Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आरोग्य विद्यापीठाने धरली संशोधनाची कास

$
0
0
संशोधनाला प्रोत्साहन देणा-या विविध महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश असलेला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा अर्थसंकल्प शुक्रवारी पहिल्या अधिसभेमध्ये (सिनेट) मंजूर करण्यात आला.

शहरातील १४२ ठिकाणी हॉकर्स झोन

$
0
0
शहराच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या हॉकर्स झोनच्या सर्व्हेक्षणाचे काम पुर्ण झाले आहे. बांधकाम, नगररचना आणि विविध कर अधिकाऱ्यांनी केलेल्या या सर्व्हेक्षणात १४२ ठिकाणी हॉकर्स झोन तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून शहरातील २७ ठिकाणांना 'नो हॉकर्स झोन' म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

नाशिकच्या वाळूकडे ठेकेदारांची पाठ

$
0
0
जिल्ह्यातील ५४ ठिकाणच्या पारंपरिक वाळू ठेका लिलावांकडेही ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढीस लागली आहे. यापूर्वी ई-टेंडरिंग आणि ई-ऑक्शनची आधुनिक प्रणाली वापरल्यामुळे प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात येत होते.

कुंभमेळ्याला जागा द्या

$
0
0
नाशिकमध्ये होणा-या कुंभमेळ्यास उपस्थित राहणा-या साधू-संतांच्या निवासव्यवस्थेसाठी सरकारने त्वरित जागा देण्याची मागणी आमदार वसंत गिते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे गिते यांनी ही मागणी केली.

बिटकोमध्ये शिक्षकाचे अश्लील वर्तन

$
0
0
एकीकडे ‌‌स्त्रियांच्या सुरक्षेचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चिला जात असताना, नाशिकमध्ये मात्र विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करणा‍ऱ्या ‌शिक्षकासंदर्भात शाळेने बोटचेपेपणाचे धोरण स्वीकारल्याने पालक संतप्त झाले आहेत.

कल्पनाशक्तीला कुंपण घालू नका

$
0
0
अनेकदा कल्पनाशक्तीला मर्यादांचे कुंपण घालून मोठ्या स्वप्नांकडे जाण्याची वाट अडली जाते. जीवनात नेहमी मोठी स्वप्ने पहा. मर्यादांच्या गुंत्यात अडकून पडू नका. कल्पनाशक्तीला मर्यादांचे कुंपण घालू नका, असे आवाहन आयईटीचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर तुषार चौधरी यांनी केले.

'केबल'वर 'डीटीएच' भारी?

$
0
0
'एसटीबी'(सेट टॉप बॉक्स) बसविण्यापोटी येणारा हजार रुपयांचा खर्च, पॅकेजेसबद्दल असलेली अनिश्चितता आणि या यंत्रणेबद्दल असलेली अनभिज्ञता व संभ्रम यामुळे महिनाभरात शहरातील डीटीएचधारकांची संख्या थेट दुपटीवर जाण्याचे संकेत आहेत.

अतिक्रमण इंजिनीअरला दमदाटी

$
0
0
नाशिकरोड परिसरातील हॉटेल विश्वंभरा येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या महापालिकेच्या डेप्युटी इंजिनीअरला दमदाटी व शिवीगाळ करण्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी रात्री उशिरा उपनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल झाला असून पोलिस चौकशी करीत आहेत.

सात वर्षीय बालिकेचा शारीरिक छळ

$
0
0
सुरक्षारक्षकाच्या सात वर्षीय मुलीशी अनैसर्गिक कृत्य करणा-या अल्पवयीन मुलास सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना टिळकवाडी येथील एका अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी घडली.

नाशकात अवघा २० टक्के जलसाठा

$
0
0
जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठ्या अशा सर्व प्रकल्पांमध्ये जवळपास २० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच प्रकल्पांमध्ये सुमारे २७ टक्के जलसाठा होता.

विनयभंगप्रकरणी शिक्षकाला अटक

$
0
0
एकीकडे ‌‌स्त्रियांच्या सुरक्षेचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चिला जात असताना, नाशिकमध्ये मात्र विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करणाऱ्या ‌शिक्षकासंदर्भात शाळेने बोटचेपेपणाचे धोरण स्वीकारल्याने पालक संतप्त झाले आहेत.

नाशिकचा नेकलेस आठवडाभरात सेवेत

$
0
0
देशातील तिस-या क्रमांकाचा तर राज्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल असलेला 'नाशिकचा नेकलेस' येत्या आठवड्याभरात नाशिककरांच्या सेवेत येणार आहे.

कुठे परिसंवाद, तर कुठे विरोध

$
0
0
'एसटीबी' (सेट टॉप बॉक्स) बसविण्यासाठीची अंतिम मुदत जसजशी जवळ येते आहे, तसतसे शहरातील वातावरणही ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे या विषयावर परिसंवाद रंगू लागले, तसे केबल चालकांच्या मनमानीविरोधात जनक्षोभही उसळू लागला आहे.

बस नाही आणि चालकही

$
0
0
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या साडेसातशे चालकांच्या बळावर शहरात एप्रिलच्या प्रारंभीच १०० नव्या बस आणण्याचे आश्वासन फोल ठरणार आहे. त्यामुळे बस नाही आणि चालकही, असे म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.

मालेगावमध्ये आढळला टीबीचा पहिला पेशंट

$
0
0
सुधारीत क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील टीबी पेशंट बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असली तरीही प्राथमिक प्रतिजैविकांना (अॅण्टीबायोटिक्स) दाद न देणा-या टीबीने (एमडीआर टीबी) आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

आरोग्यशास्त्र शाखांच्या शिक्षकांसाठी नवा अभ्यासक्रम

$
0
0
वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी 'कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन'वर भर देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य शाखेच्या प्राध्यापकांसाठी नवा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठ उत्सुक आहे.

काँक्रिटीकरणामुळे 'नो एण्ट्री'

$
0
0
काँक्रिटीकरणाच्या कामामुळे पंचवटीतील पेठ नाका ते मखमलाबाद नाका दरम्यानचा रस्ता एका बाजूने सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. काँक्रिटीकरणाचे हे काम तीन महिने चालणार असल्याने वाहनधारकांनी मालेगाव स्टँडमार्गे पुढे जाण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले.

शेतक-यांना लवकरच न्याय

$
0
0
ओढा व सय्यदपिंप्री येथील जमीन घोटाळ्यात फसवणूक झालेल्या शेतक-यांना लवकरच न्याय देऊ, अशी ग्वाही नागपूरच्या आमदार शोभा फडणवीस यांनी शनिवारी नाशिकमध्ये दिली. शेतक-यांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल होत असल्याचा प्रश्न गृहखात्याच्या चर्चेत उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाऊणलाख विद्यार्थ्यांनी दिली स्कॉलरशिप परीक्षा

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून चौथी आणि सातवीची स्कॉलरशिप परीक्षा जिल्हाभरात सुमारे पाऊणलाख विद्यार्थ्यांनी दिली. जिल्ह्यातील सुमारे ४७७ केंद्रांवर या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यात ३८८२ टीबीचे पेशंट बरे

$
0
0
जिल्ह्यात २०१२-१३मध्ये टीबीचे २ हजार ८६५ पेशंट आढळले असून त्यापैकी ९२ टक्के पेशंट पूर्णत: बरे झाले आहेत. तर ६७ पेशंटचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा टीबी अधिकारी डॉ. कपील आहेर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>