Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मराठवाड्यासाठी पाणी सोडा

$
0
0
मराठवाड्यातून राज्य सरकारवर होणाऱ्या दबावापोटी अखेर नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण समुहातून ८५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश राज्य सरकारने नाशिक जलसंपदा विभागाला दिले आहेत.

शाहीमार्गाचे लवकरच रुंदीकरण?

$
0
0
शाहीमार्गावरील अतिक्रमण काढून त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. यासंबंधी, महापालिका आयुक्तांनी टाऊन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या.

जिल्ह्यात अवघा २० टक्के जलसाठा

$
0
0
जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठ्या अशा सर्व प्रकल्पांमध्ये जवळपास २० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच प्रकल्पांमध्ये सुमारे २७ टक्के जलसाठा होता. त्यामुळे आगामी तीन महिने पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.

रायगडाचा जेव्हा विसर पडतो...!

$
0
0
नाशिकने महाराष्ट्राला अनेक प्रतिभावंत लेखक दिले पैकी वसंत कानेटकर हे न विसरता येणारं नाव. नाशिकला कुलकर्णी गार्डनशेजारी 'शिवाई' नावाच्या बंगल्यात कानेटकरांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते. कानेटकर हे नाशिकचं भूषण असले तरीही त्यांना नेहमीच सापत्नपणाची वागणूक मिळाली हे कुणीही नाकारणार नाही.

स्टाफ सिलेक्शनची आज परीक्षा

$
0
0
स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे विविध पदांसाठी आज रविवारी (ता. २४) परीक्षा घेण्यात येणार आहे. शहरातील ४२ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. दोन सत्रात होणाऱ्या या परीक्षेसाठी सुमारे १२ हजार विद्यार्ती पात्र ठरले आहेत.

... तर प्राध्यापकांवर फौजदारी गुन्हा

$
0
0
आपल्या आर्थिक मागण्यांसाठी परीक्षाकामावर बहिष्कार घालण्याचे अस्त्र दरवर्षी परजणा-या प्राध्यापक संघटनेविरुद्ध सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. बहिष्कार घालणा-या प्राध्यापकांशिवाय परीक्षा घेण्याचे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने विद्यापीठांना दिले असतानाच परीक्षाकामामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करणा-या व्यक्ती अथवा संघटनेविरुद्ध फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा, असे स्पष्ट आदेशही उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार यांनी दिले आहेत.

तरीही परीक्षेवर अनिश्चिततेचेच सावट!

$
0
0
कोणत्याही परिस्थितीत वेळेवर परीक्षा घेण्याचे आदेश सरकारने विद्यापीठांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा २८ मार्चपासून सुरू होणार असल्या तरी प्राध्यापकांच्या संपामुळे या परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट आहे.

वृक्षसंवर्धन कराल तर जीव सृष्टी वाचेल

$
0
0
'मानवाचे जीवन वनांवर अवलंबून आहे. वृक्ष संवर्धन कराल तरच जीवसृष्टी वाचेल', असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जागतिक वन दिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

असाही आग्रह

$
0
0
सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी होणं जरा मुश्किलच झालंय कारण दर्जा. कुणीही उठतं, भाषण ठोकत बसतं, कुणीही येतं गाणं म्हणून जातं, कुणीही येतं न येणारं वाद्य वाजवतं. तर त्यामुळे गर्दी जरा कमी होते.

'झूम' आता पहिल्या सोमवारी?

$
0
0
औद्योगिक प्रश्न तसेच समस्यांसदर्भात होणारी 'जिल्हा उद्योग मित्र'ची बैठक (झूम) आता पहिल्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीसाठी हा बदल होणार असल्याची चिन्हे आहेत.

पाण्यावरून गावागावांत संघर्ष

$
0
0
तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे गावागावांतच संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. तालुक्यातील कोळीपाडा, अमरावतीपाडा व दोधेश्वर ग्रुप ग्रामपंचायतीने गावाच्या हद्दीतून बाहेरील ग्रामस्थांना पाइपलाइन, टँकरद्वारे पाणी नेण्यास बंदी घालण्याचा ठराव संमत करूनही बंधाऱ्याजवळील विहिरींतून धनदांडगे शेतकरी प्रंचड पाणी वाहून नेत आहेत.

सेवानिवृत्त पालिका कर्मचा-यांचे उपोषण मागे

$
0
0
निवृत्ती वेतनासह अन्य मागण्यांबाबत येत्या २६ मार्च रोजी विशेष बैठक घेण्यासोबतच तत्पूर्वी निवृत्ती वेतनाची काही रक्कम अदा करण्याचे लेखी आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्याने सटाण्यातील सेवानिवृत्त पालिका कर्मचा-यांनी पुकारलेले आमरण उपोषण दुस-या दिवशी शुक्रवारी दुपारी मागे घेतले.

'मॅकेनिक नगर' लालफितीत

$
0
0
संपूर्ण शहरभर विखुरलेले मोटर मॅकॅनिक्स व सर्व्हिस रोडवर उभ्या राहणाऱ्या ट्रक, या दोन्ही प्रश्नांवर प्रभावी ठरू शकेल अशा 'मोटर मॅकॅनिक नगरा'चा पथदर्शी प्रस्ताव महापालिकेच्या अनास्थेपायी २००८ पासून प्रशासनाकडे धूळखात पडून आहे.

जलसंवर्धनासाठी त्यांनी केली प्रतिज्ञा

$
0
0
नाशिक एज्युकेशन सोसायटी व भारतीय जलसंस्कृती मंडळामार्फत जागतिक जल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी जलसवर्धनाची प्रतिज्ञा केली. पाणी वाचविण्याबरोबरच ते वाढविणे आणि त्याचे शुध्दीकरण करणे यासाठीही प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.

नाशिक जिल्ह्यात १३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

$
0
0
उन्हाच्या झळा तीव्र होत असताना जिल्ह्यातील टँकरची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सिन्नर आणि नांदगाव या दोन तालुक्यांत पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

MIDC तील पाण्याची पाइपलाइन बदलणार

$
0
0
शहरातील सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील पाण्याची पाइपलाइन बदलण्याची गरज निर्माण झाल्याने ती बदलण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे चीफ इंजिनीअर एस. बी. पाटील यांनी नाशिकच्या उद्योजकांना दिले.

'निफ'कडे रसिकांची सपशेल पाठ

$
0
0
नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी दुस-या दिवशी माहितीपट व चित्रपटांचा अक्षरश: पाऊस पाडण्यात आला. तडाखेबंद उन्हाळ्यात आलेल्या या बेमोसमी पावसात भिजण्याचे रसिकांनी मात्र नाकारल्याने चार दोन डोक्यांच्या उपस्थितीतच फेस्टिव्हलचा पहिला दिवस पार पडला.

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प ३९ कोटींवर

$
0
0
तिजोरीत पडलेली भर आणि आगामी उत्पन्नाच्या आधारे जिल्हा परिषदेने शुक्रवारी तब्बल ३९ कोटी ७२ लाख १८ हजार ८०० रुपयांचा विक्रमी अर्थसंकल्प मंजूर केला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सदस्यांच्या आग्रहास्तव विविध विभागांसाठीची तरतूद कमी करून तो निधी लघुपाटबंधारे विभागाकडे वळविण्यात आला.

कॉलेजरोड 'वन-वे' करावा का?

$
0
0
कॉलेजरोडवरील वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या ​निकाली काढण्यासाठी हा रस्ता वन-वे करण्याची मागणी नाशिक फर्स्टच्यावतीने पोलिस आयुक्तांना करण्यात आली आहे. कॉलेजरोडला समांतर असलेल्या गंगापूर व शरणपूर रस्त्यांचा वापर झाल्यास हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल असा दावा नाशिक फर्स्टने केला आहे.

महिला सक्षमीकरण अन् शेतक-यांना हात

$
0
0
महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रातील विविध योजनांसह जिल्हा परिषदेने सौर ऊर्जेसाठीही अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. जिल्हा परिषदेतील चौथी ते सातवीच्या मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्यासाठी अर्थसंकल्पात १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>