झाले असून, त्याची फळे नाशिककरांना चाखायला मिळत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी केले.

इको-सेन्सिटिव्ह झोनसाठी गावपातळीवर होणार पाहणी!

$
0
0
पश्चिम घाट क्षेत्रातील नाशिक, नंदुरबार, धुळ्यासह बारा जिल्ह्यांतील सुमारे २२०० गावे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी नेमलेल्या डॉ. के. कस्तुरीरंगन समितीचा अहवाल केंद्र सरकारने मान्य केला आहे.

मातेसमोर पित्याचा मुलीवर बलात्कार

$
0
0
ठार मारण्याचा धमक्या पत्नीला देत स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर पित्याने वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे गोवर्धन गाव आणि परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक तालुका पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम पित्याला अटक करण्यात आली आहे.

आयुर्वेदाचं ‘मिशन मिशिगन’

$
0
0
दहा वर्षे जीव ओतून घेतलेलं आयुर्वेदाचं शिक्षण वाया जाणार की काय असं वाटू लागलं. पैसा, कुटुंब, लाइफस्टाईल सगळं असूनही मनाला स्वस्थता नव्हती. आपल्या ज्ञानाचा वापर करुन भारताचा आयुर्वेद अमेरिकेत रुजवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनतर बीना वेसीकर यांनी मोठ्या जिद्दीनं अमेरिकेत आयुर्वेद सेंटर सुरू केलं. त्या लक्षवेधी प्रवासाबद्दल...

फोटोट्रेक!

$
0
0
डोंगरदऱ्यांमधल्या अनवट वाटा शोधायच्या, गाव सोडायचा आणि काळजाचा ठाव घेणाऱ्या उंचीवर जाऊन देखणा माहोल टिपायचा...असा ‘एरियल सर्व्हे’ करायचा तर निमुळत्या जागेवरचा पाय तसाच कॅमेऱ्यावरचा हातही अगदी स्थिर हवा... संजय अमृतकर या अवलियाने हे ‘टायमिंग’ अचूक साधलंय...

मोबाइल चोरांचा सुळसुळाट

$
0
0
शहरा‌त मोबाइल चोरून पोबारा करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. रस्त्यावरील पादचाऱ्यांकडील मोबाइल हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांचे धारीष्ठ्य वाढले असून, ते घरात घुसून मोबाइल चोरू लागले आहेत.

वृक्षसंवर्धनासाठी ‘ग्रीन गुडबाय’

$
0
0
पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या वृक्षसंवर्धनासाठी वृक्षारोपणाचा पर्याय तर अनेकजण अवलंबतात. पण परिसरातील वृक्षसंवर्धनाकडे मात्र फारसे लक्ष दिले जा‌त नाही.

मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर श‌िक्षणाची सुविधा

$
0
0
पुणे व‌िद्यापीठाशी संलग्न‌ित असणारे मॅनेजमेंट व‌िद्याशाखेतील अभ्यासक्रम नाश‌िकरोडच्या कोठारी इन्स्ट‌िट्यूटमध्ये सुरू करण्यात आले आहेत. एका पदवीसोबतच एक पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुभाही या अभ्यासक्रम रचनेत आाहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images