Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

डासांच्या प्रादुर्भावाने नाशिकरोडवासीय हैराण

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोडच्या काही भागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासनाने धूर तसेच] औषध फवारणी करून डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

संस्कृतीचं थोडं ओझं तुम्हीही घ्या ना !

$
0
0
नाशिकच्या धनिकांनी (यात सर्व प्रकारचे व्यावसायिक आलेच. राजकीय नेतेही !) आपल्या वार्षिक उत्पन्नातून अर्धाएक टक्के निधी नाशिकच्या सांस्कृतिक विकासासाठी द्यायला सुरवात केली तर? (आपल्या प्रोजेक्टच्या ओपनिंगला नटी बोलावणं म्हणजे सांस्कृतिक विकास नाही !) हो, म्हणजे सुरवातीला जरा संकोच वाटेल द्यायला.

शंभर इमूंना सोडले वाऱ्यावर

$
0
0
महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवरील ठाणपाडा येथे अज्ञात व्यक्तीने सुमारे शंभर इमू पक्षी मध्यरात्री सोडून दिल्याने खळबळ उडाली आहे. हे पक्षी आजारी असल्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्यांचे मांस खावू नये तसेच, त्यांच्यापासून दूर रहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

$
0
0
नवरात्रोत्सव काळात सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. यात्रा काळात भाविकांची गैरसोय होऊ देऊ नये. सर्वत्र स्वच्छता ठेवून वेळोवेळी साफसफाई करावी, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रांताधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला.

दोघांकडून तरुणींवर लैंगिक अत्याचार

$
0
0
जॉब देतो, कॉलेजला प्रवेश मिळवून देतो यासह लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर दोघा तरुणांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद पिंपळनेर (ता. साक्री, जिल्हा धुळे) येथील एका १९ वर्षीय तरुणीने केली आहे.

सासऱ्याच्या मारहाणीत जावयाचा मृत्यू

$
0
0
पत्नीला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या जावयास सासऱ्याने धक्काबुक्की केल्याने जावई डोक्यावर पडल्याने जागीच ठार झाला. गुरुवारी दुपारी पाटविहीर येथे ही घटना घडली. या प्रकरणी व्याह्याच्या फिर्यादीवरून सासऱ्याविरोधात रात्री उशिरा कळवण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट सही करून बँकेतनू दीड लाख लांबविले

$
0
0
तालुक्यातील नामपूर येथील झेंडा चौकातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून अज्ञात भामट्याने बनावट सह्या करून बिलपुरी येथील शेतकऱ्याचे दीड लाख रुपये लंपास केले आहेत. या प्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

... अन् पाणावले आईचे डोळे

$
0
0
‘वेळप्रसंगी हमाली काम करणारा, पाव बटर विकणारा माझा अशोक आज नाशिकचा महापौर झालाय. आयुष्यात त्याने खूप खस्ता खालल्या. त्याच्या कष्टाचे चीज झाले, यातच मला सगळे मिळाले. आता मला काही नको. त्याला अनेक आशीर्वाद लाभोत’ हे बोल आहेत नाशिकचे प्रथम नागरिक अशोक मुर्तडक यांच्या आईचे.

तणाव, जल्लोष अन् गुलालाची उधळण

$
0
0
महापौरपदाच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण तापल्याने महापालिका परिसराला शुक्रवारी युद्धभूमीचे स्वरूप आले होते. जमवाजमव केलेल्या नगरसेवकांची पळवापळवी होवू नये यासाठी सर्व पक्षांनी खबरदारी घेवून महापालिकेबाहेर आपल्या समर्थकांची गर्दी जमवल्याने महापालिका परिसरात निकाल लागेपर्यंत तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

काँग्रेस-राष्ट्रवादीची यशस्वी खेळी

$
0
0
बहुमताचे त्रांगडे, ऐन निवडणुकीपूर्वी सेना-भाजपची वाढलेली जवळीक, काँग्रेस-राष्ट्रवादीसह अपक्षांची अनिश्चित भूमिका आणि मनसेला लागलेले फुटीचे ग्रहण अशा बहुरंगी पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला सत्ता ​मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागून होती.

अपहृत तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

$
0
0
तरुणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी काही संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. विनय रमेश रेवर (२२, रा. दिंडोरीरोड, पंचवटी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

आघाडी सरकारने लावली महाराष्ट्राची वाट

$
0
0
राज्यातील आघाडी सरकारविरोधात आमदार पंकजा मुडें-पालवे यांनी काढलेली संघर्ष यात्रा शुक्रवारी नाशिकमध्ये दाखल झाली असून, या यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मालेगाव, चांदवड लासलगावमध्ये पंकजा मुडें यांनी जाहीर सभा घेवून आघाडी सरकारच्या कामकाजाव जोरदार प्रहार केला आहे.

नाटक थेट प्रेक्षकांच्या दारी

$
0
0
प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन नाटक पहायला कंटाळा करतात अशी कायम ओरड केली जाते. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी नाटक पहावे या उद्देशाने मयुरी थिएटरच्या कलाकारांनी थेट प्रेक्षकांच्या दारी जाऊन नाटक करण्याची योजना आखली आहे.

सरकारी बाबूंना सैनिकी प्रशिक्षण

$
0
0
राज्य सरकारच्या वतीने प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना सैन्यामार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे. नाशिकमधील आर्टीलरी सेंटरमध्ये हे प्रशिक्षण सध्या सुरू असून त्याचा समारोप शनिवारी, १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.

इच्छुकांसह पक्षही लागले कामाला

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच जिल्हा प्रशासनापाठोपाठ राजकीय पक्षांसह उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.

निवडणूकीची कामे सुरू

$
0
0
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच, आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्त्या केल्या आहेत.

'नाशिक पॅटर्न' युतीला डोकेदुखी

$
0
0
नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर राज्यात नवे समीकरण उदयास आले आहे.

नाशिकचा गड मनसेनेच राखला

$
0
0
जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी एकत्र आल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीसह अपक्षांच्या महाआघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला थेट मदत केल्याने मनसेचे अशोक मुर्तडक यांची महापौरपदी बहुमताने निवड झाली.

पंकजा मुंडेंची दिल्लीवर फुल्ली!

$
0
0
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर रिक्त झालेली बीड लोकसभेची जागा त्यांची मुलगी पंकजा लढवतील अशी चर्चा आहे. पण, ‘मला राज्यातच काम करण्याची इच्छा आहे’ असे सांगत पंकजा यांनी दिल्लीला जाण्यात रस नसल्याचे संकेत दिले आहेत.

निवडणुकीची रणनीती आखण्यात पक्ष व्यस्त

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच जिल्ह्यातील राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून, मतदारसंघ निहाय मेळावे, बैठकांचे नियोजन करण्यात व्यस्त झाले आहेत. सोबतच मतदार यादीत नाव नोंदविण्यास शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुकांनी मतदारांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images