Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ग्रामीण भागात फिरती प्रयोगशाळा

$
0
0
ग्रामीण भागातील शाळांमध्ये प्रयोगशाळा उपलब्ध होण्याच्या हेतूने क्रॉम्पटन ग्रिव्सने कंपनीने फिरत्या प्रयोगशाळा निर्माण केली आहे. कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्या हस्ते या व्हॅनचे उदघाटन करण्यात आले.

कोणतेही सत्कार्य ही देशसेवाच

$
0
0
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेले कोणतेही सत्कार्य ही देशसेवाच असते, असे प्रतिपादन साध्वी आराधनाजी यांनी शुक्रवारी केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कर्मचाऱ्यांना वाढीव कामाचा मोबदला

$
0
0
घरपट्टी तसेच पाणीपट्टी विभागात कार्यरत असलेल्या सुमारे १०० ते १५० कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे संबंधीत कर्मचाऱ्यांना किमान एका महिन्याचे वाढीव वेतन मिळण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता.

स्वार्थासाठी पक्ष सोडणाऱ्यांना धडा शिकवा

$
0
0
विधानसभा निवडणुकांच्या तोडांवर राष्ट्रवादीची आणि सत्तेची महत्वाची पदे भुषवून व लाभ पदरात पाडून घेणारे काही जण राजकीय स्वार्थासाठी पक्ष सोडून जात आहेत. राजकीय स्वार्थ साधणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवून त्यांना, त्यांची जागा दाखवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जेष्ठ नागरिक सेलचे प्रभारी राजपाल सिंग यांनी केले.

जॉगिंग ट्रॅकवरील पथदीप बंद

$
0
0
मुक्तीधाम मागील महापालिकेच्या शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर जॉगिंग ट्रॅक उभारलेला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यावरील पथदीप बंद असल्याने नागरिकांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे. मैदानातील स्वच्छतागृहाची स्वच्छता होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.

भुजबळांकडून विकासकामांचा दाखला

$
0
0
दहा वर्षांपूर्वी येवला मतदारसंघाचे चित्र काय काय होत अन् आज काय आहे हे जरा बघा. कधीही न होणारी कामे करतानाच येथील जनतेच्या अपेक्षांपेक्षा दामदुपटीने कामे आपण केली. येवल्यात झालेली कामे इतर दुसरा कुणीही आमदार, नामदार आणला असता तर झाली नसती. अशी येवला तालुक्यातील जनतेला साद घालतानाच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एकप्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंगच फुकले.

परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हा

$
0
0
नैसर्गिक साधनसंपत्तीचा खरा मालक असतानाही भ्रष्ट राजवटीमुळे आदिवासी बांधव अद्यापही विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर आहे. आदिवासी भागात कुपोषण, आरोग्य, शिक्षणाचा प्रश्न बिकट आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला खाली खेचून परिवर्तानाच्या लढाईसाठी आदिवासी बांधवांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले.

व्यापाऱ्यांना नो‌टिसा सुरूच

$
0
0
जकाती पाठोपाठ सरकारने एस्कॉर्ट वसुली देखील बंद करण्याचा निर्णय घेतल्याने १८ एस्कॉर्ट नाक्यावरील ६३ कर्मचारी इतर विभागात वर्ग करण्यात आले आहेत. एलबीटी की जकात अशा फंद्यात पडण्यापेक्षा प्रशासनाने आपले काम सुरू ठेवले असून विवरणपत्र सादर न करणाऱ्या हजारो व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविण्याचे काम सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उद्धव ठाकरे बुधवारी घोटीत

$
0
0
उशिरा आलेला पाऊस व बऱ्याच ठिकाणी पेरण्याही झालेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तीन हजार आदिवासी बांधवांना मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. बुधवारी (दि २०) घोटी येथे हा कार्यक्रम होईल.

जकातीपेक्षा एलबीटी परवडली

$
0
0
राज्य सरकारने एलबीटी किंवा जकातीचा निर्णय महापालिकांवर सोपविल्यानंतर नाशिकमधील व्यापारी व उद्योजकांनी एकत्र येत जकातीला तीव्र विरोध करत एलबीटी भरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गुडस सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) लागू झाल्यानंतर एलबीटी रद्द करण्याची एकमुखी मागणीही यावेळी करण्यात आली.

विदेशी पर्यटकाचे पाकीट मारले

$
0
0
ठक्कर बसस्थानक येथे विदेशी पर्यटकाचे पाकीट मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. आध्रीया विडेन्ड (२४, रा. एम स्वेसबर्ग, मुरहटर्ड डिस्नेलॅन्ड, जर्मनी) यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

महापौरपदासाठी ओबीसी आरक्षण

$
0
0
महापौरपदासाठी इतर मागस वर्गाचे (ओबीसी) आरक्षण निघाल्याने इच्छुकांच्या आकांक्षांना धुमारे फुटले आहेत. विद्यमान महापौर अॅड. यतीन वाघ यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत असून, याच महिन्यात महापौरपदासाठी निवडणूक पार पडणार आहे.

आघाडी, मनसेपुढे महायुतीचे जबर आव्हान

$
0
0
सर्वच पक्षांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवून प्रस्थापित करणारा अन् प्रसंगोपात विस्थापित करण्यासही तेवढ्याच हिरिरीने पुढाकार घेणारा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख सांगता येईल.

सरपंचांच्या वक्तव्यावरून नागडे येथे वादंग

$
0
0
तालुक्यातील नागडे येथील ग्रामसभेत सरपंचांच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाले. सरपंचांनी फेर ग्रामसभा घेवून जनतेची माफी मागावी, अन्यथा ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.

सटाण्यात चिमुकलीसाठी माणुसकीही झाली जागी

$
0
0
वय चार वर्षे. या वयातच गौरीला ब्रेनट्यूमर झाला. घरी आठरा विश्व दारिद्र्य. पैशांअभावी गौरील नाशिक येथून उपचार अर्धवट सोडून घरी आणण्यात आले. ही बातमी शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी पुढाकार घेऊन या चिमुकलीची शस्त्रक्रिया केली.

‘जनसंपर्क कार्यालय ठरणार आधार’

$
0
0
पिंपळगाव बसवंत येथे कार्यान्वित झालेले मनसेचे जनसंपर्क कार्यालय निश्चितच सामान्य जनतेला आधार देणारे असेल. या कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास मनसेचे आमदार वसंत गिते यांनी व्यक्त केला.

अभोण्यातील मुलांच्या वसतिगृहाची दुरवस्था

$
0
0
कळवण आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत अभोणा येथील शासकीय मुलांचे वसतिगृह की गुरांचा कोंडवाडा असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. निकृष्ट आहार, दुर्गंधी, घाण कचरा शौचालय नसल्यामुळे मुलांना थेट उघड्यावर बसण्याची वेळ आली आहे.

डाळिंब रस्त्यावर फेकण्याची नामुष्की

$
0
0
तेल्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव, घटलेले दर, यामुळे तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना डाळिंब बागा उद्धवस्त करण्याबरोबच डाळिंब रस्त्यावर फेकण्याची नामुष्की ओढवली आहे. तेल्या रोगावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी कृषी विभागाला अद्याप पूर्णपणे यश आलेले नसल्याने डाळिंब उत्पादक हवालदिल झाला आहे.

येवल्याच्या 'ट्रॅफिक पार्क' मधून मिळणार प्रशिक्षण

$
0
0
येवला शहरापासून अवघ्या दीड किलोमीटरवर असलेल्या अंगणगाव येथील बोटिंग क्लब जवळील साकारलेला 'ट्रॅफिक' पार्क आता जगप्रसिध्द होंडा मोटारसायकल अन् इंडिया लिमिटेड कंपनीने व्यवस्थापनासाठी हाती घेतला आहे. होंडाने चालविण्यास घेतलेला हा पार्क देशातील सहावा तर राज्यातील पहिलाच पार्क ठरला आहे.

भुजबळांचे गोविंदा लागले पांगायला!

$
0
0
घर फिरले की, त्याचे वासेही फिरतात असे म्हटले जाते. सध्या नाशिकमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ त्याचाच अनुभव घेत आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images