Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आदिवासींच्या हक्कांवर गदा आल्यास तीव्र आंदोलन

$
0
0
आमचा कुणाच्या आरक्षणाला विरोध नाही. परंतु, आमच्या हक्कांवर गदा आणल्यास राज्यातील नव्वद लाख आदिवासी शांत बसणार नाहीत, असा इशारा माजी अदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी दिला.

शिक्षा सूचीनुसारच होणार कारवाई

$
0
0
राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर कॉपी करताना निदर्शनास आल्यास त्यावर शिक्षा सूचीनुसार कारवाई करण्यात येते, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी शनिवारी विधानपरिषदेत दिली.

उद्योगांना अखंडीत वीज मिळेल

$
0
0
वादळ आणि पावसामुळे वीज वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी हे काम युद्धपातळीवर सुरू असून, उद्योगांना अखंडीत वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही महावितरणचे चीफ इंजिनीअर के. व्ही. अजनाळकर यांनी दिली. निमा हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत ते उद्योजकांशी बोलत होते.

रेल्वेची कामे लवकर पूर्ण करा

$
0
0
आगामी सिंहस्थात संपूर्ण भारतातून येणाऱ्या नागरिकांना सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी रविवारी सलग दुसऱ्या दिवशी नाशिकरोड रेल्वे स्थानकास भेट दिली. डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर महेशकुमार यांची भेट घेऊन त्यांच्यासमावेत गोडसे यांनी चर्चा केली.

एका दिवसात ‌‌मिळणार 'दाखला'

$
0
0
विद्याथी व पालकांना कोणताही दाखल काढताना अडचणी येऊ नसेत म्हणून येवला व नांदगाव तालुक्यात 'राजस्व अभियानांतर्गत' तलाठी व तालुका अशा दोन स्तरांवर शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना दिल्या आहेत.

‘सेतू’चे मोबाईल अॅप आजपासून

$
0
0
विविध प्रकारच्या शैक्षणिक दाखल्यांसाठी सेतू कार्यालयात वारंवार होणाऱ्या चकरांना आता पूर्णविराम मिळणार आहे. नाशिक सेतूचे मोबाईल अॅप सोमवारपासून (१६ जून) सेवेत येणार आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

‘SBI’चा संडे बँकिंगचा फंडा

$
0
0
राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असलेली मोठी रांग नोकरी व्यवसायात व्यग्र असणाऱ्यांना अनेकदा त्रासदायक वाटते. बऱ्याचदा वेळेअभावी ग्राहक आजचे काम उद्यावर ढकलतात. ग्राहकांच्या याच समस्येवर उत्तर शोधत स्टेट बँक ऑफ इंडियाने संडे बँकिंगचा पर्याय स्वीकारला असून, शनिवार आणि रविवार सुरू राहणाऱ्या चार शाखा शहरात सुरू केल्या आहेत. यामुळे नोकरदारांना रांगेच्या कटकटीशिवाय बँक व्यवहार पार पाडणे शक्य होणार आहे.

नाशिकमध्ये कांदा लिलाव बंद

$
0
0
खरिप हंगामाच्या तोंडावर कांद्याचे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. लासलगावसह नाशिकच्या चौदा बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद पडला आहे.

मी आणि मीच!

$
0
0
व्यासपीठ कुठलेही असो काही जणांना स्वतःबद्दल बोलण्याची खुप हौस असते. मी काय केले, माझे कसे होते, मी काय सांगितले यासह विविध प्रकारच्या गोष्टी ते अगदी सहजच सांगतात. त्यातही वेळ, ठिकाण आणि निमित्त याचे कुठलेही भान ते बाळगत नाहीत.

खणाणली घंटा अन् गजबजली मैदाने !

$
0
0
रंगबेरंगी अक्षरात फळ्यावर ल‌िह‌‌ीलेला स्वागताचा मजकूर, रेखाटलेली रांगोळी अन् मुलांचे उत्साहात करण्यात आलेले स्वागत, अशा उल्हास‌ित वातावरणात शाळेचा पह‌िला द‌िवस सोमवारी पार पडला. दोन मह‌िन्यांपासून सुन्या सुन्या असलेल्या वर्गखोल्या व‌िद्यार्थ्यांच्या क‌िलबीलाटाने बहरुन गेल्या होत्या.

सातपूरला रस्ते बनले, साइडपट्ट्यांचे काय?

$
0
0
सातपूरभागात महापालिकेतर्फे अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटिकीकरण करण्यात आले आहे. मात्र, साइडपट्ट्या मात्र तशाच सोडून देण्यात आल्या आहेत. मोजक्या ठिकाणीच पेव्हरब्लॉकची कामे करण्यात आली आहेत. उर्वरित भागातील साइडपट्ट्यांची कामे कधी करणार, असा सवाल नागरिक करत आहेत.

नाशिक-पुणे रोड बनला मृत्यूचा सापळा

$
0
0
सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट केलेल्या कामांमुळे नाशिक-पुणे रोडवर रोज अपघात होत असून, हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. अनेक ठिकाणी मशिनने ओरखडलेल्या रस्त्यावर अपघात वाढले आहेत.

बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

$
0
0
शासनाने माथाडी कामगारांना वाढीव वेतन देण्याबाबत दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी व्यापा-यांनी जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमध्ये कांदा लिलावाचे कामकाज आज बंद ठेवण्यात आले.

शेतक-यांच्या कुटुंबियांना मुंबईतील तरुणांची मदत

$
0
0
बागलाण तालुक्यात अभूतपूर्व गारपिटीमुळे हाहाकार उडाला होता. त्याच नैराश्यातून तालुक्यातील सात शेतक-यांनी आत्महत्या केली. याबाबत प्रसिध्दी माध्यमांतून माहिती मिळाल्यानंतर सामाजिक जाणिवेतून मुंबई येथील युवकांनी तालुक्यातील दोन आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुंटुंबियांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

ताहराबादमध्ये बालिकेवर बलात्कार

$
0
0
बागलाण तालुक्यातील ताहराबाद येथील बालवयातच मातृछत्र हरपलेल्या आठ वर्षीय बालिकेवर हत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्कार करणा-या आरोपीला तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

`व्ही. एन. नाईक`ची निवडणूक बिनविरोध व्हावी

$
0
0
जिल्ह्यातील वंजारी समाजामध्ये राजकीय, सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या नवीन संचालक मंडळ निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पण समाजाचे दैवत असलेले केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.

मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेची निदर्शने

$
0
0
विधानसभेची निवडणूक सुरू होण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी छावा मराठा संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महापालिकेला जमीन देण्याबाबत फेरविचार व्हावा

$
0
0
चणकापूर धरणाचे पाणी हे पूर्णत: शेतीसाठीच मिळणे आवश्यक असताना तळवाडे साठवण तलावाची क्षमता व उंची वाढविण्यासाठी शासनाने मालेगाव महानगरपालिकेला शेती महामंडळाची शंभर एकर जमीन देण्याचा घेतलेला निर्णय शेतक-यांवर अन्याय करणारा आहे.

राष्ट्रवादीची मागणी तथ्यहीन

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसकडून येत्या विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळीपेक्षा जास्त जागांची मागणी होत आहे. रविवारच्या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर त्यांनी १४० ते १४५ जागा मागितल्याचे वृत्त आहे. यावर, राष्ट्रवादीच्या मागणीला काहीही आधार नसल्याचे प्रत्युत्तर काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

‘एलबीटी’वर बॅन

$
0
0
महाराष्ट्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) विक्रीकर विभागाकडून वसूल करण्याचा निर्णय घेतल्याने व्यापारी संतप्त झाले असून शहरातल्या व्यापाऱ्यांनी तो न भरण्याचा निर्णय घेतला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images