Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जिल्ह्यात पावसाची हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर जिल्ह्यातील ब‌‌हुतांश भागाता पावसाने हजेरी लावली. सिन्नर, इगतपुरीत तालुक्यात एक ते दीड तास संततधार सुरू होती. तसेच नाशिक तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकामांना वेग येणार आहे.

आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या सिन्नर तालुक्यात रविवारी पावसाने अर्धा ते पाऊण तास हजेरी लावली. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सिन्नर शहरासह तालुक्याच्या विविध भागात पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. एक जूनपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोसळलेल्या पावसाने मुंबईत रेकोर्ड ब्रेक केले. मात्र सिन्नर तालुका मात्र अपवाद ठरला होता. नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.

शेतकऱ्यांनी शेताची मशागत करून पेरणीची तयारी केलेली असतांना पावसाने मात्र पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची घालमेल सुरू होती. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अर्धा ते पाऊन तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सिन्नर तालुक्यात पेरण्यांना सुरुवात होईल असे संकेत शेतकऱ्यांकडून वर्तवले जात आहेत.

इगतपुरी तालुक्यातील एक ते दीड तास पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पेरणीयोग्य पावसामुळे शेतकामांची लगबग वाढणार आहे. जिल्ह्यातील इतर भागातही पावसाने हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये पावसाची हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिककरांना प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने रविवारी जोरदार आगमन केले. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, शहरवासियांनीही पहिल्या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लूटला. पाच दिवस जिल्ह्यासह मराठवाड्यात चांगला पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरवर्षी जिल्ह्यात साधारणत: सात जूनला मान्सूनचे आगमन होते. परंतू यंदा जूनच्या पंधरवड्यापर्यंत जिल्ह्यातील काही भागात पावसाचा हलकासा शिडकावा झाला. खरीप पिकांसाठी फायदेशीर ठरणारे मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. शहरात आणि जिल्ह्यातही काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे आज ना उद्या नक्की पाऊस पडेल या आशेवर नाशिककर पावसाची वाट पाहत होते. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा गेले १४ दिवसपासून भ्रमनिरास झाला होता. आधीच रब्बी हंगामात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने उभी पिके आडवी केल्याने शेतकरी कोलमडला आहे. अशातच मान्सूनचा पाऊसही परीक्षा पाहू लागल्याने त्यांची चिंता वाढली होती. अखेर रविवारी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील इगतपूरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवणसह शहरातील सर्वच भागात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड तास सुरू असलेल्या पावसात भिजण्याचा आनंद नागरिकांनी लुटला.

जिल्ह्यात आज कमाल ३२ आणि किमान २३.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो महाराष्ट्राकडे आतल्या बाजूला सरकल्याने पाच दिवसांत नाशिक चांगला पाऊस पडेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापक देताहेत गावोगावी व्यायामाचे धडे

$
0
0

स्वःखर्चातून उभारताहेत गाव तेथे व्यायामशाळा

संदीप देशपांडे, मनमाड

ग्रामीण भागातील तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी, तसेच खेड्यापाड्यातून पोलिस व सैन्य दल भरतीसाठी सक्षम तरूण घडावे, यासाठी चांदवड येथील नेमिनाथ जैन शिक्षण संस्थेच्या प्राचार्य व प्राध्यापकांनी गाव तिथे दरवर्षी व्यायामशाळा हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत आतापर्यंत चांदवड तालुक्यातील तीन गावात प्राध्यापकांनी स्वःखर्चातून व्यायामशाळा उभारल्या आहेत.

क्रीडा प्रशिक्षक व उपप्राचार्य दत्ता शिंपी यांची कल्पकता व व्यायामाबद्दलची तळमळ तसेच संस्था पदाधिकाऱ्यांसह प्राचार्य डॉ. जी. एच. जैन यांची मोलाची साथ लाभत आहे. यामुळे हा लक्षवेधी उपक्रम ग्रामीण भागातून उत्तम व्यायामपटू घडवित आहे. स्वतःच्या खिशाला कात्री लावून प्राध्यापक वर्ग समाजासाठी काही करतोय. सामाजिक बांधिलकी जपतोय हे चित्र सुखावह आणि नजरेत भरणारे आहे.

गेल्या काही वर्षांपासून चांदवड महाविद्यालयाचा दरवर्षी एक व्यायामशाळा हा उपक्रम जाणीवपूर्वक सुरू आहे. ग्रामीण भागात व्यायामाची अद्ययावत साधने प्राध्यापकांच्या आर्थिक योगदानातून आणून तरुणांना शरीरसंपदा कमवण्याचे धडे दिले जात आहेत. तालुक्यातील दिघवद, गणूर आणि पन्हाळे या तीन गावात चांदवड महाविद्यालयातर्फे प्राध्यापकांच्या खर्चातून व्यायामशाळा उभारण्यात आल्या आहेत. डॉ. जैन आणि प्रा. शिंपी आणि प्राध्यापकवृंदाच्या या सामाजिक जाणिवेमुळे तरूणवर्ग व्यायामाकडे वळला आहे. शेकडो मुले शरीरसंपदा कमवित आहेत. पोलिस दलात जाण्याची इच्छा असणाऱ्या तरुणींची संख्या ही कमी नाही हे महत्त्वाचे.

ग्रामीण भागात व्यायामशाळा उभारण्याचा विडा उचलणारी ही सेवाभावी प्राध्यापकांची फौज आता राहुड, आडगाव, हरसूल या गावातही लवकरच हा उपक्रम राबविणार आहे. तुम्ही आम्हाला खोल्या उपलब्ध करून द्या, आम्ही अद्ययावत साहित्य देतो आणि गावात व्यायामशाळा उभारतो ही योजना खरोखरच कौतुकास्पद आहे.

व्यायामाचे महत्त्व जाणूनच ग्रामीण भागात व्यायामशाळा हा उपक्रम सुरू केला. संस्थाचालक, प्राचार्य, सर्व प्राध्यापकांच्या सक्रिय सहभागातून उपक्रम यशस्वी होतोय. उत्तम खेळाडू, पोलिस, सैनिक घडत आहेत याचे समाधान वेगळेच आहे. - प्रा. दत्ता शिंपी, चांदवड महाविद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौथ्या दिवशीही रेल्वे प्रवाशांचे हाल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे सलग चौथ्या दिवशीही मध्यरेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली. काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या तर, काही गाड्या लेट आल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. पावसाचा जोर वाढल्याने रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांने सांगितले.

मुंबईतील पावसामुळे महानगरी एक्स्प्रेस, पटना सुपर एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई फैजाबाद एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. गेल्या दोन दिवसापासून लखनऊहून सुटलेली लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस पंचवीस तास लेट होत इगतपुरीला पोहाचली. सोमवारीही सोडचार तास लेट झाला. गोरखपूर दादर दीड तास तर कामख्या-पुणा एक्स्प्रेही दीड तास लेट होती.

पावसामुळे गाड्या लेट होत असताना कसारा स्‍थानकाजवळ भुसावळकडे जाणारी मालवाहू गाडी तांत्रिक कारणाने बंद पडल्याने पवन एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस व मंगला लक्षव्दीप एक्स्प्रेस एक तास लेट झाल्या. तथापि, पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस व राज्यराणी एक्स्प्रेस सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत चौदा गावांचा तुटला संपर्क

$
0
0

मुसळधार पावसामुळे दळणवळण, वीजपुरवठा, वैद्यकीय सेवा ठप्प‍

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात रविवार रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दारणा नदीपात्रात अचानक वाढ झाल्याने घोटी-काळुस्ते मार्गावरील पर्यायी मार्गावरील रस्ता वाहून गेल्याने वाहतूक खंडित झाली. यामुळे काळुस्ते-कांचनगावसह चौदा गाव, वाड्यापाड्यांचा तालुक्यासह घोटी शहराशी संपर्क तुटला आहे.

इगतपुरी तालुक्यात रविवार रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने दारणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले. दारणा, भाम, वाकी नद्या मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्या आहेत. दारणा नदीवरील घोटी-काळुस्ते मार्गावर गेल्या वर्षभरापासून पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी तूर्त या मार्गावर भराव टाकून पर्यायी रस्त्यावरून वाहतूक सुरू होती. जोरदार पावसामुळे व नदीच्या प्रवाहामुळे पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेल्याने काळुस्ते-कांचनगावसह एकूण चौदा गावांची वाहतूक व्यवस्था अचानक कोलमडली. आता या परिसरातील चौदा गावे वाड्यापाड्यातील नागरिकांचा घोटीशी व तालुक्याशी पूर्णतः संपर्क तुटला आहे. वैद्यकीय सेवा, वीजपुरवठा, वाहतूक या सेवा ठप्प झाल्या आहेत.

या परिसरातील काळुस्ते, कांचनगाव, भरवच, निरपन, तळोघ, शेनवड, खडकवाडी, औचितवाडी, जुनवनेवाडी आदी चौदा गावे वाड्यापाड्यातील नागरिकांचा घोटी व इगतपुरी तालुक्याशी संपर्क तुटला आहे. यामुळे नागरिकांना आता अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. इगतपुरी तालुक्यात सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात पावसाने जवळपास एका दिवसात शतक गाठले आहे. अर्थात ४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या संततधार व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील दारणा, वाकी, भावली, भाम या नद्या जोर धरून वाहत आहे. त्यामुळे काही बंधारे व तलावांमध्ये काहीसा साठा तयार झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. या

पावसाने संपूर्ण तालुका पिंजून काढल्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे.

पंचायत समितीचे उपसभापती पांडूरंग वारुंगसे, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, तहसीलदार संघमित्रा बाविस्कर, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, मनसे तालुकाप्रमुख भगीरथ मराडे, पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, कृउबा संचालक सुनील जाधव, माजी सभापती रामदास घारे, कांचनगाव उपसरपंच रामदास गव्हाने आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा अहवाल घेतला. या भागातील नागरिकांसाठी तत्काळ पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली.आश्चर्याची बाब म्हणजे काही शाळकरी मुलांनी नव्या पुलाच्या अर्धवट भागाला लाकडी शिडी बांधून तात्पुरती येण्या जाण्याची वाट सुखकर केली.

उन्हाळ्याच्या कालावधीतच ठेकेदाराने काम गतीने केले असते तर आज हा प्रसंग निर्माण झाला नसता. या घटनेला व प्रसंगाला ठेकेदार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. - पांडूरंग वारुंगसे, उपसभापती, पंचायत समिती

पावसामुळे जवळपास चौदा गावांचा संपर्क तुटला आहे. शिक्षण, आरोग्य, दळणवळण, वीजपुरवठा आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तत्काळ खैरगाव मार्गे असणारा पर्यायी मार्ग मजबूत करून वाहतूक सुरळीत करावी. - भगीरथ मराडे, मनसे तालुकाप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोट्या नोटांवर गर्व्हनरची खरी सही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

खाऊच्या दुकानातून सोरटच्या खेळण्यामधून चिमुकले मटका जुगाराच्या विळख्यात अडकले जात आहेत. सोरट नावाच्या या खेळावर तत्काळ प्रतिबंध घालण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे या खेळात मिळणाऱ्या नकली नोटांवर महात्मा गांधी यांच्या फोटोसह भारतीय रिर्झव बँकेचे तत्कालीन गर्व्हनर बिमल जालान यांची मूळ सही छापण्यात आली आहे. या नोटा केंद्रीय सरकार द्वारा प्रत्याभूत असा मजकूर आणि अशोकस्तंभाची मुद्रा उमटविण्यात आली.

लहान मुलांना खाऊकडे आकर्षित करण्यासाठी सोरट सारखा खेळ शालेय विद्यार्थ्यांवर परिणाम करणारे ठरत आहेत. खेळण्यातून अवैध व अनैतिक संस्कार रुजविले जात आहे. यातून मुलांना मटका जुगाराची ओळख केली जात आहे. त्यामुळे सोरट खेळ बंद करून त्याच्या विक्रीवर थांबविण्याची मागणी जागरुक पालकांकडून केली जात आहे. पोलिसांनी आता पुढे येऊन लहान मुलांसाठी बाजारातील सोरटचे उत्पादनच बंद करण्यासाठी योग्य आणि ठोस उपाययोजना कराव्यात व नकली नोटांवर गर्व्हनर यांची मूळ सही, वचन व अशोकस्तंभचा मोहर छापल्याबद्दल उत्पादकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांचा संप कायदेशीरच

$
0
0

डॉ. कराड यांचा दावा; व्यवस्थापन भूमिकेवर ठाम

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

अंबड एमआयडीसीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत सुरू असलेल्या कामगारांच्या कामबंद आंदोलनाचा लढा कायदेशीर असल्याचा दावा कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी केला आहे. दरम्यान, कामगारांनी कामावर हजर व्हावे, अशी नोटीस कंपनी व्यवस्थापनाने बजावली आहे.

गेल्या ४३ दिवसांपासून अंबड एमआयडीसीतील क्रॉम्प्टन कंपनीतील कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु आहे. यासाठी सिटूचे कामगारनेते डॉ. कराड यांनी कामगारांचे आंदोलन कायदेशीरच असल्याचा दावा केला आहे. आयटक युनियन व कंपनी व्यवस्थापन यांच्या संगनमताने सोयिस्करपणे न्यायप्रविष्ठ बाब दाखवित कामगारांना वेठीत धरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आयटक प्रणित युनियन नको असल्याचे कामगारांनी डिसेंबर २०१३ मध्येच स्पष्ट करीत सिटू प्रणित युनियनचे सभासत्व स्वीकारलेे. कंपनी व्यवस्थापन व आयटक प्रणित युनियन यांनी कुठलाही करार केला तो सिटू प्रणित युनियनच्या कामगारांना मान्य राहणार नसल्याचे लेखी पत्र कंपनी व आयटक प्रणित युनियनला देखील देण्यात आल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. जुलै २०१४ मध्ये कामगारांनी सिटू प्रणित युनियनला मान्यता मिळावी यासाठी न्यायालयात मागणी देखील केली. यात ४०० पेक्षा अधिक कामगार आपल्याकडे आहेत. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन वेठीस धरत असल्याचा आरोप डॉ. कराड यांनी केला आहे.

नाशिकमध्ये आडमुठेपणा

मुंबईतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज ग्रुपच्याच कंपनीत मान्यता प्राप्त युनियन सोडून दुसऱ्या युनियनशी करार झाला आहे. आयटक व कंपनी व्यवस्थापन यांच्या संगणमताने आंदोलनकर्त्या कामगारांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप डॉ. कराड यांनी केला. याप्रसंगी आर. सी. पांडे, सिताराम ठोंबरे, अॅड. वसुधा कराड उपस्थित होते.

व्यवस्थापनाकडून नोटीस

कामगारांनी कामावर येण्यासाठी पहिल्या दिवसापासून नोटीस दिली असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले. परंतु, आंदोलनाबाबत स्थानिक पातळीवर कंपनी व्यवस्थापन बोलणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्रांतीनंतर पंचवटी, गोदावरी रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

तीन दिवसांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर पंचवटी, गोदावरी, राज्यराणी या रेल्वे गाड्या सोमवारी मुंबईला रवाना झाल्यामुळे चाकरमान्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या सलग चौथ्या दिवशी रद्द करण्यात आल्या.

नाशिकमध्ये पावसाने जोर धरला असला तरी मुंबईतील परिस्थिती सामान्य झाली. त्यामुळे पंचवटी, गोदावरी आणि राज्यराणी या गाड्या मुंबईला रवाना झाल्या. सलग तीन दिवस गाड्या रद्द झाल्यामुळे अप-डाऊन करणाऱ्या नोकरदारांना लेटमार्क पडला होता. व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले होते. त्यांनी आता समाधान व्यक्त केले.

मुंबईला जाणाऱ्या महानगरी, पटना सुपर, फैजाबाद, लखनौ, सुपर, कामायनी, पवन, कृषिनगर, अमृतसर या तर मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन बरेली, फैजाबाद, मुंबई-भुसावळ पॅसंजेर नंदीग्राम, गोदान या गाड्या रद्द झाल्या. अपची काशी एक्स्प्रेस दोन तास, लखनौ मुंबई एक्स्प्रेस पाच तास तर पुष्पक एक्स्प्रेस चार तास उशिराने धावत होती. डाऊनची पुष्पक एक्स्प्रेस आठ तास, पवन व कामायनी एक्स्प्रेस पंधरा ते वीस मिनिटे लेट धावत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कश्यपीचा पुनर्वसन तिढा

$
0
0

धरणातून पाणी उचलू न देण्याचा संघर्ष समितीचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक तालुक्यातील कश्यपी धरणासाठी आदिवासींच्या जमिनी संपादित करून त्यांना भूमिहीन करणाऱ्या नाशिक महापालिका व पाटबंधारे खाते कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनसाठी मूग गिळून बसले आहेत. २० वर्षांचा कालावधी लोटून गेल्यानंतरही प्रकल्पग्रस्तांना नोकरीची संधी, नुकसानभरपाई वा मोबदला मिळालेला नाही. याबाबत वेळोवेळी दिलेल्या निवेदनांना केराची टोपली दाखविली गेली. तातडीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन न झाल्यास कश्यपी धरणातून एक थेंब पाणी घेऊ देणार नाही, असा इशारा कश्यपी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय घोटे यांनी सोमवारी मीडिया सेंटर येथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत दिला.

आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राज्य घटनेच्या अनुच्छेद २४४ (१) नुसार पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा कायदा १९९६) राष्ट्रपतींनी मंजूर करीत सार्वजनिक हिताचे प्रकल्प उभारणीसाठी आदिवासींच्या जमिनी संपादित करण्यापूर्वी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, नुकसानभरपाई व मोबदला त्वरित देणे, प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आराखडा तयार करून त्यावर अंमलबजावणी करणे, अशा तरतुदी कायद्यात आहेत.

अशा विविध तरतुदी `पेसा` कायद्यात असताना महापालिका व पाटबंधारे खात्याकडून पूर्णपणे पाठ फिरवण्यात आली आहे. याकडे लक्ष वेधत संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांनी खाड्याचीवाडी, गाळोशी, देवरगाव, धोंडेगाव आदी गावांच्याबाबतीत पुनर्वसन करताना पाणीपुरवठा, प्राथमिक शाळा, वीजपुरवठा, खळवाडी गायरान उपलब्ध करून देण्याबरोबरच गावठाण विस्तारासाठी जमीन, गावातील रस्ते व मोरी बांधणे, माध्यमिक शाळा व त्यासाठी जमीन, सार्वजनिक इमारतीसाठी जमीन आदी विविध सुविधा कश्यपी धरण प्रकल्प पूर्ण होण्याआधी प्रकल्पग्रस्तांना मिळायला हव्या होत्या. मात्र, तसे झाले नाही.

पत्रकारपरिषदेस सोमनाथ बेंडकुळे, राजेश गायवाड, एकनाथ भोये, सोमनाथ मोंढे आदींसह प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्कल्प्चर’ अभ्यासक्रमाची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‍कलेच्या प्रांतामध्ये करिअर करण्यासाठी नाशिकमध्येही विद्यार्थ्यांना पर्याय खुले झाले आहेत. पुणे विद्यापीठाच्या स्तरावर शिल्पकला (स्कल्प्चर) अभ्यासक्रमासाठी के. के. वाघ कला कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठस्तरावर हा अभ्यासक्रम या एकमेव कॉलेजमध्ये उपलब्ध असल्याची माहिती प्राचार्य बाळ नगरकर यांनी दिली.

ग्रामीण, आदिवासी, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी सवलतीही देण्यात येतात. इयत्ता दहावी आणि बारावी नंतरचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये १० वीनंतर जी .डी. आर्ट (चित्रकला, रंगकला, शिल्पकला) या विषयांचा समावेश आहे. तर बारावीनंतर एटीडी पदविकाल, बीएफए पदवी, मास्टर डिग्री करून एम.एफ.ए. व डॉक्टरेटपर्यंत शिक्षण घेण्याचेही पर्याय या अभ्यासक्रमात येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे उपलब्ध आहेत. पेंटिंग, शिल्पकला, मेटल आर्ट इंटेरिअर विभाग आदी विभागांमध्ये करिअरच्या संधी आहेत.

कुठे ‌मिळेल संधी?

अध्यापन क्षेत्रात कलाशिक्षक, केंद्रीय विद्यालय, प्राध्यापक, वस्तुसंग्रहालय, पुरातत्व विभाग, प्रसिध्दी जिल्हा अधिकारी कार्यालय, सरकारी सिक्युरीटी प्रेस, दूरदर्शन फिल्म डिव्हीजन, फॅशन डिझाईनिंग, जाहीरात क्षेत्र, मीडिया क्षेत्र, ले आऊट डिझायनर, स्वतंत्र चित्रकार, आर्ट गॅलरी संचालक, स्टेज डेकोरेशन, नाट्य क्षेत्र.

पात्रता : दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण

कला क्षेत्राकडे मनस्वी कल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. मुळात कलेचा पिंड, वारसा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कलेच्या प्रांताला अभ्यासपूर्णता आणि झोकून देऊन सृजनाची जोड दिल्यास उत्तम करिअर घडू शकते. - बाळ नगरकर, अधिष्ठाता, ललित कला महाविद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असे निवडा फार्मसी कॉलेज

$
0
0

गोखले कॉलेजमध्ये आज खुले चर्चासत्र

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फार्मसी क्षेत्रामधील करिअरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज (दि. २३) गोखले फार्मसी कॉलेजमध्ये खुल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेजरोडवर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आवारात होणारा हा उपक्रम सकाळी ११ वाजता सुरू होईल. 'महाराष्ट्र टाइम्स' या उपक्रमाचे मीडिया पार्टनर आहे. बॅचलर ऑफ फार्मसी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशापासून पूरक माहिती विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे.

फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना पूर्ण करावी लागणारी प्रक्रिया, कॅप राऊंड, कौन्सिलिंग राऊंड, प्रवेशाचे निकष, कागदपत्रांची उपलब्धता, कॉलेजची निवड करताना उपलब्ध पर्याय, योग्य कॉलेजची निवड, तंत्रशिक्षण विभागाचे कॉलेजेससाठी असणारे निकष आदी मुद्यांवर यावेळी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहेत.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च येथे हा उपक्रम होईल. बीवायके कॉलेज नजीकच्या पेट्रोल पंपासमोरील प्रवेशद्वारातूनही विद्यार्थी व पालकांना या सत्रासाठी प्रवेश देण्यात येईल.

फार्मसी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कौशल्याधिष्ठीत मनुष्यबळाचीही मागणी वाढते आहे. परिणामी करिअरसाठी अनुकूल असणाऱ्या या क्षेत्रामधील संधी आणि आव्हाने या मुद्यांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.

अभ्यासक्रम

डिप्लोमा इन फार्मसी (डीफार्म - कालावधी : २ वर्षे), बॅचलर ऑफ फार्मसी (बीफार्म - कालावधी : ४ वर्षे), मास्टर ऑफ फार्मसी (एमफार्म - कालावधी : २ वर्षे) आणि पीएचडी हे औषधनिर्माणशास्त्रातील प्रमुख अभ्यासक्रम आहेत. फार्म डी हा नवीन अभ्यासक्रम प्रचलित होत आहे. हा सहा वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी, क्लिनिकल फार्मसी आदी विषय यात आहेत.

फार्मसी क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते भविष्यातील संधींबाबत आजच्या मार्गदर्शन सत्रात माहिती देण्यात येईल. - सुनिल अमृतकर, प्राचार्य, सर डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ ‍फार्मसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा घरपट्टी माफीचा निर्णय हवेतच

$
0
0

मराठी शाळांची महापालिकेकडून उपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्व मराठी शाळांना घरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव माजी महापौर अॅड. यतीन वाघ यांनी मागील वर्षातील म्हणजेच २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात मंजूर केला होता. या निर्णयाचे शहरात सर्वस्तरांतून स्वागत करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याचे दिसून येत आहे.

मराठी शाळांचे संवर्धन हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये यावे, यासाठी नेहमीच विविध स्तरांकडून प्रयत्न केला जातो. या शाळांना वेगवेगळ्या स्तरांवरुन निर्माण होणारा आर्थिक पेच हा त्यांच्या मिळकतीच्या तुलनेत डोईजड ठरतो. त्यातच दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद असल्याने विद्यार्थ्यांकडूनही कोणतेही अर्थसहाय्य मिळवण्याची सोय शाळांना उरलेली नाही. हा भार कमी करण्यासाठी मराठी शाळांना घरपट्टीबाबत ५० टक्के सवलत देण्याचा सरकारचा नियम आहे. मात्र, उर्वरित ५० टक्क्यांचा बोजाही या शाळांसाठी जड असल्याने ही सवलत शंभर टक्के असावी, यासाठी मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी मराठी शाळांना शंभर टक्के घरपट्टी माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मागील अर्थसंकल्पात सादर केला होता. महासभेत या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली होती. मात्र, दीड वर्षाचा काळ लोटूनही हा निर्णय कागदावरच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या शाळा अद्यापही उपेक्षितच असल्याचे चित्र समोर आले आहे.

या प्रस्तावामुळे पडणारा जादा भार भरून काढण्यासाठी मद्यावर दोन टक्के व सिगारेटवर एक टक्का जादा कर वसूल करण्याचा उपायही यातून शोधला गेला. शाळांना दुर्लक्षित ठेवून यांवरील कर मात्र वसूल केला जात आहे. त्यातून १६ कोटी रुपयांची मिळकतही महापालिकेच्या खिशात गेली. मात्र शाळांसाठी केलेली घरपट्टी माफीची घोषणा केवळ घोषणाच राहिली. त्याची कृती झाली नाही. या शाळांच्या संवर्धनासाठी आयुक्तांनी त्वरित या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शालेय संघटना करीत आहेत. त्यामुळे घरपट्टी, वीजबिल भरा किंवा शाळा बंद करा अशी दयनीय परिस्थिती मराठी शाळांवर ओढावली आहे. केवळ काही समाजसेवकांच्या व मराठी हिताच्या दृष्टीने प्रयत्नशील असणाऱ्या देणगीदारांमुळे मराठी शाळा श्वास घेत आहेत, असे चित्र यानिमित्ताने दिसून येत आहे.

मराठी शाळांना अशा प्रकारच्या आर्थिक बोज्यापासून मुक्त करणे गरजेचेच आहे. त्यांच्या मिळकतीपेक्षा खर्च अधिक असल्याचे दिसून येत असल्याने या शाळांच्या अस्तित्त्वाबद्दल शंका उपस्थित होते. शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. - मनोज पिंगळे, अध्यक्ष, रविंद्र प्रसारक विद्यामंदिर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतीक्षा दुसऱ्या कट ऑफची!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पहिल्या कट ऑफ लिस्टने स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे डोळे विस्फारल्यानंतर या यादीत समावेश नसलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची भिस्त आता दुसऱ्या यादीवर आहे. पहिल्या यादीतील प्रवेशांना आजपासून (ता. २३) सुरूवात होत असून, २५ जूनपर्यंत हे प्रवेश होतील. तर शुक्रवारी (ता. २६) दुसरी कट ऑफ लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे.

पहिल्या यादीच्या उच्चांकाच्या परिणामी दुसऱ्या कट ऑफ लिस्टमध्येही अटीतटीची स्पर्धा कायम राहणार आहे. दुसऱ्या यादीत सायन्सचा टक्का ९४ हून ९० टक्क्यांच्या खाली तर कॉमर्स शाखेच्या प्रवेशाचा टक्का ८६ हून ८२ टक्क्यांच्या खाली घसरण्याची शक्यता आहे.

आरवायके सायन्स

९३.८० % (ओपन), ९३.०० % (ओबीसी), ९०.४० % (एसबीसी) ९१.६० % (एनटी डी), ८७.०० % (एनटी सी), ८८.४० % (एनटी बी), ८७.०० % (व्हीजे), ७९ % (एसटी), ८९ % (एससी)

बीवायके कॉमर्स कॉलेज

८६.६०%(ओपन) ८२.००%(ओबीसी)

भोसला सायन्स

८९.६ % (ओपन)

भोसला कॉमर्स

८२.४ % (ओपन)

पंचवटी कॉलेज सायन्स

८३.०४ % (ओपन)

पंचवटी कॉमर्स

७० %

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिमंदांसाठी ‘मुक्त’ घेईना गती!

$
0
0

वंचित मुलांसाठी अभ्यासक्रमच नाही; पालकांची होतेय परवड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वंचितांसाठी शिक्षण हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे खऱ्या वंचितांच्या शिक्षणाची मात्र कोणतीही सोय नसल्याचे समोर येत आहे. गतिमंदांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या घटकांना शिक्षण देण्यासाठी कोणताच अभ्यासक्रम अस्तित्त्वातच नसल्याची परिस्थिती मुक्त विद्यापीठात आहे. त्यामुळे वंचितांसाठी शिक्षण ही टॅगलाइन घेऊन मुक्त विद्यापीठाने वावरावे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

१९८९ साली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी आपल्या कल्पक दृष्टीने आणि कार्यपद्धतीने बहुमाध्यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत लोकांना त्यांच्या गरजेची कौशल्ये प्राप्त करून घेण्यासाठी आवड, सवड व निवड याला प्राधान्य देणारे अभ्यासक्रम तयार केले. त्यामुळे या विद्यापीठात नवनवीन अशा शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. आजमितीला मुक्त विद्यापीठात शेकडो अभ्यासक्रम आहेत. केस कापण्यासाठीच्या अभ्यासक्रमापासून चप्पल शिवण्यापर्यंतच्या अभ्यासक्रमांमध्ये मात्र गतिमंद मुलांसाठीच्या एकाही अभ्यासक्रमाची भर आजतागायत कुणी टाकलेली नाही याचे गतिमंद मुलांच्या पालकांना आश्चर्य वाटत आहे.

आपल्या मुलाला शिकवायचे कोठे, असा मोठा प्रश्न गतिमंद मुलांच्या पालकांसमोर असतो. कारण सामान्य मुलांच्या शाळेत गतिमंद मुलांना प्रवेश दिला जात नाही. तेथे गेल्यानंतर या मुलांना भेदभावाची वागणूक मिळण्याची अधिक शक्यता असल्याने तेथे या मुलांना प्रवेश घेण्यासंबंधी पालक नाराजच असतात. किंबहुना सामान्य बुध्दी असलेल्या मुलांच्या शाळांमध्ये या मुलांना प्रवेश नाकारलाच जातो, अशावेळी खास या मुलांसाठी ज्या शाळांचे निर्माण केलेले असते. त्यांना प्राधान्य दिले जाते. मात्र, तेथील फी एखाद्या पालकाला परवडत नसल्यास व मुलाला शिकविण्यासाठी दुसरा पर्यायच उपलब्ध नसल्यास काय करावे असा मोठा प्रश्न पालकांसमोर पडतो. त्यामुळे वंचितांसाठी शिक्षण असा नारा देणाऱ्या मुक्त विद्यापीठाकडे सर्व पालकांच्या नजरा वळतात. परंतु तेथे अशा कोणत्याही प्रकारचे शिक्षण नसल्याचे समोर येत असल्याने पालकांची घोर निराशा होत आहे. मुक्त विद्यापीठात पदवीपासून पुढील शिक्षण देण्यात येत असले तरीही त्या शिक्षण कायद्यात बदल करून गतिमंद मुलांसाठी एखादा शिक्षणक्रम प्रचलित करावा अशी मागणी पालकांनी केली आहे.

पालकांचे संघटन

'आमच्या मुलांना शिकवून मोठे करायचे हे आमचे स्वप्न होते. परंतु, त्यासाठी त्यांना कोणत्या शाळेत टाकावे हा मोठा प्रश्न आमच्यासमोर पडला. सामान्य मुलांच्या शाळेत त्यांना टाकणे शक्य नाही. गतिमंद मुलांच्या शाळेत टाकण्याइतका खर्च आम्हाला पेलवणार नव्हता. अशावेळी शेवटचा आशेचा किरण म्हणून आम्ही मुक्त विद्यापीठाकडे चौकशी केली असता अशा प्रकारचे कोणतेही अभ्यासक्रम आम्ही शिकवित नसल्याचे त्यांनी सांगितले. ते ऐकून वाईट वाटले, अशी प्रतिक्रिया एका पालकाने व्यक्त केली. तर आमच्या मुलांनी शिकण्यासाठी कोठे जावे? असा सवाल आणखी एका पालकाने केला. शंभराहून अधिक पालकांनी एकत्र येत नाशिकमध्ये संघटन केलेले आहे. या मुलांना शिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असे या संघटीत झालेल्या पालकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांचा आदेश निलंबित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेचे महापौर अशोक मुर्तडक यांनी विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीच्या कविता कर्डक यांची केलेली नियुक्ती राज्य सरकारने बेकायदेशीर ठरवली आहे. महापौरांचा आदेश नगरविकास विभागाने निलंबित केला असून, पंधरा दिवसात नव्या विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे मनसेसह राष्ट्रवादीला मोठा झटका बसला असून, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

१८ मार्च २०१५ रोजी झालेल्या महासभेत महापौरांनी तत्काल‌ीन विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांचे पद काढून राष्ट्रवादीच्या कविता कर्डक यांची विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्ती केली होती. त्याला बडगुजर यांनी नगरविकास विभागाकडे आव्हान दिले होते. नगरविकास विभागाने आयुक्तांकडून पक्षनिहाय बलाबल मागवल्यानंतर मनसेच्या संख्याबळानंतर विरोधात पहिल्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना आरपीआयचे २२ सदस्य आहेत. त्यामुळे २० सदस्य असलेल्या राष्ट्रवादीला हे पद देणे महापालिका नियम १९४९,४५ (१)चा भंग असल्याने महापौरांचे आदेश निलंबित केले आहेत.

सोबतच पंधरा दिवसात विरोधी पक्षातील सर्वात मोठ्या पक्षाच्या सदस्याची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी असे आदेश काढले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मनसेसह राष्ट्रवादीला फटका बसला आहे. तर शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला असून, सुधाकर बडगुजर यांची पुन्हा विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूसंपादनाचे ‘वादळी’ प्रस्ताव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थातील भूसपांदनाच्या विषयांचा भरणा अधिक असल्याने उद्या (दि.२४) होणारी स्थायी समितीची बहुप्रतिक्षित बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. विशेषतः रस्त्यांच्या भूसंपादनाचे विषय अधिक असल्याने सदस्य आणि प्रशासन आमने सामने ठाकणार आहे. तसेच कामांच्या प्रस्तावांवरून नगरसेवकही आक्रमक होण्याची शक्यता आहे.

स्थायी समितीची बैठक सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी होणार आहे. गंगापूर रोडवरील क्रीडांगणासाठी १५ कोटी आणि चुंचाळे घरकुल योजनेच्या जागेच्या मोबदल्यापोटी १७ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायीवर ठेवण्यात आला आहे. एकीकडे कोटीची उड्डाने सुरू असताना नगरसेवकांच्या कामांचे प्रस्ताव येत नसल्याने नगरसेवक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सिंहस्थाच्या भूसंपादन प्रस्तावांसह, रस्ते, शाळा, आणि क्रीडांगणाच्या जागांच्या भूसंपादनाचे प्रस्ताव चर्चेला येणार आहेत.

सर्वाधिक प्रस्ताव आरक्षणापोटी भूसंपादनाचे आहेत. यातील अनेक प्रस्ताव न्यायालयाच्या आदेशाने करावे लागणार आहेत. त्यांचा मोबदलाही द्यावा लागणार आहे. वडाळा येथील शाळा, क्रीडांगण, दवाखाना याच्या जागेपोटी सहा कोटी रुपयांचा मोबदला देण्याचा प्रस्ताव आहे. सोबतच गंगापूर रोडवरील क्रीडांगणासाठी १५ कोटी आणि चुंचाळे घरकुल योजनेच्या जागेच्या मोबदल्यापोटी १७ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायीवर ठेवण्यात आला आहे.

अनेक प्रस्ताव हे बिल्डरांचेच आहेत. त्यामुळे नगरसेवकांकडून त्यांना विरोध होण्याची शक्यता आहे. नगरसेवकांच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीला न येता भूसंपादनाचेच प्रस्ताव कसे येतात असा सवाल सदस्यांनी केला आहे. त्यामुळे ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. या सोबतच शहरातील गाळ्यांचे लिलाव की दरवाढ संदर्भातील प्रस्तावही चर्चेसाठी येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री २७ ला नाशिक दौऱ्यावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या २७ जूनला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. स्वच्छतेसंदर्भात भोसला मिलिटरी स्कूलच्या वतीने आयोजित बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

येत्या १ जुलै रोजी गोदावरीच्या स्वच्छतेसंदर्भात मोहीम राबविली जाणार आहे. त्याची तयारी केली जात असून, त्याचा आढावा घेतला जाणार आहे. सोबतच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा आढावाही मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू असून, माहितीची जमवाजमव सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागांच्या मोबदल्यासाठी ५० कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र बँकेकडून सुमारे १०.२५ टक्के व्याजदराने हे कर्ज घेण्यात येणार आहे. तसेच बीओटी तत्त्वावर महत्त्वाच्या ठिकाणी जाहिरात फलक लावण्याचा प्रस्तावही चर्चेला येणार आहे.

राज्य सरकारने महापालिकेला ४५० कोटी रुपये कर्ज उभारण्याला मंजुरी दिली आहे. त्या अंतर्गत सिंहस्थाच्या भूसंपादन कामांसाठी ५० कोटींचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या कर्जासाठी बँकाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यात महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, देना बँकेकडून प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक कमी व्याजदर महाराष्ट्र बँकेन आकारला आहे. महाराष्ट्र बँकेने १०.२५ टक्के व्याजदराने १५ वर्षांसाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क न आकारता कर्ज देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे लेखा विभागाकडून महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवला आहे. त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता असून, भूसंपादनाचे देणी देणे महापालिकेला सोपे होणार आहे.

जाहिरात फलक बीओटीवर

सिंहस्थात चार महिने प्रमुख मार्गांवर आता बीओटी तत्त्वावर जाहिरात फलक लावण्यात येणार आहे. बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत या विषयीचा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. सिंहस्थात या जाहिरात फलकांवर भाविकांना मार्गदर्शक ठरणारी माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर उर्वरित जागेवर जाहिराती लावण्यास मंजुरी देण्यात येणार आहे. महापालिकेला यातून कोणताही फायदा होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू माफियांना पाचपट दंड

$
0
0

अवैध वाळू वाहतूकप्रकरणी महसूल विभागाचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवैधरित्या वाळूचे उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांकडून आता वाळूच्या बाजारमूल्यापेक्षा पाचपट अधिक दंड वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणे वाळू माफियांना चांगलेच महागात पडणार आहे. विशेष म्हणजे केवळ वाळू वाहतूक करणारी वाहनेच नव्हे तर वाळूच्या उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री देखील यापुढे जप्त केली जाणार आहे.

वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर नियमावली बनवली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ती अंमलात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करावा, असे आदेशच देण्यात आले आहेत. पुण्यात अलीकडेच राज्यातील महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये अवैध गौणखनिज उत्खनन रोखण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या काही महिन्यांत अवैध गौणखनिज वाहतुकीची अनेक प्रकरणे राज्यात उघडकीस आली. महसूलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत वाळू माफियांची मजल गेली. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. वाळूचे अवैधरित्या उत्खनन करणाऱ्यांकडून महाराष्ट्र अ जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८(७) मध्ये दंडाची तरतूद आहे. या तरतुदीत सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी अशी अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून वाळूच्या किमतीच्या तिप्पट दंड वसूल केला जात होता. मात्र २०१५ च्या अध्यादेश क्र. १२ नुसार यापुढे पाचपट दंड वसूल केला जाणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून, नवीन नियमान्वयेच कार्यवाही करावी, असे त्यामध्ये म्हटले आहे.

तिप्पट दंडांच्या माध्यमातून भुर्दंड बसत असूनही अवैधरित्या वाळू तस्करीचे प्रमाण कमी होत नसल्यानेच राज्य सरकारच्या महसूल विभागाने अधिक कठोर होण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाला पाचपट दंड भरण्याऐवजी वैधरित्या वाळूचे ठेके घेऊन व्यवसाय करणेच व्यावसायिकांसाठी फायद्याचे ठरणार आहे.

यंत्रसामग्रीही करणार जप्त

नदीपात्रातून वाळूचा उपसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अवैध यंत्रसामग्री वापरण्यात येते. तसेच उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक करण्यासाठी ट्रक व तत्सम वाहनांचा वापर केला जातो. आतापर्यंत ही वाहतूक करणारी वाहनचे प्रशासनाकडून जप्त केली जात होती. परंतु, आता उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री देखील जप्त करावी, असे आदेश महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंजनेरी संरक्षित क्षेत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

औषधी वनस्पतींसाठी ख्यात असलेल्या आणि नाशिकपासून जवळच असलेल्या अंजनेरी परिसराला आता संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसा निर्णय मुंबईत सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या घोषणेमुळे अंजनेरीचे ५.६९ चौकिमी क्षेत्र संरक्षित होणार आहे.

महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळाची पुर्नरचना केल्यानंतर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक पार पडली. फडणवीस यांच्यासह वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, गृह राज्य मंत्री राम शिंदे, आमदार बंटी भांगडिया व प्रभुदास भिलावेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी वन विभागाचे सचिव विकास खरगे, वन बल प्रमुख अनिल सक्सेना, प्रधान मुख्य वन संरक्षक सर्जन भगत, वन्य जीव मंडळाचे सदस्य बिट्टू सहगल हे या बैठकीला उपस्थित होते.

मंडळाने आज मंजूर केलेल्या प्रस्तावांमध्ये ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य, विस्तारित कर्नाळा अभयारण्य तसेच तोरणमाळ व अंजनेरी संवर्धन राखीव क्षेत्र यांचा समावेश आहे. ठाणे खाडी परिसरात २०५ विविध प्रजातींचे पक्षी तसेच फ्लेमिंगो पक्षी येत असतात. या क्षेत्राला रामसर साईटचा दर्जा मिळवण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

विदर्भातील बोर व्याघ्र प्रकल्प व नवेगाव नागझिरा प्रकल्प यांच्या भोवतीच्या बफर झोनला मान्यता दिली आहे. बोर व नवेगाव-नागझिरा प्रकल्पाभोवतीच्या परिसरात बफर झोन जाहीर करण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली होती. या अधिसूचनेला वन्य जीव मंडळाची मान्यता घेणे बंधनकारक असते. मंडळाने या दोन्ही प्रकल्पांभोवतीच्या बफर झोनला अशी मान्यता दिली आहे. नागपूर व वर्धा जिल्ह्यात असलेल्या बोर प्रकल्पाभोवती ६६१.१६ चौ.कि.मी. तर नवेगाव-नागझ‌िरा प्रकल्पाभोवती १२४७.४६ चौ.कि.मी. क्षेत्राला बफर झोन म्हणून मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण स्थापन केले जावे, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images