Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महापौरपदासाठी पक्षांतर्गत रस्सीखेच

$
0
0
महापौरपदासाठी निघालेल्या ओबीसी आरक्षणामुळे प्रत्येक पक्षात प्रबळ दावेदार तयार झाले आहेत. बहुमत कसे मिळवायाचे या विवंचनेत असलेल्या पदाधिकाऱ्यांना सुरुवातीस पक्षांतर्गत होणारी रस्सीखेच कशी थांबवावी याचा विचार प्राधन्याने करावा लागणार आहे.

कमळ ‘चालणार’ की घड्याळ ‘पळणार’?

$
0
0
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेला बागलाण विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी इंदिरा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत दुही व आपआपसांतील हेवेदावे, गटबाजी यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसला पाणी सोडावे लागले.

झुणका भाकर केंद्रात जमा होतोय कचरा

$
0
0
राज्यात युतीची सत्ता असताना गरीबांसाठी झुणका भाकर ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली. त्यासाठी राज्यभरात झुणका-भाकर केंद्र उघडण्यात आली. उपनगरला आजही एक केंद्र जोरात सुरू आहे. मात्र, त्यात झुणका भाकर नाही तर केरकचरा दिसून येतोय.

चिखल तुडवित जावे लागते घरापर्यंत

$
0
0
मखमलाबाद रोडवरील घाडगे मळा ते आरटीओचा परिसर विविध समस्यांनी ग्रासला असून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. रस्ता नसल्याने संपूर्ण परिसरात चिखल पसरला आहे.

नगरसेवकांमध्ये रंगली श्रेयवादाची लढाई

$
0
0
सातपूर कॉलनी भागात विजेच्या तारांच्या जाळ्यामुळे अनेक अपघात होतात. त्यासाठी नगरसेविका उषा शेळके व नगरसेवक सलिम शेख यांच्या पुढाकाराने विजेच्या तारा भूमिगत मार्गाने टाकल्या जाणार आहेत.

घंटागाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घंटागाडी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत वर्ग करण्यात यावे, या मागणीसाठी नाशिक महापालिका श्रमिक संघाच्या वतीने शनिवारपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.घंटागाडी कर्मचाऱ्यांना सेवेत वर्ग करण्याचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

भालेकर हायस्कूल बचाओ समितीचे आंदोलन मागे

$
0
0
कालमर्यादेत मागण्या पूर्ण करण्याच्या महापालिकेच्या आश्वासनानंतर बी. डी. भालेकर हायस्कूल बचाओ समितीचे आंदोलन मागे घेतले आहे. इमारतीची साफसफाई, रंगरंगोटी, सुरक्षाव्यवस्था, संगणक, विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न व शिक्षकांच्या नेमणुका या सर्व मागण्या नाशिक महापालिकच्या उपआयुक्तांनी लेखी पत्राद्वारे मान्य केल्याने समितीने आपले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे.

सोने पॉलिशच्या बहाण्याने दोघींची फसवणूक

$
0
0
दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून महिलांना गंडा घालणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. शहरात एकाच दिवसात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या असून त्याद्वारे सुमारे एक लाखाचे दागिने लंपास करण्यात आले.

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोघांना अटक

$
0
0
घंटागाडी चालक कैलास विश्वनाथ मरकड (४०, रा. नांदुरगाव) याच्या आत्महत्ये प्रकरणी आडगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रोहित कमलाकर भोये (रा. जुने नाशिक) आणि अरूण रामचंद्र क्षीरसागर (रा. गणेश चौक, क्रांतीनगर) अशी त्या दोघांची नावे आहेत.

ज्यादा घरपट्टीप्रकरणी मिळकतींची फेरमोजणी

$
0
0
वाढीव बांधकामे केल्याचा ठपका ठेवत ज्यादा घरपट्टी लागू केलेल्या २४० तक्रारदारांच्या मिळकतींची फेरमोजणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच, बांधकाम पूर्णत्वाचे दाखले सादर करणाऱ्या मिळकतधारकांवरील दंडात्मक कारवाई देखील मागे घेण्यात येणार आहे.

बागलाणला दुष्काळी जाहीर करा

$
0
0
राज्य शासनाने नुकत्याच १२३ दुष्काळी तालुके घोषित केले असून यात बागलाणचा समावेश नाही. यामुळे बागलाण तालुक्यावर अन्याय झाला असून कोणत्याही परिस्थितीत बागलाण तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात यावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री व पालकमंत्री यांना लवकरच शिष्टमंडळाद्वारे भेट घेवून साकडे घालण्यात येणार आहे. ही माहिती बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी दिली.

विकास हाच धर्म अन् जात

$
0
0
दोन महिन्यांपूर्वी मोदी नावाचं वादळ आलं. त्याचा फटका सर्वांनाच बसताना तो आम्हालाही बसला. मी कधीच मराठा समाज आरक्षणाच्या विरोधात नव्हतो. मात्र, लोकसभा निवडणुकीत माझ्याबाबत विरोधी म्हणून अपप्रचार केला गेला.

आश्रमशाळा, कारागृहालाही ‘आधार’

$
0
0
यूपीए सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या आधार नोंदणीचा विस्तार जिल्ह्यातही होणार असून आदिवासी आश्रमशाळा आणि नाशिकरोड येथील कारागृहातही आधारची नोंदणी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने यासंबंधीचे निर्देश आधार नोंदणीचे कंत्राट दिलेल्या एजन्सींना दिले आहे.

अन्नसुरक्षा ग्रामसभेच्या हाती!

$
0
0
अन्न सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबांना आता ग्रामसभेच्या परवानगीनेच धान्य मिळणार आहे. अन्नसुरक्षेच्या लाभार्थ्यांबाबत साशंकता उपस्थित झाल्याने प्रत्येक गावातील अन्न सुरक्षा लाभार्थ्यांच्या यादीला ग्रामसभेची मंजुरी आवश्यक करण्यात आली आहे.

सिन्नर ‘सेझ’ला आणखी २ वर्षे?

$
0
0
विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) विशिष्ट कालावधीत कार्यान्वित होत नसल्याचा मुद्दा पुढे आल्यामु‍ळे सिन्नर येथील इंडिया बुल्सचा सेझही त्यास अपवाद नसल्याची बाब स्पष्ट होत आहे.

आघाडी, मनसेला महायुतीचे आव्हान

$
0
0
सर्वच पक्षांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवून प्रस्थापित करणारा अन् प्रसंगोपात विस्थापित करण्यासही तेवढ्याच हिरिरीने पुढाकार घेणारा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख सांगता येईल.

पोलिस अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पडावा यासाठी प्रशासनाकडून जोरदारी तयारी सुरू आहे. त्यातीलच महत्त्वाचा भाग म्हणून पोलिसांसाठी आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते २७ ऑगस्ट या कालावधीत हे शिबीर होणार आहे.

पाणीकपात रद्दची घोषणा फसवी

$
0
0
‘नाशिक महापालिकेस गंगापूर व काश्यपी धरणातून पाणी पुरवठा करणारी दोन्ही धरणे ९० टक्के भरली असून या पार्श्वभूमीवर महापौर अॅड. यतीन वाघ यांनी मे महिन्यात ५० टक्के कपात रद्द केल्याची घोषणा केली.

अधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा

$
0
0
गोल्फ क्लब मैदानाच्या भिंतीलगत गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल्स उभारू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिल्यानंतरही हे काम बंद झाले नाही. अधिकाऱ्यांची पाठ फिरताच परिस्थिती जैसे थे झाल्याने महापालिकेच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होतो आहे.

येवल्यात अवतरले गोकूळ

$
0
0
श्रीकृष्ण जयंती निमित्त धडपड मंचतर्फे घेण्यात आलेल्या बाल श्रीकृष्ण सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नटखट, गंभीर, खेळकर, बासरीवाला, दहीहंडी फोडणारा, माखनचोर अशा विविध श्रीकृष्णलीलांनी स्पर्धेच्या सभागृहात अक्षरक्ष: गोकूळ नगरीच अवतरली होती.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images