Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मोटरसायकल अपघातात दोघे ठार

$
0
0
घोटी-भंडारदरा मार्गावर पिंपळगाव मोर शिवारात रविवार रात्री ट्रॅक्टर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून चालकाविरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

अधिकारी सक्तीच्या रजेवर !

$
0
0
चुकीचे पंचनामे करणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे लेखी आदेश निघाल्यानंतर येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या मुंजवाड, खमताणे व परिसरातील शेतकऱ्यांचे उपोषण आंदोलन चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले.

मोहमुख येथे तरुणाचा खून

$
0
0
कळवण तालुक्यातील मोहमुख या गावी एका अज्ञात व्यक्तिने कृष्णा ढवळू पवार (वय २५) या तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती अभोणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली.

सभापतीविरोधात अविश्वास ठराव

$
0
0
राजकीयदृष्ट्या संवदेनशील समजल्या जाणाऱ्या इगतपुरी पंचायत समितीच्या सभापती ठकूबाई सावंत व उपसभापती रमेश जाधव यांच्याविरोधात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पीक नियोजन कोलमडले

$
0
0
पावसाचे आगमन लांबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पीककर्ज काढून जमिनीची मशागत व बियाणे खरेदी करून बसलेला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. खरीप हंगामासाठी रोहिणी, मृग व आद्र्रा ही तिन्ही नक्षत्रे योग्य असतात.

इगतपुरीत महादेवाला साकडे

$
0
0
पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने पेरण्या खोळबंल्या आहेत. पाऊस पडावा म्हणून येथील तालुक्यातील पिंपरी सदो गावातील महिलांनी महादेवाला साकडे घातले. महादेव मंदिरात सकाळी महादेवाला महाअभिषेक करून या पाण्यात ठेवण्यात आले आहे.

आदिवासी पुरस्कारांच्या मानधनात वाढ

$
0
0
आदिवासींसाठी काम करणाऱ्या सेवक तसेच विविध संस्थांना आदिवासी विकास विभागाकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात जवळपास दुपटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पवार यांच्या हस्ते आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

राज्यावर दुष्काळाचे ‌भीषण सावट

$
0
0
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. राज्यातील परिस्थ‌ितीचा आढावा घेण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. पुढील टप्प्यात या परिस्थ‌ितीवर उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अज‌ित पवार यांनी द‌िले.

कोतवालांचा लॉँगमार्च

$
0
0
राज्यातील कोतवालांना विनाविंलंब चतुर्थश्रेणी लागू करावी, रिक्त जागांवर सामावून घ्यावे, अशा स्वरुपाच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेतर्फे नाशिकरोड ते मुंबई असा लॉँगमार्च काढण्यात येणार आहे.

बसथांब्यांना शेड मिळेल का ?

$
0
0
औद्योगिक वसाहतीतील बसथांब्यांवर निवाराशेड नसल्याने कामगारांना गैरसोय सहन करावी लागत आहे. गेल्याने वर्षांपासून बसथांब्यांची दुरवस्था असूनही महापालिकेने बस थांब्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

शहरात अपघातांत तिघे ठार

$
0
0
शहरात पंचवटी, आडगाव आणि सिडको परिसरांत दोन दिवसांत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन तरुणांसह एका महिलेचा मृत्यू झाला. दिंडोरी रोड येथून पियाराम धनाजी देवासी (१९, रा. निफाड) हा मोटरसायकलवरून चालला होता.

इंदिरानगरमधील बिबट्या जेरबंद

$
0
0
रविवारी सकाळी नागरिकांनी दर्शन देऊन बेपत्ता झालेल्या बिबट्याला सोमवारी पहाटेच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. रविवारी दिवसभर या घटनेमुळे इंदिरानगरमध्ये खळबळ उडली होती.

स्थायी निवडणुकीमुळे मनसे-भाजप युतीला छेद

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीत दोन वर्षांपूर्वी झालेली युती तुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपकडून तसे संकेत मिळत असून, सेना आणि भाजपची जवळीक वाढत आहे.

मतदार नोंदणीसाठी नागरिकांची झुंबड

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी अंतिम दिवस असलेल्या सोमवारी मतदारांची मोठी झुंबड उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयात लांबच्या लांब रांगा मतदारांनी लावल्या होत्या.

शहराचे ह‌ित बघा !

$
0
0
कुंभमेळ्यासाठी शहरातील प्रस्ताव‌ित व‌िकासकामे ही शहराच्या द‌िर्घकालीन व‌िकासासाठी फायदेशीर ठरणार आहेत. हे लक्षात घेऊन महापाल‌िकेने संकुच‌ित व‌िचार सोडावेत अन् शहराचे ह‌ित बघावे अशा कानप‌िचक्या देत उपमुख्यमंत्र्यांनी महापाल‌िकेचे कान फुंकले.

तिची झुंज परिस्थितीशी

$
0
0
ती वाट पाहत असायची ते रात्रीचे अकरा कधी वाजतात याची. हातगाडीवर नारळ रचताना, दाबेलीसाठी मसाला तयार करताना तिच्या डोक्यात मात्र सतत विचार असायचा तो हातात पुस्तक कधी धरेन याचा. रात्रीचे अकरा वाजले, की सुरू व्हायचं तिचं ध्यासपर्व.

इंजिनीअर व्हायचंय पण...!

$
0
0
‘हजारो ख्वाईशे ऐसी निकली की हर ख्वाईश पे दम निकले, निकले थे मेरे अरमां, अरमां फिर भी कम निकले’ हा शेर विशालसारख्यांना समोर ठेऊनच लिहिला गेला असावा.नाशिक-पुणे महामार्गावरील ताजनपुरे मळ्यात नऊ फुटाची पत्र्याची खोली हेच विशाल चव्हाणचे विश्व. दहावीत ९२. ४० टक्के गुण मिळालेल्या विशालला आयआयटी पवईत जाऊन इंजिनिअर व्हायचंय, कलेक्टरही व्हायचंय, पॉलिटेक्निकलाही जायचंय.

पोटनिवडणुकीत युतीची सरशी

$
0
0
शहरात प्रभाग १७ (अ) व प्रभाग ६१ (अ)मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप-सेना युतीची सरशी झाली आहे. प्रभाग १७ मधून भाजपचे दिनकर पाटील, तर ६१ मधून शिवसेनेचे केशव पोरजे विजयी झाले आहेत. मालेगावमध्ये प्रभाग २३ मधील पोटनिवडणुकीत तिसरा महाजचे हाजी मोहमद इब्राहीम ४२१ मतांनी विजयी झाले.

भाजपला मनसे वरचढ

$
0
0
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्ताधारी गटातील भारतीय जनता पार्टीला कात्रजचा घाट दाखवत विजयश्री खेचून आणला.अपक्ष नगरसेवक पवन पवार यांचे ‘बहुमूल्य’ मत मनसेच्या पारड्यात पडल्याने अवघ्या एका मताने शहराध्यक्ष राहुल ढिकले विजयी झाले.

पिंपळगावला कांदा @ २४५८

$
0
0
निर्यातमूल्य वाढवूनही कांद्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत. गेल्या आठ दिवसात कांद्याचे दर किमान आठशे रुपयांनी वाढले आहेत. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याला सर्वाधिक २४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. आगामी दिवसात कांदा आणखी कडाडण्याची चिन्हे आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images