Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कोर्टाच्या जागेबाबत मुंबईत आज बैठक

$
0
0
नाशिक जिल्हा कोर्टाला जागा कमी पडत असल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेप्रकरणी शुक्रवारी (५ डिसेंबर) मुंबईत मंत्रालयामध्ये बैठक होत आहे. त्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.

‘त्या’ पोलिसाच्या वारसांना दहा लाख

$
0
0
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्यादिवशी केंद्रावर कार्यरत असताना मृत्युमुखी पडलेल्या दशरथ जाधव या पोलिस कर्मचाऱ्याच्या वारसांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. येत्या काही दिवसातच ही मदत दिली जाणार आहे.

सटाण्यात महामार्गाचा श्वास मोकळा

$
0
0
सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर शहादा प्रकाशा राज्य महामार्गावरील पालिका हद्दीतील जिजामाता उद्यान ते पुष्पांजली थिएटरदरम्यान असलेली अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली.

पॉवर ग्रीडचा अहवाल सादर

$
0
0
औरंगाबाद ते भोईसर या दरम्यान नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या अति उच्च दाबाच्या वीज वाहिनीचे कामाचे फेर सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचा अहवाल पॉवर ग्रीडने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

आठ हजार ठिकाणी डासांची उत्पत्ती

$
0
0
कायम डास तयार होतात अशा ७ हजार ९४७ ठिकाणांची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. अंड्यापासून डासांची निर्मिती होण्यासाठी १२ दिवसांची कालावधी लागतो.

लेखाधिकाऱ्याविरोधात कर्मचाऱ्याची तक्रार

$
0
0
मुख्य लेखाधिकारी राजेश लांडे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करून लेखा विभागातील कम्प्युटर ऑपरेटर विजय शेलार यांनी आयुक्तांकडे राजीनामा सोपवला आहे. या घटनेमुळे महापालिकेत खळबळ उडाली असून लांडे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

‘आक्रमण’च्या एजंट्सचे धाबे दणाणले

$
0
0
आक्रमण संघटनेचा संस्थापक अध्यक्ष संतोष शर्मा याच्या सांगण्यावरून महिलांना सदस्य बनवून घेणाऱ्या एजंट महिलांचे धाबे आता दणाणले आहे. सदस्य महिला आक्रमक झाल्या असून एजंट महिलांना जाब विचारण्याचा पवित्रा ठिकठिकाणी स्वीकारला जात आहे.

चौपदरीकरणासाठी एकतर्फी ताबा?

$
0
0
नाशिक-सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी जमिनीचा ताबा देण्यास शेतकरी तयार नसल्याने अखेर एकतर्फी ताबा घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासंदर्भात येत्या सोमवारी, ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची बैठक होणार आहे.

‘सेंट फ्रान्स‌िस’विरोधात तक्रारी

$
0
0
सेंट फ्रान्स‌िस स्कूलच्या मनमानी कारभाराव‌िरोधात गुरुवारी सहा पालकांनी उपसंचालकांकडे ल‌िखित स्वरूपात तक्रारी केल्या आहेत.

...तर जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध वॉरंट

$
0
0
फ्लाय अॅश प्रकरणी जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या वतीने सुनावणीस कुणीही उपस्थित न झाल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रीन ट्रिब्युनलने जिल्हाधिकाऱ्यांविरोधात अटकेचे वॉरंट काढण्याचा इशारा बुधवारी दिला.

एलबीटीची ८० खाती सुरू

$
0
0
एलबीटी विभागाने बंद केलेल्या १८० बँक खात्यांपैकी ८० खातेदारांनी दंडाची रक्कम भरून विवरणपत्र सादर केली आहेत. ही खाती एलबीटी विभागाच्या शिफारशीनुसार बँकांनी सुरू केली. एकीकडे बंद करण्यात आलेली खाते सुरू होत असताना दुसरीकडे प्रशासनाने नव्याने ४०० थकबाकीदारांचे खाते गोठवली आहेत.

अलिजाच्या मृत्यूनंतर गोंधळ

$
0
0
डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे किरकोळ भाजलेल्या लहानग्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतांच्या निकटवर्तीयांनी गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.

कल्चर क्लबतर्फे आज शिवाजी अंडरग्राऊंड

$
0
0
'महाराष्ट्र टाइम्स' 'कल्चर क्लब'तर्फे आज (६ डिसेंबर) 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाचा प्रयोग होणार आहे. 'कल्चर क्लब'च्या सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या नाटकाची मोफत तिकिटे काही कालावधीच संपली.

येतोय मोबाइल प्रिंटर!

$
0
0
मोबाइलवरून केवळ टाइमपास म्हणून क्लिक केलेला एखादा सेल्फी किंवा लँडस्केप फोटो कधी-कधी खूप छान येतो. तेव्हा तो प्रिंट करून ठेवावासा वाटतो. मात्र, आज करू उद्या करू असं म्हणत तो फोटो कधीच प्रिंट होत नाही.

पदन्यासाने रस‌िकांवर मोह‌िनी‌

$
0
0
शास्त्रीय नृत्याच्या बहारदार सादरीकरणात पदन्यासाचा मेळ साधत बालकलाकारांनी रस‌िकांवर मोह‌िनी घातली. रावसाहेब थोरात सभागृहा‌त आयोज‌ित मव‌िप्रच्या ज‌िल्हास्तरीय सांस्कृत‌िक महोत्सवात शुक्रवारी शास्त्रीय नृत्याच्या सादरीकरणात व‌िद्यार्थीनींनी सहभाग घेतला.

गोंधळ सरकारी, भरडला शेतकरी

$
0
0
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होवून तब्बल महिना उलटला तरी, अद्याप मदत मिळाली नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे आणि पाहणी दौऱ्यांपलिकडे प्रशासन आणि सरकारचे पाऊल पुढे पडले नसल्याने महिनाभरात तब्बल चार शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे.

न‌िवृत्त प्राध्यापकांच्या यादीतही घोळ

$
0
0
३१ ऑगस्ट २००९ नंतर न‌िवृत्त झालेल्या प्राध्यापकांची प्रलंब‌ित ग्रॅच्युटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही शासनाकडे प्रलंब‌ित आहे. कोर्टाच्या आदेशानंतर शासनाने औरंगाबाद खंडपीठात ३९ कोटींची रक्कम जमा केली असली तरीही ग्रॅच्युटी व‌ितरणासाठी सादर केलेल्या यादीत असंख्य त्रुटी आहेत.

वाढलेल्या बजेटमुळेच सिंहस्थ निधीवर घाला

$
0
0
महापालिकेच्या वाढलेल्या बजेटकडे अंगुलीनिर्देश करूनच अधिक सिंहस्थ निधी देण्यास राज्य सरकारकडून वारंवार आक्षेप घेतला जात आहे. नगररचना विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांनी देखील महापालिकेचे उत्पन्न जास्त असताना निधीची अपेक्षा करू नये, असे ठणकावले आहे.

छडी लागे छमछम, पण व‌िद्या...?

$
0
0
नाश‌िक शहरातील सेंट फ्रान्स‌िस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्राचार्यांनी वाढीव फी न द‌िल्याबद्दल ५० व‌िद्यार्थ्यांना चक्क डांबून ठेवले. याचा जाब व‌िचारण्यास गेलेल्या पालकांशी प्राचार्या बाईंच्या नवरोबाने हुज्जत घातल्याने प्रकरण हातघाईवर गेले.

श‌िक्षकांनी ग‌िरव‌िले बातमी लेखनाचे धडे

$
0
0
बातम‌ी म्हणजे काय? बातमी कशी ल‌िहावी? या प्रश्नांपर्यंतच्या श‌िक्षकांच्या व‌िव‌िध शंकांना ‘महाराष्ट्र टाइम्स’ आण‌ि नाश‌िप्रच्या र. ज. चव्हाण हायस्कूलच्या वतीने आयोज‌ित बातमी लेखन कार्यशाळेत समर्पक उत्तरे म‌िळाली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images