Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सहाही नगराध्यक्षकांना मिळाली मुदतवाढ

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेता येत्या १७ जून रोजी होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपालिका अध्यक्ष निवडीला स्थगिती देऊन सहा महिन्यांची मुदत वाढ दिली आहे. विद्यमान नगराध्यक्षांना हा बोनस मिळाल्यामुळे आंनदोत्सव साजरा होत आहे.

खरीप हंगामासाठी बळीराजा सज्ज

$
0
0
महत्वपूर्ण मृग नक्षत्राचा प्रवेश होताना बळीराजाला आता पावसाची आस लागली आहे. खते, बियाणे याची खरेदी करत येवला तालुक्यातील शेतकरी यंदाच्या खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे.

महामार्ग बसस्थानक कात टाकणार का?

$
0
0
मुंबई, पुण्यापाठोपाठ सर्वाधिक झपाट्याने चोहोबाजुंनी विकसित होणारे नाशिक शहरात मूलभूत गोष्टींची मात्र वानवा आहे. महामार्ग बसस्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणाही हवेतच विरली असल्याची दिसून येते.

कुणीही या अन् कुठेही अतिक्रमण करा

$
0
0
नाशिक शहरातील सिडको व सातपूर भागात कुणीही या अन् कुठेही अतिक्रमण करा, अशीच परिस्थिती झाली आहे. महापालिकेसह प्रशासकीय यंत्रणा व इतर विभागांना सुस्ती चढल्याने अतिक्रमणधारकांना चाप लावला जात नसल्याचे चित्र आहे.

मनरेगा कर्मचाऱ्यांचे आज आंदोलन

$
0
0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत करार तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याबद्दल आज (सोमवार) पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण केले जाणार आहे.

घर क्रमांक नव्हे, भुलभुलैय्याच!

$
0
0
शहरातील सिडको वसाहत सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सिडकोनगरीचे चक्रव्यूह म्हणजे येथील घरांचे क्रमांक. केवळ घर क्रमांकावरून घर शोधणे म्हणजे चक्रव्युहात घुसण्याचाच प्रकार आहे. सिडको प्रशासनातर्फे लांबलचक घर क्रमांक देण्यामागचे गुपित आजही कुणाला कळलेले नाही.

टीईटी गोंधळ : श‌िक्षणमंत्र्यांनी मागविला खुलासा

$
0
0
गुणवत्ताधारक श‌िक्षकांच्या न‌िवडीसाठी राज्य श‌िक्षक परिषदेकडून ड‌िसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या टीईटी (श‌िक्षक पात्रता चाचणी) परीक्षेतील गोंधळाबाबत श‌िक्षणमंत्र्यांनी खुलासा मागव‌िला आहे.

सिडको, सातपूरमध्ये पाण्याचा अपव्यय

$
0
0
सिडको व सातपूरमधील रहिवासी भागात दररोज सकाळ-संध्याकाळ पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येते. कामगार वस्तींमध्ये गृहिणी पिण्याचे पाणी रस्त्यांवर फेकत असतात. रस्त्यांवरून दररोज पाण्याचे पाटच वाहत असल्याचे दिसून येते. महापालिकेतर्फे याबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही.

दिनकर पाटलांचा अखेर भाजपात प्रवेश

$
0
0
काँग्रेसचे बंडखोर नेते व प्रभाग १७ चे माजी नगरसेवक दिनकर पाटल यांनी अखेर रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार गिरीश महाजन उपस्थित होते. हा प्रवेश सोहळा साधेपणाने झाला असला तरी पाटील समर्थक मोठ्या संख्येने हजर होते.

निधी अन् टीडीआरला बगल

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधीत इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी संध्याकाळी मलबार हिल येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत तसेच साधुग्रामच्या प्रलंबित भूसंपादनाबाबत चर्चा होणे अपेक्षित होते.

कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

$
0
0
आगामी पावसाळा आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या उर्वरित प्रमुख कामांच्या निविदाप्रक्रिया तत्काळ पूर्ण करून सिंहस्थ कामांना गती द्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

सिंहस्थासाठी पैसा आला, पण यंत्रणा काही हलेना

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी नसल्याची ओरड होत असली तरी प्रत्यक्षात ज्या विभागांना निधी उपलब्ध झाला आहे, त्यांचीही कामे कागदावरच असल्याची बाब समोर आली आहे.

व्यावसायिकाचा स्वत:च्याच अपहरणाचा बनाव

$
0
0
व्यावसायासाठी घेतलेले १५ लाख रुपये जवळच्या नातलगाला परत करण्यासाठी तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला. मात्र शहरातील चाणाक्ष पोलिस अधिकारी आणि सायबर सेलने अवघ्या दोनच दिवसांत हा बनाव उघडकीस आणून त्या तरुणाला दिल्लीहून नाशिकमध्ये आणले.

पोलिस भरतीसाठी मिळणार अनुपस्थितांनाही संधी

$
0
0
पोलिस भरतीसाठी दिलेल्या तारखेला अनुपस्थित राहाणाऱ्या उमेद्वारांनाही संधी दिली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एकदा गेलेली संधी पुन्हा चालून येत नाही, असे म्हणतात. पोलिस दलामध्ये प्रवेश करण्यास अनेक तरुण इच्छुक असतात.

हवाई दल प्रमुखांकडून सुखोईची पाहणी

$
0
0
देशाचे हवाई दल प्रमुख अरुप रहा यांनी ओझर येथील हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) होत असलेल्या सुखोई या विमानाच्या निर्मिती शनिवारी पाहणी केली. रहा यांच्या हस्ते एचएएलच्या अत्याधुनिक वेअर हाऊसचेही उद्‌घाटन करण्यात आले आहे.

‘एलईडी’साठी ६ महिन्यांची प्रतीक्षा

$
0
0
मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केल्यानंतर जुन्या पथदिपांच्या ऐवजी एलईडी लाईटस बसवण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शहरातील सुमारे ६९ हजार पथदिपांच्या फि‌टिंग्ज बदलण्यात येणार आहे. मात्र, यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

दाखल्यांसाठी सेतूंमध्ये गर्दी

$
0
0
शैक्षणिक कारणांसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी शहरातील पाचही सेतूंमध्ये मोठी गर्दी सुरु झाली असून, नियोजित वेळेत दाखले देण्यासाठी अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

वाघेरा घाटात काजव्यांची शाळा

$
0
0
काजवा... निसर्गातील एक अदभूत कीटक. लहानपणी आपण लाइटचा किडा म्हणत त्याच्यामागे धावायचो तोच काजवा हौशी फोटोग्राफर्ससाठी एक हटके विषय होऊ शकतो हे फोटो सर्कल या हौशी फोटोग्राफर्स असलेल्या संस्थेने दाखवून दिले.

पाच महिन्यांनंतरही झूम बेदखलच

$
0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर नक्की होणार अशी दीर्घ अपेक्षा बाळगल्यानंतरही आणि तब्बल पाच महिने उलटूनही जिल्हा उद्योग मित्रची बैठक (झूम) या महिन्यातही होण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांसह औद्योगिक संघटनांच्या अनास्थेमुळे जिल्ह्यातील औद्योगिक समस्या ‘जैसे थे’च आहेत.

ओझरजवळ विचित्र अपघातात ३ ठार

$
0
0
मुंबई-आग्रा महामार्गावर ओझरजवळील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर रविवारी सकाळी दहा वाजता झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात तीन जण ठार झाले, तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती राजन जोधराज कोचर यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images