Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दोन कर्मचारी अटकेत

$
0
0
व‌िश‌िष्ट वेतनश्रेणी लागू करून त्यानुसार वेतनातील फरकाचे बिल काढून देण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली. हे दोघेही नांदगाव पंचायत सम‌ितीतील कर्मचारी आहेत.

कदम-बनकर आमने-सामने

$
0
0
निफाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेकडून अनिल कदम, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप बनकर निफाड तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

गंगा गोदावरी देवी

$
0
0
पंचवटीतील रामकुंडाच्या बाजूच्या जागेत श्री गंगा गोदावरी देवीचे छोटेसे मंद‌िर गजबजलेल्या गर्दीतही लक्ष वेधून घेते. दक्ष‌िण वाह‌िनी खळाळत्या गोदामाईचे हे सात्व‌िक सगुणरूप भाव‌िकांची नजर ख‌िळवून ठेवते.

सिन्नरला वाजेंचे शक्तीप्रदर्शन

$
0
0
सिन्नर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ तथा पराग प्रकाश वाजे यांनी गुरुवारी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी ११ वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील वाजे यांच्या पेट्रोल पंपापासून रॅलीला सुरुवात झाली होती.

‘आरोग्यविद्या’ गाठणार

$
0
0
आरोग्य ही चांगलं जगण्यासाठी लागणारी मूलभूत गोष्ट. मात्र अनेकदा अज्ञानामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा आजारांवर चुकीचे उपचार केले जातात.

भाजपा-मनसे पुन्हा एकत्र?

$
0
0
शिवसेनेच्या दबावापुढे माघार घेत भारतीय जनता पार्टीने महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला साथ दिली. मनसेने महापौरपद देऊ केले तरीही भाजपाला शिवसेनेसोबत जावे लागले. आता, शिवसेना भाजपा युती तुटली असून, तेल गेले तुप गेले अशी गत पक्षांची झाली आहे. मनसे-भाजप पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

येवल्यात शक्तीप्रदर्शनासह सेनेच्या पवारांचा अर्ज दाखल

$
0
0
येवला विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी चार उमेदवारांनी ६ उमेदवारी अर्ज दाखल केले असून, आतापावेतो एकूण ६ उमेदवारांनी ९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता संभाजी साहेबराव पवार यांनी समर्थंकासह शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

भाजपतर्फे बागलाणमध्ये दिलीप बोरसे

$
0
0
राज्यात आघाडी बरोबरच युती तुटल्याने सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ केल्याने निवडणूक कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले होते.

भुसे, गायकवाड यांचे अर्ज दाखल

$
0
0
मालेगाव बाह्य व मध्य मतदारसंघातून एकूण आठ अर्ज दाखल झाले. यात मालेगाव बाह्यमधून पाच उमेदावारांनी सहा अर्ज भरले तर, मध्य मतदारसंघातून एकाच उमेदावाराने दोन अर्ज दाखल केले.

रव‌िवार पेठेतील श्री रेणुका माता

$
0
0
नाश‌िकच्या रव‌िवार पेठेतील गाडगीळ लेन येथे सुमारे दीडशे वर्षापासून श्री रेणुका देवीचे मंद‌िर आहे. गाडगीळांच्या वाड्यात असलेली श्री रेणुकेची ही च‌ित्ताकर्षक मूर्ती स्वयंभू असल्याची माह‌िती मंद‌िराची परंपरा जपणारे पटवर्धन कुटुंबीय देतात.

कोकाटेंचे शक्तीप्रदर्शन

$
0
0
सिन्नर विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

समाजजीवनाचं प्रतिबिंब

$
0
0
‘कुसुमाग्रज’ ‘मराठी साहित्य विश्वातील अनमोल तारा’ त्यांच्या संकल्पनेतून मराठी कवी, साहित्यिक, रसिक ह्यांची देवाण, घेवाण होण्यासाठी गेली ४६ वर्षे सावाना साहित्य मेळावा आयोजित करते.

‘सावाना’ संस्था नव्हे चळवळ

$
0
0
सार्वजनिक वाचनालय हे नाशिक येथील प्रमुख वाचनालय. सुमारे एक लाखाहून अधिक पुस्तकांचा खजिना येथे आहे. ही संस्था वाचनालयापुरती मर्यादित नसून ती एक सांस्कृतिक चळवळ बनली आहे.

अनिल अवचट

$
0
0
अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ प्रसिद्ध केले.

आज साहित्यिक मेळावा

$
0
0
शनिवार, २७ आणि रविवार, २८ सप्टेंबर रोजी जिल्हा साहित्यिक मेळावा

पश्चिममध्ये ठरेना शिवसेनेचा उमेदवार

$
0
0
पश्चिम विधानसभा मतदारसंघात तयारीत गुंतलेल्या नगरसेवकांपैकी तिकीट कोणाला द्यावे असा यक्ष प्रश्न शिवसेनेसमोर निर्माण झाला आहे. सेनेतर्फे चौघे जण इच्छूक असून, या जागेवरून धुसफूस सुरू झाल्याचा प्रत्यय शुक्रवारी आला.

पिंग‍ळेंकडे सव्वा कोटींची मालमत्ता

$
0
0
नाशिक पूर्वमधून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी शपथपत्रामध्ये स्वत:जवळील तसेच कुटुंबीयांजवळील संपत्तीच विवरण सादर केले आहे. राष्ट्रवादीचे देविदास पिंगळे आणि शहर विकास आघाडीचे दामोदर मानकर कोट्यधीश आहेत.

मनसेकडून सात जागांवर उमेदवार जाहीर

$
0
0
मनसेने नाशिक जिल्ह्यातील सात जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. नाशिक पूर्वमधून रमेश धोंगडे यांना, तर देवळालीतून प्रताप मेहरोलिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

‘नाशिक मध्य’ मधून गिते, बोरस्ते, खैरेंचे अर्ज

$
0
0
नाशिक मध्य मतदारसंघातून शुक्रवारी चार उमेदवारांनी सहा अर्ज दाखल केले. यात मनसेच्या वतीने आमदार वसंत गिते, काँग्रेसच्या वतीने शाहू खैरे तर, शिवसेनेच्या वतीने अजय बोरस्ते यांचा समावेश आहे.

प​श्चिममध्ये इच्छुकांची वाढतेय संख्या

$
0
0
पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल १० उमेदवारांनी १५ अर्ज सादर केले. आज, शनिवारी शेवटच्या दिवशी आणखी किमान १० ते १२ अर्ज सादर होण्याची शक्यता आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अर्ज सादर केले असून, शिवसेनेच्या गोटात उमेदवार कोण? या प्रश्नावरून गोंधळ सुरू होता.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images