Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महापालिका प्रशासनाला आली जाग...

$
0
0
पिसाळलेल्या कुत्र्यांचा सातपूर कॉलनीत पाच जणांना चावा याबाबत ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध करताच सोमवारी सकाळी महापालिकेने मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहिमच हातात घेतली.

एमआयडीसी कॉलनीत मूलभूत सुविधांची वानवा

$
0
0
औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या एमआयडीसी कॉलनीला अनेक समस्यांनी वेढले आहे. कॉलनीत ठिकठिकाणी कच‍ऱ्यांचे ढीग साचले असून, फुटलेल्या गटारी व वाढलेल्या गवताने डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.

रिक्षाभाडे, रोजचाच प्रश्न!

$
0
0
आज अन्न, वस्त्र, निवाऱ्यानंतर महत्त्वाची गरजेची बाब येते ती म्हणजे प्रवास! महानगरात सर्वांकडेच चारचाकी नसते, बसची व्यवस्था तर गल्लीबोळात होऊ शकत नाही.

आयटीआय निकाल २० तारखेला

$
0
0
राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा (आयटीआय) निकाल तब्बल ११० दिवसांनंतर आता गुरुवारी, २० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. परीक्षा प्रणालीत ओएमआर पद्धतीचा पहिल्यांदाच वापर केल्यानंतर निकाल लवकर लागणे अपेक्षित होते.

विनय बारपांडेंची राष्ट्रीय प्लंबिंग परिषदेसाठी निवड

$
0
0
महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक विभागातील तज्ञ प्लंबिंग कंन्सलटंट विनय बारपांडे यांची २० व २१ नोव्हेंबर २०१४ रोजी बंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्लंबिंग परिषदेसाठी निवड झाली आहे.

सिन्नरला मुख्याधिकाऱ्यांना घेराव

$
0
0
सिन्नर शहर व परिसरात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विजयनगर भागातील एम. जी. नगरातील संतप्त महिलांनी नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

आनंदयात्रीची एक्झिट

$
0
0
अवघ्या चार पाच दिवसांआधी आपला ७१ वा वाढदिवस साजरा करून अभीष्टचिंतन करणाऱ्या सर्व स्नेहीजनांना आनंदाचा मूलमंत्र देणारा आणि वृद्धांसाठी काही तरी करण्याची खुणगाठ मनात बांधणारा हा आनंदयात्री अशी अचानक आयुष्यातून एक्झिट कशी घेऊ शकतो हा प्रश्न कल्पनेच्या ही पलिकडचा होता!

विहिरीत पडून हरणाचा मृत्यू

$
0
0
तालुक्यात विहिरीत पडून हरणांची बळी जाण्याची घटना येवला तालुक्यातच सुरूच आहे. ममदापूर येथे रविवारी रात्रीच्या सुमारास विहिरीत पडून एका नर जातीच्या हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पाणीप्रश्नासाठी सोनवणेंचे उपोषण

$
0
0
सटाणा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेल्या ठेंगोडा येथील गायरान जमिनाच्या प्रस्तावाला चालना मिळून सदरची जमीन सटाणा पालिकेला सुपूर्द करण्यात यावी, अशी मागणी पालिकेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते व नगरसेवक मनोज सोनवणे यांनी केली आहे.

कळवणमध्ये स्वच्छता अभियान

$
0
0
बालदिन ते जागतिक शौचालय दिन या कालावधीत शासनातर्फे बाल स्वच्छता अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत कळवण पंचायत समितीच्या निर्मल भारत अभियान कक्ष, आरोग्यविभाग, शिक्षण विभाग व महिला बाल विकास प्रकल्प विभागाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा व अंगणवाडीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार निर्मला गावित यांचे आश्वासन

$
0
0
आगामी पाच वर्षात मतदारसंघाच्या विकास व प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावण्यासाठी सदैव प्रयत्न करणार आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही.

‘पीककर्ज माफीसह नुकसानभरपाई द्या’

$
0
0
नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी आणि पीककर्ज माफ करावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी मुख्यमंत्र्यासह कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

सटाणा येथे राबविले स्वच्छता अभियान

$
0
0
येथील नववसाहतीमधील मोकळ्या भूखंडावरील काटेरी झुडपे काढण्याची मागणी स्वराज्य प्रतिष्ठान व शहरवासीयांनी केली होती. त्यानुसार पालिकेच्या माध्यमातून व गटनेते काका रौंदळ यांच्या पुढाकारातून स्वच्छता करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांवर संक्रांत

$
0
0
सलग तीन दिवस अवकाळी पावसाने बागलाण तालुक्यात रौद्ररूप कायम ठेवल्याने शेतीपिके पूर्णत: संकटात सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी तालुक्यातील नष्ट झालेल्या पिकांची पाहणी केली.

केसांच्या न‌िगेलाही द्या प्राधान्य

$
0
0
सौंदर्य साधनेत त्वचेइतकेच केसांच्या न‌िगेलाही महत्व आहे. केसांच्या आरोग्यासाठी पोषक आहारासोबतच योग्य प्रसाधनांचा उपयोग आण‌ि स्वच्छता या बाबींनाही मह‌िलांनी प्राधान्य द्यावे, असा कानमंत्र इंटरनॅशनल हेअर स्टायल‌िश दामोदर चव्हाण यांनी द‌िला.

‘वा गुरू’ ने दिला सकारात्मक संदेश

$
0
0
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्यनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सोमवारी बाबाज थिएटर्सतर्फे चंद्रशेखर फणसळकर लिखीत ‘वा गुरू’ हे नाटक सादर करण्यात आले.

१७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

$
0
0
सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १७ हजार ४५ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक माहिती आहे. यात प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, कांदा, भात, नागली, टोमॅटो, सोयाबीन, मका या पिकांचा समावेश आहे.

लेटलतिफांची मुजोरी कायम

$
0
0
महापालिकेतील लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर नवनियुक्त आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारूनही त्यांची मुजोरी कायम असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी राजीव गांधी भवनासह सहाही विभागीय कार्यालयांत केलेल्या पाहणीत तब्बल २९६ कर्मचारी लेटलतिफ असल्याचे आढळून आले.

बाळासाहेब ठाकरेंना ‘सोशल’आदरांजली

$
0
0
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त सोशल मीडियावर सोमवारी दिवसभर अभिवादन करण्यात येत होते. निव्वळ शिवसैनिकच नव्हे तर सामान्य नागरिकांनीही बाळासाहेबांच्या आठवणींना फेसबुक आणि व्हॉटसअपच्या माध्यमातून उजाळा देत त्यांचे स्मरण केले.

सिंहस्थापूर्वीच हव्यात ५०० बसेस

$
0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला नवीन सरकारकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवासी उत्पन्न वाढवायचे असेल तर शहर आणि जिल्हा मिळून किमान ५०० नवीन बसेस मिळायला हव्यात अशी अपेक्षा आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images