Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मतदार कार्डने थांबणार ‘मध्य’च्या मतदारांची धावपळ

$
0
0
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांची नावे शोधण्यासाठी होणारी धावपळ नाशिक मध्य मतदारसंघात तरी शिवसेनेन यावेळी थांबवली आहे. ‘मध्य’ मधून इच्छूक असलेल्या शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी कुटुंब मतदार कार्ड तयार केले आहे.

पेंशनधारकांचे धरणे आंदोलन

$
0
0
औद्योगिक तसेच विविध ठिकाणी काम करणाऱ्या पेंन्शनधारकांनी भविष्य निधी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. यावेळी दरमहा सहा हजार पाचशे रुपये पेंशन देण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रादेशिक अधिकारी जगदीश तांबे यांच्याकडे करण्यात आली.

विमानसेवा, हायवेप्रकरण हायकोर्टाच्या दारात

$
0
0
कसारा घाटासह अन्य ठिकाणी खराब झालेला मुंबई-आग्रा हायवे आणि अनुकूल वातावरण असूनही सुरू न होणारी विमानसेवा या दोन्ही मुद्यांवर नाशिकच्या संघटना मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. याबाबत निर्णय घेण्यात आला असून, संबंधित यंत्रणांना त्याचा जाब कोर्टच विचारणार आहे.

राज ठाकरेंवर पंकजांची टीकेची तोफ

$
0
0
राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात सुरू केलेली संघर्ष यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली आहे. या निमित्त पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडेनी राज्यसरकारच्या गेल्या पंधरा वर्षाच्या कामगिरीवर तोफ डागताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही टीका केली.

संघर्ष यात्रेविरुद्ध भाजपवर गुन्हा?

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली असताना भाजपच्या संघर्ष यात्रेत विनापरवाना झेंडे तसेच, बॅनर्स वापरल्याप्रकरणी भाजप विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या सर्व कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी केली असून, त्याद्वारे शहानिशा केली जाणार आहे.

बैलगाडीतून मिरवणूक

$
0
0
भारतीय जनता पक्षाच्या आमदार पंकजा मुंडे यांची बहुचर्चित संघर्ष यात्रा नाशिकरोड येथे दाखल झाली. तिचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. सिन्नर फाटा येथून पंकजा मुंडेंची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. बैलगाडीचे सारथ्य त्यांनी स्वतः केले.

आचारसंहितेने लटकवले महापालिकेला

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेचे अनेक कामे अंधातरी लटकली आहेत. आता, याबाबत दिवाळीनंतरच नव्या सरकारच्या साक्षीने निर्णय होण्याची शक्यता आहे.

केळीच्या सालीने घेतला तरुणाचा जीव

$
0
0
केळीच्या सालीवरून सरकल्याने डोक्यास मार लागलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश रमेश जाधव (३४, रा. डिंगरआळी, भद्रकाली) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी तो केळीच्या सालीवरून सटकला.

सिंगल विंडो उद्यापासून

$
0
0
आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय पक्षांना लागणाऱ्या विविध परवानग्या सिंगल विंडोच्या माध्यमातून दिल्या जाणार असून, ही विंडो सोमवारपासून कार्यरत होणार आहे. तसेच, यंदाच्या निवडणुकीत मध्य, पश्चिम आणि पूर्व या तीन मतदारसंघात व्हीव्हीपॅटचे मशिन्स लावले जाणार आहेत.

जिल्हा परिषदेतही निवडणुकीची लग‌ीनघाई

$
0
0
एकीकडे विधानसभा निवडणुकीची धूम सुरू झाली असतानाच नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडणूकही जवळ येवून ठेपली असून, सत्ता स्थापनेसाठी सत्ताधारी आघाडीसह विरोधी महायुतीनेही जोर लावला आहे.

प्रेस कामगारांचे मोदींना साकडे

$
0
0
गांधीनगर येथील मुद्रणालयासह देशातील १८ मुद्रणालये बंद करण्याचा निर्णय रद्द करावा यासाठी प्रेस कामगार पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. त्यासाठी रविवारी (ता.१४) रात्री खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचे शिष्टमंडळ रवाना होणार आहे.

अलाहाबादला निधी का दिला?

$
0
0
आगामी सिंहस्थासाठी गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी निधी देवू शकत नसाल तर अलाहाबाद येथे गेल्या वर्षी झालेल्या कुंभमेळ्याला का आणि कसा निधी दिला, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला केली आहे. तसेच, नीरीने त्यांचा अंतिम अहवाल कोर्टाला सुपुर्द केला आहे.

महापौर आज राज दरबारी

$
0
0
मनसेचे नूतन महापौर अशोक मुर्तडक, आमदार वसंत गिते यांच्यासह इतर पदाधिकारी आज (दि. १४) मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. महापौरांनी शनिवारी वणी गडावर जाऊन दर्शन घेतले.

स्वाईन फ्ल्यूमुळे एकाचा मृत्यू

$
0
0
शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या स्वाईन फ्ल्यूच्या पेशंटचा शनिवारी मृत्यू झाला. येवला तालुक्यातील रहिवाशी असलेला हा पेशंट ४५ वर्षांचा होता. तर सिव्ह‌िलमध्ये स्वाईन फ्ल्यूचा एक पेशंट उपचार घेत आहे.

मुख्यमंत्री पदाची दावेदार नाही

$
0
0
राज्यात मह‌िला मुख्यमंत्री व्हावी अशी मागणी असली, तरी आपण भाजपतर्फे मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार नसल्याचे स्पष्ट करून आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली.

आघाडीच्या कारभाराला जनता कंटाळली

$
0
0
राज्यातील जनता आघाडी शासनाच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळली आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात कोणत्याही परिस्थितीत भाजप महायुतीचीच सत्ता येणार असून, पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हेवेदावे विसरून कामाला लागावे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.

टोमॅटोचा बहरला हंगाम

$
0
0
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो हंगाम बहरला असून, दररोज ८० ते ९० हजार टोमॅटो क्रेट विक्रीसाठी येत आहेत. टोमॅटोची पाकिस्तान, बांगलादेश निर्यात सुरू झाल्यामुळे टोमॅटोला समाधानधारक भाव ‌मिळत आहे.

ठेवी परत देण्याची मागणी

$
0
0
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड जळगावच्या येवला येथील शाखेतील ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळावी, अशी मागणी ठेवीदारांनी संस्थेच्या व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नदीत बुडून बालकाचा मृत्यू

$
0
0
आजोबांबरोबर गुरे चारण्यास गेलेल्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी बगडू येथे घडली. आदेश प्रवीण वाघ (वय ९) असे मृताचे नाव आहे. म्हशी चारण्यासाठी नदीवर गेल्यावर आदेश हा परिसरात खेळत होता.

पंचायत समित्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व

$
0
0
जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवड प्रकिया रविवारी पार पडली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने वर्चस्व कायम राखले तर शिवेसनेही चांगलाच जोर लावला होता. विधानसभा निवडणुकीमुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले होते...
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images