Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मोदींच्या सुरक्षेसाठी सज्ज

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नाशिकमध्ये येत आहेत. पंचवटीतील तपोवन परिसरात ही सभा होणार असून पोलिसांनी बंदोबस्ताची जोरदार तयारी केली आहे.

रावण दहनासाठी उसळली गर्दी

$
0
0
‘सियावर रामचंद्र की जय’ अशा घोषणा देत पंचवटीतील व्यंकटेश बालाजी ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रामकुंडावर रावण दहनाचा कार्यक्रम झाला. यावेळी ४० फूट रावणाचे दहन करण्यात आले.

सभापतींची आज निवड

$
0
0
जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी शनिवारी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी तुटल्याने बहुमतासाठी राष्ट्रवादी पुन्हा अध्यक्ष निवडीचाच फार्म्युला वापरण्याची शक्यता आहे.

फाळके स्मारकाला प्रतीक्षाच

$
0
0
आजपर्यंत दोनदा निविदा प्रसिध्द झाल्या मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जोपर्यंत ठेकेदारांचा शोध संपत नाही, तोपर्यंत हे असेच सुरू राहणार, अशी खेदजनक प्रतिक्रिया कधीकाळी शहराचे भूषण ठरलेल्या दादासाहेब फाळके स्मारकाबाबत महपालिका ​अधिकारी व्यक्त करीत आहेत.

लासलगावला तरुणीवर बलात्कार

$
0
0
लासलगाव शहरातील एका मोबाईल रिचार्ज कंपनीत काम करणाऱ्या १९ वर्षीय युवतीवर मालकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

ना वासुदेव, ना उमेदवारांचे बलून

$
0
0
लोकसभा निवडणुकीदरम्यान मिळालेल्या वेळेचा फायदा राजकीय पक्षांनी पुरेपुर उचलला. यातून महायुतीने वासुदेवांचा जागर करून उमेदवारांची माहिती असलेले बलून आकाशात सोडले.

सोनं घ्या...मतं द्या!

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत असलेला प्रत्येक सण, उत्सवाचा मतांसाठी फायदा करून घेण्याची शक्कल उमेदवार लढवत आहेत. शहरातील तसेच जिल्ह्यातील उमेदवारांनी दसऱ्याचाही मतांसाठी उपयोग करून घेतला.

अपयश पचवून भुजबळ पुन्हा रिंगणात

$
0
0
‘ओबीसींचे मसिहा’ अशी बिरुदावली मोठ्या अभिमानाने मिरविणाऱ्या छगन भुजबळ यांचा याच बहुमानामुळे लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात मराठा समाजाने पराभव केला. तब्बल पावणे दोन लाख मताधिक्क्याने झालेला पराभव भुजबळांच्याही चांगलाच जिव्हारी लागला.

आजारी मतदार मत कसे देणार?

$
0
0
सातपूर येथील जाधव संकुल परिसरातील नागरिक दूषित पाण्याने त्रस्त झाले आहेत. जलवाहिन्या फुटल्याने त्यात ड्रेनेजचे पाणी मिसळते. यामुळे परिसराला दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होतो.

बागलाणमध्ये महिला उमेदवारांमध्येच चुरस

$
0
0
बागलाण विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच सहा महिला उमेदवार असून, नाशिक जिल्ह्यात औत्सुक्याचा विषय ठरला आहे. किंबहुना महाराष्ट्रात महिला राखीव नसलेल्या या आदिवासी बहुल मतदारसंघात पहिल्यांदाच सहा महिलांनी उमदेवारी केल्याने रंगत वाढली आहे.

सुहास कांदेंना पवारांचा पाठिंबा

$
0
0
नांदगाव तालुक्यात विकास झाल्याचा डांगोरा सर्वत्र पिटला जातोय. मात्र खरा विकास कोणाचा झाला कोणता विकास झाला असा सवाल करीत जनतेच्या ज्वलंत समस्या सोडविण्याकरिता शिवसेनेच्या सुहास कांदेना निवडून द्या, असे प्रतिपादन माजी आमदार संजय पवार यांनी केले.

जनसंपर्क अन् जातीपातीवरच भिस्त

$
0
0
बागलाण विधानसभा मतदारसंघात माघारीनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. राजकीय पक्षांच्या सहा उमेदवारांसोबतच पाच अपक्ष उभे ठाकल्याने एकूण अकरा उमेदवार रिंगणात असले तरीही खरी लढत चौरंगीच रंगणार आहे.

कसमादे अन् खान्देशचा वरचष्मा

$
0
0
कसमादे तसेच खान्देशमधील मतदारांचा वरचष्मा असलेल्या पश्चिम मतदारसंघात मतांचे विभाजन कळीचा मुद्दा ठरू पाहत आहे. तब्बल तीन लाख ३५ हजार ६४१ मतदारांपैकी किती मतदार आपला हक्क बजावणार आणि किती मतांचे विभाजन होणार, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

भूमिपुत्राच्या पाठीशी राहा

$
0
0
नांदगाव मतदारसंघातील भूमिपुत्र असल्याने आपणास इतर उमेदवारांपेक्षा जनतेच्या समस्यांची आधिक जाण आहे. धनशक्तिला मतदारांनी बळी पडू नये. मला सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन माजी आमदार व काँग्रेसचे उमेदवार अॅड. अनिल आहेर यांनी केले आहे.

चित्ररथांनी मागे टाकले सोशल मीडियाला

$
0
0
सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे सध्याचे दिवस असले तरी नाशिकच्या चारही मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांनी चित्ररथांची साथ धरली आहे. सध्या येथे १६० चित्ररथ फिरत असून सर्वाधिक म्हणजे ३५ चित्ररथ शिवसेनेचे आहेत.

गोळीबारातील चार संशयित गजाआड

$
0
0
टेम्पोचालकाचे अपहरण आणि शिंदे येथील गोळीबारातील संशयित आरोपींना अंबड पोलिसांनी वाडीवऱ्हे परिसरातून शिताफीने अटक केली. निखील विलास गवळे (२२), अक्षय युवराज पाटील (२०), राकेश अंबालाल सोनार (२२, तिघे रा. सातपूर) आणि संतोष शाम कोतेवार (२१, रा, द्वारका) अशी संशयितांची नावे आहेत.

फटाके स्टॉल्ससाठी ‘नगरविकास’चा अर्ज

$
0
0
फटाके स्टॉल्स उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मंजुरी हवी असल्यास नगरविकास खात्यामार्फत अर्ज सादर करा, अशी सूचना निवडणूक आयोगाने महापालिकेला केली आहे. हाती असलेला कालावधी लक्षात घेत विविध कर विभागाने आजच आयुक्तांच्या स्वाक्षरीने हा प्रस्ताव मार्गी लावला.

भाऊबंदकी घरात अन् राजकारण जोरात

$
0
0
माघारी प्रकरण भाऊबंदकीमुळे घडले. आता त्यावर पडदा पडला असला तरी अप्रचाराने जोर पकडला आहे. मी माघार घेतली नसून यास मतदारच योग्य उत्तर देतील, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे उमेदवार विनायक खैरे यांनी शनिवारी दिले.

आचारसंह‌िता ठरतेय वेतनातील अडसर?

$
0
0
केंद्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत शासकीय आद‌विासी पोस्टबेस‌कि आश्रमशाळेतील प्रश‌क्षिण केंद्रातील कार्यरत कर्मचारी व प्रश‌क्षिणार्थींचे वेतन मार्च मह‌न्यिापासून रखडले आहे. हे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे, अन्यथा बुधावारपासून उपोषण छेडण्याचा इशारा सीटू संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

नाशिकरोड परिसरात चेन स्नॅचर्सचा हैदोस

$
0
0
चेन स्नॅचर्सने हिसका मारून फरफटत नेल्यामुळे महिलेला दहा टाके पडल्याची घटना शनिवारी जयभवानीरोडला घडली. या घटनेनंतर पोलिस असल्याची बतावणी करून परिसरात दोन ठिकाणी चोरी झाली. या प्रकारांमुळे खळबळ उडाली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images