Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सिंहस्थाबाबत दिशाभूल करू नये

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याचा उल्लेख हा त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा असा झाला पाहिजे. तसेच, २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणारच आहे, असे तपोनिधी निरंजनी आखाड्याचे राष्ट्रीय सचिव १०८ ​श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज यांनी ठामपणे जाहीर केले.

गिरणा काठावर सतर्कतेचा इशारा

$
0
0
ठेंगोडा, पुनद, चणकापूर प्रकल्पातून गिरणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गिरणा नदीवरील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन मालेगावचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी संदीप पाटील यांनी केले आहे.

घोटी परिसर जलमय

$
0
0
मंगळवारी रात्रभर आभाळ कोसळल्यागत पावसामुळे घोटी शहर परिसर जलमय झाल्याचे जाणवत होते. मायाबाजार, विजयराज मार्केट, जुने भाजीमार्केट या भागात पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने जवळपास ६० ते ७० दुकांनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मांजरपाडा प्रकल्पातून पाण्याची प्रतीक्षाच

$
0
0
निधीअभावी मांजरपाडा प्रकल्पाचे काम दोन वर्षापासून बंद असल्याने येत्या दोन तीन वर्षात तिथून पाण्याचा थेंब जनतेला कसा मिळणार, असा सवाल नांदगाव तालुका जलहक्क संग्राम परिषद व मनमाड बचाव कृती समितीने केला आहे.

हरसूलमध्ये पावसाचा जोर कायम

$
0
0
उशिरा पण जोरदार मुसंडी मारत जुलै अखेर वरूणराजा चांगलाच प्रसन्न झाल्याने हरसूलसह परिसरातील बळीराजा सुखावला आहे. रविवार दुपारपासून शिरू झालेल्या पावसाने बुधवार सायंकाळपर्यंत ५७८ मिमीची नोंद केली. एकाच दिवसात ९४.० मिमी पावसाची नोंद झाली.

मनमाडला ये रे ये रे पावसा

$
0
0
राज्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू असताना आणि अक्षरशः नको नको रे पावसा अशी त्याला विनवणी करण्याची वेळ आलेली असताना मनमाड शहरावर मात्र अपमर्जी दाखविण्याची परंपरा जपत पावसाने पुन्हा मनमाडकरांवर ये रे ये रे पावसा म्हणण्याची वेळ आणली आहे.

सटाणा तालुक्यात बळीराजा सुखावला

$
0
0
सटाणा शहरासह तालुक्यात वरूणराजाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. शहरात रात्रीपासून संततधार झालेल्या पावसाची ४३.२ मि.मी पावासाची नोंद झाली.

सायखेडा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता

$
0
0
आठवड्याभरापासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी आणि दारणा नदीला पूर आला आहे. यामुळे चांदोरी-सायखेडा या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाला धोका निर्माण झाला आहे.

इगतपुरीजवळ दरड कोसळली

$
0
0
नाशिक-मुंबई दरम्यान आज, बुधवारी सकाळी कसारा घाटात तसेच इगतपुरीजवळ दरड कोसळल्याने महामार्ग व रेल्वेसेवा ठप्प झाली. मुसळधार पावसात, ऐन धावपळीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले.

घर अन् दुकानांमध्ये पाणीच पाणी

$
0
0
पावसाचा जोर सुरूच असून तालुक्यातील एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तसेच गोदावरी नदीला पूर आला असून त्र्यंबकेश्वर शहरात घर व दुकानांमध्ये पाणी घुसले आहे.

धनगर समाजबांधवांचा येवला तहसीलवर मोर्चा

$
0
0
धनगर राजा भडकला, कपाळी लावा भंडारा, जागा हो धनगरा आदी घोषणा देत बुधवारी दुपारी नाशिक जिल्हा धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समितीच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

ब्राह्मण समाजाचे मागण्यांचे निवेदन

$
0
0
सटाणा येथील ब्राह्मण समाजाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे बागलाणचे उपविभागीय अधिकारी संजय बागडे व तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना निवदेन देण्यात आले.

ना‌शिकची वाटचाल परिपूर्ण ‘एज्युकेशन हब’कडे

$
0
0
विविध क्षेत्रांत झपाट्याने विकसित होत असलेल्या नाशिकने ‘एज्युकेशन हब’कडे वेगाने वाटचाल सुरू केली आहे. दरवर्षी या क्षेत्रात नवनवीन सुधारणा होत मुंबई-पुण्यापाठोपाठ हे महानगर शिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे.

भावनांनी ओथंबलेले ‘रिमझिम रिमझिम’

$
0
0
नवीनच लग्न झालेले उभयता, अजून एकमेकांना निटसं समजूनही घेतलेलं नाही अन् अशातच त्यांच्या जीवनात एक वादळ येतं. त्या वादळाला नायिका कसं सामोरं जाते याचं यथार्थ चित्रण करणारं नाटक ‘रिमझिम रिमझिम’ नुकतंच कुसुमाग्रज स्मारकात सादर करण्यात आलं.

‘सारडा समान संधी’ पुरस्काराची सांगता

$
0
0
नाशिकमधील ‘श्रीरंग सारडा चॅरिटेबल फाऊंडेशन’तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘सारड समान संधी पुरस्कारा’ची सांगता करण्यात आल्याची घोषणा फाऊंडेशनचे विश्वस्त श्रीरंग सारडा यांनी केली.

आज रंगणार रंग मेंदीचा

$
0
0
महाराष्ट्र टाइम्स व गोविंद दंडे अॅण्ड सन्स प्रस्तुत ‘रंग मेंदीचा’ स्पर्धा आज दुपारी तीन ते चार यावेळेत कालिका मंदिराशेजारील हॉटेल रामा हेरिटेज येथे होणार आहे.

वचपा काढण्यासाठी चेन स्नॅचिंगचा बनाव

$
0
0
केवळ कौटुंबिक भांडणाचा वचपा काढण्यासाठी महिला कायद्याचा दुरूपयोग करीत असल्याचे प्रकार शहरात उघडक‌ीस येऊ लागले आहेत. रामवाडीत दोन दिवसांपूर्वी घडलेली कथित चैन स्नॅचिंगची घटना हा तक्रारदार महिलेने रचलेला बनाव होता, अशी माहिती पंचवटी पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आली आहे.

सिडको, सातपूरला घरांमध्ये पाणी

$
0
0
नाशिक शहरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. त्र्यंबकेश्वर रस्ता सिबल हॉटेल ते पिंपळगाव बहुलापर्यंत दोन्ही बाजूंनी खड्डेमय झाला आहे.

नद्यांना उधाण, रेल्वेसेवा विस्कळीत

$
0
0
मुसळधार पावसामुळे जेलरोडजवळ गोदावरी तसेच देवळालीगावजवळ वालदेवी या नद्यांना मोठा पूर आला. पाटबंधारे खात्याने दारणा धरणातून ५४ हजार क्युसेक पाणी सोडल्याने दारणासह या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

‘गोविंद डाइन इन’चे जल्लोषात शुभारंभ

$
0
0
शुध्द शाकाहारी हॉटेलची संकल्पना राबवणारे गोविंद डाइन इन या हॉटेलचा शुभारंभ सातपूर आयटीआय चौकातील नाईस संकुलमध्ये मोठ्या दिमाखात झाला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images