Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

डॉक्टर देताहेत पूरग्रस्तांना आरोग्य सेवा

$
0
0
जम्मू आणि कश्मीर पूरग्रस्तांना मदतीसाठी नाशिकच्या आरोग्य संघटना सरसावल्या असून दोन महिन्यात ६५ डॉक्टरांचे पथक टप्प्याने आरोग्यविषय सेवा देत आहेत. बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन नाशिकने यासाठी पुढाकार घेतला असून पूरग्रस्तांना औषधाच्या माध्यमातून मदत करण्याचेही आवाहन नाशिकचे समन्वयक जितेंद्र भावे यांनी केले आहे.

अन् अपंग महिलेच्या चेहऱ्यावर फुलले हसू

$
0
0
अपंगांसाठीच्या वाहन खरेदीसाठी‌ शासनाकडून अनुदान मिळत असतानाही‌ त्यासाठी तीन वर्षांपासून खेटा मारणाऱ्या ‌सिव्हिल हॉस्पिटलमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी महिलेला रणरागिनी महिला मंचने न्याय मिळवून दिला आहे. स्वत:चे वाहन मिळाल्याने या अपंग महिलेच्या चेहऱ्यावर शुक्रवारी हसू फुलले.

‘टाइम्स ग्रुप’तर्फे मोफत लेसर हिमोथेरपी शिबिर

$
0
0
‘द टाइम्स ऑफ इंडिया’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि रुद्रा लेसरस् इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रुद्र हॉस्पिटल येथे रविवार, १६ नोव्हेंबर रोजी डायबीटीसच्या पेशंटस्साठी मोफत लेसर हिमोथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तेच ते यंदाही...!

$
0
0
पुरूषप्रधान संस्कृतीतील स्त्रीचे किंवा मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाचे अनेक ठिकाणी जसे वर्णन केले जाते. ‘तेच ते पुन्हा तेच ते’ तीच खर्डेघाशी, तेच जगणे, तेच रूटीन, तीच चर्चा इत्यादी... इत्यादी. अगदी तसेच वर्णन वर्षानुवर्षे राज्यनाट्य स्पर्धेच्या चक्रात अडकलेल्या नाशिकच्या रंगभूमीचे करावेसे वाटते.

सकारात्मकतेचे हवे योगदान

$
0
0
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयामार्फत दरवर्षी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत व हल्ली बालनाट्य स्पर्धा घेतल्या जात असतात. थोडी थोडकी नाही तर आज या उपक्रमाचे ५४ वे वर्ष आहे.

९७ वी घटनादुरुस्ती स्वरुप, आव्हाने आणि परिणाम

$
0
0
महाराष्ट्रभर २० नोव्हेंबरपर्यंत सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सहकार क्षेत्रातील बदलत्या स्थित्यंतराचा वेध घेणारा ‘९७ वी घटनादुरुस्ती : स्वरूप, आव्हाने आणि परिणाम’ या विषयावरील हा लेख. जनसामान्यांचा आर्थिक ऋणानुबंध हीच सहकाराची मोठी ताकद आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम अन् स्पर्धाही रंगल्या

$
0
0
बालदिनानिमित्त शुक्रवारी शहरातील विविध शाळा व संस्थामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीला यावेळी विविध शैक्षणिक, सामाजिक संस्था व राजकीय पक्षांकडून अभिवादन करण्यात आले.

मनपा शाळेत नेत्र तपासणी

$
0
0
बालदिनानिमित्त मखमलाबाद नाका येथील मनपा शाळा क्र. २९ येथे नाशिक महानगरपालिका, शिक्षण मंडळ नाशिक, तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.

बालदिनानिमित्त स्वच्छता अभियान

$
0
0
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती इगतपुरी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

वाढदिवशीही जपली सामाजिक बांधिलकी

$
0
0
वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी शहरात विविध कार्यक्रम ठरवले. रुग्णांना फळे वाटण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात ते पोहचले न पोहचले तोच आपल्या भागातील कोणीचा तरी अचानक मृत्यू झाल्याची बातमी त्याला कळाली.

बाजार समितीचे विभाजन पुन्हा अंधातरी

$
0
0
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येवून प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिंचनाबाबत तातडीने नियोजन करा

$
0
0
सन २०१४-१५ साठी पालखेड डाव्या कालव्याच्या शेती सिंचनाचे तातडीने नियोजन करावे, अशी मागणी तालुक्यातील पाणी वापर सहकारी संस्थांनी पालखेड डावा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंत्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वीज चोरीचे २७४ प्रकरणे उघडकीस

$
0
0
सटाणा शहरात वीज वितरण कंपनीने सुरू केलेल्या धाडसत्रात सुमारे २७४ वीज चोरीचे प्रकरणे उघडकीस आलू असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह कायदेशीर कारवाई सुरू आहे.

कांदा, डाळिंब, द्राक्षबागांना फटका

$
0
0
जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे खरीपाबरोबरच रब्बीच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. मका, सोयाबीन, कांदा, डाळिंब, द्राक्ष पिकांची वाट लागली असून बळीराजा हवालदिल झाला आहे.

देशाच्या जीडीपीत शेतकऱ्यांचा उपयोग व्हावा

$
0
0
कृषिप्रधान देश असल्याने भारतातील ४० टक्के मनुष्यबळ शेती आणि शेतीपुरक व्यवसायात राबत आहे. पण देशाच्या ढोबळ उत्पन्न वाढीत (जीडीपी) त्याचा हातभार लागला पाहिजे, असे प्रतिपादन इस्त्राईल दूतावासातील आर्थिक व व्यापार प्रमुख इलियाज डीवॉन यांनी केले.

२४ ग्रामपंचायती बिनविरोध

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील सुमारे २४ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाल्याचे माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या अयोग्य धोरणामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांनी अर्जही दाखल केला नसल्याचेही दिसून येत आहे.

चिंतामणी जयंती समारोहात रसिक तल्लीन

$
0
0
ज्येष्ठ गायक पंडित सी. आर. व्यास यांच्या ९० व्या जयंती निमित्त भूध्वरी चिंतामणी जयंती समारोह नुकताच झाला. प्रसिद्ध सतार वादक नीलाद्रीकुमार आणि ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या मैफिलीचे नाशिककरांसाठी खास आयोजन करण्यात आले होते.

सिंहस्थ कामांवर खासगी संस्थांचा ‘वॉच’

$
0
0
नाशिक महापालिकेमार्फत सुरू असलेल्या सिंहस्थ कामांवर आता अभियांत्रिकी महाविद्यालय आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाचाही वॉच राहणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या दोन्ही संस्थाना सहभागी करून घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महिलांचा पाेलिसांपुढे ठिय्या

$
0
0
काकासाहेब खैरनार या रिक्षाचालक तरुणाच्या खूनप्रकरणातील आरोपींनी शुक्रवारी सकाळी गंगापूर गावातील काही महिलांना शिवीगाळ केली. या निषेधार्थ महिलांनी प्रथम पोलिस आयुक्त कार्यालयात व नंतर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला.

नाशिकला या अन् विमानसेवा द्या

$
0
0
मुंबईतील विमानतळाला ओझर हे पर्याय असून, नाशिकला या आणि येथून विमानसेवा बिनदिक्कत सुरू करा, असे आवाहन हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) केले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images